मालवणी शिकायचंय? भाग-२

Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31

मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ता दिसताच हा.>> दिसताहा ना..? मगे.. राखेचा१ आन राखेचा२ व्हता म्हणान कित्याक लोकांक मालवणी काय असात ह्ये कळल्यान. नायतर मालवण एक गाव असान एवडोच काय ता म्हाईत व्हता.

कुडाळात बस स्टँडावरच्या पेपरवालीला विचारलं " मालवणी पेपर आहे का?"
"मालवणी पेपर नसता. बोली आसा."
(( गोंयच्या कोकणीत एक पेपर आहे. भांगरभूय.))

*राखेचा१ आन राखेचा२ व्हता म्हणान कित्याक लोकांक मालवणी काय असात ह्ये कळल्यान. * - तां काम किती तरी उत्तमपणे मच्छिंद्र कांबळींच्या ' वस्रहरण ' , ' पांडगो इलो रे इलो ' इ. नाटकानीं आधींच केलेलां !!!

व्हय.. पन नाटकं बघुक खिसा खाली करुक लागता. नाटकाचो एका तिकीटाचो पैशात राखेचा १ अन् २ चो आख्खो सिजन बघुक् मिळता. Proud

*नाटकं बघुक खिसा खाली करुक लागता.* - कांबळींची नाटकां टिवहीवर आनेक वेळां दाखवलेली आसत. ( 'राखेचा' बघूं नकात, असां कोण म्हणता; त्येतला मालवणी बरेचदा चूकीचां असता इतकयांच )

नमसकरानु, तुम्ही म्हणता ता खराच असात. कंबळींचां नाटका टी.वी.वर लागुची त्या टायमाक एकतर माका त्ये काय बोलात ते कळात नशान नायतर आमच्या घराकडे टी.वी. नशा न. राखेचा१ पात्सून माका १०.३० वाजता टी.वी. बघुक टाईम पन मिळुक लगाल्यां अन् त्या शिरेलीन मनाचो ठाव पन घेतल्यानी.

कांबळींचां नाटका टी.वी.वर लागत त्या टायमाक एकतर माका ते काय बोलतत तां कळाच नाय नायतर आमच्या घराकडे टी.वी. नसा
आणि . राखेचा१ पात्सून माका १०.३० वाजता टी.वी. बघुक टाईम पन मिळुक लगलो आणि त्या शिरेलीन मनाचो ठाव पन घेतलो...

Pages