Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भिजले तर घामान ...
भिजले तर घामान ...
माका शिकायची आसा/ माका शिकूक
माका शिकायची आसा/ माका शिकूक व्हई.
काय बरोबर?
माका शिकुची आसा/ माका शिकाक
माका शिकुची आसा/ माका शिकाक व्हयी!
नी, कोकणात जातेस तेव्हा प्रॅ़टीस नाही करत कां??
या वर्षीच्या 'मराठी भाषा
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
(No subject)
ओ विलायती पावण्यांनो तुमका
ओ विलायती पावण्यांनो तुमका नेमक्या सांगूचा तरी काय????????? तुमी आपले नेहमी कायतरी सांगूक बघतास आणि आमका बाय तुमचा बोलना कायेक कळना नाय. आसो तुम्ही खयच्या ग्रहावरचे??
नीलू बाय, त्येंका मालवनी
नीलू बाय, त्येंका मालवनी शिकूची असा. आवशीचो घोव कोन ते इच्यारून बगा आदी.
हे इल्ले पावणे इकुन खावक येतत
हे इल्ले पावणे इकुन खावक येतत इकडे... हेतू शुध्द नाय... तेवां 'आवशीचो घो ...' दुसरां काय..
MAKA MARATHI KASA LIVACHA TA
MAKA MARATHI KASA LIVACHA TA AADI SANGA MAGE MALAVANITSUN LIVTAY.AANI MAKA MALVANI BHASHA LAY AAVADTA PAN MELYANU LIVAKACHA YEYAT NAY.
ओ परब मॅडम थय गजालेर येवा.
ओ परब मॅडम थय गजालेर येवा. मगे सांगतय तुमका देवनागरीत कसा लिवचा ता.
गो नीलू ताई मी गजालीर ईलय.
गो नीलू ताई मी गजालीर ईलय. आनी मका देवनागरी लिवक् ईला. सोप्या आसा गो.मी "Caps lock "चालू करुन लिवीत होतय म्हनान माका येयत नाय होता.
शाळेतली सगळी पोरां गायब खयं
शाळेतली सगळी पोरां गायब खयं झाली. ह्या पोरांकाव उन्हाळ्याची सुट्टी पडली हा शी वाटता.
नाय हर्षाताई सगळे आजच्या
नाय हर्षाताई सगळे आजच्या "मत्स्य/कोकु प्रितिभोजनासाठी " गेले आसत. आता ४ वाजले की "गजालीच्या" टपरीर जमतले..
रुपाली ताई आजुन चार वाजले
रुपाली ताई आजुन चार वाजले नायत सा वाटता.
माका तर वाटता सगळे गावाक गेले आसतले मालवणी शिकुक.
भ्रमर,
भ्रमर,
चला आजचो अभ्यास घ्या:
चला आजचो अभ्यास घ्या: -
मालवणीतसून शुद्ध-मराठीत करा: -
१> आजपासून परत येकदा मालवणीच्या वर्गात बसान अभ्यास सुरु करतंव.
२> मास्तर काल आपलो दोन दिवसांचो कुडाळ दौरो आटोपून परत ईले. परत येताना मास्तर फक्त अभ्यासच घ्येवन ईले. आमका वाट्लेलां विद्यार्थ्यांसाठी एखादी छोटिशी भ्याट घ्येवन येतीत.
३> गजालेवर पोरां गोंधळ घालून, गजाली करुक द्येणत नाय म्हणान मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलेलो दिसताहा.
४> धुमशानी कलाकार गेल्या आठवड्या पासून खंय दिसांचाच बन्द झालां. बहुतेक आम्ही तेका बघुन घेतलंव ह्येची कल्पना ईलेली दिसताहा.
५> मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच भ्याट आणलिहा असां समाजता. आता हंयसर मनापासून अभ्यास करुन, पुढच्या खेपेक मास्तर आमच्यासाठी भ्याट घ्येवन येतीत काय?...
शुद्ध-मराठीतसुन मालवणीत लिवा: -
१> एक वेळ मालवणीतून मराठीत लिहिणं सोपं पडतं, पण मराठितून मालवणित लिहिताना पंचाईत होते.
२> मास्तर मालवणिचं व्याकरण अजीबात शिकवत नाहीत. 'सरावानेच मालवणी लिहिता-बोलता येईल' असं सांगतात. काय सांगणार? मस्तरांची अजब शाळा...
३> इतर दुसरी भाषा शिकण्या पेक्षा मालवणी भाषा शिकायला सोपी पडेल, असं अजुनही वाटतंय.
४> वरचेवर 'गजाली' ला भेट देऊन, मालवणीचा सराव करण्याला दुसरा कोणता पर्याय सापडेल का?.
५> मी जर घरात मालवणी बोलायला सुरुवात केली, तर घरच्यांचा काय प्रतीसाद असेल?, त्याच्या कल्पनेनेच मला हसायला येते आहे...
सर सर मी पहिली - चला तपासुन
सर सर मी पहिली - चला तपासुन सांगा.
मालवणीतसून शुद्ध-मराठीत करा: -
१> आजपासून परत येकदा मालवणीच्या वर्गात बसान अभ्यास सुरु करतंव.
आजपासुन परत एकदा मालवणीच्या वर्गात बसुन अभ्यासाला सुरुवात करते.
२> मास्तर काल आपलो दोन दिवसांचो कुडाळ दौरो आटोपून परत ईले. परत येताना मास्तर फक्त अभ्यासच घ्येवन ईले. आमका वाट्लेलां विद्यार्थ्यांसाठी एखादी छोटिशी भ्याट घ्येवन येतीत.
मास्तर कालच आपला दोन दिवसांचा कुडाळ दौरा आटपुन परत आले. परत येताना (आमच्यासाठी काही आणलं नाही, हात हलवत परत आले :() फक्त अभ्यासच (भरपुर) घेवुन आले. आम्हाला आपली (वेडी) आशा होती कि विद्यार्थ्यांसाठी काहीतरी गिफ्ट घेवुन येतील ( फार काही अपेक्षा नव्हती. असो. )
मास्तर, कंसामधलो स्वगत आसा.
३> गजालेवर पोरां गोंधळ घालून, गजाली करुक द्येणत नाय म्हणान मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलेलो दिसताहा.
)
'गजाली'वर पोरं गोंधळ घालुन, गप्पा करु देत नाहीत, म्हणुन मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलेला दिसतोय. ( आम्हाला माहित आहे, शैलुच असणार. त्या दिवशी सर नसताना पण छडी घेवुन घाबरवत होती, शिवाय ही पोरं काही बोलुन देत नाहीत असं काही तक्रारवजा बोलत होती
४> धुमशानी कलाकार गेल्या आठवड्या पासून खंय दिसांचाच बन्द झालां. बहुतेक आम्ही तेका बघुन घेतलंव ह्येची कल्पना ईलेली दिसताहा.
गोंधळबाज कलाकार ( दक्षिणाच असणार), गेल्या आठवड्यापासुन कुठे दिसायचीच बंद झाली. बहुतेक आम्ही तिला चांगलंच बघुन घेवु याची तिला कल्पना आलेली दिसते. (कोणीतरी तिला मास्तरांची कमेंट सांगितलेली दिसते. घाबरली रे घाबरली.
)
५> मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच भ्याट आणलिहा असां समाजता. आता हंयसर मनापासून अभ्यास करुन, पुढच्या खेपेक मास्तर आमच्यासाठी भ्याट घ्येवन येतीत काय?...
मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच गिफ्ट आणली आहे असं समजलं. आता इथे मनापासुन अभ्यास केला तर, पुढच्या खेपेस (तरी) मास्तर आमच्यासाठी गिफ्ट घेवुन येतील काय?
म्याँव, तक्रारवजा नाय गं.
म्याँव, तक्रारवजा नाय गं. डायरेक्ट तक्रारच करत होते
१> आजपासून परत एकदा
१> आजपासून परत एकदा मालवणीच्या वर्गात बसुन अभ्यास सुरु केला आहे.
२> मास्तर काल आपला दोन दिवसांचा कुडाळ दौरा आटोपून परत आले. परत येताना मास्तर फक्त अभ्यासच घेवुन आले. आम्हाला वाटले होते की विद्यार्थ्यांसाठी एखादी छोटिशी भेट घेवुन येतील.
३> गजालीवर मुले गोंधळ घालून, गजाली करु देत नाही म्हणुन मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलेला दिसतोय.
४> वात्र मुले गेल्या आठवड्या पासून कुठेही दिसायची बंद झाली आहेत. बहुतेक आम्ही तिच्याकडे बघुन घेवु ह्याची तिला कल्पना आलेली दिसतेय.
५> मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच भेट आणलि आहे असे समजले. आता इथे मनापासून अभ्यास केल्यास, पुढच्या खेपेस मास्तर आमच्यासाठी भेट घेवुन येतील काय?...
१> मालवणीत्सुन मराठीत लिवुक सोपा पडात, पण मराठित्सुन मालवणित लिवुक खुप कठिन आसा.
२> मास्तर मालवणिचा व्याकरण अजीबात शिकवत नाय. 'सरावानेच मालवणी लिहुक बोलुक येतला' असा सांगतत. काय सांगुचा? मास्तरांची अजब शाळा...
३> इतर दुसरी भाषा शिकु पेक्षा मालवणी भाषा शिकाक सोपी पडात, असा अजुनही वाटताहा.
४> वरचेवर 'गजाली' क भेट देऊन, मालवणीचो सराव करण्याक दुसरो कोणतो पर्याय मिळात काय?.
५> मी जर घरात मालवणी बोलुक सुरुवात केली, तर घरच्यांचो काय प्रतीसाद असात?, त्याच्या कल्पनेनेच माका हसाक येत आसा...
शैलु, कबुल करुक हिंमत लागते,
शैलु, कबुल करुक हिंमत लागते, पण मास्तर ठरवतील कि धपाटा का शाब्बासी.
म्याँव, मास्तर तुका.
म्याँव, मास्तर तुका. माझ्यासाठी दादा, तेह्वा धपाटो पडलो तरी चलता
पण.....
वैनीकडे जॅक आसा. समाजलंस काय?
(No subject)
ममा... मालवणीत सून
ममा...
...
मालवणीत सून शुद्ध-मराठी व्यवस्थीत जमलां. आता शुद्ध-मराठितलां मालवणित लिवन दाखव... तो पर्यन्त मार्क गावाचे नाय...:स्मित: ...
तुमच्या प्रत्येकाच्या कंसातल्या वाक्यां वरच पुढचो अभ्यास अवलंबून असता, ह्यां लक्षात घ्येवा. तेव्हां कंसातली वाक्यां लिहिण्यावर माझो कसलोही आक्षेप नाय...
तुमचो वर्ग हंयसर भरवण्या मागे दोन ऊद्देश आसतः-
१> ह्यो 'थंड' पडलेलो धागो, परत जागो करणां गरजेचां होतां.
२> एकदम ४-५ विद्यार्थी 'गजालि'वर शिकण्यासाठी ईले, ह्यां बघून बाकीचे मोठे 'गजालि'कर हळू-हळू तिकडे पाठ फिरवण्याची शक्यता होती. आणि 'गजाली'चो धागो असो थांबान उपयोगाचो नाय.
तेव्हां 'क्रमिक अभ्यास' हंयसर आणी 'प्रात्यक्षीक' गजालिवर करुक कोणाची हरकत असता नये... :स्मितः ...
मालवणीतसून शुद्ध-मराठीत करा:
मालवणीतसून शुद्ध-मराठीत करा: -
१> आजपासून परत येकदा मालवणीच्या वर्गात बसान अभ्यास सुरु करतंव.
१. आजपासून परत एकदा मालवणी भाषेच्या वर्गात बसुन अभ्यास सुरु करणार आहे.
२> मास्तर काल आपलो दोन दिवसांचो कुडाळ दौरो आटोपून परत ईले. परत येताना मास्तर फक्त अभ्यासच घ्येवन ईले. आमका वाट्लेलां विद्यार्थ्यांसाठी एखादी छोटिशी भ्याट घ्येवन येतीत.
२. मास्तर कालच त्यांचा दोन दिवसांचा कुडाळ दौरा आटोपून परत आले. (आणि) येताना फक्तं अभ्यासच घेऊन आले. आम्हाला वाटलं होतं विद्यार्थ्यांसाठी एखादी छोटीशी भेट वगैरे घेऊन येतिल...
३> गजालेवर पोरां गोंधळ घालून, गजाली करुक द्येणत नाय म्हणान मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलेलो दिसताहा.
३. गजालीवर पोरं गोंधळ घालतात, कोणाला गजाली करु देत नाहीत म्हणुन मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलाय वाट्टं.
४> धुमशानी कलाकार गेल्या आठवड्या पासून खंय दिसांचाच बन्द झालां. बहुतेक आम्ही तेका बघुन घेतलंव ह्येची कल्पना ईलेली दिसताहा.
)
४. गोंधळ घालणारी विद्यार्थिनी गेल्या आठवड्यापासून कुठेच दीसेना. बहुतेक.. आम्ही तिला बघुन घेऊ याची कल्पना तिला आलेली दिसतेय... (आता वाचवा आम्हाला
५> मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच भ्याट आणलिहा असां समाजता. आता हंयसर मनापासून अभ्यास करुन, पुढच्या खेपेक मास्तर आमच्यासाठी भ्याट घ्येवन येतीत काय?...
५. मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच भेटवस्तू आणली आहे असं वाटतय. आता ईथे मनापासून अभ्यास केला तर मास्तर आमच्यासाठीपण भेट आणतिल का.....?
शुद्ध-मराठीतसुन मालवणीत लिवा: -
१> एक वेळ मालवणीतून मराठीत लिहिणं सोपं पडतं, पण मराठितून मालवणित लिहिताना पंचाईत होते.
१. एक वेळ मालवणीतसुन मराठी लिवणं सोप्पं पडतां, पण मराठीतसुन मालवणीत लिवायची पंचाईत होतां..
२> मास्तर मालवणिचं व्याकरण अजीबात शिकवत नाहीत. 'सरावानेच मालवणी लिहिता-बोलता येईल' असं सांगतात. काय सांगणार? मस्तरांची अजब शाळा...
२. मास्तंर मालवणीचो व्याकरण आजिबात शिकवत नसां.. 'सरावानेच मालवणी लिहितां- बोलतां येतां: असो म्हणतां... काय सांगायचो? मस्तरांची अजब शाळा...
३> इतर दुसरी भाषा शिकण्या पेक्षा मालवणी भाषा शिकायला सोपी पडेल, असं अजुनही वाटतंय.
३. दुसर्या भाषेपरीस मालवणी भाषा शिकायलो सोप्पी पडेलसे वाट्टो..
४> वरचेवर 'गजाली' ला भेट देऊन, मालवणीचा सराव करण्याला दुसरा कोणता पर्याय सापडेल का?.
४. सारखो 'गजालेर' येऊन, मालवणीचो सराव करायला दुसरो पर्याय सापडतलो का?
५> मी जर घरात मालवणी बोलायला सुरुवात केली, तर घरच्यांचा काय प्रतीसाद असेल?, त्याच्या कल्पनेनेच मला हसायला येते आहे...
५. मी जर घरी मालवणी बोलायलो सुरवात केली, तर घरच्यांचो काय प्रतिसाद असां? कल्पनेनेच माका हसायला येतयं...
हुश्श..... आता जेवायला
हुश्श..... आता जेवायला जातय...
सतिशानू काय ह्या तुम्ही पण
सतिशानू काय ह्या तुम्ही पण शाळेत.
माऊ अर्धो अभ्यास करीस्तोर दमला काय?
नीलू.... जेवलीस का गो..?
नीलू.... जेवलीस का गो..?
नीलु, मराठीतसुन मालवणीत जमुक
नीलु, मराठीतसुन मालवणीत जमुक नाय दिसता. मिया नाय पण माजो मेंदु दमलो.
मी पण हयसर हा टायपाक वेळ नाय
मी पण हयसर हा
टायपाक वेळ नाय गावलो. म्हणान वाचुक ईलंय. 
गुरुजी अभ्यासातलो पहिलो अर्धो सोप्पोच आसाय पण माराठित्सुन मालवणी लिहुक व्हया.
Pages