निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याची शेपटी पण छोटूशीच आहे.. वेगळी जात असणार पोपटाची..
आमच्याइकडे सहसा रानात एक पोपट मिळतो..त्याला रावण पोपट म्हणतात..आकाराने नेहमिच्या पोपटांपेक्षा बराच मोठा असतो म्हणुन..
मानुषी, खरच फुगला होता तो अस दिसतय..
तु त्याला न विचारता फोटो काउन काढले..परमिशन लेनी चाहिए थी ना ! .. किसी का फोटो निकालते वक्त परमिशन लेते है ना..निकालू फोटो या नही करके..फिर..

maanushi popat mastach.

tina kay g bhavala martes???

varshutai photo mast.

<आत्मधूनच्या पोस्ट मुळे संपादित Happy >
शेपुट छोटी आहे कारण अजुन पिल्लु आहे ते. मोठा होईल तशी शेपुट लांब होईल.

पोपट ( मुनीया , मैना इ. ) पाळणे हा आता गुन्हा समजला जातो ना? ( कन्फर्म करा प्लिज. मला असे वाचलेले आठवते )
अलिकडेच फेबु वर एकाचे त्यांच्या पाळीव काकाकुवा बरोबरचे फोटो पाहिले. तर काकाकुवा पाळलेला चालतो का?

आत्मधून आणि शशांक ...धन्यवाद. पण पांढरी चोच अस्ते का पोपटाची?
पोपट ( मुनीया , मैना इ. ) पाळणे हा आता गुन्हा समजला जातो ना? ( कन्फर्म करा प्लिज. मला असे वाचलेले आठवते )
अलिकडेच फेबु वर एकाचे त्यांच्या पाळीव काकाकुवा बरोबरचे फोटो पाहिले. तर काकाकुवा पाळलेला चालतो का?>>>>>>>>>>>>>>>> सावली ...याच साठी मी वर प्रश्न विचारलाय. की याला सोडून दिलं तर तो बाहेर अ‍ॅडजस्ट होईल का?
तसंही कुणालाच पिंजर्‍यात ठेवणं मला क्रूरच वाटतं.

हो, दोन्हींची चोच लहानपणी पांढरी असते.. मग हळूहळू पिवळट होत जाते..
आणि हो, पोपट पाळणे गुन्हा आहे वाइल्डलाइफ ऍक्ट नुसार.. शरदला सांगा हळूहळू बाहेर सोडायला..

चला माझ्या कमीन्या आणि डोक्यानं पैदल असणार्‍या शेजार्‍यांना कळवावं म्हणते ताबडतोब Wink
त्यांनीपन एक पोपट पाळलेला आहे..आणि तो खुप म्हणजे खुपच बोलतो..

तामण.. क्रेप फ्लॉवर.. वॉव.. थँक्स शशांक..आता लक्षात ठेवीन.. अजून कोणत्या रंगात नटलेली असतात ही फुलं??

अजून एक गोड लाईट गुलाबी रंगांची फुलं, अशीच गुच्छ्यांनी रस्तोरस्ती उमललेली आहेत त्यांचं नांव मी ठेवलंय,' लेस ची फुलं" फोटो टाकते इथे.. खरं नांव जाणायला... ही आकाराने अगदी लहान आहेत.. आज झूम न करता
काढीन फोटो..पुन्हा..

मानु, पोपट चक्क पाठ फिरवून बसलाय तुझ्याकडे Lol

ह्म्म्म्म!पिंजर्‍यात राहिल्यावर बाहेर कसा अ‍ॅडजस्ट होईल... क्लोज्ड अंगणात ट्रायल घेतली तर..?

कांदापोहे, आंबोलीतच पाहिले. सध्या आंबोलीत सर्व प्रकारचे साप आणि बेडुक दिसताहेत. मी गेलेले तेव्हा हिरव्या बेडकांची पिल्ले पाण्यात मोठी होत होती. साधारण ऑगस्टच्या मध्यावर हे हिरवे बेडुक पिल्लांसकट कुठेतरी गडप होतात. परत अवतरतात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. हे हिरवे बेडुक, ग्लायडींग फ्रॉग फक्त सह्याद्रीच्या रेंजमध्येच आहेत.

बाकीचे साप आणि बेडुक बहुतेक वर्षभर दिसतात. मी आंबोली बेडुकही अनेकदा पाहिला. हा इंचभर आकाराचा असतो. अजुक एक बेडुक पाहिलेला जो माझ्या नखापेक्षाही लहान होता. ह्या दोन्ही प्रकारचे बेडुक पुर्ण वाढलेले बेडुक आहेत. पिल्ले नव्हेत. अजुन एक दुरंगी बेडुकही उन्हाळ्यात दिसतो. मी जेव्हा पाहिलेले त्याला तेव्हा त्यांचे रस्त्याच्या एका बाजुने दुस-या बाजुला मायग्रेशन चालले होते. हे काम बहुतेक खुप दिवस चालले होते. कारण ह्या मायग्रेशनमध्ये रस्त्यावरच्या वाहनांचा अडथळा येत होता आणि कित्येक बेडूक यात शहिद होत होते. ह्या शहिदांची कातडी रस्त्याला चिकटलेली होती :(. पण अर्थात नाईलाज. ज्या रस्त्यावर हे चाललेले तो आंबोली चौकूळ रस्ता तासाभरात १०-१२ गाड्या जाण्याइतपत वर्दळीचा आहे आणि गाडीतुन ड्रायव्हरला हे मायग्रेशन दिसणे कठिण.

माझ्याकडे फोटो आहेत पण खास नाहीत आणि इथे टाकताही येत नाहीयेत. घरी गेल्यावर बघते प्रयत्न करुन.

पि़ण्ज-यातल्या पक्ष्याला बाहेर सोडले तर त्याचे काय होईल सांगता येत नाही. माझ्याकडे बरीच वर्षे पोपट होता. तो एकदा असाच पिण्जरा उघडा राहिल्याने निघुन गेला. त्याचे पुढे काय झाले देव जाणे. त्याला नीट उडता येत होते.

कित्येकदा पि़ण्ज-यातले पोपट जन्मापासुन बंद असल्याने नीट उडू शकत नाहीत. अशा वेळी बाहेर सोडाण्यापेक्षा घरात माण्जरे नसतील तर घरातच मोकळे सोडलेले बरे.

माझे वडील गायक सुधिर फडक्यांच्या घरी बरेच वेळा कामानिमित्त जायचे. त्यांच्या घरी असाच मोकळा सोडलेला पोपट होता. तो घरात फिरायचा, कोणी आले की येऊन शेजारी बसायचा. फडके गायला लागले की पेटीवर येऊन बसायचा Happy

Plum Headed Parakeet (Male) आहे तो. त्याला मोकळे सोडा. आपोआप उडुन जाईल. कुणी काही करणार नाही. केले तरी निसर्ग आहे. असे पिंजर्‍यात नक्कीच ठेवु नका.

वाटलेच मला अंबोली असेल म्हणुन. मला जायचे आहे अंबोलीला. येऊरला पण जायचे आहे. Sad

पोपट मधे दिसेनासे झाले होते पण आता थवेच्या थवे दिसत आहेत.

पाळीव काकाकुवा बरोबरचे फोटो पाहिले. तर काकाकुवा पाळलेला चालतो का?>>
हो चालतो. Exotic Birds पाळले तर चालतात. ते लव्हबर्डस पण त्यातलेच.

कांपो, येऊर जमवा. आंबोली खुप दुर आहे. पुण्याहुन येऊर जवळ आहे Happy

आंबोलीला जाल तेव्हा जरुर कळवा.

काय गं जागु, उगी उगी..

अगं, माझ्या मोबाईलवरचे फोटो आपोआप पिकासावर ऑटो बॅकप म्हणुन अपलोड झालेत. बरे झालेत ते झालेत, आता त्यांनी निमुट मला शेअर करायला परमिशन द्यावी ना? तर नाही, तो ऑटोवाला अल्बम "सिर्फ तुम" म्हणुन गपचिप पडलाय. मला "सिर्फ तुम" वरुन "मेरे भाईबहेन" असे सेटींग चेंज करायला नालायक पिकासा देत नाही आणि त्यामुळे इथे तुम्हाला हिरवे बेडुक आणि चॉकलेटी साप दाखवता येत नाहीत. आकाक???

शरदलची खूप अ‍ॅटॅचमेन्ट आहे त्या पोपटाशी. जशी आमच्या लुईशी आहे.
आता त्याला कसं सांगावं हाच प्रश्न आहे. बघू...........
क्लोज्ड अंगणात ट्रायल घेतली तर..?>>>>>>>.वर्षू गुड आय्ड्या.
तसंही कुणालाच पिंजर्‍यात ठेवणं मला क्रूरच वाटतं>>>>> कांदेपोहे....... हा पोपट आमच्या कडे काम करणार्‍या मुलाने ...त्याला रस्त्यात जखमी अवस्थेत सापडला म्हणून आणला होता.

जागु,
प्रतिसाद देण्याच्या डब्ब्याखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील इमेज वर टिचकी मारली की
आणखी एक विंडो उघडेल..
त्यात वर अपलोड फोटो वर टिचकी मारली की १५३केबी पेक्षा कमी साईझ असणारी इमेज लोड करुन मग
त्याला सेंड टू टेक्स्ट एरिया वर परत टिचकी मारायची..

टीना अग ट्युब कधीच पेटली माझी पण आज नेट इतक स्लो आहे की २० मिनीटे तरी झाली असतील अजुन त्यात फोटो अपलोड होत नाहीये.

साप Sad
मला भिती किळस वगैरे सगळं वाटते सरपटणार्‍या प्रत्येक प्राण्याबद्दल Sad
पण दया पण येते त्यांची Happy

पण हे वरचे रुबाबदार दिसणार्‍या सापांचे दिमाखदार फोटो काढणार्‍यांना __/\__
>>>
+१

टिने, तुझे शेजारी Lol

त्याला रस्त्यात जखमी अवस्थेत सापडला म्हणून आणला होता.>>
हो ते वाचले. पण त्याला बरे वाटल्यावर सोडुन देणे उत्तम असे म्हणतोय मी.

@ जागु ताई...तुमच्या भावाने काढलेत का?<<<
हो... युवराज गुर्जर..

@ टीना...त्यांनीपन एक पोपट पाळलेला आहे..आणि तो खुप म्हणजे खुपच बोलतो..<<<<
एकमेव कारण.... त्याची शेजारीण... Happy Happy Light 1

निरु Biggrin Lol Proud
पण मी कित्येक वर्ष बाहेरच असल्याने अजुन एकदाही त्याला भेटून नै आहे..घरी असली की त्याची पोपटपंची ऐकु येते..बहोत फेमस आहे पण तो .. दोनेक वर्ष झाली असेल तिथ असुन..आधी त्यांच्या नातेवाईकांकडे होता म्हणे.. Wink
बाकी पिंजर्‍यात असणारे कुठलेच प्राणी कौतुकाने बघता येत नै मला..म्हणुन अ‍ॅनिमल पार्क गेले कि कौतुकापेक्षा किवच जास्त येते त्यांना पाहताना..

Pages