याकूब आणी फाशी.

Submitted by vijaykulkarni on 21 July, 2015 - 20:43

सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.

१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.

२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.

३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.

४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.

५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.

६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?

७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?

८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्‍यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्‍याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<लोकांना जात- धर्म, मंदिर -मस्जिद काही नको आहे....... हे नेत्यांना हवे आहे.>>
----- नेत्यान्ना हे अजिबात नको आहे... त्यान्ना हवे आहे केवळ "इन्धन". जर ते जात, धर्म, मन्दिर- मशिद या मधे सापडले तरच ते त्यान्ना मुद्दा बनवतील. जर तो त्यान्चा "मुद्दा" बनला असेल तर तो पुर्णत्वास येणार नाही याची योजनाबद्ध काळजी ते जरुर घेतील. मुद्दा पुर्णत्वास आला तर गरज सम्पते.

आम्हाला मन्दिराची, मशिदीची अवशक्ता नाही आहे असे अनुक्रमे हिन्दू आणि मुस्लिमान्नी सान्गितले असते तर परिस्थिती वेगळी दिसली असती आणि एकही निरर्थक रथयात्रा निघाली नसती.

आम्हाला मन्दिराची, मशिदीची अवशक्ता नाही आहे असे अनुक्रमे हिन्दू आणि मुस्लिमान्नी सान्गितले असते तर परिस्थिती वेगळी दिसली असती आणि एकही निरर्थक रथयात्रा निघाली नसती.>>>>

सामान्य जनता हेच सांगत आहे पण तिचा आवाज एकणार कोण? तुम्ही स्वता:हा प्रयोग करुन बघा अनोळखी १० लोकांना विचारा तुला काय हवे आहे?उत्तर मिळेल.

रथयात्रेची चमक पण कमी झाली आहे असे तुम्हाला वाटत नाही का?
आणी ती रथयात्रा निरर्थक नव्हती मंडल आयोग वरुन ध्यान हटवन्यासाठीच षडयंत्र होत.

http://m.goarbanjara.com/मंडल-आयोगातील-शिफारश/

हो ते लक्षात यायला वेळ नाही लागला या सगळ्या उठाठेव्या करण्या पेक्षा देशाचा विकास करावा ना.

दिलेली अश्वासने अर्धेतरी पाळावित.

लबाड कोल्हया, इस्लाम व दलित यांच्यात भेद म्हणजे काय? दलितांनी केव्हापासून इस्लाम स्वीकारला होता? तो अजिबात स्वीकारू नये हेच बाबासाहेब सांगत होते.
आ.न.,
-गा.पै.

उदय,

>> आम्हाला मन्दिराची, मशिदीची अवशक्ता नाही आहे असे अनुक्रमे हिन्दू आणि मुस्लिमान्नी सान्गितले असते तर
>> परिस्थिती वेगळी दिसली असती आणि एकही निरर्थक रथयात्रा निघाली नसती.

राममंदिर बांधायला इतका विरोध का? तिकडे कुठलीही मशीद नसतांना मुस्लिमांना नाराज व्हायचं कारणच काय मुळातून? हिंदूंच्या रास्त मागण्यांना आक्षेप कशासाठी?

आ.न.,
-गा.पै.

आत्ताच्या सामान्य हिंदूच्या रास्त मागन्या रोजगार्,बिजली सडक पाणी आहे.
खेड्यातिल समस्त हिंदूची अवस्था फार बिकट आहे. मंदिर बांधुन या गोष्टी मिळनार आहेत का?

गापै
ओबीसी जनगणना, व्यापम घोटा़ळ्यातील हत्या, अकार्यक्षमता, भ्रष्टाचार या मुद्यांवरून लक्ष वळवून ध्रुवीकरणाचा मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नांना इथले काही द्वेषद्रोही आयडीज खीळ घालून भारतात शांतता प्रस्थापित करण्याचा धोका वेळीच ओळखून परिस्थिती पुन्हा जैसे थे करण्याच्या तुमच्या प्राणांतिक प्रयत्नांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.

आपल्या या अग्नोहोत्रास आमच्या शुभेच्छा !

उदय, तशी बातमी अफझल गुरूच्या फाशीनंतर मीही वाचली होती, पण तूर्तात लिंक मिळत नसल्याने त्याबद्दल काहीही अद्याप लिहिलेले नाही. इथले लिंक एक्स्पर्ट बातमी शोधून देतील तर उपकार!!

खरंच,याकूबच्या फाशीनंतर त्याचे शव तुरुंगाच्या आवारात दफनायला हवे होते.नातेवाईकांच्या हाती देऊन जी गर्दी पहायला मिळाली ती चीड आणणारी होती.एखाद्या हुताम्याला मानवंदना द्यावी तसे वाटत होते.वाईट जास्त याचे वाटले की इतक्या लोकांपैकी एकालाही ,हा बाँम्बस्फोटातील आरोपी आहे,१९९३ ला जो हाहाकार झाला त्यातला एक मुख्य आहे असे वाटले नाही.
कसाबच्या फाशीनंतरही असा हजारोंचा जनसमुदाय हळहळत आला होता का? हेच हळहळणे चीड आणणारे आहे.
आरोपी ,कोणत्याही धर्माचा असो शेवटी तो फक्त गुन्हेगारच आहे इतकेच समजण्यात यावे.

>>विकु, मला तुमचा मुद्दा कळला नाही. तुमचा फाशीच्या शिक्षेला विरोध आहे ना ? मग एखाद्या राज्याची विधानसभा आरोपीची फाशी रद्द व्हावी म्हणून प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्यांना पाठींबा द्यायला हवा ना? की विशिष्ठ आरोपीबद्दल सुरू असल्याने तुमची मतं बदलली लगेच ?

फाशीच्या शिक्षेला माझा नक्कीच विरोध आहे. पण त्या त्या विधानसभांनी "फाशीला विरोध" या भूमिकेतून नव्हे तर "हा आपला माणूस" या भूमिकेतून फाशीला विरोध केला आहे. एखाद्या अतिरेक्याच्या अंत्ययत्रेला हजारो लोकांनी उपस्थित रहाणे भितीदायक असेल तर विधानसभांनी अतिरेक्याला फाशी देऊ नये म्हनून ठराव करणे हेही भितीदायक आहे एवढेच मला म्हणायचे आहे.

Justice P. Sathasivam and B.S. Chauhan, who upheld Yakub Memon’s death sentence in 2013, also wrote a judgment in 2011 explaining why Dara Singh – convicted of burning to death the Australian missionary Graham Staines and his two minor children – did not deserve the death penalty.

They said: “In the case on hand, though Graham Staines and his two minor sons were burnt to death while they were sleeping inside a station wagon at Manoharpur, the intention was to teach a lesson to Graham Staines about his religious activities, namely, converting poor tribals to Christianity.”

(Judgement by Justice P. Sathasivam and B.S. Chauhan in Rabindra Kumar Pal alias Dara Singh vs. Republic of India. January 21, 2011).

http://judis.nic.in/supremecourt/imgs1.aspx?filename=37394

Justice P. Sathasivam and B.S. Chauhan, who upheld Yakub Memon’s death sentence in 2013, also wrote a judgment in 2011 explaining why Dara Singh – convicted of burning to death the Australian missionary Graham Staines and his two minor children – did not deserve the death penalty.

They said: “In the case on hand, though Graham Staines and his two minor sons were burnt to death while they were sleeping inside a station wagon at Manoharpur, the intention was to teach a lesson to Graham Staines about his religious activities, namely, converting poor tribals to Christianity.”

(Judgement by Justice P. Sathasivam and B.S. Chauhan in Rabindra Kumar Pal alias Dara Singh vs. Republic of India. January 21, 2011).
<<

ओह माय गॉड!

उदय | 2 August, 2015 - 09:49 नवीन
कायद्यासमोर सर्व समान असायला हवेत.... दुर्दैवाने ते तसे नसते
हे वारम्वार दिसते आहे.>>>>>>>>>>> याकुबच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी झाली हे चुकच ,पण आज' हजारोंची गर्दी झाल्याने' अस्वस्थ झालेले ईथले अनेकजण उद्या कर्नल पुरोहित ,साध्वी प्रज्ञा सिंगला फाशी झाल्यास त्या विरोधात ईथेच हिरहीरिने गळा काढून, फाशी कशी चूक होती याचा ऊहापोह करत बसतील.
याकुबच्या अंत्ययात्रेला गर्दी करणारे लोक आणी कर्नल पुरोहीत ,साध्वी प्रज्ञासिंग यांच्या समर्थनार्थ कोर्टात फुले ऊधळणारे हिंदुत्वावादी यांच्यात वरकरणी फरक दिसत असला तरी त्यांची'वृत्ती' एकच आहे.

sarcosuchus imperator,

>> याकुबच्या अंत्ययात्रेला गर्दी करणारे लोक आणी कर्नल पुरोहीत ,साध्वी प्रज्ञासिंग यांच्या समर्थनार्थ कोर्टात फुले
>> ऊधळणारे हिंदुत्वावादी यांच्यात वरकरणी फरक दिसत असला तरी त्यांची'वृत्ती' एकच आहे.

कुणाच्या वृत्त्या काढण्यापूर्वी पुरेशी माहिती गोळा करा. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर साधं आरोपपत्रही दाखल झालेलं नाहीये गेले आठ नऊ वर्षं.

आ.न.,
-गा.पै.

कुणाच्या वृत्त्या काढण्यापूर्वी पुरेशी माहिती गोळा करा.
कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर साधं
आरोपपत्रही दाखल झालेलं नाहीये गेले आठ नऊ वर्षं.
आ.न.,
-गा.पै.>>>>>>>>>>> आरोपपत्र दाखल झालं नाही याचा अर्थ ते निर्दोष आहेत असा होत नाही,प्राथमीक पुरावे हे त्या दोघांच्या विरोधात आहेत, म्हणूनच हजारदा जामिनासाठी अर्ज करुनही 'भारतिय न्यायव्यवस्थेने 'त्यांचा जामिन फेटाळला आहे.

याकूब, दाऊद आणि पुरोहित प्रज्ञासिंग हे एकाच माळेचे मणी असल्याचे दाखवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी एक गोष्ट नक्की आहे. पाकिस्तान ह्या नि:संशय शत्रुराष्ट्र असणार्‍या देशाशी संधान बांधून, त्यांच्याकडून पैसे, स्फोटके वगैरे मदत मिळवून त्याच्या जोरावर दुष्कृत्ये करणे ह्यात मुस्लिम अतिरेकीच आहेत. तथाकथित हिंदू अतिरेकी असे कुठल्या शत्रुराष्ट्राशी हातमिळवणी करत नाहीत. निदान आजवर तरी तसे उघडकीस आलेले नाही.

पाकिस्तान हे मुस्लिम धर्मीय राष्ट्र आहे. त्यांना भारतीय मुस्लिमांकरता काहीतरी करावे असे वाटते आणि त्यातून असे देशद्रोही काही घडते.

तर हा मोठा फरक कायम रहाणारच. आणि तो महत्त्वाचा आहे. परकीय राष्ट्राच्या मदतीने केलेला दहशतवाद हा जास्त जहाल, जास्त योजनाबद्ध आणि जास्त विध्वंसक असतो असे आजवर दिसून आले आहे.

त्यांच्या केसमधील आसुमल दोषी असल्याचं सांगणारे साक्षीदार दिवसा ढवळ्या मारले जाताहेत या प्रकरणातले आरोप शाबीत झालेले नाहीत या अर्थाने गापै बरोबरच आहेत.
(गामा तुम्ही इतका विरोध करता तरी डिफेन्ड केलं पहा तुम्हाला. याला म्हणतात न्यायबुद्धी ! कळ्ळं का ?)

the intention was to teach a lesson to Graham Staines about his religious activities, namely, converting poor tribals to Christianity.”

....

.

आँ ! म्हणजे इंटेन्शन खून करण्याचे नव्हते म्हणे आणि चुकून खून झाला म्हणून फाशी माफ ! वा !

आणि ते ख्रिस्ती धर्मप्रसारक गुन्हा काय करत होते ?

गरीब लोकाना खिस्ती बनवण्याचा ! ख्रिस्चन धर्मगुरुवर राग काढण्याऐवजी त्या लबाड हिंदू गुन्हेगारानी त्या गरीब लोकाना मदत करायला हवी होती .

देशविघातक कृत्ये करून शेकडो निष्पापांना मारणार्‍याला फाशी दिल्याबद्दल इतकी उलटसुलट चर्चा बहुधा इतर कोणत्याही देशात होणार नाही. आपण फारच महान राष्ट्र आहोत.

साध्वी आणि पुरोहितांना योग्य असेल ती शिक्षा व्हावीच व्हावी. याकूबची फाशी मात्र बलिदान ठरायला चालली आहे तेवढे आवरा!

तथाकथित हिंदू अतिरेकी असे कुठल्या शत्रुराष्ट्राशी हातमिळवणी करत नाहीत. निदान आजवर तरी तसे उघडकीस आलेले नाही.

....

Proud

हिंदूना मदत करायला जगात दुसरं सक्षम हिंदु राष्ट्र आस्तित्वात तरी आहे का ?

की त्या फाटक्या व दरिद्री नेपाळ - लंकेसमोर हात पसरणार ?

Proud
मुसलमान ख्रिचन त्याबाबतीत लकी आहेत . ढीगभर देश आहेत. नशीबवान आहेत. म्हणून ते हक्काने मदत मागतात व मदत करतात.

परकीय राष्ट्राच्या मदतीने केलेला दहशतवाद हा जास्त जहाल, जास्त योजनाबद्ध आणि जास्त विध्वंसक असतो असे आजवर दिसून आले आहे.
<<

दहशतवाद तो वाईटच. मग नक्षली असो, एलटीटीई असो की अल कायदा. पण तुम्हाला झापडे लागली आहेत. अन तीच झापडे लोकांच्या डोळ्यावर लावायची तुमची धडपड वाखाणण्यासारखी आहे.

बाकी,

आपल्याच देशातल्या सरकारच्या मदतीने केलेल्या दहशतवादातून ज्यू मारले गेले होते.

आपल्याच(मुसलमान/ब्रिटिश) सरकारच्या अखत्यारीत जनतेवर अनन्वित अत्याचार झाले होते.

राजकीय इच्छाशक्ती असेल, तर परकीय राष्ट्राच्या मदतीने केलेला दहशतवाद कधीही आटोक्यात आणता येतो.

पण स्टेट स्पॉन्सर्ड मेजॉरिटी टेररिझम??

त्यासाठी राजधर्माची आठवण करून द्यावी लागते, अधूनमधून अ‍ॅक्टिव्हेट झालेल्या माझ्या शेंडेनक्षत्र नामक (..)आयड्या, तुझ्या स्पेशल झापडांचे अभिनंदन.

आसुमलला शिक्षा द्या ज्या पध्दतीने साक्षीदारांची हत्या होते त्यावरून तो गुन्हेगारच आहे स्पष्ट होते

<<
दहशतवाद तो वाईटच. मग नक्षली असो, एलटीटीई असो की अल कायदा. पण तुम्हाला झापडे लागली आहेत. अन तीच झापडे लोकांच्या डोळ्यावर लावायची तुमची धडपड वाखाणण्यासारखी आहे.
<<
वापरून गुळगुळीत झालेली निरर्थक वाक्ये पुन्हा पुन्हा वापरून ती लोकांच्या गळी उतरवण्यचा प्रयत्न करणे दयनीय आणि केविलवाणे वाटते.
दहशतवादात लहानमोठे असते च असते. थंड डोक्याने कारस्थान आखून डझनावारी स्फोट आर्थिक वा अन्य मोक्याच्या जागी घडवून आणणे आणि एखादा स्फोट करुन डझनावारी लोक मारणे ह्याच्या तीव्रतेत फरक आहे. त्याकरता लागणारा पैसा, त्याकरता लागणारे संख्याबळ ह्यात मोठा फरक आहे. दहशतवाद तो दहशतवाद असे सरधोपट झापड लावणार्‍यांना तो कळला नाही तरी सर्वसामान्यांना नक्की कळतो.

Pages