याकूब आणी फाशी.

Submitted by vijaykulkarni on 21 July, 2015 - 20:43

सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.

१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.

२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.

३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.

४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.

५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.

६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?

७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?

८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्‍यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्‍याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीड मायबोलीकर, दोन्ही बाजुंचा आढावा घेतला असतात तर तुमची वरची पोस्ट बॅलंस्ड आहे असं म्हणता आलं असतं.

काहि विखारवंतांना, सगळ्याच गोष्टीत राजकिय रंग शोधण्याची खोड असते; त्यावर आपलं मत काय?

सरकार स्त्री की पुरूष ?
ते जसं जेण्डरलेस असतं तसंच धर्माच्या बाबतीत असतं, असा अर्थ मला समजतो. हा चुकीचा आहे का ?

आपल्या देशात बघ्यांची कमी नाही. काही खुट्ट झालं की गर्दी गोळा होऊन गम्मत पाहते. अगदी आपल्या गल्लीतून अनोळख्याची अंत्ययात्रा निघाली तरी बघे जमतातच. ते सगळे शोकाकुल अन त्या मृताचे सगेसंबंधी नसतात हो!

अन इथे जर तसे लेबल लावून आपणच 'आपले' अन 'त्यांचे' असे करायला लागलो, तर अशा वागण्याने आपणच आपले शत्रू निर्माण करीत असतो, नाही का?>>> हो पण हे एवढंच घडलंय का? त्याही आधी मृताचे फोटो काढून प्रसिद्ध करनं आणि जमावबंदी या दोनी वर पोलिसांनी बंदी आणलेली असताना दुपारी तीनपासून मृताचे फोटो फेसबूकवर यायला लागले. मुळात तो भाग अति गर्दीचा आहे, तिथे दिवसाच्या कुठल्याही वेलेला इतकी माणसं दिसतील असं एका मित्रानं सांगितलं पण त्याच मित्रानं हेही सांगितलं की बहुतेक जण "सहानुभूती" म्हणूनच आले होते, बघे म्हणून नाही. बॉडी अ‍ॅम्ब्युलन्समधून नेली, तरी त्याला जनाजाच म्हणतात आणि नमाझ वगैरे सर्व करून मगच नेण्यात आली आहे.

ज्या ग्रूपमध्ये हे फोटो आले तो ग्रूप एका राजकीय नेत्याच्या नावाने आहे. जमावाचे फोटोशॉप्ड फोटो देखील त्याच ग्रूपवरून आले. याकूबच्या शहीद होण्यावरून आलेली पोस्टर्स किती आणि कशी होती त्याचं काय? याकूबच्या फाशीवरून लगेच २०१३ साली माया कोडनानीला मिळालेल्या बेलच्या बातम्या फिरू लागल्या त्याचं काय? फेसबूक ग्रूपवरचा एक अ‍ॅडमिन माझ्या परिचयामधला आहे. त्यानं काल सांगित्लं की "प्रक्षोभक मेसेजेस" जवळजवळ ३०० डीलीट केलेत-- हे मेसेजेस वाचल्यावर "भडकाऊ" पोस्ट्स म्हणजे नक्की काय ते व्यवस्थितच कळतंय. एका पोस्टमध्ये तर "छोडदो शराफत उठलो पत्थर सारख्या काव्यात्म रचना ग्राफिकसकट होत्या. तो मित्र सकाळपासून ऑफिसचं काम सोडून हेच करतोय म्हटला.

याकूब मेमनच्या फाशीवरून इतका गदारोळ नक्की कुणी केलाय? गेले आठ दिवस यावरून घमासान होतेय ती नक्की कोण करतंय? तो दोषी नाही हे मान्य आहे तरीही तो "मुस्लिम" आहे म्हणून फाशी दिली वगैरे वक्तव्ये कुणाची आहेत? त्याच्या बायकोला एम पी बनवण्याची विनंती कोण करतंय? सुलेमान मेमन जेव्ह हात जोडून लीव्ह मी अलोन म्हणतो तेव्हा मीडीया त्याच्याच पाठून का धावतेय? बर्‍याच लोकांच्या लॉजिकनुसार मीडीया सरकारच्या ताब्यात आहे, मग हाच मीडीया गेले चार दिवस अथक "फाशी देण्यात सरकारचे काय चुकले?" हे का दाखवत आहे? एक्स्प्रेसहेडलाईएन म्हणाते "दे हँग्ड याकूब" हे "दे" आहेत तरी नक्की कोण? कलामच्या फ्युनरलपेक्षा याकूबची अँब्युलन्स कुठं पोचली आणि त्याच्या घरात कुणी काय केलं इथवर बातम्या दाखवणारी मीडीयाच होती ना? फाशीचा इव्हेंट केला तर कुणी केलाय?

मी हिंदुत्त्ववादी नाही, मी मुस्लिम विरोधक नाही (हिंदू नसतील इतके मित्रमैत्रीण मुस्लिम आहेत!!!) पण तरीही मलाच काय इतर कित्येक मुस्लिमांना यामध्ये "भडकाऊपणा" दिसतोय. पण केवळ "हिंदुत्त्व्वादीच ध्रुवीकरण करतात" असा ज्यांचा समज आहे त्यांनाही यात हिंदुत्त्ववादीच अजेंडा दिसणार

राज,

आपला नक्की रोख ध्यानी आला नाही, पण तरीही, विचार खोडता आले नाहीत की विचार मांडणार्‍याला विखारवंत, विचारजंत वगैरे म्हणून डिस्क्रेडिट करणे ही एक ट्याक्टिक फार वापरली जाताना दिसते आहे आजकाल. त्याबद्दलच वरची पोस्ट आहे.

I myself have been guilty of reactionary behaviour on occasions. तेव्हा, डोन्ट नो... लगे हाथ तुम्हीच दुसरी बाजू मांडून टाका की!

"आम्ही" आहोत, तोपर्यंत भारताचे सार्वभौमत्व, भारतीय संस्कृती वा हिंदू धर्म बुडवून टाकायची कुणाची टाप आहे? हा प्रश्न मी मायबोलीवर पूर्वीही अनेकदा विचारला होताच, आता परत विचारतो Happy

एका पोस्ट मधे खैरलांजी च्या बाबतीत असं झालं तर असा उल्लेख होता, तेव्हां उत्तर न देणंच श्रेयस्कर समजलं होतं, खैरलांजी प्रकरणात काय शिक्षा झाल्यात याचा आढावा घ्यायचा होता. देशभरात झालेल्या आजवरच्या दलित हत्यांमधे कुणाला फाशीची शिक्षा झालीय ? न्याय सर्वांनाच मिळायला हवा.

बाकी काय, मुझफ्फर पूर जसं घडलं तसा डाव आहे का अशी शंका लोकांना आहे. खरं म्हणजे तसं काहीही न घडवता तो इफेक्ट साधला गेला आहे.
निळू दामलेंचा लेख समर्पक आहे.

http://niludamle.blogspot.in/2015/07/blog-post_30.html

भीती वाटणा-यांसाठी
http://zeenews.india.com/news/nation/isi-funded-rss-leaders-pandeys-conf...

http://timesofindia.indiatimes.com/city/kolhapur/Four-arrested-in-Kagal-...

http://indianexpress.com/article/india/india-others/yakub-hanging-is-jus...

दिमा,
आत्ता घाईत आहे. सविस्तर प्रतिसाद नंतर देते.
पोस्ट आवडली. बहुतांश भागाशी मी सहमत आहे. धन्यवाद माझ्या प्रश्नाला सिरियसली घेतल्याबद्दल. (तुम्हाला उचकवण्याचा फायदा झाला Wink ) मी काही मुस्लिम मित्रांनाही हाच प्रश्न काल विचारला होता, त्यावर सिमिलर उत्तर मिळालंय.

त्याचं काये नं नंदिनीताई,
तुमचा "तो" मित्र जास्त ज्ञानी आहे. व १५ हजाराच्या गर्दीतल्या सगळ्याच लोकांच्या मनात नक्की काय होतं त्याचं आंतर्ज्ञानही त्याच्यापाशी आहे.
दुसरं,
"ती" वाक्यं माझी नाहीत. कुठून आणलीत तेही मी लिंकेसकट लिहिलं आहे. व तेही फक्त माझ्या थीमला पाठबळ म्हणून. अ‍ॅक्टिव्हली समाजात दुही माजवण्याबद्दल मी बोलतो/लो आहे.

तुम्ही तुमच्या या पोस्टीतून नक्की काय साध्य करताहात ते समजलं तर बरं होईल.

बाकी तुमचा अन माझा बायस आधीपासून स्पष्ट आहेच. तरीही 'वेळ काढून' माझ्या लिहिण्याला उत्तर टंकायचे कष्ट घेतलेत, याचा अर्थ समजला. असेही, तुमच्या-माझ्या माबो वावराचा इतिहास, व संदर्भ इथे सगळ्यांनाच ठाऊक आहेत. नाही का?

तुमचा "तो" मित्र जास्त ज्ञानी आहे. व १५ हजाराच्या गर्दीतल्या सगळ्याच लोकांच्या मनात नक्की काय होतं त्याचं आंतर्ज्ञानही त्याच्यापाशी आहे.<<< तो त्या एरियामध्ये बॉर्न अँड ब्रॉटप आहे, आणि बरीच माहिती ठेवून आहे. (मुस्लिमही आहे, आणि हेडलाईनमध्ये झळकणार्या काही लोकांचा नातेवाईकही आहे. हवे अस्ल्यास त्याचा फोन नंबर देऊ शकेन. आपणच बोलून त्याच्या ज्ञानाची माहिती घ्या)

तसेही, तुमच्या-माझ्या माबो वावराचा इतिहास, व संदर्भ इथे सगळ्यांनाच ठाऊक आहेत. नाही का?>>>>

झालं, पोस्टला उत्तर देणं शक्य नसलं की तिरकस आणि पर्सनल कमेंट्स चालू!!!

ट्याक्टीक्सचं माहित नाहि, पण माझ्यामते विखारवंत म्हणजे जो अंडरलाइंग इश्युजची संपुर्ण शहानिशा न करता सिस्टम विरुद्ध काहितरी भडक/उफराटं लिहुन लक्श वेधायचा प्रयत्न करतो तो. असे लोक तुमच्या पाहण्यात खरोखर आले नसतील तर मी तुमचा उद्वेग समजु शकतो... Happy

या सर्व गोंधळाला टीव्हीवरच्या चर्चा जबाबदार आहेत असं कुणाला वाटत नाही का ?

जर त्याने कायद्याचा भंग होत असेल तर (माहीत नाही)... कारवाई होणार का ?

राज

विखार पसरवणा-याला विखारवंत म्हणत असतील तर .. वर आनंद पटवर्धन यांच्या फिल्म ची लिंक दिलेली आहे ती नक्की बघा. द्बेषभक्तांना आवडेल.

झालं, पोस्टला उत्तर देणं शक्य नसलं की तिरकस आणि पर्सनल कमेंट्स चालू!!!
<<
यापुढे तुमची 'अहो अ‍ॅडमिन' ही साद असते.

ताई,
माझ्या प्रश्नात, यावेळीच हे 'असं' का झालं? सरकारने बॉडीची विल्हेवाट का नाही लावली? असंही होतं. त्याबद्दल काही कॉमेंट?

असो. तुम्हाला उद्देशून हेमाशेपो _/\_
अन हो, तुमच्या त्या आतरज्ञानी मित्रालाही दंडवत सांगा Wink

चर्चा ऊत्तम चालू आहे.
नंदिनीच्या पोस्टमधले मुद्दे विचार करण्याजोगे आहेत.

अ‍ॅडमीन महोदय,

कृपया माझा हा प्रतिसाद असंबद्ध किंवा वादोत्पादक मानला जाऊ नये अशी विनंती! ही विनंती येथे खासकरून करण्याचे कारण इतकेच की पराकोटीची साळसूद पोस्ट आलेली असून त्यावर अनुमोदनेही आलेली आहेत.
=============

>>>आजकाल आपण आपला पर्स्पेक्टिव्ह, (निकोप) दृष्टीकोण, घालवून बसत आहोत असं फार वेळा जाणवतं अन उद्विग्न व्हायला होतं. हा धागा सुरू झाला तेव्हा पासून आतापर्यंतची "चर्चा" पाहिली तर एक उन्माद, जो खरंतर बॅकग्राउंडला अन पुसटसा असायला हवा, तोच मुख्य विचारधारा झाल्यासारखा पुढे येऊ लागलाय असं प्रकर्षाने जाणवू लागतं.<<< अरे व्वा? हे तर खूपच नवीनच वाचायला मिळत आहे. निव्वळ उन्माद असलेल्या विशिष्ट बाजूच्या पोस्ट्सचा मोठा साठा तयार झाला आहे माझ्या लॅपटॉपवर! अचानक त्रयस्थासारखे लिहून विचारवंत ठरायचे असेल तर त्या पोस्ट्सची स्पष्टीकरणे कोण देणार?

>>>आजकाल दिसतंय असं, की आपण संदर्भ, संयम हरपून, कुणी थोडाही विरोधी आवाज काढला, की 'हा देशद्रोही', हा 'भावी अतिरेकी' असली लेबलं चिकटवून मोकळे होऊ लागलो आहोत. भरीस भर म्हणजे निराधार, अभ्यासहीन सोशल-मेडिया-फॉर्वर्ड्स वाचून आपण आपली मते बनवू लागलो आहोत. मुळापासून अभ्यास, वाचन, त्या-त्या काळातल्या लोकांनी त्या-त्या काळाच्या, समाजाच्या संदर्भांनुसार वागणूक कशी केली याचा पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी हरवून जातो.<<<

नक्की काय केले की असे लिहायला सुचते? संयम हरपून वगैरे? निराधार फॉर्वर्ड्सवर पहारे जगत आहेत.

>>>का होतंय असं? WHY?<<< तेच कळंत नाही आहे.

>>>Are we, as a People feeling threatened by something or someone? Is there, in fact, ANY REAL threat to us as a People? To integrity of our Nation? And if there is, what is the exact nature of that threat?

आपल्याला कुणापासून तरी धोका आहे. कुणीतरी आपला देश, धर्म, बुडवून टाकू पाहतो आहे असा भयगंड येतोय का? कुठून येतोय? अशी परिस्थिती खरेच आहे काय? या भयगंडामुळे नक्की काय होतंय?<<<

एक तर ह्या सगळ्या प्रश्नांचा 'धर्म म्हणजेच भारत देश आहे काय' ह्या प्रश्नाशी संबंधच नाही. याकूबच्या फाशीनंतर १५००० चा जमाव जमला त्यातील हिंदू किती हे आधी सांगा! हिंदू धर्म (किंवा जीवनशैली, जे काय असेल ते) कोणी बुडवू पाहतो की नाही हे तर डोक्यातही नाही. देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणार्‍याचे अंतिम दर्शन घ्यायला त्याच्या धर्माचे १५००० जण जमतात आणि अप्रत्यक्ष शक्तीप्रदर्शन करतात ही भारताला देश म्हणून असलेली थ्रेट आहे. धर्म म्हणून नव्हे. कोणत्याही धर्मियांचा देश म्हणून नव्हे.

>>>अन मुळात, आपला "धर्म" म्हणजेच भारत देश आहे काय?<<<

ह्या विषयावर चर्चा आणायची होती ह्यापलीकडे ह्या प्रश्नात काहीच नाही.

>>>अशा भयगंड पसरवणार्‍या बातांना शांत करण्यासाठी खरे तर 'विचारवंत' नामक जमात कामाची असते. गे लोकांचा प्रश्न असो, कुठल्याश्या पुस्तकात काय लिहिलंय त्याबद्दलची चर्चा असो, की 'इर्रिवर्सिबल' म्हणून फाशीची शिक्षा द्यावी की न द्यावी, अशी अ‍ॅबस्ट्रॅक्ट चर्चा असो.<<<

कुठेतरी बसून इन्टरनेटवर पोस्टी खरडताना उद्या ह्या पंधरा हजारांचे पंधरा लाख झाले आणि एखादे गाव जळून गेले तर काय होईल ह्याचे भान कसे असेल? आपल्याला तर फक्त पांडित्य दाखवायचे आहे. कधी नव्हे इतका ह्या दळभद्री साळसूदपणाचा राग आला आहे.

>>>'श्रद्धा' अन विश्वासावर काम करणार्‍या आपल्या मानसिकतेस, त्या विचारवंतांनी 'विचार' केलाच असेल, हे गृहितक आजवर मान्य होते. त्यामुळेच त्यांची मतप्रदर्शने, प्रथमदर्शनी अवास्तव, अतिशयोक्त वाटत असलीत, तरी आपण सगळे तटस्थतेने पाहत होतो. त्यांच्या चर्चा, वादविवादांतून काही निष्पन्न होईपर्यंत वाट पाहत होतो. अन बहुतांश वेळा, चांगलेच निष्पन्न होत आहे, असे दिसूनही येत होते.<<<

सत्तापालटानंतर असे जाणवू लागले का?

>>>मी दिलेल्या उदाहरणांत याकूब अन श्रीसंतची तुलना कशी काय करता, जिहादी ते जिहादीच, वगैरे भडक पोस्टी, प्रत्युत्तरे ताबडतोब येतील. मुद्दा पर्स्पेक्टिव्ह घालवून बसण्याचा आहे.<<<

मुद्दा पर्स्पेक्टिव्ह मुळातच नसण्याचा आहे. श्रीशांतने खिश्यातून रुमाल बाहेर काढून फिक्सिंग केल्यामुळे काहींचे चंद रुपये गेले असतील. त्याची तुलना जीवितहानीशी करत आहात. असे म्हणणे भडक नसून नॉर्मल आहे. ते भडक आहे हा पर्स्पेक्टिव्ह असणार्‍यांमुळे घोळ होत आहे. जसे हजार आरोपी सुटले तरी चालतील पण एक निर्दोष व्यक्ती फासावर जाता कामा नये असे म्हणतात तसेच करोडोंचा भ्रष्टाचार झाला तरी चालेल पण निष्पाप नागरीक मरता कामा नयेत.

>>>इथे फाशीबद्दलची चर्चा मांडणार्‍या कुणीही याकूब दोषी नाही, असे म्हटलेले नाही. पण केवळ त्याच्या फाशीबद्दल बोलणे सुरु केले, तेही सध्याच्या सरकारी भूमीकेशी सुसंगत नसलेले, म्हणजे झालंच. हा नक्कीच देशद्रोही अशा गप्पा इथे सुरू झाल्या आहेत.<<<

मूळ लेखातील मुद्यांचा मुद्देसूद प्रतिवाद पहिल्या दोन तीन पानांवर झालेला आहे. तुमच्या आणि तत्सम मतांच्या लोकांपेक्षा न्यायव्यवस्थेला आणि देशाच्या इन्टेलिजन्सला थोडेसेच अधिक कळते ह्या गोष्टींमधले. त्यामुळे त्यांनी त्याला फाशी दिली. त्याबाबत असे धागे काढणे आणि समर्थनार्थ ते वरचे सहा, आठ मुद्दे देणे हे किती ओढून ताणून आहे हे इथे अनेकांना दिसत आहे.

>>>का होतंय हे असं? आपला उदारमतवाद. आपला 'सेक्युलरिझम'. कुठे गेले हे सगळे?<<< सेक्युलरिझमचा येथे काय संबंध? उदारमतवादाचा काय संबंध? तुम्ही याकूबच्या फाशीबाबत येथे उदारपणे चर्चा गेले आठवडाभर करता आहात. भारताने त्याला बावीस वर्षे जिवंत ठेवून त्याची बाजू मांडण्याची मुभा दिली आहे. हाईट आहे!

>>>कुठेतरी विचारवंतांना विचारजंत ठरवणे सुरू झाले. कुठेतरी सेक्युलरिझमचा अर्थच बदलून 'सर्वधर्मसमभाव' असे ठरवत, त्यालाच लांगूलचालन म्हणत, त्या विचाराच्या व्यक्तींचेही चारित्र्यहनन सुरू झाले. कुठेतरी आपल्याच आपल्यावरच्या विश्वासाला तडा देण्याची प्रक्रिया सुरू झाली.<<<

कुठेतरी म्हणजे नक्की कुठे? काय म्हणायचे आहे?

>>>मग यावेळी हे असं का घडलं?<<<

भारत देशाने 'देशाच्या' अपराध्याला जाहीर शासन दिले की विशिष्ट धर्मीय कसे जमतात हे जगाला दाखवण्यासाठी! बघे जमतात वगैरे थिअरी ऐकवत जाऊ नका.

दीमा,

तुम्ही परिप्रेक्ष्य हरवून बसायच्या गोष्टी करताहात. ठीकाय. हा परिप्रेक्ष्य डोळ्यासमोर घडणाऱ्या घटनांमधून बनत असतो. यालाच वस्तुस्थिती म्हणतात. ही वस्तुस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. वस्तुस्थितीच जर माध्यमांनी लोकांसमोर आणली नाही तर परिप्रेक्ष्य कसा टिकून राहणार?

इकडे एक कथन आहे : https://www.facebook.com/sanjanapublications/posts/1694187050810186?

माध्यमांतल्या कोणी एकाने तरी मेमन कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर भाष्य केलेलं का? नाहीना? मग मी जो काही उदारमतवादी परिप्रेक्ष्य बनवलाय त्याला फुटक्या कवडीइतकीही किंमत नाही. तो माझ्यासाठी भयंकर घातक आहे. मी तो का म्हणून बाळगावा?

असो.

दुसरं उदाहरण देतो. वैचारिक आहे. १९९३ च्या मुंबई स्फोटांतील आरोपींचं वकीलपत्र नितीन प्रधानांनी घेतलं. त्यावेळी त्यांनी हिंदूंचा रोषही पत्करला. पूर्ण मुस्लिम कौम दहशतवादी नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण पुढे ११ जुलै २००६ ला परत मुंबईत लोकल गाड्यांत भीषण स्फोट झाले आणि त्यांचा परिप्रेक्ष्य बदलला. त्यांनी १९९३ च्या मुंबई स्फोटांतल्या आरोपींचं वकीलपत्र सोडलं. त्याविषयी इथे मुलाखत आहे : http://www.rediff.com/news/2006/jul/24inter.htm

तुम्हाला प्रश्न पडलाय :
>> का होतंय हे असं? आपला उदारमतवाद. आपला 'सेक्युलरिझम'. कुठे गेले हे सगळे?

या प्रश्नाचं उत्तर नितीन प्रधानांच्या वरील मुलाखतीत आहे. वाचून जर ते समजलं नाही तर प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करावी म्हणून सुचवेन. मी त्यांना ओळखत नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते मुंबईत माहीमला राहतात. या विभागात हिंदू, मुस्लीम, नवबौद्ध, ख्रिश्चन अशी सर्वधर्मीय वस्ती आहे. या वस्तीत लहानाचे मोठे झाल्याने त्यांचा मुस्लिमांकडे पहायचा दृष्टीकोन उदारमतवादी आहे.

श्री. नितीन प्रधानांचा कार्यालयीन पत्ता : http://yellowpages.sulekha.com/mumbai/niteen-pradhan-fort-mumbai_contact...

आ.न.,
-गा.पै.

एखादी विधानसभा अतिरेक्यला फाशी देऊ नये म्हणून ठराव करते तेव्हा भिती वाटत नाही ? >>>> विकु, मला तुमचा मुद्दा कळला नाही. तुमचा फाशीच्या शिक्षेला विरोध आहे ना ? मग एखाद्या राज्याची विधानसभा आरोपीची फाशी रद्द व्हावी म्हणून प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्यांना पाठींबा द्यायला हवा ना? की विशिष्ठ आरोपीबद्दल सुरू असल्याने तुमची मतं बदलली लगेच ?

इब्लिसांनी कळकळीने लिहीलय, बरेच मुद्दे पटण्याजोगे आहेत पण बर्‍याच सो कोल्ड सेक्युलरवाद्यांप्रमाणे एकांगी लिहिलय.

इथेच मनात दुसरा प्रश्न येतो, तो मागच्या फाशी दिल्या, त्यावेळी 'चोरासारख्या' गुपचूप दिल्या गेल्या. मृतदेहाची विल्हेवाट सरकारनेच लावली. 'त्या' मेलेल्यांना 'मार्टियर' 'हुतात्मे' व्हायची, त्यांच्या कबरी बनवायची संधी दिलीच गेली नाही. जशी अमेरिकेने ओसामाची कबर बांधू दिली नाही. (*संपादन: बांधायचा चान्सच निर्माण होऊ दिला नाही.) कारण जिहादी लोकांना तिथे 'वारी करण्यासाठी' सिंबॉल मिळू नये.

मग यावेळी हे असं का घडलं? >>>>> मागच्या दोन फाशीच्या घटनांनंतर सुप्रिम कोर्टानेच फाशीची तारिख जाहिर करण्याचे तसचं मृतदेह कुटूंबाच्या ताब्यात देण्याबाबतचे आदेश दिले असं वाचल्यासारखं वाटतय. (बहुतेक लोकसत्तेतच). सरकार काही बाबतींची परवानगी नाकारू शकते जसं की अंत्ययात्रा काढणे. त्यामुळे झालं ते कोर्टाच्या आदेशानुसारच झालं ना?
बातमीच्या लिंक शोधायचा प्रयत्न केला. सापडल्या तर देतो. जाणकारांनीही प्रकाश टाकावा.

नंदिनीच्या पोष्टीतले मुद्देही महत्त्वाचे आहेत !!

सरकार काही बाबतींची परवानगी नाकारू शकते जसं की अंत्ययात्रा काढणे. >>> मीडीयामधे चालू असलेल्या उलटसुलट चर्चांवर पण निर्बंध घालायचे होते.

मटाच्या मराठी आवृत्तीत एक लिहीलय तर हिंदी आवृत्तीत (नवभारत) मधे पूर्ण विरुद्ध. कामतांकडे एव्हढी महत्वाची माहीती असेल तर सर्व आवृत्त्यांमधून अचूक तेच यायला हवं.

धोरण एकच असतं असा माझा समज आहे कोल्हेबुवा.

कामतांनी म्हटलय की रागांचे मारेकरी राष्ट्रपतींकडून झालेल्या विलंबामुळे सुटले. त्याच वेळी त्यांच्यासाठी तमीळनाडू विधानसभेनेच शिक्षेला माफी देण्याबाबतचा केलेला ठराव, सुटका करण्याच्या घेतलेला निर्णय आणि केलेला पाठपुरावा या बाबिंचा उल्लेख टाळला आहे. जम्मू कश्मीर मधे भाजपचं सरकार असताना गुन्हेगार सुटताहेत. विधानसभाच पाठीशी असल्यावर वकिलांनी धावपळ करण्याची आवश्यकता काय ?

बरं एव्हढं करूनही ते मान्य करायचं म्हटलं तरीही एकाच दिवशी परस्परविरोधी निर्णय जाहीर होणं हा योगायोग स्विकारायला जडच जातंय.

फेसबुक वर इतरही पोस्टी फिरताहेत. बिहारात रणवीर सेनेने केलेल्या हल्ल्यात दलितांच्या घरात जाऊन हत्या केल्या. गरोदर महिलांचे पोट तलवारीने फाडून तलवारीच्या टोकावर अर्भकं नाचवण्यात आली कारण ही मुलं पुढे बदला घेतील. या कुणाही गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही, फादर स्टेन आणि त्यांच्या मुलांना जिवंत जाळणा-याला शिक्षा झालेली नाही.

मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे शूद्रांची हत्या हा दंडनीय अपराध ठरू शकत नाही. पण शूद्राकडून झालेला गुन्हा हा देहदंडाच्या शिक्षेस पात्र ठरतो.

<<मागच्या दोन फाशीच्या घटनांनंतर सुप्रिम कोर्टानेच फाशीची तारिख जाहिर करण्याचे तसचं मृतदेह कुटूंबाच्या ताब्यात देण्याबाबतचे आदेश दिले असं वाचल्यासारखं वाटतय. (बहुतेक लोकसत्तेतच). सरकार काही बाबतींची परवानगी नाकारू शकते जसं की अंत्ययात्रा काढणे. त्यामुळे झालं ते कोर्टाच्या आदेशानुसारच झालं ना?>>

-----
सर्वोच्च न्यायालयाने फाशीची तारिख आधी जाहिर करण्याबाबत काही नियमावली आखली आहे असे काही माझ्या वाचण्यात नाही आले.

मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत कारागृह अधीक्षक (superintendent ) यान्ना निर्णय घेण्याचे पुर्ण अधिकार होते. अर्थात अन्तिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्याच्या मुख्यमन्त्री (राज्य सरकार) यान्ना होता.

http://www.dnaindia.com/india/report-countdown-for-yakub-memon-s-hanging...

कसाबच्या बाबत तत्कालीन कॉन्ग्रेस सरकारने खुप परिपक्वता दाखवली होती. ज्यान्ना सन्देश द्यायचा आहे त्यान्ना तो मिळतोच. डन्का पिटवायची गरज भासली नव्हती.

या सरकारला प्रत्येक बाबतीचा "इव्हेंट" बनवण्याचा चस्का लागलेला आहे. परिणाम काय होतील वगैरे विचार करणे हे गौण ठरत आहे.

उदउ,

>> कसाबच्या बाबत तत्कालीन कॉन्ग्रेस सरकारने खुप परिपक्वता दाखवली होती. ज्यान्ना सन्देश द्यायचा आहे त्यान्ना
>> तो मिळतोच. डन्का पिटवायची गरज भासली नव्हती.

पण जनतेला भेकडकसाबचं प्रेत बघायला मिळालं नाही. कशावरून त्याला फाशी न देता गुपचूप सोडलं नसेल, अशी शंका घ्यायला वाव राहतो. मात्र याकूब मेमनच्या बाबतीत अशी संदिग्धता ठेवली नाही. जनतेच्या अधिकारांच्या दृष्टीने हे स्वागतार्ह पाऊल आहे.

आ.न.,
-गा.पै.

लोकांना जात- धर्म, मंदिर -मस्जिद काही नको आहे....... हे नेत्यांना हवे आहे.

आताची पिढी उन्मादात वाहवत जाणारी नाही तिला रोजगार्,बिजली सडक पाणी हवे आहे.

याकूबच्या फाशी वरुन जे राजकारण खेळले जात आहे ते सुज्ञ जनतेला समजतय.

मनुस्मृती प्रमाणे देश चालवायचा असेल तर या देशाकडे कोणी ढुंकून पण बघणार नाही.

खसा,

>> मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे शूद्रांची हत्या हा दंडनीय अपराध ठरू शकत नाही. पण शूद्राकडून झालेला
>> गुन्हा हा देहदंडाच्या शिक्षेस पात्र ठरतो.

सारखे सरखे मनुस्मृतीवर घसरू नका. अशाने तुमची मूळ छबी ओळखू येईल. असो. मनुस्मृतीच्या कोणत्या अनुच्छेदात हे म्हटलंय ते जरा सांगणार का?

आ.न.,
-गा.पै.

Pages