पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास

Submitted by आशुचँप on 14 July, 2015 - 22:59

अखेरीस होणार होणार म्हणत गाजलेली पुणेकरांची पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम यशस्वीरित्या पार पडली. २१ फेब्रुवारी रोजी निघालेली ही मोहीम महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात या सायकलस्वारांनी हे अंतर केवळ १३ दिवसांमध्ये पार केले.

आशुचँप, ते दारू-मटनाचेही खुलासे करून टाक बाबा! कामधंदा सोडून सायकलीवर फिरता तुम्ही, सुट्टीची काय कारणे देता. सुट्टी वगैरे अडचण फक्त श्रमाने सचोटीने काम करणार्‍यांना असते >>>>>

जाऊ दे टण्या, फारच अप्रिय विषय आहे तो...पण तरीही मला कुतुहल आहे, मी माबोवर एकदाही काहीही लिहीलेले नसताना ही दारू मटणाची माहीती कुठुन कळली. सगळीकडे उपलब्ध असलेली माहीती कळायची बोंब पण गुप्त माहीती बरोबर ठाऊक....कुछ तो गडबड है द्या.... Proud

जोक्स अपार्ट....सुट्टीचा खरेच खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. खूप किरकिर केल्यावर आणि पार राजीनामा देण्याची वेळ येईपर्यंत हाणामाऱ्या झाल्या. त्यातही एकाच अटीवर सुट्टी मिळाली ती म्हणजे प्रवासात असतानाही स्टोर्या द्यायच्या. त्यामुळे कितीतरी वेळेस दमून भागून आल्यावर फोनवर मेल्स चेक करून त्यातल्या संबधीत लोकांशी बोलून आणि टाईप करून स्टोऱ्या पाठवल्या आहेत. कधीकधी तर कागदावर लिहून आणि मग ते सगळे आफीसातल्या मित्राला फोनवर वाचून दाखवून पण.

नुसत्या पिकनिक टाईप प्रवासात हे करायला काही वाटले नसते, पण मेल्यासारखे दमल्यावरही हे काम करायचे म्हणजे थोरच वैताग होता.

जरा जास्तच रडगाणी गातोय असे व्हायला नको म्हणून मुद्दामच हा उल्लेख टाळला होता, पण आता विषय निघाला तर सांगून टाकले.

आणि मटण - दारूचे नावही काढले असते तर मामांनी डायरेक्ट घरी पाठवले असते. सगळे कट्टर शाकाहारी आणि देवाधर्माचे करणारे. त्यामुळे त्यांच्या सहवासात राहून मी पण १५ दिवस कडकडीत श्रावण पाळला. Proud

आशु अरे आधी माहित असतं तर जसं महाजन बंधूंना फॉलो केलं तसं तुम्हालाही फॉलो करून फेबु वर टाकलं असतं
>>>>>>>

नाय वो, ते फारच थोर लोक आहेत. आपली कुठली बरोबरी व्हायची त्यांच्याशी. मला तर माझ्या सायकलींग जर्सीवर त्यांची स्वाक्षरी हवी आहे. खरेखुरे स्फुर्तीस्थान.

मस्त वाटले वाचुन. लेखमाला झाली ते बरे झाले कारण सगळे एका बैठकीत वाचुन काढता येईल आता.

वाचताना वारंवार तुम्हा लोकांच्या भाग्याचा हेवा वाटत होता. मला असे काहीतरी करायला खुप आवडेल पण तेवढी ताकद नाहीये. तुम्हा लोकांमध्ये तेवढी ताकद आहे आणि करायलाही मिळतेय या भाग्याचा हेवा वाटतो.

आशुचँप अरे गरज नाही काही लिहायची. भन्नाट काम केले आहेस. Happy असो. हे एक बरे झाले. आता एका बैठकीत सगळे वाचुन काढीन. Happy

आशू,
मी सर्व लेख माला फॉलो केली. तमिल नाड केरळ आवडीचा प्रदे श. त्यामुळे ते फारच मस्त वाटले.

खास कौतूक. बाकी अस्थानी प्रतिसाद अनुल्लेखच करावे.

सायकलविश्व हा नवा विभाग आडमिननी बनवावा जेणेकरुन सायकलविषयीचे सर्व लेख तिथे मिळतील. उदा. आशुचेच सायकलविषयी सर्व काही, बीआरएम संदर्भातील धागे वगैरे..
भविष्यात या विषयावरील लेख वाढते रहाणार आहेत..

आज बरोबर या मोहीमेला वर्षपूर्ती झाली. गेल्या वर्षी ५ मार्चला कन्याकुमारीच्या आश्रमात मोहीम पूर्ण झाल्याच्या आनंदात होतो.

धन्यवाद वि

आम्ही पुण्यातूनच एकाकडून बनवून घेतल्या, तुम्हला हव्या असतील तर संपर्कातून कळवा मी नंबर देतो.

Pages