Submitted by Adm on 27 June, 2015 - 08:14
स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.
ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.
महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.
महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.
स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
वेबसाईट रोलँगॅरोस पेक्षा बरी आहे पण मधे मधे हँग होतेच आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चुसर म्हणजे रे काय परागभाऊ?
चुसर म्हणजे रे काय परागभाऊ?
कमेंट्रेटर्सना नक्की काय
कमेंट्रेटर्सना नक्की काय प्रॉब्लेम आहे??! म्हणे "She should go to US open, win it and then we will discuss whether she is great or not?" Really ??? अजून काय प्रुव्ह करायचं राहिलं आहे?
>>
हा टिपिकल ब्रिटीश खवटपणा आहे. त्याला तोड फक्त पुण्याच्या एका विशिष्ट भागातच सापडू शकते. ह्येंच्या कामेन्टरीला देखील पुण्यात ' माईक बरे होते ह्या वेळेस' एवढाच प्रतिसाद येईल तेव्हा यांच्या नाकाचे शेंडे लाल होतील. पुंगाट लेकाचे ...
सानिया-मार्टिना आणि
सानिया-मार्टिना आणि माकारोव्हा-वेस्निना फायनल मॅच रंगात आली आहे. एक एक सेट बरोबरी आणि ५-५ तिसर्या सेटमध्ये.:)
जिंकल्या रे जिंकल्या..
जिंकल्या रे जिंकल्या..
जिंकल्या हो मिर्झाबाई आणि
जिंकल्या हो मिर्झाबाई आणि हिंगीसबाई! मिर्झाची सेवा तुलनेने अशक्त असूनही बाजी मारली दोघींनी! दुसऱ्या सेटात २-५ अशा पिछाडीवरून ६-६ अशी बरोबरी साधत कोंडीफोडीत ७-५ मारलेली बाजी चिवटपणाची साक्ष देते. तिसऱ्या सेटात ४-५ पिछाडीवर असतांना पराभवापासून केवळ २ गुण मागे असूनही मिर्झाबाईंची सेवा खंडित होण्यापासून वाचवली. पुढे जिद्दीने खेळ करत ७-५ असा विजय प्राप्त केला.
अभिनंदन!
-गा.पै.
जहबहरीही मॅच झाली. शेवटचा सेट
जहबहरीही मॅच झाली.
शेवटचा सेट २-५ वरून खेचून आणला अक्षरशः !! मला वाटलं ते छप्पर बंद करण्यादरम्यान ह्यांची लय बिघडते की काय ! पण उलट नंतर तर हिंगिस पेटलीच होती.
हिंगीसने उगीच धरसोड न करता स्वतःच करियर जरा नीट प्लॅन करायला हवं होतं. अजूनही ती किती भारी खेळते. तिच्या खेळावरून ही एकेकाळी नंबर वन होती हे कळून येत होती अगदी. शिवाय सिनीयर असल्याने जबाबदारी वगैरे घेत होती नीट.
आपल्या बाई स्वत:च्या मर्यादा ओळखून मस्त खेळल्या. शॉट सिलेक्शन, प्लेसमेंट एकदम भारी केलं. उगीच अवास्तव फटके मारायचा प्रयत्न केले नाहीत. पेशन्स ठेऊन योग्यवेळी मोका साधला.
मॅकारोव्हा आणि व्हेस्निना ह्याआधी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये इर्रानी-विंची कडून अशाच ५-१ ने पुढे असताना हरल्या. हार्ड लक फॉर देम !
आता उद्या पेस-हिंगीस पण जिंकले पाहिजेत.
सेवा >>>
रच्याकने, उद्या कधी नव्हे ते त्या ह्यांना पाठींबा द्यावा का असं मला वाटायला लागलं आहे..
but not able to decide yet !
पराग, >> हिंगीसने उगीच धरसोड
पराग,
>> हिंगीसने उगीच धरसोड न करता स्वतःच करियर जरा नीट प्लॅन करायला हवं होतं.
सहमत. पण तिच्या अंगी कुर्निकोव्हा संचारली आणि आपण एका गुणवान खेळाडूला काही वर्षांसाठी मुकलो.
आ.न.,
-गा.पै.
सेरेना द ग्रेट!
सेरेना द ग्रेट!
हिंगीस दुखापतींमुळे त्रस्त
हिंगीस दुखापतींमुळे त्रस्त झाल्याने निवृत्त झाली. दोन्ही घोट्यांवर दोन सलग मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आणि इतरही अनेक छोट्या दुखण्यांनी त्रस्त केले तिला.
चला. आज संध्याकाळी ट्रिट आहे
चला. आज संध्याकाळी ट्रिट आहे . लोकहो,एंजॉय अजुन एक एपिक मॅच..
पग्या, आज सँप्रासचा रेकॉर्ड मोडला गेला तर रडूबिडू नको रे..
महिला दुहेरी सारखीच मार्टिना पेसच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पण जिंकेल असा मला ठाम विश्वास वाटतोय.
आज जाम टेन्शन येणारे !
आज जाम टेन्शन येणारे ! आत्तापासूनच हुरहूर वाटत्ये !
गो फेडी गो !
जोकोचं काही खरं नाही. फेडी
जोकोचं काही खरं नाही. फेडी जिंकणार.
सानिया अफाट खेळते आणि फटके जबरी आणि वेगवान मारते.
दोघी एकमेकींना मस्त साथ देत होत्या. मार्टिना एकदम थंड डोक्याची आहे. हरत होती तरिही फटके चुकल्यावर हसत होती. अभिनंदन!
ब्रेक अँड ब्रेक बॅक.. मया,
ब्रेक अँड ब्रेक बॅक..
मया, 'चुसर' सुरू झाली बघ..
फेडररने सर्व्हीस ब्रेक केली
फेडररने सर्व्हीस ब्रेक केली म्हणून नाचत होतो तोवर जोकोने ब्रेक परत मिळवलासुद्धा.
दोघेही तोडीस तोड वाटतायत. जोको किंचित जास्त सरस.
जोकोविच काय खेळला टायब्रेक,
जोकोविच काय खेळला टायब्रेक, मस्त.
फेडररभावा कर कायतरी चिमित्कार
Too many unforrce error by
Too many unforrce error by Fedex..कठिण आहे..
सशल कुठेय ?
सशल कुठेय ?
कमॉन फेडी...
कमॉन फेडी...
एक सेट ऑल... पहिली सर्व्हिस
एक सेट ऑल... पहिली सर्व्हिस गंडते आहे फेडूची आज... जो त्याचा स्ट्राँग पॉईंट आहे खरं तर..
थकलाय अस वाट्त आहे फेडि.. I
थकलाय अस वाट्त आहे फेडि.. I wish Fedi wins it..
आज पहिली सर्व्हिस चांगली होत
आज पहिली सर्व्हिस चांगली होत नाहीये फेडीची. आता पाउस आलाय. होप फेडीला याचा फायदा होईल.
फेडुबाबाचे काही खरे दिसत नाही
फेडुबाबाचे काही खरे दिसत नाही आज....
अभिनंदन सुमंगल ..
अभिनंदन सुमंगल ..
सशल आणि पार्टीचं अभिनंदन!!!
सशल आणि पार्टीचं अभिनंदन!!!
. पहिला सेट मध्ये
मानलं ज्योकोला. अभिंनदन ज्योको.
सशल आणि पार्टीचं अभिनंदन!!!
सशल आणि पार्टीचं अभिनंदन!!! >>> + १
तुमचा विश्वास बसो वा न बसो
तुमचा विश्वास बसो वा न बसो ..
पण मला फेडरर करता वाईट वाटलं .. दुर्दैवाने ही मॅच ज्योको आणि फेडरर मध्ये होती .. नाहीतर मला मनापासून वाटत होतं त्याचा जो काय गोल होता (होता का खरंच?) तो पूर्ण व्हायला हवा होता ..
(आधी स्वार्थ पण थोडा परमार्थही
.. शेवटच्या गेममध्ये फेडरर ने गिव्ह अप केल्यासारखं वाटलं .. तसं करायला नको होतं ..
बरं मग आता तुमच्या घोड्यासाठी
बरं मग आता तुमच्या घोड्यासाठी चारापाणी पाठवा, तो तिथंच गवत खायला की
अहो खावू दे की .. आमचा घोडा
अहो खावू दे की .. आमचा घोडा भावुक आहे ..
पोरांच्या दुहेरी
पोरांच्या दुहेरी जिंकल्याबद्दल सुमित नागालचं अभिनंदन!
-गा.पै.
Pages