विंबल्डन - २०१५

Submitted by Adm on 27 June, 2015 - 08:14

स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.

महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.

महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
वेबसाईट रोलँगॅरोस पेक्षा बरी आहे पण मधे मधे हँग होतेच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेरीना अपेक्षेप्रमाणे शॅरापोव्हा चा धुव्वा उडवत जिंकली .. तिचा कोच आणि तिच्यात एकदम जबरी कनेक्शन आहे ज्यामुळे सेरीना एकदम फॉर्मिडेबल झाली आहे असं काहितरी टिव्हीवरचे सर्वजण म्हणत होते ..

फुकाचं वावरिंकाला हरवलं.

प्लेयर्स वॉर्मिंग अप रे भौ. पोटात आतापासूनच फुलपाखरं Happy

बरी चालली आहे का मॅच ? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जशी 'डोण्ट केअर' कंडीशन असते, तशी आहे ही मॅच. Wink

हे असे कपडे का घालून आलेत >>>> ते रॉयल बॉक्समध्ये आहेत. तिथे ड्रेस कोड असतो.

ओहो तो रॉयल बॉक्स् आहे का .. म्हणजे आपल्या अनुष्का च्या बलमाचीही तिकडे वर्णी लागत असेल हे माहित नव्हतं .. ओके ..

फेडरर-मरे मॅच भलती इंटरेस्टींग चालू आहे!!

२-० ने रॉ आघाडीवर. दोघेही जबरदस्त खेळताहेत. पण फेडू एक पाऊल पुढे आहे. त्याचा खेळ नेहमीपेक्षा थोडा कमी आहे, पण मरीपेक्षा उजवाच ठरतोय.
-गा.पै.

बीबीसी वर फेडरर-मरी सामन्याची उत्तरचर्चा चालली होती. स्यू बार्कर, टिम हेनमन आणि अँडी रॉडिक होते. पूर्ण चर्चाभर मरीचं गुणगान चाललं होतं. त्याने कडवी झुंज दिली याबद्दल. फेडररची स्तुती करायला शब्दच सापडत नव्हते तिघांना ! रॉडिकने स्पष्ट शब्दांत सांगितलं : You run out of superlatives to describe Roger.

रॉड लेव्हरने स्वत:ची फेडररशी तुलना होणं गौरवास्पद मानलं होतं याची आठवण झाली !

गो रॉजर गो !

-गा.पै.

हे रॉड लेव्हरचं मुक्ताफळ : Lol

सशल, जोको साठी मी आहेच पाठीशी. Happy
जोकोशी खेळतांना फेडरर बेचैन होउ शकतो. तसे झाले तर जोको नक्की जिंकेल.
let's see.

जिंकली ! सेरेनाचे अभिनंदन.
कमेंट्रेटर्सना नक्की काय प्रॉब्लेम आहे??! म्हणे "She should go to US open, win it and then we will discuss whether she is great or not?" Really ??? अजून काय प्रुव्ह करायचं राहिलं आहे?

असं खरंच कोण म्हणालं का??

मॅच, इस्पेशली सेकंड सेट सही झाला .. त्या मुगुरुझा ने मस्त फाईट दिली पण मग तिला ते मॉमेंटम काही टिकवून ठेवता आलं नाही .. ती गोड आहे जामच .. आय होप ती पुढे शाएन होईल ..

दुसर्‍या सेटमध्ये सेरेना ५-१ पुढे होती. पण मुगुरुझाने सलग ४ गेम जिंकून आणि ब्रेक पॉईंट मिळवून जरा चुसर निर्माण केली होती. पण सेरेनाने राखली सर्व्हिस.

Pages