विंबल्डन - २०१५

Submitted by Adm on 27 June, 2015 - 08:14

स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.

महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.

महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
वेबसाईट रोलँगॅरोस पेक्षा बरी आहे पण मधे मधे हँग होतेच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेस आणि हिंगीस सुसाट सुटलेत. २० मिनिटांत पहिला सेट ६-१ उचलला. पुढच्या १० मिनिटांत ३-० दुहेरी सेवातोडीसह (डबल ब्रेक) !
-गा.पै.

भारी ज्योको !! पाहिले तीन सेट जबरी झाले. चौथ्या सेटमध्ये मात्र फेडररने प्रचंड चुका केल्या. नंतर सोडून दिल्यासारखं वाटलं.

सुरूवातीला फेडबर्गनी सर्व्ह अँड व्हॉलीचा प्लॅन केलेला दिसत होता तो चालतही होता. पण ज्योकोने नंतर त्याला उत्तर द्यायला सुरुवात केल्यावर प्लॅन बी दिसला नाहीत. नुसता रिअ‍ॅक्टीव गेम वाटत होता, विषेशतः तिसर्‍या सेटच्या मध्यापासून.

दोन्ही टायब्रेकर भारी होते !!

हिंगिस आणि पेसने जबरी जिंकली मॅच. फारच किरकोळीत.

हिंगीस दुखापतींमुळे त्रस्त झाल्याने निवृत्त झाली. >>>> त्याबद्दलच बेटर प्लॅनिंग म्हणतो आहे. दुखापतीतून सावरून खेळायला लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. निवृत्ती हा एकदम टोकाचा पर्याय वाटतो. बाकी निर्णयामागे अनेक कारणे असू शकतात आणि आपल्याला माहित नाहीत. पण एव्हड्या गुणी खेळाडून इतक्या लहान वयात एकदम निवृत्तीच घेतलेली बघून वाईट वाटलं होतं तेव्हा.

रच्याकने, आज काय प्रेसेंटेशनच्या आधी खेळाडूंना कपडे बदलायला आता पाठवलं होतं का?? एकदम ते निघूनच गेले. मी कॉमेंट्री ऐकत नव्हतो तेव्हा, त्यामुळे नक्की काय झालं ते कळलं नाही. मला आधी वाटलं रॉयल बॉक्समध्ये आहे की काय प्रेसेंटेशन.

रूफ आधीच बंद केलं होतं. मॅच तिसर्‍या सेट दरम्यान ज्योकोने ब्रेक मिळवला त्या गेमच्या आसपास थांबवली होती.

मला वाटलं तेव्हा रूफ बंद केलं नव्हतं .. पावसाची सर गेल्यावर ते आले खेळायला परत ..

सेरेमॉनी करता ड्युक आला ना, तर पावसाचे शिंतोडे नकोत्याच्यावर असं आपलं मला वाटलं ..

स्कोअर गेल्या वर्षीच्या रिव्हर्स झाला नाही याच दु:ख वाटतय. पुढील वर्षी बघून घेऊ अस म्हणण्याच धाडस नाही.
पण तो म्हणलाय. आय विल बी बॅक.

जोको अ‍ॅज युज्वल कंन्सिस्टंट होता. पण फार डॉमिनेटींगही नव्हता. स्ट्रॅटेजी असावी. चुकांची वाट पहाण्याची.
फायनल मधे रॉजर का ढेपाळला कुणास ठाउक. ट्रायींग टू हार्ड मे बी. पहिली सर्वीस पण दगा देत होती,
फायनलला मजा आली नाही. अचानक ३ रा आणि चौथा सेट संपला.
असो.

`मेंटल टफनेस लेव्हल' हा दोघांमधला मेन फरक असावा असं मला वाटतं. पहिल्या सेटमध्ये सुरूवातीला फेडरर चांगला खेळत होता. त्याने लवकर ब्रेकही मिळवला. पण ज्योको त्याने अजिबात विचलीत झाला नाही. लगेच पुढच्याच गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली त्याने फेडीची. सेम केस सात वेळा सेट पॉईंट मिळुनसुध्दा दुसरा सेट गमावला तरी ज्योको विचलीत झाला नाही. इव्हन मधल्या काही गेम्समध्ये फेडीला ब्रेक पॉईंट्स मिळुनसुध्दा ज्योकोने त्याला ते गेम्स जिंकू दिले नाहीत. याउलट त्याला जेव्हा जेव्हा ब्रेकची संधी मिळाली त्याने ती साधली. कारण त्यावेळी फेडरर अंडर प्रेशर गेला. त्याच्या बॉडी लँगवेजवरूनच ते जाणवत होतं. स्वतःच्या पहिल्या सर्व्हिसवर त्याला कंट्रोल ठेवता येत नव्हता. आणि ही तीच सर्व्हिस जीने त्याला आधीच्या सहा मॅचेसमध्ये पुरेपुर साथ केली होती. फॉर्ममध्ये असलेल्या नदालविरुध्द खेळताना जसं पूर्वी त्याचं होतं तेच आता त्याचं ज्योकोविरुध्द होताना दिसतय.

मला आवडली दोघांचीही बॉडी लँग्वेज आणि वर्तणूक. अत्यंत सुसंस्कृत. आदबशीर एकमेकांचा मान राखून . मान देत आणि घेत. उगीच चिड चिड अन मुठी वळवून खुन्नस देऊन सेलेब्रेशन नाही की चित्कार नाहीत. क्रिकेटपेक्षा त्यांचाच गेम मला जंटलमेन्स गेम वाटला...
सीडिंग च्या दर्जाप्रमाणेच खेळ झाला म्हणायचा....

मेंटल टफनेसचे म्हणाल तर तर ते फेडीने सहा की सात वेळा कॅरी केलेलेच आहे. शारिरीक रिफ्लेक्सेसचा वयानुसार परिणामही असणे शक्य आहे....

कोणी नं १ रँक प्लेअर क्नॉक आऊट झाला म्हणे तिसर्‍याच राऊंडला? नाव काय नीटसे कळाले नाही अजून प्लेअर चे पण बर्‍याच जणांचा फेवेरेट होता म्हणे. Proud

खतरनाक >>> खहतहरहनाहकच - दोन सेट आणि तीन मॅच पॉईंट डाऊन होता.

क्वेरीची घोडदौड संपली, मर्‍या हरला असता तर फार धक्कादायक मजा आली असती. Proud

खतरनाक काही नाही. स्वतःच्या गेमवर फ्रस्ट्रेट होत होत ड्रॅग केली अक्षरशः. सर्विस मात्र चांगली होत होती. चिलिच एकदम मस्त खेळला पण महत्वाच्या पॉइंट्सवर त्यानं चुका केल्या आणि या साहेबांनी सर्विस चांगली टाकून मॅच वाचवली. रच्याकने, चिलिचच्या सर्विसवर एवानसेविक इफेक्ट दिसतो अगदी. Honestly, he derserved to win today.

अर्थात आम्हाला आनंद आहेच फक्त सेमिफायनलसाठी फ्यान्सकडे नखं शिल्लक नाहीत हे ध्यान्यात ठेवून खेळ करावा म्हणजे झालं.

Honestly, he derserved to win today. >> असं झालं का , आम्ही नुसता स्कोर बघत होतो त्यामुळे गेम क्वालिटीचं काही कळालं नाही.
इकडे तिकडे कशाला बघता? >> ईकडे तिकडे न बघता टेनिस कसे बघतात बुवा? लोकं तर माना दुखेस्तोवर ईकडे नि तिकडे बघतात. Proud

काही लोकांनी दुखापतींमुळे बाफ वर निवृत्ती घेतली की काय?.

काल फेडरर जिंकला पण पूर्वीचा फेडरर अजूनही नाही. वयाचा परिणाम. फक्त शारिरीक नाही , मानसिक सुद्धा.

माझ्यामते तो जेंव्हा डिफेन्सीव (सेफटी फर्स्ट) असा खेळत होता, जेंव्हा सिलिच च्या चुकांची वाट बघत बसायचा तेंव्हा तो पॉईंट्स घालवायचा. पण जेंव्हा तो बॅक टू द वॉल असताना अ‍ॅग्रेसिव्ह होउन खेळायचा ते पॉईंटस तो जिंकायचा. ३ पैकी २ मॅच पॉईंट्स तर त्याने सेकंड सर्विसला एस टाकून वाचवले.

सोंगा-मरे मॅच जास्ती आकर्षक व तेवढीच चुरशीची झाली. (सॉरी फेडरर).

इकडे तिकडे बघता ना? मग आता त्या कनेडियन कडे बघा. किंवा मग मरे काकांनां संधी आहे दुसर्‍यांदा चॅम्पियनशिप करता तिकडे बघा. निळे का होता? Wink

कनेडीयननी चांगला खेळ केला तेव्हा फायनलमध्ये त्यालाच सपोर्ट करणार. फेडररला चौथ्या सेटमध्ये चान्सेस होते घालवले.

एका जागी गप पडा सांगितलं होतं पण ऐकत नाहीत लोकं. कोण रे तो डोलकर नार्‍या? Proud

आता काय बोलणार ? स्टेफी हारली/गेली तेव्हा असंच विरक्त वगैरे वाटायला लागलं होतं, सब मोहमाया है! भगवी वस्त्रं घालून हिमालयात जावं मग निळे काय आणि पिवळे काय चेहरेच दिसणार नाहीत. Proud

भगवा बुरखा Uhoh ऑरेंज ईज न्यू ब्लॅक ईन्स्पायर्ड किंवा सेना-ओवेसी युती असं काहितरी झाल्यासारखं वाटेल. Wink

Pages