विंबल्डन - २०१५

Submitted by Adm on 27 June, 2015 - 08:14

स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.

महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.

महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
वेबसाईट रोलँगॅरोस पेक्षा बरी आहे पण मधे मधे हँग होतेच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अटीतटीचा सेट जिंकणारा लगोलग पुढचा किमान एक तरी सेट हारतोच असे टेनिसचे स्टॅट्स सांगतात.
पण क्वेरी वि. सिलिच लढतीत क्वेरी अटीतटीचा पहिला सेट जिंकल्यानंतर पुढचे तीनही सेट आणि सेमी फायनलची मॅच हरला.
सिलिच ने मात्रं ह्या स्टॅट्सचा जिंक्स टाळून पुढ्चा चौथा सेट आणि मॅच जिंकली.

फेडरर वि. बर्डीच नुकतीच चालू झाली आहे, ह्यावर्षी फेडी ने बर्डीचला ऑलरेडी दोनदा हरवलेले आहे. हेड-टु-हेड स्टॅट्सही फेडीच्या फेवरमध्ये आहेत.
रविवार कारणी लावण्यासाठी कारण मिळावे ही अपेक्षा.. जस्ट लाईक दोज गूड ओल्ड डेज. Happy

चिलीक चा गेम प्रचंड इररितेटिंग होता.. अरे काय लिमिट आहे का नाही बॉल बौन्स करायची सर्व आधी... पथेटिक

फेडेक्स आणि व्हीनस... टाईम ट्रॅव्हल झालाय की काय १०-१२ वर्षे मागे ☺️>>> तरण्यांचं झालं कोळसं अन् म्हातार्यांना आलं बाळसं Lol Lol

सिलिचच्या दुखापतीमुळे अपेक्षापेक्षा फारंच एकतर्फी आणि बोरिंग झाली रविवारची मॅच. एकंदरित फेडरर फॅक्टर वगळता फारंच डल वाटले हे विंबल्डन.
तेंडुलकर/द्रविड/गांगुली/लक्ष्मण/कुंबळे/सेहवाग एकामागोमाग निवृत्त झाल्यानंतर एका पिढीचा खेळातला ईंट्रेस्ट संपतो की काय असे वाटत असतांना धोनी, युवराज, हरभजन वगैरेंनी तसे होऊ दिले नाही आणि कोहली, रहाणे सारखे लोक त्या पिढीसाठी नव्याने ईंट्रेस्ट तयार केला.

थोडक्यात पुरुषांच्या टेनिसमध्ये पिढीबदल सुरु आहे असे वाटते फेडी/नदाल वन स्लॅम पर ईयर असा अजूनही नांगर टाकून असतांना जोकोविक्/मरेने फिटनेस राखल्यास अजूनही वर्षातून दोन स्लॅम्स खिशात घालण्यास सज्ज असतांनाच वावरिंका/सिलिच वगैरे फेडी आणि नदालची जागा घेण्यास जोरदार प्रयत्न करून माझ्यासारख्यांना आता अभावानेच पहायला मिळाणार्‍या फेडी/नदाल/ जोकोविक रायवलीनंतर ईंट्रेस्ट हरवून बसलेल्या चाहत्यांसाठी पुन्हा नव्याने कारण देतील असे वाटते.

वावरिंका/सिलिच वगैरे फेडी आणि नदालची जागा >>> सिरियसली? हे दोन प्लेयर्स चांगले खेळत असतील पण म्हणून डायरेक्ट फेडी आणि नादालची जागा?

Federer, Nadal, Murray and Djokovic have between them taken all the men's singles titles at Wimbledon since 2003. कुठे आहे पिढीबदल? चिलिच स्वत: ३०+ आहे. स्टॅन वावरिंका पण.

जागा घेणे म्हणजे त्यांचे रेकॉर्ड मोडणे (जे खरं तर आता नेक्स्ट टू ईंपॉसिबल वाटते) असे म्हणत नाहीये ... वयाचाही प्रश्नं नाहीये.
डॉमिनन्स आणि त्याच्या ट्रांझिशनबद्दल बोलत होतो मी. आपल्याला फेडी आणि नदाल आवडतात कारण त्यांनी गाजवलेली हुकूमत/डॉमिनन्स. त्यांची पीकवर असतांनाची हुकूमत मोडीत काढत वर आलेले जोकोविक आणि काही प्रमाणात मरे ही मला ह्या हुकुमतीच्या ट्रांझिशनचा भाग वाटतात. फेडी आणि नदालचा जोम ओसरतांना, फेडी सारखेच वर्षातले तीन चार स्लॅम्स जिंकत जोकोविक आणि मरे जोम पकडतील हुकूमत गाजवतील असे वाटत असतांनाच ते सेमी/क्वार्टर मधून गळायला लागले ... वावरिंका फ्रेंच ओपनमध्ये सातत्य दाखवत आहे सिलिचही सेमीज आणि फायनलपर्यंत धडका मारत आहे म्हणून जिंकणार्‍यांचा पिढीबदल होत आहे असे म्हणालो.
चार स्लॅम्सचे चार वेगळे विनर्स बघायची सवय लागण्यापर्यंत थोडा ईंट्रेस्ट टिकवण्यासाठी मला कुणाचा तरी डॉमिनन्स हवा आहे, मग अजून फेडीच चार वर्षे खेळो नाही तर वावरिंका चाळीशी पर्यंत.

Pages