विंबल्डन - २०१५

Submitted by Adm on 27 June, 2015 - 08:14

स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.

महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.

महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
वेबसाईट रोलँगॅरोस पेक्षा बरी आहे पण मधे मधे हँग होतेच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, पाऊस पडून गेला .. आता छान गारगार झालं असेल ..

मरेही झाला होय तुमचा घोडा ? वावरींका ला नाही घेणार का तुमच्यात?

>> घरातल्या लाडल्याला जिंकु द्या आधी डोळा मारा

अहो, नं ३ असला तरी तुमचा केलात न तोही घोडा .. मग जरा "+व्ह" चं काय ते बघा की! Proud

तुम्ही शुक्रवारसाठी घरून काम करायचं बघा बरं, तांत्रिक गोष्टी राहू द्या.

आम्ही लाडला जिंकणार नाहीच असं काही बोललो तर +व्ह व्हायचे सल्ले द्या.

>> आम्ही लाडला जिंकणार नाहीच असं काही बोललो

प्रॅक्टिस व्हॉट यु प्रीच हो .. तांत्रिक गोष्टी राहू द्या बाजूला .. Wink

पराग, शिळोप्याच्या गप्पा बर्‍या की हे असे लाडीक विखार बरे? Proud

फार स्ट्रेस होतो बॉ या मॅचेसचा. सगळी नखं कुरतडून झाली. एक चॉकोलेट खाल्ल. टॅमरिन्ड क्यान्ड्या खाल्ल्या. एक कॅन सोडा प्यायला. आता काय केलं म्हणजे आमचा घोडा जिंकेल?

काय मॅच झाली गास्के वावरिंका.मजा आली. २००९ च्या फेडरर रॉडिक फायनलची आठवण झाली.
पण गास्के ज्योकोला कितपत टफ देऊ शकेल शंका आहे.

रॉजर मरे सेमीफायलमध्ये मजा येणार. Happy

सिंडी,जाऊ दे. एका घोड्याने तरी आगेकूच केली ना.:) वो लंबी रेसका है.. Happy

माझा अंदाज खरा ठरला पराग. तीन मॅचेस वन साइडेड. आणि गास्के वावरिंका मज्जावाली मॅच.. Happy

हे काय बरोबर नाय बुवा. फेडी पण आपला आणि मरे पण.. ये बात कुछ हजम नही हुई. वाटल्यास मरे अगदी फायनला पोहोचलाच तर त्याला आपलसं कर. Proud

श्या.. वॉवरिंका हारला.. त्याची आणि फेडेक्सची फयनल पाहिजे होती.. आता फेडेक्स आणि जोकर फायनल होईल...

गास्के पुढची मॅच ढेपाळून खेळायचीच शक्यता फार जास्त आहे...

रोज रडे ताला कोण मरे. त्यामुळे त्याला नका करु सपोर्ट.

फार स्ट्रेस होतो बॉ या मॅचेसचा. सगळी नखं कुरतडून झाली. एक चॉकोलेट खाल्ल. टॅमरिन्ड क्यान्ड्या खाल्ल्या>> १०१

सानिया हिंगीस महिला दुहेरीत उपांत्य फेरीत. सानिया सोरेस मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत. पेस हिंगीस उपउपांत्य फेरीत. बोपण्णा साथीदारासह पुरूष दुहेरीत प्रथम मानांकीत ब्रायन ब्रदर्सवर मात करून उपांत्य फेरीत. Happy

ब्रायन ब्रदर्स वर केली का मात ?? जबरीच !!! मी नंतर स्कोर फॉलो करायला विसरलो..
सानिया हिंगीसचं पाहिल.. जबरीच !

बायांची पहिली सेमी जोरात चालू आहे. स्पॅनिश बाई जाणार का फायनलला ?

रायन ब्रदर्सला हरवलं का? अरे वा! दोन्ही टीम्स १-१ होत्या तोपर्यंत मी फॉलो केलं नंतर विसरूनच गेले.

राडवान्स्का हरली की. आता पोवा-विल्यम्स.

सेरेनानं किरकोळीत काढली मॅच. शारापोव्हाला झेपत नाही सेरेना.

बोपण्णा हरला उपांत्य फेरीत नवव्या मानांकीत रुमानियाच्या जोडीकडून पाच सेटमध्ये.. Sad पाचवा सेट पार १३-११ पर्यंत गेला..

Pages