विंबल्डन - २०१५

Submitted by Adm on 27 June, 2015 - 08:14

स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.

महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.

महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
वेबसाईट रोलँगॅरोस पेक्षा बरी आहे पण मधे मधे हँग होतेच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्मधर्मसंयोगाने तिसरा सेट ज्योकोने घेतलाच >>>>> पॉझिटिव्ह बोल !!! इतकं हातपाय काय गाळायचे ते.. ज्योको आहे तो.. परतोनी येईल.

पहिल्या दोन सेट्स मधला त्याचा चाचपडत चाललेला खेळ बघून अजिबात वाटत नव्हतं तो तिसरा सेट ६-१ घेईल असं ..

अजूनही त्याची कमांड वाटत नाही गेम वर .. मेनली रिटर्न्स वर जी असते ती अँडरसन च्या मोठ्या सर्व्ह पुढे फिकी पडतेय आणि अँडरसन चा गेम जास्त वाइजर वाटतो आहे मला ..

अनाठायी "+व्ह" (:फिदी:) राहिलं तर म्हणतात तुमच्या पार्टीतले लोक म्हणतात "आधी खेळ बघा , त्यावरून योग्यता ठरवा आणि मग उड्या मारा .." आता खेळ बघून न्युट्रल टेनीस च्या बाजूने बोललं तर म्हणता "'+व्ह' व्हायचं शिका"! .. पहले नक्की करो तुम्हारी समस्या क्या है? Wink

फिल्हाल जो समस्या है वो हमारे घोडे ने रिलीव्ह कर दी है ..

हमारे एक दोस्त कहत है

ज्योको राख्खे साइयां
मार सके ना कोई

मी पहिले तीन सेट पाहिले. अँडरसन इतके दिवस कुठे होता?. जबरी खेळत होता. सर्व अँड व्हॉली बरोबर ग्राउंड स्ट्रोक्स पण मस्त. पाचव्या सेटला काहीही होउ शकते. पण अँडरसन खूपच टाळता येण्यासारख्या चुका करतो. लंबी रेसका घोडा नाही.
फेडरर मस्त खेळत होता. मरेही छान खेळला. कर्लोविच अँडरसन सारखाच.

शारापोवाची मॅच भारी सुरू आहे का? खूप खूप वेळानं स्कोअर अपडेट होतोय, रॅलिज का?

सशल, तुमच्या पार्टीचं अभिनंदन!!!

क्रिस एव्हर्ट अगदी नुकतीच बोटॉक्स् चे शॉट्स घेऊन आली आहे काय विम्बल्डन ला? Uhoh

जिंकली तुमची किंचाळ्याक्वीन शॅरापोव्हा .. ती दुसरी किंचाळ्याक्वीन अ‍ॅझारेंका चं काय झालं?

अझारेंकानी फ्रेंच ओपनमध्ये सेरेनाला टेन्शन आणलेलं. तीन सेटची आणि चांगली झाली होती मॅच.
आजही तशीच व्हावी !

सेरेना.. परत एकदा हरेच ना... काल दमछाक झाली पण तिची...

आज पुरुष गटातले सामने..

जोको - सिलिच
वॉवरिंका - गास्के
पोस्पिसिल - मरे
फेडरर - सिमॉन..

मज्जाच मज्जा..

हो ना सेरेनाने खेचली मॅच. तिकडे शारापोव्हाची मॅच पहिला सेट तर रटाळ चालु होता. आता सेरेना शारापोव्हामधे सेरेनाचा जोर राहील.

सेरेनाच मारेल विंबल्डन असं एकूण पहाता दिसतय. कसली चिवट आहे ती. हरत आली की पेटून खेळते आणि मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने खेचते. तिच्याइतका ताकदवान खेळ बाकी कोणा बायकांना जमत नाही. कालसुध्दा अझारेंका चांगली खेळली पण सेरेनाच्या खेळापुढे फिनिशींगमध्ये कमी पडली. शारापोव्हाला तुफानी खेळ करावा लागेल सेरेनाला हरवायचं असेल तर. शारिरीक आणि मानसिक दोन्हीदृष्ट्या.

पुरुषांच्या गटात गास्के आणि वावरिंका पहायला मजा येईल. दोघेही जण वन हँडेड बॅक हँडवाले आणि दोघांचेही बॅक हॅड स्ट्रॉग आहेत.

बाकी तीनही मॅचेसमध्ये टॉप थ्री फार कष्ट न पडता जिंकतील असं वाटतय.

Pages