विंबल्डन - २०१५

Submitted by Adm on 27 June, 2015 - 08:14

स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.

महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.

महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
वेबसाईट रोलँगॅरोस पेक्षा बरी आहे पण मधे मधे हँग होतेच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिंकला की स्ट्रेट सेट्स मध्ये ..

लेंडल आणि त्याचं ब्रेक-अप कधी झालं म्हणे? फ्रेन्च ओपन ला पण ही नविन कोच बाईच होती .. नविन बायकोने करवलं काय ब्रेक-अप? Wink

सशल?

अमेली मॉरिस्मो त्याची कोच झाली मग आता प्रेगनन्सीमुळे ब्रेक घेउन पुन्हा तीच कोच होणार आहे या बातम्या जुन्या झाल्या की.

हो का? मग मला माहित नाही ..

मरेची आई आणि त्याची गर्लफ्रेण्ड टर्न्ड बायको एव्हढ्याच दोन बायका त्याच्या आयुष्यातल्या माहिती होत्या मला .. फ्रेन्च ओपन बघताना अचानकच लेंडल आठवला आणि त्याची अनुपस्थिती जाणवली ..

ब्राऊनने पहिला सेट जिंकला नडाल विरुद्ध. काहीतरी अजब धाटणी आहे ब्राऊनच्या खेळाची; मी तरी असले मिश्रण पाहिले नव्हते. आता झोपतोय, उद्या उठल्यावर नडालच्या विजयाची बातमी मिळो, कारण पहिल्या सेटमध्ये तरी ब्राऊनने गुंगवून टाकले, नडालला अजून चांगले खेळावे लागेल.

आमच्या इथे विसेक टर्मिनल्स आहेत लावलेले. पण फायनान्स रिलेटेड चार चॅनेल्स लावून ठेवतात. युरो कप आणि वर्ल्ड कपच्या मॅचेस लावतात म्हणे.

Sad Sad

Lol

ते आम्ही सांत्वनपर डायरेक स्पेनमध्ये पाठवतो .. पण त्या पेडिक्युअर च्या गिफ्ट क्युपॉन्स् चं काय झालं म्हणे?

नेहमीचा नदाल फक्त दुसर्‍या सेट मध्ये बघायला मिळाला... पहिले दोन सेट बघितले त्यातच नदाल हारायची चिन्हं दिसतं होती.. तो ब्राऊन किती ते ड्रॉप शॉट्स मारतो... सर्व्हिस जोरदार आहे त्याची.. नदालला सुरुवातीला अंदाजच येत नव्हता स्पीडचा... दुसरा सेट घेतल्यावर नदाल जिंकू शकेल असे वाटत होते.. पण हारलाच बिचारा..

तो गॉफिन बराच अवघड चालला आहे की !
तिकडे मरे एक सेट हरलाय.

अपेक्षेप्रमाणे व्हिनसला सेरेनाने हरवलं पण मॅच अगदी किरकोळ झाली नाही असं वाटलं.

Roger Federer is bouncing around Centre Court like a cat chasing a mouse. कोट फ्रॉम लाइव्ह ब्लॉग Happy

Pages