विंबल्डन - २०१५

Submitted by Adm on 27 June, 2015 - 08:14

स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.

महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.

महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
वेबसाईट रोलँगॅरोस पेक्षा बरी आहे पण मधे मधे हँग होतेच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमेंट्रेटर्सना नक्की काय प्रॉब्लेम आहे??! म्हणे "She should go to US open, win it and then we will discuss whether she is great or not?" Really ??? अजून काय प्रुव्ह करायचं राहिलं आहे?

>>

हा टिपिकल ब्रिटीश खवटपणा आहे. त्याला तोड फक्त पुण्याच्या एका विशिष्ट भागातच सापडू शकते. ह्येंच्या कामेन्टरीला देखील पुण्यात ' माईक बरे होते ह्या वेळेस' एवढाच प्रतिसाद येईल तेव्हा यांच्या नाकाचे शेंडे लाल होतील. पुंगाट लेकाचे ... Proud

सानिया-मार्टिना आणि माकारोव्हा-वेस्निना फायनल मॅच रंगात आली आहे. एक एक सेट बरोबरी आणि ५-५ तिसर्‍या सेटमध्ये.:)

जिंकल्या हो मिर्झाबाई आणि हिंगीसबाई! मिर्झाची सेवा तुलनेने अशक्त असूनही बाजी मारली दोघींनी! दुसऱ्या सेटात २-५ अशा पिछाडीवरून ६-६ अशी बरोबरी साधत कोंडीफोडीत ७-५ मारलेली बाजी चिवटपणाची साक्ष देते. तिसऱ्या सेटात ४-५ पिछाडीवर असतांना पराभवापासून केवळ २ गुण मागे असूनही मिर्झाबाईंची सेवा खंडित होण्यापासून वाचवली. पुढे जिद्दीने खेळ करत ७-५ असा विजय प्राप्त केला.

अभिनंदन!

-गा.पै.

जहबहरीही मॅच झाली.
शेवटचा सेट २-५ वरून खेचून आणला अक्षरशः !! मला वाटलं ते छप्पर बंद करण्यादरम्यान ह्यांची लय बिघडते की काय ! पण उलट नंतर तर हिंगिस पेटलीच होती.
हिंगीसने उगीच धरसोड न करता स्वतःच करियर जरा नीट प्लॅन करायला हवं होतं. अजूनही ती किती भारी खेळते. तिच्या खेळावरून ही एकेकाळी नंबर वन होती हे कळून येत होती अगदी. शिवाय सिनीयर असल्याने जबाबदारी वगैरे घेत होती नीट.
आपल्या बाई स्वत:च्या मर्यादा ओळखून मस्त खेळल्या. शॉट सिलेक्शन, प्लेसमेंट एकदम भारी केलं. उगीच अवास्तव फटके मारायचा प्रयत्न केले नाहीत. पेशन्स ठेऊन योग्यवेळी मोका साधला.
मॅकारोव्हा आणि व्हेस्निना ह्याआधी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये इर्रानी-विंची कडून अशाच ५-१ ने पुढे असताना हरल्या. हार्ड लक फॉर देम !

आता उद्या पेस-हिंगीस पण जिंकले पाहिजेत.

सेवा >>> Uhoh

रच्याकने, उद्या कधी नव्हे ते त्या ह्यांना पाठींबा द्यावा का असं मला वाटायला लागलं आहे.. Uhoh but not able to decide yet !

पराग,

>> हिंगीसने उगीच धरसोड न करता स्वतःच करियर जरा नीट प्लॅन करायला हवं होतं.

सहमत. पण तिच्या अंगी कुर्निकोव्हा संचारली आणि आपण एका गुणवान खेळाडूला काही वर्षांसाठी मुकलो.

आ.न.,
-गा.पै.

हिंगीस दुखापतींमुळे त्रस्त झाल्याने निवृत्त झाली. दोन्ही घोट्यांवर दोन सलग मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आणि इतरही अनेक छोट्या दुखण्यांनी त्रस्त केले तिला.

चला. आज संध्याकाळी ट्रिट आहे . लोकहो,एंजॉय अजुन एक एपिक मॅच.. Happy

पग्या, आज सँप्रासचा रेकॉर्ड मोडला गेला तर रडूबिडू नको रे.. Happy

महिला दुहेरी सारखीच मार्टिना पेसच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पण जिंकेल असा मला ठाम विश्वास वाटतोय.

जोकोचं काही खरं नाही. फेडी जिंकणार.

सानिया अफाट खेळते आणि फटके जबरी आणि वेगवान मारते. Happy दोघी एकमेकींना मस्त साथ देत होत्या. मार्टिना एकदम थंड डोक्याची आहे. हरत होती तरिही फटके चुकल्यावर हसत होती. अभिनंदन!

फेडररने सर्व्हीस ब्रेक केली म्हणून नाचत होतो तोवर जोकोने ब्रेक परत मिळवलासुद्धा.
दोघेही तोडीस तोड वाटतायत. जोको किंचित जास्त सरस.

Sad . पहिला सेट मध्ये मिळालेल्या अर्ली ब्रेकचा फायदा घेतला नाही. आणि मॅचचा पूर्ण मोमेंटमच घालवला.
मानलं ज्योकोला. अभिंनदन ज्योको.

तुमचा विश्वास बसो वा न बसो ..

पण मला फेडरर करता वाईट वाटलं .. दुर्दैवाने ही मॅच ज्योको आणि फेडरर मध्ये होती .. नाहीतर मला मनापासून वाटत होतं त्याचा जो काय गोल होता (होता का खरंच?) तो पूर्ण व्हायला हवा होता ..

(आधी स्वार्थ पण थोडा परमार्थही Happy .. शेवटच्या गेममध्ये फेडरर ने गिव्ह अप केल्यासारखं वाटलं .. तसं करायला नको होतं ..

Pages