ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.
ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..
खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.
रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.
योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.
पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!
विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.
पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.
एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्यानंतर दाट झाल्या असतील.
बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.
आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.
मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?
आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.
कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."
उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले.
याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.
थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.
याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?
जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.
माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.
मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.
एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.
.........
यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !
पण कोणी त्यात असलेल्या सतराशे
पण कोणी त्यात असलेल्या सतराशे साठ त्रुटींकडे बोट दाखवले तरी मी त्या पटल्यास दादातर्फे प्रामाणिकपणे स्विकारतो.>>>> दादातर्फे स्विकार?? दादाला जर समजलं तर!!!!!!!!
दादातर्फे स्विकार?? दादाला जर
दादातर्फे स्विकार?? दादाला जर समजलं तर!!!!!!!!
>>
रुन्मेश आहे तो ... बीशीशीआयचा खास माणूस
दादा काय करेन ... बराबर स्वीकारालेच लावेन त्यो!
दादा हहगलो करेल
दादा हहगलो करेल
नंदिनी, एवढ्या मोठ्या सिरीअस
नंदिनी,
एवढ्या मोठ्या सिरीअस पोस्टमध्ये छोटीशी गंमत केली पण ती आपण नेमकी पकडलीत हा
इतर मुद्यांवर थोड्यावेळाने येतो ..
सचिन शतकाजवळ आल्यावर स्लो
सचिन शतकाजवळ आल्यावर स्लो होऊन चाचपडला आहे अशी ५ उदाहरणे मी पाच मिनीटात देऊ शकतो, तसेच तो आधीच्याच वेगाने खेळत राहून सिक्स मारून शतक पूर्ण करून गेला आहे अशीही ५ तितक्याच पटकन देउ शकतो. २०-२२ वर्षात त्याच्या खेळाचा पॅटर्न अनेकदा बदलला आहे.
>>>>>
एक्झॅक्टली. प्रत्येकाचा ९० ते १०० ला जायचा एक पॅटर्न असतो. तिथे खेळ अचानक चेंज होतोच, कारण कितीही सांघिक खेळ म्हटले तरी वैयक्तिक शतक ते शतक. त्याचे विचार डोक्यात रेंगाळणारच. हा मानवी स्वभाव आहे. सचिनला क्रिकेटचा देव म्हटले तरी आहे माणूसच.
राहिला प्रश्न देशहिताला प्राधान्य न देण्याचा, तर समजा तूच उल्लेखलेल्या एका पॅटर्न नुसार सचिन शतकाजवळ आल्यावर स्लो होऊन चाचपडला आणि अपेक्षित धावगती वाढली, तर नक्कीच यात संघहित नाहीये. या पॅटर्नचा हा साईड इफेक्ट आहेच. त्याच्या मनात नसूनही हे होणारच.
असामी, प्लीज नोट. हा आरोप नाहीये, पण असे होतेच. किंबहुना समोरचा फिल्डींग कर्णधार या सिच्युएशनचा फायदा उचलायला बघतो. सचिनच्याच बाबतीत नाही तर कोणाच्याही बाबतीत.
...
एक हल्लीचेच उदाहरण सांगतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात आपण ऐतिहासिक विजयाजवळ कूच करत होतो. कोहली आणि मुरली विजय विक्रमी चेस करणार होते. खूपच सहज खेळत होते. पण शतकाजवळ आल्यावर अचानक त्या दडपणाने मुरली विजय चाचपडायला लागला आणि त्यातच बहुधा पाय लॉक झाल्याने एलबीडब्ल्यू की बोल्ड वगैरे झाला. त्यानंतर लाईनच लागली आणि त्याच्या त्या शतकाचे टेंशन घेण्याने पुढे तो सामना गेला तो गेलाच.
त्यानंतर लाईनच लागली आणि
त्यानंतर लाईनच लागली आणि त्याच्या त्या शतकाचे टेंशन घेण्याने पुढे तो सामना गेला तो गेलाच.
>>
असे कसे म्हणू शकता? त्या सामन्यात भारत हरला तर त्या मुरलीच्या चुकीमुळे काय? बाकीचे धुरंधर काय करत होते?
धोनीच्या बीबीवर सचिनला झोडपणे
धोनीच्या बीबीवर सचिनला झोडपणे म्हनजे अकेंच्या बीबीवर नमोंना झोडपणे!
मुरलीच्या चुकीमुळे काय?
मुरलीच्या चुकीमुळे काय? बाकीचे धुरंधर काय करत होते?
>>
मला वाटते हा प्रश्न अनावश्यक आहे. उलट ईतर खेळले असते तर त्याची चुकी लपली असती आणि कौतुकच पदरी पडले असते. अर्थात आताही त्याला त्याच्या ९०+ धावांबद्दल कौतुकच मिळतेय, आणि ते मी देखील करतोच. पण इथे मुद्दा हे दाखवून द्यायचा आहे की नव्वदीत दडपणाखाली संथ होणे वा बाद होणे यात संघाचे नुकसान होते.
मुरलीच्या चुकीमुळे काय?
मुरलीच्या चुकीमुळे काय? बाकीचे धुरंधर काय करत होते?
>>
मला वाटते हा प्रश्न अनावश्यक आहे
>>
का बुवा? संघ तो खेळत होता तो पर्यंत सुस्थितीत होता न? मग तो आउट झाला किंवा संथ खेळून आउट झाला म्हणजे शेवटच्या १५ षटकामधली ५ निर्धाव जाउन १० ची सरासरी १५ वर जाउन त्या दडपणाखाली बाकीचे आउट झाले असे असेल तर ती मुरलीची चूक. पण तसे नसेल तर त्याला का म्हणावे की त्याच्या चुकीमुळे भारत हरला?
राहिला प्रश्न देशहिताला
राहिला प्रश्न देशहिताला प्राधान्य न देण्याचा, तर समजा तूच उल्लेखलेल्या एका पॅटर्न नुसार सचिन शतकाजवळ आल्यावर स्लो होऊन चाचपडला आणि अपेक्षित धावगती वाढली, तर नक्कीच यात संघहित नाहीये. या पॅटर्नचा हा साईड इफेक्ट आहेच. त्याच्या मनात नसूनही हे होणारच. >>> यात मानवी स्वभाव म्हंटलास ते बरोबर आहे. पण तोच तर खेळाचा पॅटर्न आहे. एका इनिंग मधला एक भाग वेगळा काढून बघा कसा स्लो खेळतोय असे म्हणणे आणि त्यातून "देशहित" वगैरे शोधणे चुकीचे आहे. वन डे मधे आपण सुमारे १०० बॉल्स खेळणार आहोत अशा तयारीने इनिंग प्लॅन करावी लागते. मग ९०-१०० जाताना अपेक्षित धावगती वाढली, तरी ती पुढे कॅच अप करता येते.
आणि मुळात सचिनची शतके बघितली तर १०० पैकी नक्की किती शतके अशी झाली आहेत त्यावरही हे आहे ना?
दादाचा पॅटर्न लक्षात आहे का? पहिले ४०-५० करायला तो ७०-७५ बॉल्स घ्यायचा. मग सुटला की १०० बॉल्स मधे १०० आपोआप व्हायचे. पण जर ५० च्या आत आउट झाला तर बरेच बॉल्स खाल्लेले असायचे. पण त्याला लाईन, लेंथ, पिच समजायला तेवढा वेळ लागत असेल. त्यात स्वार्थीपणा नसतो.
दादाचा पॅटर्न लक्षात आहे का?
दादाचा पॅटर्न लक्षात आहे का? पहिले ४०-५० करायला तो ७०-७५ बॉल्स घ्यायचा. >>
खुद्द धोणीचा पॅटर्न पण तसाच आहे. तो आधी खूप स्लो खेळतो. आणि मग स्ट्राईक रेट वाढवतो.
ऋन्मेशच्या मते मग तो देशहीतासाठी खेळतच नाही. कारण असे स्लो खेळताना तो खूपदा आउट झाला आहे आणि मग मॅचही गेल्या आहेत. अगदी परवाची हारलेली मॅच तर कहर होती. हो की नाही ऋन्मेश?
देशहीत हाच नियम असेल तर मग अॅव्हरेज प्लेअरने ४० लाच स्वघोषीत रिटायरमेंट घ्यावी म्हणजे इव्हन फिफ्टीलापण बॉल वाया घालवून देशहीत आड येणार नाही.
पुढे जाऊन तर एकही डॉट बॉल झाला की लगेच देश विरोधी कारवाया करतोय म्हणूण मोकळे व्हायचे. कारण डॉट बॉल म्हणजेच "स्लो होऊन चाचपडणे "
आणि धोणीने किती टेस्ट मॅच घातल्या ह्याची नोंद तर घ्यायलाच नको नाही का?
येथील चर्चेला काहीही अर्थ नाही. .:|
कारण डॉट बॉल म्हणजेच "स्लो
कारण डॉट बॉल म्हणजेच "स्लो होऊन चाचपडणे "
>>
चूक
सेट होण्यासाठी किंवा समोरून धडाधड विकेट गेल्या तरी फलंदाजाला स्लो व्हावे लागते. यात संघहितच असते. उलट जेव्हा विकेट सांभाळायची गरज असते आणि कोणी शहाणपणा करत मारण्यात आऊट होतो ते संघहिताच्या विरुद्ध जाते.
असो, शतकाजवळ आल्यावर चाचपडणे म्हणजे काय हे सहज दिसून येते.
@ फारेण्डदा,
सेट होण्यासाठी खाल्लेले चेंडू याबाबत म्हणणेच नाही.
गंमत कशी असते बरेचदा, जेव्हा तुम्ही शतकाजवळ आलेला असतात तेव्हा स्लॉग ओवर सुरू झाल्या असतात, वा चेस करतानाही सामना बॉल टू बॉल चुरशीचा व्हायला सुरुवात झाली असते. त्यामुळे याचा फटका आणखी बसतो.
आणखी एक गंमत हाच चाचपडणारा किंवा सावधगिरी बाळगत खेळणारा खेळाडू (कोणीही हा) १०० झाल्यावर मात्र अचानक सुटतो
आता हिशोब बघा, जर तुम्ही ९०-१०० करायला २० बॉल घेतले आणि मग पुढच्या १० चेंडूतच २० धावा ठोकल्या तर तुमचे अल्टीमेटली ३० चेंडूत ३० धावा होतात.
याच ३० चेंडूतल्या ३० धावा तुम्ही इतरवेळी थोडीशीच रिस्क उचलत वा प्रत्येक बॉलला मेरीटनुसार खेळत करू शकता,
पण शतकाजवळ मात्र तेच ३० रन आधी अतिसावधगिरी बाळगायची रिस्क घेत आणि मग फुकट गेलेले चेंडू कवर करायला म्हणून उचलून मारायची रिस्क घेत करता.
याऊनही एक गंमत स्वता इमॅजिन करून बघा, जर १०० चा रेकॉर्डच ठेवला गेला नसता. त्यातील जिन्क्स नंबर फॅक्टरच बाद झाला असता .. तर .. तर हे चाचपडणे आपल्याला कधीच बघायला मिळाले नसते
@ वैद्यसाहेब,
आपल्याला मी ते का अनावश्यक आहे म्हटले ते नंतर सविस्तर सांगतो.
शतकाजवळ आल्यावर चाचपडणे
शतकाजवळ आल्यावर चाचपडणे म्हणजे काय हे सहज दिसून येते. >> परत तेच ते लावून धरता तुम्ही. तेच ते नी तेच ते. गोल गोल फिरवून तेच ते बोलनं.
नुसते शतक धरणार की एकुण धावा आणि त्याला लागणारे चेंडू. स्ट्राईक रेट ही कन्सेप्ट माहिती आहे का? म्हणूनच डॉट बॉल लिहिले. सचिनचा एकुण काय आहे? ४६३ मॅचेस मध्ये ८६.२३ किती जण ४६३ मॅच खेळूनही ८६.२३ रेट ठेवू शकतात.
धोणी ठेवू शकेल का? उत्तर हो असेल तर तो सचिनपेक्षाही ग्रेट आहे. खरे तर अजून पाच वर्षेही तो खेळू शकणार नाही. येतंय का ध्यान्यात? लाँजेव्हिटी असा शब्द आहे तो !
२००७-८ नंतर टि २० कन्सेप्ट मुळे १५०, १७० चे स्ट्राईक रेट पाहायला मिळतात. त्या आधी कुठे होते हे सर्व? आणि सचिन कधी पासून खेळतोय?
धोणी आणि सचिनला कम्पेअर नका करू. दोघेही आपपल्य जागी ग्रेट आहेत.
असो, शतकाजवळ आल्यावर चाचपडणे
असो, शतकाजवळ आल्यावर चाचपडणे म्हणजे काय हे सहज दिसून येते. >> बरं ठिक आहे तेंडूलकर तू टेस्ट कडे दुर्लक्ष करून फक्त ODI बघतो आहेस हे लक्षात ठेवून तेव्हढ्यापुरते बघूया. तेंडुलकर हा first class cricket मधे सलामीचा फलंदाज नव्ह्ता हे तुला माहित असेल. संघाची गरज म्हणून तो ओपन करायला लागला. संघहिताला प्राधान्य न देणारा तेंडूलकर पहिला ओव्हर पासून संघाचा स्कोर अधिक व्हावा म्हणून रिस्क घेत होता तो प्रकार त्याच्या धावांची भूक असा धरूया. गेलाबाजार समोर दादाला strike rotate करायला कठीण पडत असे तेंव्हा average maintain करायला undue risk घेत होता तो प्रकार कसा संघ हितासाठी घातक होता हे पण वाचायला आवडेल. मूळात हा सांघिक खेळ आहे नि inning build करणे, overall total score वर लक्ष केंद्रित करणे हे मह्त्वाचे आहे. पूर्ण इनिंगमधला एक भाग सोयीस्करपणे घेऊन त्यावरून एखाद्याच्या commitment बद्दल एव्हढ्या सहजपणे शंका कशी घेता ? "प्लीज नोट. हा आरोप नाहीये, पण असे होतेच. किंबहुना समोरचा फिल्डींग कर्णधार या सिच्युएशनचा फायदा उचलायला बघतो. सचिनच्याच बाबतीत नाही तर कोणाच्याही बाबतीत.' हे लिहिल्यानंतर त्याच प्रकाराबाबत शंका कशी काय घेतोस रे तू ?
@ फारेण्डदा, सेट होण्यासाठी
@ फारेण्डदा,
सेट होण्यासाठी खाल्लेले चेंडू याबाबत म्हणणेच नाही.
गंमत कशी असते बरेचदा, जेव्हा तुम्ही शतकाजवळ आलेला असतात तेव्हा स्लॉग ओवर सुरू झाल्या असतात, वा चेस करतानाही सामना बॉल टू बॉल चुरशीचा व्हायला सुरुवात झाली असते. त्यामुळे याचा फटका आणखी बसतो.>>>
पहिले- "दा" मत कहो मुझे!
अरे पण सचिनने प्रत्यक्षात हे केलेले आहे अशी उदाहरणे आहेत का तुझ्याकडे? वन डे मधे? सचिन खेळायला आला तेव्हा संघाची गरज काय होती व त्याप्रमाणे तो खेळला का नाही हे महत्त्वाचे. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा नाही खेळला ते खेळाडू म्हणून अपयश होते. स्वार्थीपणा नव्हे.
आता एक "हातात गन" देतो. सचिन स्लो खेळल्याने भारताचे नुकसान झाले आहे अशी उदाहरणे कसोटीत एक दोन आहेत. त्यात तो शतकाजवळ आलेला नव्हता. पण मी ती सांगणार नाही.
आरोप करणार्यांनी शोधावीत.
इथे सचिन आणि धोनी हे परस्पर
इथे सचिन आणि धोनी हे परस्पर विरोधी (म्हणजे एक चांगला तर दुसरा वाईट) असा सूर का दिसतोय काही जणांचा. क्रिकेटच्या टीम मधे ११ जण खेळतात. कर्णधार आणि Finisher + keeper म्हणून धोनी थोर आहे.
मला विशेष करून keeper म्हणून त्याच्याबद्द्ल अजून जास्त आदर आहे. ज्या माणसाला क्षेत्ररक्षण करताना प्रत्येक चेंडूला बसावे / उठावे लागते, आणि त्यानंतर फलंदाजीही जो करतो आणि सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे त्याला 'सलाम' ठोकेन मी..
ज्या माणसाला क्षेत्ररक्षण
ज्या माणसाला क्षेत्ररक्षण करताना प्रत्येक चेंडूला बसावे / उठावे लागते, आणि त्यानंतर फलंदाजीही जो करतो आणि सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे त्याला 'सलाम' ठोकेन मी.. >>>
खरे आहे गोगा.
येथे सचिन आणण्याची गरजच नव्हती.
आता एक "हातात गन" देतो. सचिन
आता एक "हातात गन" देतो. सचिन स्लो खेळल्याने भारताचे नुकसान झाले आहे अशी उदाहरणे कसोटीत एक दोन आहेत. त्यात तो शतकाजवळ आलेला नव्हता >> द्विशतकाजवळ आला होता हे एक उदाहरण
जाहिरात कंपन्यांचे लागेबांधे,
जाहिरात कंपन्यांचे लागेबांधे, हितसंबध हे एखाद्या प्लेयर्सची कारकिर्द खेचु शकतात का? त्या कंपन्यांचा संघनिवडीवर,निव्रुत्ति घेण्यावर प्रभाव पडत असावा का?
जाहिरात कंपन्यांचे लागेबांधे,
जाहिरात कंपन्यांचे लागेबांधे, हितसंबध हे एखाद्या प्लेयर्सची कारकिर्द खेचु शकतात का? त्या कंपन्यांचा संघनिवडीवर,निव्रुत्ति घेण्यावर प्रभाव पडत असावा का?<<< हा प्र्श्नच चर्खमू आहे. मु़ळात त्यासाठी जाहिरात कंपन्या आणि तो खेळ यांचे नाते काय आहे ते आधी जाणून घ्या.
सचिन जाहिरातींमध्ये प्रचंड पैसा कमावत होता, कारण तो मैदानावर तितका गाजत होता. जो मैदानावर गाजत नाही त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यु नंतर शून्य होते. अधिक माहितीसाठी विनोद कांबळी यांना भेटा.
एखाद्या प्लेयरशी २वर्षाचा
एखाद्या प्लेयरशी २वर्षाचा करार जाहिरात कंपन्यांनी केला नि तो प्लेयर सुमार खेळु लागला संघासाठी तो निरुपयोगी असतो हकालपट्टी होणे योग्य असते मात्र त्याला संघातुन काढणे निवडसमितीला जमणार नसते कारण कंपन्यांचा दबाव नि येणारा पैसा असे होउ शकते का?
एखाद्या प्लेयरशी २वर्षाचा
एखाद्या प्लेयरशी २वर्षाचा करार जाहिरात कंपन्यांनी केला<< कधी हा करार पूर्णपणे वाचलाय का? त्यातले सर्व क्लॉजेस माहित आहेत का?
जाहिरात कपन्यांवर क्रिकेट
जाहिरात कपन्यांवर क्रिकेट चालते एखादा करार केलेला प्लेयर सुमार खेळु लागला तर त्याचि टिममधुन हकालपट्टी होणे हे कंपन्यांच्या हिताचे ठरणार नाहि ह्या प्रसंगी कंपन्या ह्या त्या प्लेयरची कारकिर्द खेचुन नेउ शकतात.
वरती विनोद कांबळीचा उल्लेख आलाय तो पुर्णपणे संपलाय त्याचे आदर्शपणाचा दिखावा करणारे,जमिनीवर पाय असणारे मित्रच त्याला हार्ट अटेक आला तरी भेटायला जात नाहित तर मी त्याला संबंध नसताना भेटण्यात काय मतलब.
पगारे, उगाच 'आत्याबाईला मिशा
पगारे, उगाच 'आत्याबाईला मिशा असत्या तर' वगैरे टाईप्स विधाने करण्यापेक्षा काय ते स्पष्ट्पणे नावे घेऊन बोला नि मुद्दे मांडा, नुसत्या पिंका टाकू नका .
राजू परुळेकर सचिन दाबून
राजू परुळेकर
सचिन दाबून कोलाच्या जाहिराती करत असताना गोपीचंद हा कोलकात्यातला बॅडमिंटनपटू याच कोला कंपन्यांच्या तोंडावर दार लावत होता आणि स्टीव्ह वॉ कोलकात्यातल्या गरीब मुलांसाठी झटत होता.
http://www.lokprabha.com/20091218/alke.htm
सकुरा, सचीनने समाजासाठी काय
सकुरा, सचीनने समाजासाठी काय योगदान दिलेय याची पण जरा माहिती काढलीत तर बरे होईल.
जाहिरात कपन्यांवर क्रिकेट
जाहिरात कपन्यांवर क्रिकेट चालते एखादा करार केलेला प्लेयर सुमार खेळु लागला तर त्याचि टिममधुन हकालपट्टी होणे हे कंपन्यांच्या हिताचे ठरणार नाहि ह्या प्रसंगी कंपन्या ह्या त्या प्लेयरची कारकिर्द खेचुन नेउ शकतात.>>> याला पुरावा म्ह्णून किमान दोन खेळाडूंच्या जाहिरात कराराची प्रत दाखवू शकाल? हे करार आणी यामधले क्लॉजेसमधली माहिती देऊ शकाल?
जी गोष्ट स्पष्टपणे दिसून येते
जी गोष्ट स्पष्टपणे दिसून येते तीला पुरावा कशाला?
कुठे स्पष्टपणे दिसून येत
कुठे स्पष्टपणे दिसून येत आहे??? तुम्ही की काय विध्यर्थी विधानं करत सुटलाय "करू शकतात" त्याचयसाठी समर्थ पुरावा समोर ठेवा की. उगाच ठोकायची म्हणून उलटसुलट कशीही विधाने ठोकायची का?
कूठल्या खेळाडूला निवडसमितीनं काढून टाकला पण जाहिरातदारांच्या दबावानं परत टीममध्ये घेतला असे एखादे उदाहरण द्या पाहू. निवडसमितीचे काम तरी कसे चालते हे तुम्हाला ठाऊक आहे का? कुठल्याही खेळाडूचा जाहिरातदार कंपनीबरोबर झालेला करार तुम्ही अक्धी वाचला आहे. त्यामधले महत्त्वाचे क्लॉजेस तुम्हाला माहित आहेत?
कर भरावा लागु नये म्हणुन
कर भरावा लागु नये म्हणुन सरकारला पत्र लिहणारे त्यांच्या कराराच्या प्रति दाखवणार मग काय विचारायलाच नको.
निवडसमितिने अशा खेळाडुंना काढून परत घेतल्याचे उदाहरण माहित नाहि मात्र न काढता कारकिर्द खेचणे असे प्रकार केलेले आहेत असे मला वाटते.
सकुरा, सचिन तेंडूलकर बर्याच
सकुरा, सचिन तेंडूलकर बर्याच charity मधे, विशेषतः post retirement भाग घेतो. त्याने नाही घेतला तरी खेळाडू म्हणून त्याचे मूल्यमापन नि माणूस म्हणून त्याचे मूल्यमापन ह्यांमधे फरक आहे हे लक्षात घ्या. इथे त्याच्या cricketing skill ची चर्चा होती.
निवडसमितिने अशा खेळाडुंना
निवडसमितिने अशा खेळाडुंना काढून परत घेतल्याचे उदाहरण माहित नाहि मात्र न काढता कारकिर्द खेचणे असे प्रकार केलेले आहेत असे मला वाटते. >> 'मला वाटते' ह्या पली़कडे जर काही नसेल तुमची मते का प्रमाण धरायची नि त्यावर का बोलायचे ?
मला वाटते'हे तर प्रत्येकाच्या
मला वाटते'हे तर प्रत्येकाच्या बाबतित असते.
मला वाटते'हे तर प्रत्येकाच्या
मला वाटते'हे तर प्रत्येकाच्या बाबतित असते. >> अहो 'मला वाटते' हे प्रत्येकाच्या बाबतीत असते पण त्याला बरेच जण बरेच वेळा पुरावाही देऊ शकतात. तुमचे सगळेच 'मला वाटते' एव्हढेच असते. त्यावर काय कप्पाळ बोलणार ?
निवडसमितिने अशा खेळाडुंना
निवडसमितिने अशा खेळाडुंना काढून परत घेतल्याचे उदाहरण माहित नाहि मात्र न काढता कारकिर्द खेचणे असे प्रकार केलेले आहेत असे मला वाटते.<>> मला वाटते या वाक्याला काडीचाही अर्थ नाही. पूर्ण माहिती असेल तरच मग लिहत जा. अनय्था जी विधाने कराल ती नक्की कुठल्या मटेरीअलच्या आधारावर केलीत ते सांगा.
तुमच्यासाठी एक खास रीकॅपः तुम्ही आधी मह्णालात की
जाहिरात कंपन्यांचे लागेबांधे, हितसंबध हे एखाद्या प्लेयर्सची कारकिर्द खेचु शकतात का? त्या कंपन्यांचा संघनिवडीवर,निव्रुत्ति घेण्यावर प्रभाव पडत असावा का?
<< हे विधान प्रश्नार्थक आह्हे आणी मी त्याला यथायोग्य उत्तर दिलेले आहे. त्यानंतर आलेले तुमचे विधान
जाहिरात कपन्यांवर क्रिकेट चालते एखादा करार केलेला प्लेयर सुमार खेळु लागला तर त्याचि टिममधुन हकालपट्टी होणे हे कंपन्यांच्या हिताचे ठरणार नाहि ह्या प्रसंगी कंपन्या ह्या त्या प्लेयरची कारकिर्द खेचुन नेउ शकतात.
वरच्या प्रश्नार्थक विधानाच आता तुम्ही ठाम मत बनवून लिहिले आहे. परत एकदा "कारकीर्द खेचून नेऊ शकतात" या विधानाला काहीही अर्थ नाही. मी तुम्हाला याहीनंतर एखाद्या कराराची प्रत वाचली आहे का हे विचारलंय. त्यावर तुम्ही अद्याप उत्तर लिहिले नव्हते. मग लिहिलेत
जी गोष्ट स्पष्टपणे दिसून येते तीला पुरावा कशाला?
का ब्वा? तुम्ही बेताल विधाने करायची मग त्याला पुरावा नको? स्पष्तपणे दिसून येते म्हणजे काय म्हणून विचारल्यावर तुमचे उत्तर आलंयः
कर भरावा लागु नये म्हणुन सरकारला पत्र लिहणारे त्यांच्या कराराच्या प्रति दाखवणार मग काय विचारायलाच नको.
निवडसमितिने अशा खेळाडुंना काढून परत घेतल्याचे उदाहरण माहित नाहि मात्र न काढता कारकिर्द खेचणे असे प्रकार केलेले आहेत असे मला वाटते.
वाटलंच होतं हा कर भरण्याचा मुद्दा अद्याप कसा आला नाही!!! तो आणून तुम्ही मूळ मुद्द्याला बगल दिलीतच. प्रश्न कर बह्रणे अथवा न भरणे नाही. तो सेपरेट मुद्दा आहे. त्यावर वेगळा बीबी काढा, मग बोलू. सध्या विषय आहे तुम्ही म्हणताय की जाहिरात कंपन्या खेळाडॉओची कारकीर्द खेचतात तो काय इलास्टिकचा नाडा आहे खेचायला?
याच वाक्यात तुम्ही मला वाट्ते असे लिहून मोकळे झालाय. आम्हालाही बरंच काही वाटतं. पण त्या "वाटपाला" जोवर फॅक्ट्सचा आधार नाही तोवर ते केवळ कल्पनारंजनच राहणार.
तस्मात. कल्पनारंजन आणि कन्स्पिरसी थेअरीज सोडून खेळ आणि क्रिकेट याबद्दल काही लिहायचे असल्यास लिहा, अन्यथा मायबोलीवर चिक्कार बीबी आहेत जिथे तुम्हाला निवांत कल्पनारंजन करता येईल,. प्रशासकांनी "गुलमोहर" असा वेगळा भागच काढून दिलेला आहे. तिथे आपल्याला "जे वाटतं" ते आवर्जून लिहा. आम्ही आस्वाद घेऊच.
खेळ बघितला सुमार वाटला ह्यात
खेळ बघितला सुमार वाटला ह्यात पुराव्याचा प्रश्न आलाच कुठे?
खेळाबद्दल बोलतोय का?
खेळाबद्दल बोलतोय का? जाहिरातदार कंपन्यांनी कारकीर्द खेचून नेणे आनी निवडसमितीवर दबाव आणणे या तुमच्या विधानांब्द्दल बोलतोय. त्यावर पुरावा द्या.
खेळाला प्रायोजक लागतात.पैसा
खेळाला प्रायोजक लागतात.पैसा लागतो तो जाहिरातदार पुरवतात.त्यांचा निवडसमितीवर शुन्य प्रभाव असतो हे भले कुणाला पटत असेल पण मला मान्य नाही.जाहिरातदार हा एक मोठा पडद्यामागुन सुत्रसंचालन करणारा घटक असणारच. भारतिय क्रिकेट हे जगभरच्या प्लेयर्ससाठी मोठे मार्केट आहे ते प्लेयर इथे येउन एखाद्या इथल्या प्लेयर्सचे गुणगान गातात नि आपण तेच घेउन उड्या मारतो कि अमका प्लेयर माझ्या लाडक्या प्लेयरला हे म्हणाला नि ते म्हणाला .आणि पुरावे म्हणुन ह्या प्लेयर्सच्या विधानांचे दाखले देतो.
मात्र ह्या प्लेयर्सच्या विधानांमागे व्यावसायिकपणा असतो.जगातली क्रिकेटची महासत्ता असलेल्यांना कशाला दुखवा त्यापेक्षा चार गोड शब्द बोलुन स्वताचा फायदा करून घ्या असा हेतु असतो
नंदिनि आधिची पुराव्याची पोस्ट
नंदिनि आधिची पुराव्याची
पोस्ट असामि ह्यांच्यासाठी होती तुमच्या पोस्टनंतर आल्याने तुमचा गैरसमज झाला
पगारे, चेंडू फळी ह्या
पगारे, चेंडू फळी ह्या खेळाबद्दल बोलत आहेत सर्व.
नंदिनी, का महाज्ञानी पगारेंशी वाद घालत आहात?
पोस्ट असामि ह्यांच्यासाठी
पोस्ट असामि ह्यांच्यासाठी होती तुमच्या पोस्टनंतर आल्याने तुमचा गैरसमज झाला>>
पगारे तुमच्या लक्षात आले नसेल तरी आपणही सकाळपासून जाहिरातदार कंपन्यांनी कारकीर्द खेचून नेणे आनी निवडसमितीवर दबाव आणणे या तुमच्या विधानांबद्दलच बोलतोय.
त्यांचा निवडसमितीवर शुन्य प्रभाव असतो हे भले कुणाला पटत असेल पण मला मान्य नाही. जाहिरातदार हा एक मोठा पडद्यामागुन सुत्रसंचालन करणारा घटक असणारच. >> जेंव्हा तुम्ही एव्हढे मोठे विधान करता तेंव्हा ' मला वाटते' पेक्षा काहीतरी छटाकभर अधिक लिहायला हव असे तुम्हाला का वाटत नाही ?
खेळाला प्रायोजक लागतात.पैसा लागतो तो जाहिरातदार पुरवतात.त्यांचा निवडसमितीवर शुन्य प्रभाव असतो हे भले कुणाला पटत असेल पण मला मान्य नाही.जाहिरातदार हा एक मोठा पडद्यामागुन सुत्रसंचालन करणारा घटक असणारच. भारतिय क्रिकेट हे जगभरच्या प्लेयर्ससाठी मोठे मार्केट आहे ते प्लेयर इथे येउन एखाद्या इथल्या प्लेयर्सचे गुणगान गातात नि आपण तेच घेउन उड्या मारतो कि अमका प्लेयर माझ्या लाडक्या प्लेयरला हे म्हणाला नि ते म्हणाला .आणि पुरावे म्हणुन ह्या प्लेयर्सच्या विधानांचे दाखले देतो.
मात्र ह्या प्लेयर्सच्या विधानांमागे व्यावसायिकपणा असतो.जगातली क्रिकेटची महासत्ता असलेल्यांना कशाला दुखवा त्यापेक्षा चार गोड शब्द बोलुन स्वताचा फायदा करून घ्या असा हेतु असतो >> ह्य पूर्ण पोस्ट्मधे घोळ आहे "खेळाला प्रायोजक लागतात.पैसा लागतो तो जाहिरातदार पुरवतात.त्यांचा निवडसमितीवर शुन्य प्रभाव असतो हे भले कुणाला पटत असेल पण मला मान्य नाही.जाहिरातदार हा एक मोठा पडद्यामागुन सुत्रसंचालन करणारा घटक असणारच." ह्या नंतर आलेली वाक्ये हा मुद्दा कसा काय बरोबर ठरवतात ?
माझ्या विधानांना आरोप शब्द
माझ्या विधानांना आरोप शब्द वापरणे हा माझ्यावरच आरोप आहे.
सचिनसंदर्भात काही फॅक्ट सांगितले की ते आरोप म्हणूनच का बघितले जाते.
सचिनचे शतकाजवळ आल्यावर गेम चेंज होताना बघणे हे जगाने अनुभवले आहे, तरी त्याला डिफेंड का केले जात आहे. वैयक्तिक शतकाजवळ आल्यावर त्याचे विचार मनात येणे हे खूपच नैसर्गिक आहे, आणि ते सर्वांनाच लागू आहे. फक्त सचिन एवढी कोणाची शतकेच नाहीत म्हणून इतरांबद्दल चर्चा होत नाही ईतकेच.
आणि हो, ही वरची पोस्ट सचिन शतकाजवळ चाचपडतो यासाठी होती.
ते जाहिरातीच्या मुद्द्याबद्दल मी माझे मत नंतर सविस्तर लिहितो.
पण झोपायला जाण्यापूर्वी,
सचिनच्या वाढत्या कारकिर्दीत त्याच्या जाहिरातदारांचा फायदा आहे आणि कारकिर्द संपली तर तोटा आहे या आशयाचा लेख मागे मी वाचलेला. पुरावा म्हणून कात्रण मागू नका, पण अर्थात याचा अर्थ जाहिरातदारांमुळे कारकिर्द वाढली असाही होत नाही. कारण जाहिरातदारांची निवडसमितीवर चालते की नाही याची मला कल्पना नाही.
पण येस्स, सचिन नक्कीच कपिलसारखा रडतखडत खेळला नाहीये. जेव्हा त्याची निवृत्ती जवळ आली आहे अशी चर्चा सुरू झाली त्या वयात तो एकदिवसीयमध्ये ते देखील आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध द्विशतक झळकावणारा पृथ्वीतलावरचा पहिला माणूस झाला हे कोण विसरेन
हे सारे फक्त मी एवढ्यासाठीच लिहितोय की सचिन म्हटले की आपला देव आणि आपण त्याविरुद्ध एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसतो. म्हणून मी दोन नकारात्मक पण सत्य शब्द लिहिले ईतकेच. कारण मी नास्तिक आहे
पगारे, गोफरच्या जमान्यापासुन
पगारे, गोफरच्या जमान्यापासुन असे वाद बघत आलेलो आहे; टेक्नॉलॉजी बदलली पण मनुष्य स्वभाव बदललेला नाहि.
एक प्रातिनिधिक कार्टुन सगळ्या माबोकरांसाठी...

काय हे राज! मी दोन
काय हे राज!
मी दोन नकारात्मक पण सत्य शब्द लिहिले ईतकेच
>>
बाकी ते तुमचे इंटरप्रीटेशन होते, सत्य नाही. आकडेवारीसह पुरावे द्या तर ते सत्य होईल
उगाच आपल काहीही.
राज
राज
राज अनिरुद्धजी, चाचपडण्याचे
राज
अनिरुद्धजी,
चाचपडण्याचे आकडे कसे द्यायचे ?
रुत्विक रोशन हा चांगला डान्सर आहे हे आकड्यांनी कसे सिद्ध करायचे?
(No subject)
:):-)
रुत्विक रोशन हा चांगला डान्सर
रुत्विक रोशन हा चांगला डान्सर आहे हे आकड्यांनी कसे सिद्ध करायचे? <<< रूत्विकचे माहित नाही पण ह्रितिक रोशनला चांगला डान्सर सिद्ध करण्यासाठी "नृत्य" या प्रकाराची टेक्निकल माहिती असणे आवश्यक. तस्मात, सचिनचा खेळ किती चांगला आणि किती वाईट हे ठरवण्यासाठी टेक्निकल माहिती आवश्यक.
डान्सर रन्स काढतो का?
डान्सर रन्स काढतो का?
तस्मात, सचिनचा खेळ किती
तस्मात, सचिनचा खेळ किती चांगला आणि किती वाईट हे ठरवण्यासाठी टेक्निकल माहिती आवश्यक.
>>
चर्चा चाचपडण्यावर चालू आहे आणि सायकॉलॉजी फॅक्टर जिथे येतो तिथे सारी टेकनिक गंडते
आता चाचपडणे हे अर्थक्वेक सारखे रिश्टर स्केलवर मोजू शकत असते तर त्याची रीडींग दिली असती
Pages