महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2015 - 17:02

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.

ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..

खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.

रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.

योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.

पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!

विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.

पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.

एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्‍यानंतर दाट झाल्या असतील.

बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.

आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.

मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?

आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.

कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."

उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.

थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.

याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?

जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.

एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.

.........

यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वरुप,
मला काय वाटते ते खात्रीपूर्वक सांगू शकत नाही पण धोनीला तसे वाटत असावे असे मला वाटते. आणि आतली खरीखोटी राजकारणाची गणिते त्यांनाच ठाऊक. धोनीचा गेम होतोय एवढे मात्र नक्की. त्यात रहाणे सामील असण्याच्या शक्यतेपोटीच त्याने त्याला बाहेर ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईतर काही कारण दिसत नाही जे रहाणेला वगळून रायडूला आत घ्यावे आणि स्वता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचे.

दुसरीकडे रहाणेबाबतही तो त्याच्यातील टॅलेंटच्या मानाने उपेक्षिला जातोय अशी थोडीफार फिलींग मला आधीपासून होतीच, जर रहाणेला स्वतालाही तसेच वाटत असेल तर त्याच्यासाठीही कदाचित कॅप्टनबदल फायद्याचा असू शकतो.

राहिला प्रश्न रहाणे राजकारण खेळणारा असेल का नाही, तर प्रत्येकवेळी यात सामील असणारे आपल्या मर्जीने असतीलच असे नसते. बरेचदा त्यांच्याकडे पर्यायच नसतो.

उदाहरणार्थ आपला या शतकातील महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या काळात मॅचफिक्सिंग आणि बरेच काही घडले ज्याबद्दल तो अनभिज्ञ नक्कीच नव्हता पण तरीही त्याविरुद्ध काही करूही शकला नाही.

बाकी आजघडीला रहाणे माझ्या आवडीच्या खेळाडूंमध्ये टॉपला आहे. त्याचे क्लासी फटके बघायला मजा येते. सचिनची ऊणीव तेवढीच कमी भासते. तो खेळला तर हायलाईटस मी आवर्जून बघतो.

मी शास्त्रीचे पारितोषिक सर्वोच्च याकरता म्हणालो की ती स्पर्धा जिंकण्यात त्याचा हातभार होता. फायनलही भारताने जिंकली व रटाळ का होईना पण तो खेळला त्यात. तसेही तेव्हा फार रन रेट ची गरज नव्हती. पराग - सचिन चे धरून मी म्हंटलो, कारण सचिन ला मिळाले तेव्हा भारत ती स्पर्धा जिंकला नाही. यात सचिनला त्याचे स्वतःचे फायनल मधले अपयश वगळता काही कमीपणा नाही, पण शास्त्रीचे पदक काकणभर सरस होते, स्पर्धेतील विजयामुळे. २००३ मधल्या सचिन च्या खेळाच्या दर्जामुळे जर कोणाला ते जास्त भारी वाटले तर तेही ठीक आहे.

आता नक्कीच युवीचे असेल.

वनडे मध्ये निश्चितच युवराजचा मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार श्रेष्ठ गणला जाईल हे खरे. हाच निकष टेस्टला लावायचा झाला तर माझ्या मते हरभजन सिंगचा मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार - २००१ च्या ऑस्ट्रेलिया सिरीजचा लँडमार्क ठरावा.

ते काहिही असो,
पण धोनीला तोडीस तोड विकेट्कीपर म्हणुन एकच नाव सुचवु इच्छितो,.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
साबा करीम.........पण,
सध्या साहेब कॉमेंट्री मधे "हात" आजमावत आहेत.
जनता की मांगपे किंवा वाईल्ड कार्ड एन्ट्री होवु शकते का बघायला हवे.

निधी, उलथापालथ या मराठी शब्दासाठी धन्यवाद,
हा आणि मंदार यांनी सुचवलेला अंतिम फेरीचा उपांत्य फेरी हे दोन्ही बदल आता करतो आहे.

बेकार तरूण - तुमच्या त्या ५ खेळाडूंच्या यादीत गांगुलीसुद्धा दिसेल असे वाटले होते. तो मैदानावर आक्रमक असला तरी बाहेर कधीच काड्या नव्हत्या.
>>>>
इथे फारेण्डशी प्रचंड सहमत. दादा म्हणजे एक पॉजिटीव्ह अ‍ॅटीट्यूड होता. तसेच यश मिळाल्यावर तो बदलला असाही नसून तो आधीपासूनच महाराजा होता. कुंबळे, द्रविड, लक्ष्मण, सचिन यांना आपला विनम्रपणा कुठल्याही त्रासाशिवाय जपता आला यालाही कारण दादाच होता, कारण प्रतिस्पर्ध्यांना जशास तसे ऊत्तर द्यायचे काम त्याने आपल्याकडे घेतले होते. आपण तर फुल्ल फॅन आहे दादाचा!

केली कर्मा याच जन्मा.... तसा काहिसा प्रकार घडतोय असं वाटतेय हल्लि.....

गांगुली पाठोपाठ धोनीचे ईंडिया टीम बिल्डिंगमधलं योगदान वादातीत आहेच.... पण मग त्याच जोडीने पद्धतशीरपणे गंभीर, युवराज सारख्यांच्या करिअरला खीळ लावणे, रविंद्र जडेजा सारख्यातद्दान सुमार टीनपाट प्लेयरला टीमवर लादणे.... काही प्रमाणात रैना अश्वीन मोहित शर्मा यांची पाठराखण करणे..... आणि स्वतःचा कंपू तयार करणे.... हे प्रकार धोनीनेही केलेच....
आता ती संधी शास्त्री आणि कोहलीला मिळतेय इतकाच फरक आहे.

एक क्रिकेट चाहता म्हणून या राजकारणाचा परिणाम टीमच्या पर्फॉर्मन्सवर होता कामा नये हाच कळीचा मुद्दा आहे.

जोपर्यंत टीम जिंकत होती धोनीच्या कंपू ला आपण "टीम बिल्डिंग" म्हणत होतो.... मग गंभीर युवराज वल्डकप टीमबाहेर असल्याचे पटत नसलं तरीही..... आता जेंव्हा अपयश येतेय, पराभव होतोय तेंव्हा अचानक धोनीचे कंपूबाजी आणि शास्त्रीची कंपूबाजी यावर उघडपणे बोलणी होतायत....

एका चाहत्याला राजकारणापलिकडे जाऊन टीम उत्तम परफॉर्मन्स देत रहावी जिंकत रहावी हीच अपेक्षा असते आणि आहे..... बाकी उदयाला आलेला अस्ताला जाणारच हे अटळ आहे.

कुठे होते मग जेंव्हा सेहवाग, गंभीर , " धोणी टेन्शनमुळे " परफॉर्म करू शकले नाहीत? इनफॅक्ट वी लॉस्ट अ गुड फ्युचर कॅप्टन.
>>>>>>>>>>>>

१००% सहमत फॉर गंभीर....... न्युझिलंड सिरीज नंतर त्याच्याकडेच फ्युचर कॅप्टन म्हणून बघायला वाव होता.
आयपीएल मधेही तो उत्ताम कॅप्टन्ची करतो.... रैना जडेजाला इतक्या संधी दिल्या जातात तर गंभीरला का नाही हा प्रशन मनात येतोच... आणि उत्तर एकच धोणीची कंपूबाजी.....

आज शास्त्रीच्या रूपाने शहला काटशह देणाराक्कुणीतरी धोनीला समोर आला इतकेच.

या सगळ्यात टीमचं नुकसान होऊ नये मात्र.

येस्स गंभीर!
गंभीर आयपीएलमधील बेस्ट कप्तान आहे. सामान्य टीमला त्याने ऊंचीवर नेऊन ठेवले.
आता धोनीला पर्याय म्हणून कोहली उभा केलाय त्याचा आक्रमकपणा डावपेचात कमी आणि आक्रस्ताळपणाच जास्त वाटतो. गंभीरचा आक्रमकपणा त्यापेक्षा नक्कीच उजवा आहे.
किंबहुना मला कोहलीपेक्षा रोहित शर्माला कर्णधार करणे परवडेल असे वाटते.
तरी बघूया, धोनी या राजकारणसमोर कितवर तग धरतोय ..

अरे तो दुय्यम संघ पाठवला आहे, त्या संघासोबत शास्त्री आणि कोहली देखील नाहीत. कसला गेम क्लिअर? जर नंतर होणार्‍या मालिकेत श्रीलंकेविरुद्ध सुद्धा रहाणे कर्णधार राहिला तर गेम क्लिअर का काय जे म्हणत आहेस ते.

अहो पायस म्हणजे शास्त्री+कोहली टीममध्ये रहाणे सुद्धा आहे हे क्लीअर.

शर्मा, रैना प्रभूतींना डावलून ज्याला बांग्लादेशबरोबर वगळून रायडूला घेण्यात आले होते त्या रहाणेला थेट कर्णधार केले.

याचाच आणखी एक अर्थ, धोनीचा गेम होताच कोहली कर्णधार आणि रहाणे उपकर्णधार.

अरे काय राव ऋन्मेश तू बातमी नीट वाचत नाहीस का?

रैना, शर्मा, धवन, अश्विन वगैरे सर्वांनी आम्हाला विश्रांती हवी आहे, आम्ही जाणार नाही असे कमिटीला कळवले आहे. उरलेल्यांपैकी मग कुणाला तरी कर्णधार करने क्रमप्राप्त होते. ह्यात कुणाचा गेम बिम नाहीये.

असो !

हे एक नवीनच. मी कुठे वाचले की रोहित शर्माला कप्तान केले म्हणून? का ती नुसतीच अफवा? की नुसतीच चर्चा? की मीदियाने उगाच हूल उठवली होती काल वगैरे? बाकी, गंभीरने कोणाचे घोडे, हत्ती मारले आहेत देव जाणे!

आणि रहाणे कॅप्टन? Proud

उरलेल्यांपैकी मग कुणाला तरी >> सर्वांना विश्रांती देत रहाणेलाच कसा तो ऊरवला. अर्थात येणारा काळ आणखी गोष्टी क्लीअर करत जाईल Happy

सर्वांना विश्रांती देत रहाणेलाच कसा तो ऊरवला. अर्थात येणारा काळ आणखी गोष्टी क्लीअर करत जाईल >>

असेच मध्ये रैनाला झिम्बॉम्बे दौर्‍यावर कॅप्टन केले होते. तेंव्हाही असेच एक दोन जण काही तरी शिजतंय म्हणाल्याच आठवतं.

तू टीम कम्पोझिशन तरी पाहिले आहेस की नाही ह्याबद्दल मला संदेह आहे. अन्यथा हे वरचे लिहिले नसतेस. बहुदा.

Ajinkya Rahane (capt), M Vijay, Ambati Rayudu, Manoj Tiwary, Kedar Jadhav, Robin Uthappa, Manish Pandey, Harbhajan Singh, Axar Patel, Karn Sharma, Dhawal Kulkarni, Stuart Binny, Bhuvneshwar Kumar, Mohit Sharma, Sandeep Sharma.

ह्या पैकी कोणाला कॅप्टन करणार मग? तिवारी की धवल कुळकर्णी की बिन्नी? भज्जी ऑलमोस्ट रिटायर होईल पुढच्या वर्षी,

आजच्या टीम मधील किती लोकं खेळत आहेत? त्यातल्या त्यात अनुभवी कोण आहे? गणित मांडा अन त्रैराशिकातनं उत्तर काढा. सॉरी मी पोस्टच टाकायला नको होती. वितंडवाद आजकाल नकोसे वाटतात. तरी बातमी वाचली तर बरं होईल.

ड्रीम टीमः

अजय जडेजा - कर्णधार

नवज्योत सिद्धू
अरुणलाल (किंवा अन्शूमन गायकवाड)
मांजरेकर
अझरउद्दीन
रवी शास्त्री - अनुभवी अष्टपैलू
पार्थिव पटेल - विकेटकीपर
रवींद्र जडेजा - नगाला नग म्हणून
श्रीशांत - अती द्रूतगती गोलंदाज
बिशनसिंग बेदी - अनुभवी स्पिनर
युसुफ पठाण - गाजराची पुंगी

>>अहो पायस म्हणजे शास्त्री+कोहली टीममध्ये रहाणे सुद्धा आहे हे क्लीअर. >> धत् तेरे की! जर - या 'जर' वर जोर देऊन वाचणे - अशा काही टीम्स आहेतच तर अर्थात रहाणे शास्त्री टीममध्ये आहे. शास्त्रीची कमेंट्री २०११ पासून ऐकली तर क्लिअर होईल कि शास्त्रीला रहाणे प्लेअर म्हणून तेव्हापासून आवडतो (अर्थात रहाणे एक फलंदाज म्हणून उपयुक्त खेळाडू आहे हेमावैम). बाकी केदारच्या पोस्टला प्रचंड अनुमोदन! ऋन्मेऽऽष तू क्रिकइन्फो वरचे ब्लॉग वाचतोस का? हेडलाईन्स नाही, ब्लॉग्ज! त्यात या सर्वांचा इत्थंभूत समाचार घेतात. तिथे तुला सर्व कारणे मिळतील कि रहाणेलाच का कर्णधार केला!

तू टीम कम्पोझिशन तरी पाहिले आहेस की नाही ह्याबद्दल मला संदेह आहे. अन्यथा हे वरचे लिहिले नसतेस. बहुदा.
>>>>

सर्वांना विश्रांती देत रहाणेलाच कसा तो ऊरवला. >> या माझ्या वाक्यानुसार मी टीम कम्पोझिशन पाहिले आहेच Happy
धवन, रोहित, आश्विन आणि कसोटीत न खेळणारा रैना यांना विश्रांती दिली अन नेमका रहाणेच कप्तानी देत खेळायला पाठवला.

अरे हो, रायडू आहे की झिम्बाब्वेला जाणार्‍यांमध्ये Happy

असो, मी माझी शंका मांडत आहे पण आपण नक्की डिफेन्ड कोणाला करत आहात? शास्त्रीला, कोहलीला, रहाणेला, की बीसीसीआयला?

ऋन्मेऽऽष तू क्रिकइन्फो वरचे ब्लॉग वाचतोस का? हेडलाईन्स नाही, ब्लॉग्ज!
>>>
नाही वाचत,
आजकाल बरेच काही सेट करता येते, बरेच काही पेड लिखाण असते, कोणाची वैयक्तिक मतेही असू शकतात, तर कोणाची वैयक्तिक खुन्नस .. त्यापेक्षा मी वाचण्यापेक्षा जे घडतेय ते बघून माझी मते बनवतो Happy

मी माझी शंका मांडत आहे पण आपण नक्की डिफेन्ड कोणाला करत आहात? शास्त्रीला, कोहलीला, रहाणेला, की बीसीसीआयला? >

मी कुणालाच डिफेन्ड करत नाही. क्रिकेटला करतोय. तुम्ही काहीच्या काही शंका मांडता आणि त्याला पुरावा म्हणून परत काहीही लिहिता. ते सहन होत नाहीये म्हणून ती पोस्ट लिहिली.

ऋन्मेऽऽष तू धन्य आहेस बाबा! तुझ्या या शतकात माझ्यातर्फे ही शेवटची धाव!

>> Happy

असो, मी माझी शंका मांडत आहे पण आपण नक्की डिफेन्ड कोणाला करत आहात? शास्त्रीला, कोहलीला, रहाणेला, की बीसीसीआयला?
>> Happy Happy

मी कुणालाच डिफेन्ड करत नाही. क्रिकेटला करतोय. तुम्ही काहीच्या काही शंका मांडता आणि त्याला पुरावा म्हणून परत काहीही लिहिता. ते सहन होत नाहीये म्हणून ती पोस्ट लिहिली.
>>>
नक्की कुठल्या क्रिकेटला डिफेंड करत आहात?
मॅच फिक्सिंगची अन स्पॉट फिक्सिंगची किड लागलेल्या?
आयपीएलच्या ग्लॅमरमध्ये वाहत चाललेल्या?
पैसा कमवायला वर्षाचे १२ महिने खेळाडूंना घाण्याला जुंपणार्‍या?
संघनिवडीचे राजकारण करणार्‍या, वशिल्याच्या तट्टूंना पुढे पुढे घुसवणार्‍या?
अर्थात हे सर्व असूनही माझे क्रिकेटवरचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही.
पण म्हणून डोळे मिटून बसायचे आणि शंकाही नाही घ्यायच्या अश्याने माझा हा आवडता खेळ आणखी वेगाने भ्रष्ट होत जाईल जे मला सहन होत नाहीये, म्हणून मी हे लिहितोय Happy

रहाणेला झिंबाब्वे दौर्‍यासाठी कर्णधार का केले असेल ह्याचे एक कारण म्हणजे त्या दौर्‍यासाठी निवडलेल्या बाकिच्या खेळाडूंपैकी कोणीच ते पद घेऊ शकत नाही व दुसरे कारण म्हणजे बीसीसीआय चे राजकारण.

बाकिचे सगळे "दादा" खेळाडू घरी बसणार असताना रहाणे का नाही घरी बसला? तो पण गेले अनेक महिने खेळतोच आहे ना? एका सामन्यासाठी त्याला वगळल्यामुळे एवढी चर्चा होणार असेल तर त्या लोकांना गप्प करायला कारण तयार करून द्यायला नको का?

"आपल्या कौशल्यामुळे जो डोईजड होऊ शकतो, त्याला जास्तीत जास्त जबाबदारी देऊन तो अपयशी होण्याची सोय करणे जेणेकरून त्याचे ते अपयश कायम त्याच्या नावामागे लावुन त्याला कायमचा दाबुन ठेवता येतो" हे जुने राजकारण आहे.अर्थात बघणार्‍याला त्यात सुवर्ण संधीही दिसते व त्या संधीचे सोने केल्यास मग त्याला कोणीही थांबवू शकत नाही. रहाणेने संधीचे सोने करावे हीच ईच्छा.

धोनीसाठी अस्तित्वाची लढाई सुरू होत आहे. भारत - आफ्रिका २०-२० आणि एकदिवसीय मालिका आजपासून सुरू होत आहे. त्याला नुसते चांगले खेळायचेच नाही तर संघालाही जिंकवून द्यावे लागणार. अन्यथा तो कर्णधारपद गमावून संघात राहिला असे न होता थेट संघाबाहेरच फेकला जाणार.

मी धोनीच्या पाठीशी आहे. या धाग्यात मी मांडलेल्या सर्व शंका खर्‍याच आहेत याबाबत मला जराही शंका नाही. आशा करतो धोनी या सर्वांना पुरून उरेल.

धोनीला शुभेच्छा !

फायनली धोनीने अप्रत्यक्षपणे पहिल्यांदा कोहलीवर निशाणा साधला.
कालच्या पराभवाचे कारण सांगताना धोनी म्हणाला की सारे काही सुरळीत चालू असताना 30-35-40 षटकांच्या मध्ये धावगती मंदावली.
आणि अर्थातच तेव्हा विराट कोहली आपला फ्लॉप शो दाखवत होता.

यावर काल न्यूज चॅनेल वर एक शो सुद्धा पाहिला. कसोटीत फॉर्मला असलेला कोहली नेमका एकदिवसीय मध्ये फ्लॉप कसा. त्याचा हल्लीचा रेकॉर्ड, गेल्या ८ कसोटीत 5 शतके. पण वनडेत गेल्या काही मालिकांत हाल्फ सेंच्युरीची सुद्दा बोंब.

अर्थात मला याबाबत काहीही संशय नाहीच आहे, पण ज्यांना थोडाफार आहे तो मिटायला हरकत नाही.

त्यामुळे आता मनाची तयारी करा आणि ही मालिका आपल्या पराभवाने संपल्यावर कर्णधार बदल झाल्यास नवल वाटून घेऊ नका..

देजा वू :
गांगुलीच्या एक्झिटवेळी युवराज , सेहवाग , भज्जी, झहीर असेच गांगुलीला सपोर्ट करत होते.

शेव्टी राजा बदलला की मंत्रीमंडळ ब्दलणारच .. पुन्हा तेच चक्र रीपीट होत आहे.

सिरिज संपेपर्यंत पण कदाचित वाट बघायला लागणार नाही... इंज्युरीमुळे धोणी कदाचित पुढची मॅच पण खेळेल की नाही अशी शंका आहे..

>>इंज्युरीमुळे धोणी कदाचित पुढची मॅच पण खेळेल की नाही अशी शंका आहे..>> सकाळ मधे बातमी येईल मग - "भारतीय संघाला ग्रहण, कॅप्टन कूल धोनी मालिकेतून बाहेर!"

चौकट राजा Happy

चेन्नई गँग चा प्रभाव कमी झाल्यामुळे धोनीलाही बाहेर काढायचे प्रयत्न चालू असतील. सांगता येत नाही.

मात्र भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून ही घसरण अपरिहार्य असली तरी वाईट वाटते. बिग-५ इतकी पॅशन कधी धोनीबद्दल वाटली नाही (त्याच्या पिढीच्या कोणाबद्दलच), तरी तो एक जबरी आवडता खेळाडू आहे.

धोणीने देखील खूप बॉल वाया घातले. त्याला शॉट मारता येत नव्हत्या. तो म्हणाला की पीच तशी होती. मग रोहितने १५० कसे केले?

अर्थात मला याबाबत काहीही संशय नाहीच आहे, पण ज्यांना थोडाफार आहे तो मिटायला हरकत नाही. >> थँक गॉड फक्त तुम्हालाच तसा संशय आहे. आमच्यासारख्या सामान्य क्रिकेट प्रेमीला नाही.

विराटच्या शॉट्स सुपर्ब होत्या. पण त्याला लावलेली फिल्डींग देखील खूप चांगली होती. त्यामुळे सगळ्या शॉट प्लेअर्स कडे. धोणीला उगाच काही बोलायचे म्हणून बोलला तो. त्याने ही मॅच घालवली.

धोणिने भारताला विश्वचषक जिकुन दिलाय. तो सर्वोत्तम कप्तान आहे.एक दोन मालिकांवरुन त्याच्या कामगिरीचे मुल्यमापन होउ नये.सचिन सारखा खेळाडु सातत्याने शेवटची काहि वर्षे सुमार खेळत होता तरीही त्याला संधि मिळायची मग धोणिलाही खेळवावे तो सचिनच्या तुलनेत उत्तम खेळतोय.

उतरणीच्या काळात माणसाने कमी बोलावे.... धोनीला हे कुणीतरी सांगायची गरज आहे!
>>>>
प्लस वन!
असेही म्हणता येईल की माणूस जास्त अघळपघळ बोलायला लागला की त्याचा शेवट जवळ आला समजावे.

तरीही असे वाटते की त्याने पुढच्या सामन्यात पुढे खेळायला यावे आणि या मालिकेत दोन तडफदार शतके ठोकून जिंकून द्यावी.

धोणिने भारताला विश्वचषक जिकुन दिलाय. तो सर्वोत्तम कप्तान आहे.एक दोन मालिकांवरुन त्याच्या कामगिरीचे मुल्यमापन होउ नये.सचिन सारखा खेळाडु सातत्याने शेवटची काहि वर्षे सुमार खेळत होता तरीही त्याला संधि मिळायची मग धोणिलाही खेळवावे तो सचिनच्या तुलनेत उत्तम खेळतोय. >>>

धोनीबद्दल काहीच वाद नाही. अजून चान्स द्यायला हवा. पण सचिन बद्दल तुमचा आकस जितका आहे तितकी माहिती तुम्हाला असती तर वाद तरी घालता आला असता. अनेक वेळा तुम्ही काहीही ठोकून दिलेले आहे.

सचिन हा शेवटचि दोनेक वर्षे सुमार खेळत होता ह्यात काय चुकिचे आहे.त्याने निव्रुत्ति घेतली नसती तर त्याची हकालपट्टी होण्याचि शक्यता होती,

धोनीबद्दल काहीच वाद नाही. अजून चान्स द्यायला हवा. पण सचिन बद्दल तुमचा आकस जितका आहे तितकी माहिती तुम्हाला असती तर वाद तरी घालता आला असता. अनेक वेळा तुम्ही काहीही ठोकून दिलेले आहे. >> +१.

खर तर सगळाच घोळ आहे. कोहली, धवन, राहाणे, रोहित सगळे एकाच प्रकारे खेळणारे आहेत. प्रत्येकाला जम बसवायला थोडा फार वेळ लागतो आणि बसला कि ते १०० च्या पुढे किंवा आसपास strike rate सहज ठेवू शकतात. (राहाणे थोडा कमी पडतो. बॉल सॉफ्ट झाल्यावर त्याचा रेट कमी होतो). रैना नि धोनी वगळता पहिल्या बॉल पासून उचलून मारू शकतील असे कोणी नाही. हा मुख्य problem होतोय. शेवटची मॅच धोनी ने घालवली ह्यात शंका नाही. धोनीचा long term plan काय आहे हे नक्की विचारात घ्यायला हवे. पुढच्य१-२ वर्षे खेळणार असेल तर नवीन कीपर ला संधी देण्यास सुरूवात करायला हवी. कोहली जो लाँग चेस मास्टर करतो त्याला ४ वर ढकलून फारसा उपयोग नाही. राहाणे चार वर येऊन उपयोग होईल असेही नाही. मयांक अग्रवाल नि नमन ओझा त्यांच्या आयुष्यातल्या best patches मधे आहेत त्यांना वापरता आले तर बरे होईल. धवन नि रैना पण scrutiny मधे यायला हवेत.

सचिन शेवटची दोनेक वर्षे अत्य़त सुमार खेळला.खरतर त्याची तेव्हाच हकालपट्टी व्हायला हवी होती.परंतु धोणि मध्ये गुणवत्ता आहे तो पुन्हा फॉर्मात येउ शकतो

सचिन शेवटची दोनेक वर्षे अत्य़त सुमार खेळला.खरतर त्याची तेव्हाच हकालपट्टी व्हायला हवी होती.परंतु धोणि मध्ये गुणवत्ता आहे तो पुन्हा फॉर्मात येउ शकतो >> धोनी मधे गुणवत्ता आहे तर सचिन मधे नव्हती का ? Wink वरचे फा चे तुम्हाला उद्देशून असलेले विधान ह्या कारणामूळेच आहे.

सचिन पगारे ,

सचिन तर काँग्रेसचा खासदार असताना तुमचा त्याविषयीचा आकस का हे कळत नाही Happy

रच्याकने , तुम्ही आपल रागा नमो खेळा ना , ज्याना क्रिकेट कळतय त्याना इथे बोलू द्या Happy

सचिनचे वय झाले होते.त्याचा खेळ संपला होता.तो टिममध्ये असला किंवा नसला तरी संघाला फरक पडत नव्हता कारण त्याचे योगदान शुन्य असायचे.मात्र धोनित अजुन खेळ शिल्लक आहे. अजुन किमान दोन वर्षे तरी तो संघाला देउ शकतो.

केदार, क्रिकेट मलाही कळते.बाकिच्यांना नि तुम्हाला क्रिकेट कळते म्हणजे तुम्हि काय स्पेशल कोर्स केलाय का?

अरे सचिनवर वाद कश्याला, मात्र सचिनने कारकिर्द चान्स आणि विश्रांती घेत लांबवली ते पूर्वपुण्याईवर हे मात्र खरेच आहे.

पगारेंशी या बाबतीत सहमत,
सचिनबाबत तो अजून शिल्लक आहे असा आरडाओरडा केला जायचा,
तर धोनीबाबत तो संपला संपला असा आरडाओरडा केला जातोय.

पण येस्स सचिन जोपर्यंत खेळत होता, त्याची जागा पहिल्या सहा फलंदाजात नक्कीच बनत होती, त्यामुळे तो कोणाची जागा अडवून होता असेही म्हणता येणार नाही.
याउपर त्याच्या अनुभवाचा फायदाही होताच, सारे सिनिअर पटापट गेल्यावर तोच शिल्लक होता.

पण हाच अनुभवाचा मुद्दा धोनीलाही लागू आहे.च

पगारे,

विषय छेडलाच आहे, तर सहज सांगतो. पटलं तर बघा, नाहीतर सोडून द्या. सचिन च्या ज्या 'शेवटच्या दोनेक' वर्षांचा तुम्ही उल्लेख केला आहे त्या त्याच्या शेवटच्या दोनेक वर्षात (वन-डे) मधे २०११ चा वर्ल्डकप आहे. त्या दोनेक वर्षात एक द्विशतक, २ शतकं आणी २ अर्ध-शतकं आहेत (८५+ चा स्ट्राईक रेट). त्यातले qualitative मुद्दे तर जाऊच द्या.

फारएण्ड, बिग फाईव्ह विषयी अनुमोदन!

धोनी विषयी मला एकच वाटतं: what goes around, comes around (पेरावं तसं उगवतं).

आपला समाज व्यक्तीपूजक आहे. जिंकणार्‍याकडून टाळ्या वाजवणाराही आहे. विश्वचषक जिंकणे ह्यात युवराजच्या अनेक खेळ्या आणि फायनलच्या सामन्यात गंभीरच्य धावा अत्यंत महत्त्वाच्या होत्या. तसेच, तेंडुलकरांनी विशेष काही न करणेही पथ्यावर पडलेले होते. धोनी कधीच ग्रेट नव्हता. पण तो सामान्यही नव्हता. दिवस फिरल्यावर त्याच्यावर टीका सुरू झाली. बरं, विराट काय किंवा कोणीही काय, धोनीने आयुष्यात कधी परखडपणे बोलूच नये अशी अपेक्षा का बरे? आणि पगारे अनेकवेळा नाही तर बहुतेकवेळा काहीतरी ठोकूनच देत असतात. पण सचिनची प्रतिभा, महानता वगैरेचा यथोचित आदर ठेवूनही म्हणावेसे वाटते की जिगरबाज खेळ आणि तेंडुलकर ह्यांचे कधी विशेष जमले नाही. जे आजकालच्या खेळाडूंचे (कसे कोण जाणे) जमताना दिसते.

आता धोनी मार खात आहे, उद्या कोहली मार खाईल, एक दिवस शास्त्री (जसा टीममधून वगळला गेला होता तस्साच) त्या पदावरून वगळला जाईल आणि तरीही त्याला एखादा उच्च नागरी किताब वगैरे मिळले.

आपल्यासाठी त्या क्षणी ग्रेट खेळणारा माणूस सुरुवातीला ऑल टाईम ग्रेट होईल मग इतरांसारखाच ठरेल आणि शेवटी टाकाऊ ठरेल.

बाकी सोळा बॉल्समध्ये २५ रन्स अश्या सिच्युएशनमध्ये धोनी असताना धोनीने जिंकून दाखवलेच पाहिजे अशी अपेक्षा कश्यामुळे बुवा? इच्छा असणे ठीक आहे, इच्छापूर्ती नाही झाली तर वाईट वाटणे ठीक आहे पण लगेच धोनी सुमार कसा काय ठरतो? आणि धोनी जेव्हा हे असे काही करून दाखवतो तेव्हा 'तो आहेच ग्रेटेस्ट फिनिशर' ही वाक्ये तरी कशाला उगाच?

प्रत्येक सामना, प्रत्येक मैदान, प्रत्येक प्रतिस्पर्धी, प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सिच्युएशन वेगळीच असते की?

Happy

त्या रोहित शर्माने १५० ऐवजी १८० का नाही काढल्या असेही म्हणू लागतील पुढे!

>>त्या रोहित शर्माने १५० ऐवजी १८० का नाही काढल्या असेही म्हणू लागतील पुढे!>> पुढे कशाला आत्ताच म्हणत आहेत कि एवढा खेळला आणि ४७ व्या ओव्हरमधे काय आउट झाला. आणि हेही म्हणत आहेत कि रहाणे बरोबरची भागीदारी १०० पेक्षा कमी स्ट्राईक रेट नी झाल्यामुळे नंतर ही वेळ आली!

धोनी कर्णधार असल्यामुळे सगळ्या यशापयशाचा पहिला वारस तो आहे एवढच. भारतीय संघाच्या (कदाचित इतरही सगळ्या संघांच्या) कर्णधाराच्या "जॉब डीस्क्रीप्श्न" मधेच लिहिलं आहे ना ते!

Pages