महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2015 - 17:02

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.

ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..

खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.

रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.

योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.

पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!

विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.

पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.

एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्‍यानंतर दाट झाल्या असतील.

बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.

आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.

मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?

आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.

कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."

उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.

थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.

याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?

जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.

एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.

.........

यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात काय चर्चा अपेक्षीत आहे?
>>>
धोनी संपला आहे का?
त्याला राजकारण करून संपवले जात आहे का?

म्हणजे प्रेशरखाली धोनी खेळू शकत नाही.
>>>
प्रेशर प्रेशर मध्ये फरक असतो. या प्रकारचे प्रेशर तो कारकिर्दीत पहिल्यांदा फेस करतोय.

म्हणजे प्रेशरखाली धोनी खेळू शकत नाही.
>>>
प्रेशर प्रेशर मध्ये फरक असतो. या प्रकारचे प्रेशर तो कारकिर्दीत पहिल्यांदा फेस करतोय.

>>

Rofl

इतक्या वर्षांनंतर असं प्रेशर पहिल्यांदाच तो फेस करतोय असं म्हणणं म्हणजे बालीश विधानांचा कळस आहे.

छ्या..........
फारएन्ड, फेरफटका आणी केदार जाधव.........ह्यांच्या पोस्ट्ला द्यायला नेगेटिव्ह मार्किंग सिस्टम का नाहीए ईथे ????????? उगाच कायच्या काय पोस्ट टाकत आहेत.
मागील काही पानांवर नंदिनी यांनीही असाच प्रमाद केलेला आहे.
( लोकहो मी प्रत्येक प्रतिसादाला +१ द्यायचं काम अजुनही इमानेईतबारे करत आहे....तपासुन पाहु शकता.)

BREAKING- रविंद्र जाडेजाचं भारतीय कसोटी संघात पुनरागमन, हरभजन सिंहला डच्चू

हे म्हणजे एखाद्या सिनेमात हृतिक रोशनच्या ऐवजी टायगर श्रॉफला घेण्यासारखे आहे.

धोनीला कल्पना होती की सामना जिंकायचा आहे तर आपल्यालाच पुढे उतरावे लागणार. कोहली आणि रहाणे काही जिंकून देणार नाहीत. त्याच्या दुर्दैवाने रैना खेळत नाहीये. म्हणून आला पुढे. >> धोनीशी बोललास का रे बाबा तू ह्याच्याबद्दल ? त्याला पण माहित असू दे हे. तो काहीतरी बरळतोय तिथे फ्लेक्सिबल ऑरडर, ५-६७ वर खेळण्याचा अनुभव वगैरे. (http://www.espncricinfo.com/india-v-south-africa-2015-16/content/story/9...) ते वाचून 'what is he smoking ?' असे वाटले तर इथे आल्यावर कारण कळले.

धोनीला सांगा रे 'If it ain't broke, don't fix it' ... Sad

तुम्ही बरळलात तरी तुमचा अंत आहे, तुम्ही शांत राहिलात तरी तो ठरलेलाच आहे. मग का नाही सत्य काय आहे याची जगाला कल्पना द्यावी.

ऋन्मेष, एक सहज शंका कधी चाटून गेली नसेल, तुमच्यासारख्या अ‍ॅनलिटीकल माईंड ला असं म्हणायचं धाडस म्या पामरात नाही, पण समोर की-बोर्ड आणी प्रतिक्रियेसाठी रिकामी जागा आहे म्हणून छापायचं धाडस करतो: धोनी चं ईतकं मन ओळखता तुम्ही, तर कधी असाही एक विचार विरंगुळा म्हणून करून पहा की त्याची कुवतच कमी आहे. मधुघट रिते झाले आहेत.

रॉबिनहूड, त्या रहाणेला बिचार्याला एक जागा घेऊन खेळू तर द्या आधी. मग ठरवता येईल की त्याला काय जमतं आणी काय नाही.

जेम्स बॉण्ड, तुमचं खरं आहे. मी मधे बराच वेळ गप्प राहीलो होतो, पण केदार, असामी, फारएण्ड, नंदिनी वगैरे लोक्स खरच खूप कष्ट घेऊन चांगले मुद्दे मांडत होते आणी त्या प्रत्येक चांगल्या बॉल ला अंधाधुंद फिरवलेल्या बॅटच्या एजेस जात होत्या, म्हणून मग परत एक बॉलिंग चेंज करावासा वाटला.

तुम्ही बरळलात तरी तुमचा अंत आहे, तुम्ही शांत राहिलात तरी तो ठरलेलाच आहे. मग का नाही सत्य काय आहे याची जगाला कल्पना द्यावी. >> अरे कोणी सत्य मांडलय ? धोनी काहीतरी वेगळेच बोलतोय. no reference to conspiracy theory that you suggest.

थोड्या वेळापूरते धरून चालू कि कोहली ची हि चाल आहे वगैरे वगैरे, मग आत्ता सांग
१. धोनी ला जर कोहली त्याच्या विरुद्ध चाली रचतोय असे वाटत असेल तर तो त्याला ह्या चेस मधे नं. ३ वर का पाठवेल ? तेही राहाणे आधीच्या दोन मॅचमधे त्या नंबरवर खेळून चांगला खेळला असताना. रोहोतच्या फॉर्ममधे राहाणे सहज खपून जात होता. परत नं. ४ वर कोहली फेल जात होता हे धोनीच्या पत्थ्यावर पडणार.
२. गेले सहा-सात महिने अजिंक्य राहाणेला soft ball वर strike rotate करता येत नाही असे सांगतोय तेंव्हा मग अशा वेळी तो ह्या सामन्यामधे त्याला पाचव्या किंवा सहाव्या आकड्यासाठी का ठेवेल ? तेही कोहली नि स्वतःच्या पाठी ?
३. रैना धोनीचा पित्त्या आहे असे धरून, रैना नि धोनी मधे पहिल्या बॉलपासून अंदाधुंद फिरवाफिरवी धोनी जास्ती effectively करू शकतो हे उघड असताना नि रैनाला थोडे बॉल सेट व्ह्यायला मिळाले कि तो अधिक प्रभावी ठरतोय नि विशेषतः ह्या सिरीजमधे (IPL included) तो विशेष फॉर्म मधे नाहिये हे दिसत असताना त्याला क्र. चार वर स्वतःच्या पुढे ढकलले नसते का धोनीने ? (इम्रान ताहिर पण निष्प्रभ ठरला असता रैनापुढे. left right combo मिळाला असता हा भाग वेगळा)

धोनीचा गेम प्लॅन नेहमी सुरूवातीला strike rotate करून blast करायचा हे काही नवीन नाहिये नि कालच्या सामन्यामधेही तेच करायचा प्रयत्न करणार हे लक्षात घेऊन आफ्रिकेने perfect गोलंदाजी करत (holding on Morkel for ending overs was brilliant) आपल्यावर strategically मात केली हे सरळ सरळ मान्य करायला कमीपणा कशाला वाटून घ्यायचा ? त्यात उगाच conspiracy theory कशाला शोधायच्या ?

त्याची कुवतच कमी आहे. मधुघट रिते झाले आहेत.
>>>
कुवतच कमी आहे? हे तर नक्कीच नाही, हे आपणही मान्य कराल.
पण आता तो संपला आहे असे म्हणत असाल तर येस्स, यावर चर्चा होऊ शकेल.
माझ्यामते नक्कीच नाही. किमान २-३ वर्षे तो सहज खेळू शकतो.
नुकतेच गेल्याच्या गेल्या सामन्यातील त्याची बिकट परिस्थितीत वन मॅन शो दाखवत केलेली ८६ चेंडूत ९२ धावांची विजयी खेळी पाहता आणखी काही बोलायची गरजही नाही.
तरीही आपल्याला शंका असल्यास त्याची जागा घेऊ शकेल असा विकेटकीपर दाखवा आणि हजार रुपये मिळवा.
गंमत अशी झालीय की मिडीयामध्ये तो संपलाय अश्या वावड्या सोयीस्कररीत्या उडवायला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला तो एखादी इनिंग फेल जाताच अरे हा रे खर्रंच की असे वाटायला लागले आहे. Happy

आफ्रिकेने perfect गोलंदाजी करत (holding on Morkel for ending overs was brilliant) आपल्यावर strategically मात केली हे सरळ सरळ मान्य करायला कमीपणा कशाला वाटून घ्यायचा ? त्यात उगाच conspiracy theory कशाला शोधायच्या ?
>>>>
अहो असामी, हा धागा जून महिन्यातील आहे आणि माझी थिअरी त्या आधीपासूनची. जेव्हा मला शंका आली किंवा जेव्हा माझ्या डोक्यात हा किडा वळवळला तेव्हापासून मी सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेउन आहे. तर मी काही आपला पराभव मान्य करण्यात कमीपणा म्हणून हे असले काही शोधत नाहीये. यापेक्षा लाजिरवाणा पराभव आपण बांग्लादेशशी झेलला आहेच की.
त्या बांग्लादेश दौर्यातही शेवटच्या सामन्यात धोनीलाच चौथ्या क्रमांकावर येऊन स्कोअर टाकावा लागलेला. अन्यथा शर्मा आणि धवन जिथे व्यवस्थित खेळत होते तिथे कोहली ने येऊन धावांचा वेग मंदावेल याची काळजी घेतलेली.

अर्थात आता कोहलीवर शंका उठू लागल्या आहेत. इथे मीच नाही तर त्या दिवशी न्यूज चॅनेलवर एक शो सुद्धा पाहिला होता. ज्यात कसोटीमध्ये फॉर्मला असणारा, शतके ठोकणारा कोहली अचानक एकदिवसीय ज्यात तो मास्टर आहे तिथे कसा परफॉर्म ढासळतोय. मात्र एकदिवसीयमध्ये कोहली संपलाय असे न म्हणता आपण धोनीला संपवायला निघालो आहोत Happy

जेव्हा मला शंका आली किंवा जेव्हा माझ्या डोक्यात हा किडा वळवळला तेव्हापासून मी सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेउन आहे. तर मी काही आपला पराभव मान्य करण्यात कमीपणा म्हणून हे असले काही शोधत नाहीये >> तू नक्की कशासाठी करतोयस मग ? नशिब स्वतःचा मान्य केलस कि हा किडा तुझा तूच शोधला आहेस.

इथे मीच नाही तर त्या दिवशी न्यूज चॅनेलवर एक शो सुद्धा पाहिला होता. >> आणी हा तुझा source of truth का ? Lol

मात्र एकदिवसीयमध्ये कोहली संपलाय असे न म्हणता आपण धोनीला संपवायला निघालो आहोत >> ह्याहून शुद्ध मूर्खपणाचे विधान नसेल. दोघेही form मधे नाहित असे धरलस तरी दोघांचे वय बघता future investment म्हणून कोणावर पैसे लावाल ?

धोनीला शंका असेल कोहलीच्या commitment वर तर त्याला सरळ drop करावे. संदीप पाटील ने आजच सांगितले आहे कि final team composition हा कप्तानाचा निर्णय आहे. कोणी अडवलय का ? किडे तुमच्या मनात आहेत फक्त एव्हढेच.

नशिब स्वतःचा मान्य केलस कि हा किडा तुझा तूच शोधला आहेस.
>>>
नशीब काय यात Uhoh
उलट मला निरीक्षण कम दूर द्रुष्टीचा अभिमान आहे Happy
.

आणी हा तुझा source of truth का ? >>>
नक्कीच नाही. उलट मी न्यूजच्या रिपोर्टरच्याही एक पाऊल पुढे आहे हे यातून मला सुचवायचे होते.
.

दोघेही form मधे नाहित असे धरलस तरी दोघांचे वय बघता future investment म्हणून कोणावर पैसे लावाल ?
>>>
ईंटरेस्टींग. हा काही आयपीएलचा करार नाही की युवा खेळाडू हातचा सोडला तर लगेच त्याला दुसरा संघ घेईल आणि तो आपल्याला मिळणार नाही. जो आज सरस तो आज सरस. जो नाही त्याचा पर्याय उद्याही उपलब्ध असणारच.
.

धोनीला शंका असेल कोहलीच्या commitment वर तर त्याला सरळ drop करावे. संदीप पाटील ने आजच सांगितले आहे कि final team composition हा कप्तानाचा निर्णय आहे. कोणी अडवलय का ?
>>>
खरेच तुम्हाला असे वाटते की आपला देश, आपली बीसीसीआय, आपली निवड समिती, आपली एकंदरीतच सिस्टीम एवढी आदर्श आणि पारदर्शक आहे Happy
पण यावरून शास्त्रीबुवा नक्की काय म्हणून आहेत संघात यावर एक गहन चर्चा होऊ शकेल. अर्थात जे दिसते तसे नसते, म्हणून तर जग फसते Happy

मित्रा.... तुझा धोनीपण तुझ्यासारखाच बरळायला लागलाय काहीही
पूर्ण कारकीर्द सेंसीबल वागून बोलून आताश्या असा हा काय बडबड करायला लागलाय?

मित्रा.... तुझा धोनीपण तुझ्यासारखाच बरळायला लागलाय काहीही
पूर्ण कारकीर्द सेंसीबल वागून बोलून आताश्या असा हा काय बडबड करायला लागलाय?

आणि अशा तर्‍हेने आणखी एक टुकार व्यक्ती (धोनी) वरचा टुकार धागा अनेक शतकी मजल मारुन सफल झालेला आहे.

"त्याची जागा घेऊ शकेल असा विकेटकीपर दाखवा आणि हजार रुपये मिळवा" - ह्या विधानाची पुष्टी (म्हणजे १००० रू. नाही, 'त्याची जागा घेणारा विकेटकीपर दाखवा' पार्ट) करण्यासाठी काही बेसीस च नाहीये. धोनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत नसल्यामुळे, तिथे तुलना करता येणार नाही आणी दुसरा कुठला विकेटकीपर भारतासाठी धोनी च्या parallel एक significant amount of time साठी खेळला नसल्यामुळे ती देखील तुलना होऊ शकत नाही.

एवढी आदर्श आणि पारदर्शक आहे >> तू मुद्द्याशी संबंध नसलेले काहितरी घुसडतो आहेस. तुझा मुद्दा हा कि कोहली जाणून बुजून स्लो खेळून सामना हरण्याचा प्रयत्न करतोय धोनीला कमीपणा आणण्यासाठी (जेणे करून तो निव्रुत्त होईल). मूळात जो कोणी थोडेबहुत क्रिकेट बघतो त्याला कोहलीच्या देहबोलीवरून हे सहज जाणवेल कि तो क्रिकेट बद्दल passionate खेळाडू आहे. जरी त्याला कप्तान व्ह्यायचे असेल तरी तो अशा मार्गाने करणे अशक्य आहे. मूळात धोनी १-२ वर्षांच्या पुढे नसेल हे माहित असताना कोहली उगाच असे काही करून स्वतःच्या पायावर धोंडा कशाला मारून घेईल असा विचार कर. ह्याउप्परही तो असे करत असेलच तर धोनी त्याला बाहेर काढू शकतो. आणि तेही जमत नसेल तर बाणेदारपणा दाखवून स्वतः कप्तानपद सोडू शकतो. हा शेवटचा पर्याय तर कुठल्याही राजकारणापलीकडचा असून फक्त धोनीच्या हातातला निर्णय आहे. तो का असे करत नाहिये ?

उलट मी न्यूजच्या रिपोर्टरच्याही एक पाऊल पुढे आहे हे यातून मला सुचवायचे होते >> तुझा source of truth काय तर तुझ्या डोक्यातला किडा ? Wink

आता माझा तुला प्रश्न हा आहे कि तू सरासपणे इतरांच्या commitment बद्दल कसलाही काडिचाही पुरावा नसताना नेहमी शंका घेत असतोस ह्याबद्दल काही विचार केला आहेस का ? ते काय जाब विचारायला येणार नाही ह्यामूळे बिनधास्त जे सुचेल ते बोलून मोकळा होतोस ?

फेरफटका,
धोनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत नसल्यामुळे, तिथे तुलना करता येणार नाही आणी दुसरा कुठला विकेटकीपर भारतासाठी धोनी च्या parallel एक significant amount of time साठी खेळला नसल्यामुळे ती देखील तुलना होऊ शकत नाही.
>>>>>>>>
आयपीएल आहे की Happy
तिथे करूया तुलना, सांगा धोनीपेक्षा सरस विकेटकीपर फलंदाज ... त्याउपर धोनीची कप्तानी बोनस Happy

असामी,
जरी त्याला कप्तान व्ह्यायचे असेल तरी तो अशा मार्गाने करणे अशक्य आहे.
>>>>>
हे देखील आपले त्याच्याबद्दलचे एक मतच झाले. अन्यथा अशक्य असे ठामपणे कोणी कोणाबद्दल नाही सांगू शकत.

मूळात धोनी १-२ वर्षांच्या पुढे नसेल हे माहित असताना कोहली उगाच असे काही करून स्वतःच्या पायावर धोंडा कशाला मारून घेईल असा विचार कर.
>>>>
१-२ वर्षेची २-३ वर्षेही होतील आणि हा खूप मोठा काळ झाला. कप्तानी म्हणजे एक वेगळेच पद आहे. दिर्घकाळ भारताची कप्तानी करणारा खेळाडू आयकॉन म्हणूनच गणला जातो. त्यामुळे ज्याला ते पद प्राप्त करणे शक्य आहे त्याला मोह होणार नाही हे कठीणच.
राहिला प्रश्न कोहलीला तो मोह झाला असेल का? तर तुमच्यामते अशक्य, माझ्यामते शक्य Happy

तुझा source of truth काय तर तुझ्या डोक्यातला किडा ?
>>>>
सोर्स ऑफ ट्रुथ हा शब्द आपलाच. माझे तर एवढे ईंग्लिशही चांगले नाहीये Wink
पण येस्स किडा माझ्याच डोक्यातील जो ईतरांच्या डोक्यात सोडतोय. कोहलीबद्दल आकस ठेऊन नाही तर धोनीबद्दल सहानुभुती ठेऊन. माझ्यामते हे सर्वात जास्त महत्वाचे.

आता माझा तुला प्रश्न हा आहे कि तू सरासपणे इतरांच्या commitment बद्दल कसलाही काडिचाही पुरावा नसताना नेहमी शंका घेत असतोस ह्याबद्दल काही विचार केला आहेस का ? ते काय जाब विचारायला येणार नाही ह्यामूळे बिनधास्त जे सुचेल ते बोलून मोकळा होतोस ?
>>>
नाही. तसे नाही. मी जे बोलतो त्याची जबाबदारी घ्यायची तयारी ठेऊनच बोलतो. काडीचाही पुरावा नाही असे नाही, प्रसंगजन्य कि परिस्थितीजन्य पुरावे म्हणतात ते मी मांडले आहेत. त्यांच्या आधारावर शंका उपस्थित करतोय. ज्यांना ते नाही पटणार त्यांनी मला वेड्यात काढले तरी हरकत नाही Happy

IPL हे करमणुकीचं साधन आहे ऋन्मेष. क्रिकेटींग स्किल्स चे निष्कर्ष नाहीत. तिथे चमकलेल्या खेळाडूंचा संघ निवडण्याची एकदा केलेली चुक पुन्हा निवडसमितीने देखील नाही केली. तसं असतं तर आज कदाचित पॉल वाल्टाथी भारताचा ओपनर असता.

तसंही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगतो. IPL च्या निष्कर्षाप्रमाणे, रॉबिन उथप्पा, पार्थिव पटेल ह्या दोघांचेही स्ट्राईक रेट्स (२०१५) धोनीपेक्षा जास्त आहेत आणी उथप्पा आणी धोनी च्या अ‍ॅव्हरेज मधेसुद्धा फारसं अंतर नाही. हे स्टॅट्स फसवे आहेत हे आपण सगळेच मान्य करू.

(२०१५)
>>
म्हणजेच ते क्लास इज पर्मनंट आणि फॉर्म इज टेंपररी की काहीसे.
कदाचित म्हणूनच हे खेळाडू कधी या संघात तर कधी त्या संघात दिसतात पण धोनीसारख्याला सोडायचा विचारही कोणी संघमालक करू शकत नाही.
जरी आयपीएल करमणुकीचे साधन असले तरी खेळले जाते क्रिकेटच, आणि ते देखील तितक्याच चुरशीने. जरी त्यातून संघ निवडला जात नसला तरी उपयुक्त खेळाडूला जास्त पैसे मिळतातच.

असो, तसेही मी ते एक सेम प्लॅटफॉर्म म्हणून सांगितलेले, मलाही धोनीची महानता आयपीएलसारख्या प्रकारातून दाखवणे आवडणार नाही, भले तो जसा भारताचा यशस्वी कर्णधार आहे तसाच आयपीएलचाही का असेना ..
पण धोनीला अगदी आजही लिमिटेड ओवर फॉर्मेटमध्ये रिप्लेसमेंट नाही हेच खरे .. किंबहुना एक सहज भरून न येणारी पोकळी तयार होईल संघात

बाणेदारपणा दाखवून स्वतः कप्तानपद सोडू शकतो. हा शेवटचा पर्याय तर कुठल्याही राजकारणापलीकडचा असून फक्त धोनीच्या हातातला निर्णय आहे. तो का असे करत नाहिये ? >>

कारण धोनी हा कधीही class batsman म्हणुन नव्हता. तो एक ऊत्तम विकेटकीपर "होता" आणि ऊत्तम कॅप्टन सुद्धा (होता?). जर धोनी चा खेळ बारकाईने बघितला असेल तर त्याच्या कॅचिंग आणि डाईव्हिंग अ‍ॅबिलिटी मधे खुपच कमतरता आली आहे. त्यामुळे जर त्याने कप्तानपद सोडले तर टीम मधे कुठल्या बेसीस वर राहिल?

आणि काही महत्त्वाचे प्रश्न :
१. धोनी अत्यंत चांगला कप्तान आहे. तर मग तो स्वतः बनवलेली टीम का सांभाळु शकत नाहिये?

२. धोनी ईतकाच जर चांगला फलंदाज आहे तर ईतरांनी सामना जिंकुन द्यायची वाट का बघतो? तो स्वतः आणि त्याचे पित्तू (रैना, धवन, अश्विन, इ.) सामना का जिंकु शकत नाही?

३. कोहली सोबत अजुन कोण खेळाडू आहेत जे धोनी विरुद्ध कारस्थान करत आहेत?

---
कानडा

< Sarcasm mode on >
आज कोहली ने धोनीच्या साथीने, धोनीचा खरा गेम केला. स्वतः शतक केलेच आणि धोनीलाही पटवले कि रन-अ-बॉल पेक्षा जास्त रन करु नको म्हणुन. अगदी शेवटच्या २ शटकातही. आज मला माझ्याच वर विचारलेल्या प्रश्न क्र. ३ चे ऊत्तर समजले.
< Sarcasm mode on >

Sanshay yeu naye mhanun tyaala madhun madhun ase khelavech laagte. Arthaat ase kele tari chaanaksh najretun to kasa sutnaar? Proud

३२० स्कोर झाला असता जर धोनी "फिनिशर" सारखा खेळला असता. परंतू तो "फिनिश" सारखा खेळला ३०० देखील झाले नाही.

असामी,

तुम्हाला (देव न करो पण) उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला तरी हा धागा चालूच ठेवण्याइतके वादकौशल्य ऋन्मेष ह्यांच्याकडे आहे.

मला गेल्या काही दिवसांत ह्या धाग्यामुळे (आणि आधीच्या क्रिकेटवरील काही धाग्यांमुळे) काही शिकता आले असेल तर ते असे:

१. स्टॅटिस्टिक्स नेमके काही सिद्ध करत नाहीत हे माझे आवडते मत (माझ्यापुरते तरी) पुन्हा सिद्ध झाले.
२. क्रिकेटमधील कोणताही परफॉर्मन्स 'ज्याला जसा हवा तसा' गणला जाऊ शकतो. एक धाव महान ठरू शकते आणि एक अख्खी कारकीर्दही कुचकामी ठरू शकते.
३. एखाद्याच्या खेळावर परिणाम करणारे इतके अनंत घटक प्रत्येकवेळी अस्तित्त्वात असतात की स्वतःचा दृष्टिकोन सिद्ध करायला कारणांची आणि दाखल्यांची कमतरता भासतच नाही.
४. स्वतःचे काहीही नुकसान न होता ह्या विषयावर कितीही वाद घातला जाऊ शकतो व त्यामागे बहुतेकवेळा असलेले कारण वैयक्तीक आवड हे असू शकते. (जसे माझाच पहिला मुद्दा :फिदी:)

अक्षरशः पूर्ण विरोधी मतांशी काही काही प्रमाणात सहमत व्हावे असे वाटावे अश्या प्रकारचा हा विषय झालेला आहे. सचिन तेंडुलकरबद्दल पगारेंच्या म्हणण्यातही थोडेसे तथ्य वाटते. कोहली कसा वागू शकेल ह्याचा भरवसा नाही हे ऋन्मेष ह्यांचे म्हणणेही क्षणभर पटू शकते. धोनी कधीच ग्रेट नव्हता हे बाळाजीपंतांचे मत धोनीचा आजकालचा खेळ बघून खरंच विचारात घ्यावे की काय असे वाटू लागते. तेंडुलकरची कारकीर्द वजा केली तर गेल्या दोन दशकात भारतीय क्रिकेटमध्ये राहिलेच काय असेही वाटते. कोहलीची कारकीर्द वजा केली तर रन चेसिंगचा कसा बोर्‍या वाजला असता ते आठवते. धोनी नसता तर कित्येक मॅचेसमध्ये आपण नांगी टाकली असती हेही जाणवते.

असो!

आज कोहली ने खरच गेम केला धोनी चा सेंच्यूरी मारून (न्यूज चॅनेल वर आलं असेलच म्हणा). धोनी (१ बॉल ४, १५ बॉल्स, १६) ने पराक्रमाची शर्थ करून तो 'महान' फलंदाज असल्याचा पुनःप्रत्यय दिला आणी शेवटच्या ५ षटकात आपल्या whopping २२ धावा झाल्या. Wink

आता एक सिरियस प्रश्नः धवन ची टीम मधे नक्की कुठल्या कामावर नेमणुक झाली आहे? त्याच्या जागी रहाणे नी ओपनिंग केलं आणी खाली रायडू / गुरुक्रित वगैरे खेळला तर अजुन किती नुकसान होऊ शकेल?

>>>त्याच्या जागी रहाणे नी ओपनिंग केलं आणी खाली रायडू / गुरुक्रित वगैरे खेळला तर अजुन किती नुकसान होऊ शकेल?<<<

रहाणेला तिथे नेले तर 'होम मिनिस्टर'मध्ये बांदेकर कोणाला आणणार?

खरा प्रॉब्लेम हा आहे.

झी मराठीच्या होम मिनिस्टरमध्ये आज अजिंक्य रहाणेचा दसरा स्पेशल एपिसोड होता.

तुम्हाला (देव न करो पण) उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला तरी हा धागा चालूच ठेवण्याइतके वादकौशल्य ऋन्मेष ह्यांच्याकडे आहे. >> Happy

ऋन्मेष आज असे म्हणतील असे मला वाटते "कोहली ने अजून थोडे अधिक रन्स काढले असते तर ३०० च्या वर जाऊन अजून सोपी मॅच झाली असती. १०० काढल्यानंतर अजून थोडे रन्स तेसुद्धा अधिक वेगात काढणे शक्य आहे पण तसे केले नाही. ह्याउलट स्लॉग ओव्हर्समधे आलेल्या धोनीवर ती जबाबदारी ढकलून त्याचा गेम केला. परत शतक मारल्यामूळे त्याचा कप्तानपदाच्या दिशेने होणारा प्रवास नक्की सुरळीत झाला आहे."

आता एक सिरियस प्रश्नः धवन ची टीम मधे नक्की कुठल्या कामावर नेमणुक झाली आहे? त्याच्या जागी रहाणे नी ओपनिंग केलं आणी खाली रायडू / गुरुक्रित वगैरे खेळला तर अजुन किती नुकसान होऊ शकेल? >>+१ हाच प्रश्न मी रैना बद्दल पण विचारतो आहे. रैनाला आजकाल बॉलिंग पण फार कमी करायला लावतात. He is pretty handy on sub continent pitches. पुढच्या मॅचमधे ओझा बघायला आवडेल.

"हाच प्रश्न मी रैना बद्दल पण विचारतो आहे." - Happy मी हे लिहीलेलं काढून टाकलं. अगदी आजच त्याने हाफ सेंच्यूरी मारल्यामुळे गदारोळ उठेल म्हणून. रैना १० वर्षं खेळून अजुन नवोदितच वाटतो. रैना आहे ना, मग जिंकु असा कॉन्फिडंस च नाही वाटत. तसंही, रैना ने इंपॅक्ट केलेल्या अशा मॅचेस फार थोड्या आठवतात गेल्या १० वर्षात.

हो आज खेळला खरा तो पण गेले काहिमहिने थेट world cup पासून चाचपडायला सुरूवात झालीये त्याची. IPL मधे खेळला नाही हि माझ्यासाठी warning sign होती.

मस्त राज! मध्यंतरी बरीच फिरत होती. सचिन नंतर बराच कॅमेरा फ्रेण्डली व बोलायलाही 'तयार' झाला.

टॉम ऑल्टर सुद्धा बराच यंग दिसतो.

सहि क्लिप आहे ती. सचिन कटिंग मारतोय, कदाचित नुकताच वडापाव सुद्धा ढकललेला असेल...

त्याची वेस्टइंडिज पेस बोलरना फेस करायची कमेंट पण साॅलिड आहे - बाॅल कम्स स्ट्रेट टु बॅट... Happy

@ कोहली विरुद्ध धोनी,

तर कालची कोहलीची खेळी माझ्यासाठी अनपेक्षित वगैरे मुळीच नव्हती. त्यामुळे अरे आज माझा अंदाज कसा चुकला असे जराही झाले नाही.

जेव्हा एखादा मोठा गेम खेळला जातो तेव्हा छोटा विचार करून चालत नाही.
तसेच मासा गळाला लावताना गळ हातचा गमावून चालत नाही.

धोनीसंदर्भात पुरेसे डॅमेज झाले आहे. त्याची क्रिकेटरसिकांमधील इमेज डामाडौल करण्यात संबंधितांना यश मिळाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दोन सामने आधी धोनीने बिकट परिस्थितीत येऊन तुलनेत फलंदाजीस कठीण असलेल्या खेळपट्टीवर 86 चेंडूत 92 धावा मारलेल्या खेळीचा लोकांना सहज विसर पडून त्याला आज फटकेबाजी जमली नाही यावर लोक हिरीरीने चर्चा करू लागले आहेत.
मग अधमरे को और मारने से अच्छा आता स्वताचीही इमेज बिल्डींग का करू नये. अर्थात आपण आधीची ती धोनीच्या खेळीवाली मॅच जिंकलो होतो तिथेही कोहलीने काही अफलातून झेल पकडत हेच केले होते.
शेवटी कोहलीला कर्णधारपद सुद्धा नाव खराब न करता मानानेच घ्यायचे आहे.

अजून एखादी मालिका धोनीची आणि त्याची स्वताहून निवृत्तीची घोषणा यासाठी तयार राहा.

नक्कीच येथील जाणकार मंडळींचे क्रिकेट संदर्भातील ज्ञान वादातीत आहे,
पण क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या पलीकडील गोष्टीही घडत असतात Happy

ऋन्मेऽऽष ,

तुस्सी ग्रेट हो Happy

स्वतः धोनी पण म्हणत असेल की हल्ली माझे रिफ्लेक्सेस स्लो झालेत आणि त्यामुळे मी फास्ट बोलरना मोठे फटके मारू शकत नाही . पण तू अन माझ चुकल म्हणण ...

रच्याकने , राजापेक्षा राजनिष्ठ म्हणजे हेच का ?

पण क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या पलीकडील गोष्टीही घडत असतात >

एकदम करेक्ट. धोनी केव्हाच संपला होता. तो फक्त श्रीनिवासनच्या कृपेने टिकलाय. श्रीनिवासनची कृपा आटली आहे आता या बिनकामाच्या धोनीची फुटण्याची वेळ झाली.

Dhoni.jpg

धोनीने मॅच संपल्यानंतर कोहलीचे कौतुक केलेच पण त्याचबरोबर रैनाचे अगदी तोंडभरुन कौतुक केले आणि ५ आणि अधिकच्या सरासरीने धावा दिलेल्या स्पिनर्सचेही पुरेपुर कौतुक करुन हा विजय सांघिक होता हे ठसवण्याचा प्रयत्न केला

राजापेक्षा राजनिष्ठ म्हणजे हेच का ?
>>>
नाही, मी धोनीचा फार मोठा चाहता वगैरे नाहीये. हितचिंतक म्हणू शकता.
तसेच सचिनच्या शतकाजवळ संथ होण्यावर टिप्पणी केली तरी मी सचिनचा नक्कीच चाहता आहे.
आणखी ऐका. माझ्यामते मॉडर्न क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहली आहे, मात्र त्याच्या क्रिकेटपलीकडील गुणांचे(!) मला कधीही कौतुक नाहीये.

शेवटी कोहलीला कर्णधारपद सुद्धा नाव खराब न करता मानानेच घ्यायचे आहे. >> तुला जर हे कळत असेल तर धोनी तसाही बाहेरच्या मार्गाला लागला आहे नि कोहलीला अनायासे जे मिळणार आहे ते मिळवायला तो धोनीचा गेम कशाला करायला जाईल ही साधी गोष्ट तुला कळत नाही ह्यावरून काय निष्कर्ष काढायचा ?

बाॅल कम्स स्ट्रेट टु बॅट. >> Happy सचिनच हे असे बोलू शकतो.

धोनीनंतर कोहलीला कर्णधार करणे हे नेम धरून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारणे आहे. मी तर म्हणतो रैनालाच कर्णधार करावा. त्यानिमित्ताने तो संघात राहीलही आणि वजनही कमी होईल जरा बिचार्‍याचे!

तर धोनी तसाही बाहेरच्या मार्गाला लागला आहे
>>>>
तसाही नाही हो, लावला आहे त्याला. हवा केली गेलीय रीतसर. बांग्लादेश बरोबर त्याला पराभव स्विकारायला लावलेय. त्यातही गेल्या वर्षभरात जे सकारात्मक घडलेय त्याला फारशी प्रसिद्धी न देता नकारात्मक गोष्टींचे भांडवल केले गेलेय. एकदा मारून चार मोजलेय.

म्हणून तर वर म्हणालो की पुरेसे डॅमेज झाले असल्याने कालचा चमत्कार दिसणे कागदावर होतेच Happy

श्रीनिवासन नसता, तर धोनी ४-०, ४-० अशा दोन तुफान पराभवांनंतरच गेला असता. त्यावेळी निवडसमितीने देखील त्याला काढायचा (कप्तानपदावरून तरी) निर्णय घेतला होता. पण श्रीनिवासन नी तो निर्णय veto केला ('selection committee needs to select the team and not to worry about the captain') असं वाचलय (बहुदा सुनंदन लेले किंवा संझगिरी). आणी तसंही ईतक्या दारुण पराभवांनंतर कुठ्ल्याही कॅप्टन ची कॅप्टन्सी टिकल्याचं उदाहरण मला तरी आठवत नाही. धोनी (ईंडिया सिमेंट्स मधे व्हाईस प्रेसिडेंट) सीएसके चा आयकॉन खेळाडू नसता तर खरच टिकला असता का हा प्रश्न आहे. तसंही रैना, जडेजा मंडळी Rhiti Sports चं representation नसताना ईतकी खेळली असती का हा देखील प्रश्न आहेच.

ऋन्मेष, तुमच्या पोस्ट्स वाचुन आणी रिव्हर्स लॉजिक बघून, पु. लंच्या बटाट्याची चाळ मधल्या 'दिब्रुगड धोक्यात आहे असं आमचा बातमीदार म्हणतो हे वाक्य सुद्धा वर्तमानपत्र वाल्यांनी आण्णांच्या डायरीतून जसंच्या तसं छापलं होतं' ची आठवण झाली.

Pages