महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2015 - 17:02

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.

ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..

खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.

रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.

योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.

पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!

विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.

पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.

एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्‍यानंतर दाट झाल्या असतील.

बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.

आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.

मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?

आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.

कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."

उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.

थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.

याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?

जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.

एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.

.........

यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिनची प्रतिभा, महानता वगैरेचा यथोचित आदर ठेवूनही म्हणावेसे वाटते की जिगरबाज खेळ आणि तेंडुलकर ह्यांचे कधी विशेष जमले नाही. जे आजकालच्या खेळाडूंचे (कसे कोण जाणे) जमताना दिसते.

धोनी कधीच ग्रेट नव्हता. पण तो सामान्यही नव्हता.

>>>

बेफिकीर,
मला ही तुमची विधाने खोडायची नाहीयेत, पण यावरून एक गंमतीशीर विचार मनात आला तो असा की , जर धोनी, सचिन सारख्या लिजंडमध्ये देखील आपण क्रिकेटरसिक काहीतरी खोट काढू शकतो तर ... तर .. श्या मला नेमके काय बोलावे ते सुचत नाहीये, थोड्यावेळाने सुचले की लिहितो..

"अरे सचिनवर वाद कश्याला, मात्र सचिनने कारकिर्द चान्स आणि विश्रांती घेत लांबवली ते पूर्वपुण्याईवर हे मात्र खरेच आहे " ह्या वाक्यांनंतर पुढची वाक्ये "पण येस्स सचिन जोपर्यंत खेळत होता, त्याची जागा पहिल्या सहा फलंदाजात नक्कीच बनत होती, त्यामुळे तो कोणाची जागा अडवून होता असेही म्हणता येणार नाही.
याउपर त्याच्या अनुभवाचा फायदाही होताच, सारे सिनिअर पटापट गेल्यावर तोच शिल्लक होता." ही अशी लिहिणे तुलाच जमते रे Wink

जिंकणार्‍याकडून टाळ्या वाजवणाराही आहे. विश्वचषक जिंकणे ह्यात युवराजच्या अनेक खेळ्या आणि फायनलच्या सामन्यात गंभीरच्य धावा अत्यंत महत्त्वाच्या होत्या. तसेच, तेंडुलकरांनी विशेष काही न करणेही पथ्यावर पडलेले होते.>> सचिन खेळला त्या मॅचेस (मला आठवतात तशा) इंग्लंड, आफ्रिका, किंवा पाकिस्तान बरोबरची सेमी. त्यात त्याचे खेळणे विशेष नव्हते ? युवी नि गंभीर च्या खेळीला कमी लेखण्याचा हेतू नाही पण २०११ च्या world Cup मधे सचिनचा हातभार नव्हता हे भयंकर धाडसी विधान आहे.

जिगरबाज खेळ आणि तेंडुलकर ह्यांचे कधी विशेष जमले नाही. >> खरच ? बहुधा तुम्ही नि आम्ही वेगळा सचिन तेंडुलकर follow केला.

बेफि, सचिन ने अनेक जिगरबाज खेळ्या केलेल्या आहेत. अनेकदा केलेल्याही नसतील. पण आत्ताचे लोक त्यापेक्षा काही वेगळे जिगरबाज खेळत आहेत असे मला तरी अजून दिसलेले नाही. ओव्हरऑल बॅलन्स अजून फार काही भारी नाही. सचिन ची कारकीर्द इतकी मोठी आहे की कोणतेही स्टेटमेण्ट त्याच्याबद्दल केले तर ते चुकीचे ठरवणारे ३-४ दाखले सहज देता येतात.

सचिनचे वय झाले होते.त्याचा खेळ संपला होता.तो टिममध्ये असला किंवा नसला तरी संघाला फरक पडत नव्हता कारण त्याचे योगदान शुन्य असायचे.मात्र धोनित अजुन खेळ शिल्लक आहे. अजुन किमान दोन वर्षे तरी तो संघाला देउ शकतो. >>> आकस दिसतो तो हा. अनेकांना मधे बॅड पॅच येतो. सचिन काय किंवा धोनी काय यांचे टीम मधले स्थान इतके असते की त्यांना स्वतःला ते ठरवू द्यावे कधीपर्यंत खेळायचे ते. असा पॅच जवळजवळ सर्वच खेळाडूंचा आलेला आहे.

जिगरबाज खेळ आणि तेंडुलकर ह्यांचे कधी विशेष जमले नाही.

हे म्हणजे खुसखुशीत लेखन आणी फारेंड ह्यांचे कधी विशेष जमले नाही असे म्हणल्यासारखे झाले.

अनेकांना मधे बॅड पॅच येतो. >> हो हे खरेय, बॅड पॅच हा येतोच. यामागे साध सरळ शास्त्रीय फंडा आहे, तो जाऊद्या. पण जेव्हा हा बॅड पॅच पस्तिशीत येतो तेव्हा त्याला बॅड पॅच न म्हणता थेट खेळ संपलाच असे घोषित करायची घाई लागते.

सेहवागला आपण असाच उगाचच संपवला असे मला अजूनही वाटते.

असामी Happy
हो, ती वाक्ये कन्फ्यूजिंग आहेत खरी, थोडा विस्तार करतो. सचिनला पुर्वपुण्याईवर काय खेळायचे, काय नाही हे ठरवायचा अधिकार मिळाला. त्याच्यावर तो संपला संपला असा ओरडा झाला नाही, ज्याने केला तो करंटा ठरवला गेला. या वयात कारकिर्द खेचताना चाहत्यांचे पाठीशी उभे राहणे खूप गरजेचे असते. ते सचिनबाबत असे झाले की जगात कोणाबाबत होणे शक्य नाही.

बरेचदा सिनिअर खेळाडूंकडून असे अपेक्षित असते की जरी त्यांची जागा देशातील पहिल्या ६ फलंदाजांमध्ये बनत असली तरी आता त्यांनी थांबावे आणि नवीन खेळाडूंना संधी द्यावी. अर्थात ही अपेक्षा मलाही व्यक्तीशा पटत नाही, पण असते काही लोकांची. सचिनने तसे काही केले नाही. सचिनबाबत अशी अपेक्षाही ठेवणारे कमीच असतील. किंबहुना त्याने साठाव्या वर्षापर्यंत खेळत राहावे असेही त्याचे चाहते होते.

असो, मला आजही आयपीएलमध्ये सीमारेषेबाहेर सचिन मुंबई ईंडियन्सची निळी जर्सी घालून बसलेला दिसतो ते बघून आनंद मिळतो. या एका गोष्टीसाठी तरी आयपीएल बंद होऊ नये.

पोस्ट कुठे भावनिक होत सचिनकडे झुकली असेल तर क्षमस्व, विषय धोनीचा आहे.
सचिनशी तुलना करत त्याच्यावर अन्याय नको. धोनी हा भले फलंदाजीत गावठी तंत्राचा का असेना पण असामान्य प्रतिभेचा खेळाडू आहे.

जेव्हापासूनचे क्रिकेट मला समजते त्यावरून एक सांगू इच्छितो,
भारतीय क्रिकेटमध्ये ५ क्रिकेटर असे झालेत ज्यांनी भारतीय क्रिकेटला घडवले, किंवा त्याचा चेहरा बदलला. त्यांना गेमचेंजर असेही म्हणू शकतो आपण.

१) सुनिल गावस्कर
२) कपिल देव
३) सचिन तेंडुलकर
४) सौरव गांगुली
५) महेंद्र सिंग धोनी

Happy Happy Happy

म्हणूनच माहीचा अस्त हा भा. क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त ठरेल.

सचिनशी तुलना करत त्याच्यावर अन्याय नको. > > हि तुलना कोणी सुरू केली त्यांना हे समजावून बघ. Happy

मी वर आधीच म्हटलेय कि धोनीचा रोल धोनीला निभावणे भाग आहे. तो इतरांसारखा खेळायला गेला तर त्याचा उपयोग नाही. त्याचे long term plans काय आहेत ते ठरवून त्याप्रमाणे आत्ताच replacement बद्दल पावले उचलायला हवीत, World Cup च्या सहा महिने आधी तसे करणे उपयोगी नाही.

"जिगरबाज खेळ आणि तेंडुलकर ह्यांचे कधी विशेष जमले नाही.", "तेंडुलकरांनी विशेष काही न करणेही पथ्यावर पडलेले होते" - हे (क्रिकेट च्या) देवा! ह्यांना क्षमा कर. हे काय म्हणताहेत, ते त्यांना कळत नाहीये. ;).

वर्ल्ड-कप मधे सचिन ची २ शतकं आणी २ अर्ध-शतकं आहेत.

जिगरबाज खेळ आणी सचिन हे समानार्थी शब्द आहेत.

विकु, कसचं कसचं Happy

१) सुनिल गावस्कर
२) कपिल देव
३) सचिन तेंडुलकर
४) सौरव गांगुली
५) महेंद्र सिंग धोनी >>> गेमचेंजर हे बहुधा बरोबर आहेत. धोनीलाही स्वतःला ठरवायचा अधिकार असायला हवा.

म्हणूनच माहीचा अस्त हा भा. क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त ठरेल. >>> सहमत आहे.

>>जिगरबाज खेळ आणि तेंडुलकर ह्यांचे कधी विशेष जमले नाही.<<

सहमत.

बॅटिंगला अगदि सुरुवातीला येऊन, इनिंग बिल्ड करुन, शेवटच्या ओवरपर्यंत क्रिजवर टिकुन, जिंकायला चार रन हव्या असताना, शेवट्च्या बॉलवर त्याने एकदाहि छक्का मारलेला नाहि.... Proud

बॅटिंगला अगदि सुरुवातीला येऊन, इनिंग बिल्ड करुन, शेवटच्या ओवरपर्यंत क्रिजवर टिकुन, जिंकायला चार रन हव्या असताना, शेवट्च्या बॉलवर त्याने एकदाहि छक्का मारलेला नाहि.... फिदीफिदी >> राज, असे म्हणु नका हो, तुमच्या sarcasm ला सिरिअसली घेऊन पुढे चर्चा सुरु करणारे महाभाग आहेत ईथे.

अरे कुठला विषय कुठे चाललाय ?

हे तर सर्वानाच मान्य असेल की धोनीचा खेळ टेक्नीक पेक्षा हँड आय को ऑर्डिनेशन अन रिफ्लेक्सेस वर जास्त अवलंबून होता अन वाढत्या वयाबरोबर ते कमी होत जाणारच . यात त्याची काही चूक नाही पण जे सत्य आहे ते आहेच ना . प्रश्न रन्सचा नाहीये , खेळताना (अन आजकाल बोलतानाही) त्याचा जो नो नॉनसेन्स अ‍ॅप्रोच होता , तो दिसत नाहीये Sad

आणि हे लोकं आता सचिनवर बोलत आहेत.

पगारे अन ऋन्मेश ह्यांच्या सचिन बद्दलच्या पोस्टना काही भाव द्यायची गरज नाही. खरे तर ऋन्मेश स्वतःच्याच पोस्ट मध्ये इतके कॉन्ट्रॅडिक्टरी लिहित असतो की बास !

महेन्द्र धोणी हा अत्यंत धोकादायक प्लेअर आहे. तो मोस्टली स्वतःच्याच खेळाडूंना रनआउट करतो. दोन धावा घेताना नाही तर जिथे एकही धाव नाही, तिथे स्ट्राईक घ्यायला जाताना. अगदी कालच्या मॅच मध्ये रोहित पण आउट झाला असता. नशिबाने त्यावेळी दोनदा बॉल स्टंम्प्स कडे फेकुनही कोणीच आउट झाले नाही.

धोणीने वनडेतून रिटायर व्हावे असे माझे म्हणणे नाही. पण तो आउट ऑफ फॉर्म आहे.गेले दोन वर्ष, किंबहूना २०१४ ची जानेवारी सोडली तर त्याने केवळ ५ फिफ्टी काढल्या आहेत आणि मोस्टली लवकर आउट झालेला आहे. शिवाय आधी लिहिल्यासारखे अनेकांना रन आउट केले आहे.

कु ऋ च्या भाषेत तो "पूर्वपुन्याईवर" टीम मध्ये टिकून आहे. हाय टाईम आहे की त्याने काहीतरी करावे. बघू आता आज महाराज काय करतात ते.

त्याला दरवेळी एक पिद्दू लागतो. आधी जडेजा होता. आता बिन्नी आहे.

मित , कठीण दिसतय . अर्थात गावसकरला माझ्या पे़क्षा जास्त कळत असणारच . Happy

पण तुलनाच करायची झाली तर फेडरर जितकी वर्ष जिंकत राहीला तितकी नदाल राहणार नाही , कारण त्याचा गेम ज्या स्ट्रेंग्थ्स वर बिल्ट आहे ,त्या वयानुसार कमी होत जाणारच ( अन हो , आय अ‍ॅम डाय हार्ड नदाल फॅन)

आजची टीम अनाकलनीयच आहे... मिश्रानी परवा बरी बोलिंग केली होती ना... त्याला बाहेर बसवून अक्षर पटेल ला घेतलाय..
बिन्नीच्या जागी मोहित शर्मा आणि अश्विनच्या जागी भज्जी.. हे अपेक्षित होते.. पण मिश्रा नक्की काय घोडं मारतो देव जाणे..

सचिन आणि धोनिची तुलना करणे हे धोनीवर अन्यायकारक ठरेल.धोनी हा अलौकिक प्रतिभा लाभलेला ग्रेट फिनिशर आहे. याउलट सचिन हा सुरवातीला यायचा चांगला खेळायचा मात्र शतक आले कि तो अतिसंथ खेळायचा.नंतर शतक झाले कि फटकेबाजि करण्याचा प्रयत्न करायचा नि आउट व्हायचा.सारी जबाबदारी ही नंतरच्या फलंदाजांवर पडायची.ते कसेबसे सामना जिंकुन द्यायचे नि सचिन हा शतक केल्याने मॅन ओफ द मॅच घेउन जायचा.मैदानावर राहुन सामना जिंकुन देण्याची सचिनची क्षमता नव्हती.

सचिनजी पगारेंच्या क्रिकेटमधीलच नाहीतर इतर ही अनेक गोष्टींमधील दिव्यज्ञानाबद्दल शंकाच नाही. मायबोलीवर एखाद्या धाग्यावर जर विषयाला धरून सुरळीत चर्चा होत असेल तर ती कशी भरकटवायची याबद्दल त्यांचे योगदान सुध्दा वादातीत आहे.

पगारे आम्हाला माहिती आहे, कॉंग्रेजने सचिनला खासदारकी नंतर भारतरत्न देऊन ही, त्यांने लोकसभा निवडणुकीत तुमच्या कॉंग्रेज पक्षाला कसलीही मदत केली नाही (निवडणुकीचा प्रचार वगैरे करण्याला) याचा तुम्हाला प्रचंड राग येतोय. तरिही राजकारणाच्या धाग्यावर करता तशी इथेही काहीही फेकाफेकी करु नका.:फिदी:

आणि हो "लवकर बरे व्हा", असे तुम्हाला सांगुन काहीच उपयोग नाही.

अहो प्रसाद खेळाचा धागा आहे त्यावर राजकारणाचा विषय कशाला.सचिनचा खेळ आवडणे कंपलसरी आहे का? मला तर तो नेहमिच सुमार वाटला त्याच्या तुलनेत धोनि सरस आहे. सचिन हा फक्त शतकविर आहे तर धोनी सर्वोत्तम फिनीशर.आणि ह्या धाग्यावर सचिनचा विषय येण्याचे कारण म्हणजे सचिनला एक न्याय नि धोनिला एक हे चुकीचे ठरेल.

सचिन आणि धोनिची तुलना करणे हे धोनीवर अन्यायकारक ठरेल.धोनी हा अलौकिक प्रतिभा लाभलेला ग्रेट फिनिशर आहे. याउलट सचिन हा सुरवातीला यायचा चांगला खेळायचा मात्र शतक आले कि तो अतिसंथ खेळायचा.नंतर शतक झाले कि फटकेबाजि करण्याचा प्रयत्न करायचा नि आउट व्हायचा.सारी जबाबदारी ही नंतरच्या फलंदाजांवर पडायची.ते कसेबसे सामना जिंकुन द्यायचे नि सचिन हा शतक केल्याने मॅन ओफ द मॅच घेउन जायचा.मैदानावर राहुन सामना जिंकुन देण्याची सचिनची क्षमता नव्हती. >>> पगारेंचा रवी शास्त्री व सचिन यात गोंधळ होतोय अशी मला शंका येत आहे Happy

पगारेन्ची सचीन तेन्डुलकर बद्दलची विधाने स्फोटक नाहीत............. हास्यस्फोटक आहेत.:फिदी:

चला मी माझ्याच वाक्याला +१ देते. पगारेन्च्या प्रत्येक पोस्टला ११११ मिळतात मग मला का नाही?

पगारे तुम्ही राजकारण आणी समाज यावरच बोला, क्रिकेट हा तुमचा आमचा विषय नाही. तुमच्या साठी नवा विषय देते. ड्रॅगनने ब्रम्हपुत्रा गिळन्कृत करायला घेतलीय याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे, मला बरेच काही म्हणायचे आहे, तेव्हा इथे नको आपण नवीन धागा काढुन तिथे बोलुया,.:स्मित:

फारएण्ड, शास्त्रि नि सचिन ह्यात माझा अजिबात गोंधळ होत नाहिये.शास्त्रिचा खेळ मी पाहिलेला नाही. सचिन हा सुमार खेळाडु होता त्याची क्षमता हि सामान्याहुन किंचित अधिक होती .शतक जवळ आले की तो अस्वस्थ असायचा बरेच चेंडु खायचा हे माझ्यामते स्वार्थिपणाचे लक्षण होते.तो कधीही शेवटपर्यत सामना जिंकुन देइपर्यत टिकायचा नाही हमखास दबावात विकेट फेकायचा.दबाव नसताना त्याचा खेळ बहरायचा मात्र दबावात तो काहीच कामाचा नव्हता.

चर्चा मुद्दामून भरकटवणार्‍या सचिन पगारे यांचा आयडी प्रशासकांनी तातडीने गोठवावा अशी मी त्यांना पुनश्च विनंती करत आहे.

मित यांना अनुमोदन. बाकी आजच्या सामन्यामध्ये धोनीने शेवटच्या चेंडूवर षटकार मारलाच आधीचे पाच चेंडू निर्धाव खेळून. Happy

सचिन ला जास्तित जास्त धावा त्याच्या खात्यात जमा करायची हाव होती त्या साठी बरेच चेंडु तो वाया घालवायचा व दुसर्‍या खेळांडुचा चान्स हुकायचा

टिम पेक्षा देशा पेक्षा वयक्तिक स्कोर त्याच्या नावावर करण्याची हाव होती त्याला

असे मी एका लेखा मध्ये वाचले होते खरे खोटे सचिन जाणे.

सचिन ला जास्तित जास्त धावा त्याच्या खात्यात जमा करायची हाव होती त्या साठी बरेच चेंडु तो वाया घालवायचा व दुसर्‍या खेळांडुचा चान्स हुकायचा
<<

सचिनच्या संपुर्ण कारकिर्दीत कोणत्याही फॉर्मटमध्ये तो किती चेंडु खेळला आणि त्यावर त्याने किती धावा बनवल्या यांची आकडेवारी देता का? म्हणजे कळेल तो किती चेंडु वाया घालवायचा ते.

तसेही आकडेवारी कश्याला म्हणतात हे तुम्हाला आणि सचिन पगारेंच्या गावीही नाही, तरिही इतकी फेकाफेकी करताय दोघेजण तर थोडी आकडेवारी पण दाखवा आम्हा अज्ञानी लोकांना.

प्रसाद, तुम्ही द्या आकडेवारी
<<

तुम्हाला जर आकडेवारी माहीती नाही, मग कश्याला लंब्याचौड्या थापा मारताय. Happy

सचिनची पुर्ण कारकिर्द मी पाहिली आहे तो दबावात डगमगणारा सुमार खेळाडु होता.धोनिला एक न्याय नि त्याला दुसरा हे योग्य नाही.तेही धोनी त्याच्यापेक्षा सरस असताना....

माझी काल व्यक्त केलेली इच्छा
..
तरीही असे वाटते की त्याने पुढच्या सामन्यात पुढे खेळायला यावे आणि या मालिकेत दोन तडफदार शतके ठोकून जिंकून द्यावी.
..

आणि आज...

खेळला रे खेळला, धोन्या खेळला .. सचिनवर चर्चा उद्या करा रे..
देवा आज सामना जिंकव भारताला. पण नेमका आज आश्विन नाहीये. Sad

Overall, though, 53 of his hundreds have come in wins, and 25 in defeats. Of those 25, eleven have been in Tests, but that's only reflective of the fact that in difficult conditions he has often fought a lone battle with very little support from the rest of the batsmen.

http://www.espncricinfo.com/asia-cup-2012/content/story/557551.html

किमान असा तरी म्हणू नका की तो शतके करायला खेळायचा. १०० पैकी ५३ शतकांमध्ये भारत जिंकलाय आणि २५ वेळा हरलाय. (ह्यात अनिर्णीत कसोटी सामनेही धरले आहेत ; उगाच बेरीज जमत नाहीत म्हणून रडायचे नाय Proud )

>>सचिन हा फक्त शतकविर आहे तर धोनी सर्वोत्तम फिनीशर<<

पण त्याचं काय आहे पगारे, गेम फिनिश करायला मुळात इनिंग बिल्ड झालेली असावी लागते. ते काम बहुतेक वेळा १-५ क्रमांकाचे बॅट्स्मन करतात.

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे; उदाहरणादाखल धावण्याची रीले स्पर्धा घ्या. या स्पर्धेत सुरुवातीचे धावपटु जर गळपटले तर शेवटचा धावपटु काय घंटा फिनिश करणार...

क्रिकेट सर्वांगाने बघा आणि एंजॉय करा; फक्त "हॅपी एंडिंग" वर जाउ नका... Wink

सचिन आणि धोनिची तुलना करणे हे धोनीवर अन्यायकारक ठरेल.धोनी हा अलौकिक प्रतिभा लाभलेला ग्रेट फिनिशर आहे. याउलट सचिन हा सुरवातीला यायचा चांगला खेळायचा मात्र शतक आले कि तो अतिसंथ खेळायचा.नंतर शतक झाले कि फटकेबाजि करण्याचा प्रयत्न करायचा नि आउट व्हायचा.सारी जबाबदारी ही नंतरच्या फलंदाजांवर पडायची.ते कसेबसे सामना जिंकुन द्यायचे नि सचिन हा शतक केल्याने मॅन ओफ द मॅच घेउन जायचा.मैदानावर राहुन सामना जिंकुन देण्याची सचिनची क्षमता नव्हती.

सचिनची पुर्ण कारकिर्द मी पाहिली आहे तो दबावात डगमगणारा सुमार खेळाडु होता.धोनिला एक न्याय नि त्याला दुसरा हे योग्य नाही.तेही धोनी त्याच्यापेक्षा सरस असताना.... >>>

मला एक कळत नाही, ही अशी वरची विधाने करणार्‍या व्यक्तीशी कोणी क्रिकेट बद्दल का वाद घालत आहेत. हे स्पष्ट आहे की ही विधाने क्रिकेट १% सुद्धा ज्याला समजत असेल तो करणार नाही.

सचिन हा बचावात्मक पध्दतीचा प्लेयर होता. शतक मारणे हे त्याचे ध्येय असायचे.संघ विजयाच्या समिप आला कि तो हमखास विकेट फेकायचा.दबावाखाली तो ढेपाळायचा.वरती जी आकडेवारी दिलीय त्यात जी ५३ शतके दिलीत ते सामने इतर प्लेयर जिंकुन द्यायचे.आकडेवारी ही फसवी असते त्याने प्लेयरचे मुल्यमापन योग्य होत नाही.

धोनी हे फिनिशर असले तरी त्यांच्यात डाव बिल्ड करायचीही क्षमता आहे. सचिन फक्त बचावात्मक खेळुन डाव बिल्ड करु शकायचा फिनिशरची कुवत त्याच्यात नव्हती.

पगारे तुम्ही तुम्ही लिहिलय की "आकडेवारी ही फसवी असते त्याने प्लेयरचे मुल्यमापन योग्य होत नाही." नि त्या च्यावर 'शतकाच्या जवळ आल्यावर विकेट फेकणे, दबावाखाली ढेपाळणे' वगैरे म्हटलय जे कुठल्याही आकडेवारीशिवाय सिद्ध कराल का ? कि फक्त तुमचे वैयक्तिक मत म्हणून इतरांनी मान्य करावे हा हट्ट ?

असामि, त्याचे सर्व सामने मि पाहिलेत.त्यावरुनच मत बनवलेय.मिडियाने हाइप केलेला प्लेयर आहे तो.त्याच्या समकालिन प्लेयरमध्ये लारा,कॅलिस,जयसुर्या हे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने सरस होते.

Pages