महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2015 - 17:02

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.

ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..

खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.

रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.

योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.

पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!

विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.

पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.

एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्‍यानंतर दाट झाल्या असतील.

बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.

आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.

मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?

आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.

कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."

उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.

थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.

याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?

जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.

एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.

.........

यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी जबरदस्त खेळाडु आहे त्याला संघात टिकुन राहायला इतरांप्रमाणे कुणा श्रिनिवासन किंवा जाहिरातदारांची गरज असेल असे वाटत नाही.

त्यातही गेल्या वर्षभरात जे सकारात्मक घडलेय >> उदाहरणार्थ ? श्रीनिवासन चा support धोनीला गेल्या २-३ वर्षांमधे तारून गेलाय हे background politics तुझ्या चाणाक्ष डोळ्यांमधून सुटले कसे ?

"धोनी जबरदस्त खेळाडु आहे त्याला संघात टिकुन राहायला इतरांप्रमाणे कुणा श्रिनिवासन किंवा जाहिरातदारांची गरज असेल असे वाटत नाही." - चला. ह्या बाबतीत अधिकारवाणीनं, निष्णात तज्ञ निर्णयाची गरज पुर्ण केल्याबद्दल संस्थान आपलं आभारी आहे.

आता चर्चा बंद. आपण सर्व पामर विक्रम राठोड, गगन खोडा, पारस म्हांब्रे, गेला बाजार नोएल डेव्हिड, डेव्हिड जॉन्सन वगैरे प्रभृतींवर बोलायला मोकळे.

श्रीनिवासन चा support धोनीला गेल्या २-३ वर्षांमधे तारून गेलाय हे background politics तुझ्या चाणाक्ष डोळ्यांमधून सुटले कसे ?
>>>
सपोर्ट असेना का? अगदी घनिष्ट संबंध असेनात दोघांचे. मुद्दा तो नाहीयेच मुळी.
या २-३ वर्षात धोनी हा स्वता संघात टिकण्यालायक होता की नाही हा चर्चेचा विषय असावा, चर्चा त्याच्या अ‍ॅबिलिटीवर व्हावी.

कालची मॅच संपल्यावर रा. रा. धोनी, सु. श्री. श्रीनिवासन ह्यांच्या निवासस्थानी न्याहारीसाठी गेले होते अशी एक विश्वासु न्यूजपेपर ची (पक्षी: टाईम्स ऑफ ईंडिया) न्यूज आहे Wink

सपोर्ट असेना का? अगदी घनिष्ट संबंध असेनात दोघांचे. मुद्दा तो नाहीयेच मुळी.
या २-३ वर्षात धोनी हा स्वता संघात टिकण्यालायक होता की नाही हा चर्चेचा विषय असावा, चर्चा त्याच्या अ‍ॅबिलिटीवर व्हावी.>> कसल्या अ‍ॅबिलिटी वर चर्चा व्हावी ? तो उत्तम फिनिशर होता. गेल्या २-३ वर्षांमधे for whatever reason, he is having hard time performing that role. He is still in because he is captain.At times whenever he has been able to put together big scores in last couple of years, he has come up higher in the order (which is not finisher's role). But again in those innings, he has faltered towards the end. And he has been providing reasons for that after every match. ह्यात डोंबलाची अ‍ॅबिलिटी आली. कप्तान नसता तर निव्वळ आहे त्या फॉर्मवर तो संघात राहिला असता का ? तेही ओझा form of life मधे असताना नि सॅमसन mature झाल्याची चिन्हे दाखवत असताना. समजा त्याने दिलेली कारणे valid असली तरी 'त्याला खेळणे जमत नाहिये नि इतरांना जमू शकेल कि नाही हे बघता येत नाहिये' हे राहतेच आहे.

धोनीची अ‍ॅबिलिटी कालच्या एवढीच आज आहे का यावरही चर्चा करणे खरे म्हणजे चूकच.
कारण सचिनची अ‍ॅबिलिटी सुद्धा शेवटपर्यंत एकसमानच होती का? तर याचे उत्तर नाही असेल.
प्रश्न आहे की आजच्या तारखेला त्याची जी अ‍ॅबिलिटी आहे त्यानुसार त्याची संघात जागा बनते आहे का?
नाही तर मग ती जागा कोण घेऊ शकेल.
नमन वा संजू हे पर्याय आपल्यातर्फे आहेत का रिंगणात?

धन्यवाद फे फे . मी जास्तीच फॉर्ममधे लिहिले Wink

धोनीची अ‍ॅबिलिटी कालच्या एवढीच आज आहे का यावरही चर्चा करणे खरे म्हणजे चूकच. कारण सचिनची अ‍ॅबिलिटी सुद्धा शेवटपर्यंत एकसमानच होती का? >> म्हणजे शेवटी धोनी ला सपोर्ट करायला तुलाही सचिनचीच गरज पडावी . Lol
सचिन ची ability सारखी नव्हती पण त्याचा रोल बदलता होता नि मह्त्व तेव्हढेच राहिले होते हा भाग धोनीच्याबाबतीमधे होत नाहीये. धोनीचा मुख्य plus point त्याचा फिनिशर रोल, flawless keeping नि uber-cool captaincy हे अष्टपैलूत्व हे होते. ह्यातले पहिले गायब झालेय, दुसरे उरलय नि तिसरे stale झालंय. मग अशा वेळी ह्यातले कमीत कमी दोन देउ शकण्याची क्षमता असलेल्या players वर अन्याय होतोय. मी आधी म्हटले होते तसे कि धोनी पुढच्या World Cup पर्यंत असेल असे तो खात्रीलायक सांगत नाहिये तेंव्हा team building च्या द्रुष्टीने पण त्याचे सध्या संघात असणे फारसे उपयुक्त नाहिये.

नमन वा संजू हे पर्याय आपल्यातर्फे आहेत का रिंगणात? >> तू नक्कि काय लिहितोस हे एकदा वाचत जा. रिंगणात ? आपल्यातर्फे ? नमन ओझा दोन सिरीज मधे संघात बॅकप म्हणून आहे. तेंव्हा रिंगणात आहे का नाही हे तुझे तूच ठरव.

सचिन हा भारतीय क्रिकेटचा बेंचमार्क आहे, सर्व प्रकारची उदाहरणे त्या एका खेळाडूत सापडतात म्हणून त्याचे नाव घेतले.
एक गंमत - इथे जसे मी सचिन विरोधक आहे असे वातावरण तयार केले जातेय तसेच सेम धोनीचा डाव संपलाय असे वातावरण जनमाणसात तयार केले जात आहे Happy

सिरीज मध्ये बॅक अप विकेट कीपर असतोच. माझ्या बोलण्याचा रोख ईतकाच की धोनीची जागा कोण घेऊ शकेल असे आपणास वाटते. अ ब क ड अशी चार नावे घेतल्याने चौघांचे मिळून एक वजन झाले जे धोनीला भारी पडेल असे होत नाही. धोनी ईतर सर्व पर्यांयांपेक्षा श्रेष्टच आहे. आजही Happy

त्याचा फिनिशर रोल संपलाय हे आपणच आपले ठरवतोय, पण तसे खरेच आहे का? आणि समजा त्यात काही फरक पडलाही असेल वयोमानानुसार, तरी याचा अर्थ फलंदाज म्हणून तो जडेजा वा अक्षर पटेलच्या लेवलचा झाला आहे का? नाही, नक्कीच उजवा आहे. इथे मला गेल्या काही वर्षातील आकडे बघायला आवडतील. (मीच आणतो नंतर शोधून Happy ) कारण मला तरी गेले दोन तीन वर्षांत तो फलंदाज म्हणून फ्लॉप होत आहे असे कधी जाणवले नाही.

विकेटकीपींगचे कौतुक आपणही त्याचे करत आहातच, तरी त्यात माझ्यातर्फेही कौतुकाचे दोन शब्द म्हणजे त्याने केलेली स्टंपिंग वा एखादा क्विक रन आऊट हे कित्येकदा मॅच पलटवणारे ठरतात. आजही हि एक स्पेशल मॅच टर्निंग अ‍ॅबिलिटी आहे त्याच्या कीपिंग मध्ये. Happy

कप्तानी म्हणाल तर राजकारणात भरडली जातेय. त्यामुळे तुर्तास याचे योग्य मूल्यमापन होऊ शकत नाही.

त्याचा फिनिशर रोल संपलाय हे आपणच आपले ठरवतोय, पण तसे खरेच आहे का? आणि समजा त्यात काही फरक पडलाही असेल वयोमानानुसार, तरी याचा अर्थ फलंदाज म्हणून तो जडेजा वा अक्षर पटेलच्या लेवलचा झाला आहे का? >> जडेजा नि अक्षर पटेल कालपर्यंत तरी बॉलर होते रे, finisher role मधे असल्याचे ऐकले नाहि त्यांनी अजून. उगाच कोलांट्या उड्या मारू नकोस. धोनी ला स्लॉग जमत नाहिये हे तो स्वतःच म्हणतोय. (तुला पटले नाहि तरी.)

जडेजा आणि अक्षर पटेल ही नावे बॅटींगची एक लेव्हल दाखवायला घेतली.
म्हणजे जरी आपण म्हटले की आता धोनी पहिल्यासारखा फिनिशर उरला नाही आणि हे काही अंशी खरेही मानले तरी त्याच्या फलंदाजीची उपयुक्तता फक्त एक फिनिशर म्हणूनच होती आणि आता तो एक साधारण फलंदाज उरला आहे असे नाही म्हणू शकत. त्याची विकेटकीपर फलंदाज म्हणून आजही संघात जागा बनते.

आलो एक कॉफी मारून Happy

हा गेल्या काही वर्षांचा धोनीचा एकदिवसीय सामन्यांतील बोलका रेकॉर्ड.
यात कप्तानी आणि कीपींग हे फॅक्टर पकडले नाहीयेत, फक्त फलंदाज म्हणून त्याचे मूल्यमापन आहे.
आता सांगा यानुसार नेमक्या कोणत्या वर्षी त्याला कोणाच्या तरी कृपेने संघात राहायला मिळाले आहे

वर्ष - सामने - धावा - सरासरी - स्ट्राईक रेट

year 2011 - 24 - 764 - 58.76 - 89.88

year 2012 - 16 - 524 - 65.50 - 87.62

year 2013 - 26 - 753 - 62.75 - 96.04

year 2014 - 12 - 418 - 52.25 - 92.07

year 2015 - 19 - 613 - 47.15 - 86.58

Devil is in the details हे ऐकलयस ? हे आकडे जिथून घेतलेस तिथेच प्रत्येक वर्षाच्या breakdown वर जाऊन innings मधला स्कोर डोळ्याआड घाल, तुझ्या लक्षात येईल की शेवटच्या दोन वर्षांमधे चढ उतार वाढले आहेत. २०१५ म्धल्य दोन मोठ्या innings वरती येऊन खेळलेल्या आहेत.

त्याच्या फलंदाजीची उपयुक्तता फक्त एक फिनिशर म्हणूनच होती आणि आता तो एक साधारण फलंदाज उरला आहे असे नाही म्हणू शकत. त्याची विकेटकीपर फलंदाज म्हणून आजही संघात जागा बनते. >> Actually you are pretty wrong here. Dhoni as a pure batsman will not override any of first 5 players in current team (maybe Raina but again, he is left handed and that counts). His worth was very high because he could finish the game for India. तुला आठवतेय का सध्या त्याने कुठला सामना फिनिश केलाय as a batsman म्हणून, नि त्यापूर्वी ? दोनेक वर्षांपूर्वी हे आकडे भसाभसा देता येत होते. Dhoni was never best keeper, he was always safe and reliable keeper. Best keeper in country is Saha. धोनीमूळे इतरांना संधी मिळत नाहिये हे लक्षात घे त्यामूळे 'ते त्याच्यापेक्षा चांगले आहेत का?' वगैरे म्हणशील तर त्याचे आकडे मिळणार नाहीत. And that is unfair to all concerned. 'त्याला उद्याच्या उद्या बाहेर काढा' असेही नाहिये पण काहिच transition plan समोर दिसत नाहिये हे लक्षात घे.

Dhoni was never best keeper, he was always safe and reliable keeper. > शंभर टक्के अनुमोदन!

असामी, वाक्यावाक्याला अनुमोदन! बाकी स्टॅटिस्टिकल डिस्ट्रिब्युशन जड आहे म्हणून ते न वापरता दहावीपर्यंत शिकलेल्या गणितावरून गोष्टी बरोबर ठरत असतील, तर हे सगळे कळेल ही आशाच फोल, आणि कळाले, तरी ते हट्टापुढे वळेल, ही तर अजूनच पुढची गोष्ट.

(ऋन्मेऽऽष ह्यांच्यावर पर्सनल हल्ला करायचा रोख वाटत असला, तरी तो तसा नाही. अज्ञानात समाधान मानून उलट त्याचा अभिमान बाळगण्याच्या वृत्तीवर तो आहे.)

धोनी जबरदस्त खेळाडु आहे त्याला संघात टिकुन राहायला इतरांप्रमाणे कुणा श्रिनिवासन किंवा जाहिरातदारांची गरज असेल असे वाटत नाही. >>> कुणा श्रीनिवासन!! त्यानं चुकून वाचलं तर थयाथया तांडवनृत्यच करेल. तमिळ शिव्या पडतील त्या सेपरेट!!

या माणसामुळे भारतीय क्रिकेटचं अतोनात नुकसान झालेलं आहे ही गोष्ट खरी आहे.

परत त्याला उद्याच्या उद्या बाहेर काढा असेही नाहिये पण काहिच transition plan समोर दिसत नाहिये हे लक्षात घे.<<<< हा आपला कायमचाच घोळ आहे. इतर देशांमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी बॅकप तयार ठेवला जातो अगदी इंजुरी वगैरे झाली तरी त्यामुळे संघांचा बॅलन्स जात नाही. आपल्याकडे जोवर तो खेळाडू खेळतोय तोवर दिवे ओवाळ ओवाळले जातात. त्याच्या रीटायरेमंटची वेळ आली की त्याला बॅकप रेडी करायचं सोडून भलतीच राजकारणं केली जातात. परिणामी आपल्याकडे शेकडो खेळाडू असूनही त्याना संधी मिळत नाही. ज्याला मिळते तो राजकारणामध्ये जास्त वेळ घालवतो (याला अपवाद आहेतच! पण ते अपवादापुरते)

सचिनची उपयुक्तता शुन्य असल्याची जाणिव धोनिला होती परंतु पुर्वपुण्याइ मिडियाने केलेले त्याचे दैवतिकरण नी जाहिरदारांचा दबाव ह्या कारणाने त्याला तो संघात नकोसा झाला असतानाही टिममध्ये ठेवावे लागत होते.तरी धोनिने रोटेशन पध्दत संघात आणुन त्याला काही सामने बसवले.धोनि हा कप्तान म्हणुन यशस्वि होण्याचे कारण त्याची योग्य निर्णयक्षमता.

पगारे तुम्ही परत प्रबोधनाचे कार्य सोडून इथे वळलात ते ? तुमचा मौलिक वेळ आमच्या वर फुकट घालवू नका हि कळकळीची विनंती.

ऋन्मेऽऽष, तुला क्रिकेट मधे सरासरी कशी काढतात हे माहित आहे का? वर जे तु so called statistics दिले आहेत त्यात एक अत्यंत महत्त्वाचा आकडा विसरला (जाणुन बुजुन ?) आहेस तो म्हणजे नॉट आऊट. ५-६ नंबर वर येणार्‍या फलंदाजाचे नॉट ऑट प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे अ‍ॅव्हरेज जास्त असते.

BTW, मागिल पानावर मी काही प्रश्न विचारले होते. त्यांची ऊत्तरे देऊ शकतोस का?

---
कानडा

आपले काही प्लेयर हे ग्रेट आहेत पण माणुसकिच्या,समाजकार्याच्या बाबतित स्टिव्ह वॉ हा प्लेयर ग्रेट आहे.

मी तुमच्या तोंडावर आकडेवारी फेकत नाही. कारण आकडे हे फसवे असतात, रुक्ष असतात..
"Figures are like bikini bathing costumes ! What they reveal is interesting, but what they conceal is more vital"

--- संदर्भ - 'फटकेबाजी' शिरीष कणेकर

असामी, एकदम सहमत! I couldn't agree more.

पगारे, आपण आलात, आमचं अहोभाग्य. आपण PWDमधे रस्ते दुरुस्तीच्या कामावर आहात का? सतत diversion काढता म्हणून विचारलं. एक आमचं बेष्ट सजेशन बघा. दोन-पाचशे पोस्टीतली एखादी तरी विषयाला धरून टाकायचा प्रयत्न करून बघा. जड जाईल सुरूवातीला ५-१० वर्ष, पण नेटानं प्रयत्न केलात थोडंफार जमू शकेल.

>>>हा आपला कायमचाच घोळ आहे. इतर देशांमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी बॅकप तयार ठेवला जातो अगदी इंजुरी वगैरे झाली तरी त्यामुळे संघांचा बॅलन्स जात नाही<<<

नंदिनी, अगदी अगदी!

जो माणूस निव्वळ कोणीतरी दुसरा जखमी झाला म्हणून संघात येतो तो त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतो हे पाहिलेले आहे.

>>>आपले काही प्लेयर हे ग्रेट आहेत पण माणुसकिच्या,समाजकार्याच्या बाबतित स्टिव्ह वॉ हा प्लेयर ग्रेट आहे.<<<

सदर धाग्याशी इतका सुसंगत प्रतिसाद आजवर पाहण्यात नव्हता.

फेरफटका - Lol

maybe Raina but again, he is left handed and that counts.
>>>>>>
या विधानावरून धोनीची संघात जागाच बनत नाही हे अट्टाहासाने दाखवायचे प्रयत्न वाटताहेत. कारण तुमच्यामते एक वीक लिंक रैना आहे, आता ऋन्मेष त्याचेच नाव घेईन, तर त्याचे लेफ्टी असणे हे फायदेमंद असल्याचे आधीच जस्टीफाय करा.
असो, धोनी फिनिशर आता पहिल्यासारखा नाही राहिला हे चला मानू थोडावेळ. तसेही त्याला काढून त्या तोडीचा कोण दुसरा फिनिशर मिळणार ही शंकाच आहे. ते ही असो, तर मायकेल बेवन नामक एक वर्ल्डक्लास फिनिशर होता. त्याची फलंदाजीची शैली धोनीच्या भिन्न होती. पण तो ज्या पद्धतीने सामने जिंकवून द्यायचा ती भुमिका धोनी सुद्धा चांगलीच निभावू शकतो. जे त्याने २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केले होते. आजही त्याच्यात ते पोटेंशिअल आहे. तेव्हा तो एक गेमप्लान होता, आता ती पर्मनंट भुमिका म्हणून घेऊ शकतो.
मुळात इथे धोनीला पहिल्या पाच फलंदाजांपैकी कोणाला रिप्लेस करायचे आहे हा विचारच चुकीचा आहे. धोनी हा विकेटकीपर फलंदाज आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याला एखाद्या विकेटकीपर फलंदाजालाच रिप्लेस करायचे आहे. ते करून तो संघात आहे, पुढेही राहू शकतो.

..

स्टॅटिस्टिकल डिस्ट्रिब्युशन जड आहे म्हणून ते न वापरता दहावीपर्यंत शिकलेल्या गणितावरून गोष्टी बरोबर ठरत असतील, तर हे सगळे कळेल ही आशाच फोल,
>>>
मुळात त्या ८५-१०० धावांच्या उदाहरणात दहावीपर्यंत जे गणित वापरले गेलेले तेच पुरेसे होते Happy
जसे त्या पर्टीक्युलर पॅच मधील स्ट्राईकरेट बघितला गेला होता त्याच धर्तीवर धावांची सरासरी बघायची होती.
कारण चाचपडणे म्हणजे स्ट्राईक रेटच नाही तर त्या पॅचमध्ये किती वेळा बाद होणे हे देखील आले.
तसेही त्या लिंकमधील ते उदाहरणच गंडलेले होते. एका सचिनप्रेमीने मॅनिप्युलेट केलेले होते. कारण त्यात फक्त शतके घेतलेली. त्याच काळात ८५ ते १०० दरम्यान जे अमाप वेळा सचिन बाद झालेला त्यांचा हिशोब त्या स्ट्राईकरेटच्या आकडेमोडीत नव्हताच. Happy

५-६ नंबर वर येणार्‍या फलंदाजाचे नॉट ऑट प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे अ‍ॅव्हरेज जास्त असते.
>>>
हे एक गंमतीशीर मिथ आहे Happy
याला किती जण सहमत आहेत इथे?
याला म्हणजे यामागील गणिताबद्दल नाही विचारत आहे, कारण नाबाद राहिले तर अर्थातच ते सरासरी काढताना काऊंट होणार नाहीच.
पण यामुळे ५-६ नंबर वर येणार्‍या फलंदाजांना अ‍ॅडव्हांटेज मिळतो या बाबत किती जण सहमत आहेत हे जाणून घ्यायला आवडेल Happy

..

मित्रा, धोनीने कधी राजकारण केलेच नाही असे तुला म्हणायचय का?
>>>>
याचे उत्तर माझ्या हेडर पोस्टमध्ये मिळेल.
आपल्या सोयीसाठी ती वाक्ये कॉपीपेस्ट करतो. Happy
< याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.>

कानडा,
विलंबाबद्दल दिलगीर आहे,
आपल्या प्रश्नांची उत्तरे

१. धोनी अत्यंत चांगला कप्तान आहे. तर मग तो स्वतः बनवलेली टीम का सांभाळु शकत नाहिये?

अत्यंत चांगले पालक सुद्धा वृद्धाश्रमात जातात.

२. धोनी ईतकाच जर चांगला फलंदाज आहे तर ईतरांनी सामना जिंकुन द्यायची वाट का बघतो? तो स्वतः आणि त्याचे पित्तू (रैना, धवन, अश्विन, इ.) सामना का जिंकु शकत नाही?

अ) ११ जणांच्या या खेळात कोणीही एकटा कधीच जिंकवून देऊ शकत नाही.
ब) ३-४ जण मिळून चांगले खेळले तरी ते वारंवार जिंकवून देऊ शकत नाहीत.
क) जर तुमच्याच संघातील कोणी तुम्ही हरावे यासाठी खेळत असेल तर सारीच गणिते अशक्य होऊन जातात.

३. कोहली सोबत अजुन कोण खेळाडू आहेत जे धोनी विरुद्ध कारस्थान करत आहेत?

कोहलीच्या जोडीने शास्त्रीवर देखील शंका आहे. कोहली जर भावी कर्णधार होणार असेल तर पुढे उजेडात न येता पाठीमागूनही त्याला खुश करण्यासाठी, त्याच्या मर्जीतला खेळाडू बनण्यासाठीही सपोर्ट करणारे असण्याची शक्यता आहेच.

मुळात त्या ८५-१०० धावांच्या उदाहरणात दहावीपर्यंत जे गणित वापरले गेलेले तेच पुरेसे होते > आता हे पण तुम्हीच ठरवणार का? परत इथे तोच मुद्दा आहे. स्वतःच्याच अज्ञानात कितीवेळ धन्यता मानणार? तुमच्या सगळ्या स्टेटमेंट्सना "मी म्हणतो म्हणून" ह्याशिवाय काही आधार नाही, आणि इतर लोक आकड्यांचा व्यवस्थित आधार देत आहेत, तर त्याची गरज नाही, हेच पुरेसे आहे, म्हणून तुम्ही ते उडवून लावणार. Uhoh

इतर लोक आकड्यांचा व्यवस्थित आधार देत आहेत,
>>>
कुठे दिलाय आधार? नक्की कश्याबद्दल बोलत आहात आपण,कुठच्या आकड्यांबद्दल?

जे त्याने २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केले होते. आजही त्याच्यात ते पोटेंशिअल आहे. तेव्हा तो एक गेमप्लान होता, आता ती पर्मनंट भुमिका म्हणून घेऊ शकतो. > घेऊ शकतो हो जर तो ते अजूनही करून दाखवू शकत असेल तर, मूळात त्याला ते जमत नाहिये हा मुख्य प्रॉब्लेम आहे. म्हणून हे सगळे सुरू आहे.

मुळात इथे धोनीला पहिल्या पाच फलंदाजांपैकी कोणाला रिप्लेस करायचे आहे हा विचारच चुकीचा आहे. धोनी हा विकेटकीपर फलंदाज आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याला एखाद्या विकेटकीपर फलंदाजालाच रिप्लेस करायचे आहे. ते करून तो संघात आहे, पुढेही राहू शकतो.>> नाही, तो विकेटकीपर म्हणून निघाला कि नुसता फलंदाज म्हणून स्वतःच राहणार नाही. नि परत जे वर लिहिलय जे तू दुर्लक्षित केले आहेस ते 'धवन, रोहित, कोहली, राहाणे' ह्यापैकी कोणालाहि धोनी replace करू शकत नाही. राहिला रैना तर तो पण finisher म्हणून संपलाय का ते माहित नाही. धोनी नक्की संपत चाललाय हे दिसतय तेंव्हा रैना च्या धोनी येणे unless it is short term arrangement - stop gap कठीण वाटते.

BTW कोहली धोनीचा गेम करतोय हा तुझा मुद्दा तो सोयीस्करपणे पाठी केला आहेस हे लक्षात आले नाहिये असे समजू नकोस Wink

नाही, तो विकेटकीपर म्हणून निघाला कि नुसता फलंदाज म्हणून स्वतःच राहणार नाही.
>>>
पण मुळात तो विकेटकीपर म्हणून का निघणार? म्हणजे त्याला कीपींग जमेनाशी झाली आहे का? कर्णधार म्हणून निघाला की असे बोलू शकतो एकवेळ ..

मूळात त्याला ते जमत नाहिये हा मुख्य प्रॉब्लेम आहे. म्हणून हे सगळे सुरू आहे.
>>>
आपल्यामते जमत नाहीये, माझ्यामते जमतेय. किमान ईतपत जमतेय की त्याची जागा एवढ्यात तरी आणखी कोणी घेऊ शकत नाही.

आपल्यामते जमत नाहीये, माझ्यामते जमतेय >> माझ्या नाहि तर तू वगळता सगळ्यांच्या. अगदी धोनीही स्वतःच म्हणतोय कि end overs slogging जमत नाहिये आत्ता. कारणे फक्त वेगवेगळी देतोय.

पण मुळात तो विकेटकीपर म्हणून का निघणार? >> हे तूच म्हणाला होतास ना " धोनी हा विकेटकीपर फलंदाज आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याला एखाद्या विकेटकीपर फलंदाजालाच रिप्लेस करायचे आहे." ? त्याचे उत्तर होते. किपिंग करत नसेल तर नुसता फलंदाज म्हणून तो राहू शकत नाही ह्या माझ्या मुद्द्यावर.

माझ्या नाहि तर तू वगळता सगळ्यांच्या. अगदी धोनीही स्वतःच म्हणतोय कि end overs slogging जमत नाहिये आत्ता.
>>>
धोनी अमुक तमुक जमत नाही असे बोलतोय तर अमुक तमुक जमतेय असेही बोलत असेलच ना. किंबहुना जर तो त्याच कामासाठी संघात असेल आणि ते न जमता त्याला बाहेरच पडावे लागणार असेल तर असे काहे बोलून तो स्वताच्या पायावर का कुर्हाड मारून घेईन. त्यामुळे त्याच्या विधानाचा विपर्यास करत ते त्याच्याच विरुद्ध वापरणे चूकच.
मी वगळता सगळ्यांच्या मध्ये हे सगळे कोण? इथे प्रतिसाद देणारे ईतकेच काऊंट करत आहात की कुठे जनमाणसांत उतरून केलेल्या सर्व्हेचे आकडे आहेत.
सामान्य क्रिकेटरसिक सोडा, जर एक्स्पर्ट आणि माजी क्रिकेटर्सची मतेही घेतली तरी असे कित्येक जण निघतील जे धोनी शिल्लक आहे असे म्हणतील.

@ विकेटकीपर फलंदाज, कन्फुजन नको
एवढाच मुद्दा आहे की धोनीला बसवायचे म्हणजे कोणीतरी विकेटकीपरच त्या जागी घ्यावा लागणार. मग कोणी विकेटकीपर फलंदाज आहे का जो त्याची जागा घेऊ शकतो.
जर तरुण खेळाडूंमध्ये एखादा धोनीपेक्षा सरस असता तर तो आता लगेच आत आला असता, मग धोनीच्या किपींगची संघाला गरजच उरली नसती आणि त्यानंतर त्याला एक निव्वळ फलंदाज म्हणून जागा मिळवायला झगडावे लागले असते. आणि ते नक्कीच कठीण आहे हे मान्य.

हे बघा, मी एकटाच नाहीये. लिटील मास्टर सुनिल गावस्कर यांचे सुद्धा असे मत आहे की धोनीमध्ये अजून ३ ते ५ वर्षे शिल्लक आहेत.

http://www.firstpost.com/sports/dhoni-made-a-scapegoat-can-play-for-anot...

http://www.wikinewsindia.com/english-news/oneindia-english/sports-oneind...

म्हणजे यात पुढचा विश्वचषकही आला Happy

थोडक्यात गावस्करने कोहलीला टेंशन दिलेय Happy

मित्रा, मग जर त्याने इतरांच्या बाबतीत राजकारण केले हे जर तू मान्य करतोयस तर मग इतरांनी त्याच्या बाबतीत राजकारण केल्याचा इतका का राग येतोय?
चर्चा जर राजकारणाची चालली असेल तर त्यात संघाचे हित वगैरे बडबड करुन ते जस्टिफाय होत नाही ना!

ऋन्मेऽऽष मागे माजी क्रिकेटरस्ना त्यांना लिहायचे पैसे मिळतात तेंव्हा त्यांच्या मताकडे तू दुर्लक्ष करतोस असे तूच म्हणाला होतास ना ? Wink

असो धोनी कडे ३-५ वर्षे उरली आहेत हे गावस्करने कुठली expiry date बघून ठरवले हे वाचलेस का ? तो नि सचिन ३८-४० पर्यंत खेळले ह्यावरून. धोनी किपर आहे तो इतकी वर्षे खेळणे निव्वळ अशक्य आहे. त्याच लेखात धोनी परत पहिल्यासारखा खेळायला लागेल असे मत गावस्करने व्यक्त केलय. ह्याचा अर्थ तो आता पूर्वीसारखा खेळत नाही हा होता हे तुझ्या चाणाक्ष बुद्धीला लक्षात आले असेल. आम्हीहि तेच म्हणतोय नि धोनीला उद्याच्या उद्या हाकला असे न म्हणता transition plan बनवा म्हणतोय हा भाग तुझ्या चाणाक्ष नजरेतून निसटला हे दर्शवून देतो.

जे त्याने २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केले होते. आजही त्याच्यात ते पोटेंशिअल आहे. तेव्हा तो एक गेमप्लान होता, आता ती पर्मनंट भुमिका म्हणून घेऊ शकतो. >>

विश्वचषकाच्या शेवट्च्या सामन्यात धोणीने धावा केल्या. त्याचापेक्षाही जास्त चांगली इनिंग गंभीरची होती. त्याने टोन सेट केला. त्यामुळे कळस धोणीला चढवता आला. इनफॅक्ट २०१४ आणि २०१५ प्रमाणेच २०११च्या विश्वचषकात देखील धोणी चाचपडत होता.

वर तू म्हणत आहेस की कोणा एकामुळे टीम जिंकत नाही. त्याचा विसर पडायला नको इतक्यातच. Wink ह्यात गेमप्लान वगैरे काही नव्हते तर त्याला सेट व्हायला खूप उशीर लागतो, त्यामुळे बॉल जास्त जातील त्यामुळे तो वर आला. तो आउट झाला असता तरी गोल्डन टच मध्ये युवी असल्यामुळे तो वर आला. आख्ख्या वल्डकप मध्ये धोणीची केवळ एक फिफ्टी आहे.

इन फॅक्ट जेंव्हा जेंव्हा तो ४ नंबर वर येतो तेंव्हा त्याच्या आधीच्या काही इनिंग मधील स्कोअर बघ. अपवादानचे त्या आधी त्याने ३०-३५ + केलेल्या असतात. त्यामुळे मो तो ४ नंबर वर येणे हा पॅटर्न आहे. तो तुला कळत नसला तरी !

आधी लिहिल्यासारखे धोणीला डिफेन्ड करताना विराट अन सचिनचा बळी द्यायची गरज नाही. पण मुद्दे नसले की असे काही तरी होत असते.

असाम्याच्या, 'आज धोणीला टीम मध्ये स्थान नाही' ह्या विधानासाठी सध्या मी सहमत आहे. बॅड पॅचेस सर्वांचे येतात. धोणीने विश्रांती घेऊन पुनरागमन करावे. त्यालाही वेळ भेटेल.

कुणीतरी वर सचिनला वन डे मध्ये काढले असे लिहिले आहे. तर सचिन हा एकमेव खेळाडू आहे की ज्याला कधीच काढले गेले नाही. 'दादा' च्या मुलाखतीत सुद्धा त्याने हे सांगीतले आहे. अर्थात इथे कुणाला सांगून काही फरक पडत नाहीच म्हणा.

धोणी निर्विवाद इम्पॅक्ट प्लेअर आहे. पण त्याचा इम्पॅक्ट आता नाहीसा होत चालला आहे. खुद्द धोणी देखील हे म्हणतो आहे. स्लॉग बद्दलचे त्याचे स्टेटमेंट पुरेसे बोलके आहे.

तर मग इतरांनी त्याच्या बाबतीत राजकारण केल्याचा इतका का राग येतोय?
>>>>>>
मला राजकारणाचा राग येतोच, मग ते कोणीही का केले असेना. कारण यात फटका भारतीय क्रिकेटला बसतो.
धोनीने केले असेल तर ते त्याच्याशीही झाले पाहिजे याचे समर्थन करताना आपण भारतीय क्रिकेटचे नुकसान तर बघत नाही ना याचाही विचार व्हावा.

मी इथे कोणाचाही चाहता म्हणून लिहित नसून भारतीय क्रिकेटचा हितचिंतक म्हणून लिहितोय, फक्त आपण आपल्या मतांनुसार माझ्या मताला अमुकतमुक शिक्का मारत आहात.

जसे आपले मत धोनीला प्रतिकूल असल्याने माझे अनुकूल मत पाहून आपण मला धोनीचा चाहता समजत आहात.
जसे वर मी सचिनच्या शतकाजवळ चाचपडण्यावर माझे प्रामाणिक मत व्यक्त केले तर मला सचिनद्वेष्टा ठरवून मोकळे झालात Happy

ऋन्मेऽऽष मागे माजी क्रिकेटरस्ना त्यांना लिहायचे पैसे मिळतात तेंव्हा त्यांच्या मताकडे तू दुर्लक्ष करतोस असे तूच म्हणाला होतास ना?
>>
हो, म्हणून मी त्यांचे कुठलेही मत प्रमाण मानत नाही हे खरे आहे. ईथेही, "हे बघा गावस्करला देखील वाटते की धोनी अजून शिल्लक आहे तर तुम्हाला गावस्करपेक्षा जास्त क्रिकेट समजते का?" असे म्हणण्याचा हेतू नाही. ते तर तुम्ही म्हणालेलात की मला एकट्यालाच असे वाटते की धोनी अजून शिल्लक आहे याच्या उत्तरादाखल सहज शोधाशोध केली असता ते मिळाले. अर्थात माझे ईतर बरेच मित्र, व व्हॉटसपवरचे सवंगडी धोनीचे पाठराखे आहेतच.
बाकी गावस्करची स्वताची बरीच मते राजकारणी असतात Happy

धोनीला उद्याच्या उद्या हाकला असे न म्हणता transition plan बनवा म्हणतोय.
>>>
हे योग्य आहे. तो बनायला हवा. पण तो तसा न बनता त्याची सरळ कायमची उचलबांगडी केली जाणार असे मला वाटते. ते नकोय. ते मला चुकीचे वाटतेय.
अश्यावेळी आत्मविश्वास मिळवून द्यायचा असतो, याउल्ट धोनीचे खच्चीकरण करायचा प्रकार घडतोय.

विश्वचषकाच्या शेवट्च्या सामन्यात धोणीने धावा केल्या. त्याचापेक्षाही जास्त चांगली इनिंग गंभीरची होती.
>>>>
याबाबत मी एक किस्सा ऐकलेला. खरा खोटा माहीत नाही.
सामना शेवटाकडे जाऊ लागला तसे गंभीरचेही शतक आले. त्यामुळे की काय माहीत नाही पण त्याचा वेग मंदावला. तेव्हा धोनीने त्याला सुनावले, अब क्या सेंच्युरी बनाके मॅन ऑफ द मॅच लेके जायेगा क्या? मॉरल ऑफ द स्टोरी - संघासाठी खेळ बे.

इन फॅक्ट जेंव्हा जेंव्हा तो ४ नंबर वर येतो तेंव्हा त्याच्या आधीच्या काही इनिंग मधील स्कोअर बघ. अपवादानचे त्या आधी त्याने ३०-३५ + केलेल्या असतात. त्यामुळे मो तो ४ नंबर वर येणे हा पॅटर्न आहे. तो तुला कळत नसला तरी !
>>>>
आपला काहीतरी पॅटर्न फॉलो करायला विश्वचषकाचा अंतिम सामना निवडणे हे मला खरेच कळू आणि पटू शकत नाही.

@ स्लॉग,
इथेच तर मेन गोची आहे. आपण धोनीला ग्रेट फिनिशर म्हणताना त्याने तेच करावे आणि ते न जमल्यास संघाबाहेर पडावे अशी धारणा केली आहे. तो प्रामाणिकपणे कबूल करतोय की त्यातील इफेक्टीवनेस आता वयोमानानुसार कमी झालाय पण त्याउपरही एक विकेटकीपर फलंदाज म्हणून त्याचा फायदा आहेच. धोनी सुद्धा तोच फायदा तुमच्या निदर्शनास आणायला बघतोय, पण आपण मात्र त्याच्याच विधानाचा विपर्यास करत त्याच्याविरुद्ध वापरत आहोत.

भारतीय क्रिकेटला फटका बसतोय?.... कुठे कुठे?

बर, तुझ्या म्हणण्याप्रमाणे अगदी गृहीत धरू की कोहली आणि शास्त्री धोनीविरुद्ध राजकारण करतायत आणि धोनीचा काटा काढण्यासाठी अंडरप्ले करतायत, तर मग धोनी धरुन बाकीचे १० प्लेयर्स स्वताच्या खेळावर मॅच काढु शकत नाहीत का?
का शास्त्री आणि कोहलीशिवाय अजुनही कुणी या so called कटात सामिल आहेत?

थोडस त्रयस्थ पणे या सगळ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल की हा आरोप कितीही लॉजिकल वाटत असला तर तरी प्रत्यक्षात असे सगळे होणे फारसे शक्य नाही

वाटल्यास एखादा ड्यु आयडी काढून तूच तुझे वरचे आरोप खोडून काढायचा प्रयत्न कर ... कदाचित बाकी सगळे जे समजावयचा प्रयत्न करतायत ते तुझे तुलाच समजून जाईल Wink

Pages