महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2015 - 17:02

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.

ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..

खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.

रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.

योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.

पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!

विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.

पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.

एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्‍यानंतर दाट झाल्या असतील.

बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.

आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.

मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?

आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.

कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."

उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.

थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.

याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?

जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.

एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.

.........

यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच काय आहे असाम्या, सचिनने त्याचे १०० वे १०० काढण्यात वेळ लावला, त्यात पाचदा ९० मध्ये बाद झाला, मग मिडियाची चर्चा वगैरे बाबी हेच ऋन्मेशचे सचिनला बघणे आहे. आपल्यासारखे त्याने ना डेझर्ट स्ट्रॉम बघितला ना ही त्याचे पहिले काही ( म्हणजे अं, एकून ९० + शतक) शतक. तो सचिनला शेवटी शेवटी बघत होता आणि तरीही हा माणूस वल्ड कप मध्ये पण वन ऑफ द हायस्ट रन गेटर होता. ते सोडा.

त्यामुळे तो त्याच्या पद्धतीने अंदाज बांधतो. पण तो खोडला तरी त्याच्याकडे तेवढा मोठेपणा नाही, की हो माझे चुकले,सचिन ऑल टाईम ग्रेट आहे. पण हा माणूस ऑल टाईम ग्रेट म्हणणे तर सोडा देशहित वगैरे टाईमपास मुद्दे आणतोय.

आता त्याने ०-२५,२५ ते ५० असे बॉल आणले. म्हणजे परत वी आर गोईंग इन सर्कल्स ही चर्चा सुरूहोताना मी ऋन्मेशला विचारले होते की त्याला "स्ट्राईक रेट" कन्सेप्ट माहिती आहे का? तर आता परत तेच ०-२५ वगैरे. धोणी जेंव्हा हळू खेळतो तेंव्हा तो विकेट न पाडण्याचे देशहित पाहतो आणि सचिन जेंव्हा सो कॉल्ड हळू खेळतो तेंव्हा तो देशहित विरोधी !

तेंव्हा ऋन्मेशला त्याच्या समजूतीवर सोडून द्या. तो जे म्हणेल ते नेहमीच खरे असते. (फक्त त्याच्यासाठीच हे मनात म्हणून घ्या अन गप्प बसा.)

चौदा वेळा बाद झाल्याने २१ ची सरासरी काढली आहे ती फक्त ८५-१०० मधल्या धावांमधली आहे. म्हणजे फक्त १५ धावा काढायच्या होते तिथे २१ काढल्या गेल्या आहेत मग strike rate 100+ झाला.
कि
०-८५ मधल्या 1801 ला १४ ने भागून येणारा average १२८.६. आता हा आकडा त्याच्या करीअर सरासरी विरुद्ध कम्पेअर करा.

enough गोंधळ झाला ना ?

>>>>>

१५ धावा काढायच्या होते तिथे २१ काढल्या गेल्या Lol
असामी तुम्ही हे गणित मुद्दाम उलटेसुलटे मांडत आहात ना. Happy
आणि त्या १८०१ ला १४ ने का भागत आहात, या उदाहरणात फक्त ८५ + खेळी घेतल्या आहेत, त्यासाठी त्याचा ८५ च्या आधी बाद झालेल्या खेळीही घ्याव्या लागतील, उलट हे १४ जे तो ८५ नंतर जाऊन बाद झाला आहे ते यातना खरे तर वगळायला हवे Happy

परत तुझ्या वरच्या पोस्ट्चा 'सचिन १०० च्या जवळ आल्यावर चाचपडतो इ हे कसे संघहिताच्या विरुद्ध आहे' ह्या मुद्द्याशी काय संबंध हा tangent आहेच मला.
>>>
या आधी आपण वरच्या सरासरीच्या गणिताबद्दल बोलूया, ते जर आपण सिरीअसली लिहिले असले तर त्यातील चुका सुधारायला हव्यात अन्यथा माझा मुद्दा आपल्याला क्लीअर होणार नाही Happy

केदार,
एखाद्यात १००० गुण असले आणि एक गुण नसला तर तो स्विकारण्यात काय कमीपणा आहे हे मला पुर्ण चर्चेत समजले नाही. बरे त्यातही मी हा सो कॉल्ड दुर्गुण सचिनमध्येच आहे असेही कुठे लिहिले नाही. त्याचे जस्टीफिकेशन माझ्यामते मानवी स्वभाव हेच आहे. याचा अर्थ जे जे फलंदाज मानव आहेत त्या सर्वांना ते कमी अधिक प्रमाणात लागू. पण आपण तिथेही सचिनला डिफेंड करायचा हट्ट का धरतो.

बाके सचिनला कोणी किती पाहिलेय यावर त्याच्या मताला किती किंमत द्यायची हे ठरणार असेल तर आपण विनोद कांबळीला इथे बोलावून त्याचे मत घेऊया. Happy

शतक आले कि खेळाडूला तणाव येणे हे स्वाभाविक आहे ऋन्मेऽऽष..

फक्त सचिन अतितणावग्रस्त व्हायचा :):-)

या आधी आपण वरच्या सरासरीच्या गणिताबद्दल बोलूया, >> ज्या तर्‍हेने तू ८०+ चा भाग average नि strike rate साट्।ई वापरतो आहेस त्यावरून तुला statistical distribution ह्याबद्दल माहित आहे असे मला तुझ्या पोस्ट वरून वाटत नाही. यामूळे ह्यावर माथेफोड करण्यात काहीच अर्थ नाही. तुझ्याकडे कसलही मुद्दा नसून तू नुसताच इथे टाईमपास करतो आहेस अशी माझी खात्री झाली आहे (तू एरवी क्रिकेट बाफावर असतोस त्यामूळे मी तू genuine वाद घालतो आहेस असे वाटत होते म्हणून उत्तर देत होतो) ह्याबद्दल तुझा त्रिवार निषेध असो.

पगारे ,अहो सचिन,नि धोनी बाजूला ठेवा नि प्रबोधनाकडे लक्ष द्या. वेळ फुकट जातोय.

असामि, लेखन ही माझी आवड आहे आवडित वेळ फुकट नाही जात. हो पुजापाठ करत बसलो असतो तर तो वेळ नक्किच वाया गेला असता.

असामी, मान्य करा हो ऋन्मेऽऽष च statistical analysis. त्याच्या मते कदाचित हे सुद्धा बरोबर असेल : "According to statistics, every human being on earth has, on average, one Br*** and one Tes*****"

ज्या तर्‍हेने तू ८०+ चा भाग average नि strike rate साट्।ई वापरतो आहेस त्यावरून तुला statistical distribution ह्याबद्दल माहित आहे असे मला तुझ्या पोस्ट वरून वाटत नाही.
>>>>>>

statistical distribution सारखे भारी शब्द नका वापरू हो., मी दहावी पर्यंत जेवढे गणित शिकलोय त्यावरून मला तरी माझा हिशोब बरोबर वाटतोय. जास्त उलगडून सांगेन माझ्या परीने, पण मला अजून विश्वास बसत नाही की ते १५ धावांसाठी २१ धावा आणि त्या १८०० ला १४ ने भागणे वगैरे आपण मस्करी करत नव्हता ..

या पद्धतीने आपण फक्त सचिनच्या शतकी खेळींना वेगळे करूया आणि त्यांचीच सरासरी काढून त्याला एकदिवसीय क्रिकेटचा डॉन ब्रॅडमन घोषित करून टाकूया Happy

सचिनसारखे हजारो प्लेयर एका Bradmanchi बरोबरी करु शकत नाही.
>>

हे तुम्ही सांगायची गरज नाही पगारे ... डॉन आधीच काय सांगायचे ते सांगून गेलेत Wink

असामी ... जाउदे! राहू दे. आधीच सांगितल होत, स्मार्ट आणि अनुभवी लोक, डेटा कधीच मान्य करत नाहीत Proud

सचीन ने आयपील मधे भाग नाय घ्यायला पाहीजे होता कारण तो 'भारत रत्न ' होता . अशा विकायला आसनार्या गोष्टी रत्न हिरे माणीक मोती नसतात ,अन देव तर मुलीच नसतात त्या काचेच्या चमकनार्या कवड्या आसतात, तुम्ही पैसे द्या अन घरी घेउन जा काम झाल की दुसर्याला विका .

सचीन काही महान वगैरे नव्हता असलाच तर तुमच्या आमच्यापेक्षा थोडा चांगला संसारीक होता, आहे .
Happy

bumrang | 17 October, 2015 - 13:54
0
Vote up!
अरे आवरा.... नाहीतर धाग्याचे नाव तरी बदला>>>>>. +१

पगारेंचं सांगता येत नाही. शास्त्री ला न बघता सुद्धा त्यांनी सचिन ची पुर्ण कारकीर्द पाहिली आहे. मग त्यांनी ब्रॅडमन ला तर अ‍ॅडलेड च्या गल्ली क्रिकेटपासून पाहीलं असेल Wink

एका दिवसात ब्रॅडमनने त्रिशतक मारल्याचे एकुन आहे.इथे लोक शतकालाच संथ होतात.पुर्ण कारकिर्दित २५०रन् काढायचे वांदे ३०० आकडा तर जादुईच ठरला असता.मोठ्या इनिंग खेळण्यासाठी कौशल्य नि गुणवत्ता लागते.

चला धागा लाईनीवर आणूया ..

हॅटस ऑफ टू विराट कोहली.
त्याची एवढी मजेशीर ईनिंग आजवर पाहिली नव्हती.
खेळून गेम केला.
शर्मा जाताच मी आमच्या ग्रूपवर भविष्यवाणी केलेली की आता धोनी येईल आणि कोहली नेमका कसा खेळेन आणि आपण कसे हरू.
एकेक गोष्ट खरी ठरली, एकेक गोष्ट ..

तुला क्रिकेटमधलं नक्की काही कळतं का रे? दक्षिण आफ्रिकेनं बोलिंग एवढी मस्त टाकली हे कबूल करायला तुला काही प्रॉब्लेम आहे का? "कोहलीनं गेम केला" असं म्हणून तू आफ्रिकेच्या टॅक्टिक्सवरती प्रश्नचिन्ह टाकतोयस.. कळत नसेल तरी सगळीकडं बोललंच पाहिजे का?

बघणं बंद नाही करू शकत कारण क्रिकेटवरचे प्रेम.
आणि कमेंट करतोय त्यामागेही क्रिकेटवरचे प्रेम.

Lol तरीपण त्यांच्या क्रिकेटिंग स्किल्स आणि टॅक्टिक्सवरती प्रश्नचिन्ह टाकतोस? चांगला क्रिकेटप्रेमी आहेस.. कीप इट अप Happy

एकदा नक्की कर.. कोहलीनं गेम केला की आफ्रिका चांगली खेळली.. एकदा नक्की कर की क्रिकेट चालू आहे की नाही.. आणि ते नक्की झाल्यावर तुझ्याजवळच ठेव.. पोस्ट नको करू Happy Light 1

आज परत धोनीनी बॅटींग ऑर्डर चेंज केली... रोहित गेल्यावर रहाणे आला असता तर कदाचित फरक पडला असता...

पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये ५, ६ आणि ७ नंबरल चांगले बॅट्समन पाहिजेत अशीही कमेंट केली आहे... आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.. स्वतः त्या नंबरवर नीट खेळू शकत असताना दुसर्‍या कोणाला तिथे खेळवण्याची काय गरज आहे...

अरे परवाच धोनी म्हणाला होता ना, की आत्ताच्या प्लेयिंग ११ मधे त्याला स्वतःला प्रमोट करायला वाव नाहीये. मग आज काय झालं? रहाणे ला खेळवायचं नसेल, तर सरळ बाहेर बसव ना. हा काय खेळखंडोबा लावलाय? आजची मॅच धोनी ला स्वतःच्या आवाक्यातली वाटली (टुकु टुकु खेळायचं, शेवटपर्यंत ओढायचे, आणी मग शेवटी मोठे शॉट्स मारून हिरो व्हायचं) म्हणून आला वर. पण नाही जमलं. Sad

पगारे, दुसर्यांनी केलेली असंबद्ध विधानं कळतात, मग स्वतः करताना तो नीरक्षीरविवेक कुठे जातो?

अरे परवाच धोनी म्हणाला होता ना, की आत्ताच्या प्लेयिंग ११ मधे त्याला स्वतःला प्रमोट करायला वाव नाहीये. मग आज काय झालं? >> हो हे कळले नाही नक्की काय होते राव. Sad

आज कोहली नि धोनी ने तिसाव्या ओव्हर नंतर नक्की काय ठरवले देव जाणे !

कालच्या सामन्याचे लॉजिक सध्या चालू असलेल्या राजकारणातच आहे. पण दुर्दैवाने कोणाला ते ग्रुहितकच मान्य नाही.

धोनीला कल्पना होती की सामना जिंकायचा आहे तर आपल्यालाच पुढे उतरावे लागणार. कोहली आणि रहाणे काही जिंकून देणार नाहीत. त्याच्या दुर्दैवाने रैना खेळत नाहीये. म्हणून आला पुढे.

जर सारे काही ठिक असते तर गेमप्लान असा असता की धोनी जसा खेळला तसेच त्याने खेळावे आणि कोहलीने आपल्या नेहमीच्या शैलीत झटपट धावा जमवाव्यात. मात्र कोहली चांगल्या सुरुवातीनंतर स्लो झाला आणि मारायचे प्रेशर धोनीच्या खांद्यावर टाकले. धोनी बिचारा. त्याने मारले असते तर कदाचित कोहली थोडा आणखी स्लो झाला असता आणि जर धोनी मारण्यात बाद झाला असता तर सामना कोहली तसाही जिंकवून देण्याच्या मूडमध्ये नव्हताच. धोनीला त्याक्षणी वाटत असेल की हा बाद झाला तर बरे होईल. पण कोहली सुद्धा सामन्याची सूत्रे धोनीच्या हातात सोपवून जायला तयार नव्हता. या सर्व नादात विकेट हातात असूनही आपले दोन आक्रमक फलंदाज फटकेबाजी न करता बस सामना पुढे पुढे नेत होते. धोनी बाद झाल्यावर योग्य वेळ येताच हाल्फ शॉट खेळून कोहलीसुद्धा बाद झाला.

अरहाणे वर येऊनही काही उपयोग झाला नसता. त्याचा स्ट्राईक रेट बघा मागचा. सुरुवातीला भरपूर बॉल खायचे . म्हणे सेट व्हायचेय.मग आस्किंग रन रेट वाढला की येडपटासारखे आडवे तिडवे शॉट मारायचे. विकेट जपून ठेवून खेळताहेत म्हणे. शेवट्च्या ७-८ षटकात दहाच्या दहा विकेट शिल्ल्क ठेवल्या तरी काय होणारे रेट ७-८ च्या पुढे गेल्यावर. मग दर बॉलल्ला विकेट टाकतात. कालचे स्ट्राईक रेट कसोटीला शोभेसेच होते. हरभजन आणि अक्शर पटेल वगळता !!

बाबा ऋन्मेऽऽष ,

माझ्या एका प्रश्नाच उत्तर देशील . इतर प्लीज जमल तर थोडा वेळ काही लिहू नका . मला त्याच्या कोलांट्या उड्या पहायच्या आहेत .

तुझ्या मते काल कोहलीने गेम केला . मुद्दाम हळू खेळला . मग धोनीने किमान रन अ बॉल तरी खेळाव ना त्यावेळी ?

पहिल्या २६ चेंडूत २६ काढणार्या धोनीने पुढच्या २२ चेंडूत केवळ ७ धावा काढल्या .

यावर तुझ काय म्हणण आहे ? की धोनीला स्प्लिट पर्सनालिटी असून त्यानेच स्वतःवर गेम केला ?

नक्कीच त्या स्लॉटमध्ये धोनीने स्लो होत स्वताच्या पायावर कुर्हाड मारली. बहुतेक तेव्हा रबाडा की मॉर्केल चांगली गोलंदाजी करत होता पण खास करून ताहिरने बूच लावलेला. धोनीला त्याचे बॉल समजेनासे झालेले. गोची अशी होती की धोनी विकेट फेकूही शकत नव्हता. अन्यथा सूत्रे कोहलीच्या हातात गेली असती. यात स्प्लिट परसनलिटी काही नसून ती त्याची स्टाईलच आहे. जे बॉलर झेपत नाहीत त्यांना उभे राहायचे आणि जो झेपेल त्याला वन टू वन मध्ये फोडायचे.

Happy

अरे बाबा , तू अस म्हणतोयस की सेट झाल्यावरही धोनी २२ चेंडूत ७ धावा काढू शकत होता . किमान रन अ बॉल सुद्धा त्याला काढता येत नसतील २६ चेंडूनंतर तर याचा अर्थ काय घ्यायचा ?

काल धोनी च्या बॅटीतून २६ बॉल मधे २६ रन्स केल्यानंतर २१ बॉल मधे अवघे ७ रन्स कसे काय निघाले ?
विकेट वाचवून खेळायचे धोरण होते तर त्याबरोबर बॉल देखील वाचवायचे धोरण असायला हवे. हातात आलेला विजय अक्षरश: फेकून दिला. ठिक आहे ३५ ओव्हर्स पर्यंत दबाव होता टिकून राहणे महत्त्वाचे होते परंतू त्यानंतर ८ विकेट हातात असताना किमान ४-५ ओव्हर तरी ६-७ रनरेट अपेक्षित होता. धावगती वाढवण्याचे प्रयत्न अजिबात दिसून आले नाही. जगातील सर्वोत्तम रन चेसर विराट कोहली आणि जगातील सर्वोत्तम फिनिशर धोनी मैदानात चांगला जम बसलेला असताना ३६-३७ व्या ओव्हर नंतर गिअर बदलेला बघायला मिळेल अशी आशा होती. पण दोघे ही संथ खेळून ३र्या पॉवरप्ले येण्याची वाट बघत होते. आणि शेवटी तोच निर्णय अंगलट आला पॉवरप्ले मधे रन्स तर आलेच नाही वर विकेट देखील गेल्या. रहाणेला आल्याबरोबर फटाकेबाजीच करावी लागली तो वर रनरेट १२ पर्यंत पोहचलेला. मग या दोघांनी २० ओव्हर काय केले हा प्रश्न उभा राहतो. सर्व दबाव जर शेवटीच आणायचा होता तर धोनी वर कशाला आला ? दबाव कमी करायला की वाढवायला ? विराट ने देखील मधे मधे फटके मारण्याचा प्रयत्न केला नाही जणू काही त्याला विकेट कमी धावांवर गमवण्याची भिती सतत वाटत होती. स्वतःच्या धावा करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतला. ५० धावा झाल्यानंतर तरी थोडी रिस्क घेऊन ५-६ च्या धावगतीने रन्स काढायच्या होत्या पण २५व्या ओव्हर नंतर धावा कुंथुन कुंथुन काढत होते. त्यात स्टेनचा रिव्हर्स स्विंग आणि इम्रान , राबडा (काय नाव आहे रे याचे) यांनी उत्कृष्ट बॉलिंग करून जखडून ठेवलेले.

3rd Wicket: 50 runs in 73 balls (V Kohli 20, MS Dhoni 29, Ex 1)
Powerplay 3: Overs 40.1 - 50.0 (Mandatory - 67 runs, 4 wickets)

या दोन चरणांमुळे मॅच ची दिशा भरकटली

पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये ५, ६ आणि ७ नंबरल चांगले बॅट्समन पाहिजेत अशीही कमेंट केली आहे... >>>
रहाणे बळीचा बकरा होण्याची भिती वाटत आहे. कुठल्याही नंबर वर येऊन चांगलं खेळण्याचा त्याचा आतापर्यंतचा इतिहास, ह्या असल्या अती प्रयोगामुळे त्याच्या कारकीर्दीवर परिणाम करु नये एवढीच अपेक्षा.
विराट आणि धोनी दोघांच्या 'पहले आप, पहले आप ' (फटकेबाजी सुरु करण्याबाबत) च्या संभ्रमात मॅच हातातून गेली. तितकंच श्रेय द.आफ्रिकेच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनाही अर्थात! कोणी एकाने फटकेबाजी सुरु केली असती, तर कदाचित द.आफ्रिका सुद्धा गडबडली असती. जर-तर च्या गोष्टी शेवटी !

धोनीला कल्पना होती की सामना जिंकायचा आहे तर आपल्यालाच पुढे उतरावे लागणार. कोहली आणि रहाणे काही जिंकून देणार नाहीत. त्याच्या दुर्दैवाने रैना खेळत नाहीये. म्हणून आला पुढे. >> ह्या विधाना इतके हास्यास्पद विधान नाही दुसरे...

ह्या विधाना इतके हास्यास्पद विधान नाही दुसरे...
<<

+१
राहणेला सहाव्या क्रमांकावर पाठवणे हा शुध्द मुर्खपणा होता धोनीचा.
काल मॅच पहात असतान, ह्या बदलेल्या बॅटिंग ऑर्डरमुळे धोनीला, इथले उपस्थित प्रेक्षक देखिल शिव्या घालत होते.

.

किमान रन अ बॉल सुद्धा त्याला काढता येत नसतील २६ चेंडूनंतर तर याचा अर्थ काय घ्यायचा ?
>>
प्रेशर डूड प्रेशर !
लोकांना वैयक्तिक शतकाचेही येते, इथे तर त्याची कप्तानी आणि कारकिर्द डावाला लागली आहे.

क्रिकेटकरता वेगळा धागा आहे ना. इथे धोनी, रैना,तेंडुलकर, गल्ली क्रिकेट, आयपिएल, कपिलदेव बीसीसीआय वगैरे चर्चा करण्यात काय अर्थ आहे. मुळात धागा का व त्यात काय चर्चा अपेक्षीत आहे? Uhoh

Pages