महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2015 - 17:02

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.

ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..

खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.

रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.

योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.

पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!

विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.

पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.

एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्‍यानंतर दाट झाल्या असतील.

बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.

आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.

मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?

आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.

कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."

उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.

थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.

याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?

जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.

एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.

.........

यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"शास्त्रिचा खेळ मी पाहिलेला नाही" आणी "सचिनची पुर्ण कारकिर्द मी पाहिली आहे " - ह्या दोन विधानात तुमचं तुम्हाला तरी सुसंगती आढळते का ते बघा पगारे.

वेल प्लेड धोनी!

धोनी वरिष्ठ खेळाडूंशी कसाही वागला असला तरी कोहली वगैरे मंडळींपेक्षा तो नेहमीच जवळचा वाटतो!

आज त्याने चांगले खेळावे असे वाटत होते!

फेरफटाका, सचिन आल्यानतर अवघी २ते३ वर्षे शास्त्रि खेळला ती त्याची शेवटची वर्षे होती उमेदीचा काळ नव्हता त्याचा खेळ इतका आठवत नाही. सचिन मात्र २४ वर्षे खेळला म्हणुन त्याचि कारकिर्द माहित आहे असे विधान केले.

त्याचे सर्व सामने मि पाहिलेत.त्यावरुनच मत बनवलेय.मिडियाने हाइप केलेला प्लेयर आहे तो.त्याच्या समकालिन प्लेयरमध्ये लारा,कॅलिस,जयसुर्या हे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने सरस होते >> थोडक्यात तुमचे वैयक्तिक मत आहे ज्याला कसलाही unbiased पुरावा नाही. तुमचा आकडेवारीवर विश्वास नसल्यामूळे कसलाही इतरांना मान्य करता येईल असे काही argument तुम्हाला देता येणार नाही हे उघड आहे.

सचिन साधारण ९००डाव खेळला असावा त्यापैकि किती सामने शेवटपर्यत टिकुन त्याने जिकुन दिले असावेत १० सामनेही नसावेत.

पगारे,क्रिकेट लोकांचा वेळ आणि पैशाची बरबादी करणारा खेळ आहे.

जो पाकिस्तान आणि भारतात जास्त प्रमाणात खेळला जातो.
त्यात मॅच फिक्सिंगचे आरोप होत राहतात जे खेळ फिक्स करुन खेळले जातात त्यात वेळ आणि पैसा का घालायचा? मुलांचे अभ्यासाचे नुकसान होते ते वेगळेच.

भले फक्त खेळाडुंचे होते.खेळाचे पैसे, जाहिरातिचे पैसे, भारतरत्न वगैरे.......

पगारे, मी संपुर्ण क्रिडाक्षेत्राबद्दल नाही सांगू शकत पण क्रिकेट मधील खुप माहित आहेत.

तुमच्याकडेच सर्व विषयांवरील दिव्य ज्ञानाचा भंडार आहे. :फिदी

अहो सचिन निवृत्त झाला. he did what he had to do. सोडा आता (त्याला). धोनीदेखील होईल लवकरच. आता विराटला धरा.

पगारेजी धोनी हा उत्तम फिनिशर आहे हे मान्यच आहे पण ओपेनिन्ग
प्लेयर इज टोटली डिफरन्ट गेम प्लेयर हे तुम्हाला क्रिकेटरच सान्गतिल.
सामन्याच्या सुरवातीला बॉलर आणि फिल्डर जोशात असत्तत अशा वेळी उत्तम टेक्निक असलेलाच खेळाडु जास्त वेळा सक्सेसफुल होतो.
सचिन हा वन डे मधला सर्वोत्कृष्ठ प्लेयर होता आणि राहिल.

१) त्याचे आव्हरेज फॉर ओपनर (ज्या काळात तो खेळला)
२) हायेस्ट पर्सेन्टेज ऑफ मॅन ऑफ द मॅच अ‍ॅवार्द्स (त्यातुन ऑसीज विरुद्ध काही १२० + सामन्यात १७ वेळ, लक्षात घ्या सामन्यात २२ खेळाडु असतात)
३) वल्डकप मधिल स्कोरिन्ग ( २ वल्ड्कपमध्ये हायेस्ट आण एकात सेकन्ड हायेस्ट स्कोर)

हे काय उगाच आहे?
जाउ द्या धोनी आज उत्तम खेळला.

पगारे,क्रिकेट लोकांचा वेळ आणि पैशाची बरबादी करणारा खेळ आहे.
>>
हेच म्हणतो! देवाने निवृत्ती घेतल्यापासन एकपण सामना पहिला नाही मी. तसै सचिन बाद झाल्यावर मैच बंद करून कामाला लागायचं!

त्यात जी ५३ शतके दिलीत ते सामने इतर प्लेयर जिंकुन द्यायचे.आकडेवारी ही फसवी असते त्याने प्लेयरचे मुल्यमापन योग्य होत नाही.
>>

कस्क्याय म्हणजे सचिन आउट झाल्यावर दुसऱ्या मंडळींनी रन काढून सामने जिंकून दिले म्हणायचं काय तुम्हाला?

>>ऋन्मेष,धोनि चमकला बर तुझा>> पगारे, तुम्ही एवढा वेळ धोनी चे गुणगान करत होता आणी आता धोनी "ऋन्मेषचा" झाला?

पगारे, माझी ह्या धाग्यावर पहिली पोस्ट तुम्ही सार्थकी लावलीत.

असो भारतीय संघ जिंकला त्यामुळे आनंदी आहे. राजकीय साठमारी करण्यासाठी अनेक धागे आहेत.

पगारेंना कधीतरी कुणीतरी उदाहरणार्थ रॅशनल वगैरे म्हटले होते, त्याची आठवण होऊन हसायला आले. Proud

<<<<सचिनची पुर्ण कारकिर्द मी पाहिली आहे तो दबावात डगमगणारा सुमार खेळाडु होता >>>

अतिशय हास्य स्फोटक विधान !!

सचिनने
१. सर्वाधिक शतके ( एक दिवसीय आणी टेस्ट मॅच मध्ये) ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली आहेत.
२. सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळालेली आहेत.

http://sachinandcritics.com/sachin_scored_against_big.php

पगारे,धोनी ची बाजु चिवटपणे लढल्याबद्द्ल तुमचे पण अभिनंदन.

सचिनचे अचुक मुल्यांकन केल्याबद्द्ल पण.

ऋन्मेष ह्या धाग्यावर एकटाच धोनीचि खिंड लढवत होता त्याचा विश्वास खरा ठरला.ह्या धाग्यापुरता धोनी त्याचाच आहे.आणि माझ्यामते धोनी हा इतर सुमार प्लेयरपेक्षा नक्कीच ग्रेट आहे.

धोनी चे आम्हीही फॅन्स आहोत हो. ऋन्मेष एकटा बिकटा काही लढवत नाहीये इथे. फक्त आम्हाला इतर खेळाडूंबद्दल काड्या घालायच्या नाहीयेत.

पगारेंच्या विधानांना क्रिकेट बेस्ड उत्तर देउन काही उपयोग नसतो. थोड्या पोस्ट येउन गेल्या की थोड्या वेळाने परत तसेच काहीतरी बेसलेस विधान ते परत करतात. अनेकदा त्यांची सचिन बद्दलची आकसयुक्त वाक्ये खोडून काढलेली आहेत. पण त्यांचा आकस आहे तो बदलण्याचे काम आपले नाही. तेव्हा जाउदे. त्यांना सचिन सुमार वाटत असेल तर त्यांचे मत त्यांच्याकडे.

एक उदाहरण देतो. इथे मिळेल
http://www.maayboli.com/node/51908?page=6

त्यांनी एकदा ठोकून दिले की अ‍ॅलन बॉर्डर कर्णधार असताना भारतात आला व सचिन पेक्षा आम्हाला अझर ची भीती वाटते असे म्हणाला. आता बॉर्डर कॅप्टन असताना जेव्हा ऑसीज भारतात आले, तेव्हा सचिन टीम मधेच नव्हता (पदार्पणही केलेले नव्हते) अशी वस्तुस्थिती सांगितली, तर मग ऋन्मेष म्हंटला की कदाचित बॉर्डर कॅप्टन नसेल तेव्हा पण खरे असेल.

क्रिकेट बद्दल असे अंधाधुंद बोलून चालत नाही, विशेषतः तुम्ही जेव्हा एखादा जगन्मान्य खेळाडू सुमार आहे म्हणता. नाहीतर मग काय ही चर्चा अशा वाटेने जाईलः
- बॉर्डर कॅप्टन नसेल पण संघाबरोबर आला असेल
-> नाही संघाबरोबरही नाही आलेला नंतर कधी
- मग बॉर्डर नसेल. दुसरा कोणीतरी म्हंटला असेल
-> नाही १९९० नंतर सचिन बद्दल असे कोणी म्हंटला असता तर इतके दिवस लपून राहिले नसते
- मग सचिन बद्दल म्हंटला नसेल, दुसर्‍या कोणाबद्दल तरी म्हंटला असेल. पण तरीही सचिन सुमार आहे
Happy

सकुरा आज्जी, पपगारे यांचे कर्तृत्व सचिन रमेश तेंडुलकर यांच्या सारखे नाही म्हणून.

आणि कदाचित शिकवणी सोडली नाही तर....... आकसाचे नाही तरी तुमच्या सारख्या आयडींचे खरे कारण सर्वांना कळले आहे.

काय योगा योग पहा माझ्या नातु चे नाव पण नरेश मानेच आहे.
कालच मी सांगितलेल माझ्या नातेवाईकात माने भरपुर आहेत.
'जिवो बेटा' आज्जिचा अशिर्वाद.:)

आज हा बीबी वाचला. खरंतर धोनीचे अभिनंदन लिहायला आले होते पण सचिनविषयीच्या पोस्ट्स वाचून भयंकर गंमत वाटली.

आयपीएलसाठी तीन सीझन्स आणि चँपियन लीगचे दोन सीझन काम केल्यानंतर समजलेल्या काही गोष्टी:
१. सचिन तेंडुलकर सांघिक खेळाडू म्हणून सर्वोत्तम आहे. टीव्हीवर बघताना (जाहिरातींमुळे असेल) त्याचा सहज वावर, प्रत्येक खेळाडू (मग तो प्रतिस्पर्धी का असेना) त्याने दिलेली दाद आणी प्रोत्साहन हे केवळ बघण्यासारखं. बाऊंड्रीबाहेर गेलेला चेंडू कुणाही प्रेक्षकाकडून घेताना सचिन त्याला हसून धन्यवाद म्हणून शकतो. (गेमचं प्रेशर वगैरे सर्व काही)

२. सचिन टेक्निकली ब्रीलीयंट आहे. याचा पुरावा म्हणून त्याचे "प्रतिस्पर्धी" म्हणून गणल्या गेलेल्या लोकांच्या त्याच्याबद्दलच्या कमेंट वाचा.

३. सचिन "व्यक्ती" म्हणून सर्वोत्कृष्ट आहे. हा माझा स्वानुभव. चालावागाबोलायची पद्धत आणि नम्रता हे त्याचे गुण वाखाणण्यासारखे. सेलीब्रीटी म्हणून अजिबात न मिरवणारे जे खेळाडू पाहिले त्यामध्ये सचिन, बाऊचर, लक्ष्मण आणि आमचा द्रविड. "देसाई म्हणजे मराठीच ना? मग मराठीत बोलूया" असं सहजपणे बोलणारा सचिन केवळ मैदानात नाही तर प्रत्यक्षातसुद्धा देवमाणूस भासतो.

सकुरा आज्जी, तुम्ही मला त्यासाठी रितसर विपु किंवा संपर्कातून मेल करून कळवू शकत होतात.

ह्या पुढे धाग्याबाह् विधाने करणे असतीलच तर तिथे संपर्क साधावा.

बाकी, आईवडिलांची, आशिर्वादाची आणि सत्य कर्माची पुण्याई आमच्या पाशी आहे.

सकुरा आज्जी, तुम्ही मला त्यासाठी रितसर विपु किंवा संपर्कातून मेल करून कळवू शकत होतात.

ह्या पुढे धाग्याबाह् विधाने करणे असतीलच तर तिथे संपर्क साधावा.

बाकी, आईवडिलांची, आशिर्वादाची आणि सत्य कर्माची पुण्याई आमच्या पाशी आहे.

माने, सुरवात तुम्ही केली आहे.

नरेश माने | 14 October, 2015 - 12:51

सकुरा आज्जी, त्यांचे कर्तृत्व सचिन रमेश तेंडुलकर यांच्या सारखे नाही म्हणून. >>>

माझ्याशी आज्जी चे नाते तुम्ही जोडले आहे. काय गरज होती का?
मग मी नातु म्ह्टले तर काय चुकले?.

नरेश, तुमच्या विचाराची बुलेट ट्रेन चुकीच्या मार्गाने चालली आहे तुम्हाला वाटते की सचिनबद्दल मला आकस आहे.मी कुणाबद्दलही आकस का बाळगु.परंतु तो एक प्लेयर म्हणुन मला नेहमीच सुमार वाटला.हो त्याला भारतरत्न दिला तेव्हा मात्र वाईट वाटले होते.

पुढिल सर्व वार्तालाप हा धागा भरकटणे हाच हेतू बाळगून असणाऱ्या सदस्यांशी विपुत करण्यात येईल.

शुभरात्री मित्रांनो.

अरे मी सुद्धा धोनीचा मित्र वा सचिनचा शत्रू, असे काही नाहीये.
मी धोनीला वर गावठी तंत्राचा खेळाडू म्हटलेय तसेच त्याच्याबरोबर सचिनला सुद्धा भारतीय क्रिकेटच्या पाच गेमचेंजरमध्ये सामील केलेय. मी मला जे चांगले वाटते त्याला चांगले आणि वाईट वाटते त्याला वाईट बोलतो.
कोणी धोनी आणि सचिन मधील चांगला कसोटी फलंदाज विचारले तर अर्थातच सचिन. कोणी दोघांमधील चांगला कर्णधार विचारले तर नक्कीच धोनी. कोण चांगला एकदिवसीय खेळाडू विचारले तर.. तर पटकन उत्तर नाही देता येणार.. तुलना एका निकषावर होणे शक्य नाही.. भले सचिनच्या लंब्याचौड्या कारकिर्दीमुळे त्याचे पारडे जड झाले तरी धोनी त्याच्या भुमिकेत सर्वश्रेष्ट आहे..

सचिनबद्दल कोणी तो शतकाच्या वेळी चाचपडतो, टेंशन घेतो असे विधान केले तर ते सचिनप्रेमापोटी नाकारण्यापेक्षा कबूल करणे उत्तम. ते दडपण आपल्यालाही टिव्हीसमोर बसून बघताना जाणवते. हा मानवी स्वभावच आहे. क्रिकेट सांघिक खेळ असला तरी आपला विक्रम तो आपला विक्रम. कोणी जर पुढे सरसावून फटकेबाजी करत नव्वदीच्या घरातून शतकाकडे जात असेल तर तो देखील आलेल्या दडपणाला झुगारण्याचाच एक प्रकार आहे.

सचिन आणि धोनीपेक्षा मला दादा कित्येक पटींनी आवडतो. पण कोणी त्यात असलेल्या सतराशे साठ त्रुटींकडे बोट दाखवले तरी मी त्या पटल्यास दादातर्फे प्रामाणिकपणे स्विकारतो.

सचिनला सुमार म्हणने नक्कीच मला कायच्या काय वाटते. अर्थात हे देखील माझे मत झाले.

पण कोणाला सचिन ओवरहाईप वाटत असेल तर येस्स ते असू शकते. एखाद्या संगकाराकडे बघताना वाटते की सचिनला मिळणार्या मानसन्मानाच्या 10 टक्केही त्याला का नाही. तो तुलनेत सचिनच्या एवढे खाली आहे का किंवा त्याच तोडीचा नाही का.. असो, संगकारा हे नाव एक उदाहरण झाले.

सचिन धोनी सोडा आता.. सचिन भूतकाळ झाला, त्यात जास्त रमू नका.. धोनी वर्तमान आहे, त्याला वाचवा.. नाहीतर भविष्यकाळ अतिशय विराट होईल !

आज धोनीने मजा आणली, माझी इच्छा पुर्ण झाली, पण पुर्ण इच्छा म्हणनार नाही, तर ये दिल मांगे मोअर !

अवांतर - कोहलीने आजही अपेक्षेप्रमाणे फलंदाजीत पाटी टाकली, पण त्याच्या नेत्रभरारक झेलांनी मला चकित केले Happy

प्रूफ बाय रिपीटीशन >>> Lol

सचिनबद्दल कोणी तो शतकाच्या वेळी चाचपडतो, टेंशन घेतो असे विधान केले तर ते सचिनप्रेमापोटी नाकारण्यापेक्षा कबूल करणे उत्तम. >>> अरे २० वर्षातील किती शतके समोर बघून बघितली आहेत विचारणार्‍याने, यावरही आहे ते. सचिन शतकाजवळ आल्यावर स्लो होऊन चाचपडला आहे अशी ५ उदाहरणे मी पाच मिनीटात देऊ शकतो, तसेच तो आधीच्याच वेगाने खेळत राहून सिक्स मारून शतक पूर्ण करून गेला आहे अशीही ५ तितक्याच पटकन देउ शकतो. २०-२२ वर्षात त्याच्या खेळाचा पॅटर्न अनेकदा बदलला आहे.

आणि सचिन बद्दल बॅट्समन म्हणूनच हे चालले आहे. कॅप्टन म्हणून दादा, धोनी शी तुलना आम्हीच काय, सचिनही करणार नाही Happy

सचिनच्या खेळाबद्दल अनेक आक्षेप व्हॅलिड आहेत. पण त्यांचा इथे उल्लेखही आलेला नाही. चर्चा मुद्द्यांवर व्हावी म्हणून मलाच ते शेवटी द्यावे लागतील येथे. पिक्चर मधे फाईट बराबर की व्हावी म्हणून गन नसलेल्याच्या हातात हीरो एक गन देतो तशी Happy

सचिनबद्दल कोणी तो शतकाच्या वेळी चाचपडतो, टेंशन घेतो >> बंधो वरती ह्या संदर्भात आलेली विधाने तो माणूस म्हणून चाचपडतो अशा स्वरुपाची नसून तो त्याच्या स्वार्थासाठी म्हणजे वैयक्तिक स्कोरसाठी संघाला पाठी ठेवून संथ होतो अशा संदर्भात आलेली आहेत. सचिनबाबात इतर आरोप समजू शकतो पण हा आरोप असा फक्त आरोप करणार्‍याच्या समजेची कुवत दाखवतो असे मी म्हणेन.

एखाद्या संगकाराकडे बघताना वाटते की सचिनला मिळणार्या मानसन्मानाच्या 10 टक्केही त्याला का नाही. तो तुलनेत सचिनच्या एवढे खाली आहे का किंवा त्याच तोडीचा नाही का.. असो, संगकारा हे नाव एक उदाहरण झाले. >> काय आहे कि ज्या दिवशी एखाद्या संगकाराला त्याच्या देशातल्या 'हा फक्त खेळ आहे नि जीवन मरणाचा प्रश्न नाही' हे न उमगता अवास्तव अपेक्षा बाळगणार्‍या लोकसंख्येचे ओझे घेऊन प्रदीर्घ कारकीर्द एक सातत्य दाखवत खेळावी लागेल तेंव्हा हा मुद्दा मांडणे जास्त अचूक ठरेल. (हे माझे मत नसून रिकी पाँटींग चे आहे.)

"Tendulkar has carried the burden of the nation for 21 years. It is time we carried him on our shoulders." - Virat Kohli

फारेण्ड , असामी .. कुणाला आणि कशाला समजवायला जाताय राव ! ...

बाकी इथे विनोद नाही तर महा-विनोद-वीर पगारे यांची हास्यस्फोटक विधाने वाचून आजची करमणूक झालेली आहे Proud

व्वा बिनपगारी मजा आला !!!

मी धोनीला वर गावठी तंत्राचा खेळाडू म्हटलेय तसेच त्याच्याबरोबर सचिनला सुद्धा भारतीय क्रिकेटच्या पाच गेमचेंजरमध्ये सामील केलेय

>>

भयंकर हसलो! ह्यांना मायबोलीचा पुल्तीझर वगैरे काही पुरस्कार असेल तर देऊन टाकण्यात यावा! नै म्हणजे आपण धोनीस गावठी तंत्राचा खेळाडू म्हणत आहोत आणि 'त्याच्याबरोबर सचिनला' सुद्धा पाच गेमचेंजरमध्ये सामील केले म्हणत आहेत!

नवीन मायबोलीचा विस्डेन काढा आता Proud

Pages