'मृत्युंजय' कर्ण आणि माझा प्रण

Submitted by भागवत on 13 April, 2015 - 05:23

आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.

मग मी कर्णा वरचे भरपूर वाचन केले. प्रत्येक लेखकाने त्यांच्या परीने कर्णावर लिहिले आहे. सगळी कडे कर्ण कमी - जास्त प्रमाणात चांगला दाखवला आहे. कर्ण दानशूर, दान वीर होता हे सगळ्या पुस्तकात आहे. पण 'मृत्युंजय' वाचल्या नंतर कर्णाच दृष्टिकोन कळला. काय रंगवलंय कर्णाला लेखकाने. 'मृत्युंजय' शिवाजी सावंत यांची सर्वोच्च कलाकृती आहे. मला आधी मराठी पेक्ष्या दुसर्‍या भाषेत प्रगल्भ शब्द योजना आहे असे वाटायचे. पण 'मृत्युंजय' वाचून माझा समज खोटा ठरला. काय अप्रतिम शब्द रचना आहे 'मृत्युंजय' मध्ये. एक-एक शब्द पारड्यात तोलून निवडला आहे. एखाद्या कलाकाराची सर्वोच्च कलाकृती वाचून आपण त्या शब्द रुपी पावसात मनसोक्त भिजुन जातो. 'मृत्युंजय' वाचुन मी खुपच प्रभावित झालो. भीष्म आणि कर्ण ने खुप प्रतिज्ञा केल्या. मला वाटते की त्यांची प्रतिज्ञा आणि जीवन भर त्यांनी पाळलेला शब्द हेच त्यांचा जीवनाचे मर्म, असामान्य कर्तृत्व आणि मोठेपण आहे.

मला असे वाटायचे की प्रतिज्ञा निभावणे खुप सोपे असते. त्यामधे विशेष काही नसते असे समजत होतो. मा‍झ्या कडे एक टू-व्हीलर आहे. मग मी सुध्दा एक प्रण केला. एक महिना मी गाडीवरून जाताना जो मागेल त्याला टू-व्हीलर वर लिफ्ट देईल असा प्रण केला. हा प्रण एक महिना निभावणे मला कठीण गेले. माणूस पहिल्यांदा स्वत:च्या सुरक्षेचा विचार करतो. मी कधीही अनोळखी व्यक्तिला निर्जन रस्त्यावर लिफ्ट दिली नाही. मळके कपडे घातलेला मनुष्य दिसला आणि त्याने लिफ्ट मागीतली तर त्यामुळे माझे कपडे खराब होतील म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली नाही. ओळखीच्या लोकांना लिफ्ट दिल्यावर मना मधे कुठे तरी नकळत अपेक्षा होती की ते कधीतरी आपल्या गरजेच्या वेळी लिफ्ट देतील. फक्त शाळेत जाणारी मुले यांना निरपेक्ष वृत्तीने लिफ्ट दिली. प्रतिज्ञा, प्रण घेणे खुप सोपे आहे पण ती प्रत्येक प्रसंगी निरपेक्ष वृत्तीने निभावणे, टिकवणे खुपच कठीण, अवघड काम आहे. त्यामुळे कर्णाला असामान्य व्यक्तिरेखेला माझा मनापासून दंडवत प्रणाम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्याय तसा म्हणला तर सर्वांवरच झालाय....
भिष्माला वडीलांच्या इच्छेखातर प्रतिज्ञा करावी लागली व अखेरपर्यंत ब्रम्हचारी रहावे लागले हा अन्याय नाही का
धृतराष्ट्र राजा असूनही आंधळा असल्याने काही करू शकला नाही हा अन्याय नाही
गांधारीचा विवाह अंधाशी लावला हा तिच्यावर अन्याय नाही का
विदुराची योग्यता असूनही त्याला सतत दासीपुत्र म्हणून हिणवले गेले हा अन्याय नाही का

+१ आशु. त्याने कौटुंबिक नात्यांमधे भयंकर चुका केल्या होत्या. आणि द्रौपदी वस्त्रहरण हा त्या चुकांचा कळस होता. त्या पापाचे फळ त्याला अत्यंत चोख मिळाले आहे.

हा काय आत्ताच्या राजकाऱण्यासारखा वासनेने पछाडलेला, उठसूठ अत्याचार करणारा अन्यायी क्रुर नव्हता. > +१

नालायक लोकांच्या टोळक्या समोर जेव्हा वस्त्र फेडली जातात तेव्हा त्या स्त्री ला काय वाटतं हे ज्याला कळतं तो दुर्योधन , दुशास्नाच्या character ला चांगलं म्हणेल का ? कल्पना करा आपल्या घरातल्या एखाद्या स्त्री सोबत असं घडलं तर ते करणार्याच्या कॅरेक्टर ला चांगलं म्हणाल काय ? कौरवांना , कर्णाला , धृतराष्ट्र , भीष्म ह्या सगळ्यांना त्यांनी ज्या चुका केल्यात त्या सगळ्या गुन्ह्यांसाठी माफ करता आलं असतं . त्यांना सुधारण्याच्या संधी अनेक वेळा दिल्या हि होत्या . पण द्रोपदी सोबत केलेल्या ह्या नीच प्रकारामुळे त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या . तेव्हा त्यांना शिक्षा मिळण योग्यच आहे >>

अगदी बरोबर.. बिचारीवर काय बितली असेल जेव्हा तिला कळल असेल कि तिच्या एक नव्हे तर पाच पाच नवर्‍यांनी मिळून तिला द्युतात लावली .. कठीणे ..
आयुष्यात ज्या व्यक्तीच्या भरोसे आपण एका नविन घरी पाऊल ठेवले त्यांनीच आपल्याला विकून खाणं अस झालय ना .. समोरचे लोक वाईट आहे हे माहीती असुनही भर सभेत ती तुमची दासी आहे तिच्यावर तुमचा अधिकार अस बोलुन पुढ्यात आणून टाकली.. कुणाची चुकी ? अजुनही ज्यांनी वस्त्राला हात लावला, समोर आल्यावर अवहेलना केली त्यांची ..

बर इतकं होऊनही कर्ण तिला अपमानीत करत होता तेव्हा ती काहीही बोलली नाही, का बरे असे ?
तो वाईटच आहे मान्य.. पण म्हणून दॄष्ट , दुराचारी , खोटा , स्वैर हे विशेषणांचे आभुषणं फक्त एकालाच का ?

धृतराष्ट्र राजा असूनही आंधळा असल्याने काही करू शकला नाही हा अन्याय नाही >> धृतराष्ट्र ला फक्त राज्य सांभाळण्या साठी देण्यात आले होते. धृतराष्ट्र आंधळा असून बरेचं काही करू शकला असता पण पुत्र मोह पायी त्याने पांडवा ला खुपं त्रास दिला आहे.

दॄष्ट , दुराचारी , खोटा , स्वैर हे विशेषणांचे आभुषणं फक्त एकालाच का>>>
कारण विषय कर्णाचा चाललाय .
इथे कर्णावर एकट्यावरच ठपका ठेवलेला नाहीये . त्या वेळी उपस्थित असणार्या सगळ्यांवरच ,तिच्या ५ हि नवर्यांवर पण ठपका ठेवला आहे .पण नंतर त्यांनी कौरवांना त्याची शिक्षा दिली म्हणून तो ठपका थोडा धुसर होतो इतकच.
बर इतकं होऊनही कर्ण तिला अपमानीत करत होता तेव्हा ती काहीही बोलली नाही, का बरे असे ? >> लातोन के भूत बातोंसे नाही मानते . तिच्या बोलण्याने त्याच्यावर काय फरक पडणार होता ? फरक पडायचा असता तर तिच्या न बोलण्यानेही तो पडायला हवा होता . कर्ण होताच दॄष्ट , दुराचारी , खोटा .
धृतराष्ट्र राजा असूनही आंधळा असल्याने काही करू शकला नाही हा अन्याय नाही>>
तो गांधारीशी लग्न करून तिचं आयुष्य बरबाद करू शकला . आपल्या मुलांच्या कागाळ्याकडे दुर्लक्ष करू शकला . त्यांच्या हो ला हो मिळवू शकला . आणि त्याच्या १०० मुलांना विनाशाकडे नेवू शकला

तेच तर! अधिच्या सगळ्या चर्चा/मते हे हेच सांगतात की...'महाभारत घडले कश्यामुळे तर कोणीही आपल धर्म/कर्तव्य पाळले नाही. कोणि पुत्र, पुत्रि, भाउ, समाज यान्च्या प्रेमात अडकला तर कोणि प्रतिज्ञेत. डोळे असुन आंधळे होणे, कश्यात तरी वहावत जाणे यामुळे शेवटी युद्ध घडले. कोणात? तर भावा भावात यात भरडल कोण गेल तर सामन्य जनता आणि स्त्रिया (विधवा, नि:संतान होवुन). आणि मग यात देव ही अडकला. मनुष्य देहात येवुन त्यालाही काही प्राक्तन भोगवी लागली. सगळ्याच माणसात- पांडव, कौरव, कर्ण, चांगले वाईट सगळ्यात 'तोच' होता पण त्यालही पक्षपात करावा लागला. एकाची बाजु घेवुन विनाष करायल लागला. का तर 'धर्म' संकटात होता.'

मुळात कोणीहि आपल्या कर्तव्या पासुन चुकले की युद्ध घडतेच.

Proud कठीणे..
शिक्षा केली .. पहिले घोडचुक करायची स्वतः आणि मग मिरवायचं .
ती खुप बोललीय यापूर्वी .. असो परत परत तेच दळण दळायचा कंटाळा आलाय ..

धर्मक्षेत्र - EPIC channel -

पाहत असालच, एकेकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे कृष्ण सोडून. का?

Pages