'मृत्युंजय' कर्ण आणि माझा प्रण

Submitted by भागवत on 13 April, 2015 - 05:23

आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.

मग मी कर्णा वरचे भरपूर वाचन केले. प्रत्येक लेखकाने त्यांच्या परीने कर्णावर लिहिले आहे. सगळी कडे कर्ण कमी - जास्त प्रमाणात चांगला दाखवला आहे. कर्ण दानशूर, दान वीर होता हे सगळ्या पुस्तकात आहे. पण 'मृत्युंजय' वाचल्या नंतर कर्णाच दृष्टिकोन कळला. काय रंगवलंय कर्णाला लेखकाने. 'मृत्युंजय' शिवाजी सावंत यांची सर्वोच्च कलाकृती आहे. मला आधी मराठी पेक्ष्या दुसर्‍या भाषेत प्रगल्भ शब्द योजना आहे असे वाटायचे. पण 'मृत्युंजय' वाचून माझा समज खोटा ठरला. काय अप्रतिम शब्द रचना आहे 'मृत्युंजय' मध्ये. एक-एक शब्द पारड्यात तोलून निवडला आहे. एखाद्या कलाकाराची सर्वोच्च कलाकृती वाचून आपण त्या शब्द रुपी पावसात मनसोक्त भिजुन जातो. 'मृत्युंजय' वाचुन मी खुपच प्रभावित झालो. भीष्म आणि कर्ण ने खुप प्रतिज्ञा केल्या. मला वाटते की त्यांची प्रतिज्ञा आणि जीवन भर त्यांनी पाळलेला शब्द हेच त्यांचा जीवनाचे मर्म, असामान्य कर्तृत्व आणि मोठेपण आहे.

मला असे वाटायचे की प्रतिज्ञा निभावणे खुप सोपे असते. त्यामधे विशेष काही नसते असे समजत होतो. मा‍झ्या कडे एक टू-व्हीलर आहे. मग मी सुध्दा एक प्रण केला. एक महिना मी गाडीवरून जाताना जो मागेल त्याला टू-व्हीलर वर लिफ्ट देईल असा प्रण केला. हा प्रण एक महिना निभावणे मला कठीण गेले. माणूस पहिल्यांदा स्वत:च्या सुरक्षेचा विचार करतो. मी कधीही अनोळखी व्यक्तिला निर्जन रस्त्यावर लिफ्ट दिली नाही. मळके कपडे घातलेला मनुष्य दिसला आणि त्याने लिफ्ट मागीतली तर त्यामुळे माझे कपडे खराब होतील म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली नाही. ओळखीच्या लोकांना लिफ्ट दिल्यावर मना मधे कुठे तरी नकळत अपेक्षा होती की ते कधीतरी आपल्या गरजेच्या वेळी लिफ्ट देतील. फक्त शाळेत जाणारी मुले यांना निरपेक्ष वृत्तीने लिफ्ट दिली. प्रतिज्ञा, प्रण घेणे खुप सोपे आहे पण ती प्रत्येक प्रसंगी निरपेक्ष वृत्तीने निभावणे, टिकवणे खुपच कठीण, अवघड काम आहे. त्यामुळे कर्णाला असामान्य व्यक्तिरेखेला माझा मनापासून दंडवत प्रणाम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांडव स्वर्गारोहणा साठी चालत निघतात. एक कुत्रा त्यांना मार्ग दाखवतो. वाटेत पहिल्यांदा द्रौपदी पडते आणि मृत्यू पावते. तसेच युधिष्ठिराला सोडून ४ पांडव वाटेत मरतात. मार्ग दाखवणारा कुत्रा हा कुत्रा नसून यमराज असतो. यमराज युधिष्ठिराला नर्क दाखवतात. यमराज युधिष्ठिराची परीक्षा घेतात. त्यानंतर पाची पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जातात. (वाटेत पडण्याच्या क्रम या मागे सुद्धा कथा आहे.)

लेखन आणि त्यावरील प्रतिसाद ----

द्रौपदी वस्त्र हरण ह्या घटनेचा विचार केला की पहिले असे वाटते की
- ती काय आणि बाकीचे पांडव हे सर्व काय वस्तु होती असे पणाला लावायला
- भर राज्यसभेत हा बिभित्स प्रकार चाललाय आणि सर्व जण भिष्म, विदुर , द्रोण, भरीस भर स्वतः गांधारी, कुंती हे सर्व बघताहेत, ऐ‍कताहेत
मग अशावेळी फक्त कर्ण गुन्हेगार नाही होऊ शकत

जन्मदात्या आईने जन्मताच सोडणे हे अन्याय कारकच

पांडवांनी युद्ध जिंकले ते केवळ श्रीकॄष्ण होता म्हणूनच

त्याच्या दानशुर पणाचा फायदा घेतला हे ही खरेच

महाभारत हे ह्या सर्व लोकांमुळे, मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या छटां मूळेच जास्त आवडते आणि

म्हणुनच सर्व प्रतिसाद हे छानच आहेत, एकाच घटनेकडे खुप वेगवेगळ्या बाजुनी बघता येते आणि वेगवेगळी मानसिकता अभ्यासता येते. Happy

यक्षचा प्रसंग वेगळा. हिमालयातला वेगळा.. हिमालयात तो कुतर्‍आ मग येतो तो प्रसंग आहे

रायबागान >>> +१
म्हणुनच सर्व प्रतिसाद हे छानच आहेत, एकाच घटनेकडे खुप वेगवेगळ्या बाजुनी बघता येते आणि वेगवेगळी मानसिकता अभ्यासता येते.>> अनुमोदन

.

लेख आणि चर्चा दोन्हीही मस्त.
कर्ण मलाही फार आवडतो त्याच्याबद्दल काहीही वाचण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. धन्यवाद भागवतजी या धाग्याबद्दल. इथली चर्चा वाचण्यासाठी आता सारखच येणं होईल माबोवर.
कर्णाला कुणी कितीही वाईट बोलले तरी माझी त्याच्याबद्दल असलेली आवड, सहानभुती तसुभरही कमी होत नाही.
अवांतर :
कर्ण मला एव्हढा आवडतो की मी एकदा 'प्लँचेट' करताना त्यालाच बोलविणार होते Proud पण ताईने मनाई केली आणि इतरकुणी चौथा साथीदार नसल्यामुळे मला तिचे ऐकावे लागले. :रागः

अती अवांतरः
सोनीवरील 'सुर्यपुत्र कर्ण' केव्हापासुन सुरु होतेय? प्लीज अपडेट द्या ना.

बोलवायचे होते ना भाउ

किमान कवचकुंडल कुठे ठेवली आहे इतके तरी विचारायचे होते. पुढे व्ह्हा मी बनतो चौथा साथिदार Happy

पांडव नरकात गेले का? ह्याविषयी श्रीमन्महाभारत (भाषांतर चिंतामणी वैद्य) ह्या वाचनातून मला जे आठवते ते पुढे लिहिले आहे.

अवांतराबद्दल क्षमस्व.

पांडव आणि दौपदी नरकात गेले नाहीत, अंतिमत: स्वर्गातच गेले, पण एकटा युधिष्ठीर ‘सदेह’ स्वर्गाला गेला. कौरव कुरुक्षेत्र युद्धात वीरमरण आल्याने तात्काळ स्वर्गात गेले. महाभारताच्या १७ व्या महाप्रस्थानिक पर्वात वर्णन येते की योगधर्म स्वीकारून योगमार्गाने (म्हणजे काय त्याचा काही उलगडा मला झाला नाही) पांडव, दौपदी आणि एक कुत्रा (यम) उत्तरेला चालू लागले. पुढे सर्वत्र पांडव आणि द्रौपदी ‘पडले’ असे वर्णन येते, जिथल्या तिथे ‘मरून पडले’ असे येत नाही. (कदाचित मरताना त्यांना तसेच जिथल्या तिथे सोडून इतरांची पुढे मार्गक्रमणा सुरु असावी)

१. प्रथम द्रौपदी योगभ्रष्ट होऊन पडली, त्यावर भीमाने विचारले ही का पडली? तेंव्हा युधिष्ठिर सांगतो की ती पक्षपाती होती, द्रौपदीचे सगळ्यात जास्त अर्जुनावर प्रेम होते जरी तिचे लग्न पाची पांडवांशी झाले होते.

२. नंतर सहदेव पडला, परत भीमानेच विचारले की हा का पडला, त्यावर युधिष्ठिर म्हणतो, सर्वात जास्त मीच सुज्ञ, हुशार ह्या अहंकारापायी असे झाले.

३. त्यानंतर नकुल पडला, त्यावर भीम विचारतो, ह्याचे इतके धर्माचे आचरण असतानाही असे काय झाले तेंव्हा युधिष्ठिर सांगतो ह्याला त्याच्या रूपाचा गर्व होता त्यामुळे असे झाले.

४. पुढे अर्जुन पडला, त्यावर दुखा:ने भीमाने विचारले ह्याचेपण असे का झाले त्यावर युधिष्ठिराने सांगितले की अर्जुनाने एकवेळ एका दिवसात सर्व शत्रुना जाळून काढीन अशी स्वत:ला शूर समजून प्रतिज्ञा केली होती, ती काही पूर्ण केली नाही तसेच तो इतर धनुर्धरांचा अपमान करायचा, म्हणून असे झाले.

५. शेवटी भीम पडला त्याने विचारले मी काय केले? युधिष्ठिराने उत्तर दिले तू आयुष्यभर अतिखादाडपणा केलास, शक्तीचा तुला गर्व होता, त्या घमेंडीमुळे असे झाले.

ह्याच पर्वात पुढे पतन झालेले ते पांडव आणि द्रौपदी मेले असा उल्लेख येतो, तेथेच इंद्र युधिष्ठिराला सांगतो हे जे पडले ते सर्व स्वर्गात गेले. पुढे १८ व्या स्वर्गारोहण, शेवटच्या पर्वात, पतन झालेले पांडव आणि द्रौपदी, त्यांनी केलेल्या पापामुळे अत्यल्प काळ नरकात राहिले आणि नंतर स्वर्गात गेले असे येते.

हायला, इतक्या फालतू कारणांवरून ५ जण पडले आणि भावांना आणि बायकोला डावाला लावणारा युधिष्ठीर सदेह स्वर्गात पोहचला?

युधिष्ठीराचा एक अंगठा गळून पडतो आणि मग तो स्वर्गात जातो - अंगठा गळून पडण्याचे कारण म्हणजे तो एकदा अर्धसत्य बोललेला असतो (नरो वा कुंजरो वा).

इतक्या फालतू कारणांवरून ५ जण पडले आणि भावांना आणि बायकोला डावाला लावणारा युधिष्ठीर सदेह स्वर्गात पोहचला?>>> हाच प्रश्न मला पण पडला आहे

छान चर्चा!

टिना तुझ्या सर्वच पोस्टना +१

शून्य>> तुम्ही जो किस्सा सांगितला आहे तो कर्णाबद्दल नसून दु:शासनाबद्दल आहे. त्याची द्रौपदीला मदत करण्याची ईच्छा इतकी उच्च असते पण त्याचवेळी द्रौपदी त्याच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून पुढे निघून जाते. त्याचाच परिणाम म्हणून तिची पहिली विटंबना दु:शासनच करतो.

सारिका333>>
तुमची पोस्ट मलाही फारशी पटलेली नाही. कारण द्रौपदीला जेव्हा कळले की कर्ण हा सहावा पांडव आहे तेव्हा तिच्या मनात त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. कारण कर्ण हा इतर पाचही पांडवांपेक्षा उजवा होता. आणि हे कृष्णाला समजल्यावर त्याने द्रौपदीची परीक्षा घेऊन तिला पाचही पांडवांसमोर कबूल करायला लावले.
(ही सर्व माहिती काॅलेज जीवनात वाचलेल्या पुस्तकांमधील आहे. आता पुस्तकांची नावे आठवत नाहीत फक्त संदर्भ आठवले तसे मांडलेत. )

<<< कौरव कुरुक्षेत्र युद्धात वीरमरण आल्याने तात्काळ स्वर्गात गेले. >>>
आणि या पांडवांच अस झाल ..
असे कसे ...??

@ निधी,
<<< तुम्ही जो किस्सा सांगितला आहे तो कर्णाबद्दल नसून दु:शासनाबद्दल आहे. >>>
असे आहे काय .?
माझ्या पोस्टीचा संदर्भ exactly कुठला आहे ते माझ्यापण लक्षात नाही ..
मी एकदा तपासून पाहीन नक्की..
निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

परंतु दुःशासन तर पूर्णपणेच कपटी, अधर्मी दाखवला आहे ना ..? हा किस्सा त्याच्याबद्दल कुठे वाचलाय तुम्ही..
मला वाटत कौरवांनपैकी कुणाबद्दल असेल तर फार फार तर विकर्णाबद्दल असू शकेल ..
पाहावे लागेल एकदा ..

जे वाचले त्यातले जितके आठवते तेवढे लिहिले आहे.:) Happy Happy मलापण असे बरेच प्रश्न पडतात.

भासमान (बहुधा इंद्र हा शब्द वापरतो) नरकात युधिष्ठिराला भावांसाठी आणि बायकोसाठी जावे लागले कारण अत्यल्प काळ ते तिथे होते, आयुष्यात जे काही केले त्याबद्दल त्यांना नरकात काही काळ राहावे लागले असे इंद्र म्हणतो (पापपुण्याचा रोचक हिशेबही काही सांगितला आहे, पण मला आत्ता तो आठवत नाही) आणि जिथे भाऊ आणि द्रौपदी तिथेच मी जाणार असे म्हणून युधिष्ठिर त्यांना भेटायला नरकात जातो, हा नरक युधिष्ठिराला बघायला लागला (अगदी जरी भाऊ आणि बायकोमुळे तरीसुद्धा) नरो वा कुंजरोवा प्रकरणात त्याने केलेल्या दुष्कृत्यामुळेच अशीही पुष्टी इंद्र देतो असे वाचल्याचे स्मरते. अंगठा गळतो वगैरे काही वाचल्याचे आठवत नाही.

माझ्या पोस्टीचा संदर्भ exactly कुठला आहे ते माझ्यापण लक्षात नाही ..
मी एकदा तपासून पाहीन नक्की..>>

मी पुस्तकातच वाचलं होतं.. आणि असंच असावं कारण द्रौपदीला पहिल्यांदा अपमानास्पद वागणूक दुःशासनाने दिली कर्णाने नाही.

तरीही तुम्ही तपासा नक्की.

तुम्ही जो किस्सा सांगितला आहे तो कर्णाबद्दल नसून दु:शासनाबद्दल आहे. त्याची द्रौपदीला मदत करण्याची ईच्छा इतकी उच्च असते पण त्याचवेळी द्रौपदी त्याच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून पुढे निघून जाते. त्याचाच परिणाम म्हणून तिची पहिली विटंबना दु:शासनच करतो.>>>

अहो तो किस्सा कर्णाबाबतचाच आहे...मृत्युंजय मध्येच त्याचा उल्लेख आहे. दुशासनाला एवढा विचारी दाखवलाच नाहीये. कर्णाच्या मनात कर्ण आणि सूतपुत्राचे द्वंद चाललेले असते आणि शेवटी वाईट विचारांचा विजय होतो असे दाखवले आहे.

मला वाटत कौरवांनपैकी कुणाबद्दल असेल तर फार फार तर विकर्णाबद्दल असू शकेल ../>>>

विकर्णाने उघडपणेच पांडवांची बाजू घेतली होती आणि द्रौपदीला वाचवायचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच शेवटी महायुद्धात भिमाने त्याला मारल्यानंतर मुकुट हातात घेऊन त्याला वंदन केल्याचा उल्लेख आहे.
(कुणी मेल्यावर पोलीस विशेषत इफ्तेकार असे करतात याचा उगम हाच असावा काय)

कर्णाबाबत सांगायचे झाले तर महाभारतात दाखवलाय तसा कपटी, दुष्टही नव्हता आणि मृत्युंजय, राधेय मध्ये रंगवल्यासारखा सद्गुणांचा पुतळाही नव्हता. तोही त्या काळच्या सर्वच व्यक्तिरेखांप्रमाणे ग्रे शेड मधलाच होता.

जन्म झाल्याच मातेने टाकून देणे, ते रहस्य आयुष्याच्या उत्तरार्धात कळणे, सख्खे भाऊ शत्रु म्हणून पाहणे आदी गोष्टी व्यासांनी ज्या रंजकपणे रंगवल्यात त्याला तोड नाही.
इतकी असंख्य व्यक्तिमत्वे, त्यांचे स्वभावविशेष, कंगोरे, आपापसातील संबंध आणि एकूणच हे महानाट्य लिहीताना व्यासांनी जे काही कौशल्य दाखवले आहे त्याबाबत हॅट्स ऑफ.
त्यामानाने रामायण फारच सरळधोपट आहे. महाभारता इतकी गुंतागुंत आणि वैविधता मला वाटत नाही आणखी कुठल्या महाकाव्यात जगभरातही पहायला मिळेल.

कर्णाबाबत सांगायचे झाले तर महाभारतात दाखवलाय तसा कपटी, दुष्टही नव्हता आणि मृत्युंजय, राधेय मध्ये रंगवल्यासारखा सद्गुणांचा पुतळाही नव्हता. तोही त्या काळच्या सर्वच व्यक्तिरेखांप्रमाणे ग्रे शेड मधलाच होता. >>>
+१

निधी,
द्रौपदीला पहिल्यांदा अपमानास्पद वागणूक दुःशासनाने दिली कर्णाने नाही. >>> होय हे तर अगदीच मान्य , काही शंका नाही..

मी वाचलेल्या पुस्तकामध्ये अस होतं कि कर्ण सूतपुत्र आहे म्हणून द्रौपदी त्याच्यासमोर थांबत नाही. त्यामुळे कर्ण दुखावतो एवढच, त्यामुळे कर्ण तिला काही करतो असे नाही..
त्यानंतर मग दुःशासन इ घटनाक्रम होता..

आशुचेम्प , बरोबर .. माझ्या पोस्टीमधील प्रसंग मृत्युंजयातीलच आहे .. बरेच वर्ष झाले वाचून त्यामुळे नक्की संदर्भ आठवत नव्हता.. आपण दिल्याबद्दल धन्यवाद .. __/\__

कर्णाबाबत सांगायचे झाले तर महाभारतात दाखवलाय तसा कपटी, दुष्टही नव्हता आणि मृत्युंजय, राधेय मध्ये रंगवल्यासारखा सद्गुणांचा पुतळाही नव्हता. तोही त्या काळच्या सर्वच व्यक्तिरेखांप्रमाणे ग्रे शेड मधलाच होता.
>> +१

अहो तो किस्सा कर्णाबाबतचाच आहे...मृत्युंजय मध्येच त्याचा उल्लेख आहे. दुशासनाला एवढा विचारी दाखवलाच नाहीये. कर्णाच्या मनात कर्ण आणि सूतपुत्राचे द्वंद चाललेले असते आणि शेवटी वाईट विचारांचा विजय होतो असे दाखवले आहे.>>

खरेच का? Uhoh

मी हा किस्सा वाचला ते पुस्तक तर दुःशासनावर होते. मृत्युंजय मी वाचलेच नाहीये अजुन. (साहित्य चोरी?)

मी हा किस्सा वाचला ते पुस्तक तर दुःशासनावर होते. >>>>>>>> काय सांगता ..?
कर्ण आणि दुर्योधनावर एकच किस्सा .. कालौघात प्रत्येक लेखकाने आपापल्या मनाप्रमाणे लिहिलेलं दिसतय.. Lol

कर्ण आणि दुर्योधनावर एकच किस्सा .. कालौघात प्रत्येक लेखकाने आपापल्या मनाप्रमाणे लिहिलेलं दिसतय>>>. Lol Lol Lol

आशुचँप,

>> कर्णाच्या मनात कर्ण आणि सूतपुत्राचे द्वंद चाललेले असते आणि शेवटी वाईट विचारांचा विजय होतो असे दाखवले
>> आहे.

मला अंधुकसं आठवतं त्याप्रमाणे मृत्युंजयात कर्ण वस्त्रहरणप्रसंगी राजसभेत अनुपस्थित दाखवला आहे. चूभूदेघे.

आ.न.,
-गा.पै.

केदार जाधव,

>> Hear in brief, O son of Pandu! I regard the mighty Karna as thy equal, or perhaps, thy superior!

ही श्रीकृष्णाने केलेली किंचित अतिशयोक्ती असू शकते. अर्जुनाने त्याचा इशारा गांभीर्याने घ्यावा म्हणून. किंवा घोष्यात्र आणि गोहरण प्रसंगी अर्जुनाने केलेले कर्णाचे पराभव हे झटपट बुद्धीबळाच्या डावासारखे असावेत. तर प्रस्तुत प्रसंग नेहमीच्या दीर्घवेळ बुद्धीबळासम असावा.

आ.न.,
-गा.पै.

रच्याकने, राधेय मधे वर्णन केलेला सुरुवातीचा प्रसंग ज्यात कर्णाच कौंतेय असणं पांडवांना कळत ते खरं आहे का?

मृत्यंजय मधे द्रौपदी स्वयंवरात जेव्हा धनुष्य उचलताना प्रयत्न चालु करतात तेव्हा श्रीकृष्ण स्वतःच्या पायाचा अंगठा दाबुन ठेवतो हे कर्णाने बघितले असते. तेव्हा कर्णाने श्रीकृष्णाकडे पाहिले असता कृष्ण त्याला केवळ थांब असा इशारा देतो. परंतु दुर्योधनाच्या आग्रहामुळे तो स्वयंवरात उभा राहतो.
असे वर्णन केले आहे.

Pages