'मृत्युंजय' कर्ण आणि माझा प्रण

Submitted by भागवत on 13 April, 2015 - 05:23

आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.

मग मी कर्णा वरचे भरपूर वाचन केले. प्रत्येक लेखकाने त्यांच्या परीने कर्णावर लिहिले आहे. सगळी कडे कर्ण कमी - जास्त प्रमाणात चांगला दाखवला आहे. कर्ण दानशूर, दान वीर होता हे सगळ्या पुस्तकात आहे. पण 'मृत्युंजय' वाचल्या नंतर कर्णाच दृष्टिकोन कळला. काय रंगवलंय कर्णाला लेखकाने. 'मृत्युंजय' शिवाजी सावंत यांची सर्वोच्च कलाकृती आहे. मला आधी मराठी पेक्ष्या दुसर्‍या भाषेत प्रगल्भ शब्द योजना आहे असे वाटायचे. पण 'मृत्युंजय' वाचून माझा समज खोटा ठरला. काय अप्रतिम शब्द रचना आहे 'मृत्युंजय' मध्ये. एक-एक शब्द पारड्यात तोलून निवडला आहे. एखाद्या कलाकाराची सर्वोच्च कलाकृती वाचून आपण त्या शब्द रुपी पावसात मनसोक्त भिजुन जातो. 'मृत्युंजय' वाचुन मी खुपच प्रभावित झालो. भीष्म आणि कर्ण ने खुप प्रतिज्ञा केल्या. मला वाटते की त्यांची प्रतिज्ञा आणि जीवन भर त्यांनी पाळलेला शब्द हेच त्यांचा जीवनाचे मर्म, असामान्य कर्तृत्व आणि मोठेपण आहे.

मला असे वाटायचे की प्रतिज्ञा निभावणे खुप सोपे असते. त्यामधे विशेष काही नसते असे समजत होतो. मा‍झ्या कडे एक टू-व्हीलर आहे. मग मी सुध्दा एक प्रण केला. एक महिना मी गाडीवरून जाताना जो मागेल त्याला टू-व्हीलर वर लिफ्ट देईल असा प्रण केला. हा प्रण एक महिना निभावणे मला कठीण गेले. माणूस पहिल्यांदा स्वत:च्या सुरक्षेचा विचार करतो. मी कधीही अनोळखी व्यक्तिला निर्जन रस्त्यावर लिफ्ट दिली नाही. मळके कपडे घातलेला मनुष्य दिसला आणि त्याने लिफ्ट मागीतली तर त्यामुळे माझे कपडे खराब होतील म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली नाही. ओळखीच्या लोकांना लिफ्ट दिल्यावर मना मधे कुठे तरी नकळत अपेक्षा होती की ते कधीतरी आपल्या गरजेच्या वेळी लिफ्ट देतील. फक्त शाळेत जाणारी मुले यांना निरपेक्ष वृत्तीने लिफ्ट दिली. प्रतिज्ञा, प्रण घेणे खुप सोपे आहे पण ती प्रत्येक प्रसंगी निरपेक्ष वृत्तीने निभावणे, टिकवणे खुपच कठीण, अवघड काम आहे. त्यामुळे कर्णाला असामान्य व्यक्तिरेखेला माझा मनापासून दंडवत प्रणाम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीया, भागवत, dreamgirl धन्यवाद Happy

रीया आणि dreamgirl रामायणाबद्दल तुमची मते जाणून घ्यायला आवडेल Happy

हे वाक्य कितीही वेळा वाचले तरी जमत नाही >>> इवान, अर्जुनाची व्यक्तिरेखा मला नेहमीच संभ्रमात असलेली वाटत आली आहे. तो आप्तेष्टांसोबत लढायचं नाही म्हणून हत्यारे टाकतो, मग कृष्णाने समजावल्यावर त्याच माणसांशी लढतो. समोर गुरू, नातलग आहेत म्हणून खचतो. महाभारतात सतत अर्जुन जे करतो तेच कसं न्यायसंमत आणि बरोबर होतं हे दाखवलं गेलं आहे असं वाटत राहत. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, योद्धा होता तर काही निर्णय त्याने स्वतःच्या हिमतीवर घ्यायला हवे होते, जसे की द्रौपदीचे रक्षण करणे, द्यूतास विरोध करणे. कर्णाला मार असे कृष्णाने सांगितल्यावर तो पडत्या फळाची आज्ञा मानतो. तो चुकीचं वागूनही योग्य वागला(पॉलिटिकली करेक्ट ) असा काहिसा कल वाटतो एकंदरीत महाभारतात. अर्थात तो ही एक प्यादेच होता म्हणा त्या जगड.व्याळ खेळातले. Happy

इवान, अर्जुनाची व्यक्तिरेखा मला नेहमीच संभ्रमात असलेली वाटत आली आहे. तो आप्तेष्टांसोबत लढायचं नाही म्हणून हत्यारे टाकतो, मग कृष्णाने समजावल्यावर त्याच माणसांशी लढतो. समोर गुरू, नातलग आहेत म्हणून खचतो. महाभारतात सतत अर्जुन जे करतो तेच कसं न्यायसंमत आणि बरोबर होतं हे दाखवलं गेलं आहे असं वाटत राहत. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, योद्धा होता तर काही निर्णय त्याने स्वतःच्या हिमतीवर घ्यायला हवे होते, जसे की द्रौपदीचे रक्षण करणे, द्यूतास विरोध करणे. कर्णाला मार असे कृष्णाने सांगितल्यावर तो पडत्या फळाची आज्ञा मानतो. तो चुकीचं वागूनही योग्य वागला(पॉलिटिकली करेक्ट ) असा काहिसा कल वाटतो एकंदरीत महाभारतात. अर्थात तो ही एक प्यादेच होता म्हणा त्या जगड.व्याळ खेळातले,>

चला आज रविवार सत्करणी लावू. Happy
अर्जुन कितीही सर्वश्रेष्ठ धनुर्धर असला तरी शेवटी भावना या कुणाला आवरता येत नाही. ज्यांच्या अंगाखांद्यावर लहानपणापासुन खेळला ज्या भावंडांसोबत लहानपणी खेळला त्यांना युध्दात "ठार" करणे ही कल्पना बहुदा त्याच्या भावनाप्रधान मनाला रुचली नसेल. तो भीम सारखा संतप्त नव्हता. महाभारतात अत्याधिक क्रौर्य करणारा फक्त भीम होता. दुर्योधन सोडुन एकही कौरवाचे संपुर्ण देह दहन करायला मिळाले नाही. (अश्वथामा नामक अजस्त्र हत्तीला देखील भीमाने ठार केले होते. आणि तेव्हा त्या हत्तीचे वर्णनावरुन तो हत्ती नसुन मेमोथ हा हत्तीचा एक पुरातन प्रकार असेल असे वाटते) यावरुन भीम रणांगणात कोणत्याप्रकारे शत्रुंना ठार करत होता याची पुसटसी कल्पना देखील अंगावर शहारे आणते. या मनोवृत्तीचा अर्जुन अजिबात नव्हता. तो आणि युधिष्ठीर नेहमीच भीमाच्या पाशवी शक्तीला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असत. अर्जुनाचा हिंस्त्रपणा फक्त यक्षांबरोबर युध्द करतानाच दिसला. युधिष्ठीरने त्याला आदेश दिला होता कौरवांना यक्षांपासुन सोडव. ते युध्द करत असताना आपल्या भावंडांची अवस्था बघुन हिंस्त्र झालेला. त्याचा आवेश बघुन यक्षांनी पराभव स्वीकारला होता.

काही निर्णय त्याने स्वतःच्या हिमतीवर घ्यायला हवे होते, जसे की द्रौपदीचे रक्षण करणे, द्यूतास विरोध करणे. कर्णाला मार असे कृष्णाने सांगितल्यावर तो पडत्या फळाची आज्ञा मानतो>> अर्जुन सदैव आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांच्या संगतीतच राहिला आहे. अश्यावेळी (त्यावेळच्या समाजातच्या चालिरितीमधे) मोठ्या भावाच्या आज्ञेचे पालन करणे हे त्याचा नेहमीच धर्म राहिलेला आहे ( आजच्या काळात आपण आई-वडीलच काय आज्जी आजोबांचे देखील काहीच ऐकत नाही) द्रौपदीचे रक्षण करणे हे पतीचे कर्तव्य आहे. त्यानुसार त्याने ते केलेच आहे. राहिले वस्त्रहरणाच्यावेळी प्रत्येक नवर्‍याला आपली पत्नी काय आहे हे चांगलेच ठाउक असते. द्रौपदी ही अग्नीतुन निर्माण झाली आहे. आणि तीच्या मनात आले तर ती सर्व कौरव घराण्याला जाळुन राख करु शकते याची देखील कल्पना असु शकतेच आणि कर्णाला मार हे तर साक्षात भगवंताने सांगितले असते. त्याची आज्ञा अर्जुन कशी मोडेल ? गीता रहस्य सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे सहस्त्ररुप दाखवतो. तेव्हाच अर्जुनाला कळुन चुकले असते की आपला सारथी कोण आहे. अश्या सारथीचा प्रत्येक शब्द त्याला अमृतापेक्षा मुल्यवान आहे. भगवंतानेच सांगितले आहे कर्म कर फळची चिंता माझ्यावर सोड. मग अर्जुनाचे काम फक्त कर्म करायचे उरले आहे. ते त्याने चोख केले आहे. पाप आहे की पुण्य याची चिंता त्याने कृष्णावर सोडलेली असते.

मला कुठेच अर्जुनाची रडकथा वगैरे दिसली नाही. अजुन आपणास कुठे दिसत असल्यास सांगावे
(मी अर्जुनचा समर्थक नाही Wink )

इवान , ८१.३४ % अनुमोदन..

हजारो, आपल्या पहिल्या पोस्टमधील अर्जुन सोडून इतर मतांशी सहमत..
त्यावेळी झाले ते महायुद्ध होते, तेपण आप्तेष्टांविरुद्धचे ! त्यामुळे इतकी चलबिचल होणे अगदीच स्वाभाविक आहे. त्यावरून त्याला रड्या म्हणता येणार नाही..
मुळात तो जर रडका असता तर तो इतका श्रेष्ठ धनुर्धर झालाच नसता असे माझे मत आहे.
अर्जुनाला 'पोलिटिकली करेक्ट' हे शब्द कर्णाच्या मृत्यूप्रसंगी फक्त लागू होऊ शकतात फक्त (ते सुद्धा श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार केले आहे, स्वतः नाही).. तो सतत पोलिटिकली करेक्ट राहायचा यत्न करत असे दिसत नाही.
इतर वेळी पांडव हे नेहमीच धर्म पाळण्याचा प्रयास करत असल्याचे दिसते ज्यात काहीच आक्षेपार्ह नाही. नाही का.? :

तेच तर . मुळात जेथे अर्जुनाला चुकीच्या निर्णयासाठी जबाबदार धरु शकत नाही तिथ कर्णाला एकांगी दोषी ठरवण पर्याप्त नाही असच मी म्हणतेय Happy

मोहजालात (नेट) सापडलेली कर्णा वरिल कविता-
कर्ण और कृष्ण का संवाद - रामधारी सिंह 'दिनकर'
सुन-सुन कर कर्ण अधीर हुआ,
क्षण एक तनिक गंभीर हुआ,
फिर कहा "बड़ी यह माया है,
जो कुछ आपने बताया है
दिनमणि से सुनकर वही कथा
मैं भोग चुका हूँ ग्लानि व्यथा

"मैं ध्यान जन्म का धरता हूँ,
उन्मन यह सोचा करता हूँ,
कैसी होगी वह माँ कराल,
निज तन से जो शिशु को निकाल
धाराओं में धर आती है,
अथवा जीवित दफनाती है?

"सेवती मास दस तक जिसको,
पालती उदर में रख जिसको,
जीवन का अंश खिलाती है,
अन्तर का रुधिर पिलाती है
आती फिर उसको फ़ेंक कहीं,
नागिन होगी वह नारि नहीं

"हे कृष्ण आप चुप ही रहिये,
इस पर न अधिक कुछ भी कहिये
सुनना न चाहते तनिक श्रवण,
जिस माँ ने मेरा किया जनन
वह नहीं नारि कुल्पाली थी,
सर्पिणी परम विकराली थी

"पत्थर समान उसका हिय था,
सुत से समाज बढ़ कर प्रिय था
गोदी में आग लगा कर के,
मेरा कुल-वंश छिपा कर के
दुश्मन का उसने काम किया,
माताओं को बदनाम किया

"माँ का पय भी न पीया मैंने,
उलटे अभिशाप लिया मैंने
वह तो यशस्विनी बनी रही,
सबकी भौ मुझ पर तनी रही
कन्या वह रही अपरिणीता,
जो कुछ बीता, मुझ पर बीता

"मैं जाती गोत्र से दीन, हीन,
राजाओं के सम्मुख मलीन,
जब रोज अनादर पाता था,
कह 'शूद्र' पुकारा जाता था
पत्थर की छाती फटी नही,
कुन्ती तब भी तो कटी नहीं

"मैं सूत-वंश में पलता था,
अपमान अनल में जलता था,
सब देख रही थी दृश्य पृथा,
माँ की ममता पर हुई वृथा
छिप कर भी तो सुधि ले न सकी
छाया अंचल की दे न सकी

"पा पाँच तनय फूली फूली,
दिन-रात बड़े सुख में भूली
कुन्ती गौरव में चूर रही,
मुझ पतित पुत्र से दूर रही
क्या हुआ की अब अकुलाती है?
किस कारण मुझे बुलाती है?

"क्या पाँच पुत्र हो जाने पर,
सुत के धन धाम गंवाने पर
या महानाश के छाने पर,
अथवा मन के घबराने पर
नारियाँ सदय हो जाती हैं
बिछुडोँ को गले लगाती है?

"कुन्ती जिस भय से भरी रही,
तज मुझे दूर हट खड़ी रही
वह पाप अभी भी है मुझमें,
वह शाप अभी भी है मुझमें
क्या हुआ की वह डर जायेगा?
कुन्ती को काट न खायेगा?

"सहसा क्या हाल विचित्र हुआ,
मैं कैसे पुण्य-चरित्र हुआ?
कुन्ती का क्या चाहता ह्रदय,
मेरा सुख या पांडव की जय?
यह अभिनन्दन नूतन क्या है?
केशव! यह परिवर्तन क्या है?

"मैं हुआ धनुर्धर जब नामी,
सब लोग हुए हित के कामी
पर ऐसा भी था एक समय,
जब यह समाज निष्ठुर निर्दय
किंचित न स्नेह दर्शाता था,
विष-व्यंग सदा बरसाता था

"उस समय सुअंक लगा कर के,
अंचल के तले छिपा कर के
चुम्बन से कौन मुझे भर कर,
ताड़ना-ताप लेती थी हर?
राधा को छोड़ भजूं किसको,
जननी है वही, तजूं किसको?

"हे कृष्ण ! ज़रा यह भी सुनिए,
सच है की झूठ मन में गुनिये
धूलों में मैं था पडा हुआ,
किसका सनेह पा बड़ा हुआ?
किसने मुझको सम्मान दिया,
नृपता दे महिमावान किया?

"अपना विकास अवरुद्ध देख,
सारे समाज को क्रुद्ध देख
भीतर जब टूट चुका था मन,
आ गया अचानक दुर्योधन
निश्छल पवित्र अनुराग लिए,
मेरा समस्त सौभाग्य लिए

"कुन्ती ने केवल जन्म दिया,
राधा ने माँ का कर्म किया
पर कहते जिसे असल जीवन,
देने आया वह दुर्योधन
वह नहीं भिन्न माता से है
बढ़ कर सोदर भ्राता से है

"राजा रंक से बना कर के,
यश, मान, मुकुट पहना कर के
बांहों में मुझे उठा कर के,
सामने जगत के ला करके
करतब क्या क्या न किया उसने
मुझको नव-जन्म दिया उसने

"है ऋणी कर्ण का रोम-रोम,
जानते सत्य यह सूर्य-सोम
तन मन धन दुर्योधन का है,
यह जीवन दुर्योधन का है
सुर पुर से भी मुख मोडूँगा,
केशव ! मैं उसे न छोडूंगा

"सच है मेरी है आस उसे,
मुझ पर अटूट विश्वास उसे
हाँ सच है मेरे ही बल पर,
ठाना है उसने महासमर
पर मैं कैसा पापी हूँगा?
दुर्योधन को धोखा दूँगा?

"रह साथ सदा खेला खाया,
सौभाग्य-सुयश उससे पाया
अब जब विपत्ति आने को है,
घनघोर प्रलय छाने को है
तज उसे भाग यदि जाऊंगा
कायर, कृतघ्न कहलाऊँगा

"कुन्ती का मैं भी एक तनय,
जिसको होगा इसका प्रत्यय
संसार मुझे धिक्कारेगा,
मन में वह यही विचारेगा
फिर गया तुरत जब राज्य मिला,
यह कर्ण बड़ा पापी निकला
"मैं ही न सहूंगा विषम डंक,
अर्जुन पर भी होगा कलंक
सब लोग कहेंगे डर कर ही,
अर्जुन ने अद्भुत नीति गही
चल चाल कर्ण को फोड़ लिया
सम्बन्ध अनोखा जोड़ लिया

"कोई भी कहीं न चूकेगा,
सारा जग मुझ पर थूकेगा
तप त्याग शील, जप योग दान,
मेरे होंगे मिट्टी समान
लोभी लालची कहाऊँगा
किसको क्या मुख दिखलाऊँगा?

"जो आज आप कह रहे आर्य,
कुन्ती के मुख से कृपाचार्य
सुन वही हुए लज्जित होते,
हम क्यों रण को सज्जित होते
मिलता न कर्ण दुर्योधन को,
पांडव न कभी जाते वन को

"लेकिन नौका तट छोड़ चली,
कुछ पता नहीं किस ओर चली
यह बीच नदी की धारा है,
सूझता न कूल-किनारा है
ले लील भले यह धार मुझे,
लौटना नहीं स्वीकार मुझे

"धर्माधिराज का ज्येष्ठ बनूँ,
भारत में सबसे श्रेष्ठ बनूँ?
कुल की पोशाक पहन कर के,
सिर उठा चलूँ कुछ तन कर के?
इस झूठ-मूठ में रस क्या है?
केशव ! यह सुयश - सुयश क्या है?

"सिर पर कुलीनता का टीका,
भीतर जीवन का रस फीका
अपना न नाम जो ले सकते,
परिचय न तेज से दे सकते
ऐसे भी कुछ नर होते हैं
कुल को खाते औ' खोते हैं

"विक्रमी पुरुष लेकिन सिर पर,
चलता ना छत्र पुरखों का धर.
अपना बल-तेज जगाता है,
सम्मान जगत से पाता है.
सब देख उसे ललचाते हैं,
कर विविध यत्न अपनाते हैं

"कुल-गोत्र नही साधन मेरा,
पुरुषार्थ एक बस धन मेरा.
कुल ने तो मुझको फेंक दिया,
मैने हिम्मत से काम लिया
अब वंश चकित भरमाया है,
खुद मुझे ढूँडने आया है.

"लेकिन मैं लौट चलूँगा क्या?
अपने प्रण से विचरूँगा क्या?
रण मे कुरूपति का विजय वरण,
या पार्थ हाथ कर्ण का मरण,
हे कृष्ण यही मति मेरी है,
तीसरी नही गति मेरी है.

"मैत्री की बड़ी सुखद छाया,
शीतल हो जाती है काया,
धिक्कार-योग्य होगा वह नर,
जो पाकर भी ऐसा तरुवर,
हो अलग खड़ा कटवाता है
खुद आप नहीं कट जाता है.

"जिस नर की बाह गही मैने,
जिस तरु की छाँह गहि मैने,
उस पर न वार चलने दूँगा,
कैसे कुठार चलने दूँगा,
जीते जी उसे बचाऊँगा,
या आप स्वयं कट जाऊँगा,

"मित्रता बड़ा अनमोल रतन,
कब उसे तोल सकता है धन?
धरती की तो है क्या बिसात?
आ जाय अगर बैकुंठ हाथ.
उसको भी न्योछावर कर दूँ,
कुरूपति के चरणों में धर दूँ.

"सिर लिए स्कंध पर चलता हूँ,
उस दिन के लिए मचलता हूँ,
यदि चले वज्र दुर्योधन पर,
ले लूँ बढ़कर अपने ऊपर.
कटवा दूँ उसके लिए गला,
चाहिए मुझे क्या और भला?

"सम्राट बनेंगे धर्मराज,
या पाएगा कुरूरज ताज,
लड़ना भर मेरा कम रहा,
दुर्योधन का संग्राम रहा,
मुझको न कहीं कुछ पाना है,
केवल ऋण मात्र चुकाना है.

"कुरूराज्य चाहता मैं कब हूँ?
साम्राज्य चाहता मैं कब हूँ?
क्या नहीं आपने भी जाना?
मुझको न आज तक पहचाना?
जीवन का मूल्य समझता हूँ,
धन को मैं धूल समझता हूँ.

"धनराशि जोगना लक्ष्य नहीं,
साम्राज्य भोगना लक्ष्य नहीं.
भुजबल से कर संसार विजय,
अगणित समृद्धियों का सन्चय,
दे दिया मित्र दुर्योधन को,
तृष्णा छू भी ना सकी मन को.

"वैभव विलास की चाह नहीं,
अपनी कोई परवाह नहीं,
बस यही चाहता हूँ केवल,
दान की देव सरिता निर्मल,
करतल से झरती रहे सदा,
निर्धन को भरती रहे सदा.

"तुच्छ है राज्य क्या है केशव?
पाता क्या नर कर प्राप्त विभव?
चिंता प्रभूत, अत्यल्प हास,
कुछ चाकचिक्य, कुछ पल विलास,
पर वह भी यहीं गवाना है,
कुछ साथ नही ले जाना है.

"मुझसे मनुष्य जो होते हैं,
कंचन का भार न ढोते हैं,
पाते हैं धन बिखराने को,
लाते हैं रतन लुटाने को,
जग से न कभी कुछ लेते हैं,
दान ही हृदय का देते हैं.

"प्रासादों के कनकाभ शिखर,
होते कबूतरों के ही घर,
महलों में गरुड़ ना होता है,
कंचन पर कभी न सोता है.
रहता वह कहीं पहाड़ों में,
शैलों की फटी दरारों में.

"होकर सुख-समृद्धि के अधीन,
मानव होता निज तप क्षीण,
सत्ता किरीट मणिमय आसन,
करते मनुष्य का तेज हरण.
नर विभव हेतु लालचाता है,
पर वही मनुज को खाता है.

"चाँदनी पुष्प-छाया मे पल,
नर भले बने सुमधुर कोमल,
पर अमृत क्लेश का पिए बिना,
आताप अंधड़ में जिए बिना,
वह पुरुष नही कहला सकता,
विघ्नों को नही हिला सकता.

"उड़ते जो झंझावतों में,
पीते सो वारी प्रपातो में,
सारा आकाश अयन जिनका,
विषधर भुजंग भोजन जिनका,
वे ही फानिबंध छुड़ाते हैं,
धरती का हृदय जुड़ाते हैं.

"मैं गरुड़ कृष्ण मै पक्षिराज,
सिर पर ना चाहिए मुझे ताज.
दुर्योधन पर है विपद घोर,
सकता न किसी विधि उसे छोड़,
रण-खेत पाटना है मुझको,
अहिपाश काटना है मुझको.

"संग्राम सिंधु लहराता है,
सामने प्रलय घहराता है,
रह रह कर भुजा फड़कती है,
बिजली-सी नसें कड़कतीं हैं,
चाहता तुरत मैं कूद पडू,
जीतूं की समर मे डूब मरूं.

"अब देर नही कीजै केशव,
अवसेर नही कीजै केशव.
धनु की डोरी तन जाने दें,
संग्राम तुरत ठन जाने दें,
तांडवी तेज लहराएगा,
संसार ज्योति कुछ पाएगा.

"हाँ, एक विनय है मधुसूदन,
मेरी यह जन्मकथा गोपन,
मत कभी युधिष्ठिर से कहिए,
जैसे हो इसे छिपा रहिए,
वे इसे जान यदि पाएँगे,
सिंहासन को ठुकराएँगे.

"साम्राज्य न कभी स्वयं लेंगे,
सारी संपत्ति मुझे देंगे.
मैं भी ना उसे रख पाऊँगा,
दुर्योधन को दे जाऊँगा.
पांडव वंचित रह जाएँगे,
दुख से न छूट वे पाएँगे.
"अच्छा अब चला प्रमाण आर्य,
हो सिद्ध समर के शीघ्र कार्य.
रण मे ही अब दर्शन होंगे,
शार से चरण:स्पर्शन होंगे.
जय हो दिनेश नभ में विहरें,
भूतल मे दिव्य प्रकाश भरें."

रथ से रधेय उतार आया,
हरि के मन मे विस्मय छाया,
बोले कि "वीर शत बार धन्य,
तुझसा न मित्र कोई अनन्य,
तू कुरूपति का ही नही प्राण,
नरता का है भूषण महान."

http://ramprasadbismil.blogspot.in/2010/10/karna-ka-krishna-ko-uttar-ram...

पिकेश ,
माधव ह्या इसमाचा प्रतिसाद वाचा . तो म्हणतोय हे सगळं कुंती मुळे घडलं (त्याला कुंती आणि द्रोपदी तला फरक सुधा काळात नाहीये ).
माझा प्रतिसाद माधव ला उद्देशून होता . तुम्ही स्वतःवर कशाला ओढून घेताय ? Lol
काही लोकांना कर्ण जाम आवडतो . कलियुगाचा प्रभावाच असा आहे कि लोकांना पाप कर्माच आणि पापी लोकांचं attraction वाटतं
पांडव स्वर्गात गेले म्हणे . पण स्वर्ग हा काही शेवटचा point नाही . चांगल्या कर्मांची फलं स्वर्गात भोगली असतील . वाईट कर्मांची नरकात

सारिका ,
अहो तुमच्या पोस्टीमध्ये तुम्ही माझ्या पोस्टी मधील वाक्य घेऊन >>>>>> असे करून उत्तर दिले आहे.
तुम्ही आधार घेतलेली आणि प्रतिसाद दिलेली दोन्ही वाक्ये माझी आहेत. त्यामुळे माझा गैरसमज झाला असावा. असो.
त्या पोस्टीकरता मी माफी मागतो आणि माझी ती पोस्ट सुद्धा काढून टाकतो..

आपण सुद्धा एकदा पोस्ट तपासून पहा, तुम्हाला माधव यांच्या पोस्टीमधले वाक्य घ्यायचे आहे का बघा..
जेणेकरून वाचकांचा गैरसमज होणार नाही.. Happy

धन्यवाद.. पोस्ट तत्काळ काढून टाकत आहे .. क्षमस्व ..

आशुचँप, मिसळपाववरची लिंक खूप छान! काही प्रतिक्रियाही छान माहितीपूर्ण आहेत. थँक्स फॉर शेअरींग.
http://www.misalpav.com/node/25140 हा लेख आणि काही प्रतिक्रिया पण छान आहेत (ह्या लेखाशी संबंधित नसल्या तरी महाभारताशी आहेत)

काही लोकांना कर्ण जाम आवडतो . कलियुगाचा प्रभावाच असा आहे कि लोकांना पाप कर्माच आणि पापी लोकांचं attraction वाटतं

>> काही लोकाना देवान (?) केलेल सगळ बरोबर अन बाकीच्यानी केलेल सगळ पाप वाटत .

" फॉर द ग्रेटर गुड" चा मोह सुटत नाही

महाभारत कथा म्हणून वाचा , गीता लिहिण्याच कारण म्हणून नाही . पाप पुण्याच्या बर्याच संकल्पना नव्यान कळतील .

अन हो , योग्य गोष्टी करून ज्याची स्थापना होते तो "धर्म " , धर्मासाठी केलेली प्रत्येक गोष्ट "योग्य " नाही Happy

योग्य गोष्टी करून ज्याची स्थापना होते तो "धर्म " , धर्मासाठी केलेली प्रत्येक गोष्ट "योग्य " नाही >> १०० % अतिशय उत्तम वाक्य

महाभारत कथा म्हणून वाचा , गीता लिहिण्याच कारण म्हणून नाही . पाप पुण्याच्या बर्याच संकल्पना नव्यान कळतील . >>+१
योग्य गोष्टी करून ज्याची स्थापना होते तो "धर्म " , धर्मासाठी केलेली प्रत्येक गोष्ट "योग्य " नाही >>+१

अन हो , योग्य गोष्टी करून ज्याची स्थापना होते तो "धर्म " , धर्मासाठी केलेली प्रत्येक गोष्ट "योग्य " नाही >> सौ टके कि बात .. पुर्णपणे सहमत Happy

"योग्य गोष्टी करून ज्याची स्थापना होते तो "धर्म " , धर्मासाठी केलेली प्रत्येक गोष्ट "योग्य " नाही" - वाक्य छान आहे, धर्मासाठी केलेली प्रत्येक गोष्ट योग्य नाही हे पटलं.

पण धर्म हा मार्गसापेक्ष नाही. किंबहूना बरेचसे धार्मिक आततायी हे आपला मार्गच योग्य आहे असं समजतात आणी धर्मापासून लांब जातात.

मला कर्णाविषयी एक प्रश्न नेहेमीच पडतो. त्याच्याव्रच्या त्या जन्मजात अन्यायाविषयी आपल्याला गोष्ट माहीत असल्यामुळे माहीत होतं. पण त्याच्या दृष्टीनं तर तो अधिरथाचाच मुलगा होता ना? (त्याला थोडच जन्म झाल्या झाल्या काय झालं ते आठवत असणार?) मग तसं असताना 'मला सुतपुत्र' म्हणून हिणवतात' अशी भुमिका घेणं त्या बिचार्या अधिरथावर आणी त्या राधेवर अन्याय नाही का? हे असं सतत आपल्याला कुणीतरी उपेक्षेनं मारून राहिलाय अशी 'नागपूरकर' (संदर्भः पु. ल. - मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर) भुमिका कशाला घ्यायची?

मला वाटतं, त्याला स्वत:च्या शौर्याची, सामर्थ्याची जाणीव होती. तो अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता पण सूतपुत्र असल्याने द्रोणांनी त्याला शिकवण्यास नकार दिला. हस्तिनापुरातल्या त्या शक्तिप्रदर्शनातही तो सूतपुत्र असल्याने बाद ठरवला गेला. तेच द्रौपदी स्वयंवरात. आपल्यात जन्मजात जे शौर्य, नैपुण्य आहे ते या क्षत्रियपुत्रांपेक्षा कितीतरी सरस अाहे. तरीदेखील आपण केवळ सूतपुत्र असल्याने त्यांच्याशी बरोबरी करू शकत नाही ही ती बोच होती. त्याला कृष्णाने / कुंतीने सांगेपर्यंत माहीत नव्हते की तो कौंतैय आहे. आणि क्षत्रिय असूनही आयुष्यभर जी अवहेलना वाट्याला आली ती विसरणे शक्य नव्हते. म्हणजे आपले मन जे सांगत होते की आपण पांडवांपेक्षा श्रेष्ठ आहोत ते खरेच होते! पण त्या पडत्या काळात दुर्योधनाने केलेले उपकार विसरणे हा कृतघ्नपणा ठरला असता. म्हणून तो कुंतीला कोणतेही पाच पांडव जिवंत ठेवण्याचे वचन देतो.

'मला सुतपुत्र' म्हणून हिणवतात' अशी भुमिका घेणं >> ह्या वाक्यातच तर उत्तर आलयं ना ? त्याला जातीवरुन हिणवण्याचा राग होता. त्याच्यात असलेल्या गुणांची पारख व्हायला हवी तर तो जो आहे त्यावरुन त्याला डावलण्यात आल म्हणून ओरडा करण स्वाभाविक आहे ना !
मला तरी कुठच वाचल्याच आठवत नै की कर्ण या कॅरेक्टर ने अधिरथ राधेला दोष देऊन अन्यायी ठरवलं आहे असं .

कर्णपत्नी वॄषालीच्या मुखी असं एक वाक्य घातलं आहे मॄत्युंजयमध्ये की "आपण जर सूतपूत्र आहोत तर त्याचा आपणास कमीपणा का वाटावा?' आणि त्या प्रसंगी कर्णाने राधा-अधिरथ यांबद्दल काढलेले कृतज्ञतेचे उद्गारही आहेत. त्याचा पराक्रम, कर्तुत्व या गुणांना बगल देऊन कायम त्याच्या हीन जातीवरुन त्याला उपेक्षित केले गेले हीच सल त्याला आयुष्यभर बोचत राहिली. राधा अधिरथ यांना कधीही त्याने दोषी मानले नाही.

आशूडी,

मला वाटतं की कर्ण तिन्ही प्रसंगी तात्कालिक निकषांत बसत नव्हता. दुर्दैवाने तिन्ही प्रसंगी सूतपुत्र असणं हाच नेमका निकषभंग ठरला.

द्रोणांनी शिकवायला नकार देणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. कारण त्यावेळी द्रोण भीष्माला बांधले गेले होते. ते कौरवांखेरीज इतर कोणालाही शिकवणार नाहीत असं त्यांच्यात ठरलं होतं. पुढे हस्तिनापुरात त्याला शक्तीप्रदर्शन करू दिलं होतं. फक्त भीमाशी सामना होऊ शकला नाही. कारण तेच. स्वयंवरात वर निवडायचा अधिकार फक्त मुलीचाच असतो. त्यावेळी द्रौपदीने माय चॉईस म्हणून त्याला नाकारलं. तिनेही तेच कारण दिलं.

तसं बघायला गेलं तर कीचकही सूतपुत्रच होता. पण तो स्वयंवरास नव्हता. त्यामुळे फक्त क्षत्रिय कुलाच्या राजांनीच यावं अशी पूर्वअट होती की काय अशी शंका येते. विवाहेच्छुक राजांच्या यादीत कोणी सूतपुत्र दिसंत नाही.

थोडी अधिक माहिती इथे डकवतो :

karna_at_draupadi_swayanvar.jpg

स्त्रोत : https://www.scribd.com/doc/19959735/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD... पीडीएफ पान क्रमांक ६४

आ.न.,
-गा.पै.

सूतपुत्र असणं हाच नेमका निकषभंग ठरला. >> त्याचे सुतपुत्र असणे आणि त्याला योग्य तो मान दिला नाही हे जर खटकत असेल तर हज्जारो वर्षांपासुन लाखो करोडो लोकांना निव्वळ इतर जाती जमातीतील लोक असल्यामुळे योग्य मान दिला गेला नाही त्यांना प्रत्येक गोष्टींपासुन वंचित ठेवले गेले. हे किती प्रमाणावर खटकायला हवे ?

Pages