'मृत्युंजय' कर्ण आणि माझा प्रण

Submitted by भागवत on 13 April, 2015 - 05:23

आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.

मग मी कर्णा वरचे भरपूर वाचन केले. प्रत्येक लेखकाने त्यांच्या परीने कर्णावर लिहिले आहे. सगळी कडे कर्ण कमी - जास्त प्रमाणात चांगला दाखवला आहे. कर्ण दानशूर, दान वीर होता हे सगळ्या पुस्तकात आहे. पण 'मृत्युंजय' वाचल्या नंतर कर्णाच दृष्टिकोन कळला. काय रंगवलंय कर्णाला लेखकाने. 'मृत्युंजय' शिवाजी सावंत यांची सर्वोच्च कलाकृती आहे. मला आधी मराठी पेक्ष्या दुसर्‍या भाषेत प्रगल्भ शब्द योजना आहे असे वाटायचे. पण 'मृत्युंजय' वाचून माझा समज खोटा ठरला. काय अप्रतिम शब्द रचना आहे 'मृत्युंजय' मध्ये. एक-एक शब्द पारड्यात तोलून निवडला आहे. एखाद्या कलाकाराची सर्वोच्च कलाकृती वाचून आपण त्या शब्द रुपी पावसात मनसोक्त भिजुन जातो. 'मृत्युंजय' वाचुन मी खुपच प्रभावित झालो. भीष्म आणि कर्ण ने खुप प्रतिज्ञा केल्या. मला वाटते की त्यांची प्रतिज्ञा आणि जीवन भर त्यांनी पाळलेला शब्द हेच त्यांचा जीवनाचे मर्म, असामान्य कर्तृत्व आणि मोठेपण आहे.

मला असे वाटायचे की प्रतिज्ञा निभावणे खुप सोपे असते. त्यामधे विशेष काही नसते असे समजत होतो. मा‍झ्या कडे एक टू-व्हीलर आहे. मग मी सुध्दा एक प्रण केला. एक महिना मी गाडीवरून जाताना जो मागेल त्याला टू-व्हीलर वर लिफ्ट देईल असा प्रण केला. हा प्रण एक महिना निभावणे मला कठीण गेले. माणूस पहिल्यांदा स्वत:च्या सुरक्षेचा विचार करतो. मी कधीही अनोळखी व्यक्तिला निर्जन रस्त्यावर लिफ्ट दिली नाही. मळके कपडे घातलेला मनुष्य दिसला आणि त्याने लिफ्ट मागीतली तर त्यामुळे माझे कपडे खराब होतील म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली नाही. ओळखीच्या लोकांना लिफ्ट दिल्यावर मना मधे कुठे तरी नकळत अपेक्षा होती की ते कधीतरी आपल्या गरजेच्या वेळी लिफ्ट देतील. फक्त शाळेत जाणारी मुले यांना निरपेक्ष वृत्तीने लिफ्ट दिली. प्रतिज्ञा, प्रण घेणे खुप सोपे आहे पण ती प्रत्येक प्रसंगी निरपेक्ष वृत्तीने निभावणे, टिकवणे खुपच कठीण, अवघड काम आहे. त्यामुळे कर्णाला असामान्य व्यक्तिरेखेला माझा मनापासून दंडवत प्रणाम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आणि चर्चा मस्त!

महाभारत का आपलेसे वाटते कारण त्यातील पत्रांचे स्वभाव किंवा ती पात्रेच रोजच्या जिवनात भेटतात.
मातृ, पितृ, भ्राता, पुत्र, पत्नि, पती, मित्र, सखा या सगळ्या गुंत्यात प्रत्येक जण अडकला आहे आणि त्या मर्यादेत ही पात्रे प्रसंगी चांगले वाईट वागतात.
कर्ण कितीही वाईट वागला तरीही त्याच्या बद्दल सहनुभुती वाटतेच. अनाथ पणाची जाणिव अगदी लहानवयातच झालेल्या व्यक्तीला सुतपुत्र म्हणणारे आणि मानाने राज़्य देवुन कायम आदर करणारा (दुर्योधन) यात त्याने दुर्योधनची निवड केली तर कुठे चुकले? तो दानी होता या पेक्शा त्याने मित्रप्रेम आणि मित्र विश्वास पाळला म्हणुन हि तो मोठा आहे.
पण या सगळ्यात तो काय चांगले आणि काय वाईट याचा विवेक विसरला. मित्रा ला योग्या वेळी योग्य सल्ला देणे हा मित्रधर्म विसरला म्हणुन तो दोषी आहे.

शेवटी महाभारत का घडले कारण प्रत्येकजण आपले नाते, प्रतिज्ञा इ. इ. च्या नादात 'धर्म' विसरला. इथे धर्म=कर्तव्य अथवा राईटसनेस

चुभुदेघे

धन्यवाद गामा_पैलवान_५७४३२,dreamgirl ,टीना, Nira

शेवटी महाभारत का घडले कारण प्रत्येकजण आपले नाते, प्रतिज्ञा इ. इ. च्या नादात 'धर्म' विसरला. इथे धर्म=कर्तव्य अथवा राईटसनेस >> +१
कपटाने द्युत खेळायला लावने हा शकुनीचा सल्ला होता .. कर्णाचा नव्हता. >> +१

भीष्म आणि द्रोणांच्या भरवश्यावर दुर्योधनास अंतिम युद्ध लढायचा सल्ला एकीकडे द्यायचा आणि दुसरीकडे भीष्म सेनापती असेपर्यंत स्वत: हाती शस्त्र धरणार नाही असा हट्ट धरून बसायचं. याला काय म्हणायचं तुम्हीच ठरवा.>>
भीष्म नी कर्णाला अर्धरथी असा उल्लेख केला होता, त्यामुळे कर्ण पहिले १० दिवस युद्धात नव्हता.

कर्णाने स्वत:च्या बळावर दिग्विजय केलेला आहे.

कुंतीने वेळीच कर्णाला आपले म्हटले असते तर युधिष्ठीराने त्याला मोठ्या भावाचा अधिकार दिला असता आणि दुर्योधनानेसुद्धा कर्णाला हसतहसत राजमुकुट दिला असता. हे सगळे महाभारतच टळले असते. कर्णावरील अन्याय दूर करण्यासाठी वेळीच कुंतीने प्रयत्न करायला हवे होते. पण ते करायच्या ऐवजी कुंती माझे "पाच" पुत्र जिवंत राहु देत हे दान मागायला कर्णाकडे गेली आणि तिने तसे जावे असा सल्ला श्रीकृष्णानेच दिला होता. युद्ध टळत नाही म्हटल्याबरोबर इंद्रसुद्धा कवचकुंडले मागायला आला. कर्णाच्या दानशूरपणाचा फायदा सर्वांनीच करून घेतला आहे. अगदी त्याच्या जन्मदात्या आईनेसुद्धा. महाभारत घडण्याची जेवढी जबाबदारी धृतराष्ट्र आणि शकुनी वर येते तेवढीच जबाबदारी कुंतीवरसुद्धा येते.

dreamgirl,

>> एकंदरीत एक योद्धा म्हणून कर्ण अर्जुनाच्या जवळपासही फिरकू शकत नव्हता. >> अत्यंत चुकीची माहीती!
>> धनुर्धारी म्हणून कर्ण हा अर्जुनापेक्षाही कांकणभर सरस होता!

जर कर्ण अर्जुनापेक्षा सरस होता तर घोषयात्रेप्रसंगी कौरव चित्ररथ गंधर्वाच्या तावडीत सापडलेच कसे? तसेच विराटाच्या गायी कौरवांनी हरण केल्या तेव्हा अर्जुनाने कर्ण, दुर्योधन, भीष्म आणि द्रोण या सगळ्यांचा एकहाती पराभव केला. त्यावेळी कुठे गेला कर्णाचा पराक्रम? कर्ण अर्जुनाच्या सोळाव्या कलेइतकाही नाही असं भीष्मांचं म्हणणं होतं.

आ.न.,
-गा.पै.

Karna Parva, the eighth book of the Mahābhārata, describes sixteenth and seventeenth days of the Kurukshetra war where post Dronacharya’s death Karna took over as the commander-in-chief. Anticipating a likely battle to the death between Karna and Arjuna, Krishna warned Arjuna calling Karna to be the foremost of the heroes.[19][20]

“ Hear in brief, O son of Pandu! I regard the mighty Karna as thy equal, or perhaps, thy superior! In energy he is equal to fire. As regards speed, he is equal to the impetuosity of the wind. In wrath, he resembles the Destroyer himself. Endued with might, he resembles a lion in the formation of his body. He is eight ratnis in stature. His arms are large. His chest is broad. He is invincible. He is sensitive. He is a hero. He is, again, the foremost of heroes. He is exceedingly handsome. Possessed of every accomplishment of a warrior, he is a dispeller of the fears of friends. No one, not even the Gods with Vasava at their head, can slay the son of Radha. No one possessed of flesh and blood, not even the Gods fighting with great care, not all the warriors of the three worlds fighting together can vanquish the son of the chariot-rider. ”

विकिभाऊ , अस सांगतात. आता ते खर आहे की नाही ते पहाव लागेल Happy

महाभारताकडे श्री. व्यास यांनी लिहिलेला एक छानसा ग्रंथ म्हणुन न पाहता त्यामधिल व्यक्तिरेखा त्याकाळी होऊन गेल्या आहेत अशा समजुतीने का भांडावे बरे?? व्यासांना कर्ण तसा दाखवावा वाटला म्हणुन त्यांनी दाखवला.ईतर व्यक्तीरेखा देखिल त्यांना वाटलं तशा रंगवल्या. महाभारताकडे एक साहित्यनिर्मिती म्हणुन बघा, त्यातील हवे ते सार घ्या, सिंपल!

कर्ण अर्जुनाच्या सोळाव्या कलेइतकाही नाही असं भीष्मांचं म्हणणं होतं.>> याच भीष्मांचं असं म्हणणं होतं की त्यांच्यासह आवाजाची परीक्षा अर्जून व कर्ण या दोघांनाच होती (*एकलव्याला इथेही विचारात घेतले नाहीये) आणि अर्जूनाने पक्षाचा डोळा टिपला त्या स्पर्धेत कर्णाचा पाण पक्षीणीच्या चोचीत लागला ते आवाजाच्या वेधाने!

कवच-कुंडलं रहीत, ब्रह्मास्त्र वाया गेल्यानंतर कर्णाला हरवणं फार कठीण नव्हतं! तरी निशस्त्र असताना बाण चालवावा लागला.

शेवटी महाभारत का घडले कारण प्रत्येकजण आपले नाते, प्रतिज्ञा इ. इ. च्या नादात 'धर्म' विसरला. इथे धर्म=कर्तव्य अथवा राईटसनेस >> +१
टीना हाही प्रतिसाद पटला.

महाभारतावरील खास टीप्पणी हि इरावती कर्वेंच्या युगांत मधे जी उतरली आहे त्याहून अधिक अचूक विश्लेषण सापडणे कठीण आहे. भैराप्पा ह्यांचे पर्व हे महाभारताला मानवी प्रव्रुत्तींचे कथन ह्या द्रुष्टीने लिहिले गेलेले पुस्तक वाचावे. कुठल्याही पात्राला दैवी वलय न देता ती फक्त माणूस म्हणून वागली आहेत असे धरले तर महाभारत काय सांगते हे अतिशय वाचनीय आहेत. अर्थात हा त्यांचा महाभारतावरील टेक आहे हे वाचताना लक्षात ठेवले तर अधिक संगती लागते. (हेच 'मृत्युंजय' ला ही लागू होते).

महाभारत घडण्याची जेवढी जबाबदारी धृतराष्ट्र आणि शकुनी वर येते तेवढीच जबाबदारी कुंतीवरसुद्धा येते.
माझ्या मते शंतनूने लंपटपणा केला, भीष्माने एकदम भीष्म प्रतिज्ञा केली, या कारणांमुळे सगळे अधोगतीला लागले. धृतराष्ट्र वगैरे लोक म्हणजे मरून खड्ड्यात गेलेल्या माणसावर माती लोटणारे एव्हढेच.
त्या बाबतीत.
<<<<शेवटी महाभारत का घडले कारण प्रत्येकजण आपले नाते, प्रतिज्ञा इ. इ. च्या नादात 'धर्म' विसरला. इथे धर्म=कर्तव्य अथवा राईटसनेस>>>>
यास अनुमोदन.

महाभारताकडे श्री. व्यास यांनी लिहिलेला एक छानसा ग्रंथ म्हणुन न पाहता त्यामधिल व्यक्तिरेखा त्याकाळी होऊन गेल्या आहेत अशा समजुतीने का भांडावे बरे?? व्यासांना कर्ण तसा दाखवावा वाटला म्हणुन त्यांनी दाखवला.ईतर व्यक्तीरेखा देखिल त्यांना वाटलं तशा रंगवल्या. महाभारताकडे एक साहित्यनिर्मिती म्हणुन बघा, त्यातील हवे ते सार घ्या, सिंपल!>>>>>>>>>>>

अरे काय देवा...इथे मृत्युंजय आणि राधेय चे दाखले देऊन कर्णाच्या कामगिरीची चर्चा चाललीये. या सगळ्या कादंबऱ्या आहेत. नायकाची प्रतिमा लार्जर दॅन लाईफ दाखवावीच लागते त्यात. कर्णाचे मूल्यमापन त्यावरून कसे काय करू शकता.

व्यासांचा आधार घ्यायचा झाला तर मध्यंतरी अजून एक पुस्तक वाचनात आले होते. त्याचे नाव आता विसरलो. पण त्यात असा उल्लेख होता की कर्णाला १९ व्या वर्षी अंगदेशाचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर तहहयात तो राजाच होता. खेरीज दुर्योधनाचा मित्र म्हणून धृतराष्ट्राच्या मंत्रीमंडळात त्याला स्थान होते. सूतपूत्र म्हणून हिणवला गेला असला तरी तो काहीच वेळी. लोक काय त्याला येता जाता २४ तास सूतपूत्र म्हणून हाक मारत नव्हते. राजवाड्याईतक्याच आलिशान महालात, दास-दासी, हाताशी सैन्य, रथ घोडे असे सर्व काही होते. त्यामुळे तसे पाहिले तर क्षत्रियत्वाचे बरेचसे फायदे त्याला असे ना तसे मिळालेलेच आहेत. राजसूय यज्ञ सोडला तर त्याच्या पराक्रमाचा दाखला देता येईल असे कुठेही युद्ध त्याने केलेले नाही. आणि तरीही तो माझ्यावर अन्याय झालाय म्हणून गळा काढतो.

या उलट पांडवांना क्षत्रियत्व जन्मापासून मिळाले असले तरी तब्बल १४ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात काढावे लागले आहे. कर्णाला कुठेही रानावनात ओळख लपवत फिरावे लागले नव्हते का रुप पालटून आचारी, घोड्यांना खरारा करणारा असे काम करावे लागले नव्हते.

मधल्या काही वर्षात इंद्रप्रस्थाचे राज्य सोडले तर पांडवांना आयुष्याच्या उतारकाळीच (महायुद्ध संपल्यावर) राज्यप्राप्ती झाली आहे. तोपर्यंत ते हलाखीचेच आयुष्य काढून जगले आहेत.

आता अन्याय नक्की कुणावर झाला. सूतपूत्र म्हणून राजाचे ऐश्वर्य उपभोगणाऱ्यावर का राजपुत्र असून घोड्याचा खरारा करणाऱ्यावर...

हे सगळ वाचल्यावर कर्ण देखील म्हणत असेल "मेरा हस्तिनापुरसे पुराना नाता है. मै बचपनसे ही क्षत्रिय राजा बनना चाहता था" Biggrin

भीष्माने एकदम भीष्म प्रतिज्ञा केली, या कारणांमुळे सगळे अधोगतीला लागले. >>> अरे हो. भीष्म प्रतिज्ञा मी विसरलेच होते .

आता अन्याय नक्की कुणावर झाला. सूतपूत्र म्हणून राजाचे ऐश्वर्य उपभोगणाऱ्यावर का राजपुत्र असून घोड्याचा खरारा करणाऱ्यावर >>>> अन्याय झालाय काहीही चूक नसताना जन्म झाल्या झाल्या सोडून दिलेल्या एक मुलावर. स्वतःची ओळख माहित नसणार्‍या एका क्षत्रियावर. आणि स्वतःची ओळख पटल्यावरही स्वतःच्याच आईने त्याला न स्वीकारल्याने तुझे पाच पुत्र जिवंत राहतील असे वचन तिला देणार्‍या दानशूर वीर योद्ध्यावर.

असे म्हणतात की युद्धभूमीवर कर्णाचे धनुष्य तोडणे फक्त पाच लोकांना शक्य होते. परशुराम, शंकर, भीष्म, द्रोणाचार्य आणि अर्जुन. ह्यावरून तो शूरवीर योद्धा असल्याची खात्री पटावी.

असे म्हणतात की युद्धभूमीवर कर्णाचे धनुष्य तोडणे फक्त पाच लोकांना शक्य होते. परशुराम, शंकर, भीष्म, द्रोणाचार्य आणि अर्जुन. ह्यावरून तो शूरवीर योद्धा असल्याची खात्री पटावी.>>>>

अहो असे म्हणणे आणि प्रत्यक्षात असणे यात फरक आहे की नाही. कर्णाने प्रत्येक वेळी पराभवच स्वीकारला आहे. महायुद्धातही तो पहिले १० दिवस उतरलाच नाही. आणि सेनापती झाल्यावर दोनच दिवसात त्याचा मृत्यू झाला.

काहीही चूक नसताना मोठे असूनही राज्याचा हक्क न मिळाल्याचा, सख्खा चुलत भाऊ लहानपणापासूनच जीवावर उठल्याचा, राज्य मिळूनही मोठ्या भावाने ते द्युतात घालवल्याचा, राजपुत्र असूनही रानावनात राहण्याचा, बृहन्नडा होऊन एक वर्ष राहण्याचा अन्याय पण कमी आहे का....

तसे म्हणले तर महाभारतात कुठले असे व्यक्तिमत्व आहे की ज्यावर अन्याय झालेला नाहीये. जगी सर्व सुखी असा मला तरी कुठले व्यक्तिमत्व दिसत नाही.

महायुद्धातही तो पहिले १० दिवस उतरलाच नाही.>>> त्याचे कारण भीष्म (की द्रोणाचार्य??) म्ह्टले होते की कर्ण लढणार असेल तर मी सेनापती होणार नाही. तेव्हा कर्णाने माघार घेतली होती. सैन्याला चांगला सेनापती मिळावा म्हणून युद्धात शस्त्र न उचलता येणे हासुद्धा अन्यायच नाही का?

तसे म्हणले तर महाभारतात कुठले असे व्यक्तिमत्व आहे की ज्यावर अन्याय झालेला नाहीये. >>> बरोबर आहे तुमचे म्हणणे. पण म्हणून कर्णावर झालेला अन्याय कमी होत नाही.

कर्णाला कुठेही रानावनात ओळख लपवत फिरावे लागले नव्हते का रुप पालटून आचारी, घोड्यांना खरारा करणारा असे काम करावे लागले नव्हते. >>>>>

आयुष्य भर कर्णाने घोड्यांना खराराच केला एक 'सूतपुत्र' म्हणून तेव्हा नाही वाटला कि हा राजपुत्र असून खरारा का करत आहे?

मधल्या काही वर्षात इंद्रप्रस्थाचे राज्य सोडले तर पांडवांना आयुष्याच्या उतारकाळीच (महायुद्ध संपल्यावर) राज्यप्राप्ती झाली आहे. तोपर्यंत ते हलाखीचेच आयुष्य काढून जगले आहेत. >>>>>> पाचही पांडवाचा जन्म 'जंगलात' झाला हि गोष्ट मान्य, पण पंडू राजाचा स्वर्गवास झाल्यावर 'पितामह भीष्म' कुंती व ५ पांडवांना घेऊन हस्तिनापुरात आले. इथून पांडवांचे सर्व शिक्षण होई पर्यंत ते आणि कौरव गुरुकुलात होते. गुरुकुलातून स्वगृही आल्यावर कलहामुळे पांडवानी खांडवप्रस्थ वसवले. म्हणजे गुरुकुलातील काळ वगळता पांडवानी राज महालात वास्तव्य केले आणि त्या नंतरही (वनवासा मध्ये जाण्यापूर्वी)

या उलट जेष्ठ पुत्र असूनही कर्ण सुतकुलात वाढला, मुलभूत हक्कासाठी सुद्धा त्याला संघर्ष करावा लागला

कवच कुंडले हि कर्णाची ईश्वर कृपेने मिळालेली ढाल होती. त्यात त्याचे स्वताचे कर्तुत्व काय होते? >>>> पण त्याने हि ढाल कधीच वापरली नाही किंवा त्याच्या आड गेला नाही. वस्तुतः त्या वेळी मल्लविद्या होतीच ना कर्णाला आव्हान द्यायला आणि भीमासारखा मल्ल असताना का दिल नाही आव्हान.

आणि हि जर ईश्वर कृपा असेल तर अर्जुनला मिळालेला 'गांडीव' धनुष्य आणि 'अक्षय भाता' हि कोणाची कृपा होती.

सूर्यास्ता नंतर जर युद्ध बंद असेल तर भीम पुत्र 'घटत्कोच' ह्याला रात्रीच्या युद्धात उतरवून कर्ण कडे असलेली अमोघ / वासवी शक्ती कृष्ण ने जाणून बुजून वापरायला भाग पडला म्हणजे कृष्ण ला सुद्धा कर्णाच्या पराक्रमाची खात्री होती.

महाभारताकडे श्री. व्यास यांनी लिहिलेला एक छानसा ग्रंथ म्हणुन न पाहता त्यामधिल व्यक्तिरेखा त्याकाळी होऊन गेल्या आहेत अशा समजुतीने का भांडावे बरे??
<<
अहो साहेब,

ते महाभारत तरी जगद्विख्यात व उत्तम साहित्यमूल्य असलेले महाकाव्य आहे.

इथे आम्ही होणार सून वगैरे 'दर्जेदार' शिरियलींवर शेकडो पोस्टी टाकून चर्चा करतो. Wink

>>आता अन्याय नक्की कुणावर झाला. सूतपूत्र म्हणून राजाचे ऐश्वर्य उपभोगणाऱ्यावर का राजपुत्र असून घोड्याचा खरारा करणाऱ्यावर... <<
हो बरोबर आहे. पांडवांवर जिवंत असताना अन्याय झालाच पण मेल्यावर सुद्धा ते बिच्चारे नरकात गेले (युधिष्ठीर अपवाद). आणि कर्णासकट सगळे कॉरव स्वर्गात गेले... Happy

.

कर्णावर झालेले अन्याय त्याकाळानुसार कृपया सांगावे >>> आईनेच जन्म होताच सोडले यापेक्षा मोठा अन्याय आहे का जगात? जे एकमेव नाते जगात खरे आणि सच्चे असते तेच असूनही नसणे ..

ऋऽऽन्मेष,

>> शॉकिंग.. हे नव्ह्ते माहीत.. असे का?

तत्कालीन क्षत्रियांना शाप का वर होता की परस्परांचा नाश करून तुम्ही स्वर्गात याल म्हणून. त्यानुसार कुरुक्षेत्रावर लढाईत मेल्यावर स्वर्ग मिळेल असा श्रीकृष्णाचा संकल्प केला होता.

हा संकल्प आजही कार्यरत आहे असं मानतात.

आ.न.,
-गा.पै.

तत्कालीन क्षत्रियांना शाप का वर होता की .............................आजही कार्यरत आहे असं मानतात.

मी तरी मानतो. शिवाय आधुनिक काळा प्रंमाणे या बाबतीत सुद्धा जात, धर्म इ. न पाळता सर्वांनाच ती संधि मिळावी म्हणून सर्वच भारतीय तसेच वागतात.

हॉई! पान्डव तर हिमालयातुन स्वर्गात गेले अशी ती गोष्ट आहे ना? एक यक्ष सगळ्या पान्डवाना एकेक करुन प्रश्न विचारतो, तर एकटा धर्म म्हणजे युधिष्ठीर त्या सर्व प्रश्नान्ची खरी उत्तरे देतो अशी ती कथा आहे, ती कोणती मग?

Pages