अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टूथपेस्ट लाटण्याने लाटून कपड्याचा चिमटा लावून ठेवतोच. Happy अजून लोकं करतात बघून हसू आले.
क्रीमच्या जार उलट्या करून त्यातील नळी इकडे तिकडे फिरवून, झटकून, हापटून क्रीम काढायचो आता कापीन.

१) शक्यतो ऑनलाईन/पेपरलेस बिल्सला साईन अप केले आहे. पण तरीही मेल मधे येतचं काही काही. त्यांची इन्व्हलप्स जर कोरी (अ‍ॅड्रेस, काही इनफॉर्मेशन न लिहिलेली) असतील तर साठवून ठेवते. परत एन्व्हलप वापरायची वेळ आली की ती वापरता येतात.
२) मी ओरीगामी करते मधून मधून , त्यासाठी प्रॅक्टीस करायला कागद लागतो. मेल मधे अ‍ॅड म्हणून मॅगझीन्स, रंगीत कागद येतात, त्याचे स्केअर्स कापुन ते वापरते ओरीगामी ट्राय करायला.

ere is latent power draw in the charger, even if it isn’t plugged into a phone, or even if the phone is fully charged.
Not a lot of draw, but if you multiply it by 5-6+ chargers per home, multiplied by millions of home, it adds up.

(नक्की शास्त्रीय माहिती नाही. कुणी ज्ञानदीप लावले तर बरच पडेल!) >> ghost/vampire/leaking/phantom power consumption म्हणतात त्याला. दर वेळी चार्जर्स काढणे तापदायक वाटत असेल तर advanced power strips मिळतात त्या वापरा. एका प्रकारात एक बटन असते ते दाबले कि नि दुसर्‍यामधे तुमचे जे मुख्य primary device (say PC) असेल ते बंद झाले कि आपोआप सगळी त्यावर अवलंबून अ॑सलेली सॉकेट्स पूर्ण बंद होतात.

अमेरिकेत येण्यापुर्वी आम्ही माणसी प्रतीदिन १०० लिटर पाणी वापरत होतो, काटकसर अशी केली नाही पण खालील उपाय केले असल्यामुळे ते सहज शक्य होते.
१> शॉवर ने अघोळ करणे. बादलीत ने किंवा टब मध्ये अंघोळ केली तर पाणी भरपुर जात.
२> बेसिन मध्ये एक पेला ठेवला होता आणि दात घासतना , चुळ भरतना तो पेला वाप्रयाचा. दात घासुन झाल्यावर बेसिनचा नळ सोडुन बेसिन साफ करायचे. दात घासताना नळ बंद ठेवावा.
३> WC मध्ये फ्लस जर हळुच सोडला तर २.५ लिटर पाणी आणि जोरात दाबला तर ५ लिटर पाणी जायची सुविधा होती. १ नंबर ला २.५ लिटर तर दोन नंबर ला ५ लिटर पाणी वापरले जायचे.
४> शक्यतो डिश वॅशर वापरला. १ दिवसाची भांडी. १४ लिटर पण्यात धुतली जातात.

अमेरिकेत घराजवळच जगातिल ६०% गोड्या पाण्याचा साठा असल्याने आतामात्र पाण्याची भरपुर नासाडी चालु आहे Happy

खुप चांगला धागा. Happy

चार्जर बद्दल. काही देशात बहुधा प्लगला चार्जर लावला की तो चालु होतो. भारतात ऑन ऑफ स्विच दाबावा लागतो त्यामुळे भारतात असाल तर तो स्वीच बंद केला तरी पुरेसे आहे. पण जिथे असा स्विच नसतो तिथे काढुन टाकण्याशिवाय पर्याय नाही.

कपड्याचा ड्रायर फक्त ह्युमिड दिवसांकरताच वापरता येईल. ड्राय वेदर असेल तेव्हा गरजेचे नाहीये.

तसेच खुप ड्राय वेदर मधे ह्युमिडीफायर वापरावा लागतो, त्याऐवजी रात्री टॉवेल वगैरे भिजवुन बेडरुममधेच एका खुर्चीवर पसरवुन वाळत घातला तर रुमची ह्युमिडीटी वाढायला मदत होते.

डाळ तांदुळ भाज्या इत्यादी धुतलेले पाणी एका भांड्यात साठवुन स्वयंपाक झाल्यावर ते झाडांसाठी वापरता येईल.

उन्हाळ्यात झोपताना एसी हवाच असेल तर एखाद तासाचा टायमर लावुन झोपावे. झोप लागल्यावर रुम थोडी गरम झाली तरी चालतं. रात्री मधेच गरमीने जाग आलीच तर पुन्हा एकदा एक तासाचा टायमर लावावा.

अमेरिकेत बहुधा सोलार पॉवर एसी उपलब्ध आहेत. किंमत माहित नाही पण त्याचा विचार करता येईल.

जिथे प्यायच्या पाण्याची टंचाई आहे पण वेदर ह्युमिड आहे तिथे वॉटर जनरेटर ( फ्रॉम एअर) वापरता येईल.

जपानमधे असताना उन्हाळ्यात एसीचे टेंपरेचर २८ ठेवा असा सतत प्रचार केला जायचा आणि ऑफिसेसमधे तसेच तापमान राखले जायचे. एरवी आपण २२/२३/२५ असे तापमान ठेवत असु ते केवळ २८ केल्याने किती ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल याचे काहीतरी कॅलक्युलेशन होते. आणि ही गरमी सहन करण्यासाठी नेहेमीचे फुलशर्ट + टाय ला डच्चु देऊन उन्हाळ्यात कुलबिझ स्टाईल सुरु केली होती. इथे वाचा.
अशाच प्रकारचे इथेही वाचता येईल.

जिज्ञासा छान धागा!!
वरच्या रारने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी करतो.
बर्‍याच गोष्टी आधीच लिहिल्या आहेत, माझे चार आणे.
एनर्जी स्टार अ‍ॅप्लायन्सेस घेणे.
भांडी हाताने धुण्यापेक्षा डिशवॉशर वापरणे, हाताने रिन्स केली तरी बरचं पाणी लागतं त्यामुळे नुसतं खरकटं काढुन धुवायला टाकणे. प्रिरीन्स करावी जर भांडी कोरडी झाली असतील तर.
हाफ रॅक लोड ऑप्शन असलेलं नवीन डिशवॉशर घेतलयं, रोजची भांडी रोज धुतली जातात.
ड्रायिंग रॅक वापरणे जास्तीत जास्त कपडे वाळवायला. स्वेटर, फ्लिसचे कपडे आरामात बाहेर मस्त वाळतात.
पेपर टॉवेल वापर ५-६% अगदीच जिथे गरज तिथे. २ महिने झाले घरातले पेपर टॉवेल संपुन, अजुन आणले नाहीत.
डिसपोजबल खुपच कमी वापरत होतो, २५च्या वर माणसं झाली तर.
ऑफिसमधे ४-५ वर्षांपुर्वी अर्थ डे ला अ‍ॅडमिनला सांगुन डिसपोजेबल ग्लास बंद करवले, तिने सगळ्यांसाठी कॉफी मग मागविले.
प्रत्येक रिसायकलेबल गोष्ट रिसायकल करतोच, कचर्‍याचा डबा १/४ पण भरत नाही पण रिसायकल बिन वहात असते.
पाण्याची बाटली मागच्या वेळी कधी विकत घेतली आठवत नाही.

https://www.catalogchoice.org/

अन्वॉन्टेड मेल्स साठी इथे साईन-अप करावे लागते. मग ते लोक्स बंद करतात.

पेन्नीसेव्हर किंवा व्हॅल्यूपॅक - लोकल नेबर्हुडचे जे काय असेल ते कुपॉन्स तेवढे येतात.

डिश वॉशर रोज वापरत असाल तर हीटेड ड्राय बटन बंद करून ठेवायचं कारण ते तासभर तरी फुंकर घालत बसतं भांड्यांवर. बरीच एनर्जी वाचते.

मीही रोज लावतेच डिवॉ. खचाखच भरतो रोजच्या रोज.
हीट ड्राय बटन बाय डीफॉल्ट ऑन होतं तो एक वैतागच आहे. बरेच दिवस माझ्या लक्षात येत नव्हतं. आता हल्ली आवर्जून बंद करते.

>>ड्रायिंग रॅक वापरणे जास्तीत जास्त कपडे वाळवायला. स्वेटर, फ्लिसचे कपडे आरामात बाहेर मस्त वाळतात.
आमचं ह**ट HOA कपडे बाहेर वाळवू देत नाही.

बाकी इथे आपण असंख्य उपाय सुचवू आणि अंमलात आणू. पण 'पर्यावरणाचा र्‍हास' हा देखिल इतका पोलिटिसाइझ झालेला विषय आहे की लाल राज्यांमध्ये (आणि मेसन डिक्सन लाइनीच्या दक्षिणेला) कितीही बोंबा मारल्या तरी उपयोग नाही असं वाटतं.

सिटी, काउंटी, टाऊन यांचे रीसायकलिंग प्रोग्राम्स असतात. ६ फुटाचा बाप्या मावेल इतकी मोठी निळी रीसायकलिंग बिन मिळते. तरीही प्लास्टिक, कागद हिरव्या गार्बेज बिन्समध्ये दिसतात. बॅटर्‍या आरामात कचर्‍यात फेकतात. कितीही कोकलऊन सांगा, अर्धवट भरलेले रंगाचे डबे कचर्‍यात, गाडीचं बदलेलं ऑइल - कचर्‍यात.

कॉमन सेप्टिक टँक्स असलेल्या कम्युनिटीजमध्ये कुकिंग ऑईल सिंकमध्ये ओतू नये असं स्ट्रिक्ट वॉर्निंग असूनही कोणी ऐकत नाही असं दिसतं. टँकच्या पाण्यावरल्या तवंगांचे फोटो, त्यामुळे सेप्टिक टँकमधले उपयोगी बॅक्टेरिया मरून होणारे प्रॉब्लेम्स, या सगळ्याचे फोटो दाखवणारी पत्रकं येतात. 'हू केअर्स' अ‍ॅटिट्यूड असणार्‍यांना काडीचाही फरक पडत नाही. 'आपण जिवंत असेपर्यंत वाट्टेल तसे बेजबादरापणे वागून मजा मारू. नंतरचं उरलेले बघून घेतील' असाच रवैय्या आहे. या सगळ्या कृत्यांचा एकत्र इफेक्ट होऊन पर्यावरणाचा ज्या रेटनं र्‍हास होतोय ते बघता आपण करत असलेले टिचभराचे प्रयत्न कितपत उपयोगी पडतील असं कायम वाटत राहतं. या सगळ्यांत आपण व्यक्तीशः जे काही करतो ते पर्यावरणाच्या समतोलाला किंवा सुधाराला उदंड हातभार लावतंय असं अजीबात नाही, पण तरी अंगवळणी पडलेल्या गोष्टी सोडवत नाही हे खरं!

बॅटर्‍या आरामात कचर्‍यात फेकतात. >> माझ्या ऑफिसात बॅटरी अन प्रिंटर कार्त्रिज कलेक्ट करतात. मी नित्यनेमाने त्याच्यात टाकते. वीचे, एक्स बॉक्सचे रिमोट भस्म्या झाल्यागत बॅटर्या खातात Happy . बर्‍याच लायब्ररीमधून पण अशी सोय आहे. स्टेपल्स, ऑफिस डेपो वगैरे सुद्धा रिसायकल सर्व्हिस देतात.

शोनू, हे इथेही लोकांना दिस्तं, माहिती असतं. पण 'पर्यावरणवाद्यांचं मूर्ख खूळ' म्हणून हिणवत हे सगळे प्रकार चालतात.

कुकिंग ऑईल सिंकमध्ये ओतू नये >> याने डिस्पोजल सुधा लवकर खराब होत., डिस्पोजल मधे भात्,तेल्,ऑईली फुड अजिबात टाकु नये त्याने डिस्पोजल क्लोग होवुन लवकर खराब होत.

मस्त धागा. माझे २ पैसे.
१. एकूण एक किचन कचर्‍याचे घरामागच्या बागेत कंपोस्ट.
२. प्रिंट सहसा करत नाही. उदा २०१५ मधे आत्तापर्यंत काहीही प्रिंट केलेले नाही.
३. इथे तिथे सापडणारे पाठकोरे कागद याद्या करायला वापरते. आता त्याच्या वह्या करण्याची रारची कल्पना अमलात आणेन.
४. शॉवर.
५. बाथरूममधे कपडे घरात वाळत घालायला दोर्‍या बांधल्या आहेत. ड्रायर नाही.
६. हिवाळ्यात जवळपास सगळ्याच भाज्या बाहेर ठेवते. फ्रिजमधे नाही. एकतर समोर असल्याने वापरल्या जातात. शिवाय फ्रिजची उर्जा वाचते. सगळी फळे, कांदे, बटाटे, टॉमेटो, ढो. मिरची, गाजरे इत्यादी कायमच बाहेर असतात.
७. नळाला सुरूवातीला येणारे गार पाणी एका जगात साठवते. ते लागेल तसे वापरता येते.
८. जमेल ते सगळे रिसायकल, अपसायकल. काही १०/१५ वर्षे जुने कपडे अजुनही वापरात आहेत. Happy

सगळ्यांच्या पोस्ट्स वाचून मला खूप छान वाटतंय Happy
chargers विषयी माहिती नव्हते. आता काढून ठेवत जाईन! पण इथे (अमेरिकेत) ऑन/ऑफ स्विच का नसतात सॉकेटस् ना? कोणाला माहिती आहे का?

रार, क्रीम वगैरे ठीक आहे पण टूथपेस्ट शेवटपर्यंत वापरून नये कारण उरलेल्या पेस्ट मध्ये fluoride चे प्रमाण अधिक असते असे मी कुठेतरी वाचले होते त्यामुळे मी पेस्ट पिळायला जात नाही Proud खखोदेजा! बाकीच्या गोष्टी तेढी उंगलीसे काढून वापरते!

१. Impulsive buying टाळण्यासाठी- यादी केल्याशिवाय खरेदीला बाहेर पडू नये! बिल करण्यापुर्वी यादीत नसलेल्या वस्तू का घेतल्या ह्याचा आढावा घ्यावा! हे मी करते!
२. अजून एक भयंकर महत्वाची टीप - ग्रोसरी करायला जाताना कधीही भुकेल्या पोटी जाऊ नये! हमखास जास्ती वस्तू खरेदी केल्या जातात. भरल्या पोटी शतपावली म्हणून ग्रोसरीज कराव्यात Proud
३. इथल्या एका प्रोफेसरांनी आपल्या घरी सोलर पॅनेल्स बसवून घेतली. किती खर्च आला ते माहिती नाही पण १२ वर्षांत break even होईल असं सांगितलं आहे त्यांना. शिवाय जर त्यांनी गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण केली तर ती ग्रीड मध्ये जाऊन त्याचे क्रेडीट मिळेल. टेक्सास मध्ये दणदणीत उन्हाळा असतो! इथे घर असणाऱ्या लोकांनी ह्या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही!

फारच चांगली माहिती मिळतेय. काही गोष्टी करत होते, काही आता सुरू करेन.
वर न आलेल्या काही गोष्टी:
१. पोळ्या करून झाल्यावर तवा तापलेला असतानाच दूधाचे पातेले त्यावर ठेवणे.
२. यादी केल्याशिवाय किराणा वगैरे तरी न आणणे.
३. उन्हाळ्यात गार पाण्यासाठी माठ वापरणे.
४. हेअर ड्रायर, वॉ. मशीन इ चा वापर अगदीच गरज असेल तेव्हा करणे.
काही प्रश्न पडले आहेत --
१. भारतातल्या हवेत भाज्या फ्रिजबाहेर ठेवून टिकत नाहीत, निदान टोमेटो वगैरे. रोज जाऊन दोन टो आणणे शक्य नाही. यासाठी काय सुचवाल?
२. दुधाच्या पिशव्या, किराणा सामान बांधून येणार्या पिशव्या फक्त डस्टबिनला अस्तर म्हणून वापरल्या जातात. या पिशव्यांचं योग्य मर्तिक कसं करावं?

तापलेल्या तव्यावर मी ही भांडं ठेवते.

दुध पिशव्या धुवून किंवा रीन्स करून वाळल्या की जमवून रद्दीवाल्याला देते. त्याच बरोबर इतर अनेक प्लास्टीक रॅपर्सही देते.
हा रिसायकलेबल कचरा ( ग्रोसरी बॅग्ज, अ‍ॅल्युमिनीयम फॉइल आणि पॅकिंग, विविध वस्तुंचे पॅकिंग - यात कार्डबोर्ड आणि प्लास्टीक मिक्स असेल तर हाताने वेगळे करुन घेते, चहाच्या कागदी डब्याच्या आत अ‍ॅल्यु. चे रॅपर असते ते काढुन रिसायकलेबल मध), सगळे कॅन्स, असलेच तर दह्याचे डबे इ. ) वेगळा ठेवला की कळत आपण किती प्लास्टीक वापरतो ते. Sad

कचरा डब्याला घालायला डीस्पोजेबल पिशव्याच घालते.
ओला किचन कचरा या महीन्यापासून वेगळा करणार असा प्लान आहे. बिल्डींग मॆधे प्रोजेक्ट सुरू करायचा आहे.

.

छान मुद्दे आले आहेत.
मी रहातो तिथे झाडी आहे आवारात, त्याची पाने गळुन पडतात.
जेव्हा इतर लोक गळून पडलेल्या पानांचा फारच "कचरा" होतो, व तो काढून टाकायला लागतो या निमित्ताने/कारणाने असलेली झाडे छाटून टाकतात व जिथे तिथे झाडून काढलेल्या पानांन्ना रस्त्याकडेला / त्याच झाडाच्या बुन्ध्याखाली/लगतच निव्वळ जाळले जाते (म्हणजे कालांतराने झाडही वठून मरते, व कॉन्ट्रॅक्टरची धन होते - तो वेगळा विषय आहे), तेव्हा,
माझ्याकडे मी पाला गोळा करुन ठेवतो व रोज सकाळी तोच पाला चुलीत जाळून घरातील साताठ लोकांचे आंघोळीचे पाणी तापवितो. पाला उपलब्ध असेस्तोवर हा उद्योग चालतो. पाल्याचे खड्यात पुरून खत करावे इतकी जागा माझ्याकडे नाही, तेवढे श्रम करण्यासाठी ताकद व वेळही नाही.
हे मी पर्यावरणस्नेही वगैरे म्हणुन करीत नाही, तर कोब्रा जात्याच काटकसरी व पुनर्वापराबाबत दक्ष असतात, त्यामुळे, व वीज/गॅस मला परवडण्याच्या पलिकडे गेल्याने हे उपाय करतो.

घरच्या कार्यक्रमात जास्त लोक येणार असल्यास, थर्माकोल/प्लॅस्टिक/कागदी डिशेस न वापरता शक्यतो झाडाच्या पानांच्या पत्रावळीच वापरतो, भले येणारे पाहुणे त्यास नाक मुरडत असतील, वा भिक्कारपणाचे डोहाळे समजत असतील. काही पाहुणे असेही अनुभवलेत ज्यांनी आक्षेप घेतला की "आम्हि काय असे ऐरेगैरे वाटलो का तुम्हाला, पत्रावळीत जेवायला वाढताय ते?" (मग त्यांना माझ्या खास शैलित समजावावे लागले.)
पत्रावळीत जेवणे म्हणजे भिकारपणाचे लक्षण असा जो काय समज झालेला आहे तो पुसुन काढावा लागेल.

असाच समज "सायकल चालविणार्‍यांबाबतही" सर्रास अनुभवण्यास मिळतो. पण मी सायकलही इतक्या "टेचात" चालवितो की त्यावर काही कुजकट निलाजरे बोलणे अशा लोकांना शक्य होत नाही.

मी वर्षातून केवळ दोन किंवा तिन वेळेसच शर्ट/प्यान्टीला इस्त्री करतो. बाकी सर्व दिवस, दोरीवर झटकून वाळत घातलेले शर्ट प्यान्ट तसेच्या तसे घेऊन वापरतो. वाळत टाकताना नीट टाकले की इस्त्रीची गरज पडत नसते. शिवाय दहा वर्षांपूर्वी वॉशिंग मशिन बिघडल्यानंतर नविन आणलेच नाही, तर वापरतच नाही. तिथे वीजेची/पाण्याची बचत होते.

मी फ्रीझ/रेफ्रिजरेटरही वापरीत नाही (अनेकदा मोह होऊनही आणला नाही). त्यामुळे वीज व औषधे यावरील खर्चात बचत होते. माझ्याकडे आलात तर काळ्या माठातील वाळ्याचा स्वादयुक्त थंडगार पाणी तेवढेच मिळेल. अन होऽऽ, आम्ही पाहुण्याला पाणी देखिल विचारूनच देतो. उगाच आला पाहुणा, की कर पुढे ग्लासभर पाणी असे नै करीत, कारण बरेचदा पाहुणा बाहेरुन काहि खाऊनपिऊन आलेला असतो व ग्लासभर पाण्यातील एखाद घोट घेतो वा घेतही नाही, अन तो गेला की ग्लासातील उरलेले पाणी फेकुन दिले जाते, ते वाया जाते. तेव्हा शक्यतो द्यायचि वेळ आली, तर ग्लास भरुन पुढे करण्यापेक्षा तांब्याभांडे पुढे करतो, व हवे तेवढे ओतून घ्या हे सांगतो. या सांगण्यावरून माझे बरेचसे देशस्थ पाहुणे हिरमुसले होतात, मागून कुचाळक्या करतात, बरेचदा तोंडावरही कोब्रांच्या पाणी हवे का विचारण्यावरचे जोक मारतात, पण मी त्यांना भीक घालत नाही.

गरजा वाढवू तितक्या वाढत जातात, पण जितक्या गरजा कमी, तितका माणूस अधिकाधिक सुखी हे तत्व लहानपणापासून मनावर बिंबवलेले असल्याने आमची साधी रहाणी जरी लोकांच्या "कुचेष्टेचा" विषय बनत असली तरी मग आम्ही अशा लोकांनाच फाट्यावर मारतो.

>>> ३. उन्हाळ्यात गार पाण्यासाठी माठ वापरणे. <<<<

हो, अन मी पाहिले आहे की कित्येकजण/जणी, (घाई/वेळ नसणे/बेशिस्त या कारणांनी) दुध तापविल्यावर लगेच ते गरम दुधाचे पातेले फ्रिज् मधे ठेवतात, यामुळे फ्रिजला वीज जास्त लागते. (एके काळी मी फ्रिज् वापरलेला असल्याने लिम्बीकडून मला हे माहित झाले आहे.)

>>> रोज जाऊन दोन टो आणणे शक्य नाही. यासाठी काय सुचवाल? <<<<
सोप्पा उपाय आहे. मी आठवड्याची भाजी आणताना जर किलोभर टोमॆटो घेतले, तर त्यातील काही पूर्ण हिरवे कच्चे निवडून घेतो, काही अर्धेकच्चे, व काही एक्/दोन दिवसात वापरता येण्याइतके पक्के. आठ दिवसात क्रमाक्रमाने ते पिकत जाऊन वापरले जातात.
पूर्ण पिकलेला (लिबिलिबित होऊ घातलेला) टोमॆटो मात्र एखाद दिवसच टीकू शकतो. तेव्हा घेतानाच केव्हा वापरायचे आहेत त्यानुसार कच्चेपक्के घ्यावेत.
माझ्याकडे फ्रिज नाही पण भाज्या व्यवस्थित वापरू शकतो. कारणे... भाज्या ठेवायला जाळीची हवेशीर टोपली वापरणे, वेगवेगळ्या भाज्यांना ओल्या/सुक्या नुसार जास्त टोपल्या करणे, पालेभाजी (ओलसर) असेल तर ती निवडून उघडीच ठेवणे पण उन्हाळ्यात मात्र घट्ट पिळलेल्या ओल्या कपड्यात ठेवणे इत्यादी.
जेव्हा माझ्याकडे फ्रिज होता, तेव्हाही मी भाज्या कधीच फ्रिजमधे ठेवल्या नाहीत.

जिज्ञासा, खूपच छान धागा.

मी सुद्धा स्वतःमध्ये खूप बदल केले.

दोन वर्षापूर्वी प्रत्येक ड्रेसवर मँचिग शूज / चप्पल होते. ते सर्व हॉस्टेलमध्ये कामाला मुली होत्या त्यांना देऊन टाकले. माझ्याकडे १०-१२ जोड होते ते आता दोन वर आले आहेत. Happy

कपडयांच्या खरेदीवर बर्‍यापैकी कंटोल मिळवला. प्रत्येक महिन्याला जेवढे आवडतील तेवढे कपडे घ्यायची हे बंद केल.

जुन्या ड्रेस पासून थोड्या मोठ्या हॅन्ड बॅग्ज शिवल्या आहेत त्या ग्रोसरीसाठी वापरते.
सगळ्या रूम्सचे दिवे चालू ठेवत नाही, ज्या रुममध्ये असेन तिथेच दिवा लावते.

वॉम रोज वापरत नाही.

मोबाईल ३ + वर्ष व्यवस्थित चालू आहे फक्त एकदाच सर्व्हिसिंग केला आहे. मोबाईलवर गेम खेळत नाही. फक्त फोन कॉलसाठीच वापरला जातो. क्वचित समस.

गणपतीत येणार्‍या पाहुण्यांना आम्ही केळीच्या पानातच जेवायला वाढतो. गावी वर्षातून एकदा पूजा असते तेव्हा सुद्धा आम्ही पानाच्या पत्रावळ्यां / केळीची पान ह्यांचाच वापर करतो. अजून पाण्याच्या प्लॅस्टीक ग्लासला पर्याय मिळत नाही आहे. सध्या तेच वापरले जातात अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये.

अन्नाची नासाडी अजिबात करत नाही,

अगोदर ग्रोसरी सामानाची खूप खरेदी व्हायची ती कमी केली. स्टॉकमध्ये फक्त ईडली / डोसा राईस, साखर, उडीद डाळ, तेल, तूप हेच ठेवते. बाकी सगळ आठवड्याला पूरेल अस आणते. भाताचे तांदूळ आई देते. ते सुद्धा १ किलोच दे अस सागते.

जे आवडत तेच बनवते. त्यामूळे व्यवस्थित खाल्ल जात.
जास्त अन्न असेल तर लगेच गरजूंना देते. जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवून मग टाकून देणे किंवा दुसर्‍यांना देणे हे अजिबात पटत नाही.

स्वतःची गाडी नाही आहे त्यामूळे पूर्णतः पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून आहे. शक्यतो बसचाच वापर करते. जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हाच रीक्षा, टॅक्सी वापरते.

प्रवास करताना खिडकीतून कचरा नाही टाकत.

हो लिंबूकाका, विचारूनच पाणी देणे केव्हाही चांगले. चांगले एसी गाड्यांतून येतात बसून लोक. ऐंशी टक्के वेळेस 'नको' हेच उत्तर येते.
घराची फरशीही आठवड्यातून दोनदाच पुसली जाते. रोजच्या रोज पुसत बसायची गरज वाटत नाही.
जाहिरातींना टीव्ही म्यूट असतो तेवढेच ध्व प्र कमी.

आमच्याकडे पाणी आणि खायला हे पाहुण्यांना न विचारता ठेवावच लागत. अस नाही केल तर पप्पा ओरडतात. त्यामूळे ती सवय लागली आहे. माझ्याकडे कोणीही आल तर अगोदर पाणी आणी खायला ठेवतेच. पाण्यासाठी एकदम छोटे साईज ग्लास वापरते.

उत्तम धागा!
मी :
१. डीटर्जन्ट वापरत नाही. मी जेव्हा एकटा असतो तेव्हा हे साध्य होते. 'कुटुंबास' पटवणे अवघड आहे.
२. अगदी साधा जुन्या जमान्यातला मोबाईल वापरतो. बराच काळ तो 'स्वीच ओफ' ही ठेवतो. आधुनिक फोन नसल्याचा न्युनगंड अजिबात नाही.
३. महिन्यातील १५ दिवस स्वताचे वाहन रस्त्यावर आणत नाही. दुपारच्या वेळातील कामे बसने करतो.
४. यंदापासून 'हापूस' आम्बा सोडला आहे. आ ता फक्त गावरान खाणार. ते तब्बेतीलाही चान्गले असतात.
५. शाकाहारी. अंडे मात्र खातो- गावरान. अंडे सर्वांनीच खावे असे माझे मत.
५.इस्त्री कमीत कमी. 'जीन्स ला तसेच प्रवासाच्या कप ड्याना कधीच नाही.
पुढे चालू....

तुम्ही अमेरिकेत राहुन हे जाणीवप्र्व करताय ह्याचे कौतुकआहेह्च, पण मुळ अमेरिकेन लोकांनी हे बदल अंगी बाणवावेत म्हणुन काही नाही का करता येणार? व्यापक प्रमाणात
माझा अनुभव हे सांगतो अमेरिकेन माणुस भारतीयम्लोकांपेक्षा जास्त receiving आहे. म्हनेजे तुम्ही जे सांगाल त्याला outright वेड्यात नाही काढणार.
मी फक्त १ महिण्यासाठी तिथे होते . एका भारतीय कुटुंबात रोजची भाम्डे घासायच त्रास नको म्हणुन thermocol plates वापरल्या जात होत्या.म्हनजे त्यांची अदचन मी सम्जु शकते पण ह्याला पर्याय नाही का द्शोधता येनार हे सुचवल्यावर जे काही गार्हाने त्या कुटुंबाने मांदले कि कुथुन बोलुन गेले असे झाले मला.
याउलट तिथल्या गोर्‍या लोकाम्चा approach खुप positive वातला,
सुचवलेल्या गोष्ती मन लाउन ऐकतात तरी.

समविचारी / वागणारी अजून इतर माणसे आहेत कळून मस्त वाटतय

अजून कोणी वापरलेले कानावर नाहीये पण तरीही माझ्या खरेदी यादीत हे आहे
http://samuchitenvirotech.blogspot.in/2015/04/samuchits-answer-to-waste-...

हर्पेन, धन्यवाद. हे नविनच दिसतंय.

आम्ही समुचितच्या डॉ. कर्वे यांना दिडदोन वर्षापूर्वी भेटलो होतो तेव्हा याबद्दल विचारले होते कारण त्यांचा सराई कुकर वापरण्यासाठी कोळसाकांड्या ( विषेशप्रकारच्या असतात. या जाळल्यातरी फारसा धुर येत नाही) लागतात. त्या आतापर्यंत त्यांच्याकडुन घ्याव्या लागतात.
इथे वाचल्यानुसार हे युनिट असेल तर कोळसा पावडर बनते पण त्याच्या कांड्या हव्या असतील तर मेन प्रोसेसिंग युनिट कडुन करुन घ्याव्या लागतील असे वाटतेय. एकदा त्यांचे प्रात्यक्षिक पहायला हवे. आणि हे गार्डन वेस्ट साठी उपयोगी आहे, किचन वेस्ट साठी बायोगॅस उपकरण आहे.

ज्यांच्याकडे गार्डन / जागा आहे त्यांनी हे आणि सराई कुकर वापरायला छान आहे. त्यांना समुचितचे किचनवेस्टसाठी बायोगॅस उपकरणही मस्त आहे. आणि सर्व उपकरणे स्वस्त आहेत अगदी. ज्यांना खरच हौस आहे ते स्वतः बायोगॅस उपकरण बनवु शकतात. समुचितकडुन गायडन्स मिळतो. अगदी स्वस्तात बनवुन होतो.

Pages