सेनापती गटग - कोरम मॉल चे फूड कोर्ट - रविवार २९ मार्च . वेळ ११.१५ ए एम . ब्रंच मीटप

Submitted by वर्षू. on 17 March, 2015 - 05:38
ठिकाण/पत्ता: 
ठाणे -कोरम मॉल फूड कोर्ट मधे २९ मार्च ला रविवारी ११.१५ वाजता सकाळी ( हो!! सपष्ट लिवलेलं बरं ;) )भेटायचं नक्की झालंय

९८ प्रतिसाद और सिर्फ १२ नाम??

बहुत नाइंसाफी है..

कोरम मधे कोरम वाढवा रे!!!

माहितीचा स्रोत: 
बीबीसी
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, March 29, 2015 - 12:30 to Monday, March 30, 2015 - 05:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण सारखं येण-जाण नाही हे ही तितकच खरं...<<< सारख कोण बोलवत आहे तुला. एक रविवार आला तर तुला तुझे जुने फ्रेन्डस भेटतील आणि तिला सुद्धा भेटता येईल. Wink

फायनली किती वाजता भेटायचय>>>>>भुंग्या आधी नोंदणी कर. मगच कळवणार Proud

कुमार ऋ. ला बोलवा...(धाग्यावर) आपोआप ट्यार्पी वाढेल. गटग धाग्यावर विषयाला धरून बोला वगैरे काही नाही नं..सो होऊ देत खर्च. Happy

एंजॉय लोक्स.

सेन्या खादाडखाऊच जास्त चांगली जागा सुचवू शकेल गटगसाठी Wink
कोरमला ठरवलंत तर तो बिल्डिंगच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून येईल तिकडे.

मेतकूट - घंटाळी रोड, ठाणे.

लोकसत्तामधला लेखः
मेतकूट हॉटेल ठाण्यातील प्रसिद्ध घंटाळी देवी मंदिराच्या पुढील चौकातच आहे. ठाणे पश्चिमेला उतरल्यावर विष्णू नगर भागातील घंटाळी देवी मंदिर कोणालाही विचारलं, तर शेंबडं पोरही तुम्हाला आणून सोडेल; पण इथे येताना भरपूर वेळ हाताशी ठेवायला हवा, कारण हॉटेलात शिरायला गर्दीही तेवढीच असते.

http://www.loksatta.com/viva-news/famous-food-of-metkut-restaurant-of-th...

मेतकूट ठाण्यात असलं तरी मालक पुणेरी आहेत, आणि ग्राहक ही त्या हॉटेलातली सर्वांत बिनमहत्त्वाची बाब आहे, असं अनेकांकडून कानावर आलं आहे. तुम्ही तिथे गेलात, तर तुमचा एकंदर आवेश/आवाज बघून मालक तुम्हांला दुसर्‍या मिनिटाला बाहेर काढतील. त्यापेक्षा पुण्यात मल्टिस्पाइसात गटग करा. कोण्णी काही म्हणत नाही.

फक्त १५-१८ जणंच मावतात. वेटिंग बाहेर रस्त्यावर. हे तर मी पाहिलंच आहे पण मिसळपाववर एक रिव्ह्यू वाचला होता. त्यापेक्षा तलावपाळीवर 'आमंत्रण' परवडलं.

रोहन कुठाय? त्याला चांगल्याच माहित असतील खादाडीच्या जागा.

एकंदर आवेश/आवाज बघून मालक तुम्हांला दुसर्‍या मिनिटाला बाहेर काढतील.<<<< चिनूक्स Lol असा अनुभव मी अजून कधी घेतला नाही. याव का ह्या गटगला. Uhoh

घोडबंदर रोडला काहि चांगले हॉटेल्स आहेत.
ओवळ्याजवळील "गारवा" पण मस्त आहे, पण थोडं लांब आहे.

हि तिथली Sizzling Chocolate Brownie Proud Happy

जिप्सी Angry अजून गटग झाल नाही आहे त्या अगोदर असे खादाडिचे फोटो डकवायला मनाई आहे. Happy
फोटो खूपच टेम्पटींग आहे. इथे नका गटग ठेवू. Proud उगीच खाणार्‍याच्या पोटात दुखेल. Wink

मेतकूटवर मोठ्ठी काट.
मिसळपाववर वाईट अनुभवावर एकांनी लेख लिहिलाय... तिथे खुद्द मेतकूटच्या मालकांनी 'आम्हाला अजून एक संधी द्या' टाईप प्रतिक्रिया लिहिली आहे. तरीही मेतकूटवाले सुधारलेले नाहीत. ग्राहकांना अजूनही तुच्छच लेखलं जातंय. मराठी पदार्थ ठाण्यात कुठ्ठेच चांगले मिळत नाहीत अशी मेतकूटवाल्यांची धारणा आहे की काय नकळे...

ठाण्यात हॉटेलं भरपूर आहेत. पण सर्वांना यायला जायला सोईस्कर आणि एकत्र धमाल करण्याजोगी जागा म्हणजे कोरम फूड कोर्टच.
अदिती सकुसप यायचं म्हणतेय म्हणजे एकूणात पाचपाखाडीकरांची मेजॉरीटी दिसतेय या गटगला Proud

सर्वांना यायला जायला सोईस्कर आणि एकत्र धमाल करण्याजोगी जागा म्हणजे कोरम फूड कोर्टच.>>>>>>चला तर मग कोरम फूड कोर्ट डन करूया. Happy

पण सर्वांना यायला जायला सोईस्कर आणि एकत्र धमाल करण्याजोगी जागा म्हणजे कोरम फूड कोर्टच.>>> करेक्ट!

Pages