सेनापती गटग - कोरम मॉल चे फूड कोर्ट - रविवार २९ मार्च . वेळ ११.१५ ए एम . ब्रंच मीटप

Submitted by वर्षू. on 17 March, 2015 - 05:38
ठिकाण/पत्ता: 
ठाणे -कोरम मॉल फूड कोर्ट मधे २९ मार्च ला रविवारी ११.१५ वाजता सकाळी ( हो!! सपष्ट लिवलेलं बरं ;) )भेटायचं नक्की झालंय

९८ प्रतिसाद और सिर्फ १२ नाम??

बहुत नाइंसाफी है..

कोरम मधे कोरम वाढवा रे!!!

माहितीचा स्रोत: 
बीबीसी
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, March 29, 2015 - 12:30 to Monday, March 30, 2015 - 05:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरम फूड कोर्ट मस्त आहे. परत पायथ्याशी वेस्ट्साइड!!!
त्या फूड कोर्टात फलुदे आणि रबड्या वगैरे मस्त मिळतात.

जाई, तुलाही कोरम मॉल जवळच पडेल. ठाण्याला उतरायचं, प्लॅट्फॉर्म दोन कडून वेस्टात बाहेर पडलं की ऑटोच्या रांगेत उभं राहायचं. आपली वेळ आली की ऑटो पकडायचा, त्याला कोरम मॉलला चल असं सांगायचं की तो तुला सोडेल ना... फारतर नाही म्हणेल हा का ना का... नाहीतर बसनी आट्यापाट्या खेळायच्या Biggrin

सर्वां ची (वेल !!आधिकांश) मते कोरम ला पडताहेत्स दिस्तंय..

उत्सवमूर्ती काय म्हणताहेत.. सेन्या , प्रकट हो आता!!!

रच्याकने, कोरमच्याच रांगेत जरा तीन हात नाक्याकडे बार्बेक्यू नेशनलाही जाता येईल.
पण प्रतीमाणशी बर्यापैकी चार्जेस पडतील. वेज वाल्यांची फार काही चंगळ नसते हे ही एक आहेच. बाकी तिथे जागेचा काहीच प्रश्न येणार नाही. वॅले पार्किंगही आहे. आधी बुक करता येईल.

त्यापेक्षा पुण्यात मल्टिस्पाइसात गटग करा. कोण्णी काही म्हणत नाही. >>> ते नको असेल तर दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसमधल्या पिंड बलूची चा विचार करा. ते पण आताशा मल्टीस्पाइसला टक्कर देतंय हां. Wink

हो हो.. पिंड बलुचीसुद्धा चालेल. हॉटेलासमोर हिरवळीवर बसायला मस्त जागाही आहे. पार्किंगही मिळतं किलोमीटरभर अंतरावर. Proud

दिल्ली पिंड बलुची गटग जाहिर झालेले नाही. वृत्तांत वाचलेला नाही. मेनू कळला नाही. त्यामुळे स्थळाचा विचार करणार नाही.

Proud

नाहीतर बसनी आट्यापाट्या
खेळायच्या> बस नंबरही सांगून टाक

चालू द्या! मज्जा करा आणि गटग झाल्यावर वृ येऊ दे.
जिप्सीभौंचा सिझलरचा फुटु भारीये.
अश्शीच चॉकोलेट ब्राउनी(सिझलिंगच हं!) आमच्या नगरातही एके ठिकाणी मिळते. बरोबर अल्लाउद्द्दिनच्या दिव्याच्या आकाराचं चॉकोलेट सॉसचं भांडं............... (भांडं शब्द फारच गद्य आहे. )
अहाहा..........एक ब्राउनी दोघात शेअर करायची! म्हणजे आपली तेवढीच कुवत आहे भौ!

कोरम मॉल मध्ये कोरम फुल्ल नक्की करा बरका.. नाहीतर कोरम अभावी कोरम मॉल मधले गटग लवकर आटोपते घ्यावे लागले वगैरे ऐकायला मिळायचे..

चॉकोलेट ब्राउनी(सिझलिंगच हं!) कोथ्रुडात अभिषेकमधे मस्त मिळते.. पण अल्लाउद्द्दिनच्या दिव्याच्या आकाराचं चॉकोलेट सॉसचं भांडं वगैरे काय ते देत नाहीत..

आता फक्त ब्राउनीकरता हा धागा फॉलो करणार Wink सेनापती पुण्यात येणार असाल तर अभिषेकला करु गटग

कल्ला सुरु का!!! Proud

खाणे महत्वाचे असले तरी भेटणे अधिक महत्वाचे आहे त्यामूळे कोरम फूडकोर्ट चालेल. तशीही सर्व गर्दी हल्ली विव्हियाना मध्ये असते म्हणे. फूडकोर्ट असल्याने ज्याला जे हवे ते खाता येईल. आणि गोंधळ घालायला चांगली जागा आहे.

सेनापती Lol
बरोब्बर वेळेवर फ्रंट वर <<<<हो वर्षा, आता काय सेनापतींनी फुडकोर्ट म्हटल्यावर राजाची सुद्धा काय बिशाद जागा बदलण्याची. Wink

पुण्यात कधी येतोयस रे ? Proud झकोबाच्या म्हणन्यानुसार एक (झकोबासाठी) हलकाफुलका ट्रेक ठेवायचाय तुझ्या गटग निमित्तने. Wink

राजे नावाचं खास सिकेपी पदार्थ देणारं नवीन रेस्ताराँ ठाण्यात निघालेय ना ? व्हेज / नॉन व्हेज दोन्ही आहेत. मी कुठेतरी वाचले होते.

मल्ली... पुण्यात पण करु एक गटग... जबाबदारी घ्या कोणीतरी. तारिख मी कळवतो.

हे रूचकर राजे कूठे आहे?

Pages