सेनापती गटग - कोरम मॉल चे फूड कोर्ट - रविवार २९ मार्च . वेळ ११.१५ ए एम . ब्रंच मीटप

Submitted by वर्षू. on 17 March, 2015 - 05:38
ठिकाण/पत्ता: 
ठाणे -कोरम मॉल फूड कोर्ट मधे २९ मार्च ला रविवारी ११.१५ वाजता सकाळी ( हो!! सपष्ट लिवलेलं बरं ;) )भेटायचं नक्की झालंय

९८ प्रतिसाद और सिर्फ १२ नाम??

बहुत नाइंसाफी है..

कोरम मधे कोरम वाढवा रे!!!

माहितीचा स्रोत: 
बीबीसी
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, March 29, 2015 - 12:30 to Monday, March 30, 2015 - 05:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy मस्त आलेत फोटोज.. मोबाईल वर ही ...

तुझे हे फोटोज सिक्युरिटी वाल्यांनी पाहिले तर पुढच्या वेळी मोबाईल्स वरून फोटो काढण्यास ही बंदी घालतील..

दिवस भर ऑफिसमध्ये वाचत होते सगळं पण तिथे लिहायला वेळ नाही झाला. गटग वृत्तांत लिहायला मला नक्कीच आवडले असते पण घर बदलण्याच्या चक्रात सापडल्याने खूप बिझी आहे. तरीपण आता दोन शब्द लिहीतेच.

कालच गटग मस्तच झालं. खूप मजा आली. सगळ्यांना भेटता येईल म्हणून घरी बिझी असुन ही वेळात वेळ काढुन आले आणि त्याचं चीजचं झालं .

ज्यांना आधी पाहिलं होतं किंवा ज्यांनी प्रोफाईलवर स्वतःचा फोटो टाकला आहे अश्या माबोकरांना ओळखणं कठीण नाही गेलं पण इतरांची नावं आणि आयडी ओळ्खण्याचा खेळ चांगलाच रंगला. केश्वे नी मी तिला तु अदिती का विचारलं तर यावर हो म्हणून बिनधास उत्तर दिलं तिनं वैगेरे वैगेरे ( स्मित )

ठाण्याबाहेर रहाणार्‍या सर्व माबोकरांचे गटग ला उपस्थित रहिल्याबद्दल खरचं कौतुक. काही काही जणं तर पार लंडन हुन आली होती. ( स्मित) आदिती आणि मिलींदा रविवारीच पहाटे मुंबईला आले आणि जेट लॅग वैगेरे सर्व विसरुन लगेच भेटायला आले त्यांच तर खूपच कौतुक आहे. खूप छान वाटलं त्यांना भेटुन.
जे कोरम मॉल मध्ये येऊन ही भेटु शकले नाहीत आणि जे नांव नोंदणी करुन ही जमवु शकले नाहीत त्यांच्याबद्दल खरोखरचं वाईट वाटतयं आता परत एक गटग ठरवू या खास त्यांच्यासाठी.

दिनेश दा चॉकलेटं मस्तच होती पण ती श्लोक साठी होती हे कळल्यवर आता थोडं गिल्टी वाटतयं खाल्ल्याबद्दल. जिप्सीची बर्फी फारच गोड कारण बर्फी वाटण्याचं कारण ही तितक चं गोड ना. खादाडीचे फोटो जिप्सी टाकेल तेव्हा बघालचं काय काय मिसलंत जे आले नव्हते त्यांनी.

रसाच्या पोळ्यांसाठी मे महिन्यात एक स्पेशल गटग नक्की. म़ंजू आणि अश्वीनी तुम्ही नका ऐकु वर्षुचं डाएट बिएट ठेवा गुंडाळून पोळ्या खाताना. माझा विचार होता कालच करुन आणायचा खरं तर पण नाही जमलं कारण एकच घर बदली करणे. सेनापती, अदिती, तुम्ही इथे असे पर्यंत नाही जमलं ना रसाच्या पोळ्यांचं गटग तर काळजी नका करु मी तुम्हाला लंडन ला आणुन देईन ( तिकीट पाठवा फक्त ) . ( स्मित)

मी खरं तर या सगळ्या मुला मुलींहुन खूप मोठी आहे पण त्यांनी असं अजिबात जाणवु नाही दिलं. खूप मजा आली . काल पासून अजून ही गटग मध्येच आहे मनाने.

वर्र्षु धन्यवाद मनापासून गटग संयोजनासाठी.

ता.क. मी लिहीपर्यंत जिप्सीचे फोटो आले सुद्धा. जिप्सी, मस्त आलेत फोटो .

ह्याचा अर्थ पुरेसा कल्ला नाही झाला>>>>वेल, तुम्ही गटगला यायला पाहिजे होत.मग किती कल्ला झाला हे समजले असते .

जिप्सी , मस्त फोटोज! सिक्युरिटीवाल्याचा फोटो काढला असता तर तुला त्याने कॅमेरा वापरु दिला असता

दिनेशदा Happy ते माबोकर मनुष्यप्राणी असं वाचावं Proud

दिनेश दा चॉकलेटं मस्तच होती पण ती श्लोक साठी होती हे>>>>हेमाताई, वर्षूदी श्लोकसाठी एक सेपरेट डब्बा दिनेशदांनी पाठवला होता. सो हे चॉकलेट्स माबोकरांसाठीच खास. Happy Happy

सिक्युरिटीवाल्याचा फोटो काढला असता तर तुला त्याने कॅमेरा वापरु दिला असता>>>>जाई, :फिदी:.

नरेंद्र शेळके यांना खास धन्यवाद. फिनलंडच्या आठवणींना उजाळा मिळाला. Happy

फिनलंडच्या आठवणींना उजाळा मिळाला.>>> अरे केपजेमिनि राहिले की
केपजेमिनि मधले माबोकर असा एक ग्रुप तयार करावा ही नम्र विनंती Lol

मनीमोहोर घर बदललंस कि तुझ्या

पत्त्याचा पत्ता मंजूडी आणी अश्वी ला लागू देऊ नकोस.. त्या डाएट वर आहेत डोळा मारा >> इति वर्षु म्हणुन म्हटलं.

जाई, तुला आग्रहाचे आमंत्रण आहेच ग

केपजेमिनि मधले माबोकर असा एक ग्रुप तयार करावा ही नम्र विनंती >>>>अगदी अगदी. कालच्या गटगमध्ये तिघे तर सीजी मधलेच होते. Happy

ममो तुझे शब्द तुझ्या रस पोळ्यांइतकेच ग्वाड ग्वाड आहेत .. इतक्या धावपळी त ही आवर्जून आलीस याचं फार्फार अप्रूप वाटलं तुझं..

खरंच मला ही गटग मिसलेल्या माबोकरांसाठी खास अजून एक गटग करावसं वाटतंय..

अर्र, कोरमला येऊन मिस केलेल्यांसाठी Sad

तिथे येऊन 'सेनापतीऽऽऽ' अशी हाळी द्यायची ना नुसती...;)

जिप्स्या, फोटू झकास! Happy (सि.गा.च्या नाकावर टिच्चून Wink )

वर्षूताई कर की प्लान.
ककल्ला करून तुम्हाल्ला ओळखल नाही म्हणजे त्यांच्या अपेक्षा खूप कमी किम्वा खूप्प जास्त होत्या कल्ल्याच्या..
फोटो न वृ वाचून बरे वाटले.

आता वेस्टर्न मध्ये करा बरे गटग

केपजेमिनि मधले माबोकर असा एक ग्रुप तयार करावा ही नम्र विनंती
>> करुन टाका. माझ्या भावाला, चूलत बहिणीला, भाच्चीला आणि अजून २ मित्रांना माबो जॉईन करायला सांगतो. Wink

मनीमोहोर, रसाच्या पोळ्या खाल्याशिवाय मी देशाबाहेर जात नाहिये आता. Wink

जिप्स्या, फोटो खरच मोबाईलने काढलेस ना? Proud सॉलेट्ट आलेत!!!

जिप्स्या, फोटो खरच मोबाईलने काढलेस ना? <<< जल्ला तोच प्रश्न मलापण पडला. यांच्या मोबाईलचे फोटो पण असले इष्टाईलमधेय येतात. Proud

मे महिन्यांत मी पण येणारे. तेव्हा सर्वांना भेटेनच (रसाच्या पोळ्या गटग नावनोंदणी चालू)

मे महिन्यांत मी पण येणारे. तेव्हा सर्वांना भेटेनच (रसाच्या पोळ्या गटग नावनोंदणी चालू) >>>> वा वा ! अलभ्य लाभ

<<< नंदिनी, लगेच तारिख नक्की करून टाक>> +१

<< मनीमोहोर, रसाच्या पोळ्या खाल्याशिवाय मी देशाबाहेर जात नाहिये आता.>> खुद्द सेनापतीनी ही इच्छा व्यक्त केली आहे म्हणजे करावेच लागेल आता Biggrin

मी कोरम मॉल च्या फूडकोर्ट मधेच आले होते पण तुम्ही म्हणताय तसा कल्ला वगैरे चाललेला दिसला नाही..ard ११.४० ला आले असेल मी आणि ओळख नसताना कोणी फोन num कसा देईल म्हणून मागितला नाही कोणाकडे..
पुढच्या वेळी भेटू नक्कीच

अरे, हे काय. पहिल्यांदाच गटगला आलो पण कुणी दिसलं नाही अशा टाईप इतक्या पोस्ट्स येत आहेत.

पहिल्यांदाच गटगला जात असाल तर कृपया बीबीवर तसे लिहा. तुमचा नंबर कुणाला तरी देऊन ठेवा, अथवा संयोजकांपैकी कुणाचातरी नंबर घेऊन ठेवा. यायला उशर्र झाला तर संयोजकांपैकी कुणीतरी मोबाईलवरून संपर्क साधतीलच. तेही जमलं नाहीतर जिथं गटग आहे तिथल्या ग्रूपमध्ये कुणी माबोचा टीशर्ट घालून आलंय का बघा. नाहीतर उभं राहून जोरात एकदाच मायबोली म्हणून ओरडा. माबोकर ताबडतोब प्रतिसाद देतील.

मला हे वाचताना शिवाजी पार्कावरच्या टीशर्ट नोंदणी गटगच्या वेळचे आपले खंदे कार्यकर्ते आठवले. रस्त्यानं येणार्‍या जाणार्‍याला "मायबोली काय?" करून विचारत बसायचे Proud

सेनापती, कधीपर्यंत आहेस?

Pages