स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयी तुम्ही स्पार्टाकस चे ड्.आयडी आहात का?
चुकीच्या गोष्टीला डुआय्डीच डीफेंड करु शकतो.

तशीही ती ट्रॅप नावाच्या गोष्टीची २ प्रकरणे वाचली होती, इतकी सुमार होती की पुढे वाचवली नाहीत.

बाकी भुताळी जहाज वगैरे तर कळतच होते की इंग्रजी पुस्तकावरुन किंवा जालावरुन घेतलेली माहीती आहे. पण ती माहीती होती म्हणुन ठीक आहे. पण दुसर्‍याची पाने च्या पाने चोरायची म्हणजे फार च.

इब्लिस, माझ्या त्या पोस्टमध्ये उपरोध टोमणा वगैरेच होता. नेमके कोणासाठी ते विचारू नका. नाव नाही घेणार कारण मला व्यक्तीपेक्षा वृत्तीला टारगेट करायला आवडते. आधीच्या पोस्ट पाहिल्या तर समजावे.

किंबहुना माझ्याही या धाग्यावर आलेल्या आधीच्या पोस्ट निषेधाच्याच होत्या.

आणि स्पार्टाकस यांनी चूक कबूल न करता सारवासारव करून इतरांवरच जे स्कोअर सेटलिंगचे आरोप् केले त्यानंतर एक किमान सहानुभुती मी प्रत्येकाबद्दल ठेवून असतो ती देखील आता उरली नाहीये.

असो,
मी कुठल्याही साहित्यचोरीचे समर्थन कदापि करणार नाही. शंका नसावी. यावर माझा स्वताचाही एक धागा होताच. साहित्यचोरीत होणार्या वाचकांच्या विश्वासघातापेक्षा मला जास्त चीड आहे ते मूळ लेखकाचे / कलाकाराचे श्रेय लाटण्याचे.

आणि हो, मित्राच्याही चुकीला पाठीशी घालणे चूकच पण स्पार्टाकस हे माझे मित्रही नव्हते. उलट आधीच्या एका पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे ते माझ्या लिखाणाला टुक्कार म्हणत मला मायबोली सोडून जायचाच सल्ला दरवेळी द्यायचे. नशीबाचा खेळ बघा, आज स्वताच गेले. असो, सांगायचा हेतू हा की त्या कारणानेही मी त्यांना पाठीशी घालायचा प्रश्न येत नाही. तर साहित्यचोरीचे समर्थन करणे कसे हास्यास्पद आहे हेच दाखवायला ती हास्यास्पद OMG वाक्ये टाकली होती.

मयी
तुमचा प्रतिसाद आता पाहीला. तुमच्याशी वाद घालंणे अशक्य असले तरी कवठीचाफा यांच्याशी माझ्यासारख्या बेनाम आयडीचे नाव जोडून त्यांची बदनामी करत आहात हे बरं नाही. तुमच्या बाफ वर तुम्ही जी मुक्ताफळे उधळली आहेत ती पाहता तुम्हाला दिलेली उत्तरे खूप सौम्य आहेत. तुम्ही कोण आहात याची काही कल्पना नाही. पण जर तुम्ही कुणाचा अतिरिक्त आयडी असाल आणि ज्याचा आहे तो माझा आवडता आयडी असेल तर मला धक्का बसू शकतो. एक तर कमजोर ह्रुदय आहे, ब्रेन हॅमरेज होऊ शकतो, अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. जर असं काही होऊन पुढे आणखी काही झालं तर एक लक्षात ठेवा इंटनेटच्या मोडेममधून घुसून तुमच्याकडे येऊन याचा जाब विचारीन. असं काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असेल हे लक्षात ठेवून अत्यंत जबाबदारीने प्रतिसाद द्या.

ज्याच्याबद्दल तुम्ही भाडताहात त्याच्या तुम्ही कोण ही शंका सुद्धा विचारलेली नाही इतका मी सभ्य, सुसंस्कृत, सालस आहे. पण सभ्यतेला काही किंमत नाही आजच्या जगात. नको ते घडून गेल्यावर जर तुमच्या लक्षात माझे हे गुण आले तर मात्र तुम्हाला पश्चात्तापाच्या आगीत पोळावे लागेल. तेव्हां आजच सांभाळा स्वतःला.

अरे बास करा की. झाल गेल विसरुन जा. ज्या आयडी वरुन एवढे भान्डता आहात, त्याचा आय डीच उडाला आहे, आणी तुम्ही लोक एकमेकाना मैदानात शड्डु ठोकुन बोलवता आहात. ज्या वरुन एतके महाभारत, रामायण घडले, तो आय डी आता तुम्हाला उत्तर द्यायलाच येणार नाही मग कशाला एकमेकाना घायाळ करता आहात?

नाहीतर खेळा आपले च्याऊ माऊ पितळेचे पाणी पिऊ, हन्डा ( आय डी) पाणी गडप ! चला एकमेकाचे कान पकडा.

हुश्श!!

वाचलं सगळं.

मयी ताई धाग्यावर प्रकट होईपर्यंत सगळे प्रतिसाद पटले आणि +१ होत गेले.

Lol

माझ्या जिवाला धोका आहे.>>
अजुन एक ड्युआय्डी घेउन ठेवा. काळजी नसावी..

आमची पण डिटेक्टिवगिरी Happy

http://www.goodreads.com/book/show/17566035-ocean-triangle

या लिंकवर बघा. त्यात खाली वाचकांची नावे आहेत. त्यात 'yatin bhat added it for reading on Aug 9 2014' असे म्हटले आहे. आता हे यतीन भट स्पार्टाकस नसतीलही..कारण नावासारखी नावे असतात Happy त्यामुळे आपण हे पुस्तक वाचलेच नाही किंवा आपल्याला हे माहितीच नाही असा दावाही ते करू शकतात Happy

कवठीचाफा,

अनोखी रात वाचल्यावर मी स्पार्टाकस या आयडीशी संपर्क साधून त्यांच्याकडे या कथेतील साधर्म्याबद्दल विचारणा केली होती. त्यावर त्यांचा मला आलेला रिप्लाय -

---------------------------------------------------------------------------------------------------------

Dear Ratna,

It is very imperative that both stories - A recurring Encounter on ygs and Anokhi Raat on maayboli appear same, because both stories are written by me. BhatakatiAatma is my id on ygs.com.

While writing the story on maayboli, I had removed certain parts from original story on ygs.com.

Thanks
Spartacus

---------------------------------------------------------------------------------------------------------

पुढे आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट लिहीताना काही माहितीसाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. ही माहिती मी त्यांना दिलीही होती (मी स्वत: ओशनोग्राफर असल्याने त्या भागात संशोधनानिमीत्त अनेकदा प्रवास केला आहे), परंतु व्यावसायिक कारणामुळे श्रेयनामावलीत अथवा संदर्भांत माझा कोणताही नामोल्लेख करु नये अशी त्यांना सूचनाही केली होती.

मुद्दा इतकाच की एकदा कानफाट्या नाव पडलं म्हणून प्रत्येक लेखन खोटं ठरवण्याचा प्रयत्नं करु नका.

-रत्ना सहस्त्रबुद्धे

रत्ना,
तूम्ही मला उद्देशून काही लिहिले आहे का मागच्या पानावर ?

मला स्वतःला खोटी नावे घेणे पटत नाही. त्या सभासदाने प्रोफाईलमधे ब्लॉगचा पत्ता दिला होता, त्यावरून फेसबूक वर शोधले इतकेच. दोन्ही ठिकाणी मी काहिही लिहिलेले नाही.

सगळेच लेखन नाही, तर नेमके कुठले आणि कुठून उचलले होते ते पण जाहीर केले तर चांगले होईल.

मायबोलीकर या बाबतीत फार हळवे आहेत, शोधता शोधता बरेच काही सापडते आहे.

चाफ्याचा आणि माबो प्रशासनाचा स्टँड पूर्णपणे पटला आहे. साहित्यचोरी अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यातूनही स्पार्टाकस यांनी माफी मागून टाकली असती असती तर विषय लवकर संपला असता. पण त्यांची नंतरची पोस्ट म्हणजे 'चोर तो चोर वर शिरजोर' यातलाच प्रकार होता. एक चोरटा साहित्यिक कमी झाल्याने माबो/मराठीला काही फरक पडत नाही.

रत्नाताई, तुम्हीच स्पार्टाकस नसाल तर कृपया इतरही सदस्यांचे लिखाण वाचून प्रतिसाद देत जावेत. बरं वाटतं लोकांना.

सदस्यकाळ - ३० आठवडे
आतापर्यंतचे सर्व प्रतिसाद फक्त आणि फक्त स्पार्टाकस यांच्या लिखाणावर.
इंटरेस्टिंग...

चिमिचांगा
कोणी कश्यावर प्रतिसाद द्यावेत हेही मायबोलीकरच ठरवणार का आता? आणि कश्यावर प्रतिसाद दिला त्याच्यावरून प्रतिसाद देणार्‍यावर संशय आणि त्याचे प्रोफाईलिंग? मायबोलीवरच्या कार्यकाळाचाही काय संबंध?

अवघड आहे सगळं. मायबोली एकुणात दिवसेंदिवस तिच्याच मेंबरांच्या बाबतीत जास्त होस्टाईल होत चालली आहे, मेंबराचे फेसबुक अकाऊंट शोधून मायबोलीवरची प्रकरणे तिकडे नेणे, मेंबरांच्या ब्लॉगवर जाऊन मायबोलीवरील घटनांबद्दल लिहिणे, नंबर मिळवून फोन करणे, बाहेर भेटण्यासाठी आवाहन करणे.

मलाच परानॉईया येतो आहे की ईतरही कुणाला तसं वाटतंय? मायबोली एथिक्स वगैरे आहेत का काही अ‍ॅडमिन टीमने नोंदवून ठेवलेले.

फेसबुक म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न असतो का? >> स्पार्टाकस प्रकरणाशी थेट संबंध नसला तरी फेसबुक वर झालेल्या घट्नांमुळे टीण एजर्स नी आत्महत्या करण्याच्या बर्‍याच घटना ऐकल्या आहेत.

चिमिचांगा,

मी कोणाचं लेखन वाचावं आणि प्रतिक्रीया द्याव्यात हा माझा वैयक्तीक प्रश्नं नाही का?
त्यावरुन मी स्पार्टाकस यांचा डुप्लीकेट आयडी आहे हे अनुमान?

मायबोलीवर मी सर्वप्रथम स्पार्टकस यांची ९० डिग्री साऊथ ही मालिका वाचली होती. त्यानंतरच्या त्यांच्या बाकीच्या मालिका वाचल्या ज्यापैकी काही माझ्या ओशनोग्राफीच्या करीअरशी संबंधीत होत्या. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मालिकेसाठी त्यांना मी थोडीफार माहितीही दिली होती.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मायबोलीवर मला फारसा वेळ मिळत नाही आणि आवर्जून वाचण्यासारखं फारसं साहित्यं आढळलेलं नाही (उथळ कादंबर्‍यांत आणि कथांमध्ये मला इंटरेस्ट नाही). इथे चालू असलेला ग्रूपीझमचा तमाशा तर उबग आणणारा आहे.

सदस्यांचे प्रतिसाद प्रकाशित होऊ देऊन विचारस्वातंत्र्य सादर केले जाणे ह्या पातळीपलीकडे येथील काही प्रतिसाद पोचले आहेत असे आपले वाटते. वाग्मयचौर्याबाबतच्या धोरणाचे उदाहरण म्हणून धागा जतन होऊन प्रतिसादांचा कॉलम गोठवला तरी हेतू साध्य होऊ शकावा असा अंदाज आहे.

चु भु द्या घ्या Happy

फेसबुक ह्यासाठी म्हणालो की बरेच नातेवाईक, नोकरी/व्यवसायाशी निगडीत लोक तसेच अनेक शाळा कॉलेज व देशविदेशातले मित्र मैत्रीणी फेसबुकमध्ये कनेक्टेड असतांना असे शहानिशा न झालेले बर्‍याचवेळा वैयक्तिक आकसापोटी, वादावादी वगैरेनंतर जर कोणी फेसबुक वॉलवर काही भलते सलते लिहिले तर एखाद्याला ह्याचा प्रचंड मानसिक त्रास होऊ शकतो.

आपली वैयक्तिक माहिती किती प्रकाशित करायची हे ज्याने त्याने ठरवायचे असले तरी बर्‍याच वेळा अशी माहिती कोण कश्याप्रकारे वापरू शकते ह्याची कल्पना न आल्याने बर्‍याच जणांना यापुर्वीही मानसिक त्रासातून जावे लागले आहे. मला वाटते प्रशासनाने एक पत्रक काढून मेंबरांना ह्याबद्दल पूर्वसुचित करावे.
मायबोली प्रोफाईल मध्ये लिहिलेली माहिती प्रशासन वापरू शकते असे मायबोलीचे नियम सांगतात पण ही माहिती ईतर मेंबर वापरू शकतात का किंवा कश्या प्रकारे वापरू शकतात? नेटवर्किंग च्या संधीसाठी मायबोली प्रशासन माहिती प्रकाशित करण्यास प्रोत्साहन देते (होत्करू कलाकारांसाठी ही मोठीच संधी आहे) पण हीच माहिती बुमरँग बनून जर त्रासदायक ठरणार असेल तर?

कदाचित हा या धाग्याचा विषय नाही पण मला हे प्रचंड कन्सर्निंग वाटले.

हायझनबर्ग +१ कनसर्न्स बद्दल. सम्ड इट अप वेल.

वाद, कॉमेंट्स इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे सुद्धा आणू नये हे बर्‍यापैकी नेटिकेट्स सदराखाली येइल आणि मायबोली प्रशासनाची ह्याबाबत कितपत जबाबदारी आहे ह्याबद्दल मी सांशक आहे.

>>कदाचित हा या धाग्याचा विषय नाही पण मला हे प्रचंड कन्सर्निंग वाटले<<
अ‍ॅब्सोलुटली! गुन्हा झालेला आहेच, परंतु काहिंनी अगदि शेपटावर पाय पडल्यासारखी प्रतिक्रिया दिलेली पाहुन गंमत वाटली...

कॉमेंट्स इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे सुद्धा आणू नये हे बर्‍यापैकी नेटिकेट्स सदराखाली येइल आणि मायबोली प्रशासनाची ह्याबाबत कितपत जबाबदारी आहे ह्याबद्दल मी सांशक आहे. >> कोणितरी फक्त ते हे फेसबूकवर या नावानं आहेत एवढं बोललं तर त्यावरून किती तो गदारोळ.. कोणि तिकडं जाउन काही लिहिलेलं नसतानाही त्यावरून किती पोस्टी त्या? स्पार्टा बाकिच्या बाफंवर कोणा-कोणाला (नावडत्यांना) काय काय बोलला आहे हे कोणि कधी बघितलं नसेल कदाचित.शिवाय कथेत, माबोवरच्या आणि इतर नावडत्या लोकांना (गांधीजींसकट) व्हिलन करून टाकलं होतं यावरून त्याची मानसिकता काय होती ते दिसतंयच. तरीपण लोक त्याच्या बाजूनं बोलतायत तेही त्याची चूक असताना हे जरा अनाकलनीय आहे.

गदारोळ कुठे दिसला नाही. त्यांचं नाव मुद्दाम घेऊन फेसबूक वगैरेचा उल्लेख करणे ही म्हणजे स्वतः काही नाही केलं तरी इतर खोडसाळ लोकांच्या हातात कोलीत दिल्यासारखच आहे.

>>स्पार्टा बाकिच्या बाफंवर कोणा-कोणाला (नावडत्यांना) काय काय बोलला आहे हे कोणि कधी बघितलं नसेल कदाचित. कदाचित.शिवाय कथेत, माबोवरच्या आणि इतर नावडत्या लोकांना (गांधीजींसकट) व्हिलन करून टाकलं होतं यावरून त्याची मानसिकता काय होती ते दिसतंयच <<

धन्यवाद. पुर्वि कधितरी शेपटावर पाय पडलेला आणि आताचं प्लेजरीजम हे फक्त निमित्त होतं, हे अधोरेखित केल्याबद्दल... Happy

Pages