संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात स्त्री म्हणून जन्माला येणं हे एक सामाजिक पंगुत्व असल्यासारखं आहे. कितीही राग आला, नैराश्य आलं तरी तुम्हाला तुमच्या अडचणींसकट सामावून घेणारी आणि समान संधी उपलब्ध करून देणारी व्यवस्था इतक्या सहजी निर्माण होणार नाहीये. पण म्हणून प्रयत्न करूच नयेत असं नाही. >>> प्रयत्न केले नाहीत तर उलटा मेसेज जाईल :). भारताबाहेर बरीच वर्ष राहिल्याने असेल पण बाई असल्याचं ठळकपणे अधोरेखित होत नाही. ना वागताना, ना वागवताना. भारतात अजूनही परीस्थिती बदलेली नाही याचा खेद मानण्याइतकीही शक्ती यात खर्च करण्याची इच्छा नाही. तीच शक्ती प्रयत्नांमधे घालावी असं वाटतं.

मला माहितेय मी अडथळ्यांची शर्यत बहुदा हरण्यासाठीच खेळतेय. पण त्याचा कितीही मनस्ताप झाला तरी मला ती पळायची आहे हा माझा निर्णय आहे. याचा अर्थ मी त्या अडथळ्यांविषयी बोलूच नये, आहे ते नशीबात मुकाटपणे स्वीकारावं असं नाही. >>>> तू ही अडथळ्यांची शर्यत परीणाम माहित असूनही खेळायची ठरवलंस, यातच निम्मी जिंकलीस. अडथळ्यांविषयी बोलायलाच हवं नाहीतर असे अडथळे आहेत हे बाकी लोकांना कसे कळणार? पण त्याकडे पॅसिव्हली बोललं/बघितलं की अनेक पदर दिसू लागतात आणि त्यातून बाहेर पडायचा मार्गही दिसतो. सो किप इट अप :).

मी मायबोलीच्या धाग्याच्या शीर्षकाबद्दल नव्हे तर डॉ. गोडबोलेंच्या लेखाच्या शीर्षकाबद्दल लिहिले आहे.

वरदा, सुपरक्लीन पोस्ट! फार आवडली आणि अभिमान वाटला तुझा. Happy सहज कुतूहल म्हणून विचारते तू उत्तर देणं नाकारूही शकतेस, पण एवढा संतुलित, शांत स्थिर विचार (स्वत:च्या निर्णयाबद्दल) तयार व्हायला संशोधनात किती वर्षं मुरावे लागले? सुरूवातीलाच नसणार हे गृहीत आहे कारण बदललेली कौटुंबिक स्थिती, भौगोलिक प्रदेश किंवा अगदी कमी पैसा हे मान्य करूनही जेव्हा खरंच कमी पैसा हातात पडतो तोवर निर्णयाच्या क्षणी असलेली व आताची मानसिक अवस्था यात फरक पडलेला असू शकतो.

मीही माणूस आहे, आशू. जेव्हा अन्याय होतो, किंवा इतर कुठल्याही अडचणी येतात तेव्हा मानसिक त्रास अजूनही होतोच की. पण हे सगळं होणार हेही अपेक्षित आहे आणि ते माझ्या वरती व्यक्त केलेल्या विचारांशी फारकत घेणारं आहे असं वाटत नाही. ते विचार मी जेव्हा तटस्थ राहून स्वतःकडे बघते तेव्हाचे दूर पल्ल्याचे आहेत. तत्कालिक त्रास, नैराश्य, वैताग, आनंद, चिडचिड यातून प्रत्येकजण जातोच. मीही. किती वर्षे लागली माहित नाही. हळूहळू स्पष्ट होत गेलेले विचार आहेत. पण याच्या विरुद्ध विचार कधी होते असं वाटत नाही.
मी आधी एके ठिकाणी लिहिले होते तसे दुसर्‍या क्षेत्रातील करिअरचे पर्यायही मी काही काळ तपासून बघितले आहेत आणि तरीही इथेच परतले. त्यामुळे आता मनात साशंकता, द्विधा अवस्था नाही. जे होईल ते इथेच.
शालेय शिकवण्या हा एकमेव पर्यायी उपजीविकेचा मार्ग दिसतो मला कधी वेळ आलीच तर Proud

वरदा, खरंच भारी! Kudos! (ढोबळमानाने) समाजशास्त्रात संशोधन करणाऱ्या एका व्यक्तीचे अनुभव आणि त्याचे परिणाम तू खूप नीट मांडले आहेस. विचारांची ही clarity येण्यासाठी खूप तावून सुलाखून निघावं लागतं ह्याची कल्पना आहे. बहोत सारी कश्मकश से गुजरने के बाद ये clarity नसीब होती है! Thank you for sharing this thought process here.

मी स्वतः शक्यतोवर "मी मुलगी आहे म्हणून" टाईपच्या विचारांपासून दूर राहायचा प्रयत्न करते. आणि सुदैवाने हे gender biases मला टोचण्याइतपत जाणवले नाहीयेत (It is not that they do not exist. Just that I have been privileged enough to escape them.) पण एकुणातच भारतात राहून संशोधन करणे ही एक अडथळ्यांची शर्यत आहे हे मला मास्टर्स करतानाच जाणवलं होतं. आणि मला खऱ्याअर्थाने मुलभूत विषयातील cutting edge संशोधनाचा अनुभव घ्यायचा होता म्हणून मी अमेरिकेत आले. आता पीएचडीच्या शेवटच्या टप्प्यावर सगळ्याच गोष्टींचा फेरविचार करून बघते आहे.

इतकी वर्ष एका अत्यंत मुलभूत विषयातील संशोधनात घालवल्यावर ह्या क्षेत्राबद्दल बरीचशी कल्पना आली आहे. माझ्या आयुष्याबद्दलच्या कल्पना आणि ह्या वाटेने पुढे गेल्यावर मिळणारे आयुष्य ह्या दोन्हीचा कुठे मेळ बसतो का ते तपासायचे आहे. त्याचबरोबर ह्या क्षेत्रात जाणवलेल्या अडचणी (ज्या फक्त मुलींना येतात असं नाही) कशा दूर होतील ह्या बद्दल मी काय करू शकते असाही विचार मनात चालू आहे. त्या अनुषंगाने इथे एक मोठी पोस्ट लिहायची आहे जिचा मुहूर्त बहुतेक ह्या विकेंडला लागेल!

उत्तम चर्चा. रूळ सोडून जाण्याच्या पुष्कळ शक्यता उपलब्ध असूनही सरळ रुळावर राहिली आहे हे विशेष. Happy

मी दहावीनंतर नक्की काय करावे हे ठरवताना एक अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट दिली होती. तेव्हाच्या अ‍ॅनालिसिसमध्ये त्या लोकांनी सांगितले की मला संशोधन करणे जमणारे नाही. Happy मग इमाने इतबारे इंजिनियरिंग केले. उपलब्ध नव्या संशोधनाचा वापर करणे - यात कळीचा मुद्दा असा असतो की निदान थेयरी तरी सिद्ध झालेली असते. बाकी सतत नवे शिकत राहणे, ब्रेक घेतला तर करियरचे काय हा मुद्दा छळणे हे एकदम तसेच. स्त्री म्हणून मी जेव्हा बाळंतपणाचा वर्षभराचा ब्रेक घेतला तेव्हा मी आधीपासून इथे इंग्लंडात असल्याने करियरवर फारसा वाईट परिणाम झाला नाही. असा ब्रेक अपेक्षितच होता. तेच माझ्या नवर्‍याने त्याला काहीतरी वेगळे करून बघायचे होते म्हणून दोन वर्षे ब्रेक घेतला, शिवाय देश बदलला. त्यामुळे त्याच्या बरोबरीच्या लोकांच्या मानाने तो थोडा मागे पडला. माझ्या बरोबर काम करणारा एकजण असाच मुले झाली म्हणून दोन वर्षे घरी बसला होता. त्याला आमच्या कंपनीने पटवून परत कामावर रुजू केले आहे. कारण म्हणजे घरी बसण्याआधी १५ वर्षे इंडस्ट्रीत त्याची ओळख होती/ ती अजून आहे. माझ्या नवर्‍याने माझ्यामुळे देश बदलला आणि त्याची ओळख जुन्याच ठिकाणी राहिली; त्यामुळे त्याचे नुकसान झाले. सहसा अशी वेळ गणितातल्या स्त्रीवर येत असणार. संशोधनक्षेत्रात, जिथे फंडिंगसाठी ज्या त्या संशोधकाचे लागेबांधे, ओळख खूप महत्त्वाची आहे तिथे फारच प्रकर्षाने जाणवणार.

मला वाटते, संशोधनक्षेत्रात, किंवा कुठल्याही क्षेत्रात लहान मोठे ब्रेक घेऊन परतायची संधी उपलब्ध होऊ लागली तर एकंदरित त्या त्या क्षेत्राचा फायदाच होईल. जाणीवपूर्वक यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

आता माझ्या हुशार शास्त्रज्ञ मैत्रिणीचे उदाहरण - रात्रंदिवस काम. एकतर स्वतःचे संशोधन. नवे फंडिंग मिळवण्यासाठी अनेकानेक प्रपोजल्स लिहिणे. त्यातली पुष्कळ रिजेक्ट होतात. त्यावर निराश न होता, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे. यात बायोलॉजिकल घड्याळ पुढे चालले आहे.. बॉयफ्रेंड हुडकायला वेळ नाही. ज्यांच्याशी मैत्री होते ते हातातून / मनातून निस्टून जातात कारण मुळात एकत्र घालवायला, बाँडिंगला वेळच नाही!
मला वाटते संशोधनक्षेत्राला इतर कार्यक्षेत्रांपासून वेगळा पाडणारा मुद्दा म्हणजे वेळ नसणे; इतर काही करायला मानसिक बँडविड्थ नसणे.
समजून घेणे म्हणजे माझ्या या वरच्या मैत्रिणीबाबत माझा उपाय - दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी (;-) शेल्डन कूपर आठवून नका) तिला घरी बोलवून खाऊ घालणे. दोन तीन तास तिच्या संशोधनाच्या गप्पा ऐकणे. फंडिंग प्रपोजल्स ऐकणे. एकंदरित तिला साउंडिंग बोर्ड म्हणून उपलब्ध राहणे.

मला वाटतं जिथे डिविजन ऑफ लेबर शक्य आहे तिथे ब्रेक घेऊन परत येता येण्याची तजवीज होऊ शकते म्हणजेच एखाद्या कंपनीपेक्षा जेव्हा अकॅडेमिक लेवल (म्हणजे युनिवर्सिटींमध्ये वगैरे) वर संशोधन सुरु असेल तर जरा अवघडच आहे ऑफिशियली ब्रेक मिळणे. अकॅडेमिक लेवलच्या रिसर्च बराचसा किती फंडिंग मिळतय आणि किती काळाकरता ह्या वर अवलंबून असतो बर्‍याच वेळा, थोडक्यात इथला रिसर्च कोणा एका/एकी साठी थांबू शकत नाही आणि थांबणे प्रॅक्टिकल ही नाही. पुढे कंपनी मध्ये सुद्धा रिसर्च सुरु असेल तर तिथेही डिविजन ऑफ लेबर जास्त सोपं असल्यामुळे नवीन व्यक्ती रिप्लेसमेंट म्हणून मिळेल पण एखादा रिसर्च बरीच वर्ष सुरु असेल आणि त्यात जर एखाद्याचा मोलाचा वाटा असेल तर शेवट पर्यंत टिकून राहणे हे अनिवार्यच आहे. कुठल्याही कारणानी ब्रेक घेणे हे संशोधनातल्या करियर मध्ये धोक्याचे ठरु शकते.

१मार्चला शीर्षक बदल्यावर मी नंतर पुढे संयमित चर्चा (श्रेय 'फूल' यांस)वाचलीच नाही. परंतू आता प्रतिसादाचा आकडा तीनशेकडे सरकू लागल्याने पुन्हा लेख वाचला. २मार्चची जिज्ञासा आणि नंतर नीधप यांची पोस्ट वाचली. पूर्वग्रह कोणताही नाहीच. (फक्त पेपरातले पानभरू लेखाबद्दलचे माझे मत सोडून)क्लीष्ट वाटणारे लेख संपादक अगोदरच काढून टाकतात. एखादा चांगला लेख येतोही परंतू देवगडच्या हापूसाला चिपळूणच्या शेकड्यावर मिळणाऱ्या आंब्यापाशीच बाजारात भाव करवून घ्यावा लागतो तसं होतं. आता जी काही चर्चा चालू आहे ती समानता मिळाली पाहिजे आणि स्त्रियांना याप्रकारच्या कामात येणाऱ्या हाल अपेष्टा याविषयी आहे आणि सर्व पटतंय. वरदा यांचे खनन संशोधन कामाचे लेख वाचले आहेत. रार यांचीही मते आवडली. "शुभेच्छा " उपहासात्मक नाही.
१अर्थशास्त्र २आर्थिक नियोजन ३ गणित मूळ pure ४गणित उपयुक्त applied ५इतिहास हे विषय संशोधनासाठी उपयुक्त आहेत असं मला वाटतं.
इकडे अधूनमधून परतणार आहे शंभर पोस्ट वाढल्या की. कारण सर्व अनुभवकथन आहे आणि प्रत्येकजण काही पुस्तक लिहित नाही. मृदुला यांची पोस्ट आवडली.

धन्यवाद वरदा. ही इव्हॉल्व्ह होण्याची प्रोसेस निश्चितच वेळखाऊ असते, लिंगनिरपेक्षही आणि बहुतांश क्षेत्रात. परंतु इथे झालेल्या चर्चेवरूनच असे वाटते की संशोधन क्षेत्रातला स्ट्रगल 'नवा' आहे. म्हणजे तो देश, विषय व व्यक्ती किंवा लिंगपरत्वे वेगवेगळा असू शकतो. याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. उदाहरणार्थ, आज पुण्यात दर तीन घरांमागे (अंदाज) एक जण आयटीत असतो त्यामुळे अत्यंत अनिश्चित वेळापत्रक, नसलेले स्धैर्य यांची किंमत देऊन मिळणारा अफाट पैसा हे गणित सर्वांना माहीत आहे. त्यासाठी शाळांमधलीच डेकेअर, गुरूकुल पध्दतीच्या शाळा, उत्तम मेस, घरपोच चिरलेल्या भाज्या अशी सपोर्ट सिस्टीम आपोआप तयार होत गेली. (फक्त आयटीमुळे नाही पण तो एक मोठा कारणीभूत घटक आहे) किंवा दुसरे उदा. फिल्मलाईनचे घेऊ. या क्षेत्रात येण्यासाठी, टिकून राहण्कायासाठी काय काय दिव्य करावी लागतात याबद्दल बर्यापैकी कल्पना यशस्वी लोकांची चरित्रे, माहिती संकलन, सिनेमे यातून सामान्यांना येत गेली. त्यामुळे पुरेशी जागरूकता आली. संशोधन क्षेत्राबद्दल अशी किती माहिती उपलब्ध आहे? वरदाच्या एका पोस्टमुळे अनेकांना उत्तम जाणीव झाली. याचाच अर्थ, संशोधनक्षेत्रातल्या संघर्षाबद्दल जास्तीत जास्त दस्तावेजीकरणाची, उघड चर्चेची तीव्र गरज आहे. मला वाटतं शक्य तेवढ्या प्रकारे वरिष्ठ संशोधकांना त्यांचे अनुभव लिहीण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. त्यांच्या माहितीला प्रसिध्दी मिळण्यासाठी पुस्तक, प्रकाशक व सोशल मिडीयाचा वापर करून घेता आला पाहिजे. म्हणजे निदान पुढची पिढी तरी अधिक सजगतेने, डोळसपणे संशोधन क्षेत्राचा विचार करेल व आपली पिढी त्यांना आवश्यक तो सपोर्ट पुरवू शकेल. Happy

मूळ विषय पॅशन वगैरे पेक्षा फंडींग ते मिळण्यासाठी ची स्पर्धा, व त्यासाठी करावे लागणारे नेट्वर्किंग जे पुरुष गटांमध्ये ओल्या पार्ट्यांमध्ये होते हे दोन फॅक्टर बायकांच्या पुढे जाण्यात अड्सर असे वरील चर्चा वाचून समजते आहे. स्पर्धा व नेटवर्किंग, जसे तुम्ही वर जाल तसे कमी होणार्‍या संधी हे सर्व फील्ड मध्येच आहे. परंतू लायक महिला शास्त्रज्ञांना पुरुषी मुस्कट्दाबी, व्हर्बल अ‍ॅब्युज, इतर अब्युज ह्याचा सामना करावा लागतो का? त्यातून त्या कसा मार्ग काढतात? बाय वर्किंग हार्ड? कीपिन्ग द प्रोसेस ट्रान्स्परंट? बाय बिल्ट इन सेफ्टी चेक्स जसे वरिष्ठांना एकांतात न भेटणे, एक तरी कलीग बरोबर असणे. असे न व्हावे म्हणून महिला शास्त्रज्ञांना काही लिगल प्रोटेक्षन आहे का? किंवा तुमच्या संस्थेत तक्रार करण्यासाठी, रिझोलुशन साठी काही नि:पक्षपाती कमीटी आहे का? हा इश्यू महत्वाचा आहे असे पुरुष वरिष्ठ व इतर संबंधितांना वाटते का? कॉर्पोरेट मध्ये अश्या कमिटी असणे, जेंडर सेन्सिटायझेशन ट्रेनिन्ग आता बंधन कारक आहे.

समजा सेफ्टी म्हणून अशी ओली पार्टी घरीच दिली तर किती शास्त्रज्ञांचे पती किंवा घरचे त्याला ओब्जेक्षन घेणार नाहीत? Whatever happens I need these funds to finish my research असा रूथलेस विचार किती जणी करतात? का माघार घेतात - मॉरल एथिकल ग्राउंडस वर. जे त्यांच्यासाठी जसटिफाइड आहे.

अमा, चांगले प्रश्न. दोन पोस्टीत उत्तर देते -
परंतू लायक महिला शास्त्रज्ञांना पुरुषी मुस्कट्दाबी, व्हर्बल अ‍ॅब्युज, इतर अब्युज ह्याचा सामना करावा लागतो का? त्यातून त्या कसा मार्ग काढतात? >> बिझी आहोत ह्या नावाखाली पुरुष वरिष्ठ अनेक वेळा वेळ देत नाहीत. प्रत्येक प्रोजेक्टवर % एफर्ट ठरलेला असतो. तो दिला पाहिजे. हे एका अर्थाने मुस्कटदाबी किंवा स्टोन वॉलिंग असते. पण सहसा एका प्रोजेक्टवर एकापेक्षा जास्त फॅकल्टी असतात. त्यामुळे असे एकजण वागायला लागला सजगतेने बाकीच्यांना सांगणे, त्याला नक्की काय अपेक्षित आहे ते इतरांच्या मार्फत समजून घेणे करावे लागते. फोकस प्रोजेक्ट ठेवून तो पूर्ण करण्यासाठी जे काय लागेल ते मिळवत राहायच. व्हर्बल अब्युज क्वचित होतो (डेटाशिटस भिरकावणे, आरडा-ओरडा) पण ते बी.एस. पर्सनली घेऊन चालत नाही . तो राग डेटावरचा आहे ही सौम्य आवाजात जाणीव करून द्यायची.

बाय बिल्ट इन सेफ्टी चेक्स जसे वरिष्ठांना एकांतात न भेटणे, एक तरी कलीग बरोबर असणे. असे न व्हावे म्हणून महिला शास्त्रज्ञांना काही लिगल प्रोटेक्षन आहे का?
सहसा वरिष्ठ ( किंवा येणारे पेशंट किंवा माझे विद्यार्थी) यांनाही एकटे भेटू नये असा संकेत आहे. ट्रेनिंग मध्ये सांगतात दार नेहमी ओपन ठेवा म्हणजे कनिष्ठ व्यक्तिला कधीही उठून जावे लागले तर आडकाठी नव्हती :). हा भाग व इतर प्रीव्हेंट सेक्शुअल हरॅसमेंट ट्रेनिंगचा भाग सहसा लोक सांभाळतात. विद्यार्थी /नी च्या प्रेमात पडल तर एच.आर मध्ये डिक्लेयर करावे लागते. त्यांचा वर्ग तुम्हाला शिकवता येत नाही. लैंगिक शोषणाच्या केसेस क्वचित होतात (पण होतातही).

एक अवांतर उदाहरणः सेक्स अँड द सिटी २ मध्ये जी वकील असते तिला तिचा सिनीअर बॉस बोलूच देत नाही ती बोलू लागली की चक्क हात समोर करतो व तिला चूप करतो. मैत्रीणी म्हणतात तू तक्रार का नाही करत. नवरा म्हणतो हे अ‍ॅक्सेप्ट करू नको दुसरी नोकरी बघ. तर तिचे उत्तर आहे मी वकील आहे
आय अ‍ॅम सपोज्ड टू सक इट अप. (अँड अ‍ॅक्सेप्ट इट प्रॉबेबली. ) पण हा तिला, तिच्या प्रोफेशनल मताला दाखवलेला डिसरिस्पेक्ट आहे. पुरुष सहकारी असे वागणे खपवून घेणार नाही.

शीट्स भिरकावणे वगैरे आइन्स्टाइन कडून पण खपवून घेणार नाही. बॅड बिहेविअर इज बॅड बिहेविअर असे माझे मत आहे. त्यात भारतीय स्त्रियांना घरी वडील/ भाउ पती ह्यांच्याकडून अब्युज सहन करण्याचे
सबकॉन्शस ट्रेनिग्न असतेच. त्यामुळे त्यांचे वागणे अश्या बिहेविअर समोर सामोपचाराचे, त्या बिच्यारया
रागावलेल्या शास्त्रज्ञाची समजूत घालण्याचे असे होत असेल तर तशी गरज नाही. डेटा चुकीचा आहे तर परत रन करू चेक करू रिझल्ट बघु विषय संपला.

क्रिएटिव्ह रायटिंग करताना मला अजून एक गोस्ट अनुभवास आली होती. म्हणजे तुमची आयड्या चांगली असेल. लेखन चांगले असेल तर वरिष्ठ चक्क ते त्यांचे म्हणोन खपवतात. तुम्ही विरोध करू शकत नाही. असे ही काही संशोधनात होते का? म्हनजे तुमचे फाइंडिंग पाथ ब्रेकिंग आहे. नोबेल मिळू शकेल तर त्याचे श्रेय बॉसनेच लाटले? हा ही एक अब्युज आहे. इथे वरिष्ठाला आदर करणे( भारतीय सवयी नुसार ) बरोबर नाही. आवाज उठवला पाहिजे. व श्रेय स्वतः घेतले पाहिजे. इथे पाय डगमगले तर
इतक्या मेहनतीचे फलित शुन्य.

बर्नाडेट चे कॅरेक्टर - पक्षी व्यक्तिरेखा- बघून घ्या ती फार डॉमिनेटिंग व कोणाला फारशी न आव्डणारी दाखवली आहे. ती काही अनुभवानेच तशी बनली असेल. पण ती यशस्वी आहे व उत्तम पैसे कमवते. टेक दॅट.

. फिल्मलाईनचे घेऊ. या क्षेत्रात येण्यासाठी, टिकून राहण्कायासाठी काय काय दिव्य करावी लागतात याबद्दल बर्यापैकी कल्पना यशस्वी लोकांची चरित्रे, माहिती संकलन, सिनेमे यातून सामान्यांना येत गेली. त्यामुळे पुरेशी जागरूकता आली. 
<<<
असहमत पण तो इथला विषय नाही त्यामुळे ते सोडून द्या. तुझा बाकीचा मुद्दा पटला.
असो.

नोबेल मिळू शकेल तर त्याचे श्रेय बॉसनेच लाटले? >> हे खूप खूप जास्त प्रमाणात होते. चांगल्या कल्पना चांगल्या लोकांसमोरच मांडाव्या. हे अनुभवाने जमते. अनेक वेळा असे होते की एखादा पदवीपूर्व विद्यार्थी चांगली कल्पना मांडून जातो. तो/ती ग्रॅज्युएट पण होवून जातो मग त्या कल्पनेला फंडिंग मिळते. आवाज उठवायला तो तिथे नसतो. नशीबाचा भाग इथे थोडा येतो. ज्युनियर फॅकल्टी झाल्यावर असे प्रकार कमी होतात. थोडे श्रेय, पैसा दिला जातो. पूर्ण खड्यासारखे बाजूला फेकले तर आवाज उठवता येतो. तशी तक्रार कमिटीकडे करता येते.
पण हा प्रकार झाला तर लिंगनिरपेक्ष होतो. त्यामुळे महिला आहे म्हणून असे वागवले असे पाहिले नाही.

मूळ विषय पॅशन वगैरे पेक्षा फंडींग ते मिळण्यासाठी ची स्पर्धा, व त्यासाठी करावे लागणारे नेट्वर्किंग जे पुरुष गटांमध्ये ओल्या पार्ट्यांमध्ये होते हे दोन फॅक्टर बायकांच्या पुढे जाण्यात अड्सर असे वरील चर्चा वाचून समजते आहे. स्पर्धा व नेटवर्किंग, जसे तुम्ही वर जाल तसे कमी होणार्‍या संधी हे सर्व फील्ड मध्येच आहे. परंतू लायक महिला शास्त्रज्ञांना पुरुषी मुस्कट्दाबी, व्हर्बल अ‍ॅब्युज, इतर अब्युज ह्याचा सामना करावा लागतो का? त्यातून त्या कसा मार्ग काढतात? बाय वर्किंग हार्ड? कीपिन्ग द प्रोसेस ट्रान्स्परंट? बाय बिल्ट इन सेफ्टी चेक्स जसे वरिष्ठांना एकांतात न भेटणे, एक तरी कलीग बरोबर असणे. असे न व्हावे म्हणून महिला शास्त्रज्ञांना काही लिगल प्रोटेक्षन आहे का? किंवा तुमच्या संस्थेत तक्रार करण्यासाठी, रिझोलुशन साठी काही नि:पक्षपाती कमीटी आहे का? हा इश्यू महत्वाचा आहे असे पुरुष वरिष्ठ व इतर संबंधितांना वाटते का? कॉर्पोरेट मध्ये अश्या कमिटी असणे, जेंडर सेन्सिटायझेशन ट्रेनिन्ग आता बंधन कारक आहे.>>>>>

अमा, हे अगदी कुणाहीसोबत होऊ शकते आणि फक्त संशोधन क्षेत्रातच नाही तर इतर कुठल्याही क्षेत्रात होते आहे. माझी एक बॉस मलय होती आणि दुसरी चिनी. दोघींच्या बाबतीत माझा अनुभव कटु आहे. आणि माझ्या ऑफीसमधे जे पुरुष होते त्यातील बहुतेक पुरुष हे स्त्रियांपुढे झुकायचे. माझ्या अनुभवानुसार मला लेडी बॉस ह्या मेल बॉस पेक्षा जास्त कनींग वाटतात.

ह्यातून फक्त एकच मार्ग आहे नवीन नोकरी धरा. कारण बहुतेक कंपन्यामधे ह्यूमन रिसोर्सेसकडे आपण कितीही तक्रार केली तरी जो बॉस म्हणेल ती पुर्व दिशा असते. बहुतेक लोक नोकरी सोडतात त्याला कारण त्यांचे मॅनेजर्स चांगले नसतात.

ह्यातून फक्त एकच मार्ग आहे नवीन नोकरी धरा. >>> ह्या मुलींनी त्यांची आयुष्ये एका
विषयाला वाहिलेली आहेत. सोडून जाणे शक्य होत नाही. किंवा त्याची किंमत मोजावी लागते व त्या मागे पडू शकतात. करिअर प्रोग्रेस होत नाही म्हणून डिप्रेशन येउ शकते. तोच रिसर्च तसाच दुसरी कडे जमेलच असे नाही. जमला तर घर संसार फिट होईल असेही नाही. हे संशोधन फील्डचे एक लिमिटेशन आहे.

कॉर्पोरेट मध्ये आपल्याला त्या मानाने फ्रीडम आहे सोडण्याचे!! फीमेल बॉस संबंधाने मिपावर एक चांगला बाफ आहे तो वाचून घ्या. हे अवांतर आहे इथे.

ह्या मुलींनी त्यांची आयुष्ये एका
विषयाला वाहिलेली आहेत. सोडून जाणे शक्य होत नाही. किंवा त्याची किंमत मोजावी लागते व त्या मागे पडू शकतात. करिअर प्रोग्रेस होत नाही म्हणून डिप्रेशन येउ शकते. तोच रिसर्च तसाच दुसरी कडे जमेलच असे नाही. जमला तर घर संसार फिट होईल असेही नाही. हे संशोधन फील्डचे एक लिमिटेशन आहे.

>> हा मुद्दा जास्त स्पष्ट वाटतो आहे पुर्वीच्या मुद्द्यापेक्षा. धन्यवाद.

फीमेल बॉस हा धागा मीच इथे काढाणार आहे.

हो नी, ते फार वरवरचं आहे. असहमती योग्य आहे. पण तेवढीही वरवरची जागरूकता संशोधनाबाबतीत नाही असं म्हणू.
आपण जरासे भरकटतोय का? ओल्या पार्ट्या, त्यातून होणारे नेटवर्किंग, राजकारण, अब्युज, श्रेय लाटणे हे फार (कु) प्रसिध्द प्रॉब्सेम्स आहेत. ओल्या पार्ट्यांना न जाणार्या , फीमेल बॉस असणार्या पुरूषांना व इतरही क्षेत्रातल्या स्त्री पुरूषांना त्याला तोंड द्यावे लागते. हां, संशोधन क्षेत्राचा विशेष म्हटलं तर वर लिहील्याप्रमाणे 'स्विच' करता येत नाही. पण मग दाद मागण्यासाठी काहीतरी फोरम, कमिटी न्यायव्यवस्था असेलच ना? हे खूप मानसिक खच्चीकरण करणारे, खर्चिक व वेळखाऊ असणार. असे होऊ नये यासाठी काही खबरदारी अनुभवातूनच येते की अशा गोष्टी उघड उघड बोलल्या जातात? एखाद्याबद्दल अशी तक्रार केल्यास त्याच्या करियरचे पुढे काय होते याची कल्पना किंवा माहिती पूर्वउदाहरणांत उपलब्ध आहे का? महिला सक्षमीकरणांतर्गत यासाठी काही विशेष याचिका योग्य मार्गाने गेल्या आहेत का? मुळात स्त्रियांच्या धोरणाबद्दल संशोधन क्षेत्रात काही नियमावली आहेत का?

माझे पहिल्या पासून तेच म्हणणे आहे त्या मसाज कुपन च्या पोस्टमध्ये ही खाली लिहीले आहे कि
पोषक परिस्थिती निर्माण करणे हे उर्वरित समाजाची जबाब्दारी आहे. स्त्रिया हुषार् नव्हे जिनिअस, क्रिएटिव्ह सेन्सिटिव्ह असतातच आहेतच पण त्यांना फुल्ली एक्स्प्रेस व्हायला परिस्थिती बनवावी लागेल. काय ही तुमची बाळंत पणं म्हणनारा बॉस नसून ओ एंजोय मदर हूड अँड कम बॅक अ रिचर पर्सन म्हनणारा बॉस सिनीअर रिसर्चर असला तर हे सर्व विनाकारण फ्र स्ट्रेशन , मानसिक ताण , तेढ वगैरे बाजूला करून त्या प्रॉडक्टिव्ह आउट पुट देउ शकतील.
Nurture the nurturer and she will definitely achieve her full potential.

हळूहळू आत्ता वाचून झाला हा धागा.

२४ X ७ काम करण्याबद्दल बर्‍याच त्या क्षेत्रातल्या मुलींनी ईथे लिहीलं आहे. ही नेहमीची परस्थिती असते, का कधीकधी? ह्यातील काही मुलींना मी प्रत्यक्ष ओळखते आणि त्या कामाव्यतिरिक्त इतर वेगळ्या खूप ईंटरेस्टींग गोष्टी सतत करतानाही दिसतात, म्हणुन हा जेन्युईन प्रश्ण. जर खरंच ही डिमांड असेल तर हीच मुलभुत गोष्ट ह्या क्षेत्रात बदलली पाहिजे असं वाटतं. एकट्यानी रिसर्च करणे आणि त्या व्यक्तीला काही कारणानी सोडून जावे लागले तर आत्तापर्यंतचे सगळे रिसोर्सेस, वेळ, पैसा वाया ही सिच्युएशन रिस्की वाटते. तोच रिसर्च दोघांच्या टीमनी शिफ्टस् वगैरे करायचा तर जास्त फंडिंग लागेल ऑफकोर्स आणि तेही मिळवणे कठिण असेल, पण ती सिच्युएशन ओव्हरऑल संशोधक आणि फंडिंग देणार्‍यांकरताही स्टेबल आणि वर्क-लाईफ बॅलन्स जपणारी वाटते. त्यामुळे पुरुष आणि स्त्रीया दोघेही हे क्षेत्र सोडुन जाण्याला आळा बसू शकेल कदाचित.

२४ तास कामाचा ट्रॅक मनात चालणे - ह्या बाबतीत फक्त मी इतर प्रोफेशन्सशी तुलना करणं योग्य आहे असं म्हणेन. कोणीही आपल्या कामातल्या काळज्या, विचार, प्लॅनिंग घरी आणु शकतंच की. हे आपल्याला किती कंपार्टमेंटलाईझ करता येतं त्यावर आहे. तो ट्रॅक घरी असताना थांबवणं (थांबवायचा असेल तर) प्रयत्नांती शक्य आहे.

टाइम फ्रेम संशोधक होण्यासाठी

फेज १: पात्रता तयारी: २१-२३ बॅचलर्स, २३-२५ मास्टर्स, २८-३० डॉक्टरल, ३०-३२ पोस्टडॉक (काही क्षेत्रात ऑप्शनल) हे संशोधना साठीचे बेसिक क्वालिफिकेशन आहे. जोपर्यंत हे पूर्णं होत नाही तो पर्यंत तुमचे प्रोफेशनल लाईफ सुरू होत नाही. तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वायत्त नसता. ह्या पूर्णं काळात एका अर्थाने तुमचे इतर आयुष्य पॉजवर असते.

फेज २: आर्थिक स्वायत्त व करिअर पथ : नोकरी मिळायचा कालावधी संदिग्ध असतो. पण लेट्स अझुम १ वर्ष म्हणजे साधारण वयाच्या ३१-३३ वर्षी तुम्ही तुमच्या पायावर उभे राहायला सुरुवात करता...

अ) नोकरी: संशोधन करणाऱ्या लॅब्ज किंवा कंपन्यांतून नोकरी मिळवणे/करणे. कामाचा लोड असला तरी कॉर्पोरेट लॅडर सुरू होते. टेन्युअर सारखे टेन्शन सुरवातीलाच नसते.

ब) शिक्षक होणे: ह्या साठी पहिली पाचेक वर्ष हे टेन्युअर मिळवायला भरपूर काम करावे लागते साधारण पोस्टडॉक इतकेच वा त्यांहूनही अधिक.

सो असे अझुम केले की १-२ वर्ष स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली, स्वतःची शैक्षणिक कर्ज वा इतर आर्थिक जबाबदाऱ्या ज्या आता पर्यंत पॉजवर होत्या त्या निस्तरायला लागली तर तुमचे वय हे साधारण ३३-३५ वर्ष झालेले असते.

अता ह्या टाइमफ्रेमचा व डिमांड्स चा स्त्री व पुरूष संशोधकांच्या दृष्टीने इंपॅक्ट पूर्णं वेगळा असतो. हे उघड आहे.
१) पुरुष आपल्या पेक्षा +१ आणि -५ वर्षाच्या रेंज मध्ये लग्न करू शकतात रादर समाज तशी परवानगी देतो. हेच स्त्रीच्या बाबतीत +५ आणि -१ असे म्हणता येईल. पण ह्या ठिकाणी उपलब्धतेचा मुद्दा येतो. म्हणजे पुरुष टींबकटू मध्ये संशोधनासाठी असेल तर टींबकटु मध्ये त्याच्या बरोबर येऊन राहणारी स्त्री त्याला उपलब्ध होऊ शकते. रादर समाजाने अशा ग्रूहकर्तव्यदक्ष स्त्रियांचा एक पूल बनवून ठेवलेलाच आहे. पण स्त्रीला मात्र असा कोणताही पूल उपलब्ध नाही. स्त्रीकडे जाऊन राहणारा नवरा समाज मान्यच करत नाही.... म्हणजे स्त्रीचा चॉइस प्रचंड लिमिटेड होतो... इथे पहिली खीळ बसते...

२) बायॉलॉजिकल क्लॉक पुरुषाला ह्याचा फारसा फरक पडत नाही. स्त्रीला मात्र ३९/४० ही वॉल दिसत असते... डाउन सिंड्रोम ते टिमोथी सिंड्रोम वा इतर अपत्य-व्यंगाची तसेच मिसकॅरेजसशी सामना करायचा असतो... त्यामुळे ३३-३९ ह्या वयात जेव्हा पुरुष संशोधक आपल्या करिअर मध्ये जोमाने फाउंडेशन उभारत असतात स्त्रिया आपल्या आयुष्यातले मोठे डिसीजन घेत असतात... नोकरी तिला हवी तिथे का नवऱ्याच्या टिंबकटुला? मूल हवे का नको?... एक की दोन ? ह्या मध्ये मेंटल स्पेस जातेच व जर निर्णय घेतले तर त्याचे शारीरिक, आर्थिक व करिअर कॉस्ट्स मल्टिपल्स मध्ये द्याव्या लागतात...

पुरुषांसाठी २१-३५ ह्या कोणत्याही कालावधीत हे निर्णय आउटसोर्स करण्याची सोय आहे... गृहिणी ही पुरुषांसाठी अतिशय लिबरेटींग अशी स्त्रियांची प्रजा भरपूर उपलब्ध राहील ह्याची समाजाने काळजी घेतलेली आहे. त्यामुळे पुरुष संशोधक कोणत्याही वेळेस आपल्या कामावर पूर्णं लक्ष देऊन एक संपूर्ण जीवन (समाजाने गौरवलेले; मुले घर गाडी वगैरे) उपभोगू शकतो... स्त्रियांसाठी मात्र दुर्दैवाने असा कुठलाही मार्ग नाही...(अपवाद वगळता).

संशोधन क्षेत्रात स्त्रियांचे प्रश्न जास्त प्रेसिंग होतात इतर क्षेत्रांपेक्षा. ह्या पलीकडे जाऊन पुरुषसत्ताक सिस्टिमचे सगळे तोटे त्यांच्याही वाट्याला इतर क्षेत्रांप्रमाणे येतातच...

फ्रिजिंग एग्ज सारख्या सुविधा, सरोगेट प्रेग्नंन्सीज, हे बायॉलॉजिकल क्लॉक्स बीट करायला उपयोगी ठरतील...

जय स्त्री-नेशन जय स्त्री-स्वातंत्र्य

पेशवा, मनापासून आभार! खूप व्यवस्थित आणि मुद्देसूद पोस्ट आहे. ह्या विकेंडला tenure track faculty position ह्यावर लिहायचं मनात होतं ते तुमच्या पोस्ट मध्ये आलं आहे.

Like many other fields this field has been structured for males since its inception. To see more and more female scientists we need to restructure the work culture of the field. मला माहिती आहे की हे खूप अवघड आहे पण तरीही हे restructuring जितक्या गतीने पुढे जायला पाहिजे तितक्या गतीने पुढे जाताना दिसत नाही. कारण संशोधनाचं (विशेषतः मुलभूत संशोधनाचं) महत्व पटवणं खूप अवघड आहे अजूनही Sad

Pages