संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदेशात टॉयलेट व लॅक्टेशन ब्रेक्स बद्द्ल सोयी आहेत.

जर सेल्स मध्ये प्रेझेंटेबल रहावे लागत असेल आणि पार्लर इ सोयी मागितल्या तर ते ठीकच आहे!

डेकेयर बद्द्ल विचार करताना एकूण कंपनीत बच्चे किती हा विचार करणे बरे पडेल. परदेशात अनेक बाबा मुलांना कंपनी डे केयर मध्ये घेवून येताना दिसतात.

कोर्पोरेट्क्षेत्र आणि संशोधन क्षेत्र ह्यात तुलना करणे चुक आहे. <<<
धन्यवाद कुणीतरी हे म्हणलं.
तसेच आयटी आणि इतर क्षेत्रांची सततची तुलनाही तेवढीच चूक आहे.

राजकारणाचं राहूदेत पण उद्योगधंदे या संदर्भात स्त्रियांचे प्रमाण या संदर्भात बोलायचे तर बिझनेस कम्युनिटीजमधे अजूनही स्त्रीशिक्षण, सबलीकरणाचे वारे पुरेसे पोचलेले नाहीत. ते जिथे पोचलेत त्या समाजांमधे बिझनेस करणे हे अजूनही प्रवाहाविरूद्ध जाणे आहे.

विषय कसाही भरकटतोय म्हणून अजून एका अवांतराची भर...
घरसंसारामुळे स्त्रिया अडकतात आणि त्यांची प्रगती खुंटते हे गृहितक काही प्रमाणातच ठिके.
घरदार, पैपाहुणा, सणवार, नातेवाइक, बर्थडे पार्टीज या सार्‍यांपुढे वर्क कमिटमेंटचे महत्व नसल्यामुळे प्रगती खुंटवून घेणार्‍या खूप मुली माहितीयेत. त्यांना वर्क कमिटमेंट ही किती सिरीयसली घ्यायला हवी हेच समजत नसल्यासारखे अनेकदा वाटते. जावेच्या माहेरी केळवण आहे ते पप्पा नाय बोलले जायला अशी कित्येक कारणे कामे न करण्याबद्दल, सुट्ट्या घेण्याबद्दल मी ऐकलेली आहेत. आणि मग बाई तू येऊच नकोस म्हणल्यावर मॅडम होतात खलनायिका... Happy

जन्माची संधी, शिक्षणाची संधी नाकारली गेली तर ते अन्यायकारक आहे कारण तेव्हा ज्याच्यावर अन्याय होतो तो त्याबाबत निर्णय/कृती यांसाठी सक्षम नसतो,

शिक्षणाची संधी मिळालेल्या सज्ञान व्यक्तीला प्रायॉरिटीज ठरवता यायलाच हव्यात. जर मल्टीटास्किंग, कमिटमेन्ट, नेटवर्किंग, पॉलिटिक्सशी डील करणं इत्यादी इत्यादीत तुम्ही कुठल्याही जेन्युइनसुद्धा कारणाने कमी पडत असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम/चॉइस आहे.

>>
संशोधन क्षेत्रात करियर करता येणे मुळातच प्रचंड अवघड आहे. अगदी पुरुषांसाठी सुद्धा!!!! अत्यंत हुशार पण पर्मनंट जॉब न मिळालेले पुरुष सुद्धा संशोधन क्षेत्र सोड्ताना मी पाहिलेले आहेत. स्त्रियांच्या निरनिराळ्या प्रश्नांमुळे त्यांच्यासाठी ह्या क्षेत्रात प्रवेश अजूनच कठीण आहे.!!>> +१
माझ्या दुरच्या नात्यातील एका पुरुषाने या क्षेत्रात रहायचे म्हणून खाजगी आयुष्यात बरीच सॅक्रिफायसेस केली. स्थिरस्थावर व्हायला वेळ लागला म्हणून लग्नाचे वय वाढले वगैरे प्रकारही झाले . दुसर्‍याच्या बाबतीत संधी शोधणे आणि न आवडणारी नोकरी घर चालवायला करणे असे सुरु आहे.

ऑन्साईट डेकेअर सगळ्याच कंपन्यांना परवडेल असं नाही आणि ती पण शेवटी एक सुविधाच आहे. अगदी डेकेअर नसलं तरी गरज पडली की मुलांची काळजी घ्यायला घरुन काम करायला परवानगी असणे (पुरुष/स्त्री दोघांना) हे सुद्धा खुप उपयोगाचे ठरते.
माझ्या पाहण्यात काही कंपन्या आहेत जिथे मॅनेजर लोकं लगेच काचकूच करायला लागतात.

जावेच्या माहेरी केळवण आहे ते पप्पा नाय बोलले जायला>>>>>>> Lol

शिक्षणाची संधी मिळालेल्या सज्ञान व्यक्तीला प्रायॉरिटीज ठरवता यायलाच हव्यात. जर मल्टीटास्किंग, कमिटमेन्ट, नेटवर्किंग, पॉलिटिक्सशी डील करणं इत्यादी इत्यादीत तुम्ही कुठल्याही जेन्युइनसुद्धा कारणाने कमी पडत असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम/चॉइस आहे.>>>>>>> +१!

कोर्पोरेट्क्षेत्र आणि संशोधन क्षेत्र ह्यात तुलना करणे चुक आहे >> हो हे मान्य आहे पण अनेक बेनफिट्स रिलेटेड ट्रेंड्स आधी इंडस्ट्रीत येतात आणि नंतर ते झिरपतात. उदा: फ्लेक्सी अवर्स ही संकल्पना (मी जेवढ वाचले आहे त्यानुसार) इंडस्ट्रीत आधी आली मग विद्यापीठे आणि संस्थात आली.
आता नवीन रिप्रोडक्श्न असिस्स्टंस बद्द्ल (तरूणपणी स्त्रीबीज फ्रिज करून ठेवायचे, नंतर काळ योग्य वाटल्यावर मुले 'घडवायची') ऐकले आहे. तेव्हा सॉफ्टवेयर मध्ये जे काय चालले आहे त्यावर पल्स ठेवणे (मराठी??) चांगले.

डॉ. रोहिणी गोडबोले यांचा लेख वाचला. एरवी लोकसता वाचला जात नाही तेव्हा हा लेखही वाचायला मिळाला नसता. लीलावती, तुमचे आभार!

लेखातली 'स्त्रियांचं विज्ञान क्षेत्रातलं योगदान' आणि 'शास्त्र, संशोधन क्षेत्रातलं स्त्रियांचं स्थान' हे दोन वेगळे तरीही एकमेकांवर अवलंबून असलेले मुद्दे, त्यांची उकल आणि मांडणी आवडली.

'स्त्रियांचा शास्त्रातला सहभाग इतका महत्त्वाचा का' या प्रश्नाचं उत्तर मला फार आवडलं आणि पटलं. 'व्यक्ती तितक्या प्रकृती', Spot On! कुठेही 'स्त्री म्हणून ती अमक्यात श्रेष्ठ, म्हणून तिचा सहभाग महत्त्वाचा' वगैरे हंबग मुद्दे नाहीत! लेखाचा विषय विज्ञान, शास्त्र आणि स्त्रिया असला तरी त्या अनुषंगानं येणारे मुद्दे इतर अनेक क्षेत्रं आणि एकूणच मायनॉरिटीजचा त्यातला सहभाग, यश यांनाही लागू पडतो याचं भान राखून लिहिलेला लेख!

स्त्रियांचा सहभाग वाढवायला आणि टिकवायला ग्रासरूट लेव्हलला काय व्हायला हवंय याबद्दल डॉ. गोडबोल्यांनी काही लिहिलं असेल तर वाचायला आवडेल.

बाफाचा विषय बघता फक्त तेवढ्याशी चिकटून लिहिण्याचा प्रयत्न करते.

या क्षेत्रात स्त्रीचं येणं आणि टिकणं सारखंच महत्त्वाचं असलं तरी टिकणं भाग जास्त कठीण आहे हे जाणवतं. सोशल कंडिशनिंग, त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती, अपराधीपणाची भावना म्हणून गळती हे सत्य आहेच. पण स्त्री म्हणून होणारा अन्याय, (अ)सहकार्‍यांकडून मिळालेली गैरवागणूक आणि हे सहन न होऊन, ब्रेकिंग पॉइंट येऊन क्षेत्र सोडून जाण्याच्या केसेसही आहेत. त्याची टक्केवारी-आकडेवारी उपलब्ध नाही, इतकच.

'परिस्थिती बदलेपर्यंत वाट न बघता, मला स्त्री रीसर्चर, सायन्टिस्ट म्हणून स्वतःला सिध्द करताना माझ्या पुरुष सहकार्‍यापेक्षा दुर्दैवानं जास्त मेहेनत घ्यावी लागणार आहे' हे मान्य करून त्या दृष्टीनं पावलं उचलली तर टिकणं जमेल का? हा 'आलिया भोगासी' असा पळपुटा अ‍ॅटिट्यूड म्हणून नव्हे तर संघर्ष करताना टिकून रहायला लागणार्‍या अनेक बाबींपैकी एक म्हणून?

अमेरिकेत भारतापेक्षा कणभर बरी परिस्थिती असलीतरी, स्त्रियांचं या क्षेत्रातलं योगदान पुरुषांच्या तुलनेत कमी असण्याची कारणमिमांसा हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेसिडेंटपदी असलेली व्यक्ती जेव्हा, "Differences in innate aptitude, rather than discrimination" अशी करते तेव्हा खेद होतो. निव्वळ एक प्रिव्हिलेज्ड पुरुष म्हणून केलेलं इन्सेन्सिटिव्ह वक्तव्य वाटतं. असाच मतप्रवाह अनेकांचा असू शकतो. या विधानाला पुष्टी देणारा कुठला डेटाबेस असेल? या उलट डिस्क्रिमेनशच्या मुद्द्याचं समर्थ करणार्‍या अनेक घटना डोक्युमेंटेड असतील. या क्षेत्राशी संबंधीत नोकर्‍यांना येणार्‍या अर्जांमध्ये समान क्वालिफिकेशन असतानाही जेंडर बघून बायकांना डावलल्या गेल्याच्या घटना सर्वश्रूत आहेत.

अशी अनेक उदारणं बघता पुरुष (आणि स्त्रियांच्या) या क्षेत्राकडे बघण्याच्या अ‍ॅटिट्यूडमध्ये योग्य बदल, कच्च्या मडक्यांपासून योग्य शिक्षण, स्त्रिया आणि मायनॉरिटीजना कामाच्या जागी दुय्यम वागणूक न मिळता सक्सेसफुल व्हायला संधी मिळेल असं वातावरण या बाबी सहभागी व्हायला आणि टिकायला आवश्यक आहेत.

Viginia Valion यांचं "Simply raising expectations for women in Science may be the singlemost important factor in helping them make it to the top" हे वाक्य वाचलं आणि वाटलं, हे अगदी शक्य आहे, जातील टॉपला, पण आधी जास्त संख्येनं येऊ आणि टिकूतर द्या!

सेल्स मध्ये प्रेझेंटेबल रहावे लागत असेल आणि पार्लर इ सोयी मागितल्या तर ते ठीकच आहे! <<
हे संशोधन क्षेत्र आहे की मार्केटिंग?
मार्केटिंग वगैरेमधे मिळतो की ग्रूमिंग अलावन्स तुम्ही एका स्तराच्या वर गेलात की.
अनेक ठिकाणी रिसेप्शनिस्टसनाही मिळतो ग्रूमिंग अलावन्स.

नीधप, मी ते अमाच्या पोस्ट वरून लिहीले होते. त्यांचे क्षेत्र सेल्स असावे हे त्यांच्या पोस्ट वरून वाटले. संशोधन सेल्स ह्या विषयातही होते. त्यामुळे नक्की तिथल्या गरजा काय हे त्यांना ठावूक असेल असे वाट्ले.

शिक्षणाची संधी मिळालेल्या सज्ञान व्यक्तीला प्रायॉरिटीज ठरवता यायलाच हव्यात. जर मल्टीटास्किंग, कमिटमेन्ट, नेटवर्किंग, पॉलिटिक्सशी डील करणं इत्यादी इत्यादीत तुम्ही कुठल्याही जेन्युइनसुद्धा कारणाने कमी पडत असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम/चॉइस आहे. >>> संधी मिळाल्यावरच्या गोष्टी आहेत ह्या. अनेक स्त्रिया लग्नानंतर मुलेबाळे, घर सांभाळून पी.एच.डी करतातच की!!! पण त्यातील किती स्त्रियांना पुढे संशोधन करण्याची संधी मिळते???

घरसंसारामुळे स्त्रिया अडकतात आणि त्यांची प्रगती खुंटते हे गृहितक काही प्रमाणातच ठिके.>> बरोबर आहे. नोकरी मिळाल्यावर वर्क कमिटमेंट ही सिरीयसलीच घेतली पहिजे. पण इथे घरसंसारामुळे आवडीचे करियर निवडता येत नाही हा मुख्य प्रश्न आहे असे मला वाटते.

"Differences in innate aptitude, rather than discrimination" <<
डेटा माहित नाही पण डिस्क्रिमिनेशन आणि डिफरन्स इन इनेट अ‍ॅप्टिट्यूड या दोन्हीच्या केसेस तेवढ्याच असाव्यात असं मला वाटतं.

मृणमयी - सुंदर पोस्ट. Discrimination बद्द्ल डायरेक्ट नाही पण एक्सपरिमेंटल डेटा आहे. ४-५ तासात टाकते.

इथे रूमाल...

>> पण त्यातील किती स्त्रियांना पुढे संशोधन करण्याची संधी मिळते???

सुमुक्ता, तुम्हीच ते पुरुषांनाही अवघड आहे असं लिहिलंय ना? मग बायकांनी स्पेशली तक्रार करण्यासारखं काय आहे?

सी, बाफच्या हेडरमधे संशोधन क्षेत्र असा उल्लेख आहे ना?
सेल्समधले संशोधन जिथे घडते तिथे प्रत्यक्ष विकत नसावेत बहुतेक. Happy

स्त्रियांचा सहभाग वाढवायला आणि टिकवायला ग्रासरूट लेव्हलला काय व्हायला हवंय याबद्दल डॉ. गोडबोल्यांनी काही लिहिलं असेल तर वाचायला आवडेल. >> प्रयत्न करते शोधून links द्यायचा . काही महिन्यांपूर्वी त्यांनी लिहिलेही होते. आणि ह्या विषयावर एक परिसंवादही घेतला होता . फक्त इतर सगळंच लिखाण अर्थातच इंग्लिशमध्ये आहे
अनेकांनी खूप छान मुद्दे मांडले आहेत . वाचत आहे . . .

सुमुक्ता, तुम्हीच ते पुरुषांनाही अवघड आहे असं लिहिलंय ना? मग बायकांनी स्पेशली तक्रार करण्यासारखं काय आहे? >>>> पी.एच.डी नंतर संशोधनात करियर करणारर्‍या स्त्रीपुरुषांचे प्रमाण पाहिलेत तर ते नक्कीच कळेल.

>> पी.एच.डी नंतर संशोधनात करियर करणारर्‍या स्त्रीपुरुषांचे प्रमाण पाहिलेत तर ते नक्कीच कळेल
तिथूनच विषय सुरू झाला ना?

असो. आता तेच ते मुद्दे पुन्हा लिहीत नाही.

पी.एच.डी नंतर संशोधनात करियर करणारर्‍या स्त्रीपुरुषांचे प्रमाण पाहिलेत तर ते नक्कीच कळेल.
>>>
मला सुमुक्तांच्या पोस्टींवरून गोंधळात पडायला झालं आहे. सुमुक्ता, I dont mean to put you on the spot here.
पण तुमच्या पहिल्या पोस्टीवरून मला वाटलं की संशोधन क्षेत्रात बायका कमी का याची सीमंतिनी, वरदाने जी कारणं दिली त्याचं पोस्टर चाइल्ड आहात.

तुम्हाला नवर्‍याच्या गावात संधी नाही पण बाहेर पडाल तर संधी मिळू शकतात आणि नवर्‍याची तसं करायची तयारी पण आहे पण तरिही तुम्हाला संधी घ्यायची इच्छा दिसत नाही, रार म्हणते तसं त्या पायरीवर डिटरमिनेशन कमी पडत असेल किंवा 'वेळेवारी' घडाव्या अशा गोष्टींबाबत लागलेल्या लांबणीमुळे आलेला गिल्ट असेल... इथे पर्सनल चॉइसचा आदर राखून मला म्हणावसं वाटतं की नक्की संशोधन क्षेत्रात राहाय्ची तेवढी आसच नाही का?

शेवटी इच्छा तिथे मार्ग.
पी.एच.डी नंतर संशोधनात करियर करणारर्‍या स्त्रीयांच्या प्रमाणात घट होण्यात तुमची पण एक केस अ‍ॅड करता येइल का? त्याचा ठपका कशावर ठेवला जाणार?

जावेच्या माहेरी केळवण आहे ते पप्पा नाय बोलले जायला >>>माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी "पाणी उशीरा आले, आज येत नाही", असे बिनधास्त सांगायची

http://www.npr.org/2014/04/22/305814367/evidence-of-racial-gender-biases...

हा एक इन्फॉर्मल सर्व्हे ज्यात हिडन बायसेस आहेत हे लक्षात येते.
(वेळ मिळेल तसं तसं टाकते इथे. अजून २ तरी माहित असलेले आहेत.)

शिकणे हा ही पर्सनल चॉईस आहे. तिथेही नेटवर्किंग, पॉलिटीक्स, संसार ह्यामुळे महिला मागे पडत होत्या. पण पुढे शिकलेल्या महिलांचे कॉन्ट्रीब्यूशन लक्षात घेवून लोक पाठीशी उभे राहिले आणि आपण इथवर येवून पोहोचलो. 'हा तिचा प्रॉब्लेम' आहे म्हणून जबाबदारी झटकण्यात कुणाचेच भले नाही.

तुमच्या आसपास एखादी संशोधिका असेल तर तिला जरूर कामाबद्द्ल विचारा. ती सांगेल ते काही समजणार नाही, त्यावर काही शेरेबाजी जमणार नाही, काही एंटरटेनमेंट होणार नाही. पण आपण शिकलो त्या मागे असलेल्या समाजसेवकांचे कर्ज म्हणून प्लिज करा.
तुमचा ब्लॉग असेल, माहितीचे वृत्तपत्र असेल तर त्या संशोधिकेला एखादा लेख लिहायला द्या. सोप्या भाषेत करायचे कष्ट पडतील पण तरी हे प्लीज करा.
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करीत असाल त्या क्षेत्रातील एका संशोधिकेची भेट कधी घ्या.
अनेक संशोधन संस्था / म्युझियम्स आउट्रिच प्रोग्रॅम करतात. आवर्जून भेट द्या. अनेक संशोधिका ह्यातून मुलांना मार्गदर्शन करतात.
अनुरूप त्या रिसर्चसाठी 'सबजेक्ट' म्हणून सामील व्हा.

लढाई तिची वैयक्तिक असली तरी आपले प्रोत्साहन, आपल्या सहकार्याने ती जराशी सोपी करा.
(हे condescending नाही तर रिक्वेस्ट म्हणून लिहीले आहे.)

Pages