संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आपल्या प्रायॉरिटीज आपण ठरवायच्या असतात. 'अन्याय झाला हो!' म्हणून कुढण्यात काय हशील आहे?

>>शिक्षणाची संधी मिळालेल्या सज्ञान व्यक्तीला प्रायॉरिटीज ठरवता यायलाच हव्यात. जर मल्टीटास्किंग, कमिटमेन्ट, नेटवर्किंग, पॉलिटिक्सशी डील करणं इत्यादी इत्यादीत तुम्ही कुठल्याही जेन्युइनसुद्धा कारणाने कमी पडत असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम/चॉइस आहे.

या संदर्भात एक उदारण द्यावसं वाटतंय...

तिशीतली एक भारतीय स्त्री टेन्युअर ट्रॅक प्रोफेसर म्हणून नोकरीला लागली. आधीच्या युनिव्हर्सिटीतलं थोडंफार फंडिंग आणि १ पीएचडीचा विद्यार्थी घेऊन आली होती. नोकरीतर दिली, पण लॅब थाटायला लागलीच जागा मिळाली नाही. काही महिन्यांनी एक प्रोफेसर रिटायर होणार होते. त्यांची लॅब हिला मिळेल असं सांगण्यात आलं. तोवर डिपार्टमेंट चेअरनं आपल्या लॅबमधली काही जागा देऊ केली.

ही प्रोफेसर मुळातच अत्यंत हुशार, मेहेनती होती. कुटुंबात जवळच्याच नॅशनल लॅबमध्ये रीसर्च करणारा नवरा आणि शाळेत जाणारं लहान पोर. घरचा भरपूर सपोर्ट!

३-४ महिन्यांत आणखी काही रोटेशन करणारे विद्यार्थी हिला मिळाले, त्यातले जवळपास सगळे तिच्याकडेच रीसर्च करण्याचं नक्की करून बसले. या दरम्यान एक पोस्ट डॉक मिळाला. वाढत्या संख्येमुळे लॅबमध्ये अडचण व्हायला लागली.

हिने 'मला नवी जागा कधी मिळणार, प्रोफेसर तर रिटायर झालेत. लॅबही आवरलीय' म्हणायला सुरुवात केली. पण त्याकडे रितसर दुर्लक्ष झालं. इन द मीन टाइम ज्या प्रोफेसरांच्या लॅबची जागा आणि रिसोर्सेस वापरत होती तिथे अडचणी यायला लागल्या. इक्विपमेंट आणि इन्स्ट्रुमेन्ट्स शेअर करताना होणारी भांडणं इथेही व्हायला लागली. ती सोडवताना वेळ, शक्ती जात होतीच.

या गोंधळात वर्षं झालं, पण नवी लॅब मिळाली नाही. तिथे रिनोव्हेशन सुरू झालं तसं हिला जरा बरं वाटलं. पण वर्षाअखेर एका नव्या बाप्या प्रोफेसरांना ती लॅब बहाल करण्यात आली आणि स्वाभाविकपणे हिचं डोकं फिरलं.

आधी डिपार्टमेंट चेअरकडे कंप्लेंट करून झाली. त्यांनी 'आमचा नाइलाज आहे. तुला ऑलरेडी माझ्या लॅबमध्ये जागा दिली आहे' अशी सुरुवात केली. दिवसेंदिवस होणारा ताप इतका वाढला की हिच्या स्टुडन्ट्स्ना धड प्रयोग करायला मिळेनात. नुकसान व्हायला लागलं.

या बाईनं शेवटी प्रकरण युनिव्हर्सिटीच्या उच्च अधिकार्‍यांकडे नेलं. फॉर्मल तक्रार नोंदवली. त्यासाठी मिटिंगांवर मिटिंगा... वेळेचा अपव्यय, स्ट्रेस, लॅब आणि रीसर्चकडे दुर्लक्ष असं सगळं व्हायला लागलं.

भांडून झगडून अखेरीस त्या नव्या प्रोफेसरला मिळालेल्या अख्ख्या मोठ्या लॅबचा काही भाग हिला मिळाला. तिथे ही शिफ्ट झाली. पण या दरम्यान धड रीसर्च नाही. त्यामुळे विद्यार्थी नाखूष. काही सोडून गेले. पोस्ट डॉक एकट्याच्या भरोश्यावर, विदाउट गायडन्स काम करू शकणारा एकमेव जीव. पण त्याचे प्रयोग मागे पडले.

यासगळ्याची गोळाबेरीज अशी की रीसर्च नाही, रिझल्ट्स नाहीत, म्हणून पब्लिकेशन्स नाहीत. फंडिंगसाठी अप्लाय करायचं कश्याच्या भरोश्यावर? पुन्हा ज्या लोकांशी पंगा घेतला तेच टेन्युअर देणार्‍या कमिटीवर. तिथे सगळा आनंदच असणार हे दिसतच होतं.

इथे तिनं चिकटून राहण्याचा निर्णय घेतला. भरपूर पॉलिटिक्सशी डील केलं. नवर्‍याबरोबर घर-मूल सांभाळत, कुठेही तक्रार न करता धडपडत राहिली. पण त्यावर हेफ्टी प्राइसटॅग लागली. डिपार्टमेंटमध्ये टिकून राहील तितका काळ किंमतही मोजत राहील. मनस्ताप भोगत राहील. परिस्थितीचा प्रॉब्लेम होताच, चॉइसही तिचा होता. सगळं भोगण्याची तयारीही होती. पण नव्या पुरुष प्रोफेसरांना जे आल्याआल्या सहज मिळालं ते हिला २ + वर्षं मरमर करून!

इथे एका स्त्रीला तिनं ठरवलेल्या प्रायॉरिटीची, चॉइसची तगडी किंमत मोजावी लागतेय हादेखिल कळीचा मुद्दा आहे!

मृण, धन्यवाद. या इतक्या चर्चेत आलेलं हे पहिलं उदाहरण विचारार्ह वाटलं. हो, हा प्राइसटॅग अवास्तव आहे हे मान्य आहे.

माझीही सीमंतीनीसारखीच रीक्वेस्ट आहे.
आयुष्यात चॉइसेस करुन, लढून झाल्यानंतर जर काही जणी इथे लिहित असतील, तर त्या केवळ स्वतःचे प्रोब्लेम, रडगाणं मांडायला लिहित आहेत असं नाही. शिवाय काही जणी फाईट मारून काही करू पहात असतील, आणि कधी निराश होत असतील, किंवा निदान काय काय प्रॉब्लेम आहेत हे सांगत असतील - तर किमान अपेक्षा इतकीच आहे - की एकवेळ कौतुक केलं नाही तरी चालेल, कामाबद्दल आदर नसला तरीही चालेल, पण निदान ' कशाला नुसते प्रॉब्लेम सांगत रडताय, तुम्हीच केलेले चॉईसेस आहेत तर' असं तरी बोलू नका.
आज फेसबुकपासून प्रत्यक्ष माणसं भेटतात तेव्हा, मायबोलीवर देखील, ऊन फार आहे उकडतंय पासून ट्रॅफीक मधे अडकलोय, प्लाईट डीले आहे इथपर्यंतचे प्रॉब्लेम्स लोकं बोलून दाखवत असतात. त्यांना 'चॉइस केलाय तर रडू नका' अशी उत्तर मिळत नाहीत. मग इथे काही स्त्रीया जेन्युइनली काहीतरी मुद्दे , अडचणी मांडत असतील तर निदान त्यांना ते का मांडताय म्हणून प्लीज झटकू नका / चेष्टा करु नका.
ही बेअर मिनीमन रीक्वेस्ट आहे...... Happy

थोडं स्पष्ट बोललं असेल तर माफ करा.

रार आणि सीमांतिनी, संशोधक आहात, ट्रॅफिक आणि फ्लाइट डीलेपेक्षा जरा जास्त सेन्सिबल मुद्दे अकारण जनरलायझेशन आणि समाजाबिमाजावर ठपके न ठेवता मांडले गेले तर जरूर सौहार्दाने विचारात घेऊ. वर मृणच्या पोस्टवरचा प्रतिसाद हे एक उदाहरण.

स्वाती, मी किंवा अजून कोणी आमच्या प्रवासाबद्दल लिहिलं, सीव्ही लिहिल्या, तर अजून ४-६ सणसणीत, ठोस उदाहरणं इथल्या इथे मिळतील.
पण ह्या चॉएसेसच्या मागे खूप किंमत मोजावी लागलेली आहे, आणि त्याबद्दलच ही चर्चा चालू होती.

वरची बरीचशी चर्चा नाही वाचली.
पण मुख्य चर्चा स्त्रियांना संशोधक होण्यात काय अडचणी विशेषतः व्यक्तिगत स्वरूपाच्या आहेत हा आहे.
मला काय वाटतं माहित्येय की स्त्रियांनी अंगिकारलेल्या प्रत्येक नव्या कार्यक्षेत्रात अशी एक फेज येऊन जाते.
पूर्वी शिक्षिका, नर्सेस या बहुतेकदा अविवाहित, प्रौढ कुमारिका अशा असायच्या.
बर्‍याचदा कामाला डिव्होट केल्याने संसार नाही अशी परिस्थिती.
मग हे दोन व्यवसाय कॉमन झाल्यावर आणि अशांना घरादाराबद्दल/ बायॉलॉजिकल क्लॉकच्या व्यवस्थेबद्दल ओरिएंटेशन आल्यावर विवाहित स्त्रिया यात सर्रास दिसू लागल्या.
मग डॉक्टर, प्राध्यापिका अश्या मुली व्यक्तिगत आयुष्य सोडून डिव्होटेड काम करताना दिसू लागल्या.
काही काळाने हे व्यवसायही समाजाने अ‍ॅक्सेप्ट केल्यानंतर व्यक्तिगत आयुष्य आणि हे व्यवसाय यात सांगड घातलेल्या स्त्रिया सर्रास दिसू लागल्या.
त्यामानाने कारकून, अकाऊंटंट, सरकारी नोकर्‍या यात काम करणार्या स्त्रियांना समाजाने आणि स्त्रियांनी त्यांना सुटेबल सामाजिक व्यवस्थेला लवकर आपलेसे केले.

मी वर हे जे डॉक्टर, प्राध्यापिका, नर्सेस्,शिक्षिका म्हणतेय ते अगदी प्रोफेशनल किंवा डिव्होटेड स्त्रियांसाठी.
प्रत्येक नोकरी / व्यवसायात पाट्याटाकू लोक सदासर्वदा असतातच त्यांच्यासाठी नाही.
आता संशोधन हे क्षेत्रं अगदी मादाम क्यूरीच्या आधीपासूनही स्त्रियांनी गाजवलेलं असलं तरी संशोधिका हा प्रकार समाजाला तसा नवा आहे. त्यातही सामाजिक जीवनापासून दूर आपल्या संशोधनातच रमणारा पुरूष आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य सांभाळून नेणारी स्त्री असं चित्रच समाजाच्या मनावर ठसलं आहे.
संशोधनात किती म्हटलं तरी पाट्या टाकण शक्य नाही(आपल्या देशातल्या मॅनिप्युलेटेड पीएच्ड्या आणि एम फिल्स सोडून द्या)
तेवढ्या संधीही उपलब्ध नाहीत. पण तश्या संधी देशात उपलब्ध झाल्यास अगदी २४ नाही पण १७-१८ तास एखादी स्त्री त्याला वाहून घेईल इतकी सपोर्ट सिस्टीम देशात उपलब्ध होणे कठिण नाही.
याऊलट जिथे संशोधनाच्या जास्त संधी उपलब्ध आहेत अश्या परदेशातील ठिकाणी व्यक्तिगत आयुष्यासाठी पूर्णवेळ सपोर्ट सिस्टीम मिळणे कठिण आहे.
संशोधनातल्या संधी जितक्या जास्त प्रमाणात स्त्रियांना उपलब्ध होतील आणि स्त्रीसंशोधिका पाहायची समजाला जितकी जास्त सवय होईल तितके हे प्रश्नं कमी होत जातील.

आणि तशी ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्येकालाच प्रत्येकच चॉइसची मोजावी लागते. भावनिक आवाहनं करू नका, अनुभव निश्चित बोलके असतील - तेच सांगा.

पी.एच.डी नंतर संशोधनात करियर करणारर्‍या स्त्रीपुरुषांचे प्रमाण पाहिलेत तर ते नक्कीच कळेल
तिथूनच विषय सुरू झाला ना? >>> इथे परदेशात सुद्धा ४० फॅकल्टी मध्ये केवळ १ बाई आहे आमच्या डीपार्ट्मेंटमध्ये....हे प्रमाण तुम्हाला चिंताजनक वाटत नसेल कदाचित, मला वाटते.

इथे पर्सनल चॉइसचा आदर राखून मला म्हणावसं वाटतं की नक्की संशोधन क्षेत्रात राहायची तेवढी आसच नाही का? शेवटी इच्छा तिथे मार्ग. पी.एच.डी नंतर संशोधनात करियर करणारर्‍या स्त्रीयांच्या प्रमाणात घट होण्यात तुमची पण एक केस अ‍ॅड करता येइल का? >>> नाही कारण माझा संघर्ष संपला आहे असे मी कुठेच म्हटलेले नाही. मी नोकरी शोधते आहे....पी.एच. डी मिळून मला एक महिना पण झालेला नाही. माझा डायलेमा केवळ इथे लिहिला आहे. हा डायलेमा फेस करणार्‍या हजारो स्त्रिया आहेत...प्रत्येक क्षेत्रातच!! शेवटी इच्छा तिथे मार्ग ते तर आहेच हो. माझी इच्छा आहे तेव्हा मार्गही सापडेलच. पण बघा तुमचीच आस कमी पडते असे म्ह्टल्याने हजारो स्त्रियांचे प्रश्न सुटत नाहीत ना???

रार आणि सीमंतिनी >> खूप छान पोस्ट्स

साती ह्यांना पूर्ण अनुमोदन!!

मृण्मयी, ५ वर्षाच्या टेन्यूर ट्रॅक मध्ये २+ वर्षे अशीच! Sad

स्वाती_आंबोळे >> मला सौहार्दाने लक्षात घेऊ सूचना दिलीत त्याबद्द्ल धन्यवाद. तुम्हाला सेन्सिबल वाटेल असे लिहीण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अर्थात जरा तुमच्या सेन्सची लेव्हल कुठेवर आहे ते मला समजेल तेव्हा.

एका क्ष क्षेत्रात स्त्रिया कमी आहेत. हे घातक आहे. आणि त्या वाढायला हव्यात ही गरज आहे असे वाचले.
ते घातक कुणासाठी आणि का? गरज कुणाची आणि का?
हे प्लीज सांगणार का?

मृणची पोस्ट चांगली म्हणवत नाही. पण महत्वाची आहे.
सातीचे म्हणणे पटले.

नीधप गरज सगळ्यांचीच आहे. महिलेची आणि समाजाचीही. महिला उच्च शिक्षण संस्थेतील रिसोर्सेस वापरतात. पुढे काही केले नाही / करू शकल्या नाहीत की हि सगळी इन्व्हेस्टमेंट वाया जाते.

साती, चांगली पोस्ट.

रार, सीमंतिनी, सुमुक्ता, मृण्मयी पोस्ट्स महत्वाच्या आहेत.
मला नोकरी करणार्‍यांचा वर्क लाईफ बॅलन्स आणि संशोधकांचा वर्क लाईफ बॅलन्स एका पातळीवर जोखावा असे वाटत नाही. इथे जे प्रॉब्लेम्स्/अडचणी लिहीले गेले असतील ते नोकरी कराणार्‍या, खूप उच्चपदावर असणार्‍या स्त्रियांनाही येत असतील परंतू संशोधन करणार्या व्यक्तीसाठी ते खूप जास्त बॉदरसम असतील असे मला वाटते.

मागे एकदा संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर असा उत्तम उपक्रम झाला होता. खूप जणांनी लिहीले होते. मात्र ते सर्व संशोधनाबद्दल होते. आता संशोधकांच्या वर्क लाईफ बॅलन्सबद्दल वाचायला मिळत आहे. प्लीज लिहीत राहा सगळेजण. तुमच्या अडचणींवर उपाय काय हे मला ठाऊक नाही, पण मूळात अडचणी काय असू शकतात ह्याचा विचार हा धागा वाचायच्या आधी आला नव्हता. समाजाची मानसिकता बदलायची असेल तर आधी ह्यासर्वाची जाणिव होणॅ गरजेचे आहे, व त्यादृष्टीने मला हा धागा महत्वाचा वाटतो.

महिला उच्च शिक्षण संस्थेतील रिसोर्सेस वापरतात. पुढे काही केले नाही / करू शकल्या नाहीत की हि सगळी इन्व्हेस्टमेंट वाया जाते. <<<
हे कित्येक क्षेत्रात होते की.
कितीतरी उच्चशिक्षित मुली आपले जग घरापुरते सिमित करून घेतात. कितीतरी उच्चशिक्षित मुली आपल्या मूळ शिक्षणापेक्षा वेगळ्याच क्षेत्रात कार्यरत असताना दिसतात.
मुलींचेच का पुरूषांचेही शिक्षण एक आणि काम वेगळे हे होताना दिसते.

तिथेही जाते इन्व्हेस्टमेंट वाया. म्हणजे मग प्रत्येकाने इयत्ता १२ वी नंतर जी स्ट्रीम पकडलीये त्यातच काय ते केले पाहिजे. नाहीतर ते समाजाला घातक होईल..

सॉरी हे लॉजिक नाही पटत मला.

स्त्रियांनी संशोधक व्हायला हवे यासाठी समाजाची किंवा खरेतर त्या क्षेत्रातील लोकांचीच मानसिकता बदलायला हवी हे मला मान्य आहे.
त्या क्षेत्रातल्या लोकांचीच अश्याकरता की स्त्री संशोधक असल्याने समाज मानहानीची वागणूक नक्कीच देत नाही. म्हणजे काय समजत नसेल पण 'संशोधक होणार? चार लोकात आमची छी थू होणार!' असला प्रकार नक्कीच नाहीये. (हा प्रकार कुठे असतो ते मला पक्के माहितीये!)

साती चांगली पोस्ट. Happy हे लॉजिकल वाटतं थोडं. शेवटी जसं इतर क्षेत्रात बायसेस ला सामोरं जावं लागलं तसं संशोधनक्षेत्रात पण सुरवातीला होणार आहे असं दिसतय. जे अर्थातच चुकीचं आहे मी फक्त ती रियॅलिटी आहे ह्या अर्थानी म्हणत आहे.

सी, तू केलेलं आवाहन तुझ्या वैयक्तिक, कळकळ असलेल्या अँगल मधून ठीक आहे पण रियॅलिटी मध्ये ते राबवलं जाणं तितकच इम्प्रॉबबल आहे. संशोधनक्षेत्रात किंवा अन्य कुठल्याशी श्रेत्रात जेव्हा स्त्रीया आणखिन संख्येनी जायला सुरवात करतील तेव्हा आपोआपच साती म्हणतायत तसं तिथेही सुधारणा होईल. शेवटी स्त्रीय स्वतःच (परत इथे सुद्धा) स्वतःच्या प्रगती करता जबाबदार ठरतील आणि इथेही त्यांना यश मिळेल.

मृणची पोस्ट चांगली म्हणवत नाही. >>> अनुमोदन. मृण्मयीने सांगितलेला अनुभव अत्यंत दुर्दैवी आहे.

लढाई तिची वैयक्तिक असली तरी आपले प्रोत्साहन, आपल्या सहकार्याने ती जराशी सोपी करा.
(हे condescending नाही तर रिक्वेस्ट म्हणून लिहीले आहे.) >>>>> ह्याचा हेतू काही असला तरी हे ज्या पद्धतीने इथे लिहिलं आहे (हे वाक्य आणि ह्याच्या वरचं सगळं) ते अजिबात आवडलं नाही. मी म्हणेन आसपासच्या स्त्री संशोधकांना अशी 'सहानुभूती' कृपया दाखवू नका... त्यांच्या कर्तबगारीला अश्या सहानुभूतीची गरज नाही! त्यापेक्षा आदर दाखवा आणि खरच काही करता येणं शक्य असेल आणि त्यांना ते हवं असेल तर ते करा.

साती, चांगली पोस्ट.

नीधप, तुझा मुद्दाही पटण्याजोगा आहे.

उच्च शिक्षणाच्या संस्थातून एक पोस्टडॉक शिकवायला अंदाजे दरवर्षी ४०-८० हजार डॉलर किमान लागलेले असतात. (हे फक्त पोस्ट-डॉक बद्द्ल त्याच्या प्रोजेक्ट्वरचा पैसा लिहीत नाही कारण तो फार व्हेरिएबल असतो.) सध्या साधारण ४-५ वर्षे पोस्ट डॉक चालते. भारतात हा आकडा कमी आहे कारण पगार / स्टायपेंड कमी देतात. कित्येक क्षेत्रात होते म्हणून इथेही ओके आहे हे पटणारे नसले तरी परवडणारे नाही. ही मंडळी पुढे जावून संशोधन वा निगडीत क्षेत्रात राहिली तर बरे.

माज मानहानीची वागणूक नक्कीच देत नाही. म्हणजे काय समजत नसेल पण 'संशोधक होणार? चार लोकात आमची छी थू होणार!' असला प्रकार नक्कीच नाहीये.---

Unfortunately this is not true. Madhyamvarga hi Kay cheej Ahe, he tula Thaook navhe Kay nee? Happy

Ajunahi maharashtrat suddha PhD kartana ghrachyancha prachanda virodh asto.

Mrunmayee ne lihilela anubhav ha kahi apavaad naahi. Bharatatalya anek stree sanshodhakanna yapekshahi bhayanak anubhav nakki ale astil.

Choice ani milaleli kimmat kinva kaamaachya ThikaNee miLaNarya soyee he nantarcha. Agodar sanshodhan karayachi paravanagee tar miLayala havee.

साती, मृण्मयी, सीमंतिनी, सुमुक्ता, उत्तम पोस्ट्स लिहून चर्चा योग्य track वर ठेवत आहात.
माझ्या माहितीत पुण्यात एका प्रतिथयश संस्थेत काम करणारे एक शास्त्रज्ञ आहेत. ज्यांनी आम्हाला अत्यंत वाईट टोन मध्ये मी मुलींना पीएचडी साठी घेत नाही कारण त्या लग्न/बाळंतपण वै. मुळे मधेच सोडून जातात असं सांगितलं होतं! हा पहिला first hand अनुभव! त्या संध्याकाळी मी ठरवलं की भारतात पीएचडी करणार नाही.

मी मागे लिहिलं होतं की I do want aspiring male researchers/scientists to write here. कारण ह्या क्षेत्राच्या गरजा फार वेगळ्या आहेत आणि मला माहिती आहे की माझे बरेच male batch-mates ह्या क्षेत्रातून इतर कारणांसाठी बाहेर पडले आहेत. पण तो एका वेगळ्या आणि महत्वाच्या चर्चेचा विषय आहे.

Research has never been and never will be a cake walk. And we (as in women) are not complaining about that. But this generalization that "if you have the aspiration you can cross all the hurdles" is hurting. As I said there are some inherent disparities in the field that need to be addressed. This is not cribbing. We are seeking attention to remove these disparities, that's all!

ओके आहे किंवा ओके नाही हे म्हणणारा मी कोणीच नाहीये सी, ती फक्त रियॅलिटी आहे. ओके नाहीचे हे पण मी वर म्हंटलय पण ह्याप्रमाणे तू आवाहन करत आहेस की इतर लोकांनी काहीतरी करायला पाहिजे तर इंप्रॅक्टिकल आहे हे म्हणत होतो.
पुरुषच असो स्त्री असो कोणीही त्यांची रोजची कामं/करिअर सोडून कोणालाही मदत करायला जाणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कोणी तसं करत असेल तर खरच कौतूकास्पद आहे पण काही लोकांच्या कौतूकास्पद वागणूकीमुळे स्त्रीयांचे प्रमाण संशोधनक्षेत्रात वाढणार नाहीये.

चिनूक्स थँक्यू.

पराग मी लिहीलेल आवडले नाही ते ठीक पण सहानुभूतीचा विषय अचानक समजला नाही. माझ्या पोस्ट मध्ये मी सहानुभूति, भावनिक आवाहन इ इ काहीही नाही. (जिथे मेलोड्रामा पदर पसरते करायच होते तिथे तस स्पष्ट लिहीले आहे.) एक मॅटर ऑफ फॅक्ट समाजातील लोकांना काय काय करता येईल त्या बद्द्ल लिहीले आहे. कारण समाज म्हणजे आपणच असतो. मी जे लिहीले आहे ते मी इतर संशोधिकासाठी करते.

>>> ट्रॅफिक आणि फ्लाइट डीलेपेक्षा जरा जास्त सेन्सिबल मुद्दे अकारण जनरलायझेशन आणि समाजाबिमाजावर ठपके न ठेवता मांडले गेले तर जरूर सौहार्दान विचारात घेऊ.>>> नाही केलेत तरि फरसा फरक पडणार नाही... तसेही तुम्ही सौहार्दाने विचार करावेत असे तुम्ही कोण टिकोजीराव लागून गेलात हेही समजले नाही... माफ करा पण तुमच्या एकंदरीतच पोस्टचा टोन होलिअर थॅन दाऊ वाटला...

पुरुषच असो स्त्री असो कोणीही त्यांची रोजची कामं/करिअर सोडून कोणालाही मदत करायला जाणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. >> इथे कोणीच मदतीची किंवा सहानुभूतिची अपेक्षा करत नाहीये. पण एक प्रश्न आहे त्याकडे लक्ष वेधणे महत्वाचे आहे म्हणून चर्चा करतो आहोत.

This is not cribbing. We are seeking attention to remove these disparities, that's all! >> अनुमोदन.

साती आणि मृण्मयीच्या, सुमुक्ताच्या पोस्टस चांगल्या आहेत.
परागप्रमाणेच मलाही कळकळीची विनंती नाही पटली. अशी वेळ का यावी? मुळात संशोधन म्हणजे प्रकांडपंडितांचा गहन विचार करण्यााचा आणि विक्षिप्त गोष्टींनी भरपूर असा गूढ प्रदेश आहे जिथे पाऊल टाकायचीही आपली टाप नाही अशी सामान्य माणसाची धारणा अाहे. जसं डॉक्टर म्हणजे देव, शिक्षक हा गुरू, राजकारणी म्हणजे पक्का फसवणारा तसंच हे. त्यामुळे संशोधक म्हटलं की लोक त्यांना त्यांच्या कोशात राहू देणं शहाणपणाचं समजतात. स्वतःच्या अकलेचे दिवाळे काढण्यापेक्षा चार हात दूर बरे. कदाचित ही मानसिकताच स्त्रियांना आवश्यक ती सपोर्ट सिस्टीम देण्यात कमी पडत असेल. संशोधकांना विचारा म्हणण्यापेक्षा त्यांनी लोकाभिमुख होऊन स्वत:च्या कार्याची माहिती पसरवली पाहिजे. सोप्या भाषेत. संशोधन कार्याबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण करणं कुणाच्या हातात आहे नाहीतर? कुणालाही स्वतःला मूर्खात काढली जायची भीती असते. त्यामुळे लोक तुम्हाला विचारतील हा विचार सोडा. तुम्ही लोकांपर्यंत जा. ही भीती दूर करा, ग्रे एरिया कमी झाला की साती म्हणते तसे हळूहळू सुरळीत होईल.

चिन्मय, वरच्या सगळ्या चर्चेतून मला समजलं ते हे की संशोधनाच्या क्षेत्रातच स्त्रियांचे त्या स्त्रिया आहेत म्हणून जास्त पाय खेचले जातात. घरातून पाठिंबा, सपोर्ट वगैरे संदर्भात कुठल्याही वेळेची, एनर्जीची प्रचंड डिमांड करणार्‍या करीअरसाठी असतील तेच आक्षेप आणि नकार असतात.

मध्यमवर्ग ही काय चीज हे मी उत्तमरित्या समजून आहे. मी ज्या क्षेत्रात वावरते तिथे आम्ही कष्ट करतो हे म्हणणे हाच मध्यमवर्ग हसण्यावारी नेतो. इतर काही नाही जमले म्हणून नाटकासिनेमात गेला असेच आमच्यापैकी अनेकांबद्दल हाच मध्यमवर्ग बोलत असतो. हाच मध्यमवर्ग माझ्या क्षेत्रातले सर्व लोक एकजात घाणेरड्या चारित्र्याचे आहेत हे समजून चाललेला असतो. (मला याचं काडीचं वाईट वाटत नाही. हसू येते)
त्या तुलनेत डॉक्टरेट करणे या संदर्भात काहीतरी बुद्धिबिद्धीचं आहे निदान घराण्याची अब्रू तरी घालवत नाहीये अश्या भावनेने बघत असावा मध्यमवर्ग संशोधकांकडे असा माझा कयास.

या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजापेक्षा त्या क्षेत्रातल्या लोकांची मानसिकता बदलणे महत्वाचे आहे असे मला वाटले.

आणि कुठल्याही करीअर संदर्भाने परिस्थिती बदलायची असेल तर त्या क्षेत्रातल्या लोकांचे वागणे, ग्रह बदलणे सर्वात आधी महत्वाचे असते असे वाटते.

ज्यांनी आम्हाला अत्यंत वाईट टोन मध्ये मी मुलींना पीएचडी साठी घेत नाही कारण त्या लग्न/बाळंतपण वै. मुळे मधेच सोडून जातात असं सांगितलं होतं! <<
जिज्ञासा त्या प्रोफेसरांच्या टोन बरोबरच तू सोडून गेलेल्या मुलींना पण जबाबदार धर ना.

चिन्मय,
>> Mrunmayee ne lihilela anubhav ha kahi apavaad naahi. Bharatatalya anek stree sanshodhakanna yapekshahi bhayanak anubhav nakki ale astil.

Choice ani milaleli kimmat kinva kaamaachya ThikaNee miLaNarya soyee he nantarcha. Agodar sanshodhan karayachi paravanagee tar miLayala havee. <<
हे वाचूनही परत एकदा क्षेत्रातील लोकांचीच मानसिकता बदलणे पहिले महत्वाचे असे वाटल्याशिवाय राह्यले नाही.

सी, पोस्ट डॉक पर्यंत पार गेल्यावर एखाद्याला विरक्ती येऊच शकते की. (मला तर कल्पनेनेही आली!) Happy
विनोद सोडून दे. मला माहित नाही पण किती लोक पोस्ट डॉक केल्यावर क्षेत्र सोडून देतात? त्यात स्त्रिया किती? आणि सोडून देणार्‍यांची कारणे काय असतात जनरली?

मी काल 'नवीन नॉर्मल' डीफाईन करायला हवा हा मुद्दा मांडला होता. इथे आपण संशोधनच नाही, तर कोणत्याही क्षेत्रात किंवा एकूण्च आयुष्यात 'सध्या समाजात जे नॉर्मल समजलं जातं' त्यापेक्षा वेगळं /आधिक काही करण्याची क्षमता आणी इच्छा असणार्‍या स्रीया ह्या कायमच 'आऊटलायर्स' समजल्या जातात.

FullSizeRender-3.jpg

१) समाजाची अश्या विचारांसाठी असलेली स्वीकॄती वाढायला हवी
२) 'आऊटलायर्स' ची संख्या वाढायला हवी, जेणेकरून 'नवीन पॉप्युलेशन आणी नवीन नॉर्मल निर्माण होईल' - हे होण्यासाठी जास्तीत जास्त स्त्रीयांना संधी, प्रोत्साहन, ट्रेनिंग आवश्यक आहेच. ह्या लेखाच्या निमित्ताने आपण संशोधन क्षेत्रातल्या स्रीयांबद्दल बोलतोय, पण इतर क्षेत्रात त्या त्या क्षेत्राच्या समस्या आणि विषय आहेतच की.
इथे आपण 'पॅराडाइम शिफ्ट' बद्दल बोलतोय. हे करताना क्षेत्रं वेगळी असली तरी स्रीयांनी ' बिग पिच्चर' नजरेसमोर ठेवून जितकं शक्य आहे तितकं आपापल्या क्षेत्रात वरच्या लेव्हलला गेलं पाहिजे, तरच हे नवीन नॉर्मल डीफाइन होईल. आणि इथेच त्या दुसर्‍या बीबीवर चालू होती ती चर्चा 'इतरांनी नाही तरी किमान स्त्रीयांनी तरी स्त्रीयांना समजू घ्यायला हवं' हा फॅक्टर येतो.

आज दिवसभर इकडे यायला वेळ मिळाला नाही. मला जे काही म्हणाय्चं आहे ते बरंचसं सीमंतिनी, रार, मृण्मयी यांच्या पोस्ट्समधे आलेले आहे. रार म्हणते तसे इथल्याच बायकांनी सीव्ही लिहिले तर भरपूर उदाहरणे मिळतील. पण मला उदाहरणांपेक्षा मूळ मुद्दे मांडण्यात रस आहे. मी किंवा आणखी कुणी काय पर्याय निवडले, काय किंमत दिली हे तपशील देऊन काय होणार? प्रत्येक निर्णयाची एक किंमत चुकवावी लागते हे आम्हालाही कळतं, फक्त ती किती जबरदस्त आणि दूरगामी परिणाम करणारी असू शकते याची चुणूक मृणच्या उदाहरणात आहेच.

जिज्ञासा म्हणते तसे - अडचणी सगळ्यांनाच असतात, येतात, आर्थिक गणितं अवघड असतात, इ. संशोधनातली करिअर सोपी नसतेच, त्याबद्दल तक्रार नाही. पण या बहुतेक गोष्टी लिंगनिरपेक्ष असतात. त्यात भर म्हणून तुम्ही बाई आहात म्हणून जे जास्तीचे अडथळे निर्माण होतात त्याबद्दल उपाययोजना हवी आहे.

चिनूक्स म्हणतो तसं - संशोधक होणे हा अजून मराठी मानसिकतेनुसार 'व्हॅलिड करिअर ऑप्शन' फारसा नाही. त्यातली वेळेची, श्रमाची सुरुवातीची गुंतवणूक व बेभरवशी व मर्यादित परतावे हे एक महत्वाचे कारण असावे. पण विषय तो नाही. स्त्रियांच्या बाबतीत तिथे टिकून रहाणे जास्त अवघड आहे हा मुद्दा आहे

नी - त्या सोडून गेलेल्या मुली पूर्णपणे एकट्याच जबाबदार नसणार. त्या एका मर्यादेनंतर सिस्टीमचा विरोध सहन करू शकल्या नाहीत म्हणून झुकल्या असंही किमान निम्म्याजणींच्या बाबतीत झालेलंच असणार. लग्न , मुलं होणं या साठी पुरुष विद्यार्थ्यांना झटकून नाही टाकत ना? मग स्त्रियांच्या बाबतीत मोकळेपणे बोलून या अडचणींवर मार्ग काढायला काय हरकत आहे? पण असाच अ‍ॅटिट्यूड असेल तर मग मात्र सरसकट सगळ्याच मुलींना तो मारक ठरतो.

बाकी नंतर.. पोटापाण्यासाठीच्या मरणरेषा दारी उभ्या आहेत Happy

Pages