संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चा वाचली.
गोडबोलेंचा लेख खूप आवडला. स्त्रीला संधी नाकारणे म्हणजे आपण एक हात बांधुन काम करत आहोत, हे खूप पटले.
एखादी मुलगी पीएचडी पर्यंत पोहचते त्याच क्षणी मला तिच्याबद्दलच नव्हे तर तिच्या आजुबाजुच्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटु लागतो. कारण तिथवर पोहचेपर्यंत तिने आणि तिच्या घरच्यांनी हजोरो निरर्थक प्रशांचा सामना केलेला असतो.
माझ्या ओळखीत कित्येक मुलींना "ग्रॅज्युएशन झाले आता बस- जे करायचे ते नवर्‍याच्या घरी जाऊन करा" हे ऐकाय्ला मिळाले आहे. ओळखीतली एक अत्यंत हुषार मुलगी डॉक्टर झाल्यानंतर उत्तम गुण असुनही पोस्ट ग्रॅड ला जाऊ शकली नाही. तिचे आरोग्य क्षेत्रात संशोधन करायचे स्वप्न तिथेच तुटले.
पीएचडी पर्यंत जेव्हा एक स्त्री पोहचते तेव्हाच तिने पुरुषापेशा खूप अधिक अडथळ्यांचा सामना ऑलरेडी केलेला असतो.
स्त्री आहे म्हणुन अवास्तव सवलती देऊ नका पण स्त्री आहे म्हणुन संधी देखील नाकारु नका असे वाटते.

संशोधन क्षेत्रातील बरे वाईट अनुभव लिहु शकत नाही. सगळी ऐकीव माहिती आहे. पण कॉर्पोरेट क्षेत्रात देखील उच्च पदावर पोहचणर्या स्त्रिया बर्याचदा पुरुषापेक्षा जास्त प्रमाणात अडथळ्याची शर्यत ओलांडत तिथवर पोहचतात.

सुमुक्ता, सीमंतीनी, रार, जिज्ञासा, वरदा तुमच्या पोस्टी आवडल्यात. तिथवर पोहचल्या आहात, अजुन पुढे जाल. तुमच्या स्वतःसाठी नाही पण तिथे टिकुन राहिलात तर पुढे येणार्‍या स्त्रियांना जरा आधार मिळेल. धीर सोडु नका.
अनुभव लिहित रहा. वाचत आहोत.
संशोधन क्षेत्र सोदलेल्या पुरुषांचे अनुभव ऐकायला आवडतील.

ओके! मे बी हेटाळणी हा शब्द जरा हार्श आहे पण ह्या अडचणी सगळीकडेच आहेत, नवीन काहीतरी सांगा असा attitude खटकला. आता त्याला काय शब्द वापरायचा हे सुचत नाहीये आत्ताही.

ते लग्न वै. गोष्टीचा मनस्ताप करून घेण्यापलीकडे आहे मी आता, पण हो, काही काळ त्याचा खूप त्रास झाला एवढं नक्की! And my work did suffer because of that. So that came out as an example instantly!

वरदाने खूप मुद्देसूद पोस्ट लिहिली आहे ज्यात मला सांगायचं आहे ते बरचसं आलं आहे. पण तरी एका महत्वाच्या मुद्द्यावर कोणी फार बोललेलं दिसत नाही जो सुनिधीने मांडला आहे. पैसा!! मुलभूत संशोधनाच्या क्षेत्रात return on investment फारच कमी असतो. ९९% गोष्टी फेल जातात. हे वाक्य लिहायला सोपं असलं तरी जगायला भयंकर कठीण आहे. After putting in months of hard work your experiments just fail! it is very depressing. You will not find a happy person in research.
अर्थात ह्या संशोधनात पैसा गुंतवणं हे government किंवा काही धनाढ्य संस्था यांनाच शक्य असतं. ते फंडिंग मिळवण्यासाठी भयंकर competition असते. एका पोस्ट डॉक ला अत्यंत डिमांडिंग काम करून सुद्धा फार कमी पगार मिळतो. पीएचडी करताना तर त्याहून कमी. जिथे आजिबात पाट्या टाकता येत नाहीत, २४*७ कामाचा विचार करावा लागतो अशा क्षेत्रात त्या कामाचा मोबदला अगदीच कमी आहे. इतक्या कमी पैशात घर कसे चालवायचे? सध्या IISc campus मध्ये काहीशे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. UGC कडून महिनोंमहिने पगार मिळाला नाहीये. फेलोशिपच्या रकमेत वाढ करण्याचे वचन देऊन महिने झाले तरी मूळ रक्कम देखिल हाती पडली नाहीये. आणि हे काठावर पास होणारे विद्यार्थी नाहीयेत. This is the cream of the society all future scientists but nobody seems to care about them!

I have been repeatedly asking for some contribution of male researcher/scientists. Is there no single male who is in active research on Maayboli? कारण माझ्या काही batch-mates नी हे क्षेत्र सोडण्याचं पैसा हे मुख्य कारण आहे. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही.

मुलभूत संशोधनात दुसऱ्या प्रकारचा return on investment देखिल फार कमी असतो - ह्याचा काय उपयोग आहे? ह्या प्रश्नाचे साधे सरळ उत्तर देणे अवघड नव्हे अशक्य असते. आत्ता लगेच ह्याचा काही उपयोग नाही पण कदाचित २५-३० वर्षांनी माझ्या संशोधनावर आधारित जेव्हा अजून संशोधन होईल तेव्हा कदाचित ह्याचा काहीतरी उपयोग होईल. My work is a small part of a very very big jigsaw puzzle.

जेव्हा तुम्ही तुमचं सर्व अस्तित्व पणाला लावून काम करत असता, तुमच्या क्षेत्रात सुपर स्पेशालिटी मिळवता आणि मग तुमच्या लक्षात येतं की अरे माझ्या बरोबरीची माझ्या वयाची नोकरी करणारी मंडळी घर घेऊन सेटल होऊन मुलाबाळांचा विचार करायला लागली आहेत आणि मी मात्र त्यांच्या इतकंच बुद्धिमत्तेचं आणि कष्टाचं काम करून अजूनही कोणत्याच प्रकारे सेटल्ड नाही! संशोधनाचा आनंद असतो आणि तो फार उच्च असतो ह्यात वादच नाही पण ते क्षण विरळ असतात. आणि तो आनंद रोजच्या जगण्यात येणाऱ्या अडचणी सोडवायला उपयोगी पडत नाही.

शिवाय ह्या क्षेत्रात ब्रेक घेता येत नाही. काही वर्षांनी पुन्हा काम वै. असा विचार फार कमी वेळा करता येतो. As a scientist you need to be at the edge of everything. The moment you take a back seat you lose that edge! Nobody remembers the second person who stepped on the moon!

आता ह्या सगळ्या अडचणींमध्ये स्त्री म्हणून काय विशेष अडचणी येतात तर माझ्यामते ह्या सगळ्या प्रश्नांची तीव्रता दुपटीने वाढते! Glass ceiling ह्या क्षेत्रात निश्चित आहे. ते पीएचडी ते एक tenured track position ह्या मध्ये कुठेतरी आहे. जिथे मी अजून पोचले नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी येणारे प्रॉब्लेम्स काय आहेत ह्यावर मी बोलू शकत नाही. फार विस्कळीत काहीतरी लिहिलं आहे पण आत्ता वेळ आहे म्हणून सुचेल तसं लिहिते आहे.

आधीच्या पोस्टींमध्ये परागनी ह्याचा उल्लेख केलाय बहुतेक तरी परत एकदा, मला वाटतं इथे संशोधनक्षेत्रातल्या कामासंदर्भातल्या डिमान्ड्स आणि त्या क्षेत्रात काही स्त्रीयांनी अनुभवलेले जेंडर बेस्ड बायसेस ह्यांची सरमिसळ केली जात आहे. जेंडर बेस्ड बायसेस हे कमी जास्त फरकाने सगळ्याच क्षेत्रात आहेत (इथे परत भारत आणि अमेरिका अशीही एक उपविभगाणी(?) करता येइल कारण भारतात त्यामानानी जास्त बायस दिसून येतो). मृणमयीनी दिलेल्या उदाहरणात सुद्धा मला फक्त जेंडर बायसच दिसला, संशोधनक्षेत्र आहे म्हणून असं काही वेगळं नाही दिसलं. त्यामुळे जेव्हा हे मुद्दे परत परत येतात तेव्हा अर्थातच हा प्रश्न पडतो की इथे दाखवला गेलेला बायस इतर क्षेत्रात दिसतो त्यापेक्षा वेगळा कसा आहे?

पुढे अजून एक मुद्दा आहे कामाच्या स्वरुपाचा तर तो सुद्धा मला पटत नाही. संशोधन करणे हे इतर लोकं जी नोकरी करतात त्यापेक्षा जरी वेगळं असलं तरी ते एक काम आहे. Its just work. चोवीसातले २५ तास मागणार्या नोकर्या असलेल्या स्त्रीया सुद्धा मला दररोज बघायला मिळतात. ह्या नोकर्या मार्केट ड्रीवन असल्या म्हणजे कमी मेह्नतीच्या किंवा संशोधनक्षेत्रापेक्षा वेगळ्या होत नाहीत. अशा नोकर्या मिळवताना आणि त्या टिकवताना त्यांनी फार किंमत मोजली आहे असा आविर्भाव सुद्धा कुठेही दिसून येत नाही आणि त्यातच मी म्हणतो खरं यश आहे. आपण ज्या काम/नोकरी/व्यवसायात उडी घेत आहोत त्याच्या काही डेफिनेट गरजा आहेत आणि त्या पुर्ण करायला मी पुर्णपणे तयार आहे हा विचार करुनच त्या त्यात उडी घेतात. आनंदानी नोकरी/करियर साठी लग्न, मुल हे सगळं होल्डवर ठेवणार्या कित्येक स्त्रीया बघितलेल्या आहेत.

एकदा एखाद्या क्षेत्रात उडी घेतली की मी स्त्री असल्यामुळे मला माझ्या कामाला पुर्णपणे न्याय देता आला नाही किंवा कुठल्या कारणांनी फार कुतरओढ होते असं वाटत असेल, किंवा फार किंमत मोजतोय असं वाटत असेल तर कदाचित आपण अजून आपल्या करियरच्या ड्राईविंग सीट वर बसण्यायोग्य झालेलो नाही हे समजून घ्यावं.
पुरुष नेहमीच त्यांच्या करियरच्या गाडीच्या ड्रायविंग सीट्वर बसलेले दिसतात, का? कारण ते म्हणेल तसं घर चालतं, स्त्रीया स्वतः केपेबल असताना सेकंड लीड घेतात (का त्याची बरीच कारणं आहेत).

आनंदानी नोकरी/करियर साठी लग्न, मुल हे सगळं होल्डवर ठेवणार्या कित्येक स्त्रीया बघितलेल्या आहेत.>> I envy you वैद्यबुवा! and you should realize that may be you are in minority. लग्न/मूल शक्य नव्हतं किंवा प्रयत्न करूनही जमलं नाही म्हणून होल्डवर टाकावं लागलं हे कारण असलेल्या बऱ्याच जणी माहिती आहेत. लग्न करायचं नव्हतं किंवा मूळबाळ नकोच होतं ह्या category तल्याही स्त्रिया पाहिल्या आहेत. पण मी अशी एकही स्त्री अजून पर्यंत पाहिली नाहीये जिने आनंदाने ह्या गोष्टी "होल्डवर" टाकल्या आहेत!

मृणमयीनी दिलेल्या उदाहरणात सुद्धा मला फक्त जेंडर बायसच दिसला, संशोधनक्षेत्र आहे म्हणून असं काही वेगळं नाही दिसलं. त्यामुळे जेव्हा हे मुद्दे परत परत येतात तेव्हा अर्थातच हा प्रश्न पडतो की इथे दाखवला गेलेला बायस इतर क्षेत्रात दिसतो त्यापेक्षा वेगळा कसा आहे? >>>
वैद्यबुवा, बरोबर आहे. जेंडर बायसच आहे- आणि तोच आपल्याला न परवडणारा आहे. इतर क्षेत्रात देखील असेच होत असेल पण इथे फक्त संशोधन क्षेत्राबद्दल बोलतोय म्हणुन कदाचित त्याबद्दलच लिहायचे आहे/ लिहिले जातेय.
इतर क्षेत्राशी तुलना मला तरी योग्य वाटत नाहीये कारण संशोधनातील लोकांना लागणारी एकाग्रता, मेहनत नक्कीच इतर क्षेत्रापेक्षा काकणभर जास्त आहे/ असावी असे वाटते. तिथे अजुन जेंडर बायस फेस करावा लागणे हा एक अ‍ॅडिशनल स्ट्रेस होऊ शकतो.

आनंदानी नोकरी/करियर साठी लग्न, मुल हे सगळं होल्डवर ठेवणार्या कित्येक स्त्रीया बघितलेल्या आहेत. >>> यात "आनंदानी" हा शब्द फक्त जगाला दाखवण्यापुरता असावा. किंवा एखादीपुरता खरा असेल. करिअर आणि लग्न मुल याला सारखंच महत्व देणार्‍या स्त्रिया का नसाव्या.
तुम्हाला स्पेसिफिक असे नाही विचारत पण सगळ्यांनाच एक विचारवेसे वाटते आनंदानी नोकरी/करियर साठी लग्न, मुल हे सगळं होल्डवर ठेवणार्या किती पुरुष आपण बघितले आहेत ?
मग स्त्रियांनी एकच गोष्ट का निवडावी यातुन ?

जिज्ञासा तू म्हणतेय तो ही मुद्दा खूप महत्वाचा वाटतोय. एकदा संशोधनाच्या गाडीत बसले की लास्ट स्टॉप येई पर्यंत उतरता येणार नाही. उडी मारुन प्रवास संपवा किंवा धीरे धीरे पँसेजर मध्ये मुक्कामाची वाट पहा आणि या प्रवासात व्यक्तिगत आयुष्याची स्टेशनं (लग्न, मुलबाळ, बयोलॉजिकल क्लॉक ई) मागे पडतांना बघत रहा.
कदाचित हे मुद्दे स्त्री म्हणुन समजुन घेणे सोपे आहे. पुरुषांना त्याची तीव्रता कितपत जाणवेल, कुणास ठाऊक.

इतर क्षेत्राशी तुलना मला तरी योग्य वाटत नाहीये कारण संशोधनातील लोकांना लागणारी एकाग्रता, मेहनत नक्कीच इतर क्षेत्रापेक्षा काकणभर जास्त आहे/ असावी असे वाटते. तिथे अजुन जेंडर बायस फेस करावा लागणे हा एक अ‍ॅडिशनल स्ट्रेस होऊ शकतो.>>>>> इथे उगाच मला दुसरी क्षेत्रं तुलनेत कमी आहेत हा वाद वगैरे घालायचा हेतू नाहीये आजिबात, फक्त समजून घ्यायची इच्छा आहे कारण बेकार वर्क स्केजूल्स इतर क्षेत्रातही बघायाला मिळतात. राहिला मुद्दा कमी उत्पन्नाचा तर परत तो एक चॉईस आहे कारण उत्पन्नाचं टेन्शन येत असेल तर आपण चुकीच्या करियर मध्ये घुसलोय हे लक्षात घ्यायला पाहिजे.
जेंडर बायसचे म्हणाल तर ते समाजाला अत्यंत क्लेषदायक आहे ह्यात काहीच वाद नाही फक्त आपण ज्या क्षेत्रात करियर करत आहोत तिथे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे समजूनच उडी नको का घ्यायला?
त्या रोहिणीताई मला वाटतं एक परफेक्ट उदाहरण आहेत लीड बाय एग्जँपलच्या. त्यांना सुद्धा जेंडरबायसला तोंड द्यावं लागलं असेलच पण त्या पुढे सरकत गेल्या आणि त्यामुळे आज त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कित्येक स्त्रीया ह्या क्षेत्रात उडी घ्यायला धजतील.

नोकरी/करियर साठी लग्न, मुल हे सगळं होल्डवर ठेवणार्या किती पुरुष आपण बघितले आहेत ?>>>>>>>> एग्जॅक्टली, का माहितीये का? कारण ह्या कारणांकरता करियर होल्डवर ठेवायचं हे असलं काही ते मानतच नाहीत कारण परत आपल्या समाजाच्या एव्लोयुशनप्रमाणे त्यांना बरोबर लग्नाकरता होकार देणार्या मुलीही सापडतात.
हेच जर रिवर्स झालं, की मुलींनी कंडिशनिंग झुगारुन जर करियरला महत्व दिलं आणि वर सुनिधी ह्यांनी लिहिलय तसं जोडीदार पण असाच निवडला की जो त्यांच्या करियरच्या चुकून्सुद्धा आड येणार नाही तर काही परिस्थिती बदलू शकते/बदलत आहे.

Paisa kami asaNe, failure yancha mala traas hot nahi. Private research institutes, even if their number is less, pay well (for materials chemistry / nanotech at least). Mazya bahutek sarva mitramaitrinninnee mazyapeksha kititari jasta paisa milavala aahe, but I knew what I was getting into. I do what I do because I am happy doing it.
Karavi laganari mehnat, milnara paisa ha tumcha choice asto.

What tpubles me is the gender bias. And ha bias nidaan Halli sagalikade sarkha nasto. To research madhye mala khoop Adhik pramaNaat disla aahe.

ह्या अडचणी सगळीकडेच आहेत, नवीन काहीतरी सांगा असा attitude खटकला.<<<
'आम्हाला वेगळे समजून घ्या, आम्हाला वेगळे एन्करेज करा/ डिस्करेज करू नका' वगैरे अपेक्षा सतत येत असल्याने 'का? तुमचे स्पेशल स्टेटस काय?' हा प्रश्न येणं अपरिहार्य आहे.

आणि हे प्रश्न आले की तुम्हाला तो अ‍ॅटिट्यूड वाटतोय.
तुमच्या क्षेत्रातल्या हार्डशिपमुळे तुमच्या नकळत तुम्ही स्वतःला सामान्य माणसांपेक्षा वरचे समजू लागलायत की काय असे वाटते आहे. आणि आम्हा सामान्य माणसांना ते वरचेपण सोदाहरण स्पष्ट करून हवे आहे म्हणजे आम्ही दंडवत घालायला मोकळे.

२४ तास विषयाचा ध्यास, विचार हे क्षेत्राची डिमांड आहे हे ठिक पण ते मुळात पॅशन नाही का?

Mazya bahutek sarva mitramaitrinninnee mazyapeksha kititari jasta paisa milavala aahe, but I knew what I was getting into. I do what I do because I am happy doing it.
Karavi laganari mehnat, milnara paisa ha tumcha choice asto. <<

चिन्मय, थँक्स. हे म्हणणार होते पण मला काय माहिती त्या क्षेत्रातले म्हणून गप्प बसले. संशोधन क्षेत्रातल्याच व्यक्तीकडून हे आल्यावर निदान हेटाळणी, अ‍ॅटिट्यूड अशी लेबले तरी लागणार नाहीत.

What tpubles me is the gender bias. And ha bias nidaan Halli sagalikade sarkha nasto. To research madhye mala khoop Adhik pramaNaat disla aahe. <<
म्हणजे हे परत त्या क्षेत्रात असलेल्या लोकांकडूनच झाले.

सर्वसाधारण समाज जो जेण्डर बायस्ड त्रास देतोय तो संशोधक स्त्री म्हणून स्पेशल वाटत नाहीये.

Nahi. Society baddal bolto aahe mi. Research madhye naslelya lokankadunahi titkach kinva Adhik traas hoto. Scientists female students ghet nahit karan tya vidyarthininche aai-wadeel kinva sasu-sasare kinva Navare traas detat. Gharachyanshi sambandha toDaNa ha choice pratyekala nasto.

सध्या मला ह्या विषयावर फार लिहिता येणार नाही, परंतु हा दुवा कदाचित काहींसाठी उपयुक्त ठरू शकेल -

http://news.nationalgeographic.com/news/2014/11/141107-gender-studies-wo...

पुढच्यासारखे काही परिच्छेद नक्कीच महत्त्वाचे आहेत -

Analysts say that more women are needed in research to increase the range of inventions and breakthroughs that come from looking at problems differently than men typically do.

"Look at what's being developed in engineering with 'smart houses,' " says San Francisco State University provost and gender studies professor Susan Rosser. "You get your heat connected and lights turned on and alarm systems set. They're all about control. It's not like what a woman might want"—or be more likely to think of. "Like, can we invent something where the house cleans itself?"

It's certainly not that men couldn't invent a house that cleans itself, she says. They just may be less likely to rank it as high as women might in the hierarchy of possibilities, if they think of it at all."

नी, <तुमच्या नकळत तुम्ही स्वतःला सामान्य माणसांपेक्षा वरचे समजू लागलायत >तुला असं वाटतंय का? oh! मला exactly त्याच्या उलट वाटतं आहे/म्हणायचं आहे! At times I feel very defeated and depressed! Yes, there are so many new things I learnt and it has been a very insightful journey so far. पण कशासाठी आणि कुठवर ह्या दोन प्रश्नांनी छळायला सुरुवात केली आहे! हा प्रवास सोपा नाही आणि तो करायची माझी लायकी आणि क्षमता दोन्ही नाही याची दिवसेंदिवस खात्री पटत चालली आहे! जेव्हा शाळा कॉलेजात संशोधक होण्याच्या बाता मारीत होतो तेव्हा आम्हाला कोणी सावध ऐका पुढल्या हाका असे म्हणाले नाही! पीएचडी ला सुरुवात केल्यापासून मी कोणालाही ह्या क्षेत्रात ये असा सल्ला दिलेला नाहीये! उलटा आपण इथे येऊन मुर्खपणा तर केला नाही ना असा विचार मी बरेचदा केला आहे. It is not easy to be in fundamental research and that's all I have to say!

सिरीयसली चिन्मय वेळेची, कॉन्सन्ट्रेशनची डिमांड प्रचंड असलेल्या कुठल्या क्षेत्रात स्त्रीला घरच्यांकडून प्रॉब्लेम्स येत नाहीत? कुठल्या क्षेत्रात तिला घराची जबाबदारी आणि आपले करीअर या दोन पातळ्यांवर समन्वय साधताना कुतरओढ सहन करावी लागत नाही? लग्न, मूल यासारखे निर्णय होल्डवर ठेवावे लागणे हे अश्या प्रकारच्या कुठल्या क्षेत्रात स्त्रीला करावे लागत नाही?
ते बरोबर आहे, तसेच असायला हवे हे माझे म्हणणे नाही पण समाज स्त्री संशोधक म्हणून वेगळा जास्तीचा जेण्डर बायस त्रास देतो या विधानाला सपोर्टिव्ह असे अजूनही काही मिळत नाहीये.

जिज्ञासा, डिफिटेड आणि डिप्रेस्ड वाटणे या सर्व फेजेस मी समजू शकते. तुला व सर्वच स्त्री संशोधकांना माझ्या मनापासून शुभेच्छा. तुम्हा सर्व जणींच्या बुद्धी व चिकाटीबद्दल मला प्रचंड आदर आहे.
बाकी समाजाचा भाग म्हणून मी नक्की काय करायचं हे समजलं नाहीये मला. पण तुम्हाला त्रास होऊ नये अशीच इच्छा आहे.
मी या बाफवर माझ्याकडून चर्चा थांबवतेय कारण बहुतेक माझी काही गोष्टींसाठी समज कमी पडतेय. तस्मात निर्बुद्ध समाजाचा भाग म्हणून मला इग्नोर मारा.

समाज स्त्री संशोधक म्हणून वेगळा जास्तीचा जेण्डर बायस त्रास देतो या विधानाला सपोर्टिव्ह असे अजूनही काही मिळत नाहीये.>>का ते माहिती नाही पण माझ्या परिघात संशोधन क्षेत्रात पीएचडी करणाऱ्या मुलांची संख्या मुलींपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. हा वेगळा जास्तीचा जेंडर बायस आहे का? I don't know!

पैशांच्या बाबतीत तुम्ही कोणत्या संशोधन क्षेत्रात आहात ह्यावर तुम्हाला किती पैसे मिळतात ते ठरते. सहसा ज्या संशोधनाचे काही डायरेक्ट उपयोग आहेत इंडस्ट्रीसाठी किंवा माणसाच्या आरोग्यासाठी त्यांना कंपन्या sponsor करू शकतात. पण फुलपाखरांचे रंग आणि आकार किंवा झाडाच्या वाढीचा अभ्यास अशा लगेच काही application नसणाऱ्या (मुलभूत संशोधन : आहे हे असे का आहे किंवा कसे आहे) संशोधनाला कमी पैसे मिळतात.

Nee, you are not getting my point. Asha kiti fields ahet mothe education deny kela jaata? Engineer, doctor, banker, film director etc hoNyasathi tumhi shikshan gheu shakta. PhD kela ki lagna honar nahi mhanoon gharche parvanagi det nahit. PhD kartana gharche traas d'etat mhanoon guides mulinna ghet nahit. Post doc positions miLat nahit. Ekda qualify zalyawarche struggles pratyekala astat. PaN adhi shikshan tar gheu dya..

अरे देवा, इथल्या काही पोस्ट्स वाचून गंमत वाटली. अरे बाबांनो, संशोधनक्षेत्रातले मायबोलीकर असा ग्रूप आहे, तर त्याच क्षेत्रातल्या हार्डशिपबद्दल बोलू की. आयटी, मेडीकल, मीडीया, या आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये हार्डशिप्स असतात त्यातही स्त्रियांना जरा जास्तच असतात यात कुणाचेच दुमत नाही आणि नसावेत.

संशोधन हा त्या प्रात्येक व्यक्तीचा चॉइस असतो, पॅशन असतं हे जरी मान्य केलं तरी त्यांना आयुष्यात कधीतरी "मी घेतलेला निर्णय बरोबर आहे की चूक?" असा प्रश्न पडणं पण चुकीचं आहे का? त्यावर त्यांनी त्यांचे स्ट्रगल्स लिहिले तर तेही चुकीचे आहेत का? मी समाजाचा एक हिस्सा म्हणून, एक स्त्री म्हणून, एका मुलीची आई म्हणून या स्ट्रगलकडे केवळ" हे सगळं सगळीकडेच चालतंय" म्हणून बघू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात काही वेगळी स्ट्रगल्स आहेत, आणी ती कमी करण्यासाठी मला जेवढं शक्य आहे तितकं मी करेन. यामध्ये छोट्या गोष्टी जसं कुठल्याही मुलीला "आअता तुझं लग्न कधी?" काय मग पळाणा कधी हलवताय या सारखे बिनडोक आणि वैयक्तिक प्रश्न विचारणार नाही. संशोधन क्षेत्रातल्या मुलीला मुद्दाम चारचौघात तिच्या कामाबद्दल विचारेन, तिचं कौतुक करेन. . इत्यादि बाबी मला जमू शकतात आणि मी त्या करत असतेच. इट्स नॉट अ बिग डील तरीही त्याचा एफेक्ट फार पडतो हे मला चांगलंच माहित आहे

संशोधनक्षेत्रातल्या स्त्रियांबद्दलच आपण बोलत असू तर मला चिन्मय आणि जिज्ञासाचा मुद्दा बर्‍यापैकी मान्य आहे. मला स्वतःचा अनुभव नाही, पण आजूबाजूला बर्‍याचदा पीईचडी करत असताना लग्न जमत नसल्याची उदाहरणे चिक्कार पाहिली आहेत त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पैसा!!! (हे मी मुलींसाठीच बोलतेय) "इतकं शिकून पण इतकाच पगार? मग काय उपयोग?" हे वाक्य अत्यंत ओळखीच्या नातेवईकाकडून ऐकलेले आहे. इथं संशोधन क्षेत्र बाजूला ठेवून केवळ एक अरेंज मॅरेज म्हणून बघताना मला प्रचंड खटकलं. म्हणजे एक स्त्री असून तिनं टिपिकल बाय्कोचे रोल्स पार पाडायचेच कारण ती अपेक्षा अध्याहृतच आहे, शिवाय पगारही प्रचंड हवा, सगळं वेळच्यावेळीही व्हायलाच हवंय कारण मुळात लग्न करायचंय कशाला तर वडलांना कॅन्सर आहे, त्यांना जायच्या आधी नातवाचं तोंड बघू देत. हे उदाहरण कदाचित रेअर असेल, पण अशी उदाहरणे आहेत- हे मलातरी फार वाईटरीत्या खटकतंय. ही अशीच उदाहरणे माझ्या वैयक्तिक अनुभवामधून पत्रकारीता, पी आर आणि फ्रीलान्सर म्हणून काम करत असलेल्या क्षेत्रासंदर्भात चिक्कारच आहेतपण विषय संशोधनक्षेत्राचा चालू आहे. आपण सध्या त्यांच्या समस्या किमान समजावून घेण्याचा प्रयत्न करू.

जिज्ञासा,
मला तुझ्या पोस्टस आवडल्या आणि पटल्या म्हणून मला काय वाटते ते लिहीते.

लाईफटाईम संशोधक व्हा किंवा नका होऊ पण 'उमेद' मात्र गमावू नका. आणि कुठल्याही निर्णयाचे प्रचंड मोठे प्राईसटॅग्स आहेत. पण निर्णय घ्यावे लागतात. त्या वेळेला मला ते योग्य वाटले, मी केले, आता मत बदलले, करुन पहा, चोखाळून पहा वेगळी वाट. एकच आयुष्य आहे. त्रास होणारच आहे. निर्णय घेतला तरी आणि नाही घेतला तरी. तुम्ही लोक्स फार खोलात शिरता (कामासाठी), पण आयुष्यातले व्हेरियेबल्स अस्थिर असतात. कोणाच्याच आयुष्यात कंट्रोल्ड कंडिशन्स नसतात. कितीही रीसर्च करा, आयुष्यातील प्रश्नांना 'सुयोग्य' उत्तरे मिळत नाहीत.

बाकी,
मला त्या व्यवसायनिहाय स्त्रियांच्या प्रश्नांचे विश्लेषणाच्या मागणीचे काय कळत नाही. करा की, प्रत्येकीने आपापल्या व्यावसायिक अडचणी लिहा. कंटाळ येईपर्यंत, सर्वर स्पेस असेपर्यंत लिहीत लिहा. उलट चांगलेच आहे.

सर्व मुद्दे विचारात घेतले तर प्रमुख मुद्दा कदाचित हाच असणार आहे. कुठल्याही व्यवसायात का असेना, किंवा व्यवसाय सोडला का असेना.

जैविक घड्याळ, सामाजिक परिस्थिती, कौटुबिक अपेक्षा, मुलांचे संगोपन - विषय संपला. सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे. (कारण जैविक घड्याळ बदलता येत नाही. ) परिस्थिती बदलण्यासाठी आपण आपल्या उदाहरणाने, प्रयत्नांने दिलेल्या 'प्राणांतिक' धडका. त्या मात्र दिल्याच पाहिजेत. सतत. अंगात ताकद असेपर्यंत. (समाजाला काय फरक पडतो ते सोडा, आपल्याला पडतो ना? मग करायला हवे).

सीमंतीनी, रार, वरदा - झकास पोस्टी. आपल्या कर्तृत्वाने खूSSSप मोठ्या व्हा ! मे युवर ट्राईब इंक्रि़झ.

नंदिनी, व्हेरी वेल सेड!

"तूच निवडलंस ना हे? मग भोग तुझ्या कर्माची फळं" असं म्हणून काही साध्यच होणार नाही. कारण ही सगळी लोकं आपापल्या कर्मांची फळं (चांगली/वाईट) एनीवे भोगत आहेत. पण त्यांना त्यांची स्ट्रगल्स शेअर करावीशी वाटली तर काय हरकत आहे? कदाचित मी ती समजूनही नाही घेऊ शकणार. पण मला निदान कळेल तरी की हे असं असू शकतं. उद्या माझ्या ओळखीतल्या, नात्यातल्या कोण्या मुलीने विचारलं तर तिला मी या बाजूची ओळख करून देऊ शकते किमान.

आणि संशोधन (किंवा कुठल्याही) क्षेत्रात स्त्रियांच्या प्रमाणासंबंधी काही करायचेच असेल तर 'आरक्षण' हा मुद्दा विचारात घेतला पाहीजे, असे आताशा वाटू लागले आहे. आणि एकदा का ते आले, की त्याचे बरेबाईट परिणाम होतात हे आपण जाणतोच.

एकतर आपल्या परिघात/आयुष्यात/ अखत्यारीत लिंगाधारित सामाजिक भूमिका/संकेत बदलण्यासाठी जोरात आणि निकराचे प्रयत्न सातत्याने करावे, नाहीतर व्यवसायात 'स्त्रियांसाठी (अमुक एक टक्के, पुढली १० वर्षे) राखीव जागा' याचा तरी आग्रह धरावा.

एकदा का राखीव जागा आल्या, की त्यापेक्षा मेरिटवर केलेली निवड बरी, हे तरी लक्षात येईल.
स्त्रियांचे अत्यल्प प्रमाण असणार्‍या ठराविक व्यावसायिक क्षेत्रात आता आरक्षणाची गरज विचारात घेण्याची गरज आहे असे वाटते.
आणि स्त्रियांचे प्रमाण सिनियर पोझिशन्स ना अतिशय कमी असणार्‍या व्यवसायात, तेही प्रमाण ठराविक टक्के असावे असा विचार लक्षात घेण्याची गरज आहे. (व्यवसायनिहाय शैक्षणिक पात्रता वगैरे नीट विचार करुन काहीतरी क्रायटेरिया ठेवून अर्थातच).

समान संधी देत नाही ना ? मग 'राखीव जागा' हा एकच पर्याय आहे. बघा विचार करुन.
एकदा का जागा दिल्या, कि तदनुषंगाने सोयी(ही) उपलब्ध करुन द्यायलाच लागतील हळूहळू.
असो. हे फालतू स्वप्नरंजन आहे सध्यातरी, पण न जाणो कधीतरी बदल होईल संघटित प्रयत्नांनी.
जगभर अनेक समाजधुरीणांच्या प्रयत्नांनी स्त्रिया शिकल्या, शिक्षणाचे प्रमाण वाढले, कायद्याने समान शिक्षणाचा (कागदोपत्री) हक्क मिळाला, तशा व्यावसायिक संधीही मिळतील मे बी.

रैना, आरक्षणबद्दल फार नाही बोलता येणार.

पण रिएन्ट्री स्ट्रॅटेजी ह्या संशोधन व्यवसायाची गरज आहे. उदा: एखाद्या स्त्रीने पोस्ट-डॉक नंतर ३-५ वर्षे ब्रेक घेतला तर १) 'रिएन्ट्री' फेलोशिप्स असणे २) कॅच-अप करण्यासाठी ४-६ महिन्याचे कोर्सेस असणे, ३) रिसर्चच्या पार्ट-टाईम (देवा, पूर्ण वेळ पुरत नाही तर हे पार्ट-टाईम कसे जमणार, पण एक ब्रेन्स्टॉर्मिंग म्हणून ऐका) संधी उपलब्ध असणे ४) प्रोफेशनल असोसिएशन तर्फे मेंटरिंग पुन्हा उपलब्ध होणे - हे एक तेवढ सुरू झाले आहे.

(एखाद्या पुरूषाने फॅमिली साठी ब्रेक घेतला तर त्यालाही ह्या गोष्टी द्यायला हव्या.)

डॉ. रोहिणी गोडबोल्यांचा लेख फार आवडला. पटला. नुकताच संशोधनात्मक अभ्यासक्रम निवडलेल्या आणि पुढे संशोधन क्षेत्रातच काम करायचे ठरवलेल्या लेकीला आवर्जून वाचायला देणार आहे. धन्यवाद, लीलावती.

उत्तम चर्चा सुरु आहे. बर्‍याच दिवसांनी मायबोलीवर काही चांगले वाचायला मिळाले.

खरंय
'रीएन्ट्री क्रायटेरिया' प्रत्येक क्षेत्रात हवा. तो क्षेत्रानुसार वेगवेगळा असू शकतो. उदा- आमच्या इंडस्ट्रीतही.
एकीकडे, एजिंग पॉप्युलेशन आणि वाढलेले आयुष्यमान. रीएन्ट्री क्रायटेरिया पाहिजे तर थोडाबहुत स्ट्रीक्ट करा, पण असायला हवा.
सध्या काय होते की एक ब्रेक घेतला की बाई ऑलमोस्ट बाहेरच फेकली जाते त्या क्षेत्रातून.

नंदिनी अ बिग थँक्यू! Happy
रैना, खरंय पीएचडीला सुरुवात करण्याआधी मी एक happy go lucky मुलगी होते. सुरुवात केल्यावर कळलं Frustration and unhappiness are the price tags Happy
रिसर्चसाठी म्हणून प्रत्येक गोष्टीत बाल की खाल काढण्याची सवय लागली आहे. आता स्वतःच्या प्रत्येक विचार आणि कृतीवर नको तितका विचार केला जातो कधी कधी. प्रत्यक्ष फिल्डमधे राहिले किंवा नाही तरी संशोधनाचा किडा आता चावलेला आहे!
आरक्षणाची भीती वाटते! कारण त्या कृत्रिम आधाराचा पुढे जाऊन काय फायदा/तोटा होईल हे माहिती नाही. त्यापेक्षा मे युअर ट्राईब इंक्रीझ हे जास्ती sustainable वाटतं!

सुंदर पोस्ट नंदिनी Happy
बर्‍याच जणींना जे वाटत होते पण धड शब्दात मांडता येत नव्हते ते लिहुन टाकलस Happy

रैना - प्राणांतिक धडका - हो हो. द्याव्याच लागणार. समाज बदलेपर्यंत. राखीव जागेचे बोललीस तेच माझ्या एक्स बॉस वर्षानुवर्षे मांडत आहेत/ त्यासाठी भांडत आहेत. (आयटी मध्ये) उच्च पदावर पोहचणार्‍या स्त्रिया कमी का यावर शोध घेत आहेत त्या. मला त्यांचे सर्व्हे रिपोर्ट्स सापडलेत तर तुला पाठवते.

खूप दिवसांनी मायबोलीवर छान वाचायला मिळाले.
पीएचडी वाल्या मुलींनो तुम्ही काय काय केलेत, कशा टिकुन राहिल्यात तेही लिहा. तुमचा स्ट्रगल लिहा.

Pages