संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशूडी तुला आवडली नाही हे मला मान्य. संशोधक लोकांपर्यंत पोहोचण्याची धडपड करतात. त्यासाठी आउटरिच असा स्वतंत्र विभाग आहे. मी स्वत: सध्या सायस्टार्टर ह्या सिटीझन सायन्स उपक्रमात सहभागी आहे. पण अनेक वेळा इतरांना सहभागी होण्याची संधी कुठे कुठे आहे हे लक्षात येत नाही त्या उद्देशाने ती पोस्ट होती.

नाही कारण माझा संघर्ष संपला आहे असे मी कुठेच म्हटलेले नाही. मी नोकरी शोधते आहे....पी.एच. डी मिळून मला एक महिना पण झालेला नाही. माझा डायलेमा केवळ इथे लिहिला आहे.>>>
सुमुक्ता, तू केवळ तुझा डायलेमा शेयर करत होतीस हे माझ्या लक्षात आलं नाही तेव्हा गैरसमजाबद्दल क्षमस्व.
तुझा डायलेमा लवकर संपून संशोधन क्षेत्रात योग्य संधी शोधत राहायचा निर्णय झाल्यास, तुला त्या निर्णयावर टिकून राहाण्यासाठी बळ मिळूदे ही शुभेच्छा!

सातीची पोस्ट आवडली. हळूहळू स्त्रियांच्या ह्या स्पेसिफिक क्षेत्रात काम करता येण्यासाठीच्या ग्रोइंग पेन्स संपाव्यात.

पण नव्या स्त्री संशोधकांना म्हणून एस्टॅब्लिश झालेल्या आणि निर्णयासाठी किंमती मोजलेल्या स्त्रियांनी त्या स्ट्रगलबद्दल लिहिलं तर ही गळती कमी होण्यासाठी मदत होइल असं वाटतं.
मृण्मयीच्या पोस्ट्मधल्या उदाहरणाचा बाकीच्या स्ट्रगलर्स ना नक्कीच फायदा होइल.

समजून घेणं डिफाइन करा माझ्यासाठी कुणीतरी आता.

विलक्षण बुद्धीमत्ता आणि प्रचंड चिकाटी असल्याशिवाय संशोधन क्षेत्रात टिकता येणे शक्य नाही हे माहीती असल्याने आदर आहे. नक्कीच आहे.

पण लढा, स्ट्रगल वगैरे म्हणायचे तर माझ्याही क्षेत्रात आहे. समाज घर संसार जबाबदार्‍या वगैरे चिवडा माझ्याही नशिबी आहे. (कु वा सु)प्रसिद्धी हा मुद्दा माझ्या क्षेत्रात जोरदार असल्याने चिवडा जास्तच आहे. तर मग भला उसका स्ट्रगल मेरे स्ट्रगलसे सफेद कैसे?

तुझ्या क्षेत्रातला लढा इथल्यापेक्षा कमी कुणी लेखलाय? कुणीच नाही.. आणखीही अशी क्षेत्रे असतील जिथे बायकांना तीव्र लढे द्यावे लागत असणार. इथे संशोधनाचा विषय चाललाय एवढंच

त्या सोडून गेलेल्या मुली पूर्णपणे एकट्याच जबाबदार नसणार. << असे मी म्हणतही नाही.

वेळेची, एनर्जीची विशेष डिमांड करणार्‍या करीअरला (नोकरी नव्हे) जी रिअ‍ॅक्शन मिळते समाजाकडून/ कुटुंबाकडून ती त्याही मुलींना मिळाली असेल.
परत प्रत्यक्ष क्षेत्रात त्यांना विरोध होत असेल.
या सगळ्याला त्या सस्टेन नाही होऊ शकल्या तर दोष पूर्ण त्यांचा असे मी म्हणणार नाही.

उनका स्ट्रगल अपने स्ट्रगलसे सफेद नाही पण सध्या त्यांच्या स्ट्रगलचा विषय चालू आहे म्हणून त्यांनासमजून घ्यायचं चाललंय.
एंटरप्र्यूनर/ स्वयंव्यावसायिक स्त्रियांचे प्रश्नं असा काही तरी धागा काढला की आपण आपले स्ट्रगल मांडू.
Happy

Nee, may be I am missing something, pan tu sangharshachee tulana ka karte ahes, he kaLala nahi.

तर मग भला उसका स्ट्रगल मेरे स्ट्रगलसे सफेद कैसे? >>> हेच विचारलं नाही पाहिजे असं मी म्हणतीये.
जस्ट रीस्पेक्ट द स्ट्रगल.
इथे संशोधनाबद्दल लेखापासून सुरुवात झाली, म्हणून संशोधनक्षेत्रातल्या मुद्यांबाबत बोलतोय.
प्रत्येक फील्ड मधे त्या त्या फील्ड नुसार प्रश्न आहेतच, त्यामूळे 'एक प्रश्न दुसर्‍याशी कंपेअर न करता' प्रश्न आहेत, त्यासाठी स्त्रीया आपापल्या क्षेत्रात उत्तरं शोधायचा प्रयत्न करताहेत , त्याला रीस्पेक्ट करा, शक्य तिथे मदत करा.. शक्य नसेल तिथे निदान नावं ठेवून डिसकरेज तरी करू नका - हे समजून घेणं असू शकतं की.
आणि इतकं जरी जमू शकलं तरी खूप कॉन्ट्रीब्यूशन होईल असं मला वाटतं.

बहुतेक वरदा आणि चिन्मयनेही तेच लिहिलंय.

च्च वरदा माझे क्षेत्र हे उदाहरणादाखल आहे. ते अजून कुठलेही क्षेत्र असू शकते.

स्त्रियांनी तरी स्त्रियांना समजून घ्या या रारच्या मुद्द्यासंदर्भाने तो प्रश्न होता.

एंटरप्र्यूनर/ स्वयंव्यावसायिक स्त्रियांचे प्रश्नं असा काही तरी धागा काढला की आपण आपले स्ट्रगल मांडू. <<
मेरा कोई स्ट्रगलही नही है.. Happy

तो स्ट्रगलवाला मुद्दा फारच चुकीचा मांडला बहुतेक मी. जे म्हणायचंय ते सोडून वेगळंच पोचलंय,
तर माफी त्याबद्दल.

मला 'समजून घेणे' या गोष्टीची व्याप्ती बघायची होती.
बुद्धिमत्ता आणि चिकाटी याबद्दल आदर आहे. पण अजून काय? अजून काय वेगळे की जे वेगळ्याने समजून घ्यायला हवे? असे काहीतरी..

हेच विचारलं नाही पाहिजे असं मी म्हणतीये.>>>>> ते आपोआप विचारलं जातं रार कारण काहीही न बोलता आपापल्या क्षेत्रात जोरदार लढा देणारे लोकं पण आहेत.

त्याला रीस्पेक्ट करा, शक्य तिथे मदत करा.. शक्य नसेल तिथे निदान नावं ठेवून डिसकरेज तरी करू नका - हे समजून घेणं असू शकतं की.>>>>> जी रियॅलिटी आहे त्याला वेगळा परत रिस्पेक्ट देऊन काय साधणार आहे? हा एक वैयक्तिक चॉईस आहे माझ्यामते. काही पबलिक नाही का कोणी केलेली चांगली कलाकुसरी बघितली की एकदम साष्टांग दंडवत वगैरे घालतात आणि काही लोकं "छान आहे हां" फक्त येवढच म्हणतात त्यातला प्रकार आहे.

शक्य तिथे मदत करायला पाहिजे हे मान्य.

नावं ठेवून कोणी डिस्करेज होऊन फिल्ड सोडत वगैरे असेल तर त्यात थोडी त्या फिल्ड सोडणार्‍या व्यक्तीची पण चूक आहे.
समजून घेणं इथे मलाही नीधपसारखाच प्रश्न पडतो की म्हणजे नेमकं काय? अन त्यानी खरं काय नेमका फरक पडतो?

नी, अगं त्यांच्याकडे कोणी मुली नव्हत्याच सोडून जायला! This was his policy to run the lab! He just never took female graduate students! आणि त्यांचे उत्तम चालले आहे! इथे अमेरिकेत असते ते तर असे tantrums दाखवल्याबद्दल suspend झाले असते कधीचेच!
आणि हो ह्या क्षेत्रातला स्ट्रगल ज्यादा सफेद है असं म्हणणं नाहीये!
There is always a first time for everything! हळूहळू त्या पायवाटेची वहिवाट बनत जाते. आणि त्यामागे पूर्वसुरींचे प्रयत्न असतात. Our generation is reaping the fruits of seeds sown by generations before. Similarly, I must sow some seeds and nurture them for generations to come. By increasing social awareness about the disparities in my field I am doing my share of contribution.

Nee, tujhya warchya postbaddal.
I am aware of the SC judgment which tried to end the discrimination against female makeup artists. PaN stree Ahe mhanoon uchcha shikshaN gheu na deNa, kinva kaamachi sandhi nakaraNa he sanshodhanachya kshetrat ghaData, jyacha mala traas hoto. Yala kon jababdaar he apan bajula Thevoo. But I wish people would try to understand that it is inhuman to deny such opportunities to women.

शक्य नसेल तिथे निदान नावं ठेवून डिसकरेज तरी करू नका - हे समजून घेणं असू शकतं की. <<
संपूर्ण चर्चेमधे संशोधन क्षेत्रातील स्त्रियांना कुणीही नावे ठेवलेली दिसली नाहीत.
जे काय अनुभव मांडले गेलेत त्यात नावे ठेवणारे संशोधन क्षेत्रातलेच लोक दिसलेत.

बुद्धिमत्ता आणि चिकाटी याबद्दल आदर आहे. पण अजून काय?
>>
अजून एक म्हणजे क्षेत्राचे नाविन्य.
म्हणजे 'संशोधन' हे तिच्यासाठी जसे नविन क्षेत्र आहे तसे तिच्या क्षेत्रातील इतरांना आपल्यात एक स्त्री पार्टिसिपंट असणे एक नविन गोष्ट आहे. त्यामुळे काही नॉर्म्स अजून बनलेच नाहीत. अश्या प्रतिकूल स्थितीत ती काम करत्येय.
आमच्या क्षेत्राचे म्हणाल तर ऑर्थोपेडिशीयन स्त्री ही एक संघर्षाची कहाणी आहे. किंवा पूर्वी मेकॅनिकलवाल्या मुली ही इंजीनियरिंगमध्ये नविन गोष्टं होती पूर्वी.

हळूहळू त्या पायवाटेची वहिवाट बनत जाते. आणि त्यामागे पूर्वसुरींचे प्रयत्न असतात. <<
हेच तर होतं सातीच्या पोस्टमधे.

But I wish people would try to understand that it is inhuman to deny such opportunities to women. <<
तुला खरंच असं वाटतंय इथे असा अमानुष दृष्टिकोन कुणी मांडलाय?

सर्वसाधारण समाज अश्या अमानुष दृष्टिकोनातून बघतो स्त्री संशोधकांकडे? (हा प्रश्न खरंच माहिती नाही म्हणून विचारतेय.)

People will understand when other people will light a fire under their butts. Nothing wrong to wish people should be more considerate towards the need for equality but that ain't doing squat for anyone. You think like this because you probably had some good influences in life and later you made good choices and now based on a much reformed thinking do actually care about equality. There are a lot of people who 1) honestly don't care about equality 2) are in fact opposing equality.
नं१ च्या लोकांना एक तर समजून घ्यायला वेळ नाही आणि नं २ च्या लोकांना समजून घेणं कशाशी खातात हे माहित नाही.

नावं ठेवून कोणी डिस्करेज होऊन फिल्ड सोडत वगैरे असेल तर त्यात थोडी त्या फिल्ड सोडणार्‍या व्यक्तीची पण चूक आहे.>>मान्य, असेलही त्या व्यक्तीही चूक थोडीशी. पण नावं ठेवली जातात हे योग्य आहे का? असा पण विचार करा की जरा? मुलगी पीएचडी करत्येय आणि तिच्या लग्नाचं वय उलटून चाललंय म्हणून सगळीकडे तिच्या आई वडिलांना गाठून सतत लाडू कधी खायला घालताय म्हणून छळणं हे किती योग्य आहे? आणि जर मुलीला ह्यामुळे अपराधी वाटत असेल तर ह्यात मुलीची किती चूक आहे? की तिने हे पण म्हणायचं नाही की मला याचा त्रास होतोय?
If you don't think there is any validity in the problems, please ignore the thread! सगळीकडे हे असंच आहे हे सतत सांगत राहिल्याने प्रश्न सुटणार नाहीये.

निश्चित साती त्याबद्दलही आदर आहेच. पण समजून घेणे असे म्हणले जाते तेव्हा काहीतरी वेगळी अपेक्षा असावी असे वाटते.

एक माणूस म्हणून कुठले वेगळेपण आहे जे समजून घेऊन ( काही गोष्टी माफ व्हायला हव्यात?) असे वाटते.
कंसातले अध्यहृत असावेसे वाटते.
म्हणून वेगळेपण काय? मोठेपण काय? हे विचारते आहे.

तसेच समाजाचा एक भाग म्हणून मी एका स्त्री संशोधकाला एन्करेज करायचे म्हणजे काय करायचे? डिस्करेज करायचे नाही म्हणजे काय करायचे नाही?

हे प्रामाणिक प्रश्न आहेत.

उदाहरणार्थ लोकलमधे पोटुशी बाई दिसली, वयस्कर बाई दिसली की उठून जागा दिली जाते बसायला. कारण माझ्यापेक्षा तिला जास्त गरज आहे बसायची हे उठणारी बाई समजून घेते.
इथे स्त्रीने स्त्रीला समजून घेणे आहे.

हा मुद्दा करीअर्सच्या बाबतीत आल्यावर प्रश्न पडतातच ना.

जिज्ञासा,

१. संशोधन हे अवघड प्रकरण आहे - रिगार्डलेस ऑफ जेन्डर
२. कुठल्याही क्षेत्रात काही करून दाखवण्याच्या वेळा आणि बायलॉजिकल क्लॉक सहसा क्लॅश होतातच
३. ८ तासांनंतर पेन डाऊन करता येत नाही अशी संशोधनाव्यतिरिक्त अनेक क्षेत्रं आहेत
४. वर्क-लाइफ बॅलन्स साधण्याची कसरत - रिगार्डलेस ऑफ जेन्डर - कोणालाही चुकलेली नसते
५. सोशल कंडिशनिंगची झळ रिगार्डलेस ऑफ फील्ड - आणि खरंतर जेन्डरही - सर्वांनाच पोचते

हे प्रश्न खरेच आहेत, पण प्रत्येक मुद्द्यात लिहिल्यानुसार स्त्रिया आणि संशोधन याबाहेरही बहुतेकांना लागू होतात. आता आम्हा नॉन-संशोधकांना तुमच्या क्षेत्रातल्या यापलीकडच्या अडचणी कळेलशा भाषेत सांगा.

मान्य, असेलही त्या व्यक्तीही चूक थोडीशी. पण नावं ठेवली जातात हे योग्य आहे का? असा पण विचार करा की जरा? मुलगी पीएचडी करत्येय आणि तिच्या लग्नाचं वय उलटून चाललंय म्हणून सगळीकडे तिच्या आई वडिलांना गाठून सतत लाडू कधी खायला घालताय म्हणून छळणं हे किती योग्य आहे? आणि जर मुलीला ह्यामुळे अपराधी वाटत असेल तर ह्यात मुलीची किती चूक आहे? की तिने हे पण म्हणायचं नाही की मला याचा त्रास होतोय?
If you don't think there is any validity in the problems, please ignore the thread! सगळीकडे हे असंच आहे हे सतत सांगत राहिल्याने प्रश्न सुटणार नाहीये.>>>>>>> तुम्ही बहुतेक चिडलेल्या दिसता. हे बघा, तुम्ही जे हे छळण्याच्या वगैरे प्रॉबलेम्सचा उल्लेख केला त्याबद्दल इथे वाचून तुम्हाला खरच वाटतं का की ती लोकं छळ्णं बंद करतील?
I don't think there's no validity in the problems, they're real problems for sure. I am saying just talking about it does nothing for you and others who are going through this.
मला वाटतं आता ही चर्चा आधी झालीये त्या वळणावर चाललीये त्यामुळे इथेच थांबतो.
वर बर्‍याच लोकांनी लिहिलय तोच माझाही मुद्दा आहे, संशोधनक्षेत्र हे सगळ्यांपेक्षा फार वेगळं आहे आणि त्यात जर तुम्ही बाई असाल तर आणखिनच अवघड जातं हाच सूर जास्त ऐकू येत आहे.

Nee, sarvasadharaN samaaj striyanna sanshodhan karayala virodh karto, ha majha mudda aahe.

संशोधनक्षेत्र हे सगळ्यांपेक्षा फार वेगळं आहे आणि त्यात जर तुम्ही बाई असाल तर आणखिनच अवघड जातं हाच सूर जास्त ऐकू येत आहे <<
या सुराबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण एवढ्या संख्येने या सगळ्या मैत्रिणी जेव्हा अनुभव सांगतायत तेव्हा त्यात तथ्य असणार यावर माझा विश्वास आहे.

पण यापलिकडे जाऊन समजून घेणे म्हणजे मी काय करायचे हे माझ्या चिमूटभर मेंदूत घुसत नाहीये.

sarvasadharaN samaaj striyanna sanshodhan karayala virodh karto, ha majha mudda aahe. <<
ह्म्म पण कसा?
हे आता मला समजेल अश्या वेळेला सांग. सध्या डोळे मिटतायत तर मी इथून कलटी मारते.

चर्चा तर उत्तम आहेच संशोधनात मुली (मुलींबद्दल बोलतोय म्हणुन मुली, नाहीतर कोणीही) कमी का यावर स्वतःकडे बघुन कळलेले एक कारण (ते वर आलेही असेल पण इतक्या प्रतिसादात लक्षात नाही) :
मध्यमवर्गातुन आल्यामुळे शिक्षण संपल्यावर लवकरात लवकर नोकरी सुरु करुन पैसे मिळवायचे होते म्हणुन तशीच वाट निवडली. त्यामुळे संशोधनाला लागणारी ३ ते कितीतरी वर्षे खर्ची घालायचा विचार पण मनात नाही आला.
संशोधन करणार्‍या सर्व व्यक्तींबद्दल अतीव आदर आहे.

९९ टक्के लोकांनी सर्वात पहिले कारण घरसंसाराच्या व्यापामुळे मुली येत नाहीत वा माघार घेतात हे लिहिले आहे. त्यामुळे पुढे जाऊन असेही म्हणावेसे वाटते, आता ज्या संशोधनात आहेत व इथे लिहिताहेत त्या जोडीदार निवडताना त्याला नक्कीच आपल्या अपेक्षा सांगतील व माघार घेणार नाहीत. बेस्टलक!!

साती, रारचे प्रतिसाद पटले. (तसे सर्वांचेच आवडलेत). मृण्मयीचे उदाहरण वाचुन खुप अस्वस्थ वाटले, संतापही आला. माणसे कोणत्या अधिकाराने इतर माणसांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात? नैसर्गिक अडथळे काय थोडे असतात का? किती मनस्ताप झाला असेल त्या स्त्रीला?

अमांचा मसाज कुपने द्या हे पटले. फक्त इतकेच म्हणेन की सर्वांना द्या. जसे मेडिकल विमा असतो तसेच हेही. त्याने आरोग्य राखायला मदतच होईल. पाठदुखी, बाकी कायकायदुखी हे हल्ली फार जास्त झाले आहे. त्यामुळे पण चांगल्या नोकर्‍या सोडल्यात बायांनी.

स्वाती_आंबोळे, ह्या पलीकडले प्रॉब्लेम्स आजिबात नाहीयेत असं नाही. पण ते बरेच subjective आहेत आणि त्यावरचे उपाय हे इथल्या चर्चेतून हाती लागतील असे नाही. पण तरीही वेळ मिळाला की त्यावर मी लिहायचा प्रयत्न करते.
वैद्यबुवा, होय मी चिडलेलीच आहे! कारण इथे येणाऱ्या बऱ्याच मंडळींचा "ह्या त्यात काय? हे सगळे प्रॉब्लेम्स तर सगळीकडेच येतात स्त्रियांना! संशोधन क्षेत्रात असलात म्हणजे तुमच्या अंगाला सोनं लागलं की काय!" किंवा "ही तर reality आहे. ह्याबद्दल गळे काढून तुमचे प्रश्न सुटणार नाहीयेत" हा असा जो सूर लागला आहे तो फार hurt करतो. तुम्ही आमचे प्रश्न सोडवू नका (ती अपेक्षाच नाहीये) पण किमान एक सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिक म्हणून ह्या क्षेत्रात असलेल्या स्त्रियांच्या प्रॉब्लेम्सची अशी हेटाळणी तरी करू नका! त्याने ही चर्चा तुम्ही म्हणता तसे <आधी झालीये त्या वळणावर चाललीये>

मला नाही वाटत इथे कुणी... कुणीचं जाऊदेत मला नाही वाट मी कुठली हेटाळणी केलीये.

मला अजूनही मी एन्करेज करायचे म्हणजे काय करायचे ते कळले नाहीये आणि डिस्करेज करायचे नाही म्हणजे काय करायचे नाही हे कळले नाहीये.

डूज अ‍ॅण्ड डोन्टस व्हाइल डिलिंग विथ रिसर्चर्स फॉर डमीज असे एक माझ्यासाठी लिहून ठेवा ही विनंती.

जिज्ञासा,
स्त्री म्हणून संशोधन क्षेत्रात जे काही प्रॉबल्म्स येतात त्याबद्दल सहानुभुती नक्कीच आहे आणि कोणी त्या समस्या खर्‍या नाहीत किंवा मोठ्या नाहीत असही कोणी म्हणत नाही आहे, हेटालनीही करत नाहीये कोणी (माझ्यामते). पण अगं कधीकधी प्रॉबलेम्स पेक्षा आपण मोठं झाल्याशिवाय ते छोटे व्हायचं नाव घेत नाहीत.

तू वरती एका पोस्ट मध्ये उल्लेख केलास की
"...तिच्या लग्नाचं वय उलटून चाललंय म्हणून सगळीकडे तिच्या आई वडिलांना गाठून सतत लाडू कधी खायला घालताय म्हणून छळणं हे किती योग्य आहे? आणि जर मुलीला ह्यामुळे अपराधी वाटत असेल तर ह्यात मुलीची किती चूक आहे? " >>> पण हे असले मूर्ख प्रश्न पी. एच्.डी/पोस्ट डॉक /रिसर्च करत बसलेल्या आणि त्यासाठी लग्न करायची सवड न झालेल्या मुलाच्या आईबापांना पण विचारले जात असतीलच की. त्याचा कितपत त्रास करून घ्यायचा आणि अपराधी तरी कशासाठी वाटून घ्यायचं म्हणते मी..
सांगायचं बिंधास्त पी च डी मिळाली की लग्गेच लाडू घ्यायला जाणार(लग्नाचे नव्हे तर पीएच्डीचे)..
शिवाय १२ ते ४ वेळात मागितले लाडू तर ठणकावून सांगायचं मिळाणार नाहीत दुकान बंद आहे. Happy

चियर अप!

जिज्ञासा, खरंच लिहा. धागा कोणी कोणाचे प्रश्न सोडवेल म्हणून नाहीच आहे.
आणि तुमचे प्रॉब्लेम्स आम्हालाही आहेत म्हटलं तर हर्ट का होता? आम्ही त्यापलीकडे काय आहे / काही आहे का हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत.

जिज्ञासा, शांत हो. इतकं वैयक्तिक पातळीवर लावून घेऊ नकोस. आणि आसपास समाज, नातेवाईक, लोक काय म्हणतात ते लावून घ्यायचं नाही. एकदाच तोंडावर सांग की भोचकपणा करू नका. कायमचे बंद पडतील Proud

शूम्पी - असे प्रश्न मुलींच्या बाबतीत जरा जास्त 'आपुलकीने' विचारले जातात गं Wink

मला स्वतःला विचारलंत तर मला समाजाकडून प्रोत्साहनाची गरज नाही, कुणी काहीही म्हणलं म्हणून कधीच मी डिस्करेजही झालेले नाही. मला समजून घ्या असंही मी कधी कुणाला सांगायला गेलेली नाही. माझ्या कुटुम्बसदस्यांना कधीच स्पष्ट सांगितलं आहे - की अशा अशा गोष्टी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत आणि मी कशाहीसाठी त्यात तडजोड करणार नाही. नोकरी, आर्थिक परतावा असो/नसो, चोवीस तास मी या विषयातच काम करते-करणार. (संशोधनात कधीच 'पेन डाउन' हा प्रकार नसतो. तुम्ही चोवीसातले पंचवीस तास त्यात घातले तरी कमीच असतात. आयुष्यातल्या प्रत्येक मिनिटाची मानसिक गुंतवणूक मागणारं हे क्षेत्र आहे. आणि म्हणून इतर नोकर्‍यांपेक्षा वेगळं आहे. ते मार्केटड्रिव्हन बरेचदा नसतं. किंवा एक प्रोजेक्ट/विषय संपला आता दुसरं सुरू करायच्या मधे ब्रेक घेईन/ नाही असंही नसतं. सगळं संशोधन सलग आणि एकमेकात गुंतलेलं असतं. त्यात खर्‍या अर्थाने ब्रेक्स नसतात) मला मुलगी, बायको, गृहिणी म्हणून इतक्या गोष्टी जमतील, जमवायचा प्रयत्न करेन, इतक्या गोष्टी जमणार नाहीत. किंवा माझ्या प्राधान्ययादीत येणार नाहीत. या सर्व निर्णयांचीही किंमत असते, ती बहुतेकवेळा पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात मोजावी लागते. ती मी मोजली आहे. कुठलीच तक्रार नाही. अर्थातच सगळ्या जणीच माझ्या पायरीवर असतील असं नाही. काही खालच्या तर काही वरच्या असतील. खालच्या पायरीवरच्यांना माझी सहानुभूती आहे कारण स्वनिर्णय-कुटुम्ब हे समीकरण इच्छित रित्या सोडवणं सहजसोपं नाहीच्चे. बहुतेक कुटुम्बसदस्य नोकरीपेशाशी तुलना करून तशाच पद्धतीच्या गुंतवणूक-परतावे गणिताची अपेक्षा करतात, आणि उरलेले घरसंसाराकडे लक्ष हीच प्राथमिकता असावी अशा अट्टाहासाचे असतात (माझ्या एका फिजिक्समधे पोस्टडॉक केलेल्या मैत्रिणीचे उद्गार - मी कितीही काही केलं तरी अर्ध्या तासात किती भांडी घासू शकते यावरच माझी किंमत माझे सासूसासरे ठरवतात. Proud ).
पण जेव्हा तुमच्या कार्यक्षेत्रात - नोकरीतल्या निवडीसाठी, फंडिंगसाठी, प्रोजेक्ट्सच्या जबाबदार्‍या वाटावाटीत केवळ तुम्ही बाई आहात म्हणून अन्याय केला जातो, तुमच्या जैविक घडामोडींना सामावून घेण्याची यंत्रणा जाणीवपूर्वक विकसित होत नाही, उलट तुम्ही त्यामुळे कामात कुचराई कराल असे गृहितक अनेक वरिष्ठांच्या डोक्यात असते त्याचा खूप मानसिक आणि करिअर पातळीवर त्रास होतो. आधीच या दुहेरी आणि परस्परपूरक बायसेस शी लढताना अनेकजणी गळतात, मागे पडतात. त्यामुळे आणि बाई म्हणून दुपटीने सिद्ध करायच्या गरजेने वरिष्ठपदी फारच कमी बायका जातात (प्रोव्हर्बियल ग्लास सीलिंग). वरती कमी बायका असल्याने हे चक्र चालूच रहाते.
पुरुषांचा लढा हा मुख्यत: आर्थिक स्थैर्याकरता जास्त असतो. एकदा नोकरी मिळाली की बाकीचे फुकटचे लढे घरदाराशी करावे लागत नाहीत.

आणखी काही सुचलं तर नंतर... तूर्तास इतकंच

Pages