संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मान्य करावे असे नाहीच पण इतरांपेक्षा किंचित जास्त संघर्ष करण्याची तयारी हवी. <<<

मस्त उत्तर!

मग असे म्हणता येईल का की इतरांपेक्षा जास्त संघर्ष न करावा लागणारी काही खास क्षेत्रे स्त्रीसाठी आहेत? Happy

असली तर कोणती? ::-)

हे आपले सहज, वादासाठी वगैरे नव्हे. Happy

तू दिलेले उत्तर हे पटण्यासारखे आणि बेसिक आहे पण स्त्रियांचे शास्त्रज्ञांच्यातले प्रमाण इतके कमी हे घातक आहे. ते वाढलेच पाहिजे. ते समाजासाठी गरजेचे आहे वगैरे विधानांचे लॉजिक शोधून मिळत नव्हते. >> खरेतर शास्त्रज्ञ निर्माण करणे ही काळाची गरज आहे (स्त्री असो वा पुरुष). ह्या क्षेत्रात सुद्धा स्त्रियांना पुढे यायची संधी मिळावयास हवी कारण जर स्त्रिया संशोधनाकडे वळणार नसतील तर आपोआपच शास्त्रज्ञांची संख्या कमी होइल, जे घातक आहे.

मग असे म्हणता येईल का की इतरांपेक्षा जास्त संघर्ष न करावा लागणारी काही खास क्षेत्रे स्त्रीसाठी आहेत? >>> नाहीत असे माझे मत आहे. पण विषय संशोधन आणि स्त्रिया आहे म्हणून संशोधनाचा संदर्भ!!

खरेतर शास्त्रज्ञ निर्माण करणे ही काळाची गरज आहे (स्त्री असो वा पुरुष). ह्या क्षेत्रात सुद्धा स्त्रियांना पुढे यायची संधी मिळावयास हवी कारण जर स्त्रिया संशोधनाकडे वळणार नसतील तर आपोआपच शास्त्रज्ञांची संख्या कमी होइल.<<<

हा प्रतिसाद मला उद्देशून नसला तरीही लिहित आहे त्याबद्दल क्षमस्व!

मग त्या डॉ. रोहिणी गोडबोले स्त्री-पुरुष समानतावादापलीकडे नक्की काय बोललेल्या असाव्यात?

की काहीच नाही?

>> कमी हे घातक आहे. ते वाढलेच पाहिजे. ते समाजासाठी गरजेचे

प्रमाण व्यस्त असल्याने एकतर ज्या थोड्या स्त्रिया या क्षेत्रात आल्या आहेत त्यांचा संघर्ष वाढतो. यावेसे वाटणार्‍या स्त्रिया अर्ध्यावाटेत गळतात (त्यांच्यावर केलेली सरकारी - पक्षी आपल्या पैशाची इन्वेस्टमेंट वाया जाते.) त्यातून दुष्टचक्र म्हणजे पुढच्या फळीतल्या स्त्रियांना केवळ स्त्री म्हणून ही नक्की फोकस्ड असेल की नाही असल्या बेसिक शंकांना सामोरे जावे लागते.

सातीने सुरुवातीला लिहिले तसे आधी स्त्रियांनी नोकरी करणे ही काळाची गरज नाही असे मत होते. ते मागे पडले. मग काही क्षेत्रे केवळ न-संसारी स्त्रियांची असे मत होते. ते मागे पडले. तसेच प्रत्येक क्षेत्राचे व्हायला हवे.
संशोधन हे स्पेशल बुद्धिमत्तेचे क्षेत्र असल्याने साहजिकच स्त्रियांची बुद्धिमत्ता जात्याच कमी असते असा शास्त्रीय सिद्धांत मांडला जातो. तो पुराव्याशिवाय चुकीचा कसा ठरवणार?

कुटुंबाने, समाजाने ते समजून घेऊन मदतीचा हात स्त्रीपुढे केला, तर देशातले हे ५० टक्क्य़ांचे बौद्धिक भांडवल, बौद्धिक क्षमता आणि बौद्धिक वैविध्य वापरून देशाच्या प्रगतीत अधिक मोलाची भर पडू शकते. >>>> स्त्रियांनी संशोधनात भाग न घेतल्याने शास्त्राचे जग जगातील ५० टक्के बौद्धिक क्षमतेला मुकते आणि या वैविध्यालाही! >>> हा मुळ मुद्दा आहे असे मला वाटते.

हो सुमुक्ता
स्त्रियांना इच्छा असल्यास संधी मिळायला हवी. त्यासाठी फेवरेबल वातावरण समाजात, क्षेत्रात निर्माण व्हायला हवे याबद्दल दुमत नाही.

बाकी तो काळाची गरज वरचा वाद झालाय घालून. फुकट गैरसमजांचे पीक आले होते. त्यामुळे तूर्तास ते माझ्याकडून बाजूला.

मी स्वतः माझ्या विषयापुरती या निष्कर्षाला येऊन पोचले आहे की मला जे संशोधन करायचे आहे ते पी एच डी साठीच करायला हवे असे नाही. डॉक्टरेट मिळण्या न मिळण्याने मला काहीच फरक पडणार नाहीये नावामागे डॉ. लावण्याच्या प्रेस्टिज पलिकडे. संशोधन करताना जे डॉक्युमेंटेशन मी करेन तेच मी माझ्याकडची इतर स्किल्स वापरून वेगळ्या पद्धतीने केले तर जास्त उपयोगाचे ठरेल. माझ्या आणि जनतेच्या सुद्धा. मग कशाला युनिव्हर्सिटीचा शिक्का हवा?

माझे माझे सांगण्याचा हेतू यात नाही पण अश्याही नोटवर संशोधनाची गाडी जाऊ शकते. त्यात काही चूक नाही. आणि गाडी इथे पोचायला वयाची किमान पस्तिस-चाळीस वर्षे पार केली जातातच.

स्त्रियांनी संशोधनात भाग न घेतल्याने शास्त्राचे जग जगातील ५० टक्के बौद्धिक क्षमतेला मुकते आणि या वैविध्यालाही! <<
क्षमतेपेक्षा अप्रोच म्हणू या का?
त्या पातळीवर मला हे जास्त योग्य वाटतेय.

>>>कुटुंबाने, समाजाने ते समजून घेऊन मदतीचा हात स्त्रीपुढे केला, तर देशातले हे ५० टक्क्य़ांचे बौद्धिक भांडवल, बौद्धिक क्षमता आणि बौद्धिक वैविध्य वापरून देशाच्या प्रगतीत अधिक मोलाची भर पडू शकते. >>>> स्त्रियांनी संशोधनात भाग न घेतल्याने शास्त्राचे जग जगातील ५० टक्के बौद्धिक क्षमतेला मुकते आणि या वैविध्यालाही! >>> हा मुळ मुद्दा आहे असे मला वाटते.<<<

बापरे, सुमुक्ता ह्या विषयावर मी मोठा प्रतिसाद दिला आहे. तो कोणीच वाचला नाही का? Proud Happy

माझे माझे सांगण्याचा हेतू यात नाही पण अश्याही नोटवर संशोधनाची गाडी जाऊ शकते. त्यात काही चूक नाही. आणि गाडी इथे पोचायला वयाची किमान पस्तिस-चाळीस वर्षे पार केली जातातच. >>> सह्मत!!

बापरे, सुमुक्ता ह्या विषयावर मी मोठा प्रतिसाद दिला आहे. तो कोणीच वाचला नाही का? >>> वाचला होता!! स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक चांगले संशोधन करतील असे मुळीच नाही. स्त्रियांनी संशोधन केले तर खूप काही बदलेल असेही अजिबात नाही. पण स्त्रियांचे संशोधन क्षेत्रातील प्रमाण अत्यल्प आहे. आमच्या ४० फॅकल्टी असणार्‍या डीपार्ट्मेंट मध्ये केवळ एक बाई आहे. ह्याव्यतिरिक्त गेल्या १० वर्षात जे अनेक फॅकल्टी इंटरव्ह्यू झाले त्यात फक्त एका बाईचा इंटरव्ह्यू झाला. आणि हीच परिस्थिती बहुतांश विद्यापिठांची आहे. ह्याचा अर्थ आपण असा काढूयात का की स्त्रियांना संधी मिळत नाहीत किंवा घेता येत नाहीत?

>>>स्त्रियांचे संशोधन क्षेत्रातील प्रमाण अत्यल्प आहे. आमच्या ४० फॅकल्टी असणार्‍या डीपार्ट्मेंट मध्ये केवळ एक बाई आहे. ह्याव्यतिरिक्त गेल्या १० वर्षात जे अनेक फॅकल्टी इंटरव्ह्यू झाले त्यात फक्त एका बाईचा इंटरव्ह्यू झाला. आणि हीच परिस्थिती बहुतांश विद्यापिठांची आहे. ह्याचा अर्थ आपण असा काढूयात का की स्त्रियांना संधी मिळत नाहीत किंवा घेता येत नाहीत?<<<

नाही. स्त्रिया स्वतःला दुर्बल समजतात, त्यांना त्यांनी तसे समजावे हेच शिकवले जाते आणि प्रवाहाविरुद्ध जाण्याची हिम्मत थोड्यांकडे असते हा त्याचा अर्थ मला तरी वाटतो. Happy

पण मला त्याचा अर्थ हा नक्कीच वाटत नाही की संशोधन क्षेत्रातील स्त्रियांना काही 'वेगळे' प्रॉब्लेम्स भेडसावतात.

>>>संशोधन हे स्पेशल बुद्धिमत्तेचे क्षेत्र असल्याने साहजिकच स्त्रियांची बुद्धिमत्ता जात्याच कमी असते असा शास्त्रीय सिद्धांत मांडला जातो. तो पुराव्याशिवाय चुकीचा कसा ठरवणार?<<<

हे जबरी आहे.

ह्याच्यावर सुयोग्य उत्तर नाही. ह्या प्रश्नाचे उत्तर देताना सतराशे साठ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार. अतिशय कळीचा मुद्दा!

हा मुद्दा तर त्या मूळ लेखातही अ‍ॅड्रेस झालेला दिसत नाही.

पुरावे निर्माण करण्यासाठी असंख्य स्त्रियांना सामाजिक अपेक्षा लाथाडाव्या लागतील.

मग? मग त्यात 'करिअर खरेच इतके महत्वाचे आहे का, असते का' हे मुद्दे निर्माण होतील.

संशोधन क्षेत्रातील स्त्रियांनी लग्न न केल्यास त्यांना शासनाकडून भत्ता मिळायला हवा, असे कुणाचेच म्हणणे नाही आहे ना इथे? Happy

इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट की त्यांचे कंट्रिब्युशन त्या दर्जाचे होते की नव्हते की कंट्रिब्युशनच नव्हते! Happy

>> लग्न न केल्यास त्यांना शासनाकडून भत्ता
हे समजले नाही.

>> काही 'वेगळे' प्रॉब्लेम्स
कुणाहून वेगळे? संशोधक पुरुषांहून वेगळे की इतर क्षेत्रातील स्त्रियांहून वेगळे?
माझ्या मते दोन्हीचे उत्तर हो आहे म्हणजे सं क्षे स्त्रियांना सं क्षे पुरुषांहून वेगळे प्रॉब्लेम्स(ही) भेडसावतात व इतर क्षेत्रातील स्त्रियांहून वेगळेही.

( थोडेसे अवांतर : मी जेव्हा रोहिणीताईना भेटेन तेव्हा विचारेन शीर्षकाबद्दल Wink )
बाकी चर्चा वाचत आहे

>>>माझ्या मते दोन्हीचे उत्तर हो आहे <<< +१ आणि त्याशिवाय, आणखी एक मतसुद्धा, की, हे प्रॉब्लेम्स कोणत्याही इतर क्षेत्रातील स्त्रियांपेक्षा भिन्न नाहीत.

>>>हे समजले नाही.<<<

हे स्त्रियांना समजत नाही हा भीषण प्रॉब्लेम आहे. आणि हे इथे एक पुरुष डकवत आहे हा त्याहून भीषण!

>>>थोडेसे अवांतर : मी जेव्हा रोहिणीताईना भेटेन तेव्हा विचारेन शीर्षकाबद्दल<<<

प्रामाणिक उत्तर देऊ का? 'हू केअर्स?'

त्यांनी त्यांना जे म्हणायचे ते म्हणून टाकले. इथल्यांना जे म्हणायचे आहे ते इथल्यांनी म्हणून टाकले.

ह्या सगळ्यातून एकातरी स्त्रीला अशी इच्छा झाली असेल का की दुनिया खड्ड्यात गेली मी संशोधनाच्या क्षेत्रात जाणार?

वरची सगळी चर्चा वाचून ह्या प्रश्नाचे उत्तर कोणीतरी द्यावे अशी विनंती Happy

मला जे संशोधन करायचे......................... हवा?
बरोबर.
संशोधन करून विषयासंबंधीच्या ज्ञानात भर पडावी, हा संशोधनाचा मुख्य हेतू.
त्याचा उपयोग कसा होईल, किंवा करायचा हा वेगळा प्रश्न. त्याची जबाबदारी संशोधकावर नाही. पण त्यात संशोधकाची मदत महत्वाची.

वरती झरबेराची पोस्ट वाचली. मस्त लिहिले आहेस. इथल्या सर्व चर्चेचा तुला शिक्षणामध्ये फायदा व्हावा अशी इच्छा,. Happy

हो पण ती परिस्थिती माझ्या विषयापुरती फेवरेबल आहे हे एक आणि संशोधनानंतर मिळणारी डीग्री याकडे मी उपजिवीकेचे साधन म्हणून बघत नाहीये. परत त्या विषयासाठी लागू शकेल असे आर्थिक पाठबळ मोठे आहे जे कुठल्या युनिव्हर्सिटीपेक्षा संशोधन + माझे इतर स्किल्स असे करून डॉक्युमेंटेशन केले तर जास्त चांगल्या प्रकारे मिळू शकेल असा माहौल आहे.

>> हे स्त्रियांना समजत नाही हा भीषण प्रॉब्लेम आहे.
Happy घोळच आहे.

>> वेगळे प्रॉब्लेम
१. सं क्षे पुरुषांहून वेगळे
- स्त्री म्हणजे कमी क्षमता/ वेगळा प्रकार/ प्राणी अश्या गैरसमजाला सामोरे जावे लागणे.
- नेटवर्किंग मध्ये ऑल मेल क्लबमधून वेगळे पडणे.
- घरची आघाडी सांभाळायला गृहकृत्यदक्ष जोडीदारांची तुलनेने अनुपलब्धता.
२. इतर क्षेत्रातील स्त्रियांहून वेगळे
- स्वतःच्या पायावर उभे राहण्यास जास्त वेळ लागणे.

संशोधनातून मिळणारा आनंद हा त्यातील सर्व घटकांना (स्त्री/ पुरूष) सारखाच मिळत असावा. त्यात असमानता नाही.

नंदिनी+1
पेशवे , वरदा यांची पोस्ट आवडली..
ह्या चर्चेचा भावी संशोधकाना दिशादर्शक म्हणून उपयोग व्हावा ही सदिच्छा

मृदुला,

तुम्ही तुमच्यासारखे विचार असणार्‍यांना रिप्रेझेंट करत आहात,

आणि ते इथे लिहीत आहात.

तुमच्यासारखे नसणार्‍यांबद्दल लिहिले होते Happy

>>>संशोधनातून मिळणारा आनंद हा त्यातील सर्व घटकांना (स्त्री/ पुरूष) सारखाच मिळत असावा. त्यात असमानता नाही.<<<

अहो हे मान्यच आहे. पण :

१. स्त्रियांनी'च' संशोधन केल्यामुळे काय वेगळे घडू शकते?
२. स्त्रिया संशोधन क्षेत्रात गेल्या नाहीत तर ह्या जगात काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात?

>> काय वेगळे घडू शकते
हे सुमुक्ताने वर सांगितले आहे की. एकुणातल्या ५०% लोकांना या महत्त्वाच्या क्षेत्रापासून दूर ठेवले नाही तर संशोधनांतील प्रगतीचा वेग वाढेल असे मला वाटते.

मुद्दा इतकाच आहे की स्त्री कोणत्याही क्षेत्रात जावो, तिच्याकडून असलेल्या कौटुंबिक अपेक्षा बदलत नाहीत.

ह्या गोष्टीचा प्रखरपणे विरोध करणारी एकही पोस्ट आलेली नाही हे अधिकच भयंकर आहे.

कौटुंबिक अपेक्षा त्यागून मी मला करायचे ते करेन असे कोणीच म्हणालेले नाही.

पॅशनच नसताना पॅशनच !

>> कौटुंबिक अपेक्षा त्यागून
म्हणजे कसे?
एकटे राहून वगैरे की कौटुंबिक जबाबदार्‍या आउटसोर्स करून?

कसंही ना मृदुला?

व्हाय शूड वन केअर?

ज्या स्त्रीला संशोधन करायचे आहे, संशोधन करण्याची प्रातिभ कुवत लाभलेली आहे आणि ज्या स्त्रीला त्या स्त्रीच्या लग्नाआधी कोणी चक्रम प्रश्न विचारत नाही आहे (किंवा, मी तर म्हणतो की विचारत आहेही) तिने तर थेट असे ठरवावे की कुटुंबव्यवस्था हा पर्याय मी माझ्या वयाच्या पन्नासाव्व्या वर्षी विचारात घेईन?

असे उत्तर जर पन्नास टक्के स्त्रियांनी दिले तर पंचवीस टक्के संशोधक वाढून संशोधनाचे क्वान्टम वाढेल ना?

तसेही फक्त संशोधक स्त्री'च' असल्याने काही वेगळे घडते हे कुठे सिद्ध होत आहे, रोहिणी गोडबोलेंच्या लेखातून किंवा येथील चर्चेतून? Happy

>>स्त्रियांनी'च' संशोधन केल्यामुळे काय वेगळे घडू शकते?
२. स्त्रिया संशोधन क्षेत्रात गेल्या नाहीत तर ह्या जगात काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात?>>

काही वेळा केवळ पुरुषांच्या नजरेने एखाद्या प्रश्नाकडे पहाणे होते त्यापेक्षा वेगळा दृष्टीकोन स्त्री तिच्या स्त्री म्हणून असलेल्या अनुभव विश्वामुळे मांडेल. कोलॅबोरेटिव एफोर्ट्सनी अधीक चांगल्या पद्धतीने संशोधन होइल. काही वेळा केवळ पुरुष संशोधक असल्याने मिळणारे रिझल्ट्स खरे चित्र दाखवणार नाहित. जसे की लॅब अ‍ॅनिमल्सचे पुरुष आणि स्त्रीयांप्रती वेगवेगळ्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट होणे. काही वेळा स्त्री म्हणून असलेल्या वेगळ्या शारीरिक आणि भावनिक गरजा लक्षात न घेतल्याने मांडलेली गृहितके आणि त्यातुन तयार होणारे बायस्ड रिझल्ट्स, किंवा जे सर्वसाधारण पुरुषाच्या बाबतीत जे परीणम असतील तेच स्त्रीच्या बाबतीत असतील हे नकळत ग्रुहित धरले जाणे असे बरेच काही यात येते.

Pages