संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण खूप काही लिहायचं आहे पण आत्ता आजिबात वेळ नाहीये Sad वेळ मिळाला की लिहेन.
वरदा, रार उत्तम पोस्ट्स! I would like to know what aspiring male researchers think of this field.

अ‍ॅस्पायरिंग कशाला फक्त? सुप्रतिष्ठित पुरुष संशोधकांचे दृष्टीकोनही वाचायला आवडतील Happy

वि,सू - इथे संशोधनक्षेत्रातल्या सर्व बायका सद्गुणांचे, नीतिमत्तेचे पुतळे असतात असा दावा अजिबात नाही. पुरुषांप्रमाणेच त्याही सर्व प्रकारचे गुणावगुण असलेल्या बर्‍यावाईट माणूस असतात. तेव्हा आपण ते मुद्दे तूर्तास बाजूला ठेवूयात.

लेख वाचल्यापासून सकाळपासून घरात यावर चर्चा चालू आहे. चर्चा करणारी समोरची व्यक्ती पीचडी असून अ‍ॅकॅ डेमिक रीसर्च करत नसली तरी इंडस्ट्रीयल रीसर्च मधे आहे. त्या चर्चेतून पुरुष संशोधकाला याबाबत काय वाटतं ह्याबद्दल काही मुद्दे -
१) महिला संशोधकांचीच नव्हे, तर सर्वच क्षेत्रात महिलांनी उच्च पदावर असण्याची गरज हळूहळू पटत आहे. कारण एक्पर्टीज, व्हूज, स्कील सेट ची डायव्हरसीटी वाढवायची असेल तर पुरुषांबरोबरच स्त्रीयांनीही असण्याची गरज आहे.
२) एकूणच इंजिनीयरींग क्षेत्रातही मुळात स्त्रीया इंजिनीयर होण्याचे प्रमाण कमी आहे (पॉप्युलेशनच्या तुलनेत) , त्यामुळे त्यातल्या पुढे पीचडी, संशोधन करतील अशांचे प्रमाण खूपच कमी. ह्याचे कारण मुळात कंडीशनींग मुळे आणि शारीरक कष्ट असतात असा समज असल्याने इंजिनीयरींग हे मुलींचे क्षेत्र नाही असाच वर्षानुवर्ष समज आहे. कॉप्युटर सायन्स, एलेक्ट्रॉनिक्स हे अपवाद असले तरी त्यात पीचडी करणार्या मुली कमीच.
३) संशोधन किंवा कोणत्याही मोठ्या पोस्टला कामासाठी द्यावा लागणारा वेळ, पेशन्स कुठेतरी कौटुंबीक जबाबदार्‍यांमधे डीव्हाईड होतोच स्त्रीयांच्या बाबतीत. अशा वेळी त्या कामाची/पोस्टची कमिटमेंट कॉप्रोमाइज होते कारण आजही स्त्रीयांची प्रमुख जबाबदारी म्हणजे कुटुंब असंच मानलं जातं.

लोकांना तुम्ही आणि तुमचे काम माहित हवे >> मी तर एकूणच कोणालाही वयाच्या १८ व्या वर्षानंतर स्वतःचे नाव काय असावे हे ठरवायचा हक्क आणि स्वातंत्र्य असायला हवं ह्या मताची आहे. त्यामुळे लग्नानंतर नाव बदलण्याचा प्रश्नच नाही.
पण संशोधन क्षेत्रात असताना हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण जगासाठी, पब्लीकेशन्स ही तुमच्या कामाची आणि तुमची ओळख असते, जी तुम्हाला पदोपदी मागीतली जाते. सिद्ध करावी लागते. अश्यावेळी एखादीनं लग्नानंतर नाव बदललं तर तुमची आधीची आयडेंटीटी धोक्यात येऊ शकते. आजवर एकाही पुरुष संशोधक मित्राला ह्या मुद्यावरुन काळजी करताना पाहिलं नाहीये, पण अनेक स्त्री संशोधकांना आयुष्यात ह्या साध्याश्या तरीही महत्वच्या मुद्याचा क्षणभर का होईना विचार करावा लागलेला पाहिलेला आहे.

नेटवर्कींग, स्वतःच्या कामाबद्दल बोलणे ह्या मुद्यांवर पण चर्चा आवश्यक आहेच.

एका मैत्रिणीने नावाआधी डॉ वापरणे सोडले. कारण ती पीएचडी (आधीचे नाव वापरणारी - स्मिथ), नवरा बॅचलर्स डीग्री. संसार बाकी सुखाचा होता पण कुठली तिच्या ऑफिसातली आमंत्रण पत्रिका आली की घरातील वातावरण बिघडायचे कारण बरेच वेळा डॉ.स्मिथ व सौ स्मिथ असे आमंत्रण असायचे. मिसेस हसून सोडून देता येत होते नवर्‍याला पण मी डॉ नाही हे दरवेळी डोळ्यासमोर नको होते त्याला. तिने ऑफिसात शेवटी कागदोपत्री डॉ लावत नाही अशी नोंद करून आली. मला नाही वाटत कुठल्या पुरूष संशोधकाला अशा गोष्टींचा सामना करावा लागत असेल.

'साथ देणे ' ह्यात पार्टीला पत्रिकेवरून ड्रामा न करता तासाभरात तयार होवून जाणे हे धरले आहे. Wink Happy

उच्च शिक्षणाचा प्रवास हा नुसतंच काम नाही, तर तुमची विचारसरणी घडवत असतो. पीचडी, पोस्ट्डॉक किंवा संशोधन यात तुमच्या मेंदूला सतत बौद्धिक खाद्य पुरवलं जात असतं. तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लावली जात असते. हा त्या शिक्षणाचा, ट्रेनिंगचा भाग आहे.
पुढे फक्त कौटुंबिक जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागल्याने जर कामात, संशोधनात ब्रेक घ्यावा लागला तर ती अनेकदा मानसिक, बौद्धिक पातळीवर प्रचंड घुसमट / त्रास देणारी ठरू शकते. मेंदूला सवयीचं झालेलं खाद्य काढून घेतल्यावर जी बौद्धिक उपासमार अनुभवावी लागते ती अनेकदा वरुन दिसत नाही, आणि हा फॅक्टर किती महत्त्वाचा आहे हे कोणी विचारातही घेत नाही.

सायो, हो मैत्रेयीचं नाव विसरलोच.. Proud

नेटवर्कींग, स्वतःच्या कामाबद्दल बोलणे ह्या मुद्यांवर पण चर्चा आवश्यक आहेच. >>>>> रार, तुच बोलून टाक बरं आता.. कारण बाकीच्यांना कुटूंब, नवरा, मुलं ह्या मुद्यावरून पुढे सरकायची इच्छाच दिसत नाहीये. Wink

बाकींची लढाई नवरा, मुले, समाज ह्या रिंगणातच होते. >>>> मी आधीच्या पोस्टीत लिहिल्याप्रमाणे हा *एक* मुद्दा आहे. जो कोणी अमान्य करायचा प्रश्नच नाही. खुद्द लेखिकेनेच इतरही कारणे / उपाय ह्यांना मुळ लेखात स्पर्श केलेला दिसतोय पण त्यावर किंवा इतर मुद्द्यांवर काही फारसे काही न बोलता तिच झापडबंद, एकांगी चर्चा करायची असेल तर ज्याची त्याची इच्छा.

स्त्रीने स्वखुशीने/रिस्क किंवा गिल्ट ह्या फॅक्टरने संशोधन क्षेत्र सोडणे हे मुद्दे एका स्त्री संशोधकाकडूनच आलेले आहेत, त्यामुळे ते मला महत्त्वाचे वाटतात.

ह्याची सुरुवात निश्चितच घरात-समाजात होते. फार थोड्यावेळा स्त्रीला तिच्या कामाविषयी विचारले जाते. >>>> एकंदरीत स्त्रियांनी काय प्रयत्न केले पाहिजेत, कोणती बाकीची स्कील्स डेवलप (नेटवर्कींग, मार्केटींग, सॉफ्ट स्किल्स इत्यादी) केली पाहिजेत आणि ती कशी? ह्याबद्दल बोलण्या प्रत्येक मुद्दा घर, कुटूंब, समाजाशी आणून जोडण्याची हातोटी हा एक संशोधनाचा विषय वाटतो आहे.. Wink

मी वर सुचवलेला व्यंग्यचित्रासाठीचा विषय ही सत्यपरिस्थिती नक्कीच नाहीये. आधीच ह्या क्षेत्रात असलेल्या स्त्रियांनी संशोधनक्षेत्र सोडून जाऊ नये म्हणून किंवा त्यांना त्यात अधिक संधी मिळाव्या म्हणून जसे प्रयत्न करायला हवे त्याचप्रमाणे अधिकाधिक स्त्रियांनी संशोधन क्षेत्राकडे वळण्यासाठी काय करावे लागले ह्याचाही विचार व्हावा असे मला वाटते. कारण ते प्रमाण वाढले तर ड्रॉपआऊट्सचे प्रमाण वजाजाता संशोधन क्षेत्रातील स्त्रियांचे एकंदरीत प्रमाण वाढेल.

रार, तुझ्या तीनही पोस्टी चांगल्या आहेत.

इथे संशोधनक्षेत्रातल्या सर्व बायका सद्गुणांचे, नीतिमत्तेचे पुतळे असतात असा दावा अजिबात नाही. >>>> मला तर थोडं वेगळं वाटतं आहे. संशोधन क्षेत्रातला अनुभव नाही पण कॉर्पोरेटमध्ये बघितलेल्या गोष्टींवरून स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत लॉबिइंगमध्ये (कंपूबाजीमध्ये) थोड्या कमी पडत असाव्या का? आणि त्यामुळे त्यांच्या वर्टीकल ग्रोथमध्ये अडथळे येत असावेत का?

खुप छान चर्चा चालु आहे. मला या विषयात फारसे माहित नाही. पण माझी मुलगी सामाजिक शास्त्रात पुढे करिअर करता यावी साठी धडपडतेय. इथे जे मुद्दे लिहिलेत त्यापैकी काही गोष्टी तिच्याही मार्गात आडव्या येतील ही भिती मला वाटते.

सगळ्या पालकांप्रमाणे मीही तिला शिक्षणासाठी उत्तेजन देतेय. या संदर्भात सिमंतीनीनी लिहिलेला मुद्दा अगदी पटला. डॉक्टरेट लेवेलपर्यंत शिक्षण घेऊन पुढे ते ज्ञान वापरण्याची संधी मिळाली नाही किंवा संधी समोर असुनही सोडावी लागली तर मग इतकी धडपड करुन काय फायदा?

मला वरची चर्चा फक्त ' स्त्रियांना शास्त्रज्ञ, संशोधक होण्यात काय अडथळे आहेत' अशीच दिसतेय.
पण 'स्त्रियांनी शास्त्रज्ञ होणे ही काळाची गरज कशी ' याबाबत काहीच चर्चा दिसत नाही आहे.

रार, सिमंतीनी छान पोस्ट्स!
माझ्या बघण्यात तीन केसेस . तिघी वेगवेगळ्या पिढीतल्या -

सायन्स क्षेत्रात पीचडी केलेली, संशोधनाची उपलब्ध संधी सोडून लग्न करुन नवर्‍याच्या गावी रहायला गेलेली आणि त्या शहरात धडपडून संधी मिळत नाही म्हणून फ्रस्ट्रेट झालेली मुलगी आमच्या घरात आहे.

त्या आधीच्या पिढीतल्या ओळखीतल्या स्त्रीने संस्थेतील राजकारणाला कंटाळून संशोधन क्षेत्र सोडले. तिच्या संशोधन क्षेत्रात संधी सरकारीच होती. नवरा आणि सासर -माहेरची मंडळी हळहळली. तिने थोडे दटून रहायला हवे होते असे त्यांचे म्हणणे पडले.

त्याच्याही आधीच्या पिढीतल्या स्त्रीने संधी मिळेल तसे संशोधन सुरु ठेवले. मधे ब्रेक घ्यावे लागले तरी अभ्यास थांबवला नाही. प्रसंगी काही काळ संशोधनाची संधी आहे त्या गावी एकटीने राहून काम केले. संशोधन सायन्स क्षेत्रातले. या स्त्रीचे मास्टर्स, पीएचडी लग्नानंतर. आर्मीत फ्रंट वर वारंवार पोस्टिंग असलेला नवरा. गरजेप्रमाणे मुलं-बाळं, घर संभाळायला हायर्ड हेल्प वगैरे याचे गिल्ट घरातल्यांनी दिले नाहीत आणि या स्त्रीने घेतलेही नाहित. एक्सेंडेड फॅमिलीतली लोकंही नेहमी तिच्या कामाची चौकशी करणारे. बाकीचे सगळे इंजिनियर-डॉक्टर/सर्जन-लॉयर-बँन्किंग वगैरे चाकोरीतले त्यामुळे या स्त्रीचे सगळ्यांनाच विशेष कौतुक. या स्त्रीच्या बुद्धीचे आणि त्याहीपेक्षा तिच्या धडाडीचे आणि चिकाटीचे कौतुक ऐकत मी मोठी झाले. आईचे गुण लेकीत नाहीत. त्यामुळे या स्त्रीची मुलगी चाकोरीतली डॉक्टर Happy

चांगली चर्चा. मला रार, सई , वरदा, जिज्ञासा यांचीच आठवण झाली होती लेख वाचून. अत्तर शास्त्रात
डेव्हलपर्स, क्रिएटिव परफ्युमर्स आणि फ्रॅ गरन्स मॅनेजर्स ह्या क्षेत्रात स्त्रियांना खूपच वाव आहे आणि संधी मिळतातही. हे प्युअर शास्त्र नाही पण रसायन शास्त्राचे पीजी व वरच्या लेव्हलचे ज्ञान आवश्यक आहे. शास्त्रीय ज्ञान व क्रिएटिविटी दोन्ही एकत्र करून रिझल्ट द्यावा लागतो. कामाच्या वेळांचा त्रास फारसा नाही व व्यवस्थापना तर्फे वेळो वेळी रजा, लंचटाइम मध्ये बाळासाठी घरी जाउन येणे वगैरे सुविधा दिल्या जातात.

स्त्रियांच्या कामाची - रिसर्च वर्क ची गुणवत्ता कंपेरेबल असते का पुरुषांच्या कामाशी ? ह्याचे काही आकडे असले तर ते द्या. म्हणजे मुद्द्याला वजन येइल.

पिरिऑडिक टेबल अभ्यासल्यावर मला एक नवा धातू शोधून काढायचा होता. मी त्याचे नावही ठेवले आहे. अ‍ॅशनिअम!!!

मला वरची चर्चा फक्त ' स्त्रियांना शास्त्रज्ञ, संशोधक होण्यात काय अडथळे आहेत' अशीच दिसतेय.
पण 'स्त्रियांनी शास्त्रज्ञ होणे ही काळाची गरज कशी ' याबाबत काहीच चर्चा दिसत नाही आहे.
>>>>>>>>

हो एक्झॅक्टली धाग्याचे शीर्षक वाचून आत प्रवेश केल्यावर मलाही हे जाणवले. स्त्रिया कसे वेगळा विचार घेऊन येऊ शकतात आणि स्त्रियांमध्ये काय वेगळ्या क्वालिटीज असतात ज्या पुरुषांमध्ये तुलनेत कमी वा अभावाने आढळतात आणि ज्या या संशोधनक्षेत्रात गरजेच्या ठरू शकतात वगैरे असेल असे वाटलेले.
अर्थात लेख अजून वाचला नाही, त्याच्यात कदाचित यावरच फोकस असावा.

असो, पण कालच हा धागा बघितला होता पण संशोधनक्षेत्र वगैरे विभाग बघून पटकन चाळायचा मोह झाला नाही.
आज मुद्दाम चर्चा वाचली कारण एका मैत्रीणीने फेसबूकवर हा लेख शेअर केलेला.
तिने शेअर करणे विशेष वाटले कारण, ती स्वता पीएचडी वगैरे केलेली उच्चशिक्षित मुलगी आहे, मध्यंतरी तिला तिच्या एका ड्रीमजॉबची ऑफर होती, पण त्यात तिला देशोदेशी फिरावे लागणार होते आणि घरच्यांनी तिला तो करायला नकार दिला कारण दिड-दोन वर्षांनी तिचे लग्न जमवताना हा अडथळा होईल. तर तिला आता हाच पर्याय उरतो की लवकरात लवकर असा मुलगा शोधून त्याच्याशी लग्न करावे जो तिला हा जॉब करायला परवानगी देईल, म्हणजेच जो आपल्या करीअरशी कॉम्प्रोमाईज करत तिच्याबरोबर देशोदेशी फिरायला तयार होईल.

तर अशी मुले तयार होणे, तयार करणे गरजेचे आहे.
अन्यथा ‘एकटा जीव सदाशिव’ राहणे मुलांना जितके सोपे जाऊ शकते तितके मुलींना जाऊ नये.

स्त्रियांच्या कामाची - रिसर्च वर्क ची गुणवत्ता कंपेरेबल असते का पुरुषांच्या कामाशी ? ह्याचे काही आकडे असले तर ते द्या. म्हणजे मुद्द्याला वजन येइल. >> अतिशय उत्तम प्रश्न !!

भारतातील आकडेवारी माहिती नाही. एन एस एफ फेलोशिप ही अमेरिकेतील एक कव्हेटेड स्कॉलरशिप आहे. पीचडी करणार्‍या आणि पोस्ट-डॉक करणार्‍या लोकांना मिळते. महिलांना आरक्षण इ नसते. गुणवत्ता असेल तर मिळते. सध्या साधारण ५५% महिलांना मिळते. इतर स्कॉलरशिप्स मध्ये अशाच पद्धतीचे प्रमाण आहे. स्त्रिया ह्या स्तरावर अजिबात कमी पडत नाहीत.

ह्यापुढील लेव्हलसचा डेटा उपलब्ध नाही कारण महिलांचे प्रमाण नगण्य आहे. आणि इथे गळतीचे प्रमाण हे का हॉरिबल आहे (किंवा त्यामागची परखड कारणमीमांसा) कुणाला फारसे रूचलेले दिसत नाही. सबब आय विल सेव्ह माय ब्रेथ.

इथे विषयाला धरुन बोला असं म्हणलं जातंय. पण मला वाटतं इथे विषयाला धरुनच बोललं जातंय.
शीर्षक कदाचित थोडं गोंधळात टाकू शकतं. लीलावती, शक्य असेल तर ते बदलून ' संशोधन क्षेत्र आणि स्रीया' असं जनरलाईझड केलं तर या विषयाशी निगडीत सगळ्याच गोष्टींची चर्चा करता येईल.
पण हेडरमधे 'समस्याही बर्‍याच आहेत' असं लिहिलं गेलं आहे, त्यामुळे इथे कोणी समस्या मांडल्या तर हरकत नाही असं मला वाटतं. शिवाय प्रॉब्लेम काय हे पाहणंही गरजेचं आहेच की जेव्हा उपाय शोधावेसे वाटतात तेव्हा. त्यामुळे जर हेल्दी आणि उत्तम चर्चा होत असेल, तर केवळ शीर्षक किंवा त्यापुढे जाऊन लेख हेच प्रमाण मानू नये. तो एक ट्रीगर आहे चर्चा करायला - असं समजून मी इथे लिहायला आले.

गाडी 'घर, संसार, कुटुंब' यापुढे जात नाही हे खरंय - पण आजही 'रेट लिमीटींग स्टेप', किंवा मार्गातले सगळ्यात मोठे स्पीडब्रेकर्स हेच आहेत/ असतात बहुतेकींच्या आयुष्यात. ह्याला वर्षानुवर्षाचं समाजाचं थिंकींग, कंडीशनींग जबाबदार आहे.
स्वेच्छेने आणि गिल्ट वाटून हेही दोन वेगळे घटक आहेत.
स्वेच्छेने म्हणजे अजून १० वर्षांनी मी आपणहून ठरवलं की मला आता काहीतरी वेगळं करायचंय - किंवा संशोधनातलंच काही वेगळं ट्राय करायचंय तर ते स्वेच्छेने / फक्त माझ्या आणि माझ्याच इच्छेने केलेलं असायला हवं.
गिल्ट - ह्यामधे निर्णय जरी मी घेतला असला, तरी तो घ्यायला भाग पाडणारी कारणं असणार. ज्यातलं मुख्य कारण लग्न, मुलं, कुटुंबाची जबाबदारी ह्याकडे होणारं दुर्लक्ष हे आहे. मुळात समाजाने मला ह्या गील्ट्ला फेस करायलाच लावलं नाही, तर कदाचित माझ्यावर असा निर्णय घेण्याची वेळच येणार नाही… पण आजून आपला समाज तिथे पोचायच्या खूप मागे आहे.

आता थोडं स्त्रीयांकडे कोणाते स्कीलसेट्स आहेत ज्यामुळे त्यांनी संशोधनात यायला हवं याबद्दल. जरा शोध घेतल्ता, तर डाटा पण मिळेल, पण हे खालचे विचार अनुभवावर आधारित आहेत -
१) अटेंशन टू डीटेल्स - प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष देण्याची वृत्ती. जी स्रीयांमधे नॅचरलीच असते.
२) निरीक्षणशक्ती - एक एक प्रयोग, म्हणजे एक एक रेसिपीच असते… शास्त्रशुद्ध प्रमाणात, तर्कावर-गृहीतकांवर आधारीत, आणि कंट्रोल्ड कंडीशनमधली रेसिपी. जसं स्वयंपाकातल्या प्रत्येक स्टेपकडे (बदलणारा रंग, सुटलेलं पाणी, आलेला वास) स्रीया बारकाईनं लक्ष देऊ शकतात, तसंच प्रयोगाबाबत असतं.
ही निरीक्षणशक्ती अतिशय महत्वाची आणि याचा खूप चांगला उपयोग होतो संशोधन करताना.
३) संधीचं सोनं करण्याची धडपड - एकूणच मुलींसाठी संधी तितक्या सहज मिळत नाहीत, त्यामुळे जेव्हा त्या मिळतात - तेव्हा मनापासून, पूर्ण डेडिकेशननी काम करतात मुली. कधीकधी 'डीप्राइव्हड' असणं चांगलं असतं असं मला वाटतं - कारण त्यामुळे 'काहीतरी मिळवायची भूक असते', फायर असते. शिवाय अनेक मुलींना परत कोणत्या ना कोणत्या कारणाने ( वर डिसकस झाली आहेत ती कारणं) संधी गेली तर ही मनात शंका/भीती असतेच. त्यामुळे ' हाती असलेला वेळ्/संधी यातुन मॅक्सीमायझेन ऑफ एफर्ट्स ' केलं जातं.

अजून काही मुद्दे नंतर ….
शिवाय स्रीया कुठे कमी पडतात, आणि त्या कशा स्वतःच मार्ग काढू शकतात हा ही एक मुद्दा चर्चा करण्यासारखा.

रार त्यात 'नर्चरिंग अप्रोच' पण घाल. संशोधनात एक एक प्रोजेक्ट त्या त्या वेळच्या डेटानुसार/ गरजेनुसार अडॅप्ट करावा लागतो. इ इ . मेंटरिंग ड्युटीज. इ इ.

एका थोड्या वेगळ्या अँगल ने विचार केला तर - स्त्री ही ब्रेड-विनर नाही हि परिस्थिती बरेच घरात असते. आणि ते संशोधनाच्या जॉब्स मध्ये लिबरेटींग ठरू शकते. पैसे मिळवण्याची सक्ती नाही मग जे पाहिजे ते करा Happy
तसेच प्रत्येक संशोधन शाखेत वेळ-अवेळ करणारे असेल असे नाही (काम १५-१८ तास असते, पण काम घरी ही आणू शकता.) हे फ्लेक्सी अवर्स फार फार मोठा ब्लिस आहे. काम जास्त आहे हे बरोबरच आहे पण तुमच्या तुमच्या शाखेतील काम कसे चालते त्यावर बरेच डिपेंड असते.

गिल्ट - ह्यामधे निर्णय जरी मी घेतला असला, तरी तो घ्यायला भाग पाडणारी कारणं असणार. ज्यातलं मुख्य कारण लग्न, मुलं, कुटुंबाची जबाबदारी ह्याकडे होणारं दुर्लक्ष हे आहे. मुळात समाजाने मला ह्या गील्ट्ला फेस करायलाच लावलं नाही, तर कदाचित माझ्यावर असा निर्णय घेण्याची वेळच येणार नाही… पण आजून आपला समाज तिथे पोचायच्या खूप मागे आहे. >>> गर्ल, अ बिग थँक्यू फॉर क्लॅरिफाईंग दिस!!!

माझ्या आधीच्या पोस्टमधले पुढचे मुद्दे -
४) डायव्हरसीटी इन थॉट्स, विचारातली विविधता - men are from mars, women are from venus ह्या तत्वानुसार एकाद्या गोष्टीकडे पहायचा पूर्णतः वेगळा दृष्टीकोन, पूर्ण वेगळी व्हीजन - ज्याची संशोधनात प्रचंड प्रमाणात गरज असते . शिवाय अनेकदा हायर पोस्टसवर मॅनेजमेंट लेव्हलला निर्णय घेतानाही असते.

सीमंतीनीने सुचवलेले मुद्दे -
५) 'नर्चरिंग अप्रोच' / मेंटरींग ड्युटीज
६) अ‍ॅडाप्टेशन स्कील्स - संशोधनात एक एक प्रोजेक्ट त्या त्या वेळच्या डेटानुसार/ गरजेनुसार अडॅप्ट करावा लागतो.

गर्ल, अ बिग थँक्यू फॉर क्लॅरिफाईंग दिस!!! >> मुळातच मी कधीच माझ्या पोस्ट मधे स्वेच्छेने आणि गिल्ट हे एकत्र केलेलेच नाहीत. किंबहुना स्वेच्छेने हा माझ्या पोस्टमधला शब्द नाहीच Happy

रीस्क मुळे असं म्हणताना मला 'अनेक मुलींना रक्त, बायोलॉजीकल सँपल्स वगैरे पाहून किळस वाटते किंवा चक्कर वगैरे येते' . त्यामुळे त्या आपणहूनच असे फील्ड स्वीकारत नाहीत मुळातच असा मुद्दा होता माझा.

rar,

>> मुळात समाजाने मला ह्या गील्ट्ला फेस करायलाच लावलं नाही, तर कदाचित माझ्यावर असा निर्णय घेण्याची वेळच
>> येणार नाही

या विधानातून स्त्रीच्या आयुष्यावर स्त्रीचं नियंत्रण नसतं असा अर्थ व्यक्त होतोय. स्त्रियांनी समाजाला बगल मारायला काय हरकत आहे?

आ.न.,
-गा.पै.

रार,
<<<मुळातच मी कधीच माझ्या पोस्ट मधे स्वेच्छेने आणि गिल्ट हे एकत्र केलेलेच नाहीत. किंबहुना स्वेच्छेने हा माझ्या पोस्टमधला शब्द नाहीच >>> हे जर मला म्हणत असशील तर,

मी माझ्या पाहिल्या पोस्टमध्ये लिहिलेले शब्द जसेच्या तसे तुझ्या पोस्टमधले होते.
- खूप बायकांची तयारी नसते अशा रिस्क घेण्याची...
- कितीही नाही म्हणलं तरी कुठेतरी 'आपण कुटुंबाला वेळ देत नाही आहोत' हे गिल्ट कुरतडतच.
- त्यामुळे ह्या सगळ्याला लागणारा वेळ, शक्ती, मानसिक इनव्हॉल्व्हंमेंट सांभाळून शिवाय कुटुंब, मुलं, संसार, सामाजिक अ‍ॅक्टीव्हीटीज जमण खरंच तारेवरची कसरत आहे. अगदी नवर्‍याचं, कुटूंबाचं सहाय्य असलं तरीही.
- त्याही पेक्षा खुद्द स्त्रीने स्वतःकडून.

दुसर्‍या पोस्टमधले हे शब्द "स्त्रीने स्वखुशीने/रिस्क किंवा गिल्ट " वरचे मुद्दे परत लिहिण्याऐवजी केलेला छोटा शब्द प्रयोग होता. तुझ्या पोस्टीचा अनर्थ करण्याचा कोणताही हेतू नाही. Happy
माझा मुद्दा पहिल्या पासून (आणि अजूनही) "पहिलं कारण आहेच पण इतरही कारणांचा विचार करा" असा आहे आणि जे मला तुझ्या पोस्टीत दिसलं. (तुझी पहिली पोस्ट येण्याआधी मी इथे काहीही लिहीलं नव्हतं. Happy ) असो.

मी स्वतः एक एक करत बर्‍याच पायर्‍या ओलांडून, बगल मारत मारत पुढे आलेली मुलगी आहे Happy
पण त्यासाठी काही सॅक्रीफायझेस करावेच लागले आहेत. हा मार्ग सरळ नक्कीच नाही.
शिवाय हे एका उडीत जमत नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या पायरीवर आहेत्/ असू शकतात. आणि कोणती मी आधीही लिहिलं आहे की - "ह्या सगळ्या पायर्‍या ओलांडून पलीकडे पोचणं खूप अवघड आहे, पण जमू शकतं त्या त्या पायरीवर डीटरमिनेशन दाखवलं तर. पण फार कमी जणी ह्या सगळ्यापुढे 'टिकाव धरू शकतात' "
कारण एक ह्युमन म्हणून धडपडण्याची कपॅसिटीपण संपू शकते, पेश्न्स संपू शकतो.

एका स्त्रीला पुरुषांच्या लेव्हलला जाणं शक्य आहे. पण त्यासाठी तिला खास प्रयत्न करावे लागतात.
टॉपलेव्हल मॅनेजमेंट किंवा टॉप संशोधक स्त्री ह्या लेव्हलला पोचायचं असेल तर त्याच ' पूल मधल्या पुरुषांच्या पेक्षा उठूअन दिसण्याइतपत जास्त/ अधिक स्कीलसेट, परसनॅलीटी' असलेली स्त्रीच तिथे कॉपीट करून शकते, निदान कन्सीडर होऊ शकते त्या संधीसाठी.

पराग, मी तुला वगैरे म्हणत नाहीये स्पेसीफिकली. जस्ट मुद्दा स्पस्ट करतीये.
सर्व प्रकारचे मुद्दे चर्चेला येणार, त्यामुळे ज्याला जे मुद्दे मांडावेसे वाटतात ते मांडले जावेत. त्यातूनही उत्तम चर्चा होऊ शकते.
आणि तशी ती होत आहे - त्यामुळे 'मी तुला म्हणतीये/ तु मला म्हणतोस' ह्या प्रकारचा गोष्टी नकोच बोलायला इथे Happy
कोणते स्कीलसेट्स हा प्रश्न विचारला गेला नसता, तर कदाचित आपणहून इतक्या पटकन माझ्याकडून किंवा अजून कोणाकडूअन त्यावर लिहिलं गेलं नसतं… Happy

स्त्रीच्या करियरमधला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे फॅमिली , जो पुरुषांच्या करियरमध्ये तेवढा सिव्हियर नसतो. त्यापुढे इतर कारणं फारशी प्रभाव टाकणारी ठरत नाहीत. ( असला तर खुपच नगण्य प्रभाव असेल)
ह्या बाफचं टायटल 'स्त्री शास्त्रज्ञ ही काळाची गरज ' ऐवजी ' स्त्रीला करियरमध्ये समान संधी , काळाची गरज' असं असायला हवं होतं.

ह्या बाफचं टायटल 'स्त्री शास्त्रज्ञ ही काळाची गरज ' ऐवजी ' स्त्रीला करियरमध्ये समान संधी , काळाची गरज' असं असायला हवं होतं.
बरोबर. फार तर कालमानानुसार जास्त स्त्रियांनी संशोधन क्षेत्रात यायला पाहिजे असे म्हणावे.
बाकी अडचणीच सांगायच्या तर कुठलाहि सामाजिक बदल घडायचा तर अडचणी जास्त, उपाय कमी हेच खरे.

एकूणच स्त्रीविषयक प्रश्नांवर जेव्हा जेव्हा चर्चा होते - तेव्हा ' नॉर्मल पेक्षा वेगळं काहीतरी केल्याशिवाय गोष्टी साध्य होत नाहीत' असं दिसून येतं.
म्हणजे 'समाज जसा आहे त्या विचारांपेक्षा वेगळं काही करणारी स्त्री ही कायमच आऊटलायर असते'.
ह्याचाच अर्थ आता ' नॉर्मल बदलण्याची किंवा री-डीफाइन करण्याची वेळ आली आहे' असं नाही का वाटत तुम्हाला?

मला एक आऊटलायर म्हणून नाही तर नॉरमल पॉप्युलेशनचा भाग म्हणून जगायचंय.
का म्हणून मी कायम समाजाला बगल मारत, फाट्यावर मारत जगायचं? असे प्रश्न काही करू पाहणार्‍या, काही बनू पाहणार्‍या, स्वतंत्र विचारांच्या स्रीयांनी विचारले तर काय उत्तर आहे त्यावर आपल्याकडे?

Pages