भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात लोक या उपायांकडे सोपे आयुर्वेदिक उपाय म्हणून पाहतात, पण शेवटी आयुर्वेद हे औषध निर्मितीचे शास्त्रच आहे ना? हे असले सल्ले फिरवून आपणच आयुर्वेदाला चव्हाट्यावर आणून बसवतो आहोत हे लोकांना कळत नाही का?
अलोपॅथी बद्दल असे मेसेज का येत नाहीत?
उद्या डोके दुखत असल्यास xyz टॅबलेट च्या 2 गोळ्या खाऊन झोपावे,
थंडी वाजून ताप येत असल्यास xyz अँटिबायोटिक दिवसातून 3 वेळा घ्यावे
वगैरे फॉरवर्ड आले तर तसे वागाल का?
की अलोपॅथी चे दुष्परिणाम होऊ शकतात, आणि आजीबाईच्या बटव्यातल्या गोष्टींचे दुष्परिणाम होतच नाहीत (कारण त्या रोजच्या वापरातल्या , सीमिंगली निरुपद्रवी गोष्टी आहेत) असे मनावर पक्के ठसले आहे?

विष देखील योग्य प्रमाणात वापरले की औषध असते, आणि औषध अयोग्य प्रकारे वापरले की विष ठरते हे लक्षात ठेवावे.

असो...

>>की अलोपॅथी चे दुष्परिणाम होऊ शकतात, आणि आजीबाईच्या बटव्यातल्या गोष्टींचे दुष्परिणाम होतच नाहीत (कारण त्या रोजच्या वापरातल्या , सीमिंगली निरुपद्रवी गोष्टी आहेत) असे मनावर पक्के ठसले आहे?>> हो असंच आहे. आयुर्वेदावर डोळे झाकून विश्वास.

सिंबा, पण वर कोणीतरी म्हटलंय नैसर्गिक उपचार सरसकट अपायकारक नसतात.
पण कोणते उपाय अपायकारक , खोटे आणि कोणते तसे नाहीत हे शोधायचं कसं?
आता या इतक्या उपचारांचं कॉकटेल आणि भेळ एकत्र करून पाठवणारा कोण हे शोधणं आपल्यासाठी तरी अशक्य असतं. क्वचित कुठेतरी ते पुरणपोळी डाएटसारखे फोन नंबर दिलेले असतात. मग अशावेळी जे लोक हे उपाय सरसकट खोटे आणि टाकाऊ नसतात, असं सांगतात, त्यांचीच ही जबाबदारी आहे, असं माझं मत आहे.

ते होळीत कापूर जाळून स्वाइन फ्लू चे विषाणू जाळून देहभक्ती मेसेज वर अशा गोष्टी पाठवू नका असे मी सांगितले तर माझी मैत्रीण म्हणाली की कापूर हा औषधी असतो, तो जाळल्याने किटाणू मरतात मग त्यात स्वाईन फ्लू चे पण मरतीलच ना! म्हटलं बाई, पोलिओचे डोस नी डासांसाठी फवारणी करणारे मायबाप सरकार कापूर जाळायला होळी साठी थांबले असते का? सगळे डॉक्टर नी वैद्य अजून पर्यंत कापुराचा होम हवन करत बसले नसते का. तर म्हणे धन्य आहेस तू, ते होत नाहीय म्हणून आपणच तर हे काम हाती घेतले पाहिजे ना! जाऊदे, करा होळी कापराची.

लसूण आणि दुध हे काँबिनेशन घेतल्यास सायटिका, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठ, अपचन, सांधेदुखी, मायग्रेन, मुरुमे, रक्त्वाहिन्या मधले ब्लॉकेजेस, कंबरदुखी, कँसर असं सगळं काही बरं होऊ शकते. Rofl

*हार्ट ॲटॅक आल्यास :-

* लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.

हा उपाय कहर आहे म्हज्जे अटॅक आलेला असताना आलेल्याने दवाखान्यात फोन फिरवायच्या ऐवजी तुळशीच्या पानाचा रस काढून तो पिला पाहिजे, आता हार्ट अटॅक काय सांगून येत नाही त्यामुळे २४ तास तर कुणी तुळशीचा रस तयार ठेवणार नाही

तोवर घरातले इतर
इश्श कशाला मेली ती अंबुलन्स बोलवायची म्हणते मी, पटकन आल्याचा तुकडा खिसून देते, टेक वन इंच ऑफ जिंजर अँड किस इट

असला जालीम उपाय केल्यावर हार्ट अटॅक तोंड पाडून परत जातोय का नाय बघाच.
आलेला अटॅक जातो काय अरे, काहीही

आशुचँप, बहुदा तो रस काढणं (पानं चमचाभर घ्यायची, की काढलेला रस चमचाभर झाला पाहिजे? कमी पडला, तर परत पानं घेऊन रस काढणं आलं) , ते आलं किसणं, लिंबू चिरून, पिळणं, मीठ घालून चव बघणं (इथेसुद्धा चवीचा विचार केलाय हे चाणाक्ष हार्ट-अ‍ॅटॅकपटूंच्या लक्षात आलं असेलच), चवीप्रमाणे मीठ अथवा रस, आलं, लिंबू प्रमाण बदलणं वगैरे प्रकारात माणसाला आपल्याला आलेल्या हार्ट अ‍ॅटॅक चा विसर पडत असावा आणी अनुल्लेखानं मारल्यामुळे खट्टु होऊन हार्ट अ‍ॅटॅक आल्या पावली परत जात असावा. Happy Happy

आपल्याला आलेल्या हार्ट अ‍ॅटॅक चा विसर पडत असावा आणी अनुल्लेखानं मारल्यामुळे खट्टु होऊन हार्ट अ‍ॅटॅक आल्या पावली परत जात असावा. Happy>>>> Rofl

“प्राणवायू मंडल”

घरांची रचना बदलली की, तिथे राहणाऱ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतातच. पूर्वीच्या बंगला किंवा वाडा संस्कृतीमध्ये घरांची उंची मर्यादीत होती. प्रदूषण नियंत्रित होते. आणि बांधकामेदेखील पर्यावरणपूरक होती. आता फ्लॅट संस्कृतीमध्ये हे सगळे कठीण झाले आहे. गगनचुंबी इमारतींमध्ये जसजसे उंचावरचे घर बघावे तर, त्या घरात मानसिक-भावनिक समस्या अधिक आढळतात, असे माझे निरीक्षण आहे. याचे कारण म्हणजे आजूबाजूच्या प्रदूषित वातावरणात घरातील oxygenation चा अभाव. अधिकाधिक ठिकाणी हवेचे शुद्धीकरण सतत होण्याची प्रक्रियाच फ्लॅट सिस्टीम मध्ये बंद पडली. वाहनांच्या आवाजांचा, धुळीचा त्रास होऊ नये म्हणून घराच्या खिडक्यांच्या काचा सतत बंद. एसी चालू. श्वसनाचे व्यायामही माणसं काचा बंद करून, एसी लावून करतात. शहराच्या वाढत्या प्रदूषणात जाणीवपूर्वक हिरवे पट्टे आखणे आणि ते टिकवणे कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या जरी सुधारली तरी, आरोग्याच्या दृष्टीने मात्र जीवनशैली खालावली.

यावरील उपाय म्हणजे प्राणवायू मंडल. ही संकल्पना सोपी आहे, सहज करता येण्यासारखी आहे.
आपले घर कितीही लहान असो, घरातील प्रत्येक सदस्याच्या नावे एक तुळशीचे रोप फ्लॅट मध्ये लावावे. एका रोपाद्वारे निदान १०० स्क्वे. फूट जागेला शुद्ध हवेचा निरंतर पुरवठा होत राहतो. म्हणजे १००० स्क्वे. फूटांच्या घरात १० तुळशीची झाडे असायला हवीत. हा प्रयोग मी स्वत: केला आहे व अनेकांना करायला लावला आहे. त्याचे आश्चर्यकारक परिणाम अनुभवायला मिळाले.

1. शुद्ध हवेचे चलन-वलन वाढल्यामुळे श्वसन प्रक्रिया लक्षणीयरित्या सुधारली. रोग प्रतिकारक शक्ती वाढली.
2. Oxygenation मुळे सकारात्मक प्रेरणा वाढली.
3. ताणावर आपोआपच नियंत्रण.
4. वातावरणातली शुद्धता वाढली. अनेक मानसिक समस्यांमध्ये समुपदेशनाबरोबरच हे प्राणवायू मंडल देखील उत्तम उपयुक्त ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेच्या समस्या प्राणवायू मंडलामुळे सुटण्यास मदत झाल्याचा अनुभव मला शेकडो केसेसमध्ये आला.

त्यामुळे गच्चीवरील बाग किंवा खिडकी-बाल्कनीतील बाग असो, त्यात एक प्राणवायू मंडल तयार करावे. तुळस, कोथिंबीर, ओवा, पुदिना आणि गवती चहा यांना आपण ‘प्राणवायू पंचायतन’ असे म्हणायलाही हरकत नाही. तीन ते चार चौरस फूट जागेत हे पंचायतन तयार करता येईल. घरातील खेळती हवा अधिक शुद्ध होत आहे असे जाणवेल.
“अनुभव हीच खात्री”

द्वारा-
मयुरेश डंके
मानसतज्ञ,
जीवनशैली व्यवस्थापन तज्ञ,
संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.<<
हे पूर्ण खोटे नाहीये. आले-लिंबाचे चाटण हा अपचनावरचा तात्पुरता उपाय आहे. बाकी अपचनावरचा जालिम उपाय म्हणजे दिनचर्या व आहार सुधारणे + योग्य व्यायाम हाच असावा.

त्या डंक्यांच्या अनेक पोस्टी फिरतायत सध्या. घरातल सुसंवाद, करीअर गायडन्स व इतर अनेक विषयांवर. नवीन बुवा/ बापू/ महाराज ऑन द ब्लॉक?

सध्या आशीर्वाद कणिक, लक्ष्मी रवा हे पाण्यात भिजवून ते कसे पुर्ण विरघळत नाहीत कारण त्यात बाकी सर्व प्लास्टिक असते असे व्हिडियो फिरत आहेत त्यात कितपत तथ्य आहे ते कुठे शोधावे?<< इतका मूर्ख व्हिडिओ आहे ना तो!

मांडे, रूमाली रोटी हे कधी न पाह्यल्यासारखे करतायत हे लोक. मैद्याचे वैशिष्ट्यच आहे ना हे!

पण तो अ‍ॅटॅक वर सुचवलाय..<< अपचनावरही सुचवलाय. मी तेवढ्यापुरतंच म्हणतेय.

हार्ट अ‍ॅटॅक वरच्या असल्या कुठल्याच उपायांना "कदम कदम बढाये जा!' पेक्षा जास्त किंमत द्यायची गरज नाही

इश्श कशाला मेली ती अंबुलन्स बोलवायची म्हणते मी, पटकन आल्याचा तुकडा खिसून देते, टेक वन इंच ऑफ जिंजर अँड किस इट >>>> कहर आहे हे Rofl

अजून एक

,
.
.
*लसून दुधा मध्ये उकळवून पिण्यामुळे जे झाले ते अद्भुत होते*
लसून फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर शरीरासाठी एक औषधी सारखे कार्य करते. यामध्ये विटामिन, खनिज, फॉस्फोरस, आयरन इत्यादी असते. लसून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जेवणा मध्ये लसणाचा कोणत्याही प्रकारे केलेला वापर शरीरासाठी फायदेशीर असतो. दुध आपल्या शरीरासाठी उपयोगी असते. दुध पिण्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि बोन्स मजबूत होतात. पण जर लसून आपणा दुधामध्ये मिक्स करून सेवन केल्यामुळे याचे फायदे अनेक पटीने जास्त वाढतात.
आजकाल खाण्यापिण्यातील दुर्लक्ष आणि वाईट सवयी यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. आज आम्ही तुम्हाला दुधा सोबत लसून सेवन केल्यामुळे होणाऱ्या 10 मोठ्या फायद्या बद्दल सांगणार आहोत.
आजकाल बहुतेक लोकांचे गुडघे दुखतात, सियाटिकाची समस्या, कधी कधी तर वेदना एवढ्या वाढतात की चालणे फिरणे मुश्कील होते. कधीकधी या वेदनेमुळे गुडघ्यावर सूज येण्याची समस्या होते. पण आज आम्ही तुम्हाला लसून आणि दुधाचा असा उपाय सांगत आहोत ज्याच्या प्रयोगाने गुडघेदुखी, सियाटिका बरे होते, एवढेच नाही तर या उपायाने कोलेस्ट्रोल, बद्धकोष्ठ, कंबरदुखी, कैंसर, अपचन, मुरुमे, हृदय धमनीची ब्लॉकेज आणि माइग्रेन इत्यादी मध्ये आराम मिळतो.
*लसूनवाले दुध बनवण्याची पद्धत*
यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधा मध्ये थोडेसे पाणी आणि लसून पेस्ट टाकावी आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्या अगोदर हे दुध प्यावे. हे पिण्यामुळे कोणकोणते रोग ठीक होतात पाहूया.
*दुध आणि लसून यांचे 10 फायदे*
*सियाटिकाच्या वेदना* : 4 लसून पाकळ्या आणि 200 ml दुध, सर्वात पहिले लसून कापून दुधा मध्ये टाका. दुध काही मिनिट उकळवा. दुध उकळल्या नंतर हे गोड करण्यासाठी यामध्ये थोडे मध मिक्स करा. या दुधाचे रोज सेवन करा जो पर्यंत वेदन बंद होत नाहीत.
*कोलेस्ट्रोल* : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच यामध्ये जमा झालेले कोलेस्ट्रोल संपवण्यास मदत करतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर होते.
*बद्धकोष्ठता* : आयुर्वेदानुसार हे नैसर्गिक पेय दुध आणि लसून चे मिश्रण आतड्यांना सक्रीय करून बद्धकोष्ठची समस्या दूर करतो आणि गुदा मार्गास नरम बनवतो.
*अपचन* : दुध आणि लसून चे मिश्रण पाचक रस निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे एसिडीटी आणि अपचन सारख्या समस्येत फायदा होतो.
*सांधेदुखी* : या दुधा मध्ये शोथरोधी तत्व असतात. ज्यामुळे हे सांधेदुखी मध्ये विशेषतः फायदेशीर असते. जर तुम्हाला गुडघे दुखीची समस्या राहत असेल तर नियमित पणे 1 ग्लास दुधात 3-4 लसून पाकळ्या टाकून उकळवून प्यावे. यामुळे आराम मिळेल.
*माइग्रेन* : माइग्रेन च्या रुग्णांसाठी दुध आणि लसूनचे हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. हे सामान्य डोकेदुखी पासून सुटका देण्यातही गुणकारी आहे.
*चेहऱ्यावरील मुरुमे :* मुरुमांचा त्रास होत असेल तर लसूनवाले दुध पिण्यामुळे फायदा होतो. रोज एक ग्लास लसूनवाले दुध पिण्यामुळे मुरूम पूर्ण निघून जातात.
*हृदय धमनी मधील ब्लोकेज* : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच ब्लोकेज संपवतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर करतो.
*कंबरदुखी* : ज्यालोकान कंबरदुखीची समस्या आहे त्यांच्या साठी लसूनवाले दुध लाभदायक आहे. लसून वेदने पासून मुक्ती देण्यासाठी मदत करतो.
*कैंसर* : भविष्यात कैंसर होऊ नये यासाठी दुध आणि लसून यांचे हे मिश्रण फायदेशीर आहे. हे साधारण त्वचा विकार बरे करते.

डॉ.प्रशांत कुंभार
श्रीक्लिनिक ,आयुर्वेद उपचार केंद्र
सेक्टर३१, वाशी गांव, वाशी , नवीमुंबई

लसूनवाले दुध>>>>>> Uhoh

आयुर्वेद उपचार केंद्र पासुन चार हात लांबच राहिलेले बरे. काल फेबू वर एक पोस्ट फिरत होती. एक महिला बारीक होण्यासाठी आयुर्वेद उपचार केंद्रआत ट्रीटमेंट घेत होती. तिला काढ्यांचे साईड इफेक्ट होउन ती कोमात गेली, स्मृतीभंश झला वै वै

अशा सगळ्या फेकू पोस्ट बद्दल आलेली एक आयुर्वेद MD ची पोस्ट

प्रिय जनता,*
एकवेळ तुम्हि आयुर्वेद चिकित्सा घेऊ नका पण घ्यायचीच असेन तर ती नैचरोपैथी अथवा एन.डि. (Naturopathy Deploma) अशी डिग्री लावलेल्यांकडून तर कधीच घेऊ नका.

आयुर्वेद हे फार खोल शास्र आहे आणि ते नैचरोपैथीपेक्षा खूप खूप वेगळे आहे. हिरवे दिसते म्हणून आयुर्वेद होत नाहि. सैद्धांतिक वापरले नाहि तर साईड इफेक्ट हा होतोच. उपवास बस्ती हे आयुर्वेदाने मोजून मापून सांगितले आहे. कसेहि केले तर अतिरेक होतो. आयुर्वेद शिकायला फुकट ८ वर्ष लागत नसतात.
आयुर्वेदातील सर्वाधिक गैरसमज नैचरोपैथीमुळे आलेत. पाणी ढोसू ढोसू अंग सुजू लागते तरि तहान लागेल तेवढेच पाणी प्या असा सल्ला देणारा वैद्याचा आवाज पोहचत नाहि. मध व गरम पाणी एकत्र स्लो पॉइझन आहे कळेपर्यंत मज्जाक्षय होत आलेला असतो.गूळाने प्रमेह होतो सांगितल्यावर धक्का बसतो, दहि गरम असते विश्वास बसत नाहि, शिळि लाळ चांगली नसते म्हटल्यावर पटत नाहि.

कितीतरि गैरसमज हे नैचरोपैथीची देण आहे. काहि का असेना,

घ्यायचे तर घ्या
पण

*नैचरोपैथी आणि आयुर्वेद हे पूर्ण वेगळे आहेत!*

आणि या न्यूज चॅनेल वर वार्ता हाराणे जो *आयुर्वेद* शब्द वापरला आहे त्याची ABP माझा कडे तक्रार दाखल केली आहे ,आपणही करावी जेणेकरुन त्यांनी लावकर चूक सुधारावी.

एक आयुर्वेद चिकित्सक

खालील व्हिडीओ पहा मग ठरवा

नैसर्गिक उपचारांत कितपत तथ्य आहे, हे कुठे शोधावे?
>>>
Internet whatsapp वगैरेवर वाचले असेल तर ते फेक आहे असे डोळे झाकून समजावे (एर व सेफ साईड).
साधारण आपल्या आज्या/आजीच्या काळात जे घरगुती उपचार केले जात साध्या साध्या आजारावर तितपत उपचार ठीक आहेत हे सेफ अझमप्शन मानायला हरकत नाही. त्यापेक्षा काहीही वेगळे वा विचित्र असेल तर ते इग्नोर करावे, फारच कुतूहल असेल तर डॉक्टरला पैसे देऊन विचारावे.

फारच कुतूहल असेल तर डॉक्टरला पैसे देऊन विचारावे.
<<
कठीण शब्दांचे अर्थ :
१. "डॉक्टरला"
२. "पैसे देऊन"
याबद्दल अधिक माहिती हवी आहे. Lol

***
आपल्या आज्या/आजीच्या काळाबद्दल.

साधारणतः ६० वर्षे = ३ पिढ्या. लिस्टर, फ्लोरेन्स नाइटिंगेल इ. सुमारे २०० वर्षे जुने आहेत. Wink

Did you Know?*

That calling out a person’s name while they are sleeping can cause brain damage to the person.
Instead of calling their name, tap them gently and if they do not respond wait a bit and tap them later.

*Do not call out a person’s name while they are sleeping*
Because their adrenaline can shot up causing fear and panic which can cause *Brain Damage*

From: World Health Organization Courtesy: LUTH
Please Forward to friends and Family
https://www.hoax-slayer.net/calling-a-sleeping-persons-name-will-not-cau...

माझ्या माहितीतल्या एक आजी आणि त्यांची मोलकरीण दोघीही स्मार्टफोन वापरत नाहीत. पण झोपलेल्याला हाका मारून उठवू नये, याबद्दल त्यांचं एकमत आहे. मात्र त्याचा संबंध आत्म्याशी आहे, असं कानावर पडलं.

मला आज हे नॉन्सेन्स वाचायला मिळालं आणि मी भयंकर अचंबित झाले. आता टाटा हॉस्पिटलात गोठे का नसावेत? किंवा ह्या बातमीतल्या हॉस्पिटलमधली ट्रिटमेंट टाटामध्ये का देण्यात येत नसावी ह्याचं उत्तर शोधतेय.
https://www.google.com/amp/www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-...

https://m.huffingtonpost.in/amit-vaidya/100-guaranteed-cure-for-cancer-i...

अमित वैद्य ची मुलाखत, त्यात तो धड स्वीकार करत नाहीये, धड फेटाळून लावत नाहीये, पण त्याने मेडिकल रेकॉर्ड लोकांना दाखवण्याचे टाळले यातच सगळे आले, असे मला वाटते.
सायो ने दिलेले ओरिजिनल पोस्ट काना मात्र चा फरक न करता wire, scroll पासून सगळ्या न्यूज पेपर मध्ये आले आहे.
लुक्स लाईक , सिनक्रोनाईझड effort

*कलियुगाचे चालक मालक पालक परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन.

आपण सर्व भाविकहि छोट्या मोठ्या समस्यांमुळे काही सेवा करत असतो. उपासना करत असतो.
त्या अंतर्गत *आपले सद्गुरु आपल्याला काही मंत्र पठण करवयास सांगतात. ते स्तोत्र, मंत्र, उतारे, तोडगे करत असताना मनात श्रद्धा भाव हा खुप महत्वाचा असतो.*

पण काही लोक त्याला अंधश्रद्धेचे नाव देऊन ढोंग ठरविण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ही हळू हळू त्यांच्या बोलण्याने भुलु लागतो. पण आपण हे विसरतो की आपल्या ऋषि मुनी यांनी निर्मित केलेले हे सर्व स्तोत्र मन्त्र यांना केवळ आध्यात्मिक कारण नसून एक वैज्ञानिक पार्श्वभूमी ही असते.
ती समजून घेतली तर आपल्या हजारो लाखो वर्षाचा इतिहास असलेल्या हिन्दू धर्माचा अभिमान तर वाटेलच, पण आपण करत असलेली सेवा ही लवकर फलद्रुप होईल व देवाला न मानणाऱ्या लोकांना सडतोड़ उत्तर देता येईल. त्याचसाठी आपण आज काहि मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण करणार आहोत.

*ऐक्य मंत्र* :- ऐक्य मंत्राच्या पठणाने ओक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते.

*नवार्णव मंत्र* :- मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. नऊ अक्षरांचा या मध्ये समावेश आहे.
मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा active होतात.
*रामरक्षा स्तोत्रातील 'र ' च्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम balance होते.*

*गायत्री मंत्र* :- गायत्री मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स (Epinopnrins) नावाचे हार्मोन तयार होते. रोग प्रतिकारक शक्तीची वाढ होते.

*कालभैरावाष्टक* :- कालभैरावाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे vibrations तयार होते त्यामुळे आपले ३ इंच पर्यंत संरक्षण होते. 
मुलांनी गंध टिळा लावल्याने भृकुटीमध्या वरील आज्ञाचक्र active होतात.

*प्रज्ञाविवर्धन स्तोत्र* :- याच्या पठणाने पिनियल gland ला धक्का बसून मेमरी चार्जेस ची निर्मिती होते. स्मृतीभ्रंश चे आजार होत नाहीत.

*सरस्वती मंत्र , सुर्य मंत्र , गणपतीअथर्वशीर्ष* :- मेंदू मध्ये cortex नावाचा भाग असतो त्यात Cortizone नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धीमत्तेत वाढ होते सदबुद्धी वाढते.

*विद्याप्राप्तीकारक स्तोत्र* :- या स्तोत्राच्या पठणाने DHA नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोन मुळे होतो. 

*दत्त महाराजांचा मंत्र* :- *"द्रां "* हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने (सेल टिश्यू फॉरमेशन ) cell tissue formation चे काम प्रॉपर होते (जखम भरून येण्याचे काम ).

*शाबरीमंत्र* :-Dopamine हार्मोनची निर्मिती होते. विशेष महत्वाचे म्हणजे या हार्मोनचा balance राखला जातो. जर हार्मोन वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्य. 

*ॐ श्री स्वामी समर्थ

Pages