भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे ब्रेन डॅमेज चे काय नवीन?8 च्या बस ला 7.25 झाला तरी न उठणाऱ्या मुलांना हाका मारूनच उठवावं लागतं. उलट अचानक टॅप केल्याने दचकण्याची शक्यता वाढेल

वरचा अमित वैद्य यांचा लेख भंकस आहे. मुळात allopathy हा शब्दच चुकिचा आहे. एखादा कुडमुडया ज्योतिषी "तुमचा गुरु उच्चीचा आहे त्यामुळे भरभराट होईल पण शनीची वक्र दृष्टी असल्याने पैसा टिकणार नही, बुध असल्याने आपलेच लोक फसवतील". ई ई गोल गोल असते तसा लेख.

आज आलेली नाविन्यपुर्ण पोष्ट ..

*ढोल वाजवताय.....महिला व मुली सावध व्हा*
मोठ्या जोशात पारंपरिक ढोल-ताशा वाजवणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवजड ढोल तासन्‌तास कंबरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचण येत असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
ढोलाचे वजन व वाजवताना गर्भपिशवीला बसणारे हादरे, धक्के यामुळे पिशवी कमकुवत होऊन गर्भधारणेस सक्षम रहात नसल्याचेे स्पष्ट होत आहे. मुलींनी व पालकांनी यावर विचार करण्याची वेळ आली‌ आहे.
*पटल्यास तुमच्या मिञ मैञिणींना अवश्य शेअर करा*

हसण्यावारी नेऊ नका. खरे आहे हे.

यावर उपाय म्हणून ढेरीवाल्या पुरुषांनी महिलां समोर उभे राहून आपल्या ढेरीचा नगारा अर्पण करावा, तो बडवल्याने महिलांनाही कसला धोका नाही आणि पुरूषांची ढेरीही मर्यादीत रहाते असे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे.

हयात ऐक नाजूक भाग आहे.
काही माहिती ही प्रयोग करून सिद्ध झाली आहे
आणि काही माहिती ही हजारो वर्षाच्या अनुभवा मधून मिळाली आहे .
त्या मुळे सर्रास अनुभवा वरून असलेली माहिती चुकीची आहे आस म्हणता येणार नाही

Rajesh,
हल्ली गल्लो गल्ली इन्फरतीलिटी क्लीनिकस झाली आहेत,
तिकडे कोणी असा सर्वे केला आहे का? की किती जोडपी उपचारास येतात, त्यात अमूक% बायकांमध्ये दोष निघाला,
तमूक% बायका ढोल पथकात होत्या, आणि ढमुक % बायकांमध्ये असलेला दोष ढोलाच्या वजनाने, हालचालीने होऊ शकतो?

असा काही सॉलिड डेटा असेल तर >>>>>अनुभवा वरून असलेली माहिती >>>> या वाक्याला अर्थ राहतो

For exa
हळदी चे गुण .
कडुनिंब चे गुण
बस दोनच उदाहरण देतो हे अनुभवातून आलेली माहिती आहे

अनेक वेट लिफ्टर महिला आणि बॉक्सिंग चैंपियन महिला सुदृढ़ अपत्य निर्मितीसाठी सक्षम असतात ह्यावरून एवढासा ढोल उचलून काही हां दोष उत्पन्न होत असेल असे वाटत नाही.

मात्र चुकीचा आहार अणि सवयी म्हणजेच जंक फूड्स, गरम पदार्थांचे प्लास्टिक कन्टेनरमधून सेवन वगैरे बाबीनी असे वंध्यत्वाचे प्रमाण वाढीस लागू शकते. शिवाय आजकालचा उशिरा लग्न करण्याचा ट्रेंड हां फॅक्टर अधिक इम्पैक्ट करणारा आहे.

One common chemical that is used when creating polycarbonate plastic and epoxy resins is bisphenol A, more commonly known as BPA.
It can affect women both when they’re trying to get pregnant and have negative effects on their baby, once they are.
‘Over the last few years there has been a great deal of interest among both health experts and the general public regarding the potential risks of plastics in daily life, particularly during pregnancy,’ gynaecologist Dr Anne Henderson from Doctify, tells Metro.co.uk.
‘The key focus has been around certain chemicals called phthalates such as BPA (bisphenol A), which are used during the manufacture of plastic products to make them more flexible and softer.
‘The mechanism of entry to the body is not entirely clear, but it is thought that minute amounts of these chemicals can leach into fluids, for example, from bottles containing water and other fluids, and are thus ingested.
‘Exposure to BPA may affect the human reproduction system, particularly in women, by affecting the number of follicles which result in the formation of mature eggs which can then ovulate and be fertilised.
‘There is additional evidence that maturation of follicles becomes abnormal resulting in an increased risk of chromosomal defects, such as Down’s syndrome. The mechanism of action is not fully understood but BPA is thought to have a possible oestrogen-like impact on both men and women.’

अनेक वेट लिफ्टर महिला आणि बॉक्सिंग चैंपियन महिला सुदृढ़ अपत्य निर्मितीसाठी सक्षम असतात
पण स्त्री खेळाडू मध्ये स्त्रीत्वाचे प्रमाण कमी होते आणि पुरुषी स्वभाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात ह्या मध्ये काही सत्य आहे का .

स्त्री खेळाडू मध्ये स्त्रीत्वाचे प्रमाण कमी होवून पुरुषी स्वभाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढत नाहीत

अपवाद - कुठलाही व्यायाम अणि क्रीड़ा प्रकार निसर्गनियमाच्या विरुद्ध जात स्टिरॉइड्स वापरत तो किंवा ती खेळाडू विकसित करण्यात आली असेल.

Social media मधून आलेले कोणतेही आरोग्य विषय असलेले मेसेज गंभीर पण घेतले नाही पाहिजेत .
हे वाईट किंवा हे चांगलं हे स्वतः ठरवणे बुध्दीचा वापर करून आणि सर्व शक्यता विचारात घेवून

हयात ऐक नाजूक भाग आहे.
काही माहिती ही प्रयोग करून सिद्ध झाली आहे
आणि काही माहिती ही हजारो वर्षाच्या अनुभवा मधून मिळाली आहे .
त्या मुळे सर्रास अनुभवा वरून असलेली माहिती चुकीची आहे आस म्हणता येणार नाही

<<

This kind of thought process is seen in the antivaxxers.

IMO, They should not reproduce.

"हळदी चे गुण .
कडुनिंब चे गुण
बस दोनच उदाहरण देतो हे अनुभवातून आलेली माहिती आहे" - ही अ‍ॅनलॉजी, ढोल वाजवून वंध्यत्व येणार्या स्त्रीयांच्या बाबतीत कशी लागू पडते? मुळातच अ‍ॅनलॉजी वादातला मुद्दा सोडून काहीही सिद्ध करत नाही (अध्यात्मिक पब्लिक बरेच वेळा हा प्रकार करतात. असो). त्यातून, हळदीचे आणी कडुनिंबाचे जे काही गुण-दोष असतील, हे प्रयोग-सिद्ध आहेत. अनुभव-सिद्ध च्या आर्ग्युमेंट चा विचार करायचा झाला तर, अनेक वर्ष लोक रक्त आल्यावर हळद लावणे वगैरे प्रकार करताहेत. तसं वर्षानु-वर्षं बायका ढोल वाजवून वंध्यत्व प्राप्त करून घेतायत असा काही डेटा आहे का?

*हातातील चुंबकीय शक्ती*

निसर्गाने माणसाला दोन हात दिले आहेत. शरीर शास्त्राच्या चुंबकीय शक्तीचा विचार केला असता डाव्या हाताचा पंजा हा उत्तर ध्रुव म्हणजे ऋण भार व उजव्या हाताचा पंजा हा दक्षिण ध्रुव म्हणजे धन भार असतो. ह्याचा उपयोग आपले शरीर स्वास्थ नीट करण्याकरता वापरता येतो.

*प्रथम दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासून भारीत करून घ्यावेत व पुढील प्रमाणे वापरावेत*

卐 डोके दुखणे -> आपला डावा हात डोक्यावर व उजवा हात मानेवर १५ मिनिट (घड्याळ लावून ) ठेवला तर डोके दुखायचे थांबते व मान दुखू लागते. नंतर डावा हात मानेवर व उजवा हात उजव्या बरगडी खाली लिव्हरवर १० मिनिट ठेवला तर मान दुखणे थांबते व आपण मोकळे होतो.

卐 छातीत दुखणे- (हार्टअॅटॅक सुध्दा) पोटातील गॅस छातीत प्रेशर देऊ लागले कि छातीत दुखते (हार्टअॅटॅक) येतो. अशा वेळी डावा हात डाव्या बरगडीखाली (स्प्लिनवर) आणि उजवा हात उजव्या बरगडीखाली(लिव्हरवर)१५ मिनिटे ठेवला तर पोटातील गॅसेस बाहेर पडतात व छातीत दुखायचे थांबते.

卐 दमा -> दमेकऱ्याला अँटॅक आला की श्वास घ्यायला त्रास होतो. अशा वेळी उजवा हात गळ्याला खळगा असतो तेथे व त्याखाली एक वीत अंतरावर डावा हात १५ मिनिटे धरला तर धाप कमी होते.

卐 मूल एक वर्षाचे होई पर्यंत शी बिघडली किंवा झालीच नाही तर आई किंवा वडील किंवा कोणी मोठ्यांनी त्यांचा डावा हात बाळाचे बेंबीवर व उजवा हात बाळाचे पाठीला असे १५ मिनिट धरले तर शी सुधारते. बाळाची तब्बेत ठीक राहण्यासाठी असे रोज करावे.

卐 जेवणानंतर पोटावर म्हणजे बेंबी व बरगडी यांचे मध्ये उजवा हात १५ मिनिटे ठेवला तर अन्न नीट पचते. हे वयस्कर लोकांना फार उपयोगी आहे.

卐 पाळीला पोटात दुखत असेल तर ओटीपोटावर दुखणाऱ्या जागी डावा हात व मागे माकडहाडावर उजवा हात असे १५ मिनिटे धरले तर पोटात दुखणे कमी होते.

卐 पीसीओडी साठी स्त्रीयांनी ओटीपोटावर डावा हात व मागे माकडहाडावर उजवा हात १५ मिनिटे ठेवावे. असे २-३ महिने करावे.

卐 डोळ्यांच्या त्रासासाठी हात एकमेकांवर घासून डोळ्यावर ठेवले असता फायदा होतो. नंबर कमी होण्याची शक्यता.

卐 नाकातील हाड वाढले असेल तर डावा हात भूमध्यावर व उजवा हात डोक्याला मागील बाजूस १५ मिनिटे धरावेत. हे दिवसातून दोन तीन वेळा करावे.

卐 कान दुखत असेल तर दुखणाऱ्या कानावर डावा हात व दुसऱ्या कानावर उजवा हात १५ मिनिटे धरावा. ह्यामुळे कानात सतत येणार्या आवाजाचा त्रास पण कमी होतो.

卐 गुडघा दुखत असेल तर गुडघ्याला एका बाजूस डावा हात व दुसऱ्या बाजूस उजवा हात असे १५-१५ मिनिटे दिवसातून २-३ वेळा ठेवावेत. गुडघ्याला सूज असेल तर डावा हात सुजेवर व उजवा हात तळपायाला १५ मिनिटे लावावा व नंतर तळपाय पाण्याने धुवावा.

卐 मनात वाईट विचार येणे, वाईट स्वप्ने पडणे ह्यासाठी दोन्ही हात एकमेकांवर घासून उजवा हात अनाहत चक्रावर ठेवावा.

卐 थायराँईडसाठी गळ्याला डाव्या बाजूने डावा हात व उजव्या बाजूने उजवा हात १५मिनीटे असे धरावेत. असे सकाळ संध्याकाळ धरणे आवश्यक आहे. असे तीन ,चार महीने करावे लागते.

वरील उपचार करताना पेशंटला स्वतः हात ठेवणे शक्य नसल्यास इतर प्रौढ व्यक्तीने हात ठेवावेत.

*प्रथम दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासून भारीत करून घ्यावेत*

-

<आपला डावा हात डोक्यावर व उजवा हात मानेवर १५ मिनिट (घड्याळ लावून ) ठेवला तर डोके दुखायचे थांबते व मान दुखू लागते. नंतर डावा हात मानेवर व उजवा हात उजव्या बरगडी खाली लिव्हरवर १० मिनिट ठेवला तर मान दुखणे थांबते व आपण मोकळे होतो.>

असं केल्याने हात दुखायला लागतील, त्यासाठी कुठे काय ठेवायचं?

मानवी होकायंत्र:
जर तुम्ही कुठल्या निर्जन स्थानी, समुद्रात बोटीवर, अथवा आकाशात विमानात अडकलेले असाल आणि तुम्हाला दिशा ओळखायची असेल तर दोन्ही हात लांब करून एक पाय दुमडून दुसऱ्या पायाच्या टाचेवर उभे रहा. तुम्ही आपोआप गोल फिराल आणि तुमचा डावा हात पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाकडे तर उजवा हात पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे स्थीर होईल. तुमचे तोंड आता पश्चिमेकडे आहे आणि पाठ पूर्वेकडे.

(तुम्ही डावखुरे असाल तर तोंड पूर्वेकडे आणि पाठ पश्चिमेकडे)

होकायंत्र पोस्ट अत्यंत भंपक वाटते आहे.
पाय मुरगळणं किंवा नाकावर पडणं यातलं एक होईल.
कोणी निर्जन बेटावर गेलं तर कृपया कन्फर्म करून इथे लिहा.

कोणी निर्जन बेटावर गेलं तर कृपया कन्फर्म करून इथे लिहा.>>>>>>
नको ,त्यापेक्षा
>>>>अथवा आकाशात विमानात अडकलेले असाल >>>
यात करून पाहा,

हवाई सुंदरी ला सांगा, मी जरा दिशा चेक करतो, मग पायलट ला क्रॉस चेक करायला सांग

समुद्रात बोट व आकाशात विमान ह्या दोन्ही ठिकाणी अडकलातच चुकून (ही दोन्ही वाहने हायजॅक झाली तरच हे शक्य आहे)... तर दिशा जाणून काय करणार आहात? त्या दिशेने धावत सुटणार का, पाण्यातून व हवेतून?

卐 छातीत दुखणे- (हार्टअॅटॅक सुध्दा) पोटातील गॅस छातीत प्रेशर देऊ लागले कि छातीत दुखते (हार्टअॅटॅक) येतो. अशा वेळी डावा हात डाव्या बरगडीखाली (स्प्लिनवर) आणि उजवा हात उजव्या बरगडीखाली(लिव्हरवर)१५ मिनिटे ठेवला तर पोटातील गॅसेस बाहेर पडतात व छातीत दुखायचे थांबते.
<<
याला नक्की १३ बरगड्या एका साईडला असणारेत. आमच्या खानदेशात 'एक्स्ट्रा पसली' असा एक इन्स्ल्ट प्रचलित आहे. "याला १३ बरगड्या आहेत" याचा अर्थ, जरा 'जास्तच' अक्कल आहे असा होतो.

आता याच्या नक्की कोणत्या बरगडीखाली हात ठेवायचा ते बघायला हवे. पण ते ही असोच.

यांचा लोचा बेसिक मधेच आहे. पोटात गॅस झाले = हार्ट अ‍ॅटॅक, या प्रचण्ड अकलेसमोर माझा तरी साष्टांग प्रणिपात.

आपल्या मायबोलीवरील डॉक्टर लोकांनी या "गॅस म्हणजेच हार्‍ट अ‍ॅटॅक" बद्दल इथे लिहावे अशी विनंती करतो.

रच्याकने. स्वस्तिकाबद्दल अभिनंदन.

रच्याकने.

हार्‍ट
<<

ह्या प्रकारे र अन ट यांचे जोडाक्षर मराठीत इतरत्र कुठे वापरतात ते कृपया कुणी सांगितलेत तर बरे होइल.

र्ट, ट्र हे दोन माहित होते. र्‍ट मला तरी नवा आहे.

(पाव भारी तसा हाथ भारी)

Rofl

अहो, पाँव भारी = प्रेग्नन्सी होते हो 13.gif

हाथ भारी झाल्यावर काय म्हणावं? Lol

होकायंत्र पोस्ट अत्यंत भंपक वाटते आहे.>>
सुचलेली आहे ती.
मला वाटलं हे तेवढं साहजिक वाटेल.
क्षमा असावी.

Pages