भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Warning from Indian Oil !!!.>>>>>>>>>
हे लोक्/कंपन्या सरकारी अधिक्रुत वेब वर प्रकाषित करायचे सोडुन व्हत्सप्प वर का टाकतिल?

Paracetamol मध्ये virus हे ऐकुन काय बोलावे हेच क्ळेना...
virus can't survive outside human body for long time... हे जर नसते तर आज दुनियाच नसति....

Drinking Warm Water बद्दल बोलायचे तर मागे एक expert सांगत होता टिव्ही वर कि गरम चहा सुध्दा पिऊ नये कोलोनल कन्सर होतो त्यामुले... ख.खो.दे.जा.
एकुन काय तर वरिल forwords पाहता आपन verify करुनच forword करावे हेची बरे...
कारण दुनिया मंगळावर गेलि तरि खुद्द अमेरिकेतिल काहि लोक माणुस चंद्रावर गेलाच नाहि असा दावा करतात youtube वर तेसे video देखिल टाकतात..

आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा अंतराने घेतलेले थोडे पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे ? तसेच आहे.
<<
Rofl

तेज सबसे तेज हा प्रकार जगात सगळि कडे चालु आहे..
आपल्या साऱखे लोक verify प्रत्येक वेळि करु शकत नाहित.. पन पत्रकार हि हिन पातळि वर जाऊन एखदी अफवा बातमि म्हनुन प्रसारित करतात... पन उघडे पदल्यावर माफि हि मागत नाहित...
हा एक प्रकार.. आपनाला हि माहित असेलच...

लंच ब्रेक में की इस युवक ने ट्रेडिंग, शेयर मार्केट से कमाए 457 करोड़ रु...

http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:ETi4wNqhxKgJ:money....

http://news.jagranjunction.com/2014/12/15/mohammed-islam-school-student-...

https://www.rt.com/business/214451-student-72-millions-dollars/

पण हर असले fwd, कंपोज कोण करते?
उदा वरचा आचमन fwd,
त्यात कोणाचा फायदा होण्या साठी कोणाचा नाव नम्बर नाही,
एकंदर प्रकार इतका शेंडा बुडखा नसलेला आहे, कि बाकी कोणाचा फायदा होण्याचा संभव नाही,
मग मुद्दामहून कोणी हा मेसेज कंपोज करून टाइप करून पाठवायचे कष्ट का घेतले?

फायदा कसा नाही, ब्राह्मण कसे हुशार होते आणि किती दूरदृष्टीचे होते हा मेसेज गेला ना.
आता त्याला शेंडा बुडखा नाहीये हे चिकित्सा केल्यावर कळते, पण तितका वेळ आहे कुणाला.
सध्या पूर्वीचे कसे चांगले आणि आत्ताचे कसे वाईट हा ट्रेंड जोमात आहे.
त्यातलाच एक कहर होता
पूर्वी लोक घरी जेवत आणि संडास ला बाहेर जात, म्हणून ते निरोगी राहत
आता लोक बाहेर जेवतात आणि घरी संडासला येतात म्हणून रोग होतात.

हरलोच मी हे वाचल्यावर

आशुचँप Lol
असे निर्बुद्ध फॉरवर्ड्स भक्तीभावाने पुढे ढकलणारी मंडळी अगणित आहेत पण हे मुळात येतात कुठून? म्हणजे पेपरातून कुणी कॉपी पेस्ट करतं की मायबोलीसारख्या बाकी साईट्सवरुन वगैरे?

आपली कुठलीही पोस्ट इंटर नेट वर आली कि ती आपल्यापुरता वैयक्तिक मालकीची राहत नाही. आणि अश्या आपल्या एकदंर सर्व पोस्टचा विचार करता आपली एक इंटर नेट वरील स्वत:ची ओळख बनते (अर्थात यांत्रिकपणे) आणि मग मी ज्या प्रकारच्या पोस्ट करत राहतो त्याच अनुषंगाने मला माझ्या फेसबुक वगैरे प्रोफाईल मध्ये जाहिराती दिसू लागतात. म्हणजेच मी शेती विषयक माहिती पोस्ट करत असेन तर मला विविध शेतकी कंपन्यांची अवजारे इत्यादी विक्रीच्या जाहिराती येवून आदळत राहणार. तेच तर मी अश्लील साहित्य / पेज लाईक करत असेन तर मला त्या अनुषंगाने घाणेरड्या जाहिराती दिसणार.
आणि ह्या सर्वांचा रेकोर्ड जागतिक स्तरावर ठेवला जात असतो योग्य वेळ येता त्या त्या देशाच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी ....

हि असली फोरवर्ड पाठवणे हा सुद्धा असाच एक प्रकार आहे ज्यात किती प्रमाणात आणि किती वेळात असले मेसेज पुढे सरकतात ह्याचा अभ्यास केला जातो ...ज्याचा उपयोग फार भयंकर मार्गाने आपत्कालीन स्थितीत अफवा पसरवायला किंवा तशी स्थिती निर्माण करायला काही समुदाय करत असतात.

सोशल मीडियामुळे ज्या समूहांना आजवर आवाज नव्हता त्यांना एक मोठा आउटलेट या निमित्ताने मिळाला आहे. संवाद अधिक वेगात सहज होऊ लागलाय. अर्धवट ज्ञान नेहमी घातक असते, या आशयाची इंग्रजी म्हण आहे. अनेकदा पटकन माहिती शेअर करण्याच्या नादात चुकीची माहिती शेअर केली जाते. हा सोशल नेटवर्किंगचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. अनेकदा जाती- धर्मांचे ग्रुप्स तयार केले जातात, त्यामध्ये वादग्रस्त मेसेजेस शेअर करून तरुणांना भडकवले जाते. काही तरुण त्याला बळी पडतात. अतिरेकी संघटनासुध्दा याच माध्यमांचा वापर करुन आपली ताकद वाढवत आहेत. ह्या मध्यामांवरून अनेकदा फक्त टोकाच्या भूमिका पसरवल्या जातात.

जेव्हा धर्म जात ह्या गोष्टी घराबाहेर पडतात तेव्हा त्याचा राजकारण होतं. उगाच उठवलेल्या प्रत्येक अफवांवर आणि विधानांवर मला वक्तव्य द्यायची गरज नाही. सोशल मीडिया चा उपयोग बऱ्याच चांगल्या गोष्टींकरता आपल्याला करता येऊ शकतो आणि आपण तो केला पाहिजे.

कालपासुन खालचा मेसेज सारखा फिरतोय वेगवेगळ्या ग्रुपवर

नुसते बेंबीत तेल टाकण्याचे कितीतरी फायदे दिलेत >>>>>>>

नाभी आणि सौंदर्य
कमी खर्चात घरगुती प्राचीन उपचार.विश्वास नाही बसणार,पण एक वेळ पंधरा दिवस करूनच पहा.मग खात्री होईल,विश्वास बसेल.
गुडघेदुखी , सर्दीपडसे तसेच त्वचाविकार. यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीजवळ वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारीक फायदे दिसतात. ही तेले नेहमी आपल्याकडे असतात. पण बेंबी मध्ये दोन तीन थेंब टाकून, बेंबीच्या जवळ फक्त दोन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार चुटकीसरशी दूर होऊ शकतात. मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात त्याची माहिती फारशी कुणाला नसते. त्यासाठीच हा प्रयत्न.

1)सांधेदुखी असेल, ओठ फाटले असतील तर सरसोंचे तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावेत,दोन थेंब बेंबीजवळ लावायचे. हा उपाय करताना थोडा चमत्कारीक वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे.
त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटणे कायमचे बरे होईल.

2)सर्दी-पडसे तर कधीही होते. काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही. पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये (homeopathy remedies)बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा.सर्दीपडशावर हा रामबाण इलाज आहे. करून पहाच एकदा. जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपायाने बरी होईल.

3) मुलगी असो की मुलं.
तारुण्यात चेहऱ्यावर मुरुमे येणं ठरलेलं आहे. फार त्रास होतो त्यावेळी. पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोडय़ा थेंबांनी बेंबीभोवती मालीश करा. यामुळे मुरुमे तर गायब होतीलच, पण त्याबरोबरच त्वचाही डागविरहीत आणि सुंदर दिसू लागेल.

4). चेहरा स्वच्छ, चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडतात. पण त्यावरही सोप्पा उपाय करून पाहा. बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब टाकून,काहीथेंब बेंबीतबेंबीभोवती लावून पहा. झटपट परिणाम दिसेल.चेहरा चमकदार दिसेलच, पण रंगही उजळेल.

5) एवढेच कशाला, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टका,काही थेंब बेंबीजवळ लावून हळुवार हाताने मसाज करायचा. या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणताही विकार असेल तर तो बरा होईल.

6)त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान ,देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब बेंबीत टाकून,काही थेंब बेंबीजवळ लावायचे.त्वचा अगदी छोटय़ा बाळासारखी मऊ होईल. माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ बेंबीशी संलग्न असते. त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो.

ही माहिती खूप उपयुक्त आहे.यातील कोणाला कोणता फायदा होईल हे सांगता येणार नाही .वात, पित्त, कफ या त्रिदोष प्रकृती वर या गोष्टी अवलंबून आहेत.तरीही नाभी उपचार पद्धती ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे.अवश्य करून पाहा.या बाबी किरकोळ समजून दुर्लक्ष करू नका.अनुभव घ्या.खात्री झाल्यावर दुसऱ्याला सांगण्याचे कष्ट घ्या.

संकलन----------------------हरिश्चंद्र बबनराव साळुंके . नाभी चिकित्सक, निसर्गोपचार तज्ञ . मु केम ता करमाळा ,सोलापूर., whatsap7588046892 ,9011569059

हा मेसेज सर्वाना पाठवा.यामुळे एखाद्याचे जीवनात आनंद येईल.एखाद्याचा चेहरा खुलेल. एखाद्याचे चेहऱ्याचे तेज वाढेल.एखाद्या मायमाऊलीला चालता येईल.या सर्वांचे आशीर्वाद तुम्हा आम्हाला मिळतील. तेव्हा हा मेसेज सर्वाना पाठवा.ही विनंती.<<<<<

Just for information ..... Fb forward
.
.
.

चंद्रग्रहणाच्या निमीत्ताने एक वेगळीच गोष्ट समजली..माझ्याकडे दोन पाण्याच्या बाटल्या होत्या..ग्रहणापूर्वी एक तास एकाच कंटेनरमधून भरलेल्या..पाणी अल्कलाईन होते. 9.2 pH व्हॅल्यूचे. त्याचा TDS 90 होता. नि ORP व्हॅल्यू होती - 300. मी फोटोग्राफीसाठी प्रवासात होतो. पैकी एक बाटली गाडीत वरचेवर होती नि दुसरी बाटली पिशवीत होती..ग्रहण संपल्यानंतर सहजच शंका म्हणून दोन्ही बाटल्यामधील पाणी पुन्हा तपासले.जी बाटली झाकून ठेवली नव्हती.. TDS सोडून दोन्ही व्हॅल्यू चेंज झाल्या होत्या...अल्कलाईन पाण्याचे रूपांतर बेसिक वाॅटरमध्ये झाले होते....
प्रेगनंट महिलेच्या पोटातील पाण्याची pH व्हॅल्यू असते 8.5.. कदाचीच ते पाणी ग्रहणामूळे बदलले तर.? बाळामध्ये काहीतरी व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते
अशाच काहीशा सुक्ष्म गोष्टींमूळे..पुर्वी गरोदर महिलांनी ग्रहण पाळावे, ग्रहणानंतर जूने पाणि ओतून द्यावे, नविन भरावे, काहीही खाऊ नये वैगरे नियम पुर्वजांनी करून ठेवले असावेत..
म्हणजे आमच्या पुर्वजांचा आभ्यास किती सखोल होता ना.....

श्री हेमंत केंजळे फेसबुकवरुन साभार

हेमंत केंजळे>>>>>
एक तर रोजच्या पिण्यासाठी बाटल्या भरल्यावर या सगळ्या व्हॅल्यू मोजणे हे विचित्र आहे,

दुसरे, पिशवीत असलेले पाणी सेफ राहते, मग बाईच्या पोटात असलेले पाणी का बदलेल?

पिशवीत असलेले पाणी सेफ राहते, मग बाईच्या पोटात असलेले पाणी का बदलेल?> म्हणजे काय? बाईचं पोट म्हणजे पिशवी आहे का? Lol

काहीही! Lol
आणि भरलेलं पाणी ओतून दिल्यावर ' नवीन' पाणी मंगळावरून आणायचं की काय!

नाभी चिकित्सक << Lol
ह्याचा उपयोग एखाद्यालाच आहे, सगळ्यांना नाही Happy
अल्कलाईन म्हणुन विकत मिळते ते पाणी असेल का? हे सगळे डिटेल्स लिहीलेले?
तरीही फॉरवर्ड हस्यास्पद आहे ..

अजून एक.....

>>>>>

मित्रांनो
कॅन्सर होतो तरी कशामुळे
आणि त्यावर उपाय काय?

माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे
पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.

२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.

३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.

४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं..
जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.

५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.

६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.

७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.

८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे.
ब्लॅडर स्टोन होत नाहीत.

९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे

१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते
म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.

११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.

१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.

१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून
किमान १० ग्लास पाणी प्यावे.

१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.

१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी
दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये

१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी
५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.

१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.

१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच
अशाप्रकारची सहा फळे खावीत.

१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते
म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.

२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.

२१) गरम लिंबूपाणी

गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते.
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.
कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि

लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल
उच्च रक्तदाब कमी करते.
मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो.
आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.

डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,
ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया

मराठी भाषांतर
-प्रफुल्लचंद्र दिघे
<<<<<<

कस्काय साभार

३ नंबर Lol
गरम पोस्टी इथे जास्त असतात. माबोकर्स सांभाळुन. Happy
१८ नम्बर मधे सहावं फळ कोणतं?

कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते
म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.>>>
इथल्या काही सदस्यांनी २४ तास झोप घेतली तरी चालेल

७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत. >>> धन्यवाद. सकाळी सकाळी चहा सुद्धा न घेता टोमॅटो खाण्याची प्रबळ इच्छा होते ती कंट्रोल करायला हे उपयोगी पडेल.

Pages