भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुचलेली, होका? चांगली जमलिय ☺️
पाठवून द्या धडाक्यात
लोक निर्जन बेटावर अडकल्यावर हे सर्व करून बघणार नाहीत, आणि फारसा धोकाही नाही.

मलाही ते भारीत-भरीत-भारी म्हणजे​ जड आणि मग शेवटी भारीत म्हणजे चार्ज्ड अशी टप्प्यात ट्युब पेटली.

भरती आणि ओहोटीचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ?

उत्तर: हो

१) एखाद्या वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या, अनारसे , शंकरपाळे केल्यावर ते पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो, त्याच्या तळाशी खूप सारे तेल जमते, आणि ते पदार्थ ही मऊ होतात. पदार्थ करणारी व्यक्ती आणि जिन्नसाचे प्रमाण ही तेच असते परंतु त्या पदार्थांत खूप तेल शोषले जाते. बटाटेवडे / भजी केलीे तर कधी कधी ते खूप तेल पितात. ह्याचे कारण म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो.

२) जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला तर खूप कमी तेल लागते व पदार्थ ही छान होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते.

३) भरती ओहोटीची वेळ कशी काढावी ? ती खालील प्रमाणे---- वृत्तपत्रात किंवा नेटवर ती मिळतेच पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहेत.
कालनिर्णयवर आजची तिथी बघावी ,उदारणार्थ आजची कृ. २ आहे , तिथी कृ. २ × ३/४ = १.५ , आता १.५ म्हणजे दुपारी १.३० वाजता पूर्ण भरती आहे. पूर्ण भरतीच्या साधारण 3 तास आधी तळण सुरू करावे. (सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेपर्यंत) पण जर तुम्ही दुपारी १.३० नंतर तळणाला सुरवात केलीत तर जसजशी वेळ पुढे जाईल तसतसे पदार्थ जास्त तेल शोषेल.

४) जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात तळण करणार असू तेंव्हा ही वेळ पाळली तर पदार्थात तेल खूप कमी शोषले जाईल, पदार्थही चांगला होईल आणि ते आरोग्यासही उत्तम राहील. आमच्या घरी दिवाळीचे सर्व पदार्थ वरील पद्धतीने भरती आणि ओहोटीची वेळ बघून केले जातात. हा प्रयोग तुम्हीही अवश्य करून बघा ; विशेष करून केटरिंगचा व्यवसाय करणार्यांनी.

----अवधूत वेलणकर
__________________

५) नमस्कार, मी सागर बर्वे, पुणे ईथून. वरील पोस्टचे शास्त्रीय विश्लेषण आपण विज्ञानात शिकलो आहे की---- Attraction - Repulsion (आकर्षण विकर्षण), Ionic bond, Covalent bond ,Vanderwaal's forces, Hydrophobic (स्निग्धता / Aromatic, oily fatty principal), Rotational, Vibrational and Translational अशा मोशन व फोर्सेस असतात. ह्या भाषेत सांगितलं की अमेरिका, युरोपाचे तळवे चाटणार्या लोकांना लगेच कळतं, पण हिंदू धर्माची चाल/रीत आहे सांगितलं, की मात्र हिंदू धर्मावर जुनाट व अंध म्हणून टीका करतात.

६) स्पष्टीकरण: -- भरतीच्या वेळेस हायड्रोफिलिक फोर्सेस (पाणीतत्व) जास्त कार्यरत असते. केवळ समुद्राचेच नाही, तर मनुष्याच्या शरीरात असलेल्या ५-६ लीटर द्रव पदार्थ, रक्त, होर्मोन्स यावर सुद्धा परिणाम होतो, पोर्णिमा, अमावस्या, अष्टमी या तिथींना हे फोर्सेस जास्त एक्टीव असतात. म्हणून, मानसिक आजार असलेल्यांत वेडाचे झटके / अंगात येणे, चिडचिड, हे प्रकार अंगातील द्रवरूप व पाणी असलेले होर्मोन्स अप डाऊन होत असल्याने या तिथींवर मूडवर जास्त परिणाम होतो. याच तत्वाने समुद्रास भरती येणे, पाऊस कमी जास्त पडणे, आणि देवतांचे शक्तीतत्व जास्त कार्यरत असणे, हे प्रकार अष्टमी व पौर्णिमेस घडतात, कारण जलतत्व जास्त कार्यरत असते. मनास चंचल, ऊद्विग्न, डीप्रेस्ड वाटत असता मूठभर मीठ कोमट पाण्यात टाकून आंघोळ करावी, भरतीच्या वेळी जलतत्व जास्त कार्यरत असल्याने जास्त सुलभतेने मीठ विरघळू शकते, मीठात NaCl मध्ये निगेटिव शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते,कारण मीठ पाण्यात विरघळले, की घन व ऋण (positive & negative) आयन्स् (प्रभारित अणू) तयार होवून ते वीजवहन करू शकतात. आपल्या शरीरात पण वीजवहन सतत सुरू असते. मीठाचे पाणी अधिक पातळ व गुळगुळीत असल्याने मल साफ करण्यास पण मदत करते. यास्तव, भरतीच्या वेळेस घरच्या बादलीत मीठ पाण्यात घालून आंघोळ केल्यास मनास शांती लाभू शकते.

७) तळणीचे तेल हे पाण्याच्या विरूद्ध धर्माचे (hydrophobic) असल्याने भरतीच्या वेळेत त्याचे शोषण पदार्थात कमी होते. पाण्याचे शोषण करायची पदार्थाची वृत्ती (hydrophilic) तेव्हा असते. याऊलट ओहोटी लागताच पाण्याचा प्रभाव (हायड्रोफिलीक /hydrophilic effect) व पृथ्वीवरील जलतत्वाचा परिणाम कमी होवून तैली पदार्थ (हायड्रोफोबिक/ hydrophobic ईफेक्ट) वाढतो, त्यामुळे ओहोटी लागली की तळण जास्त तेल पीत असणार. याच तत्वाने खिचडी, दाल, वरण, भाजी करताना भरतीच्या वेळेस कमी शिट्ट्या लागून शिजावे, तर ओहोटीच्या वेळेस वेळ लागू शकतो.

८) याच तत्वाने जास्तीत जास्त शक्ती ग्रहण करायची क्षमता असलेले देवी देवता अष्टमी, वा पौर्णिमेस अवतार घेतात. ऊदाहरणार्थ -- चैत्र पौर्णिमेस हनुमान, श्रावण पौर्णिमेस बलराम, अष्टमीस कृष्ण वा देवी, आश्विन पौर्णिमेस शिववक्ती भ्रमण, मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तात्रेय ईत्यादी.

---त्यामुळे पोस्ट मधली 'तळण तळणे व भरती ओहोटी' ही माहिती अतिशय परिपूर्ण व शास्त्रीय असून त्यात भयानक, खोटे, हिंदू धार्मिक, अंधश्रद्धा वगैरे काही नाही, हे लक्षात ठेवा.

पृथ्वी तालावर ७० टक्के पाणी नि मानवी शरीरातही ७० टक्के पाण्याचे प्रमाण म्हणून भरती ओहटीचा समुर्द्रवर व मानवी शरीरातील पाण्यावर परिणाम होतो हे माहीतच होते पण अन-धान्य नि पाकशास्त्रावरही भरती ओहतीचा परिणाम होतो हे वाचून धन्य झालो.

कौतुकाचे शब्द थिटे पडतील असा लेख.

जगातला कोणताही आरोग्यशास्त्र तुलनात्मकरीत्या भारतीय आरोग्यशास्त्र च्या जवळपास ही नाही असे आमचे महान अभ्यासपूर्ण भारतीय आरोग्यशास्त्र तसेच धन्य ते भारतीय धन्वंतरी ज्यांनी भारतीय आरोग्य शास्त्रास श्रीमंत केले नि करत आहात.

>>> यात तथ्य आहे का?

मी भरतीच्या दिवशी डोक्याला तेल लावून मालिश करतो.
जास्त दिवस जाते तेलाची बाटली, आणि मालिश केल्यानंतर डोके धुताना शॅम्पू सुद्धा कमी लागतो.

" यात तथ्य आहे का?" - नाही. नुसता स्केल चा विचार केला, तरी कॉस्मिक फोर्सेस चा नगण्य (आकारमान, वस्तुमान च्या संदर्भात) मानवी देहावर, कढईवर, त्यातल्या तेलावर वगैरे परिणाम होणार नाही -निदान सिग्निफिकंट असा तरी काही होणार नाही.

ते डेंग्यू चा डास गुडघ्यावर उडू शकत नाही, गुडघ्याला खोबरेल तेल लावणे ही पोस्ट हा काय प्रकार आहे?माणूस आडवा झाल्यावर डास गुडघ्यापुढे उडाला नाही तरी गुडघा छाती डोकं सर्व सेम लेव्हल लाच येणार ना?आणि ज्याला 3 फुटावर पण उडता येत नाही तो डास वरच्या मजल्यावर जाऊन चावतो कसा?मग तर पार्किंग सोडून बाकी कोणालाच डेंग्यू चा धोका नाही पाहिजे.

खाली एक कायप्पा फॉरवर्ड देतेय, यात काही तथ्य आहे का माहीत नाही पण अगदी कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेत जे।मी थोडे बदललेत इकडे
-----

मित्रांनो
कॅन्सर होतो तरी कशामुळे
आणि त्यावर उपाय काय?

माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे
पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.
४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं..
जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.

५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.

७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.

८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे.
ब्लॅडर स्टोन होत नाहीत.

९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे

११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.

१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.

१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून
किमान १० ग्लास पाणी प्यावे.

१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.

१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी
दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये

१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी
५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.

१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.

१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच
अशाप्रकारची सहा फळे खावीत.

१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते
म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.

२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.

२१) गरम लिंबूपाणी

गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते.
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.
कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि

लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल
उच्च रक्तदाब कमी करते.
मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो.
आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.

डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,
ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया [] ‪ सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते
[] तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद
[] ‪: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने
[] थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या
[] ‪ तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत
[] ‪पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
[] ‪ लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते
[] : गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही
[] ‪*कर्करोग.......(कॅन्सर)*

प्रिय मित्रानो,
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया हा संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय हटवू नका.
फोन:
7385630747/8668366627

विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर पोहचवा

रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......

प्रिय मित्रानो
_*हा संदेश भारतातील 125 कोटी जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_

*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे
जे कर्करोग बरा करते.

हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"*
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल
आपण सर्व शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.

*Global Pain Relief Foundation*.
Prakash Apartment,
Behind Police station,
*Ravi Nagar, Nagpur.*

फोन:
73xxx30747 /8788xxx1994

soyamkawxxxe@gmail.com
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश पोहचवा........... एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!

थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या>>>>>>
थायरॉईड असणारा नारळ कुठे शोधायचा आता?

पूर्ण फॉरवर्ड्च धन्यवाद आहे एकदम

Proud

केवढ्या प्रकारची पानं खायला सांगितली आहेत. स्वयंपाक करण्याऐवजी जंगलातून पत्री गोळा करून आणून रोज तीच खात बसावं लागेल

जंगलातून पत्री गोळा करून आणून रोज तीच खात बसावं लागेल<<<< आणायची कशाला? तिकडेच चरून यायचं आणि घरी येऊन टीव्ही पाहत पाहत रवंथ! Proud

स्पिनीच नावाचं फळ मंडईत मिळेल का?

आणायची कशाला? तिकडेच चरून यायचं आणि घरी येऊन टीव्ही पाहत पाहत रवंथ!

>>> अक्षरशः !! Biggrin स्वयंपाकघर नामक खोली घरांमधून गायबच होईल एक दिवस... शेपटासारखी

मेसेज वाचून शंकेला वावच नको म्हणून "‪*कर्करोग.......(कॅन्सर)*" हे पण क्लॅरिफाय केलंय.

"झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे" - असं रेट्रोस्पेक्टीव्ह असण्यापेक्षा, जेवल्यानंतर किमान ३ तासांनी झोपावे असं का लिहू नये?

"अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने" - एकच पान ३ महिने कसं खात रहायचं? रवंथ कपॅसिटी चा गायी-गुरांनासुद्धा हेवा वाटेल.

" गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही" ... "गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे." - लिंबू की गाजर?
Happy Happy Happy

Anusha Dandekar dislikes this. >>> Rofl

अतिशय गरम पोस्ट खाऊ नये >>> पोष्टीक असेल तर खायला काय हरकत आहे.

< गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही" ... "गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे." ->

गाजराचा रस सलग १५ दिवस न घेत ल्याने कॅसंर झालेल्यांसाठी लिंबूपाणी

Pages