भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव.. खरं सांगू का? या धाग्यावर भोंदू म्हणून आलेले बरेच फॉर्वर्ड्स मला खरे वाटतात. नक्की कोण बरोबर ते कळत नाही. त्यामुळे मला आरोग्यविषयक कोणतेही फॉर्वर्ड आले कि तो भोंदू आहे कि नाही हे न कळल्याने इथे टाकते. जेणेकरून इथे चर्चा/ उहापोह होऊन माझ्याही डोक्यात प्रकाश पडावा. आणि नक्की फॉलो करावे कि नाही याबद्दल थोडी आयडीया येते.

.डॅा• घोसाळकर (एम बी बी एस)

यांनी कपालभातीबद्दल खूपच चांगली माहिती।

*कपालभाती प्राणायाम*

कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.

कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.

कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाॕल्व्ह होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.

कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड,
एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.

कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात २६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.

कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.

कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते. हे कपालभातीमुळे होते.

एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो.
गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात.
स्ट्रेस हामोंस गायब होतात.
मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो.
कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.

*किती विशेष आहे पहा.*

कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला अर्धा/एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही.
कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.

कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो.
पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.

विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.

*एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी गुरुकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.*

*दररोज करा सूर्य नमस्कार कपालभातीयोग।*

राम राम!
आपण कधी विचार केला आहे का , की आपण "राम-राम" दोन वेळेस का म्हणतो.कारण~~~~~|-
र = २७ वा शब्द. ( क ख ग घ ड..........)
आ = २ रा शब्द. (अ आ..)
म = २५ वा शब्द शब्द.(अ आ............)
एकूण = ५४.
राम + राम.
५४+५४ = १०८.
आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात.
ह्याचा अर्थ = आपण एका व्यक्तीला जर दोनदा "राम-राम" म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो.....तर मग म्हणा की मंडळी ....
राम राम ....

~~~~~~~~
रामनाम घेत असतांना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= *लक्ष्मण* होते
नामस्मरण करताकरता मन उन्मन होते म्हणजेच *हनुमान* होते.
हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की *भरत* होते.
असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात ,शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते *शत्रुघ्न* होते.

अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच *सीता* होते.
सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते *राम* स्वरूप होते.

रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना....

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।
रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।

या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे(सप्तमी),भो राम(संबोधन).
ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.

: रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच!!!

कपालभाती करायला सोपे वाटते पण सोपे नाहिये. १ मिनिट करता करता खुप दम लागायचा. त्यामुळे जर कोणी नियमाने रोज १०-१५ मिनिटे करत असेल तर त्याचा काहीतरी चांगला उपयोग होणारच. वरची भरत यांची माहिती वाचली. ती खरी असो, खोटी असो पण भरत, उगाच सरसकट कपालभातीला भोंदू ठरवायला जाणे चुकीचे वाटले.

सुनिधी,
कपालभाती ला सरसकट टाकाऊ कोणीच म्हणणार नाही,
पण त्याचा प्रसार करताना जे अतर्क्य क्लेम केले जातात, आणि इतर एस्टॅब्लिश्ड उपचार पद्धतींना नावे ठेवली जातात त्यामुळे त्या मेसेज चे गांभीर्य निघून जाते.

उदाहरणार्थ वरच्या फॉरवर्ड मध्ये, शरीरातील गाठी वितळणे, दिवसाला अर्धा ए एक किलो वजन वाढणे/कमी होणे , व्हिटॅमिन्स आणि हिमोग्लोबिन ( लोह?) च्या गोळ्या नपचता बाहेर टाकल्या जाणे वगैरे जी विधाने केली आहेत ती जीव शास्त्राचे सामान्य ज्ञान असणाऱ्या माणसाला हास्यास्पद वाटतील,

ओके. मग ठीक. (तरीही मुद्दे हास्यास्पद वाटले तरे खरे आहेत की खोटे ते ना तुम्हाला माहिती ना मला). आणि एक शाखा दुसर्‍या शाखेला नावे खुपदा ठेवते हे इथेतिथे नेहमीच दिसते.

दिवसाला अर्धा ए एक किलो वजन वाढणे/कमी होणे <<<< कपालभातीला कप्पाळ कळणार वजन वाढवायचे आहे की कमी करायचे आहे.. आज वाढले उद्या कमी , परवा वाढले यरवा कमी... Happy

मालवणी चाली-रितीचे भांडवल करून यशस्वी झालेल्या "रात्रीस खेळ चाले" मालीका संपवताना भुत-खेत, पिशाच्च-चाळा, भगत-चेटूक यावर विश्वास ठेवणारा मालवणी भोळा-खुळा असतो असा संदेश दिला गेला.महाराष्ट्राच्या घराघरात मालवणी भाषा पोचली. परंतु कोकणातील अतर्क्य घटनांची विज्ञानाला उत्तरे सापडत नाही.
१) सिंधुदुर्ग किल्ला बचाव समितीचे अध्यक्ष व कालनिर्णयकार जयंत साळगावकर किल्यावर जाताना खोल समुद्रात बुडले असता एका अज्ञात शक्तीने आपल्याला वाचवले अशी आठवण सांगतात.
२) जयवंत दळवी अमेरीकेला जाताना विमान भरकटू लागले. जयवंत दळवींनी धावा केल्यावर त्यांना विमानाच्या पंखावर वेंगुर्ल्याचा ग्रामदैवत- वेतोबा ( भूतांचा राजा) दिसला. पुढील प्रवास सुखरूप पार पडला.
३) १९७६ साली रेडी गावात ट्रकचालकाच्या स्वप्नात दर्शन देऊन गणपतीने खणायला सांगीतल्यावर तेथे पांडवकालीन मूर्ती मिळाली
४) वरील गणपतीच्या पांडवकालीन मूर्तीजवळ वाहन उंदीर नसल्याने ग्रामदेवता माऊली देवीला ( पार्वती) कौल लावल्यावर
देवीच्या दृष्टांताप्रमाणे खणल्यावर भला मोठा उंदीर सापडला
५) होरारत्न लाडोबा म्हापणकरपासून ज्योतीर्भास्कर जयंत साळगावकरांसारखे अचूक भवीष्य सांगणारे ज्याोतीषी मालवणी मुलुखात जन्माला आले
६) गोवा मुक्तीसंग्रामात भूमीगत झालेले भाउसाहेब बांदोडकर वेंगुर्ल्यात आले असता त्यांचा चेहरा पाहून ते गोव्याचे पहीले मुख्यमंत्री होणार हि भवीष्यवाणी करणारे सिध्दहस्त साईभक्त आंबेकर मालवणी मुलुखातील
७) ब्रिटीशांच्या काळात मुंबई पोलीसातील ८०% अधिकारी मालवणी मुलुखातील होते. भुत-खेतांच्या भितीने ते भ्रष्ट्राचार न करता प्रामाणिक काम करायचे म्हणून मुंबई पोलीसांची स्काँटलंड यार्डशी तुलना झाली हे ब्रिटीशांनी नमूद केले होते.
८) पिशाच्च-चाळा यांच्या भितीने मालवणी माणूस आत्महत्या करीत नाही. भुत-खेतांच्या अंधश्रद्देने मालवणी मुलुखात खून-बलात्कार असे प्रकार नाही.
९) मालवणातील दांडी हे असे गाव आहे की जेथे गेल्या ३५० वर्षात एकाही मच्छिमार- पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला नाही. याची दंतकथा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्थापनेवेळी ग्रामदैवत रामेश्वराने शिवाजी महाराजांना किनारपट्टीच्या संरक्षणाचे वचन दिले होते.
टिप- ४० वर्षापूर्वी या "रात्रीस खेळ चाले" या गाजलेल्या गाण्यातील "हा खेळ सावल्यांचा" या चित्रपटातही कोकणातील प्राँपर्टीसाठी आलेली नरसूची भुताटकी महाराष्ट्रात गाजली होती.

वरचा मेसेज
किंवा तो लिंबूमिरचीवाला मेसेज, हे मुळात कोण लिहित असावेत याची मला प्रचण्ड क्युरिऑसिटी आहे.

सनातन संस्थावाले धुतल्या मेंदूचे (ब्रेनवॉश्ड) किंवा इथले (याच धाग्यावर 'सगळंच खोटं नसतं' स्टाईल प्रतिसाद देणारे) दोन तीन आजी-माजी आयडीज डोळ्यासमोर आहेत,

पण तरीही, इतक्या निर्बुद्धपणे अंधश्रद्धांचे समर्थन आजच्या जगात कुणी करीत असेल, असे मानायला मन धजावत नाही.

why do they do it? to what advantage?

or is their brain like appendix? like a useless vestigial organ??

BELLY ( नाभि )

DID YOU KNOW?

Our belly button is an amazing gift given to us by God. A 62 year old man had poor vision in his left eye. He could hardly see especially at night and was told by eye specialists that his eyes were in a good condition but the only problem was that the veins supplying blood to his eyes were dried up and he would never be able to see again.

Homeopathy has a cure for this condition. Infact it not only has a cure for this condition but for veins which have dried up to any part of the body such as the ears, the brain, legs, arms, pancreas, lips, jaw etc.

According to Science, in all of God’s creation, the first part created after the clot is formed is the belly button. After it’s created, it joins to the mother’s belly button through the umbilical chord.

Through this incredible gift that God has given to us, which we may seem it to be insignificant, a new life is formed.

Our belly button is surely an amazing thing! According to science, after a person has passed away, the belly button is still warm for 3 hours the reason being when a woman conceives a child, her belly button supplies nourishment to the child through the child’s belly button. And a fully grown child is formed in 270 days = 9 months. This is the reason all our veins are connected to our belly button which makes it the focal point of our body. Belly button is life itself!

The “PECHOTI” is situated behind the belly button which has 72,000 plus veins over it. The total amount of blood vessels we have in our body are equal to twice the circumference of the earth.

CURES:

For dryness of eyes, poor eyesight, pancreas over or under working, cracked heels and lips, for glowing face, shiny hair, knee pain, shivering, lethargy, joint pains, dry skin.

REMEDY:

For dryness of eyes, poor eyesight, fungus in nails, glowing skin, shiny hair. At night before bed time, put 3 drops of pure ghee or coconut oil in your belly button and spread it 1 and half inches around your belly button

For knee pain At night before bed time, put 3 drops of castor oil in your belly button and spread it 1 and half inches around your belly button.

For shivering and lethargy, relief from joint pain, dry skin at night before bed time, put 3 drops of mustard oil in your belly button and spread it 1 and half inches around your belly button.

WHY PUT OIL IN YOUR BELLY BUTTON?

You belly button can detect which veins have dried up and pass this oil to it hence open them up.
When a baby has a stomach ache, we normally mix asafoetida (हिंग) and water or oil and apply around the naval. Within minutes the ache is cured. Oil works the same way.

People die from Chemotherapy, Not Cancer – Said Doctor Peter Glidden

http://www.blueskyin.com/people-die-from-chemotherapy-not-cancer-said-do...

He says that people who refuse chemotherapy treatment live on average around 12 years longer than people who accept the chemotherapy treatment, most patients undergoing chemotherapy die in time frame of 3 years since they are diagnosed with cancer and some much faster than that (within few weeks since being diagnosed.) He also claims that patients with breast cancer who reject treatment live four times longer than those who undergo chemotherapy.

<< वWhen a baby has a stomach ache, we normally mix asafoetida (हिंग) and water or oil and apply around the naval. Within minutes the ache is cured.<<

बाकीच माहीत नाही पण हे मात्र फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही लागु होतं . पोटात गुबारा धरल्यास चिमुटभर हिंग चमचाभर पाण्यात विरघळवुन हे पाणी नाभीच्या आजुबाजुला लावल तर लगेच गॅस सुटतो... असे घरगुती उपाय अजूनही केले जातात.

अमुक लिंक क्लिक करा मग व्हॉट्सॅपची स्पेशल व्हिडिओ कॉलिंग मिळेल असा मेसेज फिरतो आहे, तो होक्स आहे. लिंक क्लिकून लिंक बनवणार्‍याला पैसे व आपल्याला व्हायरस फ्री गिफ्ट मिळतोय.

प्लेस्टोअरला व्हॉट्सॅप नुसतं अपडेट करा, फुकटात आपोआप व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरू होईल.

आजचं ताजे .....
------------------------------------------------------

Dear Parents
On account of the sudden demise of our student Sirish Savio of Xll C. Today 30.11.2016 (Wednesday) will be a holiday from LKG to Std. XII. Kindly pray for the happy repose of his soul.
Regards Principal.
The boy died due to he ate kurkure and it was not digested. Then he took ENO . On the spot he died. Don't give junk foods to children

*BSNL 4G ExPress SIM Launched*

With every 4G ExPress SIM you get unlimited data and calls for 1 year, with additional freebies.

*BSNL 4G ExPress SIM features :*

_Unlimited 4G Internet_
_Unlimited Calls_
_Unlimited SMS_
_4G Internet Speed Upto 10 Mbps_
_Free SIM Card_

Get your *FREE* BSNL 4G ExPress SIM Card Today

Register Now : इथे bsn.co अशी लिंक दिलीय मेसेजमधे त्यावर क्लिक करू नये.

_Offer is valid till 31st Dec, 2016_
-----------

पहले चेक करो फिर फॉरवर्ड करो..

https://check4spam.com/promotions/bsnl-4g-express-sim-launched-scam/

कॅबमध्ये झालेले बहुतांशी रेप्स हे चाईल्ड लॉक असलेल्या कॅबमध्ये झालेले आहेत असा एक मेसेज दोनतीनवेळा आला. हा खरा आहे की फेक?

>>कॅबमध्ये झालेले बहुतांशी रेप्स हे चाईल्ड लॉक असलेल्या कॅबमध्ये झालेले आहेत<< खरं आहे की नाही सांगता येणं अवघड आहे तरी पण तसं असण्याची शक्यता खुप दाट आहे.

काल वाचनात आलेली पोष्ट. या पोष्ट खाली एक तुनळी ची लिन्क होती.

In Mumbai a Pakistani female free style wrestler after defeating everybody got high and started using abusive language against Indians and challenged Indian spectators that if any Indians has guts she may come in ring and have a wrestling bout with her.Her challenge was accepted by a spectator by name Sandhya Phadke(who happens to be RSS district level swayamsevak of Mahila wing called Durga Vahini)
All Indians must watch this video to know what happened in the ring.

__ पाकिस्थानी रेसलर विरुध्द सलवार कमिझ मधील भारतीय मुलगी, नाव संध्या फडके, आर एस एस .. एका वर एक ...! खरं तर ती दोघेही ग्रेट खली च्या विद्यार्थीनी आहेत BB Bul Bul आणि कविता

Is defense minister Manohar Parrikar good?

Today I met with a CEO of a company who’s company provide one of their product to defence field.

She told me a latest incident about Mr. parriker which made me proud that Modi hand-picked him for this role.

The shoes

Indian army use a special kind of shoes in some of their particular use.

We used to purchase this shoes from Israel at a price of ₹ 25000 per shoe.

This was in general routine till Mr. Parriker came into picture.

After he became the Defense minister, his people did some enquiries and they found that these shoes are exported to Israel from India only.

The shoes were manufactured in Jaipur India.

After this he directed the defense people to approach the company for direct procurement.

The company directly refused the deal citing corruption, delay in payment and further difficulties.

Listening this, he directly approached the company and given his personal contact number and said, “even if your payment get delayed for a single day, contact me directly”.

The deal got finalized at ₹ 2200 per shoes.

From ₹ 25000 to ₹2200 per shoes.

This is the determination of Mr. Parriker, now you guys decide whether he is a good minister or not.

Modi rightly said Manohar Parrikar is one of the jewels in his cabinet. One of the efficient and sharp ministers that every Indian should be proud of.

Pl forward to maximum people bcz paid media wont publish this...

Let us ensure that let every one know the truth...

Jai hind.

हे एका फेसबूक प्रोफाइलवर शेअर केले होते:

परवा एका IT क्षेत्रातली व्यक्ति मला म्हणाली तुला "अरे तुला शिवाजीत एवढा इंटरेस्ट का आहे ?
जगात इतके पराक्रमी राजे आहेत ?

सारखं आपलं शिवाजी शिवाजी. तो थोडीच जगातला सगळ्यात पराक्रमी राजा होता?"

त्याला मी म्हणालो नीट ऐक,
"मी जाणिवपूर्वक विधान करतो की शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेनानी होते. जगात तुलना नाही असे राजे होते..."

माझं बोलणं मध्येच तोडत ती व्यक्ती म्हणाली
"सिध्द करून दाखव"

मी ठीक आहे म्हणलं. तसंही लायब्ररीतील बरीचशी जनता डोकावून पाहत होती...

यापेक्षा चांगली संधी नाही, मी म्हंटलं...

महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे सेनानी पराभूत केले त्यातले फक्त दोघेच भारतीय होते.
बाकी सगळे परकीय होते. त्यांच्या त्यांच्या देशाचे मानांकित सेनानी होते.....

शिवरायांनी पराभूत केलेले सेनानी पाहु - ज्याची लाल महालात बोटं छाटली
तो शाहिस्तेखान तो अबु-तालिबानचा नबाब,
तुर्कस्तानचा नबाब आहे.
तो प्रतिऔरंगजेब या नावाने ओळखला जायचा, औरंगजेबाचा सक्खा मामा आहे तो.
बंगाल प्रांत जिंकुन दिलाय त्याने.. असा बलाढ्य सेनानी महाराजांनी एका रात्रीत तीन बोट छाटली.... पहाट व्हायच्या आत गायब झाला तॊ पुन्हा नाही आला...
तो बहलोलखान पठाण सिकंदर चिडरखान पठाण हे सगळे पठाण अफगाणी आहेत. अफगाणीस्तानचे आहेत हे..

तो दिलेरखान.. मंगोलियन आहे तो, बाबा... मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा... महराजांनी त्याचा पराभव केला.
सिद्धि जौहर, सिद्धी सलाबत खान हे सगळे इराणी आहेत. इराण चे आहेत सर्वोत्तम योद्धे आहेत महाराजांनी त्यांचा पराभव केला.

आणि इथं लोणावळ्याच्या उंबरखिंडीत ज्याचा कोंडून पराभव केला...असा की गिनिज बुकला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली की जगातल्या सगळ्यात कमी सैन्याने जास्तित जास्त सैन्याचा पराभव केला
( एक हजार विरुद्ध 30 हजार आणि 30 हजारंचा संपूर्ण पराभव 1000 मधला एकही मावळा न गमावता )

तो कहार्तलब खान तो उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे त्याचा पराभव केला.

इंग्रज-गवर्नर लिहितो की शिवाजी महाराज जर अजून 10 वर्षे जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्तानचा नीट चेहरा पाहता सुध्दा आला नसता...

सतराव्या शतकात लंडन मध्ये 3 वृत्तपत्रे प्रकाशीत होत होती. त्यामध्ये लंडन गॅझेट नावाचं वृत्तपत्र होत . शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या लंडन गॅझेट मध्ये पहिल्या पानावर ती बातमी छापून आलेली. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्या असा नव्हता, किंग ऑफ मराठा असाही नव्हता.... तर त्यात माझ्या राजांचा उल्लेख
Shivaaji the king of India असा होता...

व्हियेतनाम नावाचे छोटसं राष्ट्र आहे हो राष्ट्रचं, आपल्या पुणे जिल्ह्याएवढेपण नसेल. व्हिएतनामचं आत्ताची महासत्ता अमेरिकेसोबत गेली 35 वर्षे युद्ध सुरू होते. पण या युध्दात अमेरिकेला विजय मिळाला नाही. का माहितीये कारण--

त्या व्हिएतनामच्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.... त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्यसेनानी "हू जी मीन" नांव त्याचे. त्याच्या समाधीवर लिहून ठेवलंय शिवाजी महाराजांचा एक मावळा येथे चीरविश्रांती घेतोय....

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" या विषयावर 100 मार्काँचा पेपर घेतला जातो.

जगातली 112 राष्ट्र शिवरायांच्या गोरील्ला warfair (युधतंत्र) चा वापर आपल्या अभ्यासक्रमात करतात.

पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

मी म्हणालो आता तूच सांग सगळं जग शिवरायांचा अभ्यास करतंय तिथं माझ्या देशातल्या अभ्यासक्रमात किती वेळा शिवरायांचा उल्लेख आहे ?

तुम्ही इतिहास शिकलात त्या CBSC मध्ये 1700 पानांचे पुस्तक काढलंय. त्यात फक्त 4 ओळी आहेत शिवाजी महाराजां बद्दल म्हणून तुला ही माहिती नव्हती... म्हणुन तुम्ही असं म्हणालात...

औरंगजेबाने आयुष्यातीलं ऐन उमेदीची २७ वर्ष तब्बल.... हो २७ वर्ष या महाराष्ट्रात मराठ्यांशी निकाराची झुंज देण्यात वाया घालवली.

त्याने हिच २७ वर्ष इतर कुठल्याही ठिकाणी घालवली असती तर कदाचीत ही अर्धी पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली आली असती... इतक्या प्रचंड शक्तीशाली फौजेचा तो बादशाह होता पण मराठ्यांनी त्याला दिल्लीचे तख्त पुन्हा पाहु दिले नाही...

कारण अख्ख्या जगाला माहिती आहे... शिवाजी काय होते. पण भारतातील लोकांनाच माहित नाही.....
*जय शिवराय*

Pages