Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जानी थोडी म्हातारी दिसली
जानी थोडी म्हातारी दिसली परवाच्या का त्याच्या मागच्या भागात. जेव्हा श्री तिच्याशी बोलत असतो. कलाबाई म्हणत असतात जानीच्या बाबान्शी की पिन्ट्याच्या लग्नात त्या स्वतःला सोन्याचे दागिने करणार आहेत, त्या भागात.
जानी थोडी म्हातारी दिसली >>
जानी थोडी म्हातारी दिसली >> हल्ली ती नाहीच आवडत .
शीर्शक गीतात बघा किती छान दिसते त्या पिवळ्या-जाम्भळ्या साडीत .
पुर्वानुभवावरून सान्गतोय ही
पुर्वानुभवावरून सान्गतोय
ही देवस्थळीची सिरीयल आहे ती केव्हाही संपेल. अचानक
कुणी सांगू शकेल आभाळमाया, वादळवाटचा शेवट काय झालेला?
असही
टी आर पी प्रचंद्ड घसरलाय.
असही टी आर पी प्रचंद्ड
असही
टी आर पी प्रचंद्ड घसरलाय.>>> सहमत.
एक शंका.
फेब्रुवारी ते सप्टेंबर सहा महिन्यात जानूचे फक्त तीन(च) महिने झाले होते. मग इतक्यात पाचवा महिना?
किमान दिवाळीपर्यंत तरी थांबायचे ना. बाकीचे विषय संपले का???
Aga bai, Saru Mawashi che vay
Aga bai, Saru Mawashi che vay 55 yrs, & ata lagna la ubhi rahatey. ..
Ithe Rohanya, tithe Vachchi.
Ithe Rohanya, tithe Vachchi. Ithe Sunita, tithe Saiprasad. Ashudhdha bhashe che udattikaran chalu aahe .
जानी थोडी म्हातारी दिसली >>
जानी थोडी म्हातारी दिसली >> नसेल हो तसं काही. बहुतेक तो ही मूड स्विंगचा एखादा प्रकार असावा
काल सरूमावशीच्या लग्नाबद्दल
काल सरूमावशीच्या लग्नाबद्दल श्री चिंतीत दिसला .
जानीने विचरल तर बोलता बोलता म्हणाला , " मी मोठं ईन्द्रधनुष उचलण्याचा पण केला होता .... वगैरे"
मला वाटलं त्याची काहितरी गल्लत झाली कारण जानी लगेच खिदळली
त्याने विचारलं " व्हॉट ईज सो फनी अबाउट ईट "
ती म्हणाली " सरू मावशींबद्दल बोलताना तू ही पूराणातली उदाहरणे द्यायला लागलास "
म्हणजे गल्लत लेखकाची होती
ईन्द्रधनुष>>> बरोबर आहे
ईन्द्रधनुष>>>
बरोबर आहे की.. आईआजी, आई, मोठी आई, सरु मावशी, बेबी आत्या, शरयू मावशी आणि जानी ! झालं की सप्तरंगी इंद्रधनुष्य पूर्ण !
हो ना स्वस्ति.. खिदळायला तर
हो ना स्वस्ति.. खिदळायला तर मलाही झाल होत पण कारण होत श्रीने शिवधनुष्य म्हणायच्या ऐवजी इंद्रधनुष्य म्हटल.. जानुबाई खिदळल्यावर मनात अंधुकशी शंका निर्माण झाली की हि त्याला दोन धन्युष्यांमधले फरक समजावुन देईल, पण "हाय रे कर्मा.." आशा वेडी असते याचा प्रत्यय आला मला
ओह माय ग्वॉड दिवसेंदिवस ही
ओह माय ग्वॉड
दिवसेंदिवस ही खुप फनी होत चालली आहे सिरीअल.
ईन्द्रधनुष>>> लेखकाला नाही
ईन्द्रधनुष>>>
लेखकाला नाही समजलं पण सेटवरच्या कोणाच्याच लक्षात नाही आलं म्हणजे कमाल आहे.
आज खूप काय काय छान झाले. १.
आज खूप काय काय छान झाले.
१. पिंट्याला एक अशुद्ध मराठी बोलणारी भेटली. दोघांची नजरानजर पाहून कोणालाही गृहस्थाश्रम त्यागावासा वाटला असता.
२. पिंट्या पळून गेलेला नाही. 'आपल्याकडे जे नाही तेच माणसाला आवडते' ह्या उक्तीनुसार पिंट्याला स्वतःच्या शुद्ध मराठीचा तिरस्कर वाटत असून अशुद्ध मराठी बोलणारी एक भिन्नलिंगी व्यक्ती त्याला आवडलेली आहे.
३. घरातील इतर खोल्यांमध्ये सत्तत कोणी ना कोणी असल्यामुळे श्री आणि जान्हवीला एकमेकांशी बोलताच येत नाही. म्हणून बेडरूममध्ये बोलावे असे ठरवले तर श्री बाळ पलंगावरून खाली पडते मधेच! त्यामुळे दोघेही आज एका रेस्टॉरंटमध्ये भेटले.
४. पिंट्याचा विवाह त्या शांताबाईशी व्हावा ही श्रीची सध्या एकमेव महत्वाकांक्षा आहे. जान्हवीचीही ह्यास काही हरकत नाही पण ही गोष्ट विवाहाआधी पिंट्याच्या आईला समजावी असे तिचे म्हणणे आहे. त्यावरून दोघांचा जो वाद झाला त्यात जान्हवीने 'आईला सांगितले तर ती भांडेल पण नंतर मान्य करेल' असे वाक्य टाकले. त्यावर बोलताना श्रीने विचारले की 'पण हे सगळे व्हायला वेळ किती लागेल'! पण चुकून हा प्रश्न विचारताना त्याची नजर आणि दोन्ही हात चुकून जान्हवीच्या पोटाच्या दिशेने वळले. जान्हवीने त्यावर उत्तर दिले की 'अश्या गोष्टींना किती वेळ लागेल हे सांगता येत नाही'! 'ही तो श्रींची इच्छा' ह्या उक्तीनुसार मालिकेतील सर्व गोष्टी होत असताना ह्या एकाच बाबतीत श्रीची इच्छा का चालत नाही हे एक न उलगडलेले कोडे आहे. प्रसूतीनंतर जान्हवीचे बाळ बहुधा 'ते मागे एक मोदी म्हणून होऊन गेले ते कुठे असतात हल्ली' असे विचारेल असे वाटते.
५. आज जेवढा भाग मी पाहिला त्यात फ्रस्ट्रेटेड बेबी दिसली नाही.
६. गोखले गृह उद्योग हा डेडलाईनच्या आत पूर्ण होऊ न शकणारा प्रकल्प आहे.
३. घरातील इतर खोल्यांमध्ये
३. घरातील इतर खोल्यांमध्ये सत्तत कोणी ना कोणी असल्यामुळे श्री आणि जान्हवीला एकमेकांशी बोलताच येत नाही. म्हणून बेडरूममध्ये बोलावे असे ठरवले तर श्री बाळ पलंगावरून खाली पडते मधेच! त्यामुळे दोघेही आज एका रेस्टॉरंटमध्ये भेटले.>>>>>:अरे देवा! पोट दुखले हसून.:हहगलो:
४. पिंट्याचा विवाह त्या शांताबाईशी व्हावा ही श्रीची सध्या एकमेव महत्वाकांक्षा आहे. जान्हवीचीही ह्यास काही हरकत नाही पण ही गोष्ट विवाहाआधी पिंट्याच्या आईला समजावी असे तिचे म्हणणे आहे. त्यावरून दोघांचा जो वाद झाला त्यात जान्हवीने 'आईला सांगितले तर ती भांडेल पण नंतर मान्य करेल' असे वाक्य टाकले. त्यावर बोलताना श्रीने विचारले की 'पण हे सगळे व्हायला वेळ किती लागेल'! पण चुकून हा प्रश्न विचारताना त्याची नजर आणि दोन्ही हात चुकून जान्हवीच्या पोटाच्या दिशेने वळले. जान्हवीने त्यावर उत्तर दिले की 'अश्या गोष्टींना किती वेळ लागेल हे सांगता येत नाही'! 'ही तो श्रींची इच्छा' ह्या उक्तीनुसार मालिकेतील सर्व गोष्टी होत असताना ह्या एकाच बाबतीत श्रीची इच्छा का चालत नाही हे एक न उलगडलेले कोडे आहे. प्रसूतीनंतर जान्हवीचे बाळ बहुधा 'ते मागे एक मोदी म्हणून होऊन गेले ते कुठे असतात हल्ली' असे विचारेल असे वाटते.>>>>>>>
४ >>>
४ >>>
(No subject)
(No subject)
परवाच्या एपिसोड मधे बेबी
परवाच्या एपिसोड मधे बेबी 'चांदण्यातलं डोहाळजेवण' कधी करुया म्हणताना म्हणाली की आता कोजागिरीही येतेच आहे तेव्हाच करु चां डो. माझा नवरा म्हणतो, ह्यांना सणवार काय कधी येतात तेही माहीत नाही?? दसरा गेला कुठे मधला, गणपतीनंतर डायरेक्ट कोजागिरी यायला... खरंच काहीही दाखवतात हल्ली. नाही जमत तर बंद तरी करा म्हणावं सिरीयल.
एक नोटः कधीतरी रिमोट लांब आहे, उठुन चॅनेल बदलायाचा कंटाळा आला तरच २-३ मिनीटं ही सिरीयल डोळ्यावर पडते. तेव्हाचे सीन्स इथे लिहिले जातात. 'इतका वैताग होतो तर बघुन नका ना' असं बोलु नये कुणीच प्लीजच..
वादळ्वाट, देवयानी किन्वा
वादळ्वाट, देवयानी किन्वा हल्लीची जुळून येती रेशीमगाठी पट्कन कशा सम्पवल्या त्याची माहिती काढायला हवी.
(No subject)
बेफी बाकी काही का असेना,
बेफी

बाकी काही का असेना, तुम्हाला पिंट्या दिसला हे महत्त्वाचं
जुळून येती रेशीमगाठी पट्कन
जुळून येती रेशीमगाठी पट्कन संपली????????????????????????
देवा रे
पट्कन म्हणजे आणखी ६ महिने तरी
पट्कन म्हणजे आणखी ६ महिने तरी लाम्बेल असे वाटत असताना अचानक सम्पली.
रसना, देवयानीची वेळ बदलली
रसना, देवयानीची वेळ बदलली बहुतेक, रात्री १०.३०. ती तर किती वर्षे चालू आहे स्टार प्रवाहवर.
विषयाला धरुन बोला रे
विषयाला धरुन बोला रे

जान्हवीचे बाबा ते ऑपरेशन कधी
जान्हवीचे बाबा ते ऑपरेशन कधी करून घेणार आहेत??
जान्हवीचे बाबा ते ऑपरेशन कधी
जान्हवीचे बाबा ते ऑपरेशन कधी करून घेणार आहेत??<<< अहो. पायाचं ऑपरेशन असं म्हणाकी.
हा बीबी अतिशय करमणूक प्रधान आहे. या मालिकेचे दोन तीन प्रसंग चुकून माकून पाहिले असतील पण हा बीबी कायम वाचला जातो. चकटफू एंटरटेनमेंट
हा बीबी अतिशय करमणूक प्रधान
हा बीबी अतिशय करमणूक प्रधान आहे. या मालिकेचे दोन तीन प्रसंग चुकून माकून पाहिले असतील पण हा बीबी कायम वाचला जातो. चकटफू एंटरटेनमेंट +१
जान्हवीचे बाबा ते ऑपरेशन कधी
जान्हवीचे बाबा ते ऑपरेशन कधी करून घेणार आहेत??<<< अहो. पायाचं ऑपरेशन असं म्हणाकी. >>>
सिरियलला कधीच सोडचिठ्ठी दिलीय. इथल्या प्रतिक्रिया वाचते अधूनमधून.
नंदिनी. मी आज पाहिला थोडा
नंदिनी.
मी आज पाहिला थोडा भाग तर सरू मावशी म्हणे, 'आजकालची मुल लग्नानंतर हनीमूनला जातात मला मात्र चारी धाम यात्रेला जायचय. अन् त्यानंतरपण भारतभर देवदेव करत फिरायचय.'
Pages