होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि आता चांगला आणि श्रीमंत नवरा आहे तर ऑप्रेशनचं आठ्वत नाहीये. >>>> अग तिला तिच्या पैशांनी त्यांच ऑपरेशन करायच आहे, स्वाभिमानी ना ती..

हा मग आपटेशी लग्न करायला निघाली बाबांच्या ऑपरेशनसाठी तेव्हा स्वाभिमान गहाण टाकला होता का तिने.

आणि तेव्हा ऑपरेशन एका महिन्याच्या आत केलं नाही तर उपयोग नाही असं होतंना. मग डिक्लेअर करा की आता उपयोग नसल्याने पाय असाच राहणार.

नवऱ्याकडून लोन घेऊन त्याचे पैसे फेडता येत नाहीत का नंतर. जाऊदे चालुदे.

अन्जू तू महान आहेस. बाबांच्या ऑपरेशनचे बाबा, जानी, कलाबाई, पिंट्या, श्री, डायरेक्टर, प्रेक्षक सगळे विसरले आहेत. Proud फक्त तुझ्या लक्षात आहे Happy

जस मुलाच लग्न होउन सून घरात आली की आयांच्या सासवा होतात तस..>>> हो मुग्धा तसच पण आया होतात बहिण कशाला एवढी पझेसिव होते Uhoh जिथे तिथे स्वतःचा मोठेपणा दाखवायचा Angry म्हणे पिंट्याच्या सगळ्या गोष्टींना मी स्वतःला जबाबदात धरते

हा मग आपटेशी लग्न करायला निघाली बाबांच्या ऑपरेशनसाठी तेव्हा स्वाभिमान गहाण टाकला होता का तिने. >>>> हो, कारण तिला आपण बँकेत काम करतो, जिथे अकाउंट्स, एफ.डीज याव्यतिरिक्त लोनपण मिळत हे आठवत नव्हत... आपट्याशी लग्न मोडल्यावर डोक्यात प्रकाश पडला.

हो मुग्धा तसच पण आया होतात बहिण कशाला एवढी पझेसिव होते >>>> अग कारण हा तोपर्यंत सतत तायडा तायडा करत असतो, बाबा सतत जानु जानु करत असतात आणि आता हे दोघेही स्वावलंबी झालेत.

नताशा Lol .

हम्म्म परवा जोक्स चाललेले हवा येउद्यावाले करत होते नॉमिनेशन पार्टीत. बाळाने पत्र लिहिलं जान्हवीला, त्यात पायाचा उल्लेख आजोबांच्या etc. तेव्हा कळलं की अजून पाय तसाच, एरवी मी कशाला ह्या शिरेलीच्या वाटेला जातेय.

जानूचा पगार ४० ते ४५ हजार आहे. बाबांना ती १५ ते २० हजार देते. बाकी तीला खर्च काय? कपडे मोठ्या सासूबाई शिवतात, डबा बाकीच्या सासवा देतात. बँकेत सोडाआणायला गाडी आहे. बाकीचे पैसे जातात कुठे? मला हिशोब हवाय.

पिंट्याच्या सगळ्या गोष्टींना मी स्वतःला जबाबदात धरते >>> हो ना , किती आता रडारड ती .
उठसुठ आपलं तोंड पाडून बसलेली असते. आणि सारखी टिपं गाळते. आणि मग तो श्री येतो ,
काय झालंय ?
काही नाही !
मग अशी का बसलीयसं ?
काही नाही .

सारखं आपलं तेच दळणं .

पिंट्याच्या कशाला, ह्या शिरेलीसाठी पण तीच जबाबदार आहे, मग सांगते का प्रेक्षकांना मी त्रास देतेय तर सिरीयल बंद करा. अर्थात रिमोट आपल्या हातात असतो हे आपलं नशीब.

बाकीचे पैसे जातात कुठे? मला हिशोब हवाय. >> भगवती , "नेशन वॉन्ट्स टु नो " का?

कपडे मोठ्या सासूबाई शिवतात, >> हो बघितला ना त्यानी चांदण्यातल्या डो़जेसाठी शिवलेला मस्त असा पांढरा गाउन !! .
ती काय शाळेच्या गॅदरिंगमध्ये परीचा रोल करतेय का , असे कपडे घालून ????
एक चांदणीवाली छडी आणि चंदेरी पंख आणून द्या आता.

ती काय शाळेच्या गॅदरिंगमध्ये परीचा रोल करतेय का , असे कपडे घालून ????
एक चांदणीवाली छडी आणि चंदेरी पंख आणून द्या आता.>> फोटो हव्वाय.

पिंट्याच लग्न दसर्याला आणि जानीच डोजे कोजागिरीला असे काहितरी होते ना. आता डोजेसाठी १ तासाचा महाएपिसोड आहे. मग पिंट्याच्या लग्नाचे काय झाले Uhoh
१) पुढे ढकलले
२) मालीकेच्या सोयीसाठी दसरा आधी आणि कोजागिरी नंतर आहे Proud
३) माझा काहितरी गोंधळ होत आहे

नक्की काय Uhoh

पिंट्याच लग्न दसर्याला आणि जानीच डोजे कोजागिरीला असे काहितरी होते ना. >>> मला तरी असच वाटलं होतं.
दसरा झाला , पिंट्याचं लग्नाच काय झालं ? ती मुलगी येणार होती , पंतानी सुचवलेली , दसर्याला . तिच काय झालं?

काहीही म्हणा पण ह्या शिरेलीने नवीन गणित मांडणी केली.

७ वा महिना = एक वर्षे.

९ महिने ९ दिवस = ? (गणित सोडवा. कोणालाच येणार नाही).

ती मुलगी येणार होती , पंतानी सुचवलेली , दसर्याला . तिच काय झालं?>>> ते पुढे ढकलले आहे काही करणाने. कलाबाईच म्हणत होत्या मागच्या एका भागात.

त्या ५ आया म्हणतात की जानीच्या डोजेला तिच्या माहेरच्याना नाही बोलवायचे. तर त्याच क्षणाला कलाबै रिक्षातुन पिशवी घेऊन उतरताना दाखवल्यात. ते विकीपिडीयावर या सिरीयलचा शेवट लिहीलाय तो खरा आहे की काय देव जाणे.:अओ: तसे असेल तर मला शेवट नाही आवडणार.

ते जानीचे बाळ जाते म्हणे. म्हणजे बहुतेक कलाबै शी तिचे काय भान्डण वगैरे दाखवणार असतील, मग कलाबै काहीतरी बोलणार आणी हिला मानसीक धक्का बसणार असे असेल. हे मागे विकीवर लिहीले होते तेव्हा वाचले. त्या आधी इथेच कोणीतरी लिहीले होते.

तो मन्द्या प्रेक्षकाना अजून मन्द बनवतोय. बाकी काही नाही. हिची कुर्मगतीची डिलीव्हरी प्रोग्रेस बघीतली तर ते बाळ बहुतेक स्वतःचाच बड्डे आत साजरा करुन मग बाहेर येऊन सर्प्राईज पार्टी देईल.:खोखो: ( अपेक्षा आहे की निदान शेवट तरी चान्गला असेल)

Pages