होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांभाळा सौख्यभरे>>>:फिदी: अरे कोणीतरी त्यान्च्या थोपु वर लिन्क द्या रे याची. म्हणजे जनाची नाहीतर मनाची तरी वाटुन सुधरतील ते.:फिदी:

जानीसाठी गाणे- दुनियामे लोगोन्को धोखा यही हो जाता है

कलासाठी- हमसे ना ट्कराना हमसे है जमाना

पिन्ट्यासाठी- या रावजी, बसा भावजी

जानीचे बाबा- मुझे तुमसे कुछ भी न चाहीये, मुझे मेरे हालपे छोड दो

सरु मावशी- कही करता होगा वो मेरा इन्तजार

बेबी आत्या- मेरी मर्जी ( गोविन्दा)

आई आजी- या लाडक्या मुलीनो

श्री बाळ- बडे मिया दिवाने ऐसे न बनो

पिन्ट्याची सुनिता- सोना कितना सोना है, सोने जैसे तेरा मन

जानीचे बाबा- मुझे तुमसे कुछ भी न चाहीये, मुझे मेरे हालपे छोड दो>>> खास कलासाठी "कुछ ना कहो कुछ भी ना कहो"

रश्मे तुने मेरे मुंह की बात छिन ली. मला पण सेम वाटतंय की हि लिंक डकवावी तिच्या टाईम लाईन वर. संन्यास घेऊन हिमालयातच जाईल बिचारी. Proud

असं ऐकलं आहे की श्री (शशांक केतकर) त्याच्या वडलांच्या कंपनीमध्ये काम करायला सुरू करणार आहे... खरं आहे का?

असं ऐकलं आहे की श्री (शशांक केतकर) त्याच्या वडलांच्या कंपनीमध्ये काम करायला सुरू करणार आहे... खरं आहे का?>> खर की काय, अस असेल तर ही मालिका लवकर संपेल. :हुश्श:

>>> अंजली_१२ | 9 October, 2015 - 00:52

श्री बाळ खाली का झोपतो?
<<<

पलंगावर झोपलं तर पडतं ते येडं, म्हणून!

उश्याही नाही आहेत त्या उद्योजकांकडे, त्याच्या दोन्ही बाजूंना लावायला!

पलंगावर झोपलं तर पडतं ते येडं, म्हणून!

उश्याही नाही आहेत त्या उद्योजकांकडे, त्याच्या दोन्ही बाजूंना लावायला!>>>>>:हहगलो:

ती बेबुटली म्हणतेय आजकाल पाचव्या,सातव्या,नवव्या महिन्यात डोहाळेजेवण करतात ..आपण जान्हवीच पाचव्या महिन्यात चांदण्यातल डोहाळेजेवण करूयात
तर नर्मदा बाई म्हणतायत त्याला अजून अवकाश आहे बेबी Uhoh ....पाचवा महिना यायला अजून अवकाश Angry ..आवरा रे ह्यांना कोणीतरी

Color combo baghun bhiti ch vatli ekdum>>> Color combo च काय तिच वेड्यासारखे हसणं, रडणं, बडबडणं, काहीही हं श्री म्हणणं सगळ्याचीच भीती वाटते Proud

whatsapp च्या जोक्सला कंटाळून
जान्हवीनी स्टेटस टाकले .......,
माय लाइफ, माय रूल,,
माय डिलीवरी, माय मूल ......!!!

डी Rofl

कै च्या कै प्रश्न आहे हा ^
अजून तिच्या पाचव्या महिन्यातल्या डोहाळे जेवणाच्या गप्पा चालू आहेत

अजून पिन्ट्याच लग्न व्हायचय , सरू मावशीच लग्न ठरायच , बेबी आत्याच प्रकरण लायनीवर यायचय , गीता आणि मनिश ला नविन घर घेतल की बाळाच प्लॅनिंग करायचय , इन्दू काकी आणि श्री मधला गैरसमज दूर व्हायचाय , कलाबाईना मनासारखी सून मिळायचीय , जान्व्हीची २-३ डोहाळेजेवण व्हायची आहेत , जान्व्हवी आणि श्री बाळातले लटके रुसवे फुगवे कमी व्हायचेत , छोट्या आईला बंगलोर वरून परत यायचय , जान्व्हवीला कळायचय की आता पिन्ट्या मोठा झाला - त्याचे प्रॉब्लेम्स त्याला सोडवू द्यावेत , जर सुनीता सून म्हणून आली तर तिची आणि कलाबाईची दिलजमाई व्हायची आहे , अजून नवरात्र-दसरा-दिवाळी-नाताळ-मार्गशिर्श-होळी-पाडवा सगळं सगळ व्हायच आहे .
मग नंतर जानीच्या डिलिवरीच काय ते बघू .

परवा जानीचे बाबा कलाबाईंना म्हणले "आता तिचे दिवस भरत आलेत" म्हणजे लवकरच श्रीफळ येणार का? पण एकीकडे तिची गोखल्यांकडे २-३ डोहाळेजेवण व्हायची आहेत Uhoh गणित काही सुटत नाही.

परवा जानीचे बाबा कलाबाईंना म्हणले "आता तिचे दिवस भरत आलेत" >>>> हो ना. मी पट्टकन म्हणाले "काही काय अजुन पोट पण दिसायला तयार नाही दिवस कुठले भरायला.."

Pages