होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज पाहिला थोडा भाग तर सरू मावशी म्हणे, 'आजकालची मुल लग्नानंतर हनीमूनला जातात मला मात्र चारी धाम यात्रेला जायचय. अन् त्यानंतरपण भारतभर देवदेव करत फिरायचय.' >>>>>

मग लग्न कशाला करायचंय??? Happy

जान्हवीच्या बाबांच्या पायाचे ऑपरेशन कृष्णा करणारेय Happy आईच्या आयुष्यात करायच्या राहुन गेलेल्या गोष्टी करण्यातली ती एक महत्वाची गोष्ट आहे इतर आज्या, मामा यांच्या सुरळीत आयुष्यानंतर. Wink

सरू मावशी म्हणे, 'आजकालची मुल लग्नानंतर हनीमूनला जातात मला मात्र चारी धाम यात्रेला जायचय. अन् त्यानंतरपण भारतभर देवदेव करत फिरायचय.' >>>>>

मग लग्न कशाला करायचंय??? >>>+११११११

लग्न करायचा एवढा अट्टाहास कशाला. तिला लग्न नक्की कशासाठी हवय. चार धाम यात्राच करायची आहे तर देवळाना attached बर्याच धार्मिक tours असतात. अस जमल तर सन्सार वाल नाटक कशाला उगाच. सध्या लेखिका कोण आहे?

सगळ्यान्ची लग्न होतात मग माझच का नाही वगैरे कहितरी एकदा रडत होती .
श्री ला म्हणाली , मी कुमारिका मेले तर माझ लग्न वडाच्या झाडाशी लावून देशिल ना

लग्न करायचा एवढा अट्टाहास कशाला. तिला लग्न नक्की कशासाठी हवय. चार धाम यात्राच करायची आहे तर देवळाना attached बर्याच धार्मिक tours असतात. अस जमल तर सन्सार वाल नाटक कशाला उगाच. 
>>
देव टुर्स ममधल्या नंदिनी मॅडम अरेंज करतात त्या टुर्स

लग्न झालं नाही ना? मग देव टुर्स मध्ये ककाम करा की! Happy

बालक जन्माला आले की ताडताड चालत घराबाहेर जाऊन बंगल्याकडे बघत म्हणेलः

"ओह माय गॉड! पुन्हा त्रिशंकू सरकार आले?"

खरंच??? त्यामुळे तरी मालिकावाल्यांना कळेल का लोक कंटाळलेत आता ते. कारण पब्लिक वोटींगवर दिले ना अॅवार्डस्.

काल मनिष ने पिंट्याची बातमी त्याच्या बायकोला सांगितली पण महत्वाचं म्हणजे ही गोष्ट जाह्नवी च्या आई ला माहित नाही हे सांगायला उशिर केला, नेहमीप्रमाणे गडबडीत असल्याने बायकोने ऐन महत्वाच्या गोष्टी ऐकतानाच फोन ठेवावा? Uhoh
त्यातून ती काहीतरी गौप्यस्फोट करणार हे लक्षात येताच जाह्नवी ने तिला साधा डोळा मारून खुणा करून थांबवू नये? नुसतंच भांबावल्यासारखं (अ‍ॅक्चूली माठासारखं) नुसतंच पहात बसावं?

जाह्नवी ची ब्रह्मानंदी लागलेली होती (नेहमीप्रमाणे) तर चक्क श्रीरंग गोखले तिला काय 'मिसेस सहस्त्रबुद्धे' म्हणाला चक्क.... Uhoh
मिसेस म्हणायचं असेल तर गोखले किंवा अगदी सहस्त्रबुद्धेच म्हणायचं असेल तर मिस म्हणायला हवं होतं ना? Uhoh
सध्या या शिरेलिच्या डायरेक्टरने भांग प्यायला सुरू केलेली दिसते. Proud

Biggrin
.... आणि आपण पिंट्याला गिफ्ट काय देउया तर म्ह्णे.. घर देऊया !!!!!!
अर्थ कळला का काही याचा???
इतके दिवस गोखले गृह उद्योग म्ह्णजे आपण यांचा लोणची, पापड विकण्याचा बिजनेस आहे असं समजत होतो, ते तसं नसून गृह उद्योग म्हणजे गोखले घरं विकतात, त्यातलंच एखादं देऊया असं म्हणायचं असणार श्री ला Wink
उद्योगपती लेकाचा !

या मालिकेला या वेळी एकही अवॉर्ड नाही मिळालं बहुतेक. हुश्श्श्य !!!

मिळाली अवार्ड्स. बेस्ट सासवा आणि बेस्ट व्हिलन (जानुबैच्या आई). अजून एक मिळालं वाटतं. Sad

अरे तिच बेस्ट व्हिलन आहे. तिला स्क्रीनवर बघितल रे बघितल की आता हिला काय फेकुन मारु असा विचार येतो.. बोलायला लागली की तर नक्को अस होत.. आय गेस हिच पावती आहे तिच्या कामाची..

'मिसेस सहस्त्रबुद्धे'>>>>>>>>>>>>>> अकलेचा दुष्काळ :रागः

हो मुगु तिने बेस्ट काम केलंय. मला आवडते ती. गुंतता हृदय हे मध्ये पण आवडली.

मी सुहास्बैना वोट दिलं होतं, तिने पण चांगलं केलंय. मी एक दोनच बघितले एपिसोड.

बाबांच्या ऑपरेश्नसाठी ही बाई त्या अधेड उमर टकल्या आपटेशी लग्न करत होती. आणि आता चांगला आणि श्रीमंत नवरा आहे तर ऑप्रेशनचं आठ्वत नाहीये.

हो ना, लोन घेतल होत त्याच काय झाल कोण जाणे?

अग हि पझेसिव्ह म्हणजे "मला कोणी काही सांगितल नाही, मला कळवल नाही, माझी आता कुणाला गरज नाही " या अर्थी पझेसिव्ह झालीय.. जस मुलाच लग्न होउन सून घरात आली की आयांच्या सासवा होतात तस..

Pages