Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिचे पोट फक्त नाईट गाउन मध्ये
तिचे पोट फक्त नाईट गाउन मध्ये दिसत.
एकदाच बसून काय ते ठरवा म्हणावं नक्की पोट दिसायला हवय कि नकोय
एरवी ढगळ ड्रेस मध्ये किन्वा साडीमध्ये सपाट >> हो ना नाईट गाउन मध्ये दिसत नंतर निळ्या ड्रेस मध्ये दिसत नाही परत गुलाबी ड्रेस मध्ये दिसायला लागत ...अरे हे काय आहे
काही भरवसा नाहीएय श्रीबाळाचा
काही भरवसा नाहीएय श्रीबाळाचा नंतर ते कदाचित अर्धा तास प्रवचन देऊ ही शकत की नदीवर विसर्जन करून त्याने एकप्रकारे पर्यावरणाच संवर्धनच केलय म्हणून (कस ते तोच जाणो )
हे सगळे जण मध्ये मध्ये जानीला
हे सगळे जण मध्ये मध्ये जानीला - " तु प्रेग्नंट आहेस ना " किन्वा आपाप्सात " अग पण ती प्रेग्नंट आहे ना " , कलाबाई नेहमी " ती दोन जीवांची ... " वगैरे म्हणत असतात , बहुतेक लेखकाने ही वाक्यं दिग्दर्शकाच्या लक्शात रहावं म्हणून पेरली असावीत .
एक्दा श्री आणि कोणीतरी बोलत होतं , बहुतेक आई .
ती त्याला कशाबद्दल तरी समजावत असते .
तर म्हणते " आणि तुला म्हाहिती आहे ना त्यात जान्हवी प्रेग्नंट आहे "
तर तो म्हणतो " येस आय नो "
कॉनेक्स्ट मध्ये वाचलत तर ईतक विनोदी वाटतं ते .
जणू मध्ये मध्ये आठवण करून घ्यायची , हीला दिवस गेलेत आहेत त्याची .
मला वाटतं ते बाळ, जानुबाईच्या
मला वाटतं ते बाळ, जानुबाईच्या पोटी जन्म घ्यायला घाबरतंय. काय काय आईचे ऐकायला लागेल आणि बाकीच्यांचे पण. आत असताना अंदाज आला असेल त्याला.
नक्की पोट दिसायला हवय कि नकोय
नक्की पोट दिसायला हवय कि नकोय
" आणि तुला म्हाहिती आहे ना
" आणि तुला म्हाहिती आहे ना त्यात जान्हवी प्रेग्नंट आहे "
तर तो म्हणतो " येस आय नो " >>>
जानीचं बाळ अधून मधून रिवर्स
जानीचं बाळ अधून मधून रिवर्स का घेतंय ? परवा हे एवढं पोट...त्याच्या आदल्या दिवशी सपाट.....आज्काल फार वचावचा बोलायला लागलीये. हा टोन आहे तो कारटी काळजात घुसली मधला टोन आहे तिचा....इथे कॉपि झालाय बहुतेक.
थोतांड समाविष्ट झालं आहे का
थोतांड समाविष्ट झालं आहे का गर्भसंस्कार नावाचं?
जानीचे महिने म्हन्जे ३ पुढे
जानीचे महिने म्हन्जे ३ पुढे आणि २ मागे !
अरे हे काय आहे अ ओ, आता काय करायचं एकदाच बसून काय ते ठरवा म्हणावं नक्की पोट दिसायला हवय कि नकोय
आणि तुला म्हाहिती आहे ना त्यात जान्हवी प्रेग्नंट आहे "
तर तो म्हणतो " येस आय नो
>>>

असं काय करता! ब्रह्मदेवाचं एक
असं काय करता! ब्रह्मदेवाचं एक मिनिट म्हणजे पृथ्वीवरची १००० वर्षं नाहीत का! मग त्याचा आदर्श ठेवून जमेल तसा हिशोब करून मंदे आपल्याला केवढं मोठ्ठं ज्ञान सोप्पं करून सांगातायत त्याची किंमतच कशी नाही म्हणते मी! आं! उगीच भलत्या अपेक्षा बाई!!
फायनली जानी ला केस सरळ करायला
फायनली जानी ला केस सरळ करायला (वेळ किंवा पैसा) काहितरी मिळालं हुश्श
आधी प्रत्येक एपिसोड मध्ये ते वेव्ही केस डोक्यात जायचे
केस डोक्यात जायचे>>> केस
केस डोक्यात जायचे>>> केस डोक्यातच जाणार ना

डोक्यात नाही.. डोक्यावर असतात
डोक्यात नाही.. डोक्यावर असतात केस
म्हणजे सॉरीच हां , पण अगदी
म्हणजे सॉरीच हां , पण अगदी पिन्ट्या ने पळून वगैरे जाउन लग्न करण्याईतकी ती सुनिता मला काही ग्रेट वाटत नाही .
ती कलाबाईना चांगल हॅन्डल करू शकेल आणि तिच पिन्ट्यावर प्रेम आहे ,या निकशावर सगळे त्यांच्या लग्नामागे का लागले आहेत.
एकतर मला ती सुनिता काही फार स्मार्ट वगैरे वाटत नाही.
प्रत्येक वेळी येउन काहितरी घोळ घालते.
अति शहण्पणा करून पहिल्यान्दा पिन्ट्याच्या घरी , मग गोखल्यांच्या घरी थडकते.
परवा विसर्जनाच्या वेळी "जान्वी ताय " करून घोळ घातला .
पिन्ट्याला आपल्या प्रेमाचा साक्षात्कार होतो तो प्रसंग ही फार कच्चा होता.
आणि त्यात ती , रोहन्या म्हणायच सोडत नाही .. वैताग !
कलाबाई म्हणतात ते बरोबर आहे , ज्या मुलीला बोलायची , वागायची पोच नाही , त्या मुलीला त्यानी का म्हणून सून म्हणून घरी आणावं ?
कलाबाई म्हणतात ते बरोबर आहे ,
कलाबाई म्हणतात ते बरोबर आहे , ज्या मुलीला बोलायची , वागायची पोच नाही , त्या मुलीला त्यानी का म्हणून सून म्हणून घरी आणावं ? >>> +१
ती कलाबाईना चांगल हॅन्डल करू शकेल >>> ह्याबाबत सुद्धा मला शंकाच वाटते... कायम तडतडबाजा वाजत राहेल काही दिवसांनी आणि पिंट्या आणि बाबा दोघेही डोक्याला हात लावून बसतील... जान्हवीच काय जातंय एसी रूममध्ये बसून बोलायला!
पण हे ही खरच... "मियां बीबी राजी तो क्या करेगा काझी!"
पिंट्या पळून गेला? व्वा व्वा!
पिंट्या पळून गेला? व्वा व्वा! आता मालिका बघायला हवी.
पिंट्या पळून गेला? व्वा व्वा!
पिंट्या पळून गेला? व्वा व्वा! आता मालिका बघायला हवी. >>
ज्या मुलीला बोलायची , वागायची पोच नाही , त्या मुलीला त्यानी का म्हणून सून म्हणून घरी आणावं ? >>> अशी एक मुलगी पण आहे त्याना आता त्यात सूनदेखील आणायची म्हणजे!!
अशी एक मुलगी पण आहे त्याना
अशी एक मुलगी पण आहे त्याना आता त्यात सूनदेखील आणायची म्हणजे!! >>> हे भारी होतं
पिंट्या पळून गेला? व्वा व्वा!
पिंट्या पळून गेला? व्वा व्वा! आता मालिका बघायला हवी.>>>:हहगलो:
ज्या मुलीला बोलायची , वागायची पोच नाही , त्या मुलीला त्यानी का म्हणून सून म्हणून घरी आणावं ? >>> अशी एक मुलगी पण आहे त्याना आता त्यात सूनदेखील आणायची म्हणजे!!>>>>लय भारी!:हहगलो:
विनिता
विनिता
ज्या मुलीला बोलायची , वागायची
ज्या मुलीला बोलायची , वागायची पोच नाही , त्या मुलीला त्यानी का म्हणून सून म्हणून घरी आणावं ? >>> अशी एक मुलगी पण आहे त्याना आता त्यात सूनदेखील आणायची म्हणजे!!>>>>लय भारी >> + १००००
विनिता
विनिता
पिंट्या पळून गेला? व्वा व्वा!
पिंट्या पळून गेला? व्वा व्वा! आता मालिका बघायला हवी.>>>

पिंट्या पळून गेला? >>> तो
पिंट्या पळून गेला? >>> तो कसला पळतोय .
आईचा धाक आणि बहिणीची माया या पलिकडे काय आहे त्याच्यासाठी .
त्याचे भाओजी मागे लागलेयत , पळून जा आणि लग्न कर म्हणून .
पण जानीला ते पसंद नाही आहे - ती तहाच्या गोष्टी करतेय .
कलाबाईना समजावून त्यान्च मन वळवण्याचा प्रयत्न आहे तिचा .
तिच वागण अर्थातच सगळ्याच्या कळण्यापलिकडचे आहे.
ईकडे बेबी आत्या आणि सरु मावशीच भांडण झालयं
एकमेकीना टोमणे मारून झाले .
श्रीने सरूमवशीला वचन दिलं की येत्या एक वर्शात निदान तिच लग्न ठरलेलं तरी असेलं .
अचानक श्री बाळ मोठा
अचानक श्री बाळ मोठा झाल्यासारखं कसा वागतोय
, कधी नव्हे ते तो जानी, बेबीआत्याला सुनवायला लागलायं.
श्रीने सरूमवशीला वचन दिलं की
श्रीने सरूमवशीला वचन दिलं की येत्या एक वर्शात निदान तिच लग्न ठरलेलं तरी असेलं .>>>
अरे बापरे! म्हणजे अजून वर्षभर तरी ही मालिका चालू राहाणार का ?
see the flip side ,चीकू .
see the flip side ,चीकू .
लग्न ठरलं असेल , असं म्हणाला तो .
( आईशप्पथ , हे वाक्य जानीच्या टोनमध्ये वाचून बघा . लिहिल्यावर गंमत वाटली म्हणून ही विशेश तिप्पणी)
म्हणजे जर वर्शभरात मालिका संपेल आणि त्यात सरूमावशीच्या लग्नाचा सोहळा नसेल .
ती जानी दिवसेंदिवस जास्तीच
ती जानी दिवसेंदिवस जास्तीच वेड्यासारखे वागायला लागलिये
काय तर म्हणे पिंट्या अजुन लहान आहे. म्हणजे काय ही लहान मुलाचे लग्न लाऊन देणार आहे
त्याला आता मी सांभाळतेय आणि मग सुनीता सांभाळेल 
आता मी सांभाळतेय आणि मग
आता मी सांभाळतेय आणि मग सुनीता सांभाळेल >>>> पहिल्यापासून या सिरियल मधे कोणीतरी कोणाला तरी सांभाळतच आहे. बेबी आत्या आणि कलाबाई सोडून !
आई आजी गोखले गृह उद्योगाला !
पाच आया (आई=आया अनेक वचन.. इती कणेकर उवाच) श्री बाळाला !
त्या पाच जणी कमी झाल्या म्हणून की काय, जानी पण श्रीबाळाला !
अत्यानंदबाबा सरु मावशीला !
आता जानी 'अनंत काळाची ' माता होऊ घातली आहे, तर श्रीबाळ जान्हवीला !
त्यामुळे आपल्यासारख्या पामर प्रेक्षकांनीही या सिरियलला सांभाळून घेतलं पाहिजे...
... सांभाळा सौख्यभरे !
सांभाळा सौख्यभरे !> > हाहा!
सांभाळा सौख्यभरे !> > हाहा!
Pages