होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

७ वा महिना = एक वर्षे. >> हे कधी झाल?
अन्जु ताई , हे डोजे पाचव्या महिन्यातले आहे , सातव्या महिन्यातले यायचे अजून . Happy

पाचव्या महिन्यात डोजे करतात? मला नाही माहिती. तिसऱ्या महिन्यात चोर ओटी आणि ७ व्या महिन्यात डोजे हेच मला माहितेय. मला वाटलं डोजे चर्चा म्हणजे ७वा सुरु. मी नाही बघत ही शिरेल.

गणित चुकलं मग ५ वा महिना= १ वर्ष.

पाचव्या महिन्यात डोजे करतात? मला नाही माहिती. तिसऱ्या महिन्यात चोर ओटी आणि ७ व्या महिन्यात डोजे हेच मला माहितेय.>>> हो म्हणजे सातव्या महिन्यातच करतात , पण काही जण हौस म्हणून ५ व्या , ७ व्या आणि ९ व्या महिन्यातही करतात .आपण मजा म्हणून करूया गं . जरा त्या निमित्ताने घरात काहितरी समारंभ आणि आनंदी वातावरण ! ....... हे मी नाही जानीच्या सासवा म्हणत होत्या Happy .

स्वस्ति नी पोस्‍टलेल्या फोटोत जानी चा झगा फुल स्लिव्ज आहे, आणि डोजे च्या प्रोमोज मधे जानी स्लीवलेस ड्रेस मधे दिसते. Uhoh

आणि डोजे च्या प्रोमोज मधे जानी स्लीवलेस ड्रेस मधे दिसते. >> तिने कापले असतील डोजे झाल्यावर स्लिव्ह्ज कारण नंतर डोळे बांधुन फक्त नवर्‍याबरोबर हॉलमध्ये जायच आहे ना मग? Wink :फिदि:

कालचा अख्खा एपिसोड "आजची सोनोग्राफी आणि तिचे महत्त्व" या विषयावर फुकट घालवला. पहिल्या ब्रेकच्या आधी जानी-श्री, नंतर ४ सासवा आणि त्यानंतर बाबा, पिंट्या आणि फटाकडी.

कालचा अख्खा एपिसोड "आजची सोनोग्राफी आणि तिचे महत्त्व" या विषयावर फुकट घालवला >>> हो का, मग बघितला नाही ते बरच झाले.

माझ्या डिलीवरी ला 15 दिवस बाकि असताना जानव्ही ला दिवस गेलेले, पुढच्या महिन्यात माझ्या लेकीचा पहिला वाढदिवस आहे

काल एक एपि. पाहिला..

जानीकडे एकच ड्रेस आहे. तो जांभळा.. मोठ्या आईने शिवलेला..
आणि श्रीकडे निळा शर्ट विथ व्हाईट टाय.

काल जानीच्या बाळाने पोटात लाथा मारायला सुरुवात केली.
हिला नक्की कितवा महिना सुरु आहे? बाळ कितव्या महिन्यात लाथा मारायला लागतं?
ते श्रीला पोटावर हात ठेवल्यावर का जाणवलं नाही?

काल जानीची पहिलीच सोनोग्राफी झाली असं तिने आणि सर्व आयांनी घेतलेल्या टेन्शनवरुन कळलं.
सुरुवातीच्या महिन्यात सोनोग्राफी वै. केलीच नव्हती का? Uhoh

ते श्रीला पोटावर हात ठेवल्यावर का जाणवलं नाही?>>म्हणूनच येडचापला खाली झोपायला पाठवलेय

सुरुवातीच्या महिन्यात सोनोग्राफी वै. केलीच नव्हती का?>>>>तेव्हा सोनोग्राफीचा शोध लागला नव्हता गं!

पियु..अगदी हेच म्हणाले मी काल टीव्ही बघताना !
आता सगळ्या आयांना लाथ मारने हां अनुभव घेतल्यावरच सीरियल पुढे जाणार अस वाटल !

डी विनीता Biggrin

Pan shree ne tar tila birthday la ti frame gift keli hoti na ti kasli hoti i think sonography chi hoti

सौम्या. Biggrin

खरेच किती ताणायची सिरियल अगदी अॅड लागली तरी प्रचंड चीड येते. बावळटपणा तरी किती प्रत्येक पात्राचा. कहर आहे.

मी तिचे बाळ असते तर लाथांबरोबर एक कानसुलीत पण हाणली असती Happy जास्त लाडं लाडं केल्याबद्दल.

जान्हवी प्रकल्प Lol Lol
सौम्या Lol

जानुचे कॅलेन्डर डेज न मोजता फक्त सिरेलचे दिवसच मोजताहेत का?!!??

ह्यापुढे कोणत्याही रखडलेल्या सरकारी प्रकल्पाला जान्हवी प्रकल्प असे नांव देण्यात यावे. >>> Lol झी वर अजून डोहाळेजेवणाच्याच जाहिराती बघून अरे अजून डिलीव्हरी नाही का हिची हे चेक करायला येथे आलो, खत्रा कॉमेन्ट्स आहेत इथल्या Happy

काल जानीच्या बाळाने पोटात लाथा मारायला सुरुवात केली.
हिला नक्की कितवा महिना सुरु आहे? बाळ कितव्या महिन्यात लाथा मारायला लागतं? >>>>>>
माझ्या अनुभवाप्रमाणे , बाळाच्या लाथा सहाव्या महिन्यात जाणवतात .
हीचा पाचवा चालु आहे ना .

जान्हवी प्रकल्प Lol , सौम्या Lol

Pan shree ne tar tila birthday la ti frame gift keli hoti na ti kasli hoti i think sonography chi hoti >> ते ही खरचं की !

आणि डोजे च्या प्रोमोज मधे जानी स्लीवलेस ड्रेस मधे दिसते. >> तिने कापले असतील डोजे झाल्यावर स्लिव्ह्ज कारण नंतर डोळे बांधुन फक्त नवर्‍याबरोबर हॉलमध्ये जायच आहे ना मग? >>> म्हणजे नक्की काय ग?? . आता रीपीट बघावाच लागेल .

म्हणजे नक्की काय ग?? . >>>> अग प्रोमोजमध्ये दाखवत होते की पांढर्‍या ड्रेसातल्या जानुचे डोळे बांधुन श्री तिला घेउन जिने उतरत हॉलमध्ये घेउन येतोय, नंतर तिच्या डोळ्यावरची पट्टी काढुन तिला म्हणतो आजचा दिवस आपल्या बाळाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे अस काहीस म्हणुन म्हणाले मी हे..

आता रीपीट बघावाच लागेल . >>>>> काल हे झालच नाही.. अख्ख्या एपिसोडात न्हेमीप्रमाणे डोजेची तयारी त्यातही झाडावरची फुल न तोडता जमिनीवरची फुल वेचुन, धुवुन, वाळवुन त्याच्या माळा करण्याच्या सुचना, पदार्थ कोणते तयार आहेत, कोणते अर्धे झालेत आणि कशाला आईआज्जींची मदत हवीय, जानुचा मेकअप, ती गच्चीवर आल्यावर श्रीच तिच्याकडे बघत बसण, सख्ख्या सासुनेच तिची सगळी ओटी भरण (पाच नारळ, पाच फळ आणि सुकामेवा) आणि मावशींच्या डोक्यातुन निघालेल्या आयड्याच्या कल्पनेप्रमाणे उपस्थित प्रत्येकाने जानु आणि तिच्या बाळाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करण यामध्ये आईआज्जी आणि श्रीची आई यांचेच नंबर्स काल लागले बाकीच्यांचे आज.... एकदा फक्त गीता आणि मनिष जानीच्या घरी निघालेले असताना वाटेत कडकडी भेटण्याचा सीन, नंतरची तिची कडकड आणि रिक्षाने जानीच्या घरी जायला निघण येवढच काय ते वेगळ झाल..

अग प्रोमोजमध्ये दाखवत होते की पांढर्‍या ड्रेसातल्या जानुचे डोळे बांधुन श्री तिला घेउन जिने उतरत हॉलमध्ये घेउन येतोय, नंतर तिच्या डोळ्यावरची पट्टी काढुन तिला म्हणतो आजचा दिवस आपल्या बाळाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे अस काहीस म्हणुन म्हणाले मी हे.. >>>> अरे देवा ! , ही लोक नको तिथे ईमोशनल , रोमान्टीक होतात .

हो एकदम , साश्रुनयनांचा कार्यक्रम होता तो .
तु मिसलास वाटत ?? >>>> कोणी मी का? >> ह्म्म्म्म

एकदा फक्त गीता आणि मनिष जानीच्या घरी निघालेले असताना वाटेत कडकडी भेटण्याचा सीन, नंतरची तिची कडकड आणि रिक्षाने जानीच्या घरी जायला निघण येवढच काय ते वेगळ झाल..>>>
म्हणजे एक तासाच्या महाएपिसोडमधे फक्त एवढेच बघण्यासारखे झाले का?

Pages