मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना, नवीने टाकलेले सगळेच फोटो सुंदर! शॉर्टकट एंदी तर खूपच मस्त आहे. मी कधीतरी कॉपी करणार हां ती डिझाईन्स.

हा प्रकार त्यांच्यासाठी ज्यांना मेहेंदी काढायला वेळ नसतो पण हातावर तिचा अंश ( होसुमीह्याघ वाल्या जान्हवी चा नव्हे Lol ) हवा असतो .. उगाच जरा रेघोट्या Wink

नेलपेंट इग्नोअर करा Wink

WP_20150527_22_07_58_Pro.jpg

मुली, पुण्यातला तुझा पत्ता देऊन ठेव. किंवा मेंदी गटग करूया! मी नेहमी सगळ्यांना काढून देते नि माझ्या हातावर काढायला वेळ उरत नाही. कधी आयती सापडलीस तावडीत तर हात रंगवून घेईन म्हणते! Wink Proud

प्रज्ञा९ >> माझ पण तसचं होतं . गम्मत म्हणजे मी जेव्हा म्हणते की मला काढून द्या कोणीतरी तेव्हा सगळे हात वर करतात अथवा कोणाला जमतच नै काढणं Sad

सक्काळी सक्काळी मस्त रिमझिम पाऊस सुरु.. बॅकग्राऊंड ला वो कौन थी मधलं नैना बरसे.. रिमझिम रिमझिम चालु होतं . कातिल माहोल बनलेला सो उरलासुरला कोन ओतला मी हातावर त्याच्याच हा परिपाक Wink ..

जेवढ्या स्पीड नी काढली त्याच्या दुप्पट वेगात हात धुऊन पन टाकले Proud

WP_20150605_10_39_52_Pro.jpg

Pages