मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

anju +१११११११११११११११११११
टिने, दिड वर्शापुर्वीचे पराक्रम रंगल्यावर कसले ऑसम दिसत असतील.

चुम्मेश्वरी दिसताता रीये..एक नंबर..
AddEmoticons04225.gif

माझ्या खुप आवडत्या मेंदीपैकी एक ही पन.. दिसायला भरगच्च..काढायला सोप्पी आणि रंगते पन भारी Wink

तू मला भेटशील ना जेंव्हा तेंव्हा कोन घेऊनच ये गं Proud
जिथे कुठे कोपरा मिळेल तिकडे खोअपच्यात दाटिअवाटीत उभारून का होईना आपण मेहंदी काढू (म्हणजे तू काढ Proud )

बिल्कुल,
मी या ववि ला आली असती ना तर तुझा आणि दक्षिणाचा हात रंगवुन दिलाच असता..
ती त मला बरच कै कै ऑफर करतेय Wink
AddEmoticons0424.gif

अंजु +१>>> ++++++++ १११
टिना.. रियाला भेटायला जाशील तेव्हा मला सांग.. मी स्वतः भेटायला येते तुला.. कोन घेवुनच! डोळा मारा>>> मी पण मी पण Happy
एएएएए टिणु म्या बी लायणीत हाये मेंदी काढायला... Happy

कसल काय अन कसल काय..
या डीझाईन्स ना ते डीजाईन्स म्हणुन घ्यायला पण तयार व्हायचे नै.. Lol
आणि इकडून तिकडून जांगडबुत्ता करुन काढलेल्या आहेत ग ह्या..त्यात माझ कार्य ते काय Sad

मी पण मी पण स्मित
एएएएए टिणु म्या बी लायणीत हाये मेंदी काढायला... >>>> आधी भारतात ये खळीवाले म्हणे लायणीत हाये मेंदी काढायला..

रिये मला पण फोन कर हां तु टीनाला भेटशील तेव्हा, मलापण मेंदी काढुन घ्यायची आहे.. टिना त्याबदल्यात तुला नॅचरल्सच आइस्क्रीम खायला घालीन..

आता एखाद्याला देवाने गुण तरी किती द्यावेत. किती allrounder असावं.++१११११
tina बाय आपण कुठे राहता ?
एकदा धाड टाकावीच लागेल
इन्स्टंट मेहेंदी कोन.. - म्हणजे काय ? किती वेळात रंगते मेहंदी ?

टिना, डायरेक्ट नॅचरल्सच हव की नॅचरल्सच्या चवीसारख होमेड पायजे ते पण सांग Happy

मला एक शंका आहे मेंदी रंगण्याविषयी.. मी लहान असताना किंवा फारफार तर कॉलेजात जात असताना पर्यंत मेंदी रंगण ही अतिशय कष्टाची आणि लकची गोष्ट मानली जायची. मग ती रंगावी म्हणुन लिंबु, साखरपाणीच लाव, लवंगांची धुरीच दे, असल काहीबाही करायचे.. मी तर एका विशिष्ट पार्लरमधुन आणायचे कोन कारण तिथल्या सारखी इतर कोनातली मेंदी रंगत नाही म्हणुन.. पण गेल्या काही वर्षात एक गोष्ट लक्षात आली की मेंदी अगदी कमी वेळ ठेवली तरी दोन दिवसात काळी पडेपर्यंत रंगते यामागच कारण काय असेल?

टिना,
केंव्हापासून लिहिन म्हणते पण विसरते, आत्ता हा बीबी वर आला म्हणून लिहावेसे वाटले.
एवढी छान कलाकार आहेस, तर प्लिज ते इन्स्टन्ट कोन्स, मॅजिक मेन्दी , ब्लॅक अरेबिक मेंदी इ. अजिबात वापरु नका , लहान मुलींवर तर अजिबातच नको!
या मधे para-phenylenediamine सारखी हार्मफुल केमिकल्स असु शकतात
अजुन काही साइड इफेक्ट्स झाले नाहीत म्हणून वाट पाहु नका प्लिज, इट्स नॉट वर्थ टेकिंग रिस्क :(.
थोडं गुगल सर्च केलं तर इतके भयानक साइड इफेकट्स वाचायला मिळतील कि पुन्हा इच्छा होणार नाही !
हे घे या लिंक्स नक्की पहा,
ब्लॅक हेना वॉर्निग :
http://www.hennapage.com/henna/ppd/whatisppd.html

एका बाईचा रिअल मेडिकल एक्स्पिरिअन्स :
http://www.hennapage.com/henna/ppd/wilson.html

बाकी Keep doing good work Happy

डीजे, मला पण कल्पना आहे अगं या इन्स्टंट ची..
सहसा नसते काढत म्हणा..एखाद्यावेळीच करते..पण ओके आता नै काढणार Happy
मला दाट शक्यता आहे पण कि त्यात अलितं/आलतं असत..असो..
लिंक उघडायची हिम्मत नै केली म..बघीतलेले आहे मी रिझल्ट्स यापुर्वीही.. ज्या लोकांनी नाही पाहिले त्यांनी नक्की बघा..ती खरच हानीकारक ठरू शकते..

इन्स्टंट मेहेंदी कोन.. - म्हणजे काय ? किती वेळात रंगते मेहंदी ? >> अग त्यात लिक्वीड असत जरास घट्ट पण..ते वाळत दोन मिनिटात आणि मग फेविकॉल सुकल्यावर कसे साल निघतात तसे निघतात..पण डीजे म्हणातात त्याप्रमाणे ती छान नसते अस माझ्या सुद्धा ऐकीवात आहे.. सो नकोच वापरु ती Happy

मुग्धटली, भेटू तस ठरवू Wink
मी सुद्धा बरेचदा लावली कि लगेच धुवुन टाकयची ती तरी पन रंगायची..पण इतक्यात नै रंगत..
तरीही मला अस वाटत कि हाट हवेशीर ठेवला कि छान रंगते म्हणुन Proud खखोदेजा..
कधीकाळी भरपुर रंगायची मेहेंदी..मुख्ख्यत्वे करुन १४ ते २० २१ वयात.. अ‍ॅज अ सायन्स स्टुडंट मला वाटत कि याट हार्मोनल चेंजेस मुळे शरीरात होणारे बदल आणि उष्णतेचा बराच सहभाग असावा Happy

किती वेळ लागतो एका हाताला ? आणी थोडे चुकले तर खोड रबरासारखे काही असते का ? >> vijaykulkarni, मुड वर डिपेंड करते ते..कधी लवकर होतो..कधी खुप हळू.. खोडरबर प्रकार नै आहे यात Happy

स्वत:च्या आणि इतरांच्या हातावर मेंदीची नक्षी काढून जमाना लोटला Happy
टीना, मायबोलीवर चक्कर मारलीच आणि धागा पहिल्या पानावर असेल तर नक्कीच उघडून बघते. प्रतिसाद द्यायचा योग आज आला. एखादे यंत्रदेखील काढणार नाही अश्या सफाईने मेहेन्दी काढता तुम्ही!
रच्याकने - श्रावण आला! यावेळचा लोकप्रभाचा साप्ताहिक अंक - मेहेंदी विशेषांक आहे Happy

एएएएए टिणु म्या बी लायणीत हाये मेंदी काढायला... >>>> आधी भारतात ये खळीवाले म्हणे लायणीत हाये मेंदी काढायला.. >>> मुगु अग येणार हाये मी बै.तुझ्या काणात तारिख सांगत्ये . Wink Happy

पुण्यात हातापायावर मेंदीची प्रॅक्टीस करायला कुणाला २ हात आणि २ पाय हवे असतील तर मी तयार आहे. Proud मला विपु करा प्लिज.

मला मेंदी खूप आवडते पण मला साधा कोन पण हातात पकडता येत नाही.

Pages